वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
9 Dec 2023 - 2:55 pm

वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट

नर्मदा नदीवरील Sardar Sarovar Dam धरण गुजरात सरकारचा प्रकल्प आहे आणि धरण भिंती पुढील जमीन परिसर एकता पुतळा (Statue of unity) प्रकल्पासाठी राखीव केला आहे. तो केंद्र सरकारकडे आहे.

हे धरण उभारताना किती विरोध झाला हे सर्वांना माहीत आहेच.

सरदार वल्लभभाई पटेल पुतळा उर्फ एकता पुतळा (Statue of unity - SOU) याबद्दल ऐकून होतो. २०१८ ला उद्घाटन झालं आणि नंतर लगेचच मार्च २०२० ते मे २०२२ दरम्यान कोरोना निर्बंधांमुळे जाणे रहीत झालं. आताच या आठवड्यात जाऊन आलो. पुतळ्यासमोर थोडं बडोदाही पाहावं हे ठरवलं. आमच्या धावत्या सहलीतील काही चित्रे प्रथम.
आमचा प्लान असा होता-
दादर एकता नगर ट्रेनने बडोद्याला उतरलो (०५:३०)
ही गाडी पुढे शेवटी एकता नगर/केवडिया/statue of unity ला जाते तरी बडोद्यात दोन दिवसांचे हॉटेल घेतले. सर्व जागा ,बस स्टँड पूर्वेलाच आहे. सयाजीगंज पोलिस स्टेशन जवळच आहे व त्यामागच्या रस्त्यावर असंख्य हॉटेल्स आहेत. गाडी पहाटे साडेपाचलाच जाते. त्यामुळे स्थानिक बस स्टँडवर(आणि उत्तम स्वच्छ स्टेशन समोरच जवळच आहे.) वेळ काढून आठ वाजता हॉटेल शोधले.

फोटो १
बडोदा पूर्व स्टेशन परिसरात

पहिला दिवस सकाळी लक्ष्मी विलास पॅलेस(३किमी) बाहेरूनच पाहिला. आतल्या भागासाठी यूट्यूबवर चानेल लालनटॉपवर विडीओ (१तासाचा) पाहा.
फोटो २
सयाजी युनिव्हर्सिटी

फोटो ३
joy train route, सयाजी बाग.

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचची कालचीच ट्रेन पकडली. बस स्टँडवजवळच्या हॉटेलातून पोहे चहा घेतले. हातात लगेज नव्हते . फक्त पाण्याची बाटली, मोबाईल, पैसे,एटीएम कार्ड घेतले. म्हणजे पुढे सामान ठेवणे ही कटकट गेली. तिथे खाण्याच्या वस्तू आणि मोठ्या बॅगा नेता येत नाहीत.

साडे सातला एकता नगरला पोहोचलो.
फोटो ४
एकता नगर रेल्वे स्टेशन

बाहेरच्या एसी बसने SOU पार्किंगला उतरलो.
फोटो ५
free ac bus, एकता नगर रेल्वे स्टेशन

प्रवेश तिकिटे दोन प्रकारची आहेत. पुतळ्याभोवती फिरणे यासाठी रु१५० चे तिकिट आहे ते आदल्या दिवशीच काढले होते आणि पीडीएफ printed पेज नं २ वर SoU entry ticket 1/2/3/4 अशी नावे आणि QR code असतो ते अधिक ओरिजिनल आइडी प्रूफ आधार वगैरे दाखवावे लागते. ते पाहून आत सोडतात.
त्याची खिडकी आठला उघडते. पण आमचे तिकिट (१५०रु) होते आणि लगेज सामान नव्हते त्यामुळे पहिलेच आत गेलो.
फोटो ६
parking lot locker room

