"आर्टिकल ३७० चा राजकीय थरार"

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in राजकारण
29 Feb 2024 - 3:48 pm

बहुतेक लोकांनी अलीकडे थिएटर कडे सिनेमा बघायला पाठ फिरवली आहे हे एव्हाना बॉलिवुडवाल्याना नक्की कळले असेल. पण तरीही सिनेमा बनविण्याचे काही धाडसी प्रयत्न होतात.
काश्मीरला भारतापासून वेगळे पाडण्याचे सातत्याने प्रयत्न ज्या कलम ३७० मुळे होत होते, ते कलम रद्द करण्याचे अभुतपुर्व कार्य मोदी सरकारने केले. त्या रद्द करण्याच्या प्रक्रियेची माहिती देणारा - Article 370- हा सिनेमा आहे. इतका गुंतागुंतीचा आणि राजकीय वाटणारा पण सामाजिक सुद्धा असणारा हा विषय चित्रपट बनविण्यासाठी निवडला हे प्रचंड साहस आहे.
ताबडतोब आव्हान असणार होते ते हा सिनेमा बनवायचा कसा या विषयीचे ; म्हणजे दिग्दर्शनाचे, कथा कथनाचे. गोव्याचा असणारा याचा दिग्दर्शक खच्चुन ३३ वर्षाचा मराठमोळा युवक आहे. आदित्य सुहास जांभळे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे करायची आवड, म्हंजे तिथून सुरुवात. पण त्याने बनवलेले दोन लघुपट राष्ट्रीय पारितोषिक विजेते आहेत : 'खरवस' आणि 'आबा... ऐकताय ना ?'.

या सिनेमासाठी आदित्यने एक दिग्दर्शक म्हणून अफाट कामगिरी केली आहे. त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. खरेतर एका माहितीपटाचा असणारा अतिशय क्लिष्ट विषय त्याने एका राजकीय थरारपटाच्या रूपात प्रेक्षकांपुढे ठेवला आहे. अजिबात कुठेही हा सिनेमा टिपिकल फिल्मी वाटत नाही. अडीच तीन तास कुठेही कथाकथनातला थरार थांबत नाही. कथाकथनाच्या बाबतीत या सिनेमाने भल्याभल्या सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहेत. कलम ३७० रद्द करण्याची प्रक्रिया आणि काश्मिरमध्ये शिगेला पोहोचलेल्या अतिरेकी कारवाया या समांतर चालणाऱ्या घटनांमधून हा सिनेमा पुढेपुढे जातो.

या सिनेमासाठी केलेल्या पात्रांची निवड अजब आहे. ते कलाकार सुचले कसे याचेच मला पहिल्यांदा आश्चर्य वाटले. त्यांच्यातल्या प्रत्येक कलाकाराच्या अभियानात दिग्दर्शकाचे कौशल्य तर दिसतेच पण प्रत्येक कलाकाराने आपल्यातले कसब जीव एकटवुन ओतले आहे. उदाहरणार्थ यामी गौतम. ही या चित्रपटाची नायिका आहे. एक काश्मिरी मुलगी जी सुरुवातीला लष्करामध्ये कार्यरत असते आणि नंतर गुप्तचर अधिकाऱ्याची भुमिका सादर करते. यामी या वर्षीची सर्वोत्तम कलाकार ठरणार आणि तिला त्या विषयीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार हे नक्की. सिनेमातल्या एका लांबलचक प्रसंगात ती काश्मिर मधल्या अतिरेकी कारवायांबाबत समजावत असते तो प्रसंग या पोरीने काहीच्याकाही ताकतीने उभा केला आहे. सिनेमात असे तीन चार प्रसंग तरी आहेत जिथे यामीच्या अत्युच्य अभिनयाचा अनुभव येतो. अरुण गोविल यांनी पंतप्रधानांची भुमिका सादर केली आहे, दिग्दर्शकाची कमाल आहे ! किरण करमरकर या मराठी रंगभुमीवरच्या पण सिनेमा आणि टीव्हीवर स्थिरावलेल्या अभिनेत्याने गृहमंत्र्यांची केलेली भुमिका विसरता येणे अशक्य आहे. आणि प्रियामणी ! ही मुळची बंगळुरूची पण तामिळ, तेलगु सिनेमात अभिनय करणारी आघाडीची अभिनेत्री. विद्याबालनची चुलत / मामे /मावस पण बहीण. पंतप्रधानांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याची भुमिका प्रियाने सादर केली आहे. तिचे पात्र उभे करण्यात दिग्दर्शनाचा कहर झालाय. प्रियाने अप्रतिम काम केलंय.

