ताज्या घडामोडी - मे-जून २०२३

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
28 May 2023 - 1:47 pm

नमस्कार मंडळी,

खरं तर महिन्याच्या २८ तारखेला ताज्या घडामोडींचा नवा धागा काढणे तितकेसे योग्य ठरणार नाही. तसेच आधीच्या धाग्यात आधीच १६०+ प्रतिसाद झाले आहेत तेव्हा त्या धाग्यात अजून प्रतिसाद आल्यास ते वाचणे यापुढे त्रासदायक होऊ शकेल म्हणून मे-जून २०२३ साठी नवा धागा काढत आहे. तसेच इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत त्या जुन्या धाग्यात प्रतिसाद म्हणून जाण्यापेक्षा नव्या धाग्याच्या सुरवातीला असल्या तर ते चांगले होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नव्या संसदभवनाचे उद्घाटन केले. आपल्याला नवे संसदभवन हवे यासाठी पूर्वीपासून विचार चालू होता. सगळ्यात सुरवातीला नरसिंहराव पंतप्रधान असतानाच हा विचार सुरू झाला होता. गुलाम नबी आझाद तेव्हा संसदीय कार्यमंत्री होते. त्यांच्याशी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी या विषयावर चर्चा केली होती असे स्वतः गुलाम नबी आझादांनी म्हटले आहे. https://www.ndtv.com/india-news/new-parliament-narasimha-raos-idea-good-...

नव्या संसदभवनात लोकसभेत अध्यक्षांच्या आसनाशेजारी सेंगोलची स्थापना केली गेली आहे. सेंगोल म्हणजे सोन्याचा राजदंड. तामिळ संस्कृतीत चोला राजघराण्यात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतिक म्हणून सेंगोल नव्या राज्यकर्त्याच्या (त्यावेळी राजा) हातात सुपूर्द केला जात असे. शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कोणत्या प्रतिकाच्या स्वरूपात दर्शवावे असे जवाहरलाल नेहरूंना विचारले. तेव्हा नेहरूंनी चक्रवर्ती राजगोपालाचारींना याविषयी विचारणा केली. तेव्हा राजाजींनी तामिळनाडूतील चोला राजघराण्यातील परंपरेप्रमाणे असा सेंगोल नेहरूंच्या हातात दिला जावा असे मत व्यक्त केले. ते पंडित नेहरूंनी मान्य केले. त्यानंतर राजाजींनी मद्रासमधील एका सोनाराकडून सोन्याचा सेंगोल (राजदंड) बनवून घेतला. तामिळनाडूतील थिरूवदुतुराई मठाचे प्रतिनिधी कुमारस्वामी थंबिरन आणि इतरांनी तो सेंगोल १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री पावणेबाराला पंडित नेहरूंच्या हातात सुपूर्त केला. याविषयी त्यावेळच्या इंडिअन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी देत आहे:

sengol

म्हणजे १४ ऑगस्टच्या मध्यरात्री नेहरूंनी सुप्रसिध्द Tryst with Destiny हे भाषण केले त्याच्या काही मिनिटे आधी त्यांनी या सेंगोलचा स्विकार केला होता असे दिसते.

राजदंड ही संकल्पना पूर्वीपासून माहित असली तरी त्याचे तामिळमधील सेंगोल हे नाव आणि त्याचा आपल्या स्वातंत्र्याच्या सोहळ्यात असलेले महत्व हे सगळे मला तरी गेल्या काही दिवसातच कळले. गुगलवर शोधाशोध करताना न्यू इंडिअन एक्सप्रेसमधील १५ ऑगस्ट २०२२ रोजी आलेला https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2022/aug/15/mutts-try... हा लेख सापडला. त्यात सेंगोलचा स्विकार केल्यानंतरचा पंडित नेहरूंचा मठाच्या प्रतिनिधींबरोबरचा पुढील फोटो दिला आहे. या फोटोत नेहरूंच्या हातात सेंगोल बघता येईल.

sengol

त्या सेंगोलचे पुढे काय झाले? तर तो प्रयागराजला नेहरूंच्या आनंदभवन या प्रासादतुल्य घरी बनलेल्या संग्रहालयात चक्क नेहरूंना भेट म्हणून मिळालेली सोन्याची काठी असे वर्णन करून ठेवण्यात आला.

sengol
sengol

हा प्रकार समजल्यावर अगदी संताप आला. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून जी गोष्ट स्वतः नेहरूंनी स्विकारली होती त्याला चालायची काठी बनवून टाकणे आणि स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी बनविणे कितपत समर्थनीय आहे?

दुसरे म्हणजे आता काँग्रेसवाले संसदभवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी न करता पंतप्रधानांनी केले म्हणून त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. म्हणजे राष्ट्रपती या पदाविषयी त्यांच्या मनात आदर असेल असे म्हणायला हवे. जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती निवडायची वेळ आली होती तेव्हा त्याच पंडित नेहरूंना चक्रवर्ती राजगोपालाचारी राष्ट्रपती व्हावेत असे वाटत होते. नेहरूंना राजेंद्रप्रसाद फारसे पसंत नव्हते. राजेंद्रप्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि ज्योतिष, शकुन वगैरे गोष्टी मानत होते हे त्यामागे असलेले एक कारण होते असे म्हणतात. पण सरदार पटेलांच्या आग्रहामुळे राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाले. काहीही असले तरी राजाजी हे नेहरूंच्या 'मनातील राष्ट्रपती' होतेच ना? त्याच राजाजींच्या सल्ल्याने बनवून घेतलेल्या आणि स्वतः स्विकारलेल्या सेंगोलला आपली भेट मिळालेली चालायची काठी करून टाकणे हा त्या मनातल्या राष्ट्रपतींचा अगदी मोठा सन्मानच होता की नाही?

