ताज्या घडामोडी - मे-जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
28 May 2023 - 1:47 pm

नमस्कार मंडळी,

खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good-...

नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:

sengol

म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.

राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-try... हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.

sengol

त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.

sengol
sengol

हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?

दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

प्रतिक्रिया

बावडी बिल्डर's picture

10 Jun 2023 - 3:23 am | बावडी बिल्डर

चंपाला स्वतचा मतदारसंघही नाही.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 9:06 pm | बावडी बिल्डर

महाराष्ट्र भाजपचे पूर्ण वाटोळं करण्याची भीष्मप्रतिज्ञा फडणवीसांनी केली आहे.

खरंतर अति कमी वयात नी नागपूरचं महापौरपद सोडलं तर साधा विरोधी पक्षनेतेपदाचाही अनूभव नसलेल्या व्यक्तिस डायरेक्ट मामूपद कोणत्या आधारावर मोशांनी दिलं हे देव जाणे. बहूतेक आपलं एकनारा नी आपल्याला भविष्यात न नडनारा व्यक्ति त्यांना हवा असेल म्हणून सरळ खूली सूट मोशांनी द्यायला नको होती. ह्यामुळे महाराष्ट्र भाजपचं वाट्टोळं झालंय. मूंडे, गडकरी, तावडे, खडसे असे मोठे भाजप नेते संपल्यात जमा आहेत ज्यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला.

आग्या१९९०'s picture

9 Jun 2023 - 9:00 pm | आग्या१९९०

सुब्रमण्यम स्वामी आसारामला वाचवायला निघाला होता.

बावडी बिल्डर's picture

9 Jun 2023 - 8:56 pm | बावडी बिल्डर

राज्यात परीस्थीती फारच बिघडलीय.
औरंगजेबावरून जिथे तीथे हिंदू मूस्लिम पेटत चाललंय. राज्य सरकार काहीही करत नाहीये. कोल्हापूरात बंदचं आवाहन करनार्यांवर कोणताही गून्हा दाखल झालेला नाही. पवार, राऊतांना खूलेआम धमक्या दिल्या जाताहेत. पींपळकर हा धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता आहे असं त्याच्या ट्वीटर प्रोफाईल वरून दिसतंय. बहुतेक राज्यात पून्हा सत्ता येनार नाहीये असं दिसत असल्याने काही भाजप कार्यकर्ते पीसाळल्या सारखे करताहेत. पींपळकर त्यातलाच एक. राऊतांना ह्या आधी धमक्या देनार्यांवर काहीही कारवाई झाली नाही. महीलांवरील अत्याचारात वाढ झालीय.
ठाण्यात भाजप पदाधीकार्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल झाल्या मूळे शिंदे गट नी भाजपात वादाची ठिणगी पडलीय. एकंदरीत राज्यात कायदा सूव्यवस्थेचा बोजवारा ऊडालाय. युपी बिहार कडे वाटचाल सुरूय. गुन्हेगार आजिबात घाबरत नाहीयेत. महीला मूलींनी सांभाळून रहावे. एका विशीष्ठ पक्षाच्या गूंडाकडून तर नक्कीच.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2023 - 3:17 am | श्रीगुरुजी

या धमक्या म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी केलेली थापेबाजी आहे.

बावडी बिल्डर's picture

10 Jun 2023 - 3:23 am | बावडी बिल्डर

राऊतांच्या भावाला फोन आला होता. रेकोर्डींग ऊपलब्ध आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2023 - 3:58 am | श्रीगुरुजी

हे managed call असतात.

बावडी बिल्डर's picture

10 Jun 2023 - 10:31 am | बावडी बिल्डर

कैच्याकै

बावडी बिल्डर's picture

12 Jun 2023 - 11:29 pm | बावडी बिल्डर

पवारांना धमकी देनारा बर्वे अटकेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2023 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरोगामी महाराष्ट्राची वाताहात बघतांना वाईट वाटंतय. समतेचा, आधुनिकतेचा विचार जिथे मांडला गेला तिथे छत्रपती शाहु महाराजांच्या कोल्हापूरात हे घडतंय हे सगळं दु:खदायक आहे. लोकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष अन्य विषयावर कसे राहील हा प्रयत्न होतांना दिसतो. धर्माधर्मात तेढ कशी राहील असा प्रयत्न काही अराजक शक्ती करतात. वातावरण धुसमुसत ठेवणे, निवडणूकीत फ़ायदा मिळावा इतकाच हेतू त्यांचा असतो. सध्याची परिस्थिती आणि येत्या निवडणूकीच्या काळात हे अजून वाढत जाईल पण त्यामुळे देशाच्या एकते-अखंड्तेवर त्याचा परिणाम होतो असतो. आपण विवेववादी लोकांनी हे सगळं भान समाजमनाला देणे इतकंच सध्या आपल्या हातात आहे.