काश्मिरी नागरिक सोडले तर अन्य भारतीयांसाठी कलम ३७० रद्द होणे ही प्रामुख्याने केवळ एक बातमीच असेल. ते कलम आबाधित ठेवण्याचे, मुळात ते घटनेमध्ये घुसडण्याचे पाशवी कट कारस्थान किती भयंकर होते याचा अभ्यास सामान्य माणूस का आणि कशासाठी करेल ? त्यामुळे ३७० कलमाशी संबंधित इतिहासातल्या अनेक व्यक्तीनी तमाम भारतीयांची किती क्रूर फसवणुक केली हे आपल्याला कसे आणि कधी कळणार ? त्या कलमाचा आधार घेऊन आजवर किती भयंकर राजकारण आणि अर्थकारण केले गेले याचा थांगपत्ता तरी कसा लागणार ? अनेक माहिती नव्याने या सिनेमामधून पुढे येते. मोदी सरकारने ते कलम हटविण्यासाठी किती आणि कसे अचाट प्रयत्न केले हे अन्यथा समजले नसते. हा सिनेमा तथ्यांवर आधारित आहे असे निर्मात्यांचे लिखित स्वरूपात निवेदन आहे.

मोदींनी काय केले या प्रश्नाची गाडीभर उत्तरे आहेत. पण कलम ३७० रद्द करून भारतीय समाजावर अनंत उपकार केले आहेत, हे नक्की. नेहरूंनी केलेल्या चुकांपैकी एक मोठी चुक मोदी सरकारने अतिशय धाडसाने, निग्रहाने सुधारली आहे. बाकीच्या अनेक सुधारणा आणि देणग्या आहेतच पण कलम ३७० रद्द केले या एका कारणासाठी मात्र केवळ अब कि बार नाही, बार बार मोदी सरकार.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Feb 2024 - 6:28 pm | मुक्त विहारि

प्रचंड सहमत...

अहिरावण's picture

29 Feb 2024 - 7:25 pm | अहिरावण

नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत धावून येणार !!!

मुक्त विहारि's picture

29 Feb 2024 - 10:07 pm | मुक्त विहारि

अशा लोकांना ना कर्झन माहीत नसतो ना सूर्हावर्दी ....

चित्रगुप्त's picture

29 Feb 2024 - 10:55 pm | चित्रगुप्त

नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत

... अबब... अचाट शब्द. मानाचा मुजरा. ( 'विचारजंत' जास्त चपखल वाटेल का?)

मुक्त विहारि's picture

29 Feb 2024 - 11:01 pm | मुक्त विहारि

हो

चौथा कोनाडा's picture

29 Feb 2024 - 8:49 pm | चौथा कोनाडा

भारी लेख !
जातीय सलोख्यावर कृत्रीम पद्धतीने बनवलेले हास्यास्पद सिनेमा पेक्षा असे सिनेमे बघणं भारी असतं
असाच बारावी नापास बघायचा राहिलाय, तो ही बघायला हवा.

रच्याकने, हा लेख कायप्पावर वाचल्या सारखं वाटतंय !
कुणी लिहिलं ते नाव नव्हतं

राघव's picture

29 Feb 2024 - 10:39 pm | राघव

कालच बघीतला! खूप आवडला!!