प्रतिक्रिया

तिथे राष्ट्राचा लाक्षणिक प्रतिनिधी म्हणून विद्यमान राष्ट्रपती मा. मूरमू यांना बोलावले नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

28 May 2023 - 4:51 pm | चंद्रसूर्यकुमार

नव्या सण्सदभवनावर राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पुढील ट्विट करण्यात आले आहे

खरोखरच किती घाणेरडे लोक आहेत हे. आणि असले लोक फक्त मोदीविरोधी म्हणून त्यांना डोक्यावर चढवणारे लोक आहेत.

किळस आली हे बघून.

मुक्त विहारि's picture

28 May 2023 - 5:16 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

धन्यवाद श्री चंद्रसूर्यकुमार. आज संसदभवनात हिंदु संतांना बघुन आणि मंत्रघोषणा ऐकुन छान वाटले.
इतर पंथाचे (मुस्लीम, ईसाई, ज्यु, पारशी) आणि धर्माचे (शीख, बौध्द, जैन इ.) संत/पुजारी होते का?

मुस्लीम तरुणीबरोबर जेवायला गेलेल्या हिंदू तरुणाला जमावाची मारहाण; VIDEO व्हायरल

https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-boy-muslim-girt-out-for-dinne...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2023 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

29 May 2023 - 1:52 pm | श्रीगुरुजी

मोदीद्वेष्ट्यांच्या बुडाला किती जाळ लागलाय ते ट्विटर व अनेक समाज माध्यमातून लख्ख दिसतंय. पप्पू, पवार, सुळे, वागळे, राऊत, ठाकरे, काही मिपाकर अक्षरशः धुमसताहेत. मोदी बरेच दिवस गप्प राहतात आणि नंतर असे काही करतात की शेपटीला फटाक्यांचा सर लावून पेटविल्यावर रेकत, दुगाण्या झाडत, सैरावैरा धावणाऱ्या गाढवासारखे मोदीद्वेष्टे डोळ्यांसमोर येतात.

भारताच्या संसदेची इमारत येवढी पवित्र आहे की, वाईट शक्ती तिथे प्रवेश न करण्याची कारणे शोधीत आहेत.

कर्नलतपस्वी's picture

29 May 2023 - 2:54 pm | कर्नलतपस्वी

पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सरकारी आवास,कचेरी व तत्सम इमारतोंका निर्माण व रखरखाव करते. हा विभाग केन्द्र व केन्द्रीय मंत्रालयाच्या अधीन व पर्यायाने कॅबिनेटच्या अधीन येतो.

जुन्या सांसद भवनास बनवून बराच काळ लोटला व नवीन भवन अथवा प्रस्थापित भवनाची वृद्धी होणे ही काळाची गरज व सर्वानाच मान्य.

अवशक्यते नुसार सरकारी भवन बनवणे ही एक शासकीय प्रक्रिया आहे.

भवन बांधकाम पूर्ण झाले की कम्प्लीशन प्रमाणपत्र अनिवार्य व नंतर ती वास्तू पुर्वनिर्धारित कार्या साठी उपयोगात आणणे. त्यामुळे उदघाटन कुणाकडून करायचे ,किंवा नाही हा त्या मंत्रालयाचा अधिकारात येते.

इतके साधे सोपे गणीत आहे.

या इमारती मधे म. म. राष्ट्रपती यांचा आवास,कार्यालय अथवा कुठल्याच प्रकारचा समावेश नाही.

बात का बतंगड बनाना कोई हमसे सीखे असे गर्वाने आपण म्हणू शकतो.

यावर सरकारी प्रस्थापित प्रोटोकॉल असेल असे मला वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

29 May 2023 - 3:26 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजित केला असता तरीही प्रत्येक गोष्टीत स्वत:चे नाक कापून अपशकुन करणाऱ्यांनी काही तरी वेगळे कारण पुढे करून विघ्न आणलेच असते. हे अपशकुनीमामा आणि विघ्नकर्ते भारताला लागलेली कीड आहे.

शलभ's picture

29 May 2023 - 4:08 pm | शलभ

+११११

यश राज's picture

29 May 2023 - 4:52 pm | यश राज

हे अपशकुनीमामा आणि विघ्नकर्ते भारताला लागलेली कीड आहे.

अगदी खरंय.. कसेही ही केले आणि काहीही केले तरी हे लोकं विघ्न घालण्याचे सोडणार नाहीत.

डँबिस००७'s picture

29 May 2023 - 5:14 pm | डँबिस००७

१० डिसेंबर २०२० ला कोनशिला समांरंभ आणि २८ मे २०२३ ला म्हणजे अवघ्या तिन वर्षांत वास्तु तयार होऊन पं प्र मोदी त्या वास्तुचे उद्घाटन करतात हेच लोकांना पचत नाही.

त्यामुळे मा मोदी द्वेषाने लोक सैरभैर झालेले आहेत.

रात्रीचे चांदणे's picture

29 May 2023 - 7:00 pm | रात्रीचे चांदणे

विरोध कोनशिला समांरंभापासूनाच चालू होता. आत्ता हिथून पुढे संसदेची जुनी बिल्डिंगच कशी चांगली होती ह्याची वर्णने ऐकायला मिळतील.

श्रीगुरुजी's picture

29 May 2023 - 8:01 pm | श्रीगुरुजी

नवीन संसदभवन सुरू झाल्यावर बंद पडणाऱ्या जुन्या संसदेतल्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर मला ५ मिनिटे तरी बसू द्या.

