शेठ... 12 Nov 2023 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुषारशेठ, तुम्ही पण अतिशय सुंदर काम करुन घेतलेय.इमेज जनरेट करणे सोपे काम नाही. आपण सांगतो एक आणि तो करतो दुसरंच. कला थेट हृदयात पोहोचली. दिवे आणि गजरेवाली आवडली. शुभ दीपावली.
भयंकर त्रासदायक आहे हे आधीच समजले असल्याने अंक प्रकशित झाल्यावर ह्य धाग्याकडे अजिबात फिरकायचे नाही असा घोर निश्चय मनोमन करुन टाकला होता...
परंतू हा समविचारी प्रतिसाद वाचला आणि त्याला सहमती दर्शवण्यासाठी इथे येण्यापासुन स्वतःला रोखु शकलो नाही!
संपूर्ण अंकातील चित्रांचा वापर केवळ गवि यांच्या संकल्पनेतून साकार झाला. आधी साध्या सरळ सूचनांना मिळणारं Dall-E चं ओबडधोबड उत्तर त्यांच्याच सल्ल्याने अधिक सुबक, अर्थपूर्ण येऊ लागलं. त्यामुळे या सर्व चित्रनिर्मितीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे!
एखादी गोष्ट मनापासून केली आणि ती इतरांना आवडली, की त्याचा आनंद शतगुणित होतो, तसं वाटतंय.
एकीकडे व्यनिने लेख येत होते, त्यांना उत्तर देणे, ते लेख छाननी करून समितीसमोर ठेवणे, हे चालू होते. दुसरीकडे लेख निवड, अंक सजावट, प्रकाशन यांच्याविषयी दिवाळी अंक समितीमध्ये चर्चा झडत होत्या.
त्यादरम्यान गवि यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लेख आणि चित्रनिर्मिती करता येईल असे सुचवले. तेव्हा सर्वात आधी मुखपृष्ठ तयार करण्याचा विचार मनात आला, आणि एक दोन चित्रे Bing Dall-E कडून तयार करून घेतली. हा प्रकार इतका पण वाईट नाहीये, हे लक्षात आले. मग Dall-E ला आणखी चांगल्या, स्पष्ट, स्पेसिफिक सूचना देऊन हवं ते काढून घेता येऊ लागलं. आधी काही चित्रे इतकी वास्तववादी निर्माण झाली की, Dall-E ने ते एखाद्या खऱ्या व्यक्तीवर आधारित काढले असावे आणि त्यामुळे कुणाच्या खाजगीपणावर आपण अतिक्रमण करतोय की काय, अशी शंका आली.
मग सर्व चित्रांत एक समान शैली असावी म्हणून, Dall-E ला अजून एक सूचना देणे सुरू केले, की पेंटिंग वाटेल अशी चित्रे काढ. एकदा सूचना केली, की तो/ते/ती चार चित्रे काढून देई. मग त्यावर खल होऊन एखादी अतिरिक्त सूचना देऊन चित्र सुधारले जाई. कधी कधी सूचना जास्त झाल्या की, Dall-E कन्फ्युज होऊन गडबड करत असे, जसे ओठांना चिकटलेला कप, मोटारसायकलवर पाठमोरा बसून चालवणारा दूधवाला, तीन पायांची बाई...
पण बऱ्याचदा Dall-E ने अत्यंत उत्कृष्ट आणि मोहक (किंवा फॉर दॅट मॅटर जीवघेणे) चित्र काढून दिले.
बऱ्याच लेखांमध्ये गवि यांनी स्वतः चित्रे तयार करून दिली आहेत. पैजारबुवांच्या लेखातील देवसेनेचे चित्र तर तीन जणांनी दोन दिवस कष्ट घेऊन तयार केलंय. त्यातील चार पाच चित्रे तर जीवेघेणे मालिकेतील होती, पण, ते एक असो...
AI कडून चित्रे काढण्याची कल्पना मांडली हे खरे पण तुमचीच पूर्वीची काही चित्रे खफ वर बघून ती कल्पना आली होती.
काही ठिकाणी बरेच हातपाय मारून चित्रे बनवावी लागली. होल्डोल तर हैराण करून गेला. गुंडाळलेल्या गाद्यागिरद्या, चौकोनी ठोकळा स्वरूप बॅग आणि काय काय बाहेर टाकत होता डाळ ई. मग बेड रोल हे त्याला जास्त कळते आहे असे लक्षात आले. भारतीय म्हटले की दाढी मस्ट, पठाणी पायघोळ ड्रेस आणि फेटा अशी एक घट्ट समजूत डाळ ई ची दिसते.