या तिकिटावर पुतळ्याच्या आतमध्ये वरती ४५व्या मजल्यावर viewing gallery आहे तिकडे जाता येत नाही. त्यासाठी रु ३८० चे तिकिट आणि time slot 8-10,10-12,12-14.. वगैरे घ्यावा लागतो. थंडीत धुके असते व दूरचे दिसत नाही. धरणाची भिंत दिसत नाही. त्यामुळे ते तिकिट घेतले नव्हते. आठ ते पावणे नऊ पुतळा पाहून बाहेर आलो.मंगळवार ते शुक्रवार गर्दी नसते.
फोटो ७
पुतळ्याकडे

बाहेर फ्री एसी बसने जंगल सफारीला(२किमी) उतरलो.
फोटो ८
Jungle Safari entry

फोटो ९
जंगल सफारी १

फोटो १०
जंगल सफारी २

जंगल सफारीचे ओनलाइन तिकिट काढले नव्हते. ते तिकडे खिडकीवर फक्त कार्डानेच काढता येते (रु २००). युपिआई पेमेंट किंवा रोखीने मिळत नाही.
इथे खूप पिंजरे आहेत. आफ्रिकन पशू पक्षी आणि भारतीय काळा वाघ(बिबट्या), हे खास आकर्षण सवा तासात पाहून बाहेर आलो. पूर्ण सावकाश पाहायला अडीच तीन तास हवेत.

जंगल सफारी तून बाहेर येऊन इ रिक्शाने(५०रु) परत SOU Prking मध्ये आलो. Platform no 5 वरून Circular route bus दर पंधरा मिनिटांनी सुटतात. कुणी असो वा नसो.
फोटो ११
circular route bus

बसचे तिकिट ५०रु बसमध्येच रोखीने काढायचे. एकूण ४२ किमी बस फिरवतात. तीन चार ठिकाणी पाच पाच मिनिटे थांबवितात फोटो काढण्यासाठी,पाणी ,खाणे यासाठी. दीड ते अडीच तास लागतात. परत मूळ जागी आणल्यावर एसी बसने भारत भवनाला आलो .
फोटो १२
circular route bus मार्ग

तिथून इ रिक्षाने रेल्वे स्टेशनला पाऊणला आलो. (अकरा ते पाच एसी बस रेल्वे स्टेशनला फेरी मारत नाहीत, पुतळा ते भारत भवन जातात.)
१३:४०ला प्रतापनगर (वडोदराचे एक उपनगरी स्टेशन) जाणारी लोकल ट्रेन मिळाली आणि साडे तीनला पोहोचलो. तिथून बडोदा स्टेशन सात किमी आहे (व्हाया लक्ष्मीविलास पॅलेस. तो कालच पाहिला होता). रिक्षावाले १२०रु घेतात. तर अशी थोडक्यात एकता पुतळा Statue of unity सहल आटोपली. सहल आयोजनासाठी यूट्यूबवरच्या विडिओंचा खूप उपयोग झाला.

(( इथे पटेलांचा मोठा पुतळा उभारण्यापेक्षा त्या जागी नदीवर दोन तीरावर टॉवर उभारून त्यावर ग्लास ब्रिज लावला असता तर ते अधिक चांगले झाले असते. ते एक विशेष अराजकीय आकर्षण ठरले असते. एक छोटा पुतळा डॅम व्ह्यू पॉइंटवर आहेच. ))

इतर माहिती आणि टिप्स

Lakshmi Vilas palace, Vadodara. Photo slide show.
https://youtu.be/faAsaD2bDrg

एकता पुतळा परिसर आणि जंगल सफारी slide show.
https://youtu.be/FQWMEiQztQ0
बडोद्यामध्ये काय पाहावे

Municipality site वर attractions वर जा
काही virtual tours पाहता येतील.
तांबेकर वाडा भित्तीचित्रे - virtual tour

Maharaja Fateh Singh Museum - virtual tour

लक्ष्मी विलास पॅलेस यूट्यूब विडिओ
vmc.gov.in
सयाजी म्युझीअम आणि तांबेकर वाडा पाहा. सुंदर आहे.
------------
खादाडी बडोद्याची
खाने में क्या है?
https://youtu.be/WgHbfmHe5Nc?si=o30nZOly_UltoBWx

Times foodie
https://youtu.be/P-fYHmY3x0c?si=RT8D6wBK_lZ2iEZt
याच ठिकाणी नाही खाल्लं पण हे पदार्थ खाल्ले दुसरीकडे.

