द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

जावा फुल स्टॅक's picture
जावा फुल स्टॅक in काथ्याकूट
5 May 2023 - 6:47 pm
गाभा: 

आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा.

पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो.

चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.

धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.

चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.

---

रेटिंग : ४.२/५

  • चित्रीकरण *****
  • अभिनय *****
  • दिग्दर्शन ****
  • पटकथा ****
  • परिणामकारता ****

---

द केरल स्टोरी चित्रपटाचे युट्यूब टीजर

---

हा चित्रपट आणि त्यातील संदेश यांपुरती मर्यादित चर्चा करण्याची; धाग्याला राजकीय वळण लागू न देण्याची मिपाकरांकडून अपेक्षा.

- जावा फुल स्टॅक

प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल एक व्हिडिओ बहुतेक रिजवान अहमद यांचा एका सहकार्याने कायप्पावर पाठवला.केरळ लव्ह जिहाद वर अतिशय मार्मिक भाष्य या सिनेमाच्या निमित्ताने केलं आहे.

Bhakti's picture

8 May 2023 - 11:18 am | Bhakti

https://youtu.be/D6vZdFbJkX4
हा तो व्हिडिओ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2023 - 12:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपटाची उत्तम ओळख करुन दिली आहे.

-दिलीप बिरुटे

प्रोपोगंडा सिनेमा आहे असे वरकरणी दिसते. काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे असे रिव्ह्यूज वाचून समजते आहे. खुद्द ट्रेलर मध्ये ३२००० मुलींचा आकडा होता तो बदलावा लागला, सिनेमात मात्र आहे तसे ठेवले आहे.

विवेकपटाईत's picture

7 May 2023 - 10:10 am | विवेकपटाईत

वास्तविकता तर सिनेमात जे दाखविले असेल त्यापेक्षा दहा पट जास्त असेल. कुणी काश्मिरी ब्राम्हण भेटला असेल तर त्याला विचारा. या शिवाय महाराष्ट्रात किती मुली लव जिहादच्या शिकार झाल्या आहेत. या बाबत माहिती घ्या..

कॉमी's picture

7 May 2023 - 10:36 am | कॉमी

सिनेमा केरळ वर आहे. महाराष्ट्र आणि काश्मीर नाही. आणि तुमच्या मनाप्रमाणे वास्तविकता ठरत नसते.

वामन देशमुख's picture

7 May 2023 - 1:16 pm | वामन देशमुख

काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे असे रिव्ह्यूज वाचून समजते आहे. खुद्द ट्रेलर मध्ये ३२००० मुलींचा आकडा होता तो बदलावा लागला, सिनेमात मात्र आहे तसे ठेवले आहे.

१. अधोरेखित भागाधारित प्रश्न:

तुम्ही हा सिनेमा पहिला आहे का?

२. मी हा सिनेमा पाहिलाय, त्यात ३२००० हा आकडा मलातरी दिसला नाही / ऐकू आला नाही. (चूभूदेघे)

काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे

३ अ. तुमच्या माहितीनुसार / समजुतीनुसार किती मुस्लिम / मुस्लिमेतर तरुणी या प्रकारांना बळी पडल्या असतील?

३ आ. तुमच्या मतानुसार किती बळी पडल्यानंतर हा सिनेमा / असा इतर कोणता सिनेमा प्रदर्शित करण्याचे समर्थन करता येईल?

१. मी हा सिनेमा पाहिला नाही.
२.शेवटी एका ख्रिश्चन मुलीचा मोनोलॉग आहे त्यात ३२००० हा आकडा वापरला आहे. ट्रेलर पोस्ट करताना ३२००० मुलींची गोष्ट असे लिहिले होते, नंतर त्या पोस्ट डिलीट केल्या. (त्या मी पाहिलेल्या.)
३. माझ्या वैयक्तिक मताचा किंवा समजुतीचा इथे प्रश्न नाही असे वाटते. इथे सत्यापित रिपोर्ट वरूनच आकडेवारीचा अंदाज येतो. माझ्या वाचाणाप्रमाने केरळ मधील आयसिस जॉईन केलेल्या ज्ञात लोकांची संख्या २१ आहे.
३आ. मी कधी सिनेमा काढावा ह्यावर एक शब्द सुध्दा लिहिले नाहीये. कधीही काढावा. पण आकडे फुगवून सांगू नयेत.

"...पण आकडे फुगवून सांगू नयेत."

कदाचित आकडा फुगवून सांगितलं असले पण हे सर्व अनेक वर्षे भारतात आणि इत्रतरी चालले आहे हे लपवावयाचे का?
का सतत बजरंगी भाईजान सारखेच चित्रपटाचे ची अफू पाजत बसायची

काँगेस काळात आंधी आणि किस्सा कुर्सी का वर आलेली बंदी आठवावी

तुम्ही माझे अर्धवट कोट केलेले वाक्य आहे खुद्द त्याच वाक्यात मी लिहिले आहे कि कोणी कशावर सिनेमा काढावा आणि का काढू नये ह्याव्रर माझे काहिहि म्हणणे नाही. पण तुम्ही २१ चे ३२००० करणार असाल तर नैसर्गिक आहे कि तुमच्या उद्दिष्टावर शंका घेतली जाईल आणि तुमचा मुद्दा गंभीरपणे घेतला जाणार नाही. जर दिग्दर्शकानेच ह्याची खबरदारी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती.