सोनेरी पूल आणि व्हील चेअर वरचे आजोबा फायनल हवे तसे होईपर्यंत तीस चित्रे झाली होती.
बाकी तुम्ही बनवलेली सर्व चित्रे अफलातून आली आहेत. ती चकली तळण्याची प्रतिमा त्याच्या गळी कशी उतरवलीत ते सांगा.. कल्पनाच करवत नाही. :-)
हो ना! भारतीय व्यक्तींविषयी प्रीकन्सिव्ड नोशन्स आहेत खरे.
दाढीवाले पठाणी टाईप लोक, सरदार लोक असेच येतात. त्याला आवर्जून indian man in shirt and jeans असं सांगावं लागलं, तेव्हा कुठे त्याने हवं तसं चित्र दिलं.
चकली - पहिला प्रयत्न - indian recipe of chakli in frying pan, some chakli s are in a bowl
डीप फ्राय हवं म्हणून तसं वेगळं सांगितलं
indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil.
आता असं तळणं कसं चालेल? शिवाय शेजारी भांड्यात फ्रेंच croissant आले.
मग सूचना आणखी स्पेसिफिक केली.
indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size
मग अपेक्षेच्या जवळ जाणारं चित्र मिळालं.
मस्त. 18 Nov 2023 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी. आवडलं. लैच समजून सांगावं लागतं AI ला आणि मनासारखं चित्र यायला. आपलं AI च्या वतीनेच शाल श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कारात कांदे वगैरे पण टाकले त्यांनी पण समजून घेऊन सत्कार स्विकारावा. धन्यवाद.
अगदी indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size हे शब्द वापरून मला वेगळीच चित्रे दिली आहेत Dall-E ने!
हुश्श! संपला एकदाचा दिवाळी अंक वाचून!
मलपृष्ठ अंक आला तेव्हा पाहिले होते पण आता दिसत नाहीये.
सगळ्याच चित्रांसाठी खूप मेहनत घेतलीये आणि प्रत्येक लेखासाठी सुयोग्य बनवलय!
या चित्रांमुळे तर या वेळेसचा अंक विशेष आवडला आणि वेगळा झालाय. खूप छान!
प्रतिक्रिया
12 Nov 2023 - 8:00 am | ज्ञानोबाचे पैजार
मलपृष्ठ फारच देखणे आणि जीवघेणे झाले आहे
पैजारबुवा
12 Nov 2023 - 8:07 am | प्रचेतस
सहमत, अगदी जीवघेणे
12 Nov 2023 - 8:07 am | भागो
व्व्वा!!
12 Nov 2023 - 8:21 am | सरिता बांदेकर
सुंदर
12 Nov 2023 - 9:31 am | मदनबाण
गजरा माळलेली ए आय सुंदरी ? :)
मदनबाण.....
12 Nov 2023 - 10:31 am | अनिल हटेला
आवडण्यात आले आहे...
12 Nov 2023 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुषारशेठ, तुम्ही पण अतिशय सुंदर काम करुन घेतलेय.इमेज जनरेट करणे सोपे काम नाही. आपण सांगतो एक आणि तो करतो दुसरंच. कला थेट हृदयात पोहोचली. दिवे आणि गजरेवाली आवडली. शुभ दीपावली.
-दिलीप बिरुटे
12 Nov 2023 - 11:27 am | गवि
सुंदर आहे. त्रासदायक आहे. ;-)
13 Nov 2023 - 3:49 pm | टर्मीनेटर
+१०००००००
भयंकर त्रासदायक आहे हे आधीच समजले असल्याने अंक प्रकशित झाल्यावर ह्य धाग्याकडे अजिबात फिरकायचे नाही असा घोर निश्चय मनोमन करुन टाकला होता...
परंतू हा समविचारी प्रतिसाद वाचला आणि त्याला सहमती दर्शवण्यासाठी इथे येण्यापासुन स्वतःला रोखु शकलो नाही!
पण काही म्हणा, चित्र खुपच सुंदर आहे...
😘
12 Nov 2023 - 11:27 am | गोरगावलेकर
मलपृष्ठ आवडले . छान दिसतेय सुंदरी
12 Nov 2023 - 12:09 pm | कर्नलतपस्वी
तुषार भौ,या सुद्रींच्या जन्माची गोष्ट आणी प्रसूतीवेदना यावर प्रकाश टाका.