---------------------
स्टेशनजवळचा पूर्व भाग फार अस्वच्छ आहे. रिक्षावाल्यांनी थुंकून आणि गुटखा पाकिटे टाकून वाट लावली आहे. स्टेशनही अस्वच्छ आहे. अगदी दादर टर्मिनस सुद्धा.(बांद्रा टर्मिनस सोडून. तेही पूर्वी बकाल होते.) जेव्हा तिकिटे काढण्यासाठी कूपन्स आणि त्याची मशिने होती तेव्हा सर्व मशिनांच्या कूपन स्लॉट्समध्ये चुईंगगम भरलेला असे.) एकूण पश्चिम रेल्वेची सर्वच स्टेशने घाण दिसली. पश्चिम रेल्वेच्या सर्वच रेल्वे गाड्या भंगारात टाकण्याच्या अवस्थेत आहेत. जेव्हा प्रवासी फस्टक्लासचे तिकीट काढतो तेव्हा प्लाटफार्मवर त्याला काहीही फर्स्ट क्लास मिळत नाही.

स्टेशन समोरचा स्थानिक बस डेपो ही एकमेव चांगली जागा आहे. चकचकीत फरशी, खुर्च्या, स्वच्छ टॉइलेट्स, सुंदर ऐसपैस चौकशी कक्ष वगैरे.

दूरच्या बसेसचा एसटी डेपोही छान आहे परंतू तो स्थानिक व्यापाऱ्यांनी गजबजून टाकला आहे. खूप आडवळणाने वाट काढत बसपर्यंत पोहोचता येतं.

जाण्याच्या अगोदर बडोदा आणि पुतळ्याचे बरेच विडिओ यूट्यूबवर पाहून घेतले. त्यामुळे सहल ठरवणं सोपं झालं.
* शनिवार रविवार फार गर्दी असते.
* सोमवारी बडोद्याचा महाल आणि एकता पुतळा परिसर बंद असतो.
*बडोद्याला जायला यायला (मुंबईहून) भरपूर गाड्या आहेत. पण एकता पुतळ्याहून परत येण्यास एक गाडी दुपारी दोनला आणि नंतर संध्याकाळी सात किंवा रात्री नऊला आहेत. तिकडे आकर्षणं खूप आहेत परंतू त्यासाठी एक/दोन दिवस राहायला हवे. एक दिवसीय सहलीसाठी अगदी मोजकी ठिकाणं करायला हवीत. ती यूट्यूबवरच्या विडिओ तून पाहून नक्की केली.
*बडोद्यातील सयाजी बाग(कामठी बाग) आणि त्यातली joy train ही लहान मुलांसाठी एकमेव आकर्षण आहे.
*एकता पुतळा परिसरात लहान मुलांसाठी activity काही नाही. जंगल सफारी प्राणी संग्रहालय ठीक आहे. Dino trail,cactus garden, butterfly garden इथे काही विशेष नाही. तरी थोडी गर्दी होती.

&&&&&

एकता पुतळा -जावे पोहोचावे कसे

* रेल्वेने येणाऱ्यांना 'एकता नगर' टर्मिनस (केवडिया हे जुने नाव)स्टेशन येथे उतरावे लागते. हे परिसरातले पहिले ठिकाण आहे. इथून पुढे अडीच किमी भारत भवन -पुतळा पार्किंग साडेसात किमी -जंगल सफारी नऊ किमी - dam view point अशी एसी बस सर्विस फुकट नेते.वेळ सकाळी साडे सात ते रात्री आठ पर्यंत.
*मुंबई दादर पश्चिम ते एकता नगर रोज 23:50 to 07:30 train no 12927/12928 आहे 21:15 to 05:30 आहे. इतर ठिकाणांहून गाड्या आहेत पण सोयीची वेळ नाही. रात्रीची आकर्षणे म्हणजे light and sound show, cruise,lighting पाहून दादर ट्रेन सहज मिळते. अहमदाबादहून जनशताब्दी रोज पावणे अकराला येते व लगेच परत जाते. या गाडीला विस्टाडोम डबा आहे.

