दिवाळी अंक २०२३ - अनुक्रमणिका

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
12 Nov 2023 - 12:00 am

   मिपा एअरवेज

BOARDING PASS

NAME OF PASSENGER:
MIPA VACHAK
CLASS:
BUSINESS CLASS
FROM TO
मुखपृष्ठ मलपृष्ठ

7 STOPS

संपादक:
चांदणे संदीप
╍ ╍ ╍
मुखपृष्ठ:
गवि
╍ ╍ ╍
मलपृष्ठ
आणि
AI चित्र निर्मिती:
तुषार काळभोर
╍ ╍ ╍
मुद्रितशोधक:
सुधांशु नूलकर
╍ ╍ ╍
मुद्रितशोधन सहाय्य:
प्रचेतस
╍ ╍ ╍
अंक सजावट:
टर्मीनेटर
╍ ╍ ╍
संपादकीय
भटकंती
लेख
कथा
कविता
पाककृती
पुस्तक परिचय
FLIGHT NO:
╍ ╍ ╍
DA 2023
ETKT NO:
╍ ╍ ╍
MN-51729
DATE TIME SEAT
12-11-23 06:00 AM BC - 1A

--------------------------------------

प्रतिक्रिया

मिपा दिवाळी अंकाचे सहर्ष स्वागत.. दिवाळी आनंदमय जाणार नक्की!! दिवाळी अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

हा अतिशय सुरेख बोर्डिंग पास घेतलाय मी, आता एकेका ठिकाणांवर जात राहणार आणि आस्वाद घेत राहणार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Nov 2023 - 7:30 am | ज्ञानोबाचे पैजार

एकाच बोर्डिंग पास वर उपलब्ध असलेली सप्तरंगी सफर करायला सज्ज झालो आहे

दरवर्षी प्रमाणे वैशिष्टयपूर्ण अनुक्रमणिका

टर्मिनेटर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

पैजारबुवा,

भागो's picture

12 Nov 2023 - 7:46 am | भागो

झकास. नेहमी प्रमाणे.

दिवाळी अंकासाठी अनेक हातांनी कष्ट घेतले. अंक सुंदर झाला. आटोपशीर पण चांगला कंटेंट. आणि त्याचे रुपडे तर अतिशयच साजिरे झाले आहे.

सर्वांनी मान मोडून काम केले, पण मॅन ऑफ द मॅच असा एक पुरस्कार टर्मिनेटर यांनाच नि:संशय...

त्यांनी सजावट तर केलीच पण अन्य जे पडेल ते काम वेळोवेळी स्वीकारले. सॅल्यूट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2023 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वांनी मान मोडून काम केले, पण मॅन ऑफ द मॅच असा एक पुरस्कार टर्मिनेटर यांनाच नि:संशय...

सहमत.मिपाचं सगळं काम हौसे-मौजेचं. आपलं ऑफिस-काम, दिवाळीतली घरची कामं आणि अशावेळी मिपाचं काम. दोन शब्दांनी कौतुक केलं कोणी तर, तीच काय शाबासकी. मला स्वत: ला टर्मिनेटर तुमच्या या अफाट कामाचं कौतुक आहे. मनापासुन अभिनंदन. संभाजी नगरात आल्यास एक मस्त पार्टी देईंन.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

12 Nov 2023 - 9:45 am | तुषार काळभोर

पूर्ण प्रतिसादाशी सहमत..
पुण्यनगरीत एक पार्टी माझ्याकडून!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Nov 2023 - 6:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

पार्टीची वेळ आणि ठिकाण समजल्यास टर्मिनेटर, चांदणे सर, पैलवानभाऊ, गवि, वल्लीदा, प्रशांत,नुलकर काका,यांचे,याची देही याची डोळा, दर्शन घेण्याकरता जमलेल्या त्यांच्या अगणित चहात्यांची गर्दी आवरण्याची जबाबदारी आमची, तसेच त्यांची रांगेने दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, या रांगेत उभ्या असलेल्या चाहत्यांना प्रत्येकी एक पार्ले जी आणि फ्रुटी आमच्या तर्फे देण्यात येईल,

पार्टीआधी संपूर्ण पुण्यात 500 फ्लेक्स लावण्यात येतील, आणि पुणे शहरातून त्यांची हत्ती वरून मिरवणूक काढण्यात येईल

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

12 Nov 2023 - 6:44 pm | तुषार काळभोर

आमचे अगणित चाहते रक्तदान करायला येताहेत की काय 🤣

अवांतर : मी हत्तीवर बसणार नाही. मला भ्याव वाटतं!

