गाभा:
नमस्कार,
माझा एक मित्र रात्री ९ च्या सुमारास मुंबई international airport terminat २ ला येणार आहे. त्याला तिथून पुण्याला जायचं आहे. पण रात्री कॅब ने जायची रिस्क घ्यायची नाही.
Volvo bus किंवा शिवनेरी जास्त सुरक्षित वाटते.
तर international airport वरून बस साठी जवळचा थांबा कोणता आहे? थोडं मार्गदर्शन केलं तर खूप मदत होईल. जर कोणी असा प्रवास केला असेल तर त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल.
प्रतिक्रिया
26 Sep 2023 - 10:02 am | कर्नलतपस्वी
के के ट्रॅव्हल्स शेअर टॅक्सी सुरक्षित, आम्ही रात्री दोन वाजता सुद्धा हीच घेतो. बाकी इतर काही कारणास्तव असेल तर मग सांगता येत नाही.
26 Sep 2023 - 1:03 pm | अदित्य सिंग
+१
के के सुरक्षित आहे... के के च्या शेअर कॅबही मिळतात....सँडीज म्हणुनही एक कॅब सेवा होती, आता आहे का माहित नाही...
काही वर्षापुर्वी तरी सँडीज कॅबचे पुण्यात (डहाणुकर कॉलनी, लेन क्र १) बुकिंगही होत असे... म्हणजे ड्रायव्हर नंबर वगैरे आधीच मिळतो...
मी अनेक वेळा के के अन सँडीज दोन्हीने प्रवास केला आहे... सुरक्षित आहे... फार कमी वेळा त्रास झाला आहे...
शिवनेरी अन ट्रेनने प्रवास करणे हे एकट्या प्रवाश्याला अन तेही सामान फार नसेल तरच शक्य (सोयिस्कर नाही) आहे, पण एकुण त्यात त्रास खूप आहे कारण जनरली परदेशाहुन येणारी विमाने मध्यरात्री वगैरे येतात... तेव्हा शिवनेरी मिळेलच ह्याची खात्री नाही अन ट्रेनही आहेत का ते माहित नाही, वर पुण्यात उतरुन पहाटे रिक्षावाल्यांचे पाय धरावे लागतील....
26 Sep 2023 - 10:27 am | मनो
के के ट्रॅव्हल्स शेअर टॅक्सी +१
दुसरा अगदीच निर्वाणीचा उपाय म्हणजे रिक्षाने मैत्री पार्क चेंबूर नाक्याला या, तिथे पुण्याला जाणाऱ्या सर्व सरकारी आणि खाजगी बसेस मिळतील. सामान बरोबर असेल तर हे खूप कष्टाचे होते.
26 Sep 2023 - 12:30 pm | Trump
टॅक्सीने सीएसटीएम किंवा दादरला या आणि पुण्याच्या रेल्वेत बसा.
26 Sep 2023 - 7:29 pm | अहिरावण
मुंबई पुणे विमानाने या
26 Sep 2023 - 7:52 pm | राघवेंद्र
घरापर्यन्त सोडतात
26 Sep 2023 - 10:23 pm | Nishantbhau
सविस्तर प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप आभार. KK travel airport var direct book करता येते का? की advance booking करावे लागते.
27 Sep 2023 - 12:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
स्वानुभव-- अरपोर्ट्वर डायरेक्ट बूक करता येते. पण कधी कधी केके लिहिलेली गाडी (स्वतःची) उपलब्ध नसेल तर केकेवाले ते बूकिंग दुसर्या कोणातरी कॅब ला देतात, मात्र कॅब सुटे पर्यंत केके चा माणुस तिथे उभा असतो, कदाचित ५०/५० टक्के वाटुन घेत असावेत. आणि दुसरा कॅबवालाही परतीचे भाडे मिळतेय या आनंदात ते स्वीकारतो.
ओला/उबर चा पर्यायही चांगला आहे. आजकाल मला उबरच जास्त आवडते, कॅन्सल होणे, पेमेंटच्या कटकटी कमी असतात(पुन्हा स्वानुभव)
27 Sep 2023 - 7:08 am | साहना
जास्तच रिस्क असेल तर मुंबई T२ वर निरंत नावाचे हॉटेल आहे ह्यांच्याशी घासाघीस करून तासाच्या हिशोबाने रूम मिळतो. व्यवस्थित झोप आणि आणि अंघोळ वगैरे करून मग सकाळी बाहेर पडू शकता किंवा पुण्याचे विमान सुद्धा पकडू शकता. (अविवाहित जोडीदाराना आणि लहान मुलांना निरंत मध्ये मज्जाव आहे पण रूम दर्जा चांगला होता.) सकाळी पुण्याची फ्लाईट असते साधारण ३००० रुपयांत मिळते. रूम चा खर्च साधारण ५-१० हजार असू शकतो. सांगताना काही बाही रेट सांगतात.
आर्थिक दृष्टिकोनातून घाटेंका सौदा असला तरी आपण थकलेले असाल किंवा वयोवृद्ध असाल तर उगाच रात्रभर टॅक्सीत बसण्यापेक्षा हे चांगले.