-दिलीप बिरुटे

बावडी बिल्डर's picture

10 Jun 2023 - 11:22 am | बावडी बिल्डर

कोल्हापूरात ३५० हिंदू तरूणांवर गुन्हे दाखल झालेत. एकही हिंदूत्ववादी नेता त्यांच्या जामीनासाठी फिरताना दिसत नाहीये. ह्या मुर्ख तरूणांना अक्कल हवी होती.

रात्रीचे चांदणे's picture

10 Jun 2023 - 12:42 pm | रात्रीचे चांदणे

जातीय तणावाच्या घटनांमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे. अंमळनेर मध्येही दगडफेक झाली. दांगेखोरांना धर्म असतो हे मान्य आहे तर.

कॉमी's picture

10 Jun 2023 - 11:51 am | कॉमी

सहमत

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2023 - 12:52 pm | श्रीगुरुजी

औरंगजेबाने महाराष्ट्रात पुनर्जन्म घेतल्यानै व औरंगाजेब सत्तेबाहेर फेकला गेल्याने औरंगजेबाचे भक्त असे राडे करतच राहणार.

बावडी बिल्डर's picture

10 Jun 2023 - 1:54 pm | बावडी बिल्डर

औरंगजेब सत्तेतच आहे.

बावडी बिल्डर's picture

11 Jun 2023 - 4:41 pm | बावडी बिल्डर

भाजपची सत्ता गेल्यानंतर कर्नाटक शांत झालंय असं संजय राऊत बोलले. काही प्रमाणात हे खरं आहे. मागच्या वर्षी हिजाब नी काहीबीही मूद्दे काढून कर्नाटक पेटलेले होते. आज अशीच परिस्थीती महाराष्ट्रात आहे. औरंगजेबावरून महाराष्ट्र पेटलाय की पेटवला गेलाय देव जाणे. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे ती राज्ये अशांत आहेत. तीकडे मनीपूर जळतंय पण कोनालाही सोयरसूतक नाही. महाराष्ट्रातूनही भाजपची सत्ता गेल्यास महाराष्ट्रही शांत होईल असं वाटतंय.

आनन्दा's picture

11 Jun 2023 - 8:01 pm | आनन्दा

उत्तरप्रदेश पण पेटवायचा प्रयत्न झाला बऱ्याच वेळेस.
का बरे अपेक्षित परिणाम मिळाला नसेल?

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2023 - 8:07 pm | श्रीगुरुजी

औरंगजेबाने महाराष्ट्रात पुनर्जन्म घेतलाय, उत्तर प्रदेशात नाही.

बावडी बिल्डर's picture

11 Jun 2023 - 9:24 pm | बावडी बिल्डर

औरंगजेबाचा जन्म गूजरात मध्ये झाला होता. :)

बावडी बिल्डर's picture

11 Jun 2023 - 9:25 pm | बावडी बिल्डर

ऊत्तर प्रदेशही धूमसतंय. मागेच बलात्कार पीडीत दलीत मूलीला रात्री जाळून टाकले गेले होते विसरलात का?

बावडी बिल्डर's picture

11 Jun 2023 - 10:52 pm | बावडी बिल्डर

आज वारकरियांवर लाठीहल्ला केल्यागेल्याच्या बातम्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2023 - 10:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वारक-यांच्या फडातील काहीच लोकांना सोडायच्या नियमामुळे गर्दी झाली. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारक-यांपेक्षा अधिक कोणाला असू शकते ? पुंडलिकाने २८ युगे विटेवर उभं केलेलं, हे सावळे सुंदर ध्यान आपल्या भक्तांसाठीच उभं आहे, ...कालच्या वारक-यांना झालेल्या लाठीमाराने पांडुरंगही कळवळला असेल. पांडुरंगा यांना सुबुद्धी दे रे बाबा...आणि महाराष्ट्रात देशात सुख नांदु दे, दुसरं काही मागणं नाही. जय हरी..!