टर्मीनेटर's picture

14 Nov 2023 - 1:00 pm | टर्मीनेटर

आमचे अगणित चाहते रक्तदान करायला येताहेत की काय

५०० फ्लेक्सचा खर्च करण्यासाठी निधी उभा करायला ते जबरदस्तीचे रक्तदान शिबिर पण आयोजीत करतील, काय भरोसा नाय 😀

मी हत्तीवर बसणार नाही. मला भ्याव वाटतं!

अहो असं नका बोलु... बुवा म्हणजे लैच डेंजर मुडी माणुस... मुड बदलला तर "हत्ती वरून मिरवणूक काढण्यात येईल" ऐवजी उद्या "गाढवा वरुन धिंड काढण्यात येईल" म्हणाले तर काय घ्या? नकोच ती रिस्क... त्यापेक्षा ते म्हणतायत ना हत्ती, मग हत्ती तर हत्ती, करु आपण तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये बसवुन अ‍ॅडजेस्ट, मग भ्याव नाही वाटणार 😂

स्वगतः 'संभाजी नगरात' एक, 'पुण्यनगरीत' एक आणि 'नदीच्या अलिकडे असलेल्या पिंचिं देशात' एक अशा तीन पार्ट्या घ्यायला जाण्या-येण्यास किती खर्च येइल ह्याचे गणित करुन बघणे आले... फार जास्त होणार असेल तर मी आपला इथेच तिन वेळा पार्टी करुन बिल पेमेंटसाठी हॉटेल्चा QR कोड तिघांना देतो असा प्रस्ताव मांडुन बघावा लागेल 😎

चांदणे संदीप's picture

13 Nov 2023 - 12:45 pm | चांदणे संदीप

आम्ही 'बुवा' तुमचे चाहते.
कोणी कुणाला किती आवरावे! =))

सं - दी - प

सुरेख कल्पना आणि कलाकृती !

मदनबाण.....

प्रशांत, टर्मिनेटर, पैजारबुवा व समस्त साहित्य संपादक याचे मनपूर्वक धन्यवाद.

आपले सकारात्मक विचार आणी माझा लेख दिवाळी अंकात संपादित करण्यासाठी घेतलेल्या विशेष परिश्रमा मुळे माझा आनंद आणी उत्साह द्विगुणित झाला.

विसाव्याच्या क्षणी मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणे कठीण आहे.

विजुभाऊ's picture

12 Nov 2023 - 9:34 am | विजुभाऊ

वा मस्तच कन्सेप्ट आहे ही

कुमार१'s picture

12 Nov 2023 - 10:03 am | कुमार१

अतिशय सुरेख कल्पना आणि कलाकृती !

टर्मिनेटर दंडवत घ्या! अप्रतिम कलाकृती!

बोर्डिंग पास हि संकल्पना वापरून केलेली टर्मिनेटर यांची अनुक्रमणिका खूपच आवडली. त्यातच अनुक्रमणिकेहून नजर फिरवतांना भटकंती विभागात माझ्या लेखाचे नांव पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

या बोर्डिंग पासवरील क्यू आर कोड आणि बार कोड कोणी स्कॅन करून पाहिला का? :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2023 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी काही मिपाकर भले परंपरावादी असू दे, सनातनी दळन टाकणारे असू दे ( काडी योग्य टाकलीय वाह सर वा ) पण काहींच्या कल मात्र आधुनिक विचार, विज्ञानवादी, नवतंत्रज्ञानवादी असतो आणि त्याचा एक मिपाकर म्हणून मला कायम अभिमान आहे. लगे रहो दोस्त हो...!

-दिलीप बिरुटे

Nitin Palkar's picture

12 Nov 2023 - 7:55 pm | Nitin Palkar

दोन्ही कोड्स 'रीड' झाले नाहीत..

अथांग आकाश's picture

14 Nov 2023 - 2:21 pm | अथांग आकाश

मी पाहिला!

अजित पाटील's picture

12 Nov 2023 - 4:25 pm | अजित पाटील
सौंदाळा's picture

12 Nov 2023 - 5:58 pm | सौंदाळा

अतिशय सुंदर
अनुक्रमणिकेपासूनच मन प्रसन्न होते. टर्मिनेटर म्हणजे सतत नाविन्याचा ध्यास.
सकाळी अंक थोडा चाळला होता, आता मात्र लॉगिन करून बोर्डिंग पास घेतला आहे. आता प्रवास सुसाट चालू करतो.

