एक किस्सा: अब की बार सौ पार

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in राजकारण
8 Oct 2023 - 11:05 am

भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.

बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून, बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार. खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल. मी उतरलो, जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. (लक्ष्य निर्धारित करून, योजना बनविणे आणि त्यासाठी सर्व लॉजिस्टि्स पुरविणे ही प्रधानमंत्रींची कार्य करण्याची पद्धत). किती तरी वेळ तो हसत राहिला आणि म्हणाला, देशभक्त जरा मागचे रेकॉर्ड तपासून बघ. पदक वाढले तरी जास्तीत जास्त दहा-पंधरा वाढतील 100 तर निश्चित होणार नाही. (आकड्यांची खेळण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची सवय), पैज लाव. मी पैज लावत नाही, हे तुला माहित आहे. पण भेटल्यावर माझ्या तर्फे चाय पकौडे किंवा तुझ्या तर्फे लंच.

या वेळी पहिल्यांदा सोनी लिव्ह वर सर्व खेळ बघितले. दिवसभर टीव्ही समोर बसून, चहाचे घोट घेत खेळाडूंना प्रोत्साहन देणे सुरू केले. एक दिवस सौ. ने कंटाळून आयुष्यात प्रथमच विचारले, आजकाल लिहणे सोडून दिले आहे का? मी उतरलो १०० पूर्ण होऊ दे, मग ठरवेल काय लिहायचे ते. दिवसभराच्या भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाची चीरफाड करणाऱ्या समीक्षकांना ही १०० पदक मिळतील याची खात्री नव्हती. माझे मन ही सांशक होते. पण विश्वास होता बाकी मंत्रालयाच्या टार्गेट प्रमाणे हे लक्ष्य ही निश्चित पूर्ण होईल. बाकी १०७ पदक मिळाले तरी सोनी लिव्हच्या समीक्षकांपाशी सरकारची तारीफ करण्यासाठी शब्द नव्हते. असो.

काल मित्राला फोन करून त्याला विचारले, कुठे सुजले असेल तर बरणाल घेऊन येऊ का? दोन चार शिव्या देत तो म्हणाला, मला माहित आहे, दिवसभर टीव्ही समोर बसून तू काळी जादू करत असणार, त्या शिवाय हे शक्य नाही. मी उतरलो, तुला माहित होते, तर पैज का लावली. मी लवकरच भेटायला येणार आहे लंच तैयार ठेव.

चला शंभरी पार झाली. आता १५० करायचे असेल तर तैराकी, जिमनॅस्टिक आणि इतर खेळांवर वर ही काम करण्याची गरज आहे. निवडणुकीत विपरीत घडले नाही तर २०३० पर्यंत हे लक्ष्य निश्चित पूर्ण होऊ शकते.

शेवटी, मी ऑलम्पिक चॅम्पियन आहे. मला ट्रायल देण्याची गरज नाही. मी सरकारला ब्लॅकमेल केले. एशियन गेम्सचे तिकीट पटकावले. पण गर्वाचे घर नेहमीच खाली होते. हे मात्र त्याला कळले नाही.

प्रतिक्रिया

भीमराव's picture

8 Oct 2023 - 5:29 pm | भीमराव

आताच guardians of the galaxy v3 हिंदी डबा मध्ये पाहिला . त्यात एक वाक्य होते. दुसरा मौका सभीको मिलना चाहिए. मुद्दा असा की बजरंग पुनिया चांगला पैलवान आहे. राजकारण सोडून एका लढाऊ पैलवानाप्रमाणे भिडला तर अजुनही रास लाऊ शकतो तो.

विवेकपटाईत's picture

14 Oct 2023 - 4:53 pm | विवेकपटाईत

त्याने ट्रायल दिली असती आणि पराजित झाला असता तर कुणीही काहीही म्हंटले नसते. पण बहुतेक त्याला विशाल कालीरमण या ट्रायल विजेतची भीती वाटली असावी असे हरियाणात बोलले जाते. ( मी जिथे राहतो ते जाटांचे गाव आहे). पराजित झाल्याने अब्रू धुळीस मिळाली.