- तहहयात भावी पंतप्रधानांची मागणी

काल दिल्लीत एक साहील नावाच्या इसमाने एका मुलीला २१ वेळा चाकुने भोकसून आणि नंतर दगडाने ठेचून ठार मारले. हा प्रकार भर रस्त्यात लोकांसमोर घडला.
कोणत्याच मिडीयाने त्या साहील आडनाव जाहीर केले नाही.
नंतर समजले की तो साहील सर्फराज खान आहे.
या लोकांत इतके क्रौर्य कोठून येते हेच समजत नाही.

या लोकांत इतके क्रौर्य कोठून येते हेच समजत नाही.

कारणे तशी बरीच आहेत. मला आठवतील तशी मी लिहितो.
१. संगतः बहुतेक गुन्हेगार हे त्याच जमातीतील असतात. मी किती शुर/निधडा/डॅशीग आहे ही तरुणामध्ये स्पर्धा लागते. आधी छोटे मोठे गुन्हे करुन निर्ढावल्यानंतर असे मोठे गुन्हे करायला काही वाटत नाही.
२. काफिरः त्यांच्या लेखी अब्राहमिक पंथाच्या (ईसाई आणि ज्युंचे) लोकांची काही टक्के किंमत असते. मुस्लीमांच्या पुस्तकानुसार इतर काफिरांच्या जीवाचे काहीच मुल्य नसते.
३. शिक्षणाचा अभावः बहुतेक मुस्लीम गुन्हेगारांमध्ये शिक्षणाचा अभाव असतो, त्यामुळे चांगले वाईट याची जाणीव, पुढील परिणामांची जाणीव कमी असते.
४. अल्पस्वय:मुल्यः कमी उत्पन्न व इतर गोष्टींमुळे त्यांना स्वताच्या जीवाचे मुल्य फारसे नसते, म्हणजे जाण्यासारखे / हरवण्यासारखे काहीच नसते.
५. कमी बुध्यांकः जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केल्याने मानसिक वाढ होत नाही. त्यामुळे त्यांचा बुध्यांक इतरांपेक्षा कमी असतो.
६. वस्ती: हे लोक बहुधा समुहाने राहतात, त्यामुळे त्यामुळे त्यांना अशा वेळी कोणी अडवणार नाही, अशी खात्री असते.
७. समाजः एकंदरीतच समाज मुस्लीमापासुन फटकुन/घाबरुन राहतो, दांभिक पुरोगामी त्यांना मुस्लीमांना साथ देण्यात पुढे असतात. पुढे पोलिसांचा किंवा दांभिक पुरोगामीचा ससेमारा मागे लागु नये म्हणुन समाज गप्प बसतो.
८. नैतिक मुल्यांचा अभावः जर कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलाच तर समाज, सरकार, पक्ष, सरकारी यंत्रणा त्या थांबवणार्‍याच्या पाठीमागे उभे राहील याची खात्री नसते. त्यामुळे नैतिक मुल्याचा विकास होत नाही, आणि एक स्वभावात मारखाऊपणा / बुळेपणा / लाचारपणा येतो. त्यामुळे मी आणि माझे काम भले अशा शहामृगी वृत्ती सगळीकडे दिसते.

चंद्रसूर्यकुमार's picture

30 May 2023 - 1:27 pm | चंद्रसूर्यकुमार

९. आपले नाव आणि अल्पसंख्यांक हा दर्जा ही अशी एक जादू आहे की त्यामुळे आपण काहीही केले, कितीही गंभीर गुन्हा केला तरी समाजातील विचारवंत, जे.एन.यु सारख्या ठिकाणचे प्रोफेसर, मोठे मोठे पत्रकार, वकील, मानवी हक्कवाले, तसेच समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष वगैरे पक्षांचे राजकारणी थयथयाट करत अल्पसंख्यांकांवर अन्याय म्हणून गळे काढायला पुढे येतील ही खात्री त्यांना असते.

मोदींना या घाणेरड्या इकोसिस्टिमची विषवल्ली मुळापासून उपटून टाकणे तर सोडाच थोडी विस्कळीत करणेही जमलेले नाही. बघू भविष्यात योगी पंतप्रधान झाले तर ते काही करू शकतात का.

लहानपणा पासुन कुरबानी करताना प्राण्यांची हलाल हत्या सर्वासमोर घरातच होत असते. रक्ताच्या थारोळ्यात तडफत पडलेल्या प्राण्यांना पाहुन त्यांचे मन निर्ढावलेले असते. त्यामुळे शांतीप्रिय समाजाच्या लोकांना मानवीय हत्या करणे, शीर धडापासुन वेगळे करणे, शरीराचे तुकडे करणे ह्या बद्दल काही वाटत नाही.
काफीरांची हत्या करण शास्र संमंत असल्याच लहान पणा पासुन मनावर बिंबवलेले असल्याने, उच्च शिक्षीत लोकही गुन्हा करायला तयार होतात.

उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांच, वेळेच काहीही वाटत नाही. मेल्या नंतर स्वर्गात ७२ हुर मिळतात ह्यावर उच्च शिक्षीतांचा अंध विश्वास असतो.

संपुर्ण जगात ५७ देश आधिकारीक ईस्लामी देश आहेत. ह्या ५७ देशातही औषधाला सुद्धा शांतता नाही.

५७ देशातल्या ऐका ही देशाने रोहिंग्या मुस्लिम किंवा सिरीयातल्या निर्वासीतांसाठी आपले दरवाजे उघडले नाहीत. जरी कोण्या ऐका देशाने आपले दरवाजे उघडले असते तरीही ह्या सिरीयातल्या निर्वासीतांना युरोप मध्ये शरणागती घेण्यातच विषेश स्वारस्य होते.