अंकाचे दर्शनी स्वरूप अतिशय आकर्षक. संपादक आणि सर्वच कलाकारांचे कौतुक आणि अभिनंदन.

एक_वात्रट's picture

12 Nov 2023 - 8:10 pm | एक_वात्रट

मिपाचा २०२३ दिवाळी अंक नेहमीप्रमाणेच उत्तम बनला आहे. भटकंती विषय असल्याने अंकाचे मुखपृष्ठ बोर्डिंग पासच्या स्वरूपात देण्याची कल्पना अनोखीच. ४ नोव्हेंबरची मुदत ७ नोव्हेंबर केल्यावर लेख देण्यासाठी थोडी अधिक मुदत मिळाल्याने हायसे वाटले आणि त्याच वेळी एवढ्या कमी वेळात संपादक मंडळ अंक पूर्ण कसा करणार असा विचार मनात येवून काळजीही वाटली. पण इतका थोडा वेळ हाताशी असतानाही एवढा सुंदर अंक बनवल्याबद्दल संपादक मंडळ आणि खास करून टर्मीनेटर यांचे खास आभार. अंक सवडीने वाचतो आहे, लेखांवर प्रतिक्रिया देईनच.

रीडर's picture

12 Nov 2023 - 8:13 pm | रीडर

सर्व सहभागी मिपकरांचे अभिनंदन

अथांग आकाश's picture

12 Nov 2023 - 8:52 pm | अथांग आकाश

अफाट सुंदर अनुक्रमणिका! बोर्डींग पासची संकल्पना खुप आवडली!!

अनन्त्_यात्री's picture

12 Nov 2023 - 9:50 pm | अनन्त्_यात्री

आवडली!

स्नेहा.K.'s picture

12 Nov 2023 - 10:05 pm | स्नेहा.K.

दिवाळी अंकाची घोषणा झाल्यापासून अंक येण्याचे वेध लागले होते.

सजावट खूपच छान आहे! प्रवास विशेष अशा दिवाळी अंकाला याहून साजेशी अनुक्रमणिका असू शकत नाही..

तुर्तास उपस्थिती नोंदवत आहे. या वर्षी काही लिहायचे होते पण कामाच्या गडबडीत राहुन गेले. आधी वाचुन येतो. संपादक व लेखक मंडळाचे आभार.

दिनेश५७'s picture

13 Nov 2023 - 12:03 am | दिनेश५७

मिपा अंकामुळे दिवाळी खमंग झाली!

दिवाळी अंक अतिशय सुंदर झालाय. सध्या दिवाळीची धामधुम असल्याने नंतर निवांत वाचेन.
अनुक्रमणिका फारच कल्पक... आवडलीच !
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा !

नंदन's picture

13 Nov 2023 - 8:26 am | नंदन

अनुक्रमणिका अतिशय कल्पक आणि देखणी आहे! टर्मीनेटर ह्यांच्या परिश्रमाला आणि सर्जनतेला दाद द्यावी तितकी थोडीच.

नूतन's picture

13 Nov 2023 - 12:55 pm | नूतन

आणि मनापासून अभिनंदन

श्वेता व्यास's picture

13 Nov 2023 - 12:24 pm | श्वेता व्यास

क्या बात है, झकास!
खूप सुंदर अनुक्रमणिका, मस्त कल्पना आहे.

चांदणे संदीप's picture

13 Nov 2023 - 12:43 pm | चांदणे संदीप

बोर्डिंग पास स्वरूपात 'प्रवास' थीम असणार्‍या अंकाची अनुक्रमणिका द्यायची ह्या कल्पकतेला केवळ सलाम!
कौतुक तर सर्वांनी केलेलंच आहे, मी जाहीर घोषणा करतो की, नदीच्या अलिकडे असलेल्या पिंचिं देशात 'टर्मिनेटर' बोट दाखवतील त्या रेस्टॉरंटात 'टर्मिनेटर' यांना माझ्याकडून पार्टी लागू.

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

13 Nov 2023 - 9:58 pm | चौथा कोनाडा

|| जय मिपा दिवाळी अंक ||

मुखपृष्ठ एक नंबर झकास आहे. तपशील पाहताना हरवून जायला होते ! मलपृष्ठ अप्रतिम सुंदर आहे ! हातात दिवे घेतलेली ललना तिच्या मोहक विभ्रमामुळे खेळवून ठेवते. तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !

मिपा एअरवेज चा बोर्डिंग पास भन्नाट ! या संकल्पनेसाठी जोरदार टाळ्या !!!