*एकता पुतळ्याला स्वतःच्या वाहनाने गेल्यास श्रेष्ठ भारत भवनच्या पार्किंगला वाहनं ठेवावी लागतात. तुमच्याकडे टेंट सिटी दोन,तीन याचं बुकिंग असेल तर ते दाखवून तिथे कार नेता येते.
*इतर ठिकाणे गाठण्यासाठी इ रिक्षा आहेत. त्यांचे भाडे किती ते sou site वर https://soutickets.in
*बडोदा, अहमदाबाद येथून मोजक्याच एसटी बसेस आहेत. ओनलाइन बुकिंग करणे. त्या बसेसचा डेपो/पार्किंग जंगल सफारी जवळ आहे.

एकता पुतळा परिसर - राहावे कुठे?

फोटो १३
एकता नगर रेल्वे Retiring रूम

स्टेशनजवळ (समोर) दोन मोठी हॉटेल्स दिसतात.

Galaxy Unity
Reva Bhavan

भारत भवनपासून दीड किमीवर
Hotel BRG Budget Stay हे फार लोकप्रिय आहे. जेवण थाळी साधी चारशे रुपये पडतात. शिवाय इ रिक्शाचा खर्च वाढतो.
याशिवाय
Tent city one
Tent City two
Tent City Narmada
इथे तंबूत राहण्याची सवय असायला हवी.भाडेही बरेच आहे.

राहाणे,जेवण आणि ई रिक्षा प्रवास खर्चिक आहे.

&&&&&&

*एकता पुतळा परिसर आकर्षणे -
खूप आहेत.
साईट soutickets.in पाहा. वेळा ,नियम,तिकिट दर दिले आहेत.

बोटींगचे तीन पर्याय दिसतील.
लहान मुलांना पाहण्यासारखे जंगल सफारी झू म्हणता येईल. तरुणांसाठी रिव्हर राफ्टिंग आहे. वयस्करांना Ekta dinner cruise आवडेल कदाचित. गोव्यातील क्रूजशी तुलना नको कारण नाच गाणी आणि नानवेज जेवण नाही. लाइटिंग आहे.

नौका विहार दोन आहेत. एक पुतळ्यासभोवार आणि दुसरा तलावात क्रमांक दोनमध्ये. इथे अहमदावादवरून येणारे sea plane उतरते. म्हणजे अगदी ते येणारे उडणारे पाहाणे सुद्धा मजेदार ठरेल. वेळ माहीत हवी.

पुतळ्यावर लेझर टाकून माहिती सांगणे ही कल्पना मला फारशी आवडली नाही. त्यापेक्षा भारत भवनमध्ये एखाद्या हॉलमध्ये दोन तीन भाषांत अर्ध्या तासाचे चित्रपट ठेवायला पाहिजेत.

जाताजाता
फोटो १४
राऊंड ट्रिप बसमधून दिसलेले नर्मदा परिक्रमा करणारे.

___________________

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

10 Dec 2023 - 3:22 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप छान भटकंती आणि त्याला समर्पक प्रचि.
खूप सुंदर आटोपशीर सहल.
दिलेले तपशिल पुढील सहल आयोजनासाठी अ त्यंत उपयोगी आहेत !
कंजूस जी +१
N1234eCL456

