विश्वचषक फायनल मॅच - लाईव्ह चर्चेसाठी धागा

गवि's picture
गवि in काथ्याकूट
19 Nov 2023 - 1:59 pm
गाभा: 

फायनल मॅच बघत असलेल्या सर्व मिपाकरांना लाईव्ह चर्चेसाठी जागा म्हणून हा नवीन धागा.

प्रतिक्रिया

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फिल्डिंग घेतली आहे.

आता बघू कसे होते. प्रेशर प्रचंडच असणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 2:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑस्ट्रलिया टॉस जिंकून आपल्याला फलंदाजी ३५० + झाले पाहिजेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियास धु धु धुवावे विजयासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

19 Nov 2023 - 2:06 pm | प्रचेतस

नॉर्थ गोव्यात फिरतोय, भावाच्या हाती स्टिअरिंग दिलंय आणि मी मोबल्यावर हॉटस्टार उघडून बसलोय.

गवि's picture

19 Nov 2023 - 2:06 pm | गवि

पहिला चौकार...उत्तम..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 2:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गिलचा पहिल्या गल्लीत थोड़ा पुढे असलेला झेल झाला नाही.नशीब. गोलंदाजी भारी होतेय त्यांची आणि क्षेत्ररक्षण उच्च. चार तरी चौकार वाचवले आहेत.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

19 Nov 2023 - 2:45 pm | गवि

दोघे गेले

गवि's picture

19 Nov 2023 - 2:48 pm | गवि

तिसरा गेला. मूड ऑफ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्योतिषांचेभाकित भाकित पाहता भारतीय संघ जिंकणार आहे. मुडऑन ठेवा. आज कोहल्या टुकुटुकु खेळून दोनशे करील. रावल्या पण टीकून आहे. खेळाचा आनंद घेवू...

१९. ३ षटकात ११४ वर ०३ बाद आहेत. सध्या स्कोर बरा आहे. कमॉन इंडिया कम्मॉन.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 2:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गिल आणि रोहिट परतले. खरं तर आवश्यक त्या धावा आलेल्या षटकात रोहिटला फटका मारायची गरज नव्हती. आतिशय कठीण झेल घेतल्याने रोहीट परतला.

प्रतिसाद लिहायला आलो तेव्हा श्रेयसही परत निघालाय. एक मोठा स्कोर आता इथून होईल असे वाटत नाही, असे वाटायला लागले आहे. कोहली अजुन मैदानावर आहे आणि त्याला साथ द्यायला के. एल रावल्या आहे.

आता दोन अड़ीचशे धावा झाल्या की येईन धाग्यावर.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

19 Nov 2023 - 3:20 pm | Bhakti

मला हे मैदानच आवडलं नाही,फायनल वानखेडे वा इडनलाच पाहिजे होती असं गेल्या आठवड्यापासून वाटतंय,कम ओन इंडिया!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी खरं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम म्हटलं म्हणजे 'हाल' अपेक्षितच. भारतीय संघावर कितीही संकटे आली तरी निभावून नेऊ

१९९ वर ५ आणि आता ०९ षटके बाकी आहेत १०० धावा व्हाव्यात जिंकू.

-दिलीप बिरुटे

आपले खेळाडू गलपाटले तसाच हा धागाही गलपाटला.

वामन देशमुख's picture

19 Nov 2023 - 5:40 pm | वामन देशमुख

आपले खेळाडू गलपाटले तसाच हा धागाही गलपाटला.

+१

बोलर्स आणतील चुरस आता. त्यांच्यावर सगळी मदार.

अगदी खरं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम म्हटलं म्हणजे 'हाल' अपेक्षितच. भारतीय संघावर कितीही संकटे आली तरी निभावून नेऊ

ह ह पु वा

गवि's picture

19 Nov 2023 - 5:57 pm | गवि

२४०, अगदीच वाईट नाही.

बोलर्स आहेत आपले स्ट्राँग. त्यांचा जलवा आता अपेक्षित.

रात्रीचे चांदणे's picture

19 Nov 2023 - 6:01 pm | रात्रीचे चांदणे

जिंकू आपण.

कंजूस's picture

19 Nov 2023 - 6:06 pm | कंजूस

कोणता बॉलर चमकणार?

.

.
hindustan times live score

सर्व भारतीय तुमच्या बरोबर आहेत_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पन्नास षटकात २४० धावा झाल्या नंतर प्रत्युतरात २९ धावा ०३ षटकात आणि एक बाद आहे, ते फटकेबाजी करीत राहणार अवांतर धावा कमी करणे आणि विकेट्स मिळवाव्या लागतील. नाय तर, आपला निकाल लागला.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Nov 2023 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या सर्वांसोबत विश्वचषक क्रिकेट २०२३ च्या सामन्याचा आनंद घेता आला. आता इथून जिंकू असे काही वाटत नाही. आपला संघच खरा चोकर्स आहे.