इथे या चित्रपटाचा परिचय करून दिल्याबद्दल अनेक आभार. (वर्तमानपत्रे, बातम्या वगैरे बघत नसल्याने असा चित्रपट आला असल्याचे माहितीही नव्हते). उद्या परवाच चित्रपट बघण्याचे ठरवले आहे. असे चित्रपट मुद्दाम चित्रपटगृहात जाऊन बघणे हेही एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे मी समजतो - म्हणूनच 'केरला स्टोरी' पण बघितला होता.
कृपया चांगले चित्रपट, आणि टीव्हीवरील चांगल्या कार्यक्रमांविषयी माहिती देत रहावी. अनेक आभार.

.

सुबोध खरे's picture

2 Mar 2024 - 7:27 pm | सुबोध खरे

परखड विचार

प्रथम गुप्तचर विभागात काम करणारी २५ ते ३० वयाची मुलगी नंतर राष्ट्रीय अन्वेषण संस्थेची अध्यक्ष होते आणि अक्ख्या राज्याचा गुप्तचर विभाग तिच्या हाताखाली येतो आणि त्यानंतर ती कमांडो सारखी असॉल्ट रायफल घेऊन दहशवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केवळ दोन गाड्या घेऊन जाते. यासारखा सत्याचा विपर्यास कोणत्याही सिनेमात केलेला नसावा.

शिवाय काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठी केवळ एक चिलखती गाडी असावी आणि शेवटी हातघाईची लढाई असावी इतका तद्दन बाजारू आणि भंपकपणा दुसऱ्या भागात भरल्यामुळे पहिल्या भागात अपेक्षा उंचावल्यावर एकदम खड्ड्यात पडल्यासारखे वाटले.

त्यातून घटनेच्या दुरुस्तीचे कलम फक्त काश्मीरच्या एका वाचनालयातच असावे आणि भारतभर कुठेही नसावं. त्यासाठी तीच मुलगी जाऊन त्या वाचनालयातून घेऊन यावं आणि भारताच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना ते माहिती नसावं इतक्या भंपक पातळीवर हा चित्रपट जातो.

३७० कलम रद्द केल्यावर काश्मिरात हिंसाचार होऊ नये याची जबाबदारी सुद्धा याच मुलीवर असावी? भंपकपणाची पातळी किती खाली उतरवावी?
काश्मिरात लष्कराचे ३ लाख ३० हजार सैनिक तैनात आहेत आणि निदान लाख डिड लाख केनरीय अर्धसैनिक बलाचे जवान तैनात आहेत

सर्वोच्च न्यायालयात टिकाव लागेल असा कायदा तयार करण्यात आणि ३७० कलम रद्द करण्यासाठी किती कायदा विभागातील अधिकारी, कायदे तज्ज्ञ आणि विधी विशेषज्ञ यांनी कष्ट घेतले आहेत याची हा सिनेमा पाहिल्यावर किंचितही कल्पना येणार नाही. सर्व बाजूनी विचार करून केलेले हे जगड्व्याळ काम एका मुलीच्या हिरोईनगिरी वर उभे केलेलं पाहणे हा केवल अत्याचार आहे

एका मुलीच्या हिरोईनगिरीवर "अख्खा सिनेमा" उभा केला आहे.

उगाच ३७० नाव वाचून गेलो होतो टिपिकल बॉलिवूड छाप बाजारीकरण केलेला सिनेमा वाटला.

अर्थात सिनेमा चित्रपटगृहात चालणे आणि सत्य यांचा काहीही संबंध नाही.

केवळ दोन चार सत्य घटनांचा उल्लेख करून सत्याचा पार अपलाप केलेला माझ्या सारख्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला पाहवत नाही.