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 11:02 am | श्रीगुरुजी

लाठीमार वगैरे झाला या लोणकढी थापा आहेत. असे काहीही झालेले नाही. दरवर्षी प्रत्येक ४७ दिंडीतील प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देतात. इतरांना प्रवेश नसतो. काल इतर अनेक वारकऱ्यांनी सर्व अडथळे ढकलून, पोलिसांना ढकलून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून जाऊध दिले नाही. यापलिकडे काहीही झालेले नाही. लोकमतने टाकलेली स्वत:ची चित्रफीत काढून टाकली आहे. जमलेल्या सर्व लाखो वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला असता तर तेथे चेंगराचेंगरी होऊन मागील महिन्यात जे झाले त्याची पुनरावृत्ती झाली असती.

इपित्तर इतिहासकार's picture

12 Jun 2023 - 11:24 am | इपित्तर इतिहासकार

इथे काहीतरी वेगळेच ऐकायला मिळाले

(एकट्या) लोकमतने व्हिडिओ काढला ही सबब थोतांड म्हणायला पुरेशी नाही. एबीपी सहित इतर बऱ्याच ठिकाणी ती अजूनही सुरू आहे.

दुसरे म्हणजे, लाठीचार्ज झालाच आहे असे काही माझे म्हणणे नाही, पण पूर्ण शहनिशा सुद्धा झालेली नाही, ती होऊन मग थोतांड आहे का सत्यता हे जाहीर झाले तर उत्तम.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 11:31 am | श्रीगुरुजी

थोतांडच आहे. जे घडलेच नाही त्याची काय डोंबल शहानिशा करणार.

इपित्तर इतिहासकार's picture

12 Jun 2023 - 11:37 am | इपित्तर इतिहासकार

पण तो वारकरी सांगतोय की मारहाण झाली म्हणुन.

इपित्तर इतिहासकार's picture

12 Jun 2023 - 11:37 am | इपित्तर इतिहासकार

पण तो वारकरी सांगतोय की मारहाण झाली म्हणुन.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 12:00 pm | श्रीगुरुजी

या वारकऱ्याच्या दोन समान चित्रफिती आहेत. एकात दंडावरचा सदरा फाटलेला दाखवतोय, दुसऱ्यात सदरा धड आहे. जखम झाली म्हणून सांगतोय, पण सदरा वर करून जखम दाखवित नाही. कोपऱ्यापाशी एक रूपयाच्या नाण्याच्या आकाराचा फिकट गुलाबी (गुलालाचा असावा) डाग दाखवतोय, पण सदरा वर करून जखम दाखवायला तयार नाही. एकदा सांगतो लोकांनी मारले, एकदा सांगतो २० पोलिसांनी ४ जणांना मारले. बाकीचे तिघे कोठेच नाहीत. एका दिंडीचे महंत चित्रफितीत सांगतात लाठीमार वगैरे काही झाले नाही.

हा तथाकथित वारकरी बहुतेक सिल्व्हर ओक दिंडीचा वारकरी असावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2023 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं म्हणजे, हे सगळे वारकरी नसून, ते सगळे पाकिस्तान पुरस्कृत देशद्रोही टोप्या धोतर घालून आलेले डुप्लीकेट वारकरी असून शिंदेणवीस सरकारला बदनाम करायला आलेत आहेत, अशी मांडणी करायला पाहिजे होती. =))

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 12:51 pm | श्रीगुरुजी

वा! दुष्प्रचार फसल्याने छान मेलोड्रामा आणि त्रागा चाललाय! चालू द्या.

पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारक-यांपेक्षा अधिक कोणाला असू शकते ?

सर, तुमच्या राजकीय धुळवडीत मला रस नाही. गर्दीमुळे काही चेंगराचेंगरी होऊन पुर्ण वारीला गालबोट लागले असते. त्यापेक्षा सौम्य लाठीमार परवडला.
तुमच्या कडुन जास्त समंजस भुमिकेची अपेक्षा आहे.