संपादकीय खूप समर्पक झालेले आहे. संपादकीयाचे चित्र जुन्या काळात नेऊन रमवण्याचे सुख देते !
एकंदरीत मिपाच्या कीर्तीला असा साजेसा असा दिवाळी अंक सर्वांनाच आवडेल असा आहे.

या दिवाळी अंकासाठी वेळेशी शर्यत करून लेख पूर्ण करता आला याचा आनंद आणि तो दिवाळी अंकात प्रकाशित झालाय हात दुहेरी आनंद यामुळे माझी दिवाळी आनंदमय झाली आहे !

सर्व मिपाकर आणि कुटुंबियांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणारे नूतन वर्ष विक्रम संवत २०८० याच्याही हार्दिक शुभेच्छा !

मिपा दिवाळी अंकाचे संपादक, साहित्य संपादक मंडळ, ग्राफिक्स कलाकार, प्रूफरीडिंग कलाकार आणि पडद्यामागचे कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

टर्मीनेटर's picture

14 Nov 2023 - 12:35 pm | टर्मीनेटर

उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

मुक्त विहारि's picture

14 Nov 2023 - 6:54 pm | मुक्त विहारि

मुखपृष्ठ आवडले

जव्हेरगंज's picture

14 Nov 2023 - 8:45 pm | जव्हेरगंज

जबरी !!

_/\_

मार्गी's picture

14 Nov 2023 - 8:52 pm | मार्गी

लय लय भारी अंक आहे!!!! समस्त आयोजकांचे व हे प्रत्यक्षात आणणा-यांचे खूप कौतुक व अभिनंदन!!!! प्रत्येक शीर्षकावरची चित्रं व मांडणी अतिशय समर्पक आहे! एक नंबर आहे अंक.

उग्रसेन's picture

15 Nov 2023 - 8:34 am | उग्रसेन

अनुक्रमाणिका कल्पना अप्रतिम.

रंगीला रतन's picture

15 Nov 2023 - 11:13 am | रंगीला रतन

क्या बात है. बोलेतो एकदम झकास!!!

सागरसाथी's picture

18 Nov 2023 - 7:13 am | सागरसाथी

छान अंक,प्रवासाला सुरवात करुया. अशी सुरेख शब्दभरारी घेणारे विमान आपल्याही शब्दांच्या गावात लॅण्ड व्हावे कोणाला वाटणार नाही ?
तयारीला लागायला हवे.

सागरसाथी's picture

18 Nov 2023 - 7:13 am | सागरसाथी

छान अंक,प्रवासाला सुरवात करुया. अशी सुरेख शब्दभरारी घेणारे विमान आपल्याही शब्दांच्या गावात लॅण्ड व्हावे कोणाला वाटणार नाही ?
तयारीला लागायला हवे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:03 am | बिपीन सुरेश सांगळे

टर्मिनेटर
बोर्डिंग पास - कसलं भन्नाट ! तुमच्या कल्पकतेला सलाम आहे .
अतिशय अभिनव अन समर्पक कल्पना . अन काय उतरवली आहे . वाचकांना अगदी बिझनेस क्लास मधून सफर घडवलीत ! अन अंक सजावटही
खूप खूप अभिनंदन !

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:13 am | बिपीन सुरेश सांगळे

गवि आणि तुषार
सुरेख कल्पना आपली ए आय ची अन तुषार यांनी अप्रतिम चित्रे केली आहेत . लै च आवडली . माझी तुषार यांना विनंती आहे कि - चित्रे कशी केली यावर तुमचे अनुभव येऊ द्या की लिहून .

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:14 am | बिपीन सुरेश सांगळे

एकूण अंक सुरेख , देखणा अन मुख्य म्हणजे वाचनीय झाला आहे . सगळेच विभाग . पूर्ण टीम ला सलाम आहे !
मोठं अन वेळखाऊ , प्रसंगी किचकट , त्यात आपली सगळी कामे सांभाळून हे करणं याची सकारात्मक दखल मिपावासीयांनी घेतली आहे आणि घ्यावी.

मिपाला खूप शुभेच्छा !

बिपीन सुरेश सांगळे's picture

22 Nov 2023 - 10:14 am | बिपीन सुरेश सांगळे

सुधांशु नूलकर आणि प्रचेतस यांचे योगदान देखील मोलाचे अन उत्तम !

Pramodk's picture

1 Dec 2023 - 9:16 pm | Pramodk

संपूर्ण दिवाळी अंक सुरेख झाला आहे. मांडणी आणि सजावटीसाठी संपूर्ण टीमला सलाम.