एकता पुतळ्याला जाने २०१९ जाण्याचा अचानक योग आला !
अमदावदला नातेवाईका कडे आलो होतो. सकाळी लवकर उठून एकता पुतळ्या पाशी येऊन पोहोचलो. दु, चे जेवण आटोपून अडीच ते सुर्यास्त असा परिसराचा आनंद लुटला. अप्रतिम अनुभव होता. परदेशी जाता आलेलं नाही याचे दु:ख दुर झाले ! व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तेव्हा नविनच होते काम सुरु होते.
येता येता जवळच असलेलेल पोयचा येथे रात्री नीलकंठ धाम हे स्वामीनारायण मंदिर आहे. तिथली रोषणाई आणि पाण्यातले प्रतिबिंब पाहून डोळ्यांचे पारणे फिटले ( यासंबंधी माझ्या फेसबुक वर एक पोस्ट पण लिहिली आहे आणि फोटो व्हिडिओ सुद्धा जोडले आहेत. ) . परतीचे रिझर्वेशन असल्याने वडोदरा बघता आले नाही आता या धाग्यातली माहिती वापरून वडोदरा सहलीचे नियोजन करता येईल.

गोरगावलेकर's picture

11 Dec 2023 - 12:15 pm | गोरगावलेकर

धावती असली तरी माहितीपूर्ण सहल. फोटोही सुंदर.
मी सुद्धा २०१९ ला एकता पुतळ्यास भेट दिली होती. बडोदा बघायचे बाकी आहे. आपण दिलेल्या माहितीचा निश्चितच उपयोग होईल.
याच सहलीत वाटेत कुबेर मंदिरही पहिले होते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Dec 2023 - 12:26 pm | राजेंद्र मेहेंदळे

ही ट्रिप करायची आहेच, माहीतीचा नक्की उपयोग करेन.

रच्याकने- एकतानगर स्टेशनच्या रस्त्यावरची हॉटेल्स महागडी आहेत. त्या ऐवजी गरुडेश्वर गावात चांगली होम स्टे आणि घरगुती जेवणाची सोय आहे. मराठी घरे खुप आहेत. अंतराच्या दृष्टीने एकतानगर स्टेशनपासुन पुतळा डावीकडे पाचेक कि.मी. असेल तर गरुडेश्वर उजवीकडे तितकेच अंतर आहे. पण लोकल जीप्स असतात ये-जा करायला. दिवसभराची जीप ठरवली तर आसपासची ८-१० ठिकाणेही बघुन होतात (कुबेर मंदीर, अनुसुया माता,शूलपाणीश्वर वगैरे). त्यामुळे एक दिवस गरुडेश्वर आणि आसपास बघुन मुक्काम, एक दिवस पुतळा आणि एक किवा दोन दिवस बडोदा (विथ मुक्काम) असे करता येईल. टेन मात्र ही एकच सोयीची आहे दादरहुन.

चौथा कोनाडा's picture

11 Dec 2023 - 12:53 pm | चौथा कोनाडा

गरुडेश्वर गावात चांगली होम स्टे आणि घरगुती जेवणाची सोय आहे. मराठी घरे खुप आहेत.

छान टीप आहे.

विअर्ड विक्स's picture

11 Dec 2023 - 4:17 pm | विअर्ड विक्स

तत्सम जीपवाला अथवा एखाद्या homestay चा नंबर दाखवून ठेवा इथे

a

होम स्टे साठी हि लिंक सापडली
होम स्टे

गरुडेश्वर - आणि इतर कुबेर मंदिर वगैरे.
या नावाचे तसेच टिळकवाडा ही नावे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या वर्णनात येतात. रस्त्याकडे आहेत. गरुडेश्वराचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्रातील एक संन्यासी (अगोदर विवाहित) संत श्री टेंबे स्वामी तिकडे जाऊन राहिले. समाधी आहे. तर या नावाची रेल्वे स्टेशने केली आहेत तिथे रेल्वे थांबत नाहीत.
एकट्या दुकट्या पर्यटकांना शेअरिंग जीप ठरवणे परवडणारे नाही. चार सहा भाविकांनी ठरवून वाहन केल्यास ती ठिकाणे सहज जमतील.