कॉमी's picture

12 Jun 2023 - 10:50 am | कॉमी

डोनाल्ड ट्रम्पवर दुसरे आरोपपत्र दाखल. आधीचे जे होते, पॉर्न स्टारला गप्प करण्यासाठी पैसे दिले ते फारसे दणकट नव्हते आणि तात्यांचा वकील त्या गुन्ह्यासाठी आधीच आत गेला असला तरी थेट तात्याला हात लावत येत नव्हता.

हे आरोपपत्र मात्र बऱ्यापैकी गंभीर आहे. वरकरणी तरी पुरावे दणकट वाटतात. हे त्याने सरकारी गुप्त माहिती स्वतच्या घरी विनासुरक्षा ठेवली, त्याबद्दल वारंवार खोटे बोलला, ती कागदपत्रे लपविण्याचा प्रयत्न केला, तिरहाईत लोकांना त्यातली काही माहिती दिली असे आरोप आहेत. पुरावे म्हणून त्याच्या हॉटेल / क्लब / घरातले अनेक फोटो, तसेच काही ध्वनिमुद्रित संभाषणे आहेत. वर म्हणल्याप्रमाणे, प्रकरण गंभीर आहे.

आरोपपत्रात एक गंमत आहे. त्यात तात्या निवडणुकीआधी हिलरी ला सरकारी गुप्त माहिती एका अनाधिकृत ईमेल सर्व्हर वर ठेवली म्हणून आत घालणार असे ओरडून ओरडून सांगत होता. मी अध्यक्ष झाल्यावर गुप्ततेचे कायदे आणखी कडक करणार असे म्हणत होता. ह्या गोष्टींचा आणि वक्तव्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे.

https://www.politico.com/news/2023/06/09/trump-indictment-takeaways-0010...

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 12:08 pm | श्रीगुरुजी

पालखी प्रस्थानावेळी प्रत्येक दिंडीच्या प्रत्येकी ७५ वारकऱ्यांनाच प्रवेश देणार हे ८ जूनलाच सर्व दिंडीप्रमुखांना कळविले होते. असे असतानाही इतरांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. नशीब पोलिसांनी त्यांना अडविले. अन्यथा प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2023 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> नशीब पोलिसांनी त्यांना अडविले.
नाही, नाही,नाही. प्रत्येक वारक-याला गुलाब पुष्प देऊन.

''हे चिमण्यांनो परत फिरा रे
घराकडे अपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या''

असा स्पष्ट आवाज स्पीकर मधून येत आहे. =))

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 2:09 pm | श्रीगुरुजी

काय गंमत आहे. शिस्त लावायचा प्रयत्न केला तर हुकुमशाही, दडपशाही म्हणून दोन्ही हाताच्या तळव्यांना चुना लावून बोंब ठोकायची. शिस्त नाही लावली तर ढिसाळ कारभार, जनतेची पर्वा नाही, शून्य व्यवस्थापन असा कांगावा करायचा.

दोन्ही नाही जमलं तर बनावट चित्रफिती तयार करून प्रसिद्ध करून वाटेल ते आरोप करायचे, माध्यमांना हाताशी धरून समाजात आग लावून आपल्या पोळ्या भाजायच्या.

सगळंच फसलं की मेलोड्रामा आणि त्रागा करायचा.

या प्रकाराला डबल ढोलकी ही संज्ञा सुद्धा सौम्य ठरेल.

काल वारकऱ्याना अडविले नसते तर आत प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असती. पोलिसांना याची कल्पना असल्याने त्यांनी दुर्घटना घडू दिली नाही. मग कोणाला तरी वारकऱ्याच्या पोषाखात उभे करून काहीतरी बनावट कथा रंगवून गोंगाट करून सरकारला झोडपत बसायचं. Pathetic.

