पालकावर माझा विशेष लोभ आहे.पण आतापर्यंत तो पाण्यात उकळून प्युरी करत धपाटे,पुरी,पालक पनीर,पालक इडली -डोसा,पालक चिला असेच बनवले आहे.नुसता न उकळता चिरून पीठ पेरून भाजी घाईच्या वेळेत होते.डायट पाळणं सात दिवस झालं जमलंच नाही.
मका होता पालक होता.न उकळता फक्त पालक चिरून तेव्हा झटपट रेसिपी केली.
साहित्य -दोन वाटी उकडलेले मक्याचे दाणे,अर्धी जुडी चिरलेला पालक, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, एक चमचा मैदा,तीन चमचे दूध ,२५ ग्रम चीझ,
एक चमचा हर्ब्स,तिखट , मीठ चवीनुसार,एक चमचा लिंबाचा रस.
कृती-
एक चमचा पनीर कढईत टाकून गरम झाल्यावर बारीक लसूण फोडणीला दिला.कांदा परतून घेतला.मक्याचे दाणे परतले.हर्ब्स,तिखट मीठ टाकले.चिरलेला पालक फोडणीत टाकला.मक्याचा पिवळसर रंग आणि पालकाचा हिरवा रंग सुंदर दिसू लागला.यत एक चमचा मैदा आणि नंतर दूध घातले.एका वाफेनंतर किसलेले चीझ टाकले.हळूहळू चीझी स्टेक्चर आले.किंचित लिंबू पिळले.
याच पुढे ब्रेड टोस्ट करायचे होते पण ब्रेड विसरले.मग पोळीच तुपात गरम कळून हे चीझी मिश्रण त्यावर पसरून पोळीची घडी घालून कडक खरपूस भाजली.
लेकीला याचा मक्याचा गोड आणि मेल्टेड चीझचा यम्मी स्वाद आवडला.आणि तिच्या पोटात पालक गेला याच आई म्हणून समाधान मिळालं.
या मका पालक चीझी मिश्रणाचे स्प्रिंग रोलही बनवता येतात.झटपट भरपेट पदार्थ आहे.
-भक्ती
प्रतिक्रिया
19 Jul 2023 - 12:03 pm | टर्मीनेटर
वाह! मस्त 👍
![Paratha](https://lh3.googleusercontent.com/pw/AIL4fc8wx0zbwtKsgh8-1jArg41gTHh3Tt6zE_5EUGCKFLU2-avzJqkjLE97MwYUqAjC_lbebRnLV3oCZsbWBYcLCHoS3aKbaD_zXnHpr_3YW_htICFUHRmDF83g-GYzX5jfJP6zc7qgB5YDuumknPa2JBM2IpbYsjIvk1DhYywsDGb7p3TLYjth1TcB7_31djxqV-owYGMQScAi1GNSYwrk7hRvGj-YnOLiDwX893WLBMRy6cueIzEC4uHaMVXMX-iUE3toPe0AqlD_2Nf8KHKPzMwNlJ7NhD8cE8iD0qYRr6ITqFHduzwM790lfxph-GQCSeZsXXePmdy45zvpljdGaA7vvG5pZZYjxrOeGP7Pqsp1VDEjM0iGsk0gX_IaXt5rO6qeurzpyrcGhQ0AdWrXDmNlbZ0nw9cI8qvE1vQ7eRCOnDJgeORb4vps6OG3iYv-_PoAoORJlxp6pSPTQn3Ec2-Au3VRYnM2SHsgmjpKY7ZKR_JqVbLsCqfOrhzOOO6JEQEmNVSci0_G5rqAzO6UKRPevWalPVKtx58r-cDCjbBirww6YJHNpU1j1am0D8HfkLAOfa4C0jJDjfEdpO-UsfbEz9Qw-FJ6iYW6NKlIQ7LZf8PNUeOLY9tcVEWsuwPMGeClbY8M20uUJ3WqRY9PqO0-tLETPgWRqWL-Ch5-GDnQlW7dxi2_Ox4DB1eQGSNqGIP3b1NNgPzy_qRuiUF0E3KVVP1wKQCPp4tXBWC_x7VaUsJYpoif3BEbdZ5TVGWPeGRNWrp2nMKM176EJh5jAHXt3tTxQlzopZ3J-tIUCkaKBP3lbnwvwu5UzCDWdeQEC5vhOXvuWWGv0rxdnLYH6-eBub7H-ljMDb1TqHvhI5SyjQCEYCq7GJfww_B4qlHp94wuTJN-JeW1Jm4uwQIF004=w820-h615-s-no?authuser=0)
ब्रेड किंवा पोळी ऐवजी बाजारात तयार मिळणाऱ्या पराठ्यांचा वापर करुन हा पदार्थ नक्कीच करुन बघणार!