संभाव्य विश्वचषक विजेत्या ओस्ट्रेलियास मन:पूर्वक शुभेच्छा. भारतीय संघास असेच चांगले खेळत राहा यासाठी शुभेच्छा.

आपल्या सर्वांसोबत क्रिकेट दळन दलतांना मजा आली.

-दिलीप बिरुटे

निराशाजनक परिस्थिती आहे खरी या क्षणी. आता एखाद दुसरी विकेट जाऊन देखील फारसे काही होणार नाही. केवळ मोठा चमत्कार.

वामन देशमुख's picture

19 Nov 2023 - 9:22 pm | वामन देशमुख

ऑस्ट्रेलियाच्या हार्दिक अभिनंदन.
पुढील विश्वचषकासाठी भारताला शुभेच्छा.

कंजूस's picture

20 Nov 2023 - 4:05 am | कंजूस

आपण एवढेच चांगले खेळतो.

दोन दिवस पीचवर उभे राहून छत्तीस धावा काढण्यापेक्षा बरे खेळतो ही सुधारणा.
जेव्हा भेदक गोलंदाजी करणारे आणि फिल्डींगवाले नवीन येतील तेव्हा खेळात मजा येईल.

बाकी फुटबॉलच्या तुलनेत हा खेळ कंटाळवाणा आहे (हे माझे मत.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2023 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण एवढेच चांगले खेळतो हे मान्य पण आपली फलंदाजी काल ढेपाळली. सुर्यकुमार, श्रेयस अय्यर, रावल्या, जड्डू लै सुमार खेळले. धावा कुटल्या असत्या तर, मोठा स्कोर झाला असता. नंतर, विकेट्स मिळवता आल्या असत्या. आपल्या गोलंदाजांनीही नंतर नुसत्या पाट्या टाकल्या अर्थात एका लहान स्कोरचा बचाव मोठ्या सामन्यात करता येत नाही. ऑष्ट्रेलियाची भक्कम फलंदाजी आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी जीव तोडून केले. पाच पन्नास रन्स बाउंड्रीच्या वाचवले. सर्वच क्षेत्रात ते काल नंबर वन वर होते.

फोक्लीची भारतीय टीम काल चांगली खेळली नाही. च्यायला, आता सगळं आठवलं की तान होतोय. मुडऑफ.

-दिलीप बिरुटे
(क्रिकेटा रसिक )

एकंदरीत नोंदवलेल्या गोष्टी म्हणजे पुरेसा आणि मासिक हप्ता असलेला स्वस्त इन्शुरन्स घ्या, नाहीतर सलाईन बाटली आणि युरिन थैली स्वतःच्याच हाताने सावरत हॉस्पिटलातून बाहेर निघावे लागेल. कमला पसंद इलायची भारत आणि वेस्ट इंडिज येथे सर्व वयोगटांत सुप्रसिद्ध आहे. फॉग चल रहा है और सदैव चलेगा. प्युरो मिठात केमिकल्स नाहीत आणि ते घरी नसणे ही एव्हाना शरमेची बाब वाटत आहे. आणि फोन पेवर छोट्या ट्रांसॅक्शनसाठी शिंचा पिन लागत नसल्याने ते सर्वोत्तम आहे.

आणि हो. रोजचे बँकिंग म्हणजे युद्ध वाटत असल्यास प्रचंड आकर्षक रिवार्ड्ससाठी इंडसइंड बँकेस पर्याय नाही.

आंद्रे वडापाव's picture

20 Nov 2023 - 11:28 am | आंद्रे वडापाव

a

आंद्रे वडापाव's picture

20 Nov 2023 - 11:37 am | आंद्रे वडापाव

n

आग्या१९९०'s picture

20 Nov 2023 - 7:49 pm | आग्या१९९०

विश्वचषक फायनल मॅच पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ठेवल्याने भारत हरला.
ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्वीकारत असताना स्टेडियममध्ये तुरळक प्रेक्षक उपस्थित होते ( प्रेक्षकांमध्ये खिलाडूवृत्ती रुजवण्यात नेहरु कमी पडले ), तरी नेहरू पूर्ण स्टेडियमला हात हलवून अभिवादन करत होते आणि विशेष म्हणजे कॅमेरा मध्ये छबी येण्यासाठी फार उत्सुक नव्हते आणि मध्ये कोणी कडमडला तरी त्याला बाजूला ढकलत नव्हते. सगळंच विचित्र.