प्रचेतस's picture

12 Jun 2023 - 2:23 pm | प्रचेतस

खरे तर दंडुकेच द्यायला पाहिजेत नियम मोडून आत घुसत आलेल्यांना, तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे "नाठाळाचे माथी हाणू काठी", केवळ वारकरी आहेत म्हणून नियम मोडून आत घुसू द्यायला हवे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2023 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वारकरी आहेत म्हणून घुसू द्यायला हवे का ? याचं उत्तर नाही असं आहे. पण... एकूण येणा-या दींड्या किंवा महत्वाच्या ज्या पालख्या, किंवा त्या फडातील एकूण केवळ पंच्याहत्तर वारक-यांना सोडणार होते. कोण सोडायचे याचे काही नियोजन नव्हते म्हणून सर्वच वारक-यांनी तिथे गर्दी केली. मुख्य दारावर इतक्या मोठ्या संखेने वारकरी आल्यावर पहिल्या पंच्याहत्तर मधे आपण असावे असे वाटल्यामुळे सर्वच वारक-यांनी मुख्य प्रवेशाच्या ठीकाणी गर्दी केली. प्रवेश तोंडावर असलेल्या पोलिसांना इतकी गर्दी आवरणे शक्य नव्हते. खाली आपण एका प्रतिसादात तुडवणे असा उल्लेख केला ते योग्य नाही. गर्दीने पोलिसांचे कडे तोडले म्हणून पोलीस पडलेला दिसतो, ते काही जाणीव पूर्वक केलेले नाही. ”हसत खेळत बोबडे बोलत ।तुडविले बाळ त्याशी शुद्धी नाही” असे काही झाले नाही. वारक-यांची गर्दी झाली, त्यांचं नियोजन करता आले नाही. आणि म्हणून दर्शनाच्या ओढीने धावणा-या वारक-यांना आवरायला पोलिस बळाचा वापर करावा लागला. काही वारक-यांना त्याची निब्बर झळ बसली.

इतर वेळी ’वारक-यांबद्दल” खट जरी वाजलं तरी ’वारकरी संप्रदाय धोक्यात ’ ’अस्मितेवर हल्ला’ वगैरे किती तो गदारोळ करणारे आता वारक-यांनी शिस्त पाळायला पाहिजे होती वगैरे बोलतात तेव्हा गम्मत वाटते. इतकाच मतितार्थ.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2023 - 9:13 pm | श्रीगुरुजी

कोणत्या ७५ जणांना सोडायचे याचै नियोजन दिंडीप्रमुखाने करायचे की ते सुद्धा मंदिर व्यवस्थापधाने करायचे? म्हणजे ४७ दिंडीतील एकूण कोणत्या ३५२५ वारकऱ्याना आत सोडायचे ही यादी मंदिर व्यवस्थापनाने करायची.

प्रचेतस's picture

13 Jun 2023 - 10:12 am | प्रचेतस

खाली आपण एका प्रतिसादात तुडवणे असा उल्लेख केला ते योग्य नाही.

आणि आपण मात्र लाठीमार झालाय असे विधान करता ते कशाच्या आधारावर? आपणास तुडवणे हा शब्दप्रयोग अयोग्य वाटला, मात्र प्रत्यक्षात पोलिस खाली पडलेला आणि वारकरी त्याला 'ओलांडून" जाताना स्पष्टपणे दिसत नाही, शिवाय दोन्ही व्हिडिओंमध्ये पोलिस लाठीमार करताना कुथेही दिसत नाहीयेत, फक्त थोपवून दिसत आहे. "तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा न्याय" असे म्हणावे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2023 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या व्हीडीयोमधे विशेषतः आळंदी नावाच्या व्हीडीयोवर त्यात बाराव्या चौदाव्या सेकंदाला एक राखीवदलातील पोलीस तेराव्या सेकंदाला लाठीमार करतोय तर अजून एक पोलीस गप्पकन एका वारक-याला श्रीमूखात प्रसाद देत आहे. आणि इतर व्हीडीयोत वारकरी मारहाण झाल्याचे सांगतो आहे, अजून एक वारकरी लाठीचार्ज झाल्याचे सांगत आहेत, अर्थात हे सगळंच खोटं आहे असे म्हणत असाल तर माझ्याकडून विषय संपला. आपलं जे असेल ते मत मान्य आहे.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2023 - 11:30 am | श्रीगुरुजी

अजूनही थापेबाजी सुरूच आहे. त्या चित्रफितीत कोणत्याही वारकऱ्याला लाठी मारलेली दिसत नाही. जमाव पांगविण्यासाठी हवेत फिरविलेली दिसते, पण कोणालाही लाठी मारलेली नाही.