अहिरावण's picture

8 Oct 2023 - 7:31 pm | अहिरावण

इतके दिवस टीव्हीसमोर बसुन राहिलात आणि खेळ पाहीले. वाटले होते एक झकास माहितीपूर्ण लेख येईल.
पण काय ... भ्रमनिरास.

तेच ते पालुपद तीच ती आरती

वाजवा हो ढोल वाजवा पण काही तारतम्य?
ढोलाचा आवाज आता किरटा होत होत टीमकीचा यायला लागलाय.... अजुनही वेळ गेलेली नाही... संभाळा स्वतःला

विवेकपटाईत's picture

14 Oct 2023 - 4:56 pm | विवेकपटाईत

मी सत्याची टिमकी वाजवली. तुम्हाला आवडली नाही त्यात माझा दोष नाही. बाकी ज्या नेत्याच्या नेतृत्वात सर्व क्षेत्रांत प्रगती होत आहे. त्याची तारीफ करण्यात काही गैर आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Oct 2023 - 5:45 pm | अमरेंद्र बाहुबली

सुंभ जळाला तरी पीळ जात नाही ही म्हण इथे लागू पडते.

अहिरावण's picture

14 Oct 2023 - 7:20 pm | अहिरावण

>>>त्याची तारीफ करण्यात काही गैर आहे का?

बिलकुल गैर नाही.. पण एकाचे गोडवे गायचे आणि इतरांना शिव्या घालायचा हा दळभद्री करंटेपणा निदान आता तरी सोडा !!

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Oct 2023 - 7:30 pm | अमरेंद्र बाहुबली

दळभद्री करंटेपणा निदान आता तरी सोडा !! +१

विवेकपटाईत's picture

26 Oct 2023 - 10:52 am | विवेकपटाईत

माझ्या लेखात कुणालाही शिवी दिलेली नाही. बाकी जो ट्रायलला घाबरला, राजनीती केली, सरकारला ब्लॅकमेल केले. त्याची अब्रू जाणारच होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Oct 2023 - 9:14 pm | अमरेंद्र बाहुबली

ओलींपीक मध्ये किती पदके मिळाली? त्यावेळी कुठे गेले होते पंतप्रधानांचे प्लानिंग वगैरे?
आपल्या देशातील लोकही दिव्य आहेत. खेळाडूंच्या मेहनतीला शाबासकी न देता पंतप्रधानांची आरती ओवळताहेत. काय तर म्हणे प्लानींग केली. पदकं जिंकायला कसली असते प्लानींग?

म्हणजे लोक वाचतात म्हणून काहीबाही काहीच्या काही लिहायचं?? मालकांनी राजकीय धागे बंदं केल्याने अशाप्रकारे वेगवेगळ्या मार्गाने दाबलेली ऊर्मी बाहेर निघतेय.

कर्नलतपस्वी's picture

9 Oct 2023 - 12:22 pm | कर्नलतपस्वी

२०१४ -पंतप्रधानांची आरती सुरू झाली.
२०१८-मिशन खेलो इंडिया ची स्थापना झाली.
ले क राज्यवर्धन राठोड ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळमंत्री झाले.
गाव,शाळा,जिल्हा,राज्य व देश स्तरावर मिशन राबवले.
खेळ,कला यांना राजाश्रय हवा असतो. आताच्या काळात सरकारकडून तो मिळाला तर खेळाडू, कलाकार चमकतात.
एसीयन खेळ १९५१ मधे सुरू झाले.
२०१४ च्या आगोदर व नंतर ची मेडल यादी बरेच काही सांगून जाते.

भारताला सन १९०० ते २०१२ ,११२ वर्षात २४ मेडल्स तर २०१६ ते २०२० ,६ वर्षामधे ९ मेडल्स मिळाले. याचाच अर्थ तत्कालीन सरकार खेळ,खेळाडू आणी पर्यायाने देश या बद्दल किती संवेदनशील आहे हे वेगळे लिहावयास नको.

पी टी उषा,अदिल सुमारील,नरेंद्र बत्रा,,नारायण रामचंद्र सारखे ऑलिम्पिक मेडलिस्ट, अनुभवी IOCचे प्रेसिडेंट तर २०१४ पुर्वी,कलमाडी,विद्याचरण शुक्ला,चौटाला सारखे राजकारणी प्रेसिडेंट होते.