बाकी,ए आये (AI),सुंद्री भारीच आहे.
13 Nov 2023 - 3:04 pm | चौथा कोनाडा
मलपृष्ठ अप्रतिम सुंदर आहे !
हातात दिवे घेतलेली ललना तिच्या मोहक विभ्रमामुळे खेळवून ठेवते !
तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
15 Nov 2023 - 11:21 am | रंगीला रतन
+१५११२३
14 Nov 2023 - 6:57 pm | मुक्त विहारि
माझा गणेशा झाला आहे
14 Nov 2023 - 8:37 pm | जव्हेरगंज
काय सुंदर!!
AI अतिशय सुंदर वापर...
14 Nov 2023 - 9:19 pm | अथांग आकाश
चष्मेबद्दूर! किसीकी नजर ना लगे!!
14 Nov 2023 - 10:49 pm | शशिकांत ओक
कृत्रिम बुद्धिमत्ता आता हाताळायचा सराव करत करत पुढे जायचे आहे...
सुंदरीच्या दोन हातात असमान दीप, नाकात अपरेपण याचा काही संदर्भ असेल का?
15 Nov 2023 - 8:37 am | उग्रसेन
सुंदरा मनामधि भरली
15 Nov 2023 - 6:27 pm | मुक्त विहारि
अप्रतिम
15 Nov 2023 - 10:24 pm | तुषार काळभोर
संपूर्ण अंकातील चित्रांचा वापर केवळ गवि यांच्या संकल्पनेतून साकार झाला. आधी साध्या सरळ सूचनांना मिळणारं Dall-E चं ओबडधोबड उत्तर त्यांच्याच सल्ल्याने अधिक सुबक, अर्थपूर्ण येऊ लागलं. त्यामुळे या सर्व चित्रनिर्मितीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे!
एखादी गोष्ट मनापासून केली आणि ती इतरांना आवडली, की त्याचा आनंद शतगुणित होतो, तसं वाटतंय.
एकीकडे व्यनिने लेख येत होते, त्यांना उत्तर देणे, ते लेख छाननी करून समितीसमोर ठेवणे, हे चालू होते. दुसरीकडे लेख निवड, अंक सजावट, प्रकाशन यांच्याविषयी दिवाळी अंक समितीमध्ये चर्चा झडत होत्या.
त्यादरम्यान गवि यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लेख आणि चित्रनिर्मिती करता येईल असे सुचवले. तेव्हा सर्वात आधी मुखपृष्ठ तयार करण्याचा विचार मनात आला, आणि एक दोन चित्रे Bing Dall-E कडून तयार करून घेतली. हा प्रकार इतका पण वाईट नाहीये, हे लक्षात आले. मग Dall-E ला आणखी चांगल्या, स्पष्ट, स्पेसिफिक सूचना देऊन हवं ते काढून घेता येऊ लागलं. आधी काही चित्रे इतकी वास्तववादी निर्माण झाली की, Dall-E ने ते एखाद्या खऱ्या व्यक्तीवर आधारित काढले असावे आणि त्यामुळे कुणाच्या खाजगीपणावर आपण अतिक्रमण करतोय की काय, अशी शंका आली.
मग सर्व चित्रांत एक समान शैली असावी म्हणून, Dall-E ला अजून एक सूचना देणे सुरू केले, की पेंटिंग वाटेल अशी चित्रे काढ. एकदा सूचना केली, की तो/ते/ती चार चित्रे काढून देई. मग त्यावर खल होऊन एखादी अतिरिक्त सूचना देऊन चित्र सुधारले जाई. कधी कधी सूचना जास्त झाल्या की, Dall-E कन्फ्युज होऊन गडबड करत असे, जसे ओठांना चिकटलेला कप, मोटारसायकलवर पाठमोरा बसून चालवणारा दूधवाला, तीन पायांची बाई...
पण बऱ्याचदा Dall-E ने अत्यंत उत्कृष्ट आणि मोहक (किंवा फॉर दॅट मॅटर जीवघेणे) चित्र काढून दिले.
बऱ्याच लेखांमध्ये गवि यांनी स्वतः चित्रे तयार करून दिली आहेत. पैजारबुवांच्या लेखातील देवसेनेचे चित्र तर तीन जणांनी दोन दिवस कष्ट घेऊन तयार केलंय. त्यातील चार पाच चित्रे तर जीवेघेणे मालिकेतील होती, पण, ते एक असो...