पोळ्या करता येत नसल्याने एकटा असलो कि हे पराठे खुपच उपयोगी पडतात, फक्त भाजले कि काम झाले!
मला त्यांच्यापासुन आलु पराठे, गोबी पराठे, चिज पराठे वगैरे बनवणे खुपच सोयीस्कर पडते, आता भरपुर चिज घालुन हे 'चीझी पालक मका' पराठेही बनवुन बघतो लवकरच 😀
(हे तयार पराठे गव्हाच्या पिठाचे आणि मैद्याचे अशा दोन प्रकारात मिळत असले तरी चवीच्या बाबतीत मला मैद्याचेच जास्ती आवडतात)
19 Jul 2023 - 12:21 pm | Bhakti
प्रोडक्ट छान आहे,मैदा वर्ज्य करा :)
आणखिन एक वेगवेगळ्या मिलेटचा मिक्स पराठाही वापरता येईल.सध्या मिलेट ट्रेडिंग आहेत.
19 Jul 2023 - 12:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
करुन बघणार!!
पराठे करायची माझी सोपी पद्धत--पालक उकडुन घेऊन मग मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करणे. चवीपुरते मीठ मिरची घालुन त्यात कणीक मळणे आणि पराठे लाटणे. सॉस किवा खोबर्याच्या चटणीबरोबर मटकावणे.
19 Jul 2023 - 1:41 pm | कंजूस
मजा आहे लेकीची.
----------
वेज कटलेट,स्टफ्ट मिरची,फ्रांकी हेसुद्धा बाळकोमाटे सारू छे।(मुलांसाठी चांगले).
दाण्याचे कूट,लिंबू पिळून पालक/चवळी ची कच्ची कोशिंबीर चविष्ट लागते.
शिवाय पालक/मेथीना गोटा कढीमां.
19 Jul 2023 - 3:57 pm | Bhakti
कढी आवडते तर पालक गोटा कढीमां नक्की करेन.
19 Jul 2023 - 5:40 pm | चौकस२१२
एक चमचा हर्ब्स
म्हणजे कोणते? कोरडे वाळलेले कि ताजे ? ऑरगॅनो पार्सली इत्यादी?
विचारायच कारण असे कि जर भारतीय मसाले जास्त घातले तर या हर्ब्स ची चव मारली जाईल
परवा एका ओळखीच्याने "कॉन्टिनेन्टल मीट लोफ " खायला घालतो म्हणले... म्हणून उत्सहाने वाट बघितली तर भरपूर आले लसूण घालून त्याचा "खिमा लोफ" झाला होता कॉन्टिनेन्टल काहीच नवहते ! काली मिरी आणि जायफळ पण होते ( हे दोन्ही मसाले आशियायी असले तरी त्याचा वापर इटालीय पदार्थात होते हे खरे आहे पण त्याचे लग्न भरपूर आले लसूण घालून झाला तो मस्त खिमा ...
तिखटा ऐवजी जर स्मोकड पाप्रिका मिळाली तर बघा एक वेगळी चव येते , शिवाय तुपाऐवजी ऑलिव्ह तेल किंवा लोणी
19 Jul 2023 - 6:44 pm | Bhakti
छान सूचना आहेत.