तथाकथित ३२ हजार हा आकडा नक्की कसला आहे? लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतरीत झालेल्या मुलींचा आकडा की आयसिसमध्ये सामील होऊन सिरीयाला जायला निघालेल्या/गेलेल्या मुलींचा आकडा? तो दुसरा आकडा आहे असा दावा कोणी केल्याचे ऐकिवात नाही. हा आकडा पहिला (धर्मांतरीत झालेल्या मुलांचा) असाच दावा माझ्या मते आहे. समजा तो आकडा किती आहे असा दावा असता तर तुमच्यासारख्यांना तो पटला असता? २० हजार? १० हजार? ५ हजार? २ हजार? ५००? २००? १००? १०?५? १? काश्मीरमध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या, त्यांना विस्थापित व्हावे लागले याविषयी असले काही झालेच नाही पासून काश्मीर फाईल्समध्ये जे काही दाखवले आहे ते फुगवून दाखवले आहे पर्यंत वेगवेगळे दावे झाले होते.

त्यामुळे ३२ हजार (असा दावा केला गेला असेल तर) ऐवजी तो आकडा कितीही आहे असा दावा केला असता तरी तो आकडा फुगवलेलाच आहे असे तुमच्यासारख्यांकडून म्हटले गेले असते ही शक्यता सगळ्यात जास्त.

कॉमी's picture

8 May 2023 - 10:41 am | कॉमी

The Kerala Story' stars Adah Sharma, Yogita Bihani, Siddhi Idnani and Sonia Balani in the lead roles. The trailer of Sen's film 'The Kerala Story' came under fire as it claimed that 32,000 girls from the state went missing and later joined the terrorist group ISIS.

In a police station scene, one of the girls rattles off numbers to prove that Kerala is heading for trouble. She claims that more than 30,000 girls have been converted to Islam and weaned away to fight for ISIS. She quotes a former chief minister of the state as saying that Kerala will become an Islamic state in 20 years. The film makes no attempt to tell the audience where the numbers and that fears have emanated from.

तो आकडा कितीही आहे असा दावा केला असता तरी तो आकडा फुगवलेलाच आहे असे तुमच्यासारख्यांकडून म्हटले गेले असते ही शक्यता सगळ्यात जास्त.
>>> सिनेमामध्ये २२ कोटी आकडा असता आणि आम्ही तक्रार केली असती तरी तुम्ही असेच बोलला असता ह्याची शक्यता सगळ्यात जास्त.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 10:59 am | चंद्रसूर्यकुमार

उगी उगी.

बाकी मार्क्सच्या जन्मदिनाच्या उशीराने शुभेच्छा.

काहीतरी बोलायलाच पाहिजे असे नाही. बोलायला काही नसले की गप्प बसले तरी चालते.

टर्मीनेटर's picture

8 May 2023 - 11:07 am | टर्मीनेटर

In a police station scene, one of the girls rattles off numbers to prove that Kerala is heading for trouble. She claims that more than 30,000 girls have been converted to Islam and weaned away to fight for ISIS.

त्या प्रसंगात ती मुलगी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमोर ३० कि ५० हजार अशा घटना घडल्या असल्याच चा उल्लेख करते आणि त्यापैकी केवळ ७०३ प्रकरणांची नोंद झाली असून त्यातल्या फक्त २६१ व्हिक्टिम्सची सुटका करण्यात आली आहे असा काहीसा तो संवाद आहे. अत्यंत प्रभावी सादरीकरण असलेला हा चित्रपट पाहावा आकड्यांच्या नादी लागू नये, तो पब्लिसिटी स्टंट असू शकतो असे माझे वैयक्तिक मत!
आणि हो, प्रत्यक्ष आकडा कितीही असला तरी त्या मुलींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या तीन मुलींची हि कथा आहे त्यातली फक्त एक मुलगी प्रत्यक्षात isis मध्ये भरती होताना दाखवली आहे, अन्य दोन मुलींच्या आयुष्याची प्रचंड फरफट होते, त्यामुळे लव्ह जिहादला बळी पडलेल्या जेवढ्या मुली असतील त्या सर्व isis मध्ये भरती झाल्या वगैरे मुद्द्यांवर चित्रपट न पहाता चर्चा करणे अगदीच गैरलागू ठरेल असेही नमूद करू इच्छितो (हे कोणा एकाला उद्देशुन नाही) !

हा ३० किंवा ५० हजार आकडा कुठून काढला ?

ते निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकालाच माहित 😀
पण तो आकडा प्रत्यक्षात ३ किंवा ५ जरिअसला तरी त्याने विषयाची दाहकता कमी होत नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर बनलेले माझे मत आहे!

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 11:38 am | चौकस२१२

सहमत ,, दुर्दैवाने वाद ३२ कि ३२००० यावरच होत राहणार

तुमचे म्हणणे मला अमान्य नाहीच. पण एक किंवा २ किंवा २१ घटना आणि ३२०००/५०००० घटना ह्याने अतिशय वेगवेगळे चित्र निर्माण होते.

३२०००/५०००० घटना ह्याने अतिशय वेगवेगळे चित्र निर्माण होते.

+१
त्यासाठीच हा पब्लीसिटी स्टंट असावा असे मला वाटते. आणि तसा तो असल्यास नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा देउन रिलीज केलेल्या चित्रपटाच्या 'टिजर' वरुन अत्ता चित्रपट प्रदर्शित होण्यच्या/झाल्याच्या सुमारास गदारोळ होउन चित्रपटाची एवढी चर्चा होते आहे/प्रसिद्धी मिळत आहे म्हणजे त्यात निर्माता-दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत असेही म्हणण्यास वाव आहे!