चित्रगुप्त's picture

2 Mar 2024 - 9:28 pm | चित्रगुप्त

प्रतिसादात मांडलेले सगळे मुद्दे पटले. सत्याचा खूपच (फिल्मी) विपर्यास केलेला दिसतोय त्यामुळे आता हा पिच्चर बघायला जावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. कदाचित गंमत म्हणून फिल्लमबाजी बघायला जाऊही. धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Mar 2024 - 9:51 pm | अमरेंद्र बाहुबली

खुप खुप धन्यवाद खरे साहेब, चित्रपटाबद्दलचे सत्य सांगीतल्या बाबत. असले फालतू सिनेमे लोक का डोक्यावर नाचवतात काय माहीत. मी फसलो तुम्हीही फसा असं काही तरी असावं. मागेही कुणीतरी शेरशहा नावाचा सिनेमा पहा असं इथेच मिपावर सूचवलं होतं. कॅप्टन विक्रम बात्रा ह्यांच्या बद्दलच्या आदरासाठी सिनेमा पाहीला, पण इतका प्रचंड बोलीवूडी फालतूपणा होता काय सांगू?? चार चार मशीनगण ने २० फूटावरचा हिरो मरत नव्हता, चारही मशीनगण त्याच्या पायाजवळच गोळ्या मारत होत्या नी त्यातली एकही गोळी त्याला लागत (म्हणजे त्याच्या दोन्ही पायाला ) लागत नव्हती. विशेष म्हणजे तो दुसर्या सैनिकाला ओढतही नेत होता. मध्येच चालू युध्दात पाकिस्तानी सैन्याशी दात काढत काढत गप्पाही मारत होता. हा ३७० सिनेमाही असाच फालतू दिसतोय. धन्यवाद.

शानबा५१२'s picture

3 Mar 2024 - 4:08 pm | शानबा५१२

नमस्कार,
मी स्वःता एक्स आर्मींच्या खुप जवळचा नातेवाईक आहे, 'काश्मिर फाईल्स' बद्दल आपले विचार, मत माहीती करावसे वाटते. त्या बद्दल आपणच एखादा छोटा तरी लेख लिहावा ही विनंती.

हॉलिवूड काय अन बॉलीवुड काय, बहुतेक पिच्चरात फालतू फिल्लमबाजीच असते. मात्र पैसे खर्चून बघायचे, तर शारूक-सलम्याच्या फालतूगिरीपेक्षा असे पिच्चर बघावेत असे आम्हास वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Mar 2024 - 7:52 am | अमरेंद्र बाहुबली

होलिवूड मध्ये नसते ईतकी फालतूगीरी.

अहिरावण's picture

3 Mar 2024 - 12:08 pm | अहिरावण

काय सांगता ? असेल असेल, तुम्ही म्हणता तसेच असेल. आम्ही काय आंधळे पडलो. नीट दिसत नाही. तुमच्यासारखे मार्गदर्शक आहेत म्हणून बरे !

राष्ट्रवादी सिनेमांमध्ये खरे खोटे वैगरे काही विचारायचे नसते. फक्त गोरिला सारखे छाती पिटत पिटत बाहेर पडायचे असते.

या आधी आलेल्या राष्ट्रवादी सिनेमा केरळ स्टोरी मध्ये पण काही गोष्टी मनाजोगत्या दाखवल्या होत्या. तसे लिहिल्यावर ह्या संस्थळावरचे काही सन्माननीय सदस्य "हागणारे, निर्लज्ज" अश्या भाषेत उत्तरे लिहीत होते.

फक्त गोरिला सारखे छाती पिटत पिटत बाहेर पडायचे असते.
हा हा ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Mar 2024 - 11:05 am | अमरेंद्र बाहुबली

राष्ट्रवादी सिनेमांमध्ये खरे खोटे वैगरे काही विचारायचे नसते. फक्त गोरिला सारखे छाती पिटत पिटत बाहेर पडायचे असते. हाहाहा. षटकार