आमच्या घरात एक अंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू व जज्ज आहे. या वर्षी एशियन खेळाडूंना घेऊन गेला व जज्ज सुद्धा होता. त्याचा प्रवास जवळून बघीतला आहे.

जर एखादे सरकार चांगले काम करत असेल तर सामान्य जनता जरूर त्याची दखल घेते पण कार्यकर्ते मात्र त्यांच्या आकां ची मर्जी राखण्यासाठी काहीबाही बोलत राहातात.

खेळाडूंची मेहनत कुणीच नाकारत नाही पण सरकार ने खेळाडूंवर घेतलेली मेहनत मात्र सोईस्कर पणे विसरतात.
Year Gold Silver Bronz Total

1951 - 15, 16, 20, 51.

1954 - 5 4 8 17

1958 - 5 4 4 13

1962 - 10 13 10 33

1966 - 7 3 11 21

1970 - 6 9 10 25

1974 - 4 12 12 28

1978 - 11 11 6 28
1982 - 13 19 25 57
1986 - 5 9 23 37
1990 - 1 8 14 23
1994 - 4 3 16 23
1998 - 7 11 17 35
2002 - 11 12 13 36
2006 - 10 17 26 53
2010 - 14 17 34 65
________________________________________
2014 - 11 10 36 57
2018 - 16 23 31 70
2023 - 28 38 41 107

पॅरिस मधे नक्कीच भारतीय खेळाडू अपेक्षे पेक्षा भरीव कामगीरी करणार यात शंकाच नाही.

हर,हर,.......

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Oct 2023 - 12:28 pm | अमरेंद्र बाहुबली

ब्रिजभूषण बद्दल काहीही लिहीलं नाहीत?

सर टोबी's picture

10 Oct 2023 - 11:00 am | सर टोबी

खेळाडूंच यशाचं श्रेय द्यायचं झालं की प्रधानमंत्र्यांची वाहवा, त्यांच्या योग्य नीतीचं यश आणि धोरण आणि प्रशासन यासाठी राजकारणी IOC च्या प्रेसिडेंट पदावर बसला तर ती आपल्या चमच्यांची सोय! जरा बघा एशियन गेम्सचं नियोजन, त्या निमित्ताने कायमस्वरुपी झालेलं रंगीत प्रसारण. कोणी ऊठसूठ इंदिरा गांधींना त्याचं श्रेय देत बसला नाही.

कर्नलतपस्वी's picture

10 Oct 2023 - 11:48 am | कर्नलतपस्वी

गणेश चतुर्थीला बाप्पा मोरया,नवरात्रात अंबाबाई चा उदो उदो...

थोडक्यात म्हणण्याचा उद्देश ज्या त्या वेळेस त्या त्या सरकारला श्रेय द्या.

जर एखादे सरकार, (मग ते कुठलेही असो),चांगले काम करत असेल तर सामान्य जनता जरूर त्याची दखल घेते

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Oct 2023 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली

ईस्रो चं श्रेय नेहरूंना द्यायला हवं.
अणूबोम्बचं इंदिरागांधींना.

अहिरावण's picture

11 Oct 2023 - 10:03 am | अहिरावण

अणुबॉम्बचे की अणुस्फोटाचे??

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2023 - 12:19 pm | अमरेंद्र बाहुबली

बोम्बचे.

मग ते होमी भाभांनाच द्यायला हवे

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Oct 2023 - 7:58 pm | अमरेंद्र बाहुबली

थोडक्यात म्हणण्याचा उद्देश ज्या त्या वेळेस त्या त्या सरकारला श्रेय द्या.

आम्ही देतोच कधी तरी तुम्ही पण द्या ! :)

विवेकपटाईत's picture

14 Oct 2023 - 4:37 pm | विवेकपटाईत

नेहरूंनी इस्त्रोची स्थापना केली, पण पाळण्याची शक्ती या सरकारने दिली. ( सर्वच क्षेत्रांत). हे सत्य स्वीकार करा.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Oct 2023 - 5:44 pm | अमरेंद्र बाहुबली

खो खो. विनोद चांगले करतात सर आपण.

विवेकपटाईत's picture

26 Oct 2023 - 10:57 am | विवेकपटाईत

आजोबांनी बांधलेल्या कौलारू घराच्या जागेवर नातवाने बंगला बांधला. त्या बंगल्याचे श्रेय आजोबांना द्यायचे असे म्हणायचे आहे का?