विअर्ड विक्स's picture

11 Dec 2023 - 4:16 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला.. मी या पुतळ्याला उदघाटन झाल्या झाल्या भेट दिली होती , त्यावेळीस फुलपाखरू उद्यान व अजून एक उद्यान बनलेले होते. टेंट सिटी बनायची बाकी होती. माझ्या मते धरणाची उंची खूप गाजली होती त्या उंचीला रिप्लेस करायला हा पुतळ्याचा उंचीचा वाद epitome असू शकतो .
एकंदर परिसर हिरवागार असतो पावसाळ्यात. वडोदरा स्टेशन च्या बाहेर बुलेट ट्रेन चे मोठे काम चालू आहे त्याचा उल्लेख राहिला....

कंजूस's picture

11 Dec 2023 - 4:42 pm | कंजूस

बुलेट ट्रेन चे मोठे काम -
रुळाच्या पश्चिम भागात विश्वामित्री स्टेशनपासून खूप काम दिसत होते पण ते बुलेट ट्रेनचे असावे ही कल्पना नव्हती. शिवाय सूरत पर्यंत रुळाची पश्चिम हद्द कुंपण घालून सुरक्षित केलेली दिसली. तापी नदीवर पूल बांधत होते. म्हणजे पूल बांधणे प्रथम संपवणार.

आम्ही 09:45 train ने वडोदरा हून निघालो. त्यानंतरच्या लगेचच 09:55 च्या बिकानेर हॉलिडे स्पेशलचे एंजिन कोसांबाला बिघडले ही बातमी वाचली. चार तास सर्व गाड्या अडकल्या होत्या. आम्ही थोडक्यात सुटलो.

पहायला मिळाला. आता खरे तर राणी साहेबांसमावेत दालने पहायला मिळणार नाहीत. तरीही बडोदा शहरातील विविध भागात सयाजी राव गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा ठसा पहायला मिळतो. मला एकता मूर्तीच्या रूपात वल्लभाई पटेलांना पाहायला व्हिआयपी म्हणून सपत्नीक भेट द्यायची संधी मिळाली. सूरत चा नवा किल्ला जमल्यास जरूर पहावा. शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीमुळे हा किल्ला जरा बदनाम होता. आता तो पहायला मिळणे एक पर्वणी आहे. विविध कालखंडातील घटना, आतील वातानुकूलित दिवाणखाने वापरणारे बदलले की कसे दिसत, तोफा, व इतर शस्त्र सामुग्री कशी आदर्शवत ठेवावी ते पहायला मिळाले.

प्रचेतस's picture

12 Dec 2023 - 11:04 am | प्रचेतस

सुरेख आणि तपशीलवार माहिती काका. बडोद्याला नातेवाईक असल्याने हे सर्वच सहज पाहता येईल. पुतळ्याचे आकर्षण मात्र फारसे नाही.

श्वेता व्यास's picture

29 Dec 2023 - 3:35 pm | श्वेता व्यास

खूप छान माहिती दिलीत. पुढच्या आठवड्यात बडोद्याला चाललो आहोत.
मला असं विचारायचं आहे की जॉय ट्रेनला तिकिटाला फार गर्दी असते का? की ऑनलाईन आधी काढलेलं बरं?
आम्ही जातो आहोत तो वीकएंड नाही.

कंजूस's picture

29 Dec 2023 - 5:49 pm | कंजूस

जॉय ट्रेनला ओनलाइन तिकिटांची गरज नाही. खिडकीवरच तिकिट घ्या.

दर ४५ मिनिटांनी गाडी भरून सुटते. १५० लोक एका फेरीत जातात. सध्या अंधार लवकर होतो. प्राण्यांच्या पिंजऱ्यात जवळून जाताना ते दिसणार नाहीत. तीन वाजता आत जाऊन प्रथम गाडी फेरी करा. त्यानंतरच प्राणी पाहायला जा. बागेला चार गेट्स आहेत. काला घोडा चौकाकडच्या गेटने आत गेल्यास डावीकडे प्रथम तिकिट खिडकी आणि स्टेशन आहे. एक /दोन नंबरच्या गेटने गेल्यास उजवीकडे आहे.

श्वेता व्यास's picture

29 Dec 2023 - 7:11 pm | श्वेता व्यास

तपशीलवार माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद _/\_ :)