27 Sep 2023 - 10:13 am | अमरेंद्र बाहुबली
ओला ऊबेर च्या काळात सदर प्रश्न अतिशय निरागस वाटतो.
27 Sep 2023 - 10:13 pm | चौथा कोनाडा
ज्यांना असे अनुभव नाहीत ते निरागसच म्हणायला हवेत.
(फेसबुक समूहावर आजकाल असले प्रश्न लई विचारले जातात, बऱ्याच वेळा वाटते दोन चार मित्रांना / शेजाऱ्या पाजऱ्यांना आधी का विचारात नसावेत :) असो. )
प्रश्नवरचा हा प्रतिसाद त्यामुळे अतिशय निरागस वाटतो.
28 Sep 2023 - 4:31 am | चामुंडराय
विमानतळावरच ते पॉड हाटेल झालं होतं ना?
तेथे नाही का राहता येत रात्रीपुरते?
29 Sep 2023 - 6:41 pm | चित्रगुप्त
आजच आम्ही अमेरिकेतून निघून उद्या दिल्लीला रात्री साडेअकराला पहुचणार आहोत. ज्यांच्या घरी उतरणार आहोत, ते उच्च्पदस्थ सरकारी अधिकारी आहेत. त्यांनी आम्हाला सल्ला दिला की रात्री दीड-दोनला टॅक्सीने येण्यापेक्षा सकाळपर्यंत विमानतळावरच थांबणे बरे. (त्यांच्यामते जी२० नंतर दिल्लीत अपराधाचे प्रमाण वाढलेले आहे) त्यामुळे आम्ही जवळचे हॉटेल बुक केले आहे. तिथे झोपून, नाष्ता करून नऊ वाजता त्यांच्या घरी जाऊ. गेली वीस वर्षे रात्री स्वतःच्या घरी जात होतो, पण आता त्यांनीच असे सांगितल्याने तसे करणेच योग्य ठरेल.
(आता मुळात त्यांच्याकडे जायचेच का, तर इकडे येताना जास्तीचे झालेले सामान त्यांच्याकडे ठेवलेले आहे ते घेणे)
29 Sep 2023 - 7:37 pm | विजुभाऊ
दिल्ली आणि मुंबई यात बराच फरक आहे.
दिल्ली ही स्थानीक माणसांनाही सुरक्षीत वाटत नाही.
त्या मानाने मुंबई बरीच सुरक्षीत आहे.
पुणे मुंबई साठी उबेर कॅब उपलब्ध आहेत.
मुंबई एअरपोर्टवरून पुण्यासाठी प्रीपेड कॅबदेखील मिळतात.
29 Sep 2023 - 7:41 pm | विजुभाऊ
रात्री ९ च्या सुमारास जर तुमचे मित्र मुंबईमधे येणार असतील तर त्यांना दादर हुन शिवनेरी / एशियाड मिळू शकते.
त्याचे बुकिंग रेडबस वर मिळू शकेल. किंवा डोमेस्टीक एअरपोर्ट बाहेर नीता व्होल्वो च्या बसेस मिळतात. त्याचेही बुकींग रेडबस वरून करता येईल.
29 Sep 2023 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली
एक वन वे कॅब नावाचे एप आहे पिवळे नी मध्ये निळा गोल असलेला लोगो. मस्त आप आहे सिडानच्या किमतीत कधी कधी एस सु व्ही मिळते. नो एक्स्ट्का चार्जेस.
1 Oct 2023 - 2:02 am | तुर्रमखान
मागच्या पंधरा वर्षापासून केके ट्रॅवल्स वापरतो आहे. रात्री-अपरात्री कधिही गैरसोय झाली नाही. पुर्वी एकटा असताना शेअर वापरायचो पण आता तीन जण असल्यामुळे चार्टर कॅब बूक करतो. आता त्यांचे मुंबई ते पुणे साडेपाच हजार होतात. शेअर कॅबची एक समस्या अशी होती की मी रहात असलेल्या ठिकाणामुळे सर्वात आधी मला पिकअप केलं जायचं आणि ड्रॉप शेवटी.
2 Oct 2023 - 8:51 pm | सिरुसेरि
sandis चे बु़किंग बहुतांशी वेळा आधी करावे लागते .
केके मधे बरेचदा आयत्या वेळीही adjust करुन घेतात . असे निरिक्षण आहे .
3 Oct 2023 - 7:44 pm | रात्रीचे चांदणे
Nishantbhau, तुमचा मित्र आला का? आला असेल तर त्याने कोणता पर्याय वापरला? तुमच्या अनुभवाचा फायदा दुसऱ्यांना होईल.
28 Oct 2023 - 10:07 pm | Nishantbhau
उशिरा प्रतिसाद देत असल्याबद्दल क्षमस्व. माझ्या मित्राने KK travels book केली. प्रवास एकदम सुरक्षित वाटला.
28 Oct 2023 - 10:08 pm | Nishantbhau
उशिरा प्रतिसाद देत असल्याबद्दल क्षमस्व. माझ्या मित्राने KK travels book केली. प्रवास एकदम सुरक्षित वाटला.
30 Oct 2023 - 5:03 pm | चौथा कोनाडा
ओके, निशुभाऊ !