अहिरावण's picture

11 Oct 2023 - 7:45 pm | अहिरावण

>>> कोणी ऊठसूठ इंदिरा गांधींना त्याचं श्रेय देत बसला नाही.

पण न्युयॉर्क टाईम्सचा ५ डिसेंबर १९८२ चा लेख वेगळेच सांगतोय
https://www.nytimes.com/1982/12/05/world/asian-games-give-mrs-gandhi-a-p...

सर टोबी's picture

15 Oct 2023 - 9:51 am | सर टोबी

एक सॉफ्ट पॉवर म्हणून एशियन गेम्सच्या आयोजनाचा निवडणुकीत लाभ होणं आणि कशाही प्रकारे मोदींची आरती ओवाळायचीच हा अट्टाहास असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना?

साध्या एशियाड बसेसचं उदाहरण घ्या. अल्युमिनियमच्या पत्र्यापासून बनविलेल्या, वजनाला हलक्या, सुखद रंगसंगतीच्या, रुंद खिडक्या असणाऱ्या बसेसनी सार्वजनिक प्रवासाची कल्पना बदलून टाकली. अंतराष्ट्रीय स्पेसिफिकेशन्स चे तरण तलाव, रेसिंग ट्रॅक, अशा पायाभूत सुविधा देशातच तयार झाल्या. या धाग्याचं जे शीर्षक आहे ते साध्य करणाऱ्या पायाभूत सुविधांची ती पायाभरणी होती. आणि हे सर्व करतांना कुठेही इंदिरा गांधींची छबी नव्हती.

सध्या प्रत्येक ठिकाणी असलेली श्री मोदी यांची छबी आणि नावाचा उदो उदो अगदी डोक्यात जाणारा आहे. श्री मोदी आणि त्यांचे सहचारी श्री नेहरु यांना याचमुळे नावे ठेवतात, पण श्री मोदी तेथेच जाऊन पोचले आहेत.

विवेकपटाईत's picture

26 Oct 2023 - 10:56 am | विवेकपटाईत

एवढी घृणा कुठून येते. फक्त खेळ नाही देशाच्ची चाहुमुखी प्रगती झाली आहे.

कर्नलतपस्वी's picture

9 Oct 2023 - 12:51 pm | कर्नलतपस्वी

टिप्पणी करना उचित नही.
समय करेना दुध का दुध.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Oct 2023 - 12:58 pm | अमरेंद्र बाहुबली

मोठं आंदोलन करूनही त्याच्या विरूध्द साधा गुन्हा दाखल केला जात नव्हता. लोकलज्जेस्तव दाखल केला. त्यामुळे पुढे तपास काय होणार हो माहीतच आहे. भाजपचा लाडका खासदार असल्याने खेळाडूंचे लैंगीक शोषण झालेही असेल तरी काय फरक पडतोय?

निनाद's picture

10 Oct 2023 - 1:21 pm | निनाद

जर प्रधानमंत्री ने असे म्हटले आहे तर नक्कीच 100 पार होतील. (लक्ष्य निर्धारित करून, योजना बनविणे आणि त्यासाठी सर्व लॉजिस्टि्स पुरविणे ही प्रधानमंत्रींची कार्य करण्याची पद्धत). काहीसा सहमत आहे. काही बाबतीत कार्य करण्याची पद्धत नक्कीच दिसून येते आहे.

मुक्त विहारि's picture

11 Oct 2023 - 8:55 pm | मुक्त विहारि

प्रगती होतेच

रंगीला रतन's picture

13 Oct 2023 - 8:10 pm | रंगीला रतन

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा...
चालूदे

रंगीला रतन's picture

13 Oct 2023 - 8:15 pm | रंगीला रतन

आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा...
चालूदे

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Oct 2023 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली

हीही. एखाद्या राजकीय व्यक्तिमागे वहात गेलेले लोक भारत सोडला तर कुठेही नसावेत.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2023 - 8:49 pm | मुक्त विहारि

परमपूज्य गांधी यांनी, पाकिस्तानच्या निर्मितीला कळत नकळत हातभार लावला , तरी जनता शांतच होती

परमपूज्य नेहरू यांनी, चीनला जमीन दिली, तरी जनता शांतच

-----

आम्ही आपले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी मागे, बहालोल खानाला ठेचून मारा ... एका प्रकारे ही पण , व्यक्ती पूजा ...