कंजूस's picture

3 Mar 2024 - 12:31 pm | कंजूस

छान

'आर्टिकल ३७०' पाहिला!
सध्या सचिन तेंडुलकरचे काश्मिरचे एकाहून एक सुंदर व्हिडिओ पाहिले.एका रहिवासी महिलेचे पर्यटनबाबत सकारात्मक मत ऐकले.मागच्या वर्षीच आत्या काश्मीरमध्ये मस्त ट्रीप करून आली होती. तेव्हा प्रश्न पडतो.इतक्या सुंदर काश्मिरला अतिरेक्यांनी नजर लावलीच कशी?आणि लावावी तरी का?
तर पाहयला जायचं होता ड्यून सिनेमा पण कोणीच बरोबर येईना मग ३७० बघायला जाऊ या ठरवलं.मी काश्मीर फाईल आणि केरळा स्टोरी कमकुवत हृदयामुळे थिएटरमध्ये पाहायला जाणं शक्यच नव्हतं.दोन्ही नंतर ओटीटीवर पाहिले तेव्हा खूप भडक वाटले.पण ३७० बघू शकणार कारण यात एक सकारात्मक घटना दाखविली आहे.
नेहमी जुन्या राजकीय घटनांचे सिनेमा पाहतांना या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार नव्हतो हे वाटतं राहते.पण केवळ भारतात असूनही वेगळे असणारे हे काश्मिर ३७० मुळे कसे अनेक धूर्त राजकरण्यांचे दगडफेक, सैनिकांवर हल्ले करणे यासाठी मोब तयार करून वापरणे,धर्माचा धाक दाखवत प्रगतीही नाकारणे,गुप्तपणे पाकिस्तानची चाटूगिरी करणे इत्यादी असे अनेक कारनामे समजले.
३७० हटवण्यासाठी कायदेशीर तयारी कशी झाली यात दाखवली खरी पण खरचं ते एक कलम का डिलीट केलं होतं याचा भुंगा आता डोक्यात शिरला आहे.कालांतराने वाचनातून याची उत्तरं मिळतीलही.पण हे ३७० हटवण्यासाठी इतकं वर्ष कोणाचीच आस्था का नव्हती हाही प्रश्न पडला.
वरील प्रतिसादात डॉ.खरे यांनी म्हटल्याप्रमाणे इतक्या महत्त्वाच्या कारवाईमध्ये इतकं कमी सैनिक घेऊन जावं ही कुजबुज आम्ही उभयंता थिएटरमध्ये करत बसलो होतो :)
बाकी थिएटर पूर्ण भरलं होतं.अनेक प्रसंगांना टाळ्या पडत होत्या.ते रामाचा अभिनय करणारे अरूण गोविंद मोदीच ओळखले जातील ;)
आणि किरण करमरकर,वैभव तत्ववादी या मराठी गुणी कलाकारांना उत्कृष्ट अभिनयासाठी १०/१० गुम देईन.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं लहानपणापासून शिकवलं आहे .या भारतीय साम्राज्याच्या मुकुटमणी जम्मू आणि काश्मिर भारताला शोभून दिसत होता ,राहिल आणि राहणार.

चित्रगुप्त's picture

3 Mar 2024 - 3:32 pm | चित्रगुप्त

फालतू फिल्लमबाजी हे तर तथाकथित बॉलिवुडी पिच्चरांचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे अमूकतमूक सांगूनच गेलेत. तरीपण -

३७० मुळे कसे अनेक धूर्त राजकरण्यांचे दगडफेक, सैनिकांवर हल्ले करणे यासाठी मोब तयार करून वापरणे,धर्माचा धाक दाखवत प्रगतीही नाकारणे, गुप्तपणे पाकिस्तानची चाटूगिरी करणे इत्यादी असे अनेक कारनामे समजले.

-- हे सर्वसामान्य जनतेला ('पब्लिक' ला) समजणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी सिनेमा हे साधन उत्तम आहे.

Bhakti's picture

3 Mar 2024 - 4:16 pm | Bhakti

फार डिटेल नाही पण सहज ही माहिती सिनेमातून पोहचली.
मी देवाचे आभार मानेल की बोलीवूडच्या छछोरी सिनेमांतून मला मुक्ती मिळाली :);)(म्हणजेच मी आता matured झालिये :))

चौथा कोनाडा's picture

12 Mar 2024 - 6:04 pm | चौथा कोनाडा

फार डिटेल नाही पण सहज ही माहिती सिनेमातून पोहचली.