SNAP!N pizza mix hebs
नक्कीच मस्तच पर्याय आहे.
20 Jul 2023 - 5:23 am | चौकस२१२
काहीसे या सारखेच तुर्की पद्धतीचे गोझलेम नावाचे परोठे असे करतात
आवरण: मैद्या आणि कणिक याचे मिश्रण पाणी आणि दुधात भिजवून झाकून ठेवावे चिंमूट भर मीठ ( जणू पिझ्झा बेस )
सारण : मोठ्या पातेल्यात चिरलेला बारीक कांदा परतवून घेणे त्यावर पालक टाकणे आणि तो गळेपर्यंत ( विल्ट ) परतणे ((पालक जर बेबी स्पिनॅच जातीचा मिळाला तर उत्तम )
हे मिश्रण काढून थंड झाल्यावर त्यातील पाणी चाळणी वापरून कमी करणे
वरील सारणात फेटा चीज ( हे जरा खारट आणि आंबट दोन्ही असते ) कुस्करून घालणे + काली मिरी आणि मीठ
(फेटा नाही मिळाले तर दुसरे कोणते जास्त आंबट चीज चालेल पण शक्यतो ताजे असावे प्रोसेज्ड चीज नको )
( तिखट नाही किंवा इतर काही नाहीत )
मैदा गोळी जाडसर लाटून त्यात हे सारण भरणे, मोठी कारंजी किंवा लांबट पण पसरट जाडसर पराठा करणे आणि तो दोन्ही बाजूने तव्ययावर खरपूस होई पर्यंत भाजणे ,
यावर लिंबू / आणि लागल्यास काली मिरी आणि मीठ वरून शिंपडून घेता येते
20 Jul 2023 - 7:35 pm | कर्नलतपस्वी
काॅर्न सुप काही आवडणारे पदार्थ पावसाळ्यात व हिवाळ्यात जरुर बनतात.
पौष्टिक पदार्थ करुन बघेन.
21 Jul 2023 - 5:58 am | प्रचेतस
ही रेसिपी नक्की करून बघेन.
21 Jul 2023 - 10:22 am | सौंदाळा
रेसीपी आवडली.
फक्त एक वाक्य थोडे खटकले.
हल्ली बरीच मुले भाज्या अजिबात खात नाहीत म्हणून त्याला चीझ, डीप फ्राय, रोल, वगैरे प्रकारात दडवून दिल्या जातात. यातून भाजी कमी आणि बाकी हानिकरक घटक ( उदा. साखर, मैदा, तेल, चीझ वगैरे) जास्त प्रमाणात जातात. हल्ली लठ्ठ, इनअॅक्टिव मुले जास्त दिसण्याचे हे पण एक कारण असावे (मोबाईल तर आहेच) माझ्या बघण्यात अशी कित्येक मुले आहेत. जी एक वेळ तूप साखर, न्युटेला पोळी, पराठे वगैरे खातात पण घरी केलेल्या भाज्या अजिबात खात नाहीत.
हा प्रतिसाद वैयक्तिक नसून हल्ली आजूबाजूला दिसणार्या मुलांवरुन लिहिलेला आहे.
अर्थात असे पदार्थ अधून मधून करणे हे रुचीपालटासाठी चांगलेच पण हे 'अधूनमधून' म्हणजे नक्की कधी हे मात्र ज्याचे त्यानेच तारतम्याने ठरवावे.
21 Jul 2023 - 10:50 am | Bhakti
भावना समजल्या :)
कधीतरी हो चीझ नाहीतर पनीरच वापरते.
वरती एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे शक्यतो मैदा नाहीच.
21 Jul 2023 - 4:46 pm | कंजूस
करा हो.
नैतर लेकीला वाटेल माझ्या आईला चांगले चटकमटक पदार्थ करताच येत नाहीत.