मारहाण झाल्याचे सांगणारा एक लबाड असून तो वारकरी नसून एक मार्क्सवादी आहे. फेबु पानावर टिपू सुलतानचे गुणवर्णन करणारी पोस्ट आहे. फेबुवर ब्राह्मण, पेशवाई, मोदी, फडणवीस यांना भरपूर शिव्या आहेत. कोणत्या दिंडीत होता त्याचे नाव सांगत नाही. कधी म्हणतो जमावाने मारहाण केली, कधी म्हणतो २० पोलिसांनी एकांतात नेऊन मारले, कधी म्हणतो आम्हा चौघांना मारले पण इतर तिघांचा पत्ता नाही. गुलालाचा सदऱ्यावरचा डाग जखम म्हणून दाखवतोय, पण सदरा वर करून डाग दाखवित नाही.

जे संपूर्ण खोटे आहे ते १००% सत्य आहे हे ठासून सांगण्याचा आपला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 11:39 am | बावडी बिल्डर

फडणवीसांवर टिका केली म्हणून वारकर्याला झालेली मारहाण योग्य ठरते का?

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 11:49 am | बावडी बिल्डर

मग ह्या न्यायाने आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन करमूसेला चोपला ते ही बरोबरच की. करमूसेने एका नागड्या माणसाच्या चेहर्यावर आव्हाडांचा चेहरा मोर्फ केलेला वीडीओ सोमी वर टाकला होता. चोपला गेल्या नंतर इतर कूठल्याही धारकर्याची असं करण्याची हिंमत झाला नाही.

बावडी बिल्डर's picture

13 Jun 2023 - 11:49 am | बावडी बिल्डर

मग ह्या न्यायाने आव्हाडांनी बंगल्यावर नेऊन करमूसेला चोपला ते ही बरोबरच की. करमूसेने एका नागड्या माणसाच्या चेहर्यावर आव्हाडांचा चेहरा मोर्फ केलेला वीडीओ सोमी वर टाकला होता. चोपला गेल्या नंतर इतर कूठल्याही धारकर्याची असं करण्याची हिंमत झाली नाही.

सुबोध खरे's picture

13 Jun 2023 - 8:07 pm | सुबोध खरे

हायला

भुजबळ परत आले वाटतं.

तरीच धुळवड चालू झाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2023 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मारहाण झाल्याचे सांगणारा एक लबाड असून तो वारकरी नसून एक मार्क्सवादी आहे.

=)) भारी होता बघा. आवडला. चालू ठेवा.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2023 - 1:45 pm | श्रीगुरुजी

तुम्ही सत्य नाकारणार हे सर्वांनाच माहिती आहे.

हे वाचा.

यावरही विश्वास न ठेवता वारंवार तुम्ही वारंवार खोटे बोलत राहणार आणि थापा पुराव्यासहीत उघडकीस आणल्या की कांगावा, मेलोड्रामा आणि त्रागा करणार हे सुद्धा सर्वजण जाणतात. तेव्हा येऊ देत अजून नवीन थापा.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2023 - 1:48 pm | श्रीगुरुजी

सकाळी याचे प्रोफाइल दिसत होते. याची लबाडी समाजमाध्यमांमळे सार्वत्रिक झाल्यानंतर याने काही मिनिटांपूर्वीच खाते लॉक केले. सिल्व्हर ओक दिंडीचा भोंदू!

प्रचेतस's picture

13 Jun 2023 - 11:59 am | प्रचेतस

काय राव सर, एव्हढे वारकरी अंगावर धावून येत असताना काय गुलाबपुष्प द्यायला हवे होते का? लाठी फक्त उगारताना दिसत आहे, चोप देताना दिसत नाहीये, बाकी तुम्ही अजूनही वारकरी पोलिसांना तुडवून पुढे जात आहेत ह्याचा सुस्पष्ट व्हिडिओ असूनही ते मान्य करताना दिसत नाहीत. वारकरी जरी असले तरी झुंडीचे मानसशास्त्र वेगळेच असते हे काय मी तुम्हास सांगावयास हवे काय? उलट प्रत्यक्ष दंडुके दिले नसतानाही ते दिले असते तर मला ह्यात काहिही वावगं वाटलं नसतं. राम कृष्ण हरी.
बाकी हे खरे वारकरी नसून वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असून त्यांना दर गुरुवारी मंदिरात पालखी सोहळ्याचे दर्शनाचा हक्क असतो असे ऐकिवात आहे, म्हणून ते सर्व झुंडीने वारीच्या सोहळ्याला जायचेच असा हट्ट धरुन नियम मोडून घुसत होते असे कळते. खखो विठ्ठल जाणो.