शेवग्याच्या पानांच्या पाककृती खुप दिवसांपासुन करायच्या होत्या.शेवग्याचा झाड कल्पवृक्ष प्रमाणेच झाल आहे.सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगाशिवाय मज्जा नाही.वरपायला तर आवडतातच पण औषधही आहेत.आता कुठे याच्या पानांविषयी/पाल्याविषयी मी जागरूक झालेय.अतिशय कोवळे,सहज स्वच्छ होणारे हिरवेगार आहेत.याच्या तीन सोप्या पाकृ!
१.शेवगा पानांची पोडी/गन पावडर
२.शेवगा पानांचे थालिपीठ
३.शेवगा पानांची भाजी
१.शेवगा पानांची पोडी/गन पावडर
साहित्य -उडीदडाळ(२ छोटी वाटी),हरभरा डाळ(१मोठी वाटी),तीळ(१ छोटी वाटी),धने,जिरे,२ लाल मिरच्या, चवीनुसार मीठ,एक मोठी वाटी शेवगा पानं (धुवून ,कोरडी केलेली)
कृती-
१.सर्व डाळी स्वतंत्र भाजून घेतल्या.
२.तीळ इतर साहित्य एकत्र भाजले.
३.शेवगा पाला स्वतंत्र एक चमचा तेलात परतला.
४.गार झाल्यावर सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक केले.
छानपैकी मोरिंगा पोडी तयार.ईडली करतांना मिश्रणात सुकामेवा पावडर आणि तीळ भुरभुरले होते ,कमाल लागत होती.
२.शेवगा पानांचे थालिपीठ
साहित्य -भाजणीचे पीठ,ज्वारीचे पीठ,मिरची आलं लसूण पेस्ट,दोन मोठी वाटी शेवगा पानं (धुवून ,हलकेसे चिरलेली.)
कृती-
१.सर्व पिठं,शेवगा पानं,मिरची पेस्ट,हळद हिंग टाकून पीठ मळून घेतलं.
२.थालिपीठ थापून,तूप टाकत गरमागरम भाजायचे.
खरोखर चव अप्रतिम होते.
याच बरोबर शेवग्याची फुले परतून गाजर ,हरभरा कोशिंबीरीत वापरले.
३.शेवगा पानांची भाजी
साहित्य -शेवग्याची पानं,चिरलेला लसूण पाकळ्या,एक कांदा
कृती-
१.लसणाची फोडणी देत कांदा परतून घेतला.
२.लाल तिखट वापरून शेवग्याची पानं परतून घेतली,एक चमचा पोडी/शेंगदाणा कूट टाकून भाजी ३ मिनिटांसाठी वाफवली.
याशिवाय शेवग्याच्या पानांपासून भजे, कोथिंबीरीसारख्या वड्याही तयार करु शकता.
-भक्ती
प्रतिक्रिया
7 Dec 2023 - 5:10 pm | विजुभाऊ
शेवग्याची पाने तळल्यावर त्यातले गुण निघून जात असतील ना?
की त्याची चव टिकून रहाते?
7 Dec 2023 - 7:14 pm | Bhakti
कदाचित!
7 Dec 2023 - 7:15 pm | Bhakti
कदाचित होत असावे पण चव टिकते.
7 Dec 2023 - 6:31 pm | सरिता बांदेकर
छान आयडिया आहेत.
अशाच आयडिया कधी केळफूलाच्या केल्या आहेत का??
केळफूल पण आरोग्यासाठी चांगलं असतं.शेवग्याच्या शेंगा खाल्या जातात तेव्हढ्या आवडीने पाला नाही खाल्ला जात.
तसंच केळफूलाचं आहे.
7 Dec 2023 - 7:13 pm | Bhakti
केळफूल मिळालं तर नक्की करणार, धन्यवाद सरिता.
8 Dec 2023 - 2:08 pm | सौंदाळा
छानच. शेवगा पाला खूप पूर्वी लहान असताना खाल्ला होता तेव्हा आवडला नव्हता. परत एकदा बघायला पाहिजे.
शेंग म्हणजे माझा जीव की प्राण डाळ, सांबार, पीठले, नुसत्या तव्यावर परतवून कशीही मस्तच लागते.
शेवग्याची फुले मात्र कधीच खाल्ली नाहीत.
9 Dec 2023 - 11:41 am | Bhakti
धन्स सौंदाळा!
9 Dec 2023 - 11:41 am | Bhakti
शेवगा
फुलवुन पंखा
शुभ्र फुलांचा
तुरा टपोरा
तलम उन्हाचा
टाकित टाकित
सुने उसासे
टिपे शेवगा
धुंद कवडसे!
-सदानंद रेगे
:)