Bhakti's picture

20 Nov 2023 - 11:43 am | Bhakti

उघडा डोळे पहा नीट!
A
आता यांना गाढवाला गुळाची किंमत काय हेही म्हणता येईना...विजेते आहेत ते ...

कपिलमुनी's picture

20 Nov 2023 - 1:37 pm | कपिलमुनी

त्यामुळे हवे तसे वापरतात..

आंद्रे वडापाव's picture

20 Nov 2023 - 1:43 pm | आंद्रे वडापाव

हा एकच् खेळाडू कालच्या भारतीय संघात असता ..
तर भारताने २०२३ चा विश्वचषकाबरोबर २०२७, २०३१ चे विश्वचषक जिंकून आणले असते.

nm

हा एकच् खेळाडू कालच्या भारतीय संघात असता ..
तर भारताने २०२३ चा विश्वचषकाबरोबर २०२७, २०३१ चे विश्वचषक जिंकून आणले असते.

कर्नलतपस्वी's picture

20 Nov 2023 - 2:59 pm | कर्नलतपस्वी

तपासून घ्यावे.

जरा मुद्दा स्पष्ट करा ना. कसल्या एवढ्या वेदना झाल्यात? अठरा अठरा तास अशी मिरवून घेण्याची कामं करतात का आपले आदर्श पंतप्रधान?

चांदणे संदीप's picture

20 Nov 2023 - 3:46 pm | चांदणे संदीप

हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचताना.... जाऊदे...! :(

सं - दी - प

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Nov 2023 - 4:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

२००३ ची पुनराव्रुत्ती झाली.
भारत जिंकावा म्हणून 'हे' आणि ह्यांचे मित्र तेव्हाही निळा टी-शर्ट,टोपी घालुन बसले होते. पॉप-कॉर्न, धणाडाळ,बटाटा-वेफर्सची मागणी चालुच होती. ह्यावेळी प्रे़क्षकात शहारूख, रणवीर,दीपिका आणि खुद्द सदगुरू आणि बाजुला क्रिकेटचा 'देव' बसलेला . भारत जिंकणार, ही मंडळी मैदानात धावणार.. आणि मग देशभर 'इंडिया......... इंडिया.' चे नारे घुमणार.. अशी अपेक्षा होती. असो.
ट्रॅविस हेडने धावा रचायला सुरुवात केली आणि पॉप-कॉर्नची मागणी कमी झाली.हळुहळु ह्यांचे मित्रही घरी जायला निघाले.
उत्कृष्ट आणि जेमतेम ह्यांच्यातील फरक काल अधोरेखीत झाला.

काल दूरचित्रवाहिनीवर दिवसाची ( = भारताची ) फलंदाजी कठीण होती व रात्रीची सोपी होती हे आवर्जून दाखवलं गेलं. यांत तथ्य जरी असलं तरी ते कितपत लागू पडतंय ते माहीत नाही. एकंदरीत पन्नासेक धावा कमी पडल्या. रोहित नेहेमीसारखा ५० च्या आतबाहेर बाद झाला. त्यानं शतकापावेतो जायला हवं होतं. ३ बाद ४७ म्हणजे गोलंदाज सुमार नक्कीच नव्हते. पण फलकावर धावाच नसतील तर ते तरी दबाव कसा टाकणार म्हणा.

-नाठाळ नठ्या

आग्या१९९०'s picture

20 Nov 2023 - 8:46 pm | आग्या१९९०

१९८३ च्या फायनलचा आपला स्कोअर आठवा. आपल्या बॉलर्सनी मॅच जिंकून दिली होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Nov 2023 - 11:22 pm | अमरेंद्र बाहुबली

किती तो जीव तूटतोय बीसीसीआय च्या संघासाठी. बरं तरी भारत देशाचा अधिकृत संघं नाहीये तो. १८-१८ तास काम करनार्यांना काही कामधंदा नसेल. पण आपल्या सारख्या कामे असणार्या लोकांनी तरी आपला वेळ क्रिकेट सारख्या फालतू गोष्टीवर घालवू नये. ते व्यावसायीक क्रिकेटर्स आहेत, देशावर संकट आलं तर काडीची मदत करत नाहीत वरून सरकारकडे झोळी पसरून टॅक्समाफी मागतात. तुम्ही लोक कामधंदे बुडवून त्यांचा ऊदोऊदो करतात. (व्यक्तिपुजा कधी बंदं होणार?)
काल दिवसभर प्रवासात होतो. ८ वाजेनंतर लोकांचा धांगडधींगा/इतरांना त्रास देणं बंदं झालेलं दिसलं. नी लोक कामधंद्य्याला लागलेली दिसली. काय झालं असावं अंदाज आलेला होताच.

नठ्यारा's picture

21 Nov 2023 - 12:40 pm | नठ्यारा

एका अर्थी सहमत आहे. मी साधारणत: दिवसान्त वा डावान्त आढावा घेणारा रसिक आहे. अनेक दशकानंतर रविवारी संपूर्ण सामना बघितला.

-नाठाळ नठ्या

सर टोबी's picture

21 Nov 2023 - 9:15 am | सर टोबी

दिखाऊगिरी, चमचमाट हे आता आपले वैशिष्ठ्य बनले आहे. सामन्याच्यावेळेस लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके करण्याचं प्रयोजन काय वगैरे गौण मुद्दे आहेत. मागे कोविडच्या वेळेसदेखील दिवे लावण्याच्या आदेशामुळे एकट्या महाराष्ट्राला एकदम निर्माण होणारी घट रोखण्यासाठी सुमारे एक कोटीचा खर्च आला. यात थोडी जरी गफलत झाली असती तरी संपूर्ण राज्य अंधारात बुडण्याचा धोका होता. निव्वळ खर्चाचा जरी विचार केला तरी ती दिखाऊगिरी देशपातळीवर पंधरा एक कोटीला पडली असणार.

दिखाऊगिरी, चमचमाट हे आता आपले वैशिष्ठ्य बनले आहे.

सगळीकडे श्री मोदी यांची प्रतिमा, हा प्रकारच एक प्रकारे डोक्यात तिडीक जाणारा आहे. अर्थाच भारतात नगरसेवकसुध्द्दा तेच उद्योग करतो त्यामुळे नावे कोणाला ठेवणार !!

जे काही होतं ते कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे होते असा काहीसा सूर आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2023 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली

काल का परवा बीसीसीआयचा संघं हरला ते बरंच झालं. जिंकला असता तर रात्री दोनेक वाजेपर्यंत चौकात डिजे वाजवून धिंाणा घातला गेला असता. त्यामुळे माझ्या आजारी आईला नी वर्षीय मूलाला प्रचंड त्रास झाला असता. सोसायटीत अजूनही काही म्हातारे आजारी लोक आहेत त्यांनाही भयंकर त्रासाचा सामना करावा लागला असता. बातमी ऐकून समाधान वाटलं होतं.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Nov 2023 - 5:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर. ती सगळी व्ही आय पी मंडळी भारत जिण्कणार ह्या अपेक्षेनेच आली होती. भारत जिंकणार मग शहारूख्,दीपिका,सचिन्,सदगुरु,रणवीर्,आशा भोसले,अनुराग ठाकूर हे सर्व लोक मैदानात धावणार.. खेळाडुंची पाठ थोपटणार.. काही जण नाचणार्,एक गाणे म्हणणार्,एकजण 'भारताची 'वेळ' आली आहे..' म्हणत जगाला 'संदेश'देणार..असा सगळा बेत होता. तो फसला. करोडो रुपयांचे फटाके फुटले असते तेही वाचले.
क्रिकेटपटूंच्या बायकानी आठवडाभर मग मीडियात/चॅनेल्सवर धुमाकुळ घातला असता.. तो ही आता नाही.

आंद्रे वडापाव's picture

22 Nov 2023 - 8:54 am | आंद्रे वडापाव

टीम ने सर्व सामने जिंकावे, (त्यावेळी ती व्यक्ती सामना पाहायला मैदानात आली नव्हती)
आणि
ज्यावेळी ती व्यक्ती सामना पाहायला मैदानात आली,
त्यावेळी सामना हरावा..
त्यामुळे त्याव्यक्तीला "पनौती" म्हणून म्हटलं जायचं, ते आता जास्त अधोरेखित झालं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2023 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

photo_2023-11-23_17-33-31

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2023 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोहम्मद कैफ़ : I CAN NEVER ACCEPT THAT THE BEST TEAM HAS WON THE WORLD CUP. THE INDIAN TEAM IS THE BEST TEAM ON PAPER.

Glenn Mitchell : I think Someone needs to remind former indian batter, Mohammad kaif that world Cup finals are won on a cricket field and not on paper

David Warner : i llike MK, issue is it does not matter what's on paper.At the end of the day you need to perform when it matters. That's why the call it a final. Thats the day that counts and it can go either way, that's sports. 2027 here we come. (सर्व संवाद. ट्वीटरवरुन साभार)

च्यायला, लै तान होऊ राहीला. अरे भो आम्ही हरलो. आम्ही अंतिम सामन्यात खराब खेळलो. विषय संपला. जय हिंद जय भारत.

-दिलीप बिरुटे