ईस्लामीक जगताचा सर्वात श्रिमंत असलेला प्रमूख देश हज उमरा यात्रेकरु कडुंन प्रवेश फी घेतो. साउदी अरेबीयाने कधी ही निर्वासीतांना स्विकारलेले नाही.

ह्या बँकग्राउंड वर रोहिंग्या मुस्लिम लोकांना भारत सरकारने भारतात आश्रय द्यायलाच पाहीजे असे भारतातले व भारताबाहेरचे
पुरोगामी म्हणत असतात.

अश्या होपलेस केस मध्ये मोदी कडुन काही अपेक्षा ठेवणे चुकीच आहे. त्या पेक्षा देशा साठी महत्वाच्या योजना राबवणे हा मोदींसाठी प्राथमिकता होती व आहे. त्याचा परीणाम म्हणुनच देश आज जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हिंदु समाजाने एकत्रीत राहुन निवडणुकीला सामोर जाणे अति महत्वाचे आहे हे कर्नाटकातील निवडणुकीने दाखवलेले आहे.

सतत भाजपाला आर एस एस ला मोदींना मुस्लिम विरुद्ध दाखल्याने त्या समाजाची एक गठ्ठा मते भाजपा विरुद्धच जाणार आहेत. कॉंग्रेसने आता उघड पणे प्रो मुस्लिम व हिंदु विरुद्ध भुमिका घेण सुरु केलेल आहे तरीही काही हिंदु पुरोगामी कॉंग्रेसलाच मत देणार.

हिंदु समाजाने स्वःता मंथन करण गरजेच आहे.

दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल (२९ मे) उजेडात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून याप्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, पोलीस आरोपी साहिल खान आणि अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

साहिल आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंधात होते. परंतु, मुलीला हे नातं संपवायचं होतं. त्यामुळे साहिल नाराज झाला होता. मुलगी साहिलचे फोन उचलत नव्हती. त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. या सर्व प्रकाराचा साहिलला राग आला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. संबंध सुरू ठेवण्यासाठी साहिलने तिच्यावर दबाव आणला होता. परंतु तरीही तिने ऐकले नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली असल्याचे वृत्त इंडिनय एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/shahbad-dairy-murder-girl-wanted-to...

चंद्रसूर्यकुमार's picture

30 May 2023 - 11:35 pm | चंद्रसूर्यकुमार

आज साक्षी मलिक आणि इतर तथाकथित आंदोलनकर्ते हरिद्वारला गंगेत आपली पदके बुडविणार होते. पण आयत्या वेळेस त्यांनी शेपूट घातली आणि राकेश टिकैत या तितक्याच फालतू माणसाच्या सांगण्यावरून आंदोलन पाच दिवस स्थगित केले आहे.

रिशी बागरींनी आज एक महत्वाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. तो व्हिडिओ मी मुळातून युट्यूबवर शोधला. हा व्हिडिओ आहे ऑगस्ट २०२२ मधला. साक्षी मलिकने त्यावेळेस राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदके जिंकल्यानंतर एन.डी.टी.व्ही शी बोलतानाचा. या व्हिडिओत साधारण अडीच मिनिटांनंतर साक्षी मलिक फेडरेशनच्या ब्रिजभूषण शरण सिंग यांना श्रेय देताना दिसेल. ज्या माणसाने आपले लैंगिक शोषण केले असा आरोप तिने नंतर केला त्या माणसाविषयी ती इतकी तोंडभरून बोलत आहे यातच काहीतरी काळेबेरे दिसत आहे.

हल्ली व्हिडिओ एम्बेड होत नाहीत त्यामुळे लिंक देत आहे. https://www.youtube.com/watch?v=HBkEMiLV9_M आधारण अडीच मिनिटांनंतर साक्षी ब्रिजभूषण विषयी बोलताना दिसेल.

रिशी बागरींनी आणखी एक गोष्ट ट्विट केली आहे आणि ती म्हणजे ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यापूर्वी प्रत्येकाला राष्ट्रीय स्पर्धेत क्वालिफायरमध्ये खेळावेच लागेल आणि तिथे जिंकूनच पुढे जाता येईल. हा नियम नोव्हेंबर २०२२ मध्ये बनला. त्यानंतर हे तथाकथित आंदोलन सुरू झाले हा योगायोगच का?

त्याउपर काल ही सगळी मंडळी नव्या संसदभवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता तिथे जाऊन तमाशा करणार होती. त्यांना दिल्ली पोलिसांनी उचलून तिथून हाकलून दिले हे चांगले झाले. संसदभवन परिसरात (विशेषतः २००१ मधील हल्ला झाल्यानंतर) असा कोणालाही सहजासहजी प्रवेश मिळत नाही आणि तिथे जायला क्लिअरन्स मिळवणे, पास काढणे वगैरे विहित मार्गानेच जावे लागते. तो नियम मोडणार्‍या कोणालाही दिल्ली पोलिस असेच उचलून घेऊन जातील. माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंगांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिली आहे. मिखाईल गोर्बाचेव्ह भारत भेटीवर असताना दिल्लीत राजपथाजवळील काही रस्ते त्यांच्या गाड्या तिथून जायच्या वेळेस बंद केले होते. अशावेळेस नटवरसिंग आय.पी.एस अधिकारी वेद मरवाह यांच्याबरोबर गाडीत होते. त्या गाडीने एक चुकीचा टर्न घेतला आणि ती गाडी नेमक्या त्या बंद केलेल्या भागाजवळ जायला लागली. अशावेळेस तिथे संरक्षणाला तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांना किंवा जे कोणी सुरक्षायंत्रणेत असतील त्यांना अशा सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या गाडीवर गोळ्या झाडायचे पण अधिकार असतात. दुसर्‍या दिवशी राजीव गांधींनी याबद्दल दोघांना झाडले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की दिल्लीच्या त्या भागात सुरक्षेचे नियम असे काटेकोर असतात. त्या नियमाला अपवाद व्हावा अशी साक्षी मलिक मोठी कोण लागून गेली?

आणि साक्षी मलिकला दिल्ली पोलिसांनी उचलून नेल्यावर जेव्हा काही फालतू पुरोगाम्यांनी यत्र नार्यस्तू पुज्यन्ते वगैरे म्हणणारा हाच आपला देश का वगैरे प्रश्न विचारायला सुरवात केली तेव्हाच त्या प्रकारात काहीही अर्थ नाही हे समजून चुकले. शेतकरी आंदोलनाच्या नावाने वर्ष-दीड वर्ष तमाशा करूनही हाती काहीही लागले नाही. मोदी सरकारविरोधात मोठा असंतोष पसरेल, उठाव होईल, लोक रस्त्यावर उतरतील वगैरे अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश झालेले तेच लोक आता साक्षी मलिक, विनेश फोगाट वगैरे लोकांना पुढे करून आपला अजेंडा राबवत आहेत.

दुसरे म्हणजे साक्षी मलिक आणि विनेश फोगाट वगैरेंनी ब्रिजभूषण शरण सिंगांवर खूप गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप खोटे आहेत आणि अशा कोणत्यातरी अजेंड्याचा भाग आहेत हे सिध्द झाल्यास त्या दोघींना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांना जन्मठेप देऊन तुरूंगात पाठवायला हवे. कारण असे आरोप खरे असतील तर एखाद्याला आयुष्यातून पूर्ण उठवायचे सामर्थ्य त्यात असते. तसे असेल आणि हे आरोप खोटे होते तसेच कोणत्यातरी वेगळ्या अजेंड्यामुळे केले गेले होते असे पुढे आल्यास तशीच शिक्षा हे खोटे आरोप करणार्‍यांना का व्हायला नकोत? बाई म्हणजे नेहमी बरोबरच असणार हे गृहितक प्रत्येक ठिकाणी योग्य असेलच असे नाही.

आता तिला पदके बुडवायची असतील तर गंगेत बुडवू दे, यमुनेत बुडवू दे नाहीतर समुद्रात बुडवू दे. तिच्याविषयी शून्य सहानुभूती.

श्रीगुरुजी's picture

31 May 2023 - 12:18 am | श्रीगुरुजी

निखिल वागळेने तर या विषयावर ट्विट्सचा सपाटा लावलाय. मोदी, सरकार, सचिन तेंडुलकर, संघ या सर्वांना शिव्या घालून झाल्या. लोकांना आंदोलन करण्याचे वारंवार आवाहन करतोय. हा ढोंगी स्वतः दिल्लीत जाऊन आंदोलन करणार नाही किंवा ठाकरे कुटुंबियांसारखा घरातून बाहेर पाऊल ठेवणार नाही, पण घरात बसून रोज ४०-५० ट्विट्स टाकणार आणि इतरांना आंदोलन करायला सांगणार.

चंद्रसूर्यकुमार's picture

31 May 2023 - 11:52 am | चंद्रसूर्यकुमार

आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनने साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटुंना पोलिसांनी पिटाळून लावले याचा निषेध केला आहे.

एक गोष्ट समजत नाही. समजा या कुस्तीपटुंपैकी कोणी खून केला असता आणि पोलिसांनी कारवाई केली असती तरी आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनने त्याविरूध्द स्टेटमेंट दिले असते का? नाही ना? म्हणजे तुम्ही कुस्तीपटू असा नाहीतर कोणी बृहस्पतीचे बाप असा, कायदा मोडायचा अधिकार कोणाला नाही. आता जर हे कुस्तीपटू दिल्लीतील एकदम सर्वोच्च सुरक्षेच्या भागात तिथे जायला आवश्यक असलेली प्रक्रीया पूर्ण न करता आणि पाहिजे त्या परवानग्या न घेता घुसायचा प्रयत्न करत असतील तर तो भारतीय कायद्याचा भंग झाला नाही का? मग हे कुस्तीपटू म्हणून त्यांना तसे करायची परवानगी द्यायची का?

आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना स्वित्झर्लंडमध्ये आहे. युरोपिअन लोक. त्यांच्याकडून दुसरे काही होईल अशी अपेक्षाच नाही. सिरीयातील युध्दानंतर मानवतेचा पुळका येऊन अनेक लोकांना त्यांनी घरी घेतले आहे. त्याचे परिणाम युरोपात व्हायला लागलेच आहेत. स्वीडनसारख्या देशात जाळपोळ आणि दंगली झाल्याचे पूर्वी कधी ऐकले होते का? ते मध्यंतरी बातम्यांमध्ये आले होते. भोगू दे त्यांना फुकाच्या मानवतावादाची फळं. आम्हाला फालतूचे लेक्चर द्यायला येऊ नका.

हार्वी वाइंस्तीन माहितीये का ? तो स्त्री कलाकारांना कामासाठी सेक्स करायला लावायचा. स्त्री कलाकारांसह सगळ्या इंडस्ट्री ला ही गोष्ट माहिती होती. तरी सगळे तोंड फाटेस्तो कौतुक करायचे त्याचे.

काहीतरी तथ्य असणारच. काढून टाका आणि बसला कुठेतरी दुसऱ्या खात्यात.
______________
सध्या संरक्षण खातं गाजत आहे.
१. अधिकाऱ्यांचे नसते उपद्व्याप.
२.पाकिस्तानावर चुकून डागले गेलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र. खर्च २४ कोटी रुपये!

डीजेचा आवाज कमी करा, विनंती करणाऱ्या पुण्यातील वृद्धालाच हाकललं, अपमानाच्या भावनेतून टोकाचं पाऊल

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-crime-new...

ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत, कठोर कायदे आणण्याची गरज आहे आणि अशा कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी व्हायलाच हवी....

Uttarkashi: नाबालिग को भगाने के मामले ने पकड़ा तूल, दुकानदारों का विरोध तेज, कई ने छोड़ दिया शहर

https://www.amarujala.com/amp/dehradun/uttarakhand-uttarkashi-news-case-...

--------
Uttarakhand: नाबालिग छात्रा को भगाने का मामला हुआ उग्र, मुस्लिम समुदाय के 42 दुकानदारों ने रातोंरात छोड़ा शहर

https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttarakhand/dehradun-ci...

-----

विरार रेल्वे स्थानकातून 4 वर्षीय मुलाचं अपहरण; काही तासांच्या आत मुलाची सुटका

https://marathi.abplive.com/news/maharashtra/4-year-boy-kidnapped-from-v...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2023 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक पदकविजेत्या सातपेक्षा अधिक महिला पहिलवानांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या भाजपा खासदार ब्रीजभूषण यांची देशभर खेळाडू आणि राजकर्त्यांनी अटकेची मागणी केली आहे. पण सरकारात जे जे असतील ते ते निर्दोष, हे सरकारचं धोरण असल्यामुळे देशभरात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला तरे थेट जेलमधे रवानगी होते, मात्र ब्रीजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही अटक होत तर नाहीच परंतु आंदोलन करणा-या विजेत्या खेळाडूंना ज्या पद्धतीने फ़रफ़टत नेले ते सर्व देशाने पाहिले यापेक्षा अधिक लज्जास्पद काय असू शकते. अतिरेकी, गुन्हेगार समजून त्यांची जी फ़रफ़ट केल्या गेली ते भयंकर आहे. पण, जमेल तशा पद्धतीने देशाची मातीच करायची ठरवलेल्या नेतृत्त्वाकडून न्यायाची अपेक्षा बाळगणे गैरच आहे.केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री असलेल्या स्मृति इरानी यांना तर या प्रकरणाची माहितीच नसावी या पद्धतीने त्या याकडे पाहात असाव्यात. निर्लज्ज भाजपा सरकारकडून फ़ार अपेक्षा नाहीतच. लैंगिक शोषणाच्या घटनेकडे दुर्लक्ष करणा-या सरकारचा एक भारतीय नागरिक म्हणून निषेध व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2023 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''दोन हजाराची नोट चलनात आणने आणि परत घेण्याच्या तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर प्रश्न निर्माण केला आहे, हा निर्णय मूर्खपणाचा आहे''. - पी. चिदम्बरम ( मा. केंद्रीय वित्तमंत्री) संदर्भ- लोकसत्ता.

पहिली नोटबंदी, द्वीतीय नोटबंदी, करोनाकाळातील निर्णय. शे दोनशे ते हजार किमीचा लोकांनी करोना काळात केलेला पायी प्रवास, त्यांचे झालेले हाल. अशा काही निर्णयामुळे इतिहासातील लहरी संस्थानिकांची आठवण झाल्याशिवाय होत नाही.

मुहम्मद तुघलक हा एक लहरी व महत्त्वाकांक्षी दिल्लीचा सुलतान होता. लहरी आणि निर्णय घेण्याच्या बाबतीतला येडपटपणा त्याच्यात ठासून भरलेला होता. 'तुघलकी निर्णय' या शब्दाच्या उगमाचा निर्माता तोच. सतत होणाऱ्या सत्तेवर परकीय आक्रमणाला कंटाळून त्याने आपली राजधानी देवगिरीला हलविली. सरकारी व्यवस्था पाहणारेच नव्हे, तर दिल्लीतील सरसकट जनतेला त्याने दिल्लीहून देवगिरीला जाण्याचा हुकूम दिला. या त्याच्या हुकमाने लोकांचे फार हाल झाले, प्रवासात अनेक लोक आजारी पडले, उपासमार झाली, काही मरण पावले. काही काळानंतर त्याला आपला निर्णय चुकला असे वाटले आणि मग पुन्हा त्याने चारेक वर्षात सर्वांनी दिल्लीला परत चला असे फर्मान काढले. काही लोक जगले. काही देशोधडीला लागले. काही मरण पावले.

दुसरं, एक उदाहरण, असंच आहे. जनतेकडून वसूल होणारा कर पुरेसा नव्हता म्हणून 'तांब्याची नाणी' ही आता 'सोन्याची नाणी' म्हणून चलनात वापरली जातील असा फतवा काढला गेला. टकसाळ नसल्याने ठिकठिकाणी नाणी पडत गेली आणि गोंधळ झाला. पुन्हा वेड्या तुघलकाने त्याबाबतीतला हुकूम मागे घेतला. विद्येने सुसंस्कृत असलेल्या तुघलकास लहरी आणि वाटेल त्या निर्णयाने राज्य नीट सांभाळता आले नाही. सामान्य जनतेच्या हालापेष्टा वाढतच गेल्या.

जगभर 'तुघलकी' निर्णय घेणा-यांचा फार मोठा इतिहास आहे, आपल्याला त्यांना वेळीच ओळखता आणि आवरता आलं पाहिजे इतकंच.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

1 Jun 2023 - 9:41 am | सुबोध खरे

आवरता आलं पाहिजे इतकंच.

ते ठीक आहे

पण हे कसं कसं करायचं ते पण डिट्टेलवार मध्ये सांगा बघू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2023 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, कर्नाटकमधे जसा जनतेने 'बीग हीट' मारला तसंच.
काँग्रेस म्हणून नव्हे, कोणीही सत्तापालट करीत राहीलं पाहिजे.

आपली सत्ता जनथा कधीही पालथी करु शकते, अशी भिती
सरकारला राहीली पाहिजे, तर जनताभिमूख कामे होतात असे वाटते

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

1 Jun 2023 - 10:43 am | डँबिस००७

आपली सत्ता जनथा कधीही पालथी करु शकते, अशी भिती
सरकारला राहीली पाहिजे, तर जनताभिमूख कामे होतात असे वाटते

तुम्ही अगदी रास्त बोललात. स्वनुभवाचे बोल !!
२०१४ पुर्वी ही भिती काँग्रेसला नव्हती म्हणुन ७५ वर्षात जनताभिमूख कामे करायची राहुन गेली

जे गेल्या ७५ वर्षात साघ्य झाल नाही ते आता कर्नाटकात काँग्रेस करणार ?

कर्नाटकाच्या विजया नंतर येऊ घातलेल्या राज्य निवडणूकांच्या प्रचारा मध्ये काँग्रेस आता उघडपणे हिंदुंच्या विरोधात उतरलेली आहे.
आंध्रा, तेलंगाणासाठी मुसलमान समाजाला खैरातीचे आमिष दाखवत आहेत. उघड आहे हा पैसा हिंदु टॅक्स पेयरच देणार.

सुबोध खरे's picture

1 Jun 2023 - 11:37 am | सुबोध खरे

कर्नाटकमधे जसा जनतेने 'बीग हीट' मारला.

हा बिग हीट भाजप ला नव्हता तर ज द सेक्युलर ला होता. भाजपच्या मतांत फारसा फरक पडला नाही. तर ज द सेक्युलर ची मते काँग्रेसला मिळाली म्हणून सत्ता पालट झाला.

काँग्रेस म्हणून नव्हे, कोणीही सत्तापालट करीत राहीलं पाहिजे.

म्हणजे

केंद्रात कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार आणायला हवं?

एक ना धड भाराभर चिंध्या हि स्थिती आहे विरोधकांची.

त्यातील एक तरी माणूस विश्वास ठेवावा असा आहे का?

केवळ पर्याय नाही म्हणून भाजप यावा अशी बहुसंख्य सुजाण लोकांची धारणा नक्कीच नाही.

परंतु आज तरी श्री मोदी यांच्या तोडीचा एक हि नेता कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाही.

केवळ मोदी विरोधासाठी बाजारबुणग्यांचं सरकार येणं भारतीय जनतेला या घटकेला तरी परवडणारे नाही.

आपल्या मते श्री मोदी हे अगदी हुकूमशहा( स्टालिन, हिटलरच्या तोडीचे) असतील.

परंतु ते भ्रष्ट आहेत असे पानवाला, रिक्षावाला, हमाल, माथाडी, मजूर सुद्धा मानत नाहीत.

असा विश्वास एका तरी विरोधी पक्ष नेत्याबद्दल खुद्द त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटतो का?

हे नेते परत आले तर देश विकून खातील अशीच भीती सामान्य माणसांना वाटते यामुळेच श्री मोदी परत येणारच यात शंका नाही.

बाकी पुरोगामी लोक जे असहिष्णुता इ बोंबा मारतात त्याची सामान्य जनतेला जन्मापासून सवय आहे. उदा आता २००० च्या नोटा रद्द केल्यामुळे कोणत्याही गरिबाला काहीही फरक पडलेला नाही.

उलट ते ज्यांच्याकडे काम करत आहेत ते श्रीमंत लोक घाबरलेले पाहून गरिबांना उलट दिलासा आणि गम्मत वाटते. आणि यातून हे सरकार श्रीमंतांचे नाही हि धारणाच दृढ होते.

मग तुम्हीच त्यांना सूट बूट कि सरकार म्हणा कि काही.

सालदार's picture

6 Jun 2023 - 2:43 pm | सालदार

<<आपल्या मते श्री मोदी हे अगदी हुकूमशहा( स्टालिन, हिटलरच्या तोडीचे) असतील.>>
तुम्हाला हुकुमशाहिचे तोटे समजावून सांगण्याची गरज आहे का?

सुबोध खरे's picture

6 Jun 2023 - 6:49 pm | सुबोध खरे

सांगा बरं

कृपया हिटलर, स्टालिन, सद्दाम परत वाचा...

विजुभाऊ's picture

8 Jun 2023 - 11:03 am | विजुभाऊ

सद्दाम वाइट नव्हता. त्याची राजवट होती त्यावेळेस इराक प्रगत देश होता.
तेथे आय एस आय एस किंवा तालीबान चे आस्तित्व अजिबात नव्हते.
इराकवर अनेक निर्बंध लावले होते तरीही सामान्य इराकी माणसाचे जगणे अशक्य झालेले नव्हते.

सुबोध खरे's picture

8 Jun 2023 - 4:21 pm | सुबोध खरे

श्री मोदी हे हिटलर, स्टालिन, सद्दाम सारखे कसे आहेत

हे सांगा बरं

बरेच व्यवहार डिजिटल झाले आहेत. मग मोठ्या रकमेच्या नोटांचे औचित्य कुठे राहिले आहे?
छोटे व्यवहारही डिजिटल होत आहेत.

नोटा छापण्याचा खर्च सारखाच राहातो. पण मोठ्या रकमेची खोटी नोट छापल्यास फायदा जास्ती होणार. तो एक धक्का आहे.

केवळ ओरड करून काय फायदा?
कर्नाटक चांगले आहे मान्य. ज्यांना महाराष्ट्रातून तिकडे जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. तिकडे व्यापार,नोकरी करावी. काही एचवन विझा लागत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2023 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग मोठ्या रकमेच्या नोटांचे औचित्य कुठे राहिले आहे?

सतत, पालथे निर्णय घ्यायचेच कशाला ?
काळा पैसा आणू यंव होईल आणि त्यंव होईल.
एकदाच काय ती पॉलीसी ठरवली पाहिजे की नाही.

केवळ ओरड करून काय फायदा?

’न धरी शस्त्र करी मी गोष्टी, सांगेन युक्तीच्या चार’
आपला वसा जनजागृतीचा.

कर्नाटक चांगले आहे मान्य...

आपण महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही.
आपलं पहिलं प्रेम भारत आणि दुसरं प्रेम महाराष्ट्र.
मग इतर अनुक्रम.

-दिलीप बिरुटे
(महाराष्ट्रीयन)

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2023 - 11:08 am | श्रीगुरुजी

२००० ची एकही नोट ९९% जनतेकडे नाही. तस्मात्.ही नोट व्यवहारातून काढून घेतल्याने त्यांचे शष्प नुकसान नाही. परंतु मोदींचा कोणताही निर्णय तुघलकी म्हणून उर बडवून घेणाऱ्यांना उर बडविण्यासाठी एक नवीन कारण मिळाले आहे.

https://marathi.hindustantimes.com/nation-and-world/64-percent-indians-d...

-----
ज्याअर्थी, कॉंग्रेस नोटबंदीचा विरोध करत आहे, त्याअर्थी , हा निर्णय योग्यच असावा ....

कॉंग्रेस वर माझा अजिबात विश्र्वास नाही ....

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Jun 2023 - 1:42 pm | चंद्रसूर्यकुमार

मला वाटते लॉक डाऊन सुरू झाल्यापासून की त्याच्याही आधीपासून २००० ची नोट ए.टी.एम मधून येणे बंद झाले आहे. २००० ची नोट मुद्दामून बँकेत जाऊन कॅश काढली (ए.टी.एम वर न जाता) तरच मिळत असावी. इतरांचे माहित नाही पण मी स्वतः २००० ची नोट बघितली (वापरणे खूप दूर राहिले) त्याला किमान ५ वर्षे झाली असावीत.

सुरवातीला २००० ची नोट कशी त्रासदायक आहे- १२० रूपयाची भाजी घेतली तर भाजीवाल्याला २००० ची नोट द्यायची का वगैरे टीका करणारे लोकच आता त्या नोटा बंद करायचा निर्णय आल्यानंतर त्या नोटा किती चांगल्या होत्या अशी स्तुतीसुमने उधळत आहेत.

कंजूस's picture

1 Jun 2023 - 1:54 pm | कंजूस

चलनासंबंधित व्यवहाराची कसोटी लागली.

तर बदल करणे स्वाभाविक नाही का? यामध्ये पालथेपणा काय झाला?

नोटा बंदी काळात तर नेहमीच्याच दुधवाले,वाणी यांनी सांगितले की पैसे मिळतील तेव्हा द्या. पण आमचे बँक अकाऊंटच नाही. मग हे सगळे गुप्त रोख व्यवहारच करत होते हे उघड झाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2023 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आठवत असेल, तुम्हाला २०१६ ची ती एक रात्र. ठीक रात्री आठ वाजता, अचानक प्रसिद्ध आकाशवाणी सॉरी दूरदर्शनवाणी झाली. 'बहनो और भाईयो' आपण हजार आणि पाचशेच्या नोटांना आता 'जय महाराष्ट्र' म्हणत आहोत. अर्थात, पहिली नोटबंदी. आणि तेव्हाच प्रसिद्ध अशा दोन हजार रुपयाच्या नोटेचा जन्म झाला. 'जमीनीत पुरली तरी, त्या नोटेत एक चीप असेल, लोकेशन समजेल वगैरे. ' माष्टर ष्ट्रोक. माय गॉड हहपुवा होते, सर्व आठवण झाल्यावर. तर, अशा त-हेने नोटबंदी झाली. निश्चलनीकरण झालं. चलनात तुटवडा भासेल म्हणून दोन हजार रु.च्या नोटेचा जन्म झाला असेही एक कारण सांगितल्या जाते. दोन हजार रुपयाचे सुटे मिळणे, ते सांभाळणे तिचा व्यवहारातला प्रत्यक्ष उपयोग हे सगळं पाहता तो प्रयोग फसलाच. पुढे २०१९ नंतर तर, त्या नोटा छापायलाच दिल्या नाहीत आणि हळुहळु दोन हजार रुपयांची नोट मार्केट मधून नाहीशी झाली. बँकांनी हळुहळु त्या नोटा जमा करुन घेतल्या असाव्यात. आणि आता शिल्लक नोटबंदी द्वीतीय.

दोन हजार रुपयाची 'द नोटबंदीची ष्टोरी' पाहिल्यावर एक भारतीय म्हणून आपल्या देशवासियांचा नेमका फायदा काय झाला ? काळा पैसा बाहेर आला ? बेकार तरुणांना रोजगार उभे करता आले ? प्रत्यक्ष व्यवहार सुटसुटीत झाले ? गैरव्यवहार कमी झाले ? की रीजर्व बँकेची ती केवळ एक प्रोसेस होती, पण तिचा गवगवा केल्या गेला ? प्रश्न तर पडतच राहतील.

-दिलीप बिरुटे