सुप्रिया वि सुनेत्रा

बाजीगर's picture
बाजीगर in राजकारण
16 Feb 2024 - 1:50 pm

बातमी,

बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-e...

घ्या कविता....

पवार वि पवार

बारामती त सुप्रिया वि सुनेत्रा,
आव्हान हे बारामती शरदचंद्रा।।

नणंद विरुद्ध भावजय,
कोणाचा होणार जय??

घराघरातलं हे महाभारत,
वोटसाठी आवाज मारत!!

वर्षानुवर्षाची सुरक्षीत सीट,
अजीत सुरुंग लावणार धीट।।

एकरात केली करोडोची वांगी,
भाजपनीती का ठेचण्या नांगी।।

क्यों की लोहा लोहे को काटता,
गूढनीती 'शाह' आणि मात का !!

राजा शरदचंद्र बारामती,
ताजा अजीत-तंत्र करामती।।

उभा उमेदवार राष्ट्रवादी अजीत,
आता पहायचे कुणाची जीत।।

"देवेंद्र क्या करेगा अकेला ",
बघा घरी संघर्ष उभा केला।।

प्रश्न जनादेशाच्या तृतिय नेत्रा,
ठरवेल सुप्रिया कि सुनेत्रा ।।

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

16 Feb 2024 - 1:54 pm | अहिरावण

कुल

मुक्त विहारि's picture

16 Feb 2024 - 9:28 pm | मुक्त विहारि

कविता आवडली..

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 8:36 am | अमरेंद्र बाहुबली

ही कविता संपादक मंडळाने तात्काळ ऊडवावी. ह्यात भाजपच्या नेत्यांची लाल केलीय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका केलीय. प्यूअर अंधभक्तीयुक्त कविताय.

अहिरावण's picture

19 Feb 2024 - 3:51 pm | अहिरावण

जरा मजा घ्यायला शिका अबा.... लै शिरेस हुता जणू

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2024 - 8:42 am | अमरेंद्र बाहुबली

मजा घ्यायची तर दोघांवर टिका करा, आपल्या आवडत्या पक्षाची ना नेत्याची लाल म्हणू नका.

अहिरावण's picture

20 Feb 2024 - 10:03 am | अहिरावण

असे कसे शक्य आहे अबा....
चला सुरुवात तुम्ही करा.... करा नेहरु, गांधींवर टीका... आणि दाखवा कशी दोघांवर टीका करता येते ते !!

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2024 - 3:03 pm | चौथा कोनाडा

समयोतीचित रचना.

मला तर "देवेंद्र" हायलाईतलट ची रचना वाटते.

नठ्यारा's picture

17 Feb 2024 - 4:48 pm | नठ्यारा

आमास्नी सु.सु. म्हायती व्हत्या. तेंच्या इरुद्दबी सु. X सु. ह्यो बिगर'सु.'वर अन्याव हाये. हितंबी आरक्षण पायजेल.

लढाई कशीही होऊ द्यात. जागा तर पवार घरातच राहील. कार्यकर्ते घोषणा देऊन आणि सतरंज्या उचलून मरतील. उद्या सुप्रिया आणि सुनेत्रा गोड होतील.

दुसरीकडून लढवायला हवी होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2024 - 8:44 am | अमरेंद्र बाहुबली

संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा बोर्ड वर कसा?? आताच मी ह्याचं विडंबन लिहीलं तर नी त्यात भाजप नेत्यांवर टिका केली तर चालनार आहे का???

नावातकायआहे's picture

20 Feb 2024 - 10:01 am | नावातकायआहे

लिवा कि अ.बा.!

अहिरावण's picture

20 Feb 2024 - 10:03 am | अहिरावण

न चालायला काय झाले....

चला पाहू तुमचे विडंबन कौशल्य... होऊन जाऊ द्या ;)

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 5:14 pm | विवेकपटाईत

अवश्य करा. त्यात शेरखान आणि तवाकी नाव वापरा.वाचायला मजा येईल.

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2024 - 12:50 pm | चौथा कोनाडा

आलं का न्हाय विडंबण अजूण ?

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 11:38 am | अहिरावण

जमत नाही बहुधा...

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 1:38 pm | अमरेंद्र बाहुबली

शेणात दगड मारून शेण अंगावर ऊडवून घ्यायची मला हौस नाही.

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 1:45 pm | अहिरावण

अरेरे !! आम्ही गोमयाने स्वच्छ सारवलेल्या देवघरात ध्यान करतो आणि रामरक्षा म्हणतो !!

इतकं प्रसन्न वाटतं की वा !!

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली

संपादक मंडळात कुणी भाजपवाला भरलाय का?? ्जूनहा ही कविता बोर्डवर कशी??

विवेकपटाईत's picture

23 Feb 2024 - 4:38 pm | विवेकपटाईत

राजकारणी कविता आवडली. घर का भेदी लंका ढाये हेच शाश्वत सत्य.

१.५ शहाणा's picture

23 Feb 2024 - 8:27 pm | १.५ शहाणा

शेंडी तुटो वा पारंबी तुटो पद आमच्यात घरात

चौथा कोनाडा's picture

29 Feb 2024 - 3:13 pm | चौथा कोनाडा

भलताच धाडसी असा हा बाजीगर,
असे काव्य पाडण्या लागते जीगर