-----+

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Oct 2023 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

राजकीय चर्चा नकोत.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2023 - 9:04 pm | मुक्त विहारि

परमपूज्य नेहरू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे, उभ्या राहणाऱ्या जनतेची आहे ...

आम्ही , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे, एक प्रकारची व्यक्ती पूजा ...

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Oct 2023 - 9:07 pm | अमरेंद्र बाहुबली

गांधी नेहरूंची नावं घेतलीत. सध्या मोदींच्या काळात चीन किती भूमी गिळतोय ते पहा. चीनचं नाव घ्यायचीही हिंमत होत नाहीये विश्वगुरूंची. असो. राजकीय चर्चा नको आहेत. तरीही तुम्हाला चर्चा करायचीच असेल तर स्वतःच स्वतशी करा.

मुक्त विहारि's picture

14 Oct 2023 - 9:19 pm | मुक्त विहारि

हिंदूंचे राष्ट्र स्थापन करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले...

बाय द वे,

छत्रपती शिवाजी महाराज यांचा, कुठला पक्ष होता?

सुबोध खरे's picture

17 Oct 2023 - 9:41 am | सुबोध खरे

चीन किती भूमी गिळतोय

याला काही आधार

कि

नेहमी प्रमाणे पप्पूच्या गफ्फा

लष्करप्रमुखानी ग्वाही दिली आहे कि एक इंच सुद्धा जमीन चीनला दिलेली नाही.

कि आता लष्करप्रमुख सुद्धा मोदीभक्त झाले असे म्हणणार?

https://timesofindia.indiatimes.com/india/not-an-inch-of-land-has-been-l...

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 9:53 am | अमरेंद्र बाहुबली

सुब्रम्हण्यम स्वामी हो नाव ऐकलंय का?? विशेष म्हणजे तथाकथीत देशभक्त पक्षाचेच खासदार आहेत. पण ते देशद्रोही असावेत.
गुगल वर असंख्य वृत्तपत्रांच्या बातम्या आहेत पण एक पान्श्चजन्य सोडलं तर अख्खा मिडीया देशद्रोहा असावा.

सुबोध खरे's picture

17 Oct 2023 - 10:10 am | सुबोध खरे

एखादा सज्जड पुरावा द्याल का?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 10:51 am | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे वृत्तपत्रांच्या बातम्या/सुब्रम्हण्यम स्वामींनी दिलेले पुरावे खोटे होते का?? की मोदी खोटं बोलले?? खोटं बोलण्याचा इतिहास कुणाचा आहे हे माहीत करा.

सुबोध खरे's picture

17 Oct 2023 - 11:19 am | सुबोध खरे

वृत्तपत्रांच्या बातम्या/सुब्रम्हण्यम स्वामींनी दिलेले पुरावे

तेच द्या म्हटलंय हो.

ऐकीव बातमी नको

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 12:00 pm | अमरेंद्र बाहुबली

चमच्याने कसं भरवनार सर? स्वत: नेट वर जाऊन थोडे तरी कष्ट ऊपसा.

सुबोध खरे's picture

17 Oct 2023 - 12:03 pm | सुबोध खरे

तुम्हाला सापडत नाहीये ना?

मला तरी सापडलं नाही.

सोडून द्या.

मी तरी कोणत्याही राजकारणी किंवा पत्रकारापेक्षा लष्करप्रमुखांवर जास्त विश्वास ठेवतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 12:04 pm | अमरेंद्र बाहुबली

पुरावे असतील तरीसुध्दा. हे लिहायचं राहीलं.

सुबोध खरे's picture

17 Oct 2023 - 12:06 pm | सुबोध खरे

पुरावा द्या

मग बोलू

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 12:25 pm | अमरेंद्र बाहुबली

सुब्रम्हण्सम स्वामींनी दिलं ते काय होतं?

अहिरावण's picture

17 Oct 2023 - 2:56 pm | अहिरावण

घंटा

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली

आयडी ऊडायची वेळ झालीय,