१०१ सहमत ! या दृष्टीने सिनेमाची पटकथा उत्तम लिहिली आहे, संकलन कथेला न्याय देणारं आहे.
शेवटी कथा योग्य वेग पकडते हे सिनेमाचं यश म्हणावे लागेल.

या निमित्ताने जेके बॅन्क भ्रष्टाचार प्रकरण, झुनी हकसर या संबंधी माहिती मिळाली.
त्या संबधी सुत :
https://www.rozanaspokesman.com/entertainment/bollywood/230224/article-3...

हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आणि मोठे आर्थिक यश मिळवले हे पाहून तथाकथित पिलावळ गॅन्गच्या पोटात दुखायला लागलं आहे !

शानबा५१२'s picture

3 Mar 2024 - 4:01 pm | शानबा५१२

Artcle 370 रद्द करण्यात आले हे भारतातल्या व काश्मिरच्या जनतेला ही कळत आहे, त्याचे सकारत्मक, फायदे व बदल हा कळत आहे.

पण मला व्यक्तीशा: विचारायचे आहे: "काही वर्षांपुर्वी मला जो ट्रेन मध्ये, मुंबईला खासकरुन, प्रवास करताना असुरक्षितपणा जाणवायचा, बॅग दीसली की भीती, सर्व स्टेशन वर मिलिटरी व पोलिस चेकींग साठी." हे सर्व चित्र आता का पुर्ण बंद झाले आहे व तेव्हा एवढे सहज, नियमितपणे व सरासर का चाललेले?

का चाललेले? .........का चाललेले?

काही वर्षांपुर्वी मला जो ट्रेन मध्ये, मुंबईला खासकरुन, प्रवास करताना असुरक्षितपणा जाणवायचा, बॅग दीसली की भीती, सर्व स्टेशन वर मिलिटरी व पोलिस चेकींग साठी." हे सर्व चित्र आता का पुर्ण बंद झाले आहे

-- याचे खरेखुरे उत्तर जे कुणी देतील, त्यांची इथे 'अंधभक्त' म्हणून हेटाळणी झालीच म्हणून समजा.

Artcle 370 रद्द करण्यात आले हे भारतातल्या व काश्मिरच्या जनतेला ही कळत आहे, त्याचे सकारत्मक, फायदे व बदल हा कळत आहे.

-- ते सकारात्मक फायदे, बदल वगैरे गोष्टी 'डोळस' गुलामांना सोडून बाकी सगळ्यांना कळत आहेत.

विवेकपटाईत's picture

12 Mar 2024 - 10:35 am | विवेकपटाईत

मी प्रधानमंत्री कार्यालयात असताना माननीय ए एस दुलत ( एक्स. रॉ) आणि एम के नारायणनच्या अखत्यारीत कार्य केले आहे. एवढेच म्हणेन सिनेमा हा अतिरंजित असतो. आपल्या दर्शकांना तसाच आवडतो. ३७० समाप्त झाल्याने फक्त काश्मीर नाही तर पंजाब सहित संपूर्ण हिमालयीन भाग वाचला आहे.

सुबोध खरे's picture

12 Mar 2024 - 12:01 pm | सुबोध खरे

सिनेमाचा महा भंपक पणा मान्य केला तरी एक वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल

ती म्हणजे सामान्य जनतेला शाहरुख खान आणि अक्षय कुमार किंवा सैफ अली खान बद्दल जशी भरपूर माहिती असते तशी डॉ रघुनाथराव माशेलकर, एस सोमनाथ किंवा डॉ होमी भाभा यांच्याबद्दल असत नाही.

त्यामुळे अशा काश्मीर, ३७० कलम, केरळ स्टोरी अशा गोष्टींबद्दल जनतेला माहिती होण्यासाठी सिनेमा हे माध्यम नक्कीच अत्यंत प्रभावी आहे.