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 11:41 am | चौकस२१२

आकडा गेला चुलीत .. हे असे होतच नाहीये, हिंदूंचा हा कांगावा आहे असे म्हणणे आहे का तुमचे? स्पष्ट हुन जाऊद्या,, हा सूर्य हा जयंद्रथ / बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या म्हणी रमाणे

माझे सगळे प्रतिसाद वाचा. तरी तुम्हाला नाही समजले तर तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही.

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 12:09 pm | चौकस२१२
चौकस२१२'s picture

8 May 2023 - 12:16 pm | चौकस२१२

यातील "ब्रेकिंग न्युज" हा नेहमीचा आरडाओरडा बाजूल ठेवूया . मुख्य मुद्दा हा कि जगभर हे चाललंय आणि तुमच्या सरकेचे एकदा काय म्हणून असून बसल्यात

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 11:21 am | चंद्रसूर्यकुमार

अत्यंत प्रभावी सादरीकरण असलेला हा चित्रपट पाहावा आकड्यांच्या नादी लागू नये, तो पब्लिसिटी स्टंट असू शकतो असे माझे वैयक्तिक मत!

सहमत.

अवांतर- म्हणूनच तो आकडा किती दाखवला असता तर तो खरा वाटला असता असे विचारले. समजा तो आकडा त्यांचे समाधान होईल इतका कमी असता तर मग दुसर्‍या कोणत्यातरी काल्पनिक मुद्द्यावरून गदारोळ चालू केला असता. जे मागच्या वर्षी काश्मीर फाईल्सच्या वेळेस झाले तेच यावेळेस केरळ स्टोरीच्या निमित्ताने.

टर्मीनेटर's picture

8 May 2023 - 11:55 am | टर्मीनेटर

तर मग दुसर्‍या कोणत्यातरी काल्पनिक मुद्द्यावरून गदारोळ चालू केला असता.

ते तर आहेच, आणि तसेही चित्रपटातील कम्युनिस्ट विचारसणीच्या पित्याची मुलगी असलेली पुर्वाश्रमीची 'गितांजली' (गितु) आणि धर्मांतरणानंतर झालेली 'अनिशा' ह्या पात्राच्या तोंडीचा सुरुवातीचा,
"Communists are the most Hippocrates"
आणि नंतर पश्चातापदग्ध अवस्थेत त्याच पित्याच्या मांडीवर डोके ठेउन रडत त्याला "तुम्ही आम्हाला परकीय कम्युनिस्ट विचारसरणीचे धडे दिलेत, पण आपल्या परंपरा आणि संस्कृती शिकवली असती तर अशी वेळ आली नसती" अशा आशयाचे दोन संवाद मुस्लीम तुष्टीकरणात अग्रेसर आणि ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या (अर्थात चर्चच्या) पुर्णपणे प्रभावाखाली असलेल्या 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या केरळ सरकार आणि इतर डाव्या मंडळींना मिर्च्या झोंबवण्यास पुरेसे होते त्यामुळे त्यांनी वाट्टेलत्या मुद्द्यावरुन आकांड तांडव केलेच असते हे नक्की 😀

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 12:36 pm | चौकस२१२

"ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या (अर्थात चर्चच्या) पुर्णपणे प्रभावाखाली असलेल्या 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या"

हे फक्त भारतीय कम्युनिस्टांच्या बाबतीतच होऊ शकते,,, कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या कम्युनिस्टांना धर्म वैगरे आवडत नाही

म्हणजे जसे काही शीख ख्रिस्त्री तर बनतात पण शीख धर्मातील मुख्य गोष्टी सोडतच नाहीत ( कन्फयुजन हुता होगा )

कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या कम्युनिस्टांना धर्म वैगरे आवडत नाही

+१
तोच विरोधाभास अधोरेखीत करायचा होता म्हणुन 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या असे लिहीले!
इतर धर्मियांचे तुष्टीकरण आणि हिंदुंचा तीव्र द्वेष एवढाच भारतीय कम्युनिस्टांचा एककलमी कार्यक्रम असतो. सदर चित्रपटातील "Communists are the most Hippocrates" हा गितांजली नामक पात्राच्या तोंडचा संवाद म्हणूनच मला फार फार आवडला 😀
असो... धाग्याला भलतेच वळण लागयला नको म्हणुन आता प्रतिसाद आवरते घेत बऱ्याच दिवसांनी आज मिळालेलया फावल्या वेळेचा सदुपयोग करत वरती एका प्रतिसादात म्हंट्ल्याप्रमाणे हा चित्रपट मला कसा वाटला आणि का आवडला ह्यावर भाष्य करणारा स्वतंत्र लेख लिहायला घेतो!

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 1:15 pm | चौकस२१२

१००% टर्मीनेटर

टर्मीनेटर's picture

8 May 2023 - 1:42 pm | टर्मीनेटर

* 'Hippocrates'
ह्या आणि वरच्या काही प्रतिसादांमध्ये 'hypocrites' असे लिहायचे होते पण टंकताना ऑटो कंप्लीट्द्वारे त्याजागी आलेल्या 'Hippocrates' अशा चुकिच्या स्पेलिंगकडे दुर्लक्ष झाले आणि पुढेही तेच वाक्य प्रतिसादांत कॉपी-पेस्ट केल्याने प्रत्येक ठिकाणी त्याच चुकिच्या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे त्याबद्दल क्षमस्व 🙏
ते वाक्य "Communists are the most hypocrites" असे वाचावे!

वाट बघतो..

सुबोध खरे's picture

8 May 2023 - 12:37 pm | सुबोध खरे

@ कॉमी

मी हा सिनेमा पाहिला नाही.

मग टिप्पणी करण्याची एवढी घाई कशासाठी?

बयरामजी नर्सिंग होम मधून काळ्या कुत्र्याने नवजात बालकाला पळवले या बातमी वर डॉ बयरामजी आक्षेप घेऊन गदारोळ करतात कि हि बातमी साफ खोटी आणि चुकीची आहे.
प्रत्यक्ष काय झाले असे विचारता डॉ बयरामजी म्हणतात साफ खोटी बातमी आहे ती काळ्या कुत्र्याने नव्हे तर तांबड्या पाठीच्या कुत्र्याने बालक पळवले.

अशा तर्हेचा आपला युक्तिवाद आहे. .

धाग्याचे काश्मीर करण्यासाठी छिद्रान्वेषीपणा करण्याची हि वृत्ती अत्यंत खालच्या पातळीची आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

२१ चे ३२००० हे छिद्र नाही, भलेमोठे भगदाड आहे.

१ हे सुद्धा मोठे भगडाद असून तुम्ही २१ हा आकडा कमी लेखत आहात याचे सखेद आश्चर्य वाटलं

Context सोडून वाचले की असेच होणार. खरे सर मला छिद्रान्वेषी म्हणले त्यासंदर्भात भगदाड आणि छिद्र शब्द आहेत.

सुबोध खरे's picture

8 May 2023 - 7:13 pm | सुबोध खरे

२१ चे ३२००० हे छिद्र नाही, भलेमोठे भगदाड आहे.

परत वृत्ती तीच

मूळ प्रश्न लव्ह जिहाद आहे कि नाही हे सोडून तपशिलात घोळ घालत बसायचं आणि धागा भरकटवायचा.

ज्याच्या घरातल्या मुली अश्या फ्रीज किंवा आयएसआयएस त्यांच्या घरच्यांना पण विचारा, प्रपोगंडा आहे की नाही ते कळेल. बाकी आपलं नेहमीचं दळण चालू द्या

वामन देशमुख's picture

7 May 2023 - 1:26 pm | वामन देशमुख

सिनेमाचे दिग्दर्शन बऱ्याच ठिकाणी ढिसाळ आहे पण धाग्यात म्हटल्याप्रमाणे, वेगवान कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते. माझ्या मते सिनेमा पाहून मते बनवावीत.

सिनेमातील तुकड्यातुकड्यांमधून येणारे पागल परिंदे हे गाणे मला आवडले.

ना ज़मीं मिली,
ना फ़लक मिला
है सफ़र में अंधा परिंदा
जिस राह की मंज़िल नहीं
वहीं खो गया होके गुमराह

---

संपूर्ण गाणे इथे ऐकता येईल:

हंगामावरची गाण्याची लिंक

परीक्षण आवडले! आज संध्याकाळी द केरल स्टोरी बघणार आहे!! त्यानंतर माझे मत सांगतो!!!

श्रीगणेशा's picture

7 May 2023 - 11:38 pm | श्रीगणेशा

परीक्षण आवडले. चित्रपट पाहिल्यानंतरच भाष्य करायला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

7 May 2023 - 11:58 pm | श्रीगुरुजी

हा चित्रपट या सत्यकथेवर आधारीत आहे.

श्रीगुरुजी's picture

8 May 2023 - 12:04 am | श्रीगुरुजी

अश्या अनेक घटना प्रत्यक्षात घडलेल्या आहेत. अनेक हिंदू मुलींना फसवून धर्मांतर करून लग्न लावण्यात आले आहे. त्याविषयी उद्या लिहितो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट पाहिल्यावर लक्षात आलं की, धागा लेखकाने अतिशय संयमाने चित्रपटाचं परिक्षण लिहिलंय. जावा फुल स्टॅक यांचं खरंच कौतुक आहे. क्रूर, बटबटीत, भडकपणानं अंगावर येणा-या सिनेमाचं तटस्थपणे, परिक्षण करण्यासाठी जो अलिप्तपणा असावा लागतो, तो परिक्षणात आलाय. दहशतवादी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी जे काही पर्याय निवडतात, ते भयंकरच असतं. ज्या कुणावर अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते तितकंच वेदनादायी.

बाकी, ताश्कंद फाईल्स, काश्मीर फाईल्स, द, केरला ष्टोरी, आणि आता पुढे 'लोकसभा २०२४' असा एखादा सिनेमा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

8 May 2023 - 9:47 am | मोदक

पेड ट्रोल्स, पुरस्कार वापसी गँग आणि मुख्य म्हणजे पैशाच्या लोभाने का आणखी कोणत्या प्रलोभनाने अंतर्जालावर धडधडीत खोटे बोलणार्‍या सो कॉल्ड उच्चशिक्षित लोकांवरती पण असे चित्रपट येऊन यांचे बुरखे टराटरा फाडले पाहिजेत.

वामन देशमुख's picture

8 May 2023 - 10:07 am | वामन देशमुख

पेड ट्रोल्स, पुरस्कार वापसी गँग आणि मुख्य म्हणजे पैशाच्या लोभाने का आणखी कोणत्या प्रलोभनाने अंतर्जालावर धडधडीत खोटे बोलणार्‍या सो कॉल्ड उच्चशिक्षित लोकांवरती पण असे चित्रपट येऊन यांचे बुरखे टराटरा फाडले पाहिजेत.

१००% सहमत!

सामान्यनागरिक's picture

10 May 2023 - 12:51 pm | सामान्यनागरिक

एकदम सही ! नुसतेच बुरखे फाडणे पुरेसे नाही. खुप हाल हाल केले पाहिजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मंद भक्त' 'अंध भक्त' 'प्रचारी भक्त' अशाही विषयांवर सिनेमे आले पाहिजेत. काळाची ती गरज आहे.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 11:54 am | चौकस२१२

काढा ना ,, त्याच बरोबर : "अंध गुलाम १ काँग्रेस २, राष्ट्रवादी ३, सेना यावर पण काढा

सामान्यनागरिक's picture

10 May 2023 - 12:50 pm | सामान्यनागरिक

"अंध गुलाम १ काँग्रेस २, राष्ट्रवादी ३, सेना

हे लोक तर रोजच टीव्हीवर अकलेचे तारे पाजळत असतात. त्यांना बघण्यासाठी पैसे देउन तिकीट कोण विकत घेईल ?
अगदी तुमच्या आसपासही ते फिरत असतील.

दु:ख हे आहे की त्यंनी कितीही मूर्खपणा केला तरी त्यांना मते देणारे लोक आहेत.
वास्तवीक राहुल गांधी, संजय राउत, आप पार्टीचे लोक यांना फक्त आणि फक्त सर्कशीत जोकर म्हणुन काम करायची परवानगी द्यायला पाहिजे. त्यांना मोकळे सोडु नये.दुसरे काही करतांना सापडल्यास त्यांना मिठाच्या पाण्याने भिजवलेल्या चाबकाचे फटके द्यायला पाहिजे.

सुबोध खरे's picture

8 May 2023 - 12:40 pm | सुबोध खरे

'मंद भक्त' 'अंध भक्त' 'प्रचारी भक्त

बिरुटे सर

कुठूनही काहीही कारण नसताना श्री मोदी आणि अंधभक्त यांच्यावर विषय आणलाच पाहिजे का?

विषय काय आणि आपण कुठे काय करतो आहे हे भान आपल्या सारख्या अतिउच्च शिक्षित माणसाला नसावे हे केवळ द्वेषमूलक विचारसरणीचे लक्षण आहे.

माणूस द्वेषाने किती अंध होऊ शकतो याचे आपण एक उत्तम उदाहरण समोर आणत राहता.

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 12:50 pm | चौकस२१२


".....अतिउच्च शिक्षित माणसाला नसावे..."

मोदींच्या भाजपच्या एकाद्या धोरणावर यांनी अभ्यासपूरने टीका केली तर समजू शकतो पण ज्यात त्यात मोदी आणणे ... केवळ कलुषित मन /द्वेषमूलक
सरांचा हा "हेट जिहाद" दिसतोय
पालथ्या घड्यावर पाणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्वॉरं.....! धन्यवाद. आपल्या पटणा-या आणि न पटणा-या मताचा आदर आहेच. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 9:29 am | चौकस२१२

आता पुढे 'लोकसभा २०२४' असा एखादा सिनेमा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
भावना नाही पोचल्या,,, इस्कटून इस्कटून सांगावे

चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही.

प्रेक्षकांना निदान हे कळावे कि अश्या गोष्टी घडत आहेत एवढे घडले तरी पुरे
हिंदूंचे विभाजन आणि धार्मिक परिवर्तन होते आहे हे सत्य आहे

चित्रपतातून ते कसे दाखवयाचा तो निर्माता आणि दिग र्शकाचा निर्णय असतो

हे उदाहरण अनेकांनी पहिले असेल "विभाजन आणि धार्मिक परिवर्तन"
नसेल तर बघा
https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18&t=72s

एक नंबर चित्रपट! केवळ भारतीयांनीच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने बघावा असा चित्रपट आहे.
जावा फुल स्टॅक तुम्ही परीक्षण थोडक्यात पण छान लिहिले आहे 👍
काल हा चित्रपट पाहिला आणि केवळ प्रतिसादातून ह्या कलाकृतीवर मतप्रदर्शन करणे अवघड असल्याने ह्याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार करत आहे त्याबद्दल क्षमस्व!

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 11:15 am | चंद्रसूर्यकुमार

परीक्षण आवडले.

वामन देशमुख's picture

8 May 2023 - 12:23 pm | वामन देशमुख

ज्यांना गदारोळ करायचा असतो त्यांनी कशावरूनही गदारोळ केलाच असता, ३२ वरून नाहीतर ७२ वरून!

---

बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा" या ओळी आणि त्यामागची दाहकता मनातून जात नाहीय.

---

"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत" याचीच हा सिनेमा पाहून प्रचीती येतेय.

बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा" या ओळी आणि त्यामागची दाहकता मनातून जात नाहीय.

अगदी...अगदी...
काल हा चित्रपट पाहील्याला आता १५ तास उलटुन गेलेत पण ह्या गाण्याचा हँगओव्हर काही अजुन उतरत नहीये! ह्यावर कुठला उतारा घ्यावा अशा विचारात पडलोय 😀

शानबा५१२'s picture

8 May 2023 - 12:31 pm | शानबा५१२

मागे काही महीन्यांआगोदर मालवणचे 'ते' प्रसिध्द आमदार ह्या विषयाबाबत बोलत होते. तेव्हा त्यांनी उल्लेख केला की अशा 'कामा'साठी काही मुले पैसे घेतात. ब्राम्हण मुलीचे वेगळे पैसे, मराठा असेल तर वेगळे, गुजराती असेल तर वेगले असे पैसे दीले जातात. हे ऐकुन मला थक्क व्हायला झाले व खुप रागही आला.
असे करण्याचे कारण, उद्देश हा हींदु लोकसंख्या कमी करणे असतो. मुलगी कुठे काय करतेय ह्याकडे बारीक लक्श असणे फार गरजेचे आहे असे वाटते.

झालेल्या जन जागृतीमुळे ब्राम्हण आदि लोक काळजी घ्यायला लागले आहेत. आणि उगीचच त्रास नको म्हणुन या लव्ह-जिहाद वाल्या लोकांनी आपली स्ट्र्टेजी बदलली आहे.

हल्ली ते आंबेडकरी आणि तत्सम मुलींवर ( आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातल्या ) निशाणा साधतात. त्यांना जाळ्यात पकडणे त्या मानाने सोपे असते. परत थोडे बहुत मारहाण, त्रास दिलेले ही चालते कारण आसपास त्या तेच पहात असतात.
अजुन दहा वर्षात त्यांची संख्या बदलली असेल. मग हेही लोक जागे होतील

चौकस२१२'s picture

8 May 2023 - 12:55 pm | चौकस२१२

इसिस बरोबर लग्न

https://www.youtube.com/watch?v=Q_GIUbyyuRw

हे पहा
आणि आता काय येथे मजूर सरकार आल्यामुळे त्यांचे रिहदय पिळवटून निघाले आहे आणि या महिलांना परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे

also love how EVERY one of the brides has an excuse.
I was tricked.
I was on vacation.
I was trying to help.
I made a wrong turn.

स्वप्निल रेडकर's picture

8 May 2023 - 1:26 pm | स्वप्निल रेडकर

गेल्या ९ वर्षात महामानव मोदीजी आणि लोहपुरुष शाहजी ,सुपरस्पाय डोवाल जी यांच्या नेतृत्वाखालच्या बलशाली भारतामध्ये ३०००० मुलीच धर्मांतर किंवा देशाबाहेर अपहरण झालं आणि त्या जोडगोळीला ज्याचा पत्ता लागला नाही आणि याकिश्चित सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे या प्रकरणाची इत्यंभूत माहिती आहे हे म्हणजे हि वरची लोक अकार्यक्षम ठरलेत असा स्पष्ट आरोप होतोय आणि याचा तीव्र णिशेध अध्यक्ष महोदय !!इथे लोकांच्या फ्रिज मध्ये काय आहे हे अख्खा देशाला मीडिया वाले बोंबलून दाखवत असतात आणि एवढा मोठा प्रकार होऊन ९ वर्षांनी सिनेमा मधून सांगावं लागतंय . आणि ३ कि ३०००० याने काय फरक पडतो म्हणणार्यांना एकच प्रश्न आहे ,ज्याला सत्य दाखवायचं आहे तो जेव्हा खोटेपणाचा आधार घेतोय तेव्हा त्याच्या हेतूंबद्दल शंका घेतली जाणारच ,

NCRB report: Maharashtra in top three in crimes against women, Delhi most unsafe metro city
In the abetment to suicide of women cases, Maharashtra tops the list with 927 cases, followed by Madhya Pradesh (758) and West Bengal (456). August 30, 2022,
त्या ३ मुलीबद्दल कळवळा आहे हे स्वागतार्ह पण जेव्हा हिंदू नवरा किंवा पुरुषांकडून हिंदू महिलांचं शोषण ,फसवणूक,बलात्कार किंवा हत्या होते तेव्हा तो नॅशनल चिंतेचा विषय कसा नसतो तिथे ब्रिजभूषण ,सेनेगार सारख्या लोकावर आरोप झाले कि मात्र पुरावे कुठे आहेत?कोर्ट चौकशी करेल ,संविधान वगैरे सोयीस्कररीत्या आठवत !
मुस्लिम रिलेटेड काही आलं कि तिथे रेटून अजेन्डा ढकलायचा ,इस्लामिक राष्टफळांना ढिकाना !महाराष्ट्रात रेप चे आरोपी मंत्री आहेत मंत्री मंडळात आणि बार पीडित पण हिंदूच तिथे नाही पूजा चव्हाण स्टोरी ,हाथरस स्टोरी ,उन्नाव स्टोरी ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2023 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहाहा ! कसला उत्तुंग हानलाय बघा.

-दिलीप बिरुटे
( निशब्द)

स्वप्निल रेडकर's picture

8 May 2023 - 1:38 pm | स्वप्निल रेडकर

आणि एक बायोपिक drdo च्या कुरुळकरावर पण कधी येतो याची वाट बघायची...

आनन्दा's picture

9 May 2023 - 9:07 am | आनन्दा

हो, तो आलाच पाहिजे.
म्हणजे कोणापासून सावध राहायचे हे देखील सगळ्यांना कळेल.
गेला बाजार डॉक्युमेंटरी तरी.

वामन देशमुख's picture

8 May 2023 - 1:44 pm | वामन देशमुख

चला, चांगल्या सिनेमाचं, संयमित आणि चांगलं परीक्षण करणाऱ्या, चांगल्या धाग्याचं, काश्मीर केरळ होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणायचं!

सगळ्यांनी माना डोलवणे अपेक्षित आहे काय ? काय चुकीचे किंवा असंबंधीत लिहिले आहे तक्रार करायला ?

वामन देशमुख's picture

8 May 2023 - 2:02 pm | वामन देशमुख

कॉमीराव,

तसं नाही हो पण चर्चा -
हा सिनेमा बघण्यालायक आहे की नाही, सिनेमातल्या कोणत्या बाबी चांगल्या वाईट, दिग्दर्शन अभिनय कथानक संगीत या बाजू... अशी न होता वेगळाच अंगाने जात आहे म्हणून धाग्याचे काश्मीर केरळ असं म्हटलं.

श्रीगुरुजी's picture

8 May 2023 - 2:28 pm | श्रीगुरुजी

बरोबर. शेवटी मोदी-शहांना आणलंच आणि चित्रपट लांबच राहिला.

पुन्हा एकदा यशस्वीपणे धाग्याचा मूळ विषय कचऱ्यात फेकून अत्यंत चतुराईने धागा मोदी-शहांकडे वळविल्याबद्दल नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना त्रिवार मुजरा!

इथे आकडेवारीवर तावातावाने प्रतिसाद द्यायला वेळ आहे, मूळ फूस लावून आणि धाक वापरून हिंदूंचे धर्मातर होते हे मात्र या उदारमतवादी लोकांना दिसत नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही... दुर्दैव

काँग्रेस काळात सेन्सर सरकार विरुद्ध काही टीका करणारे केलं तर जी बंदी आणत होते ते दिवस ज्यांनी सहन केलेत त्यांनी आता हे हि दिवस गपगुमान सहन करावे
कुरतडत कुरतडत हे दोन अब्राहमीक धर्म हिंदूंचे दमन करणार ... आणि आपण असेच मारामाऱ्या करीत राहणार
इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा

इथेच आपल्यात फरक आहे. विदा आणि आकडेवारी शिवाय तोंड उघडण्यात माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. कारण जर anecdotes वरून जायचे असेल तर माझा निष्कर्ष खूप वेगळा येईल तुमच्यापेक्षा. द्या बघू तुम्ही आकडेवारी.

मूळ फूस लावून आणि धाक वापरून हिंदूंचे धर्मातर होते हे मात्र या उदारमतवादी लोकांना दिसत नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही... दुर्दैव

कुरतडत कुरतडत हे दोन अब्राहमीक धर्म हिंदूंचे दमन करणार ... आणि आपण असेच मारामाऱ्या करीत राहणार
इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा

ते धर्म नसुन पंथ (किवा जात ) आहेत. धर्माची शिकवण वेगळी असते आणि पंथाची वेगळी असते.

चला, खरया विदा कडे बघू. वर वामनजी विचारत होते म्हणून गुगल करून पाहिला आणि चटकन सापडला.

मिसिंग पर्सन रिपोर्ट २०२०. (होम पेज लिंक, pdf लिंक)
प्रकाशक - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो, भारत सरकार.

तक्त्यामध्ये किती लोकं बेपत्ता झाले आणि किती लोक सापडले ह्याची थेट आकडेवारी आणि किती लोक सापडले ह्याची टक्केवारी दिली आहे.

केरळमध्ये २०२० शेवटी बेपत्ता असणारे एकूण लोक - १६२४ (त्यातील केवळ ४७८ स्त्रिया आहेत.)

केरळचा बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा दर - एकूण ८५%, स्त्रियांसाठी ९४% - दोन्ही दर भारतामध्ये सर्वोच्च दर.
भारताचा सरासरी दर - ५०%.

म्हणजे केरळ हे हरवलेल्या लोकांना शोधण्यात भारतातले सर्वोत्कृष्ट राज्य आहे.
असे असताना सिनेमा बनवणाऱ्या माणसाने हे ३०००० ५०००० आकडे आणले कुठून ?

जर मुद्दामून सत्ताधारी पक्षाला न मिळवता येणाऱ्या राज्याला बदनाम करण्यासाठी वाट्टेल ते दावे करणारा सिनेमा बनवला जात असेल तर I am sorry, मी त्या दाव्यांना दुर्लक्षित करून नुसते दिग्दर्शन कसे आहे आणि संगीत कसे आहे ह्यावर चर्चा नाही करू शकत.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 3:22 pm | चंद्रसूर्यकुमार

तक्त्यामध्ये किती लोकं बेपत्ता झाले आणि किती लोक सापडले ह्याची थेट आकडेवारी आणि किती लोक सापडले ह्याची टक्केवारी दिली आहे.

या आकडेवारीचा नक्की रेलेव्हन्स काय? लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली वेगळ्या आणि बेपत्ता व्यक्ती वेगळ्या. नाही म्हणजे दोनमध्ये थोडासा ओव्हरलॅप असू शकेल म्हणजे लव्ह जिहादला बळी पडलेली मुलगीच बेपत्ता होणे अशाप्रकारचा (त्याचा आणखी लहान सबसेट म्हणजे लव्ह जिहादला बळी पडून अफगाणिस्तान/सिरीया किंवा अन्य कुठे गेलेल्या मुली). अन्यथा लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली बेपत्ता व्यक्तींमध्ये कुठे शोधायला गेलात? लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुली 'बघा मी कित्ती कित्ती उदारमतवादी. मी कि नै दुसर्‍या धर्मातील मुलाशी लग्न केले' असे म्हणत जन्मापासून ज्या घरी वाढली ते घर, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले ते आईवडील, त्यांचे संस्कार, त्यांचा धर्म कसा टाकाऊ, ते लोकं कित्ती कित्ती चांगले आणि तुम्ही कित्ती कित्ती वाईट असे तत्वज्ञान पाजळत समाजाताच राहत असतात. त्यांना बेपत्ता लोकांमध्ये कुठे शोधायला गेलात?

पण बेपत्ता असणे हा सुद्धा दावा आहे ना ? तो अड्रेस केलाय.

बर. तुमच्याकडे विदा असेल लव जिहाद ला बळी पडणाऱ्या मुलींबद्दल तर जरूर द्या. ते सोडा, लव जिहाद दूर. निव्वळ किती हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केले हा विदा असला तरी चालेल, त्यातल्या १००% केसेस लव जिहादच्या नाहीत हे खरेतर तुम्हाला पण मान्य असायला हवे, पण तरी, काय विंडो मध्ये खरा विदा असणार हे तरी समजेल.

सुबोध खरे's picture

9 May 2023 - 10:47 am | सुबोध खरे

YOU CAN PROVE ANYTHING AND EVERYTHING WITH STATISTICS

EXCEPT TRUTH.

बाकी वाममार्गी लव्ह जिहाद नाहीच हे सिद्ध करण्यात धन्यता मानतात

कॉमी's picture

9 May 2023 - 11:04 am | कॉमी

लॉल

एक था टायगर, दोन्ही पार्ट
फॅमिली मॅन, सर्व सीझन्स
१६ डिसेंबर चित्रपट
स्पेशल ops सर्व सीझन्स
इतर असंख्य चित्रपट, मालिका यामधे पाकिस्तानी लष्कर किंवा त्यांची गुप्तचर संघटना, किंवा अगदी आयासिसच्या नावाने कोणत्याही स्टोरीज, कारस्थाने दाखवली गेली. कितीतरी तरुणांना कट्टर बनवून भरती करणे, त्यांना वापरून भयंकर मिषन्स, अगदी देशातील मुख्य ठिकाणे, शहरे उडवून देणे, गॅस गळती करण्याचे कारस्थान, ओलीस ठेवलेल्या नर्सेस, ....,...., सर्व कथा मनोरंजन म्हणून लोकांनी बघितल्या.
त्यातही विशिष्ट धर्माकडे, संघटनांकडे स्पष्ट रोख होता.
हे काल्पनिक आहे किंवा तत्सम declare देखील केले होते.

Regardless of whether Kerala stories is a propaganda or not (which it very well can be, not even denying that possibility), कोणत्याही इतर तत्सम चित्रपटाच्या वेळी नेमके आकडे, सत्यता पुरावे अशी चर्चा का झडली नसावी? काश्मीर फाईल्स, केरळ यात मात्र झडते आहे. काश्मीर फाईल्स सुद्धा भारतातला अंतर्गत विषय असेल तर तो बाजूला ठेवता येईल. तूर्त केरळ बद्दल हा प्रश्न येतो.

या प्रश्नांत whataboutery उर्फ तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हा दोष आहे हे मान्य करतो.

एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले वेगळे, आणि ब्रॉड सांख्यिकी दावा वेगळा. खेरीज, जसे तुम्ही म्हणता, की त्या गोष्टी काल्पनिक म्हणूनच लिहिल्या आहेत.

आणि पिकिंग योर बॅटलस हे सुध्दा आले. उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे जोरात ओरडणे महत्वाचे.

एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले नव्हे. एक संघटना, आख्खी दिल्ली- वायुगळती , अणुबाँब. दुल्हन की बिदाई का वक्त बदलना है इ इ. नेमक्या किती लोकांना ठार करायचा बेत होता?

केरळ स्टोरी बाबत देखील काल्पनिक असे जाहीर केले आहे असे कुठेतरी वाचले आणि ते गृहितक धरून वरील प्रश्न होता. तसे नसेल तर बाद.
इन फॅक्ट फॅमिली man वगैरे तर चक्क inspired by true stories / events किंवा तत्सम दाखवत असे.

टर्मीनेटर's picture

8 May 2023 - 5:53 pm | टर्मीनेटर

उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे जोरात ओरडणे महत्वाचे.

Lol... चला वादासाठी आपण मान्य करू कि हा प्रोपगंडा चित्रपट आहे!
मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया जाणाऱ्या प्रोपगंडाला अशा 'काउंटर प्रोपगंडाने' दिले जाणारे उत्तर सहन होत नसल्याने ह्या खेळातल्या जुन्या खेळाडूंकडून चित्रपटावरील बंदीची मागणी, आकडेवारी वगैरे निरर्थक गोष्टींवरून वरून आरडा-ओरडा आणि रडारड चालू आहे असे मानण्यास काही वाव आहे का? 😂 😂 😂
अवांतरः बाकी चित्रपटच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईची आकडेवारी मात्र चांगली वाढत आहे हे कशाचे द्योतक असावे?

मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया जाणाऱ्या प्रोपगंडाला अशा 'काउंटर प्रोपगंडाने' दिले जाणारे उत्तर सहन होत नसल्याने ह्या खेळातल्या जुन्या खेळाडूंकडून चित्रपटावरील बंदीची मागणी

बंदी वैगरे आणावी असे मला आजिबात वाटत नाही. मी जनरली फ्री स्पीच समर्थक असतो. BBC डॉक्युमेंट्री, इतर सिनेमे यांवर बंदी आणली की गप्प बसणारे लोक वेगळे.

आकडेवारी वगैरे निरर्