15 Nov 2023 - 10:48 pm | गवि
AI कडून चित्रे काढण्याची कल्पना मांडली हे खरे पण तुमचीच पूर्वीची काही चित्रे खफ वर बघून ती कल्पना आली होती.
काही ठिकाणी बरेच हातपाय मारून चित्रे बनवावी लागली. होल्डोल तर हैराण करून गेला. गुंडाळलेल्या गाद्यागिरद्या, चौकोनी ठोकळा स्वरूप बॅग आणि काय काय बाहेर टाकत होता डाळ ई. मग बेड रोल हे त्याला जास्त कळते आहे असे लक्षात आले. भारतीय म्हटले की दाढी मस्ट, पठाणी पायघोळ ड्रेस आणि फेटा अशी एक घट्ट समजूत डाळ ई ची दिसते.
सोनेरी पूल आणि व्हील चेअर वरचे आजोबा फायनल हवे तसे होईपर्यंत तीस चित्रे झाली होती.
बाकी तुम्ही बनवलेली सर्व चित्रे अफलातून आली आहेत. ती चकली तळण्याची प्रतिमा त्याच्या गळी कशी उतरवलीत ते सांगा.. कल्पनाच करवत नाही. :-)
15 Nov 2023 - 11:35 pm | तुषार काळभोर
हो ना! भारतीय व्यक्तींविषयी प्रीकन्सिव्ड नोशन्स आहेत खरे.
दाढीवाले पठाणी टाईप लोक, सरदार लोक असेच येतात. त्याला आवर्जून indian man in shirt and jeans असं सांगावं लागलं, तेव्हा कुठे त्याने हवं तसं चित्र दिलं.
चकली - पहिला प्रयत्न - indian recipe of chakli in frying pan, some chakli s are in a bowl
डीप फ्राय हवं म्हणून तसं वेगळं सांगितलं
indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil.
आता असं तळणं कसं चालेल? शिवाय शेजारी भांड्यात फ्रेंच croissant आले.
मग सूचना आणखी स्पेसिफिक केली.
indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size
मग अपेक्षेच्या जवळ जाणारं चित्र मिळालं.
18 Nov 2023 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी. आवडलं. लैच समजून सांगावं लागतं AI ला आणि मनासारखं चित्र यायला. आपलं AI च्या वतीनेच शाल श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कारात कांदे वगैरे पण टाकले त्यांनी पण समजून घेऊन सत्कार स्विकारावा. धन्यवाद.
-दिली बिरुटे
18 Nov 2023 - 12:37 pm | तुषार काळभोर
दूधवाला जर उलट बसून मोटारसायकल चालवू शकतो, तर सत्कारात कांदे मिळणं, हा मी बहुमानच समजतो.
जय प्रा डॉ, जय मिपा, जय Dall-E!!
15 Nov 2023 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अति सुंदर आणि केवळ अप्रतिम. कौतुकाला शब्द नाही.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2023 - 4:10 am | निनाद
सुरेख आली आहेत सर्व चित्रे. या साठी तुम्ही Dall-E पेड व्हर्जन वापरले की मोफत?
16 Nov 2023 - 4:12 am | निनाद
अगदी indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size हे शब्द वापरून मला वेगळीच चित्रे दिली आहेत Dall-E ने!
17 Nov 2023 - 7:44 pm | नठ्यारा
कलाकारी सॉलिड जमली आहे.
17 Nov 2023 - 11:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
वापरायला क्रेडिट पॉईंट विकत घ्यावे लागत आहेत(कमीत कमी $१५), चकट फु व्हर्जन आहे का कुठे?
बाकी काही असो, चित्रे भारी जमली आहेत.
18 Nov 2023 - 5:06 pm | चौथा कोनाडा
जबरदस्त प्रॉम्प्टीग आहे !
मानलं बुवा !
22 Nov 2023 - 10:06 am | बिपीन सुरेश सांगळे
तुषारजी
ही दिपबाला कमालीची सुंदर केली आहे !
आपली सगळी मंडळी अगदी प्रोफेशनल लोकांना मात देतील असं काम करतात .
अभिनंदन!
22 Nov 2023 - 4:45 pm | मित्रहो
वाह खूप सुंदर मलपृष्ठ
23 Nov 2023 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली
मेलो.
29 Dec 2023 - 12:29 pm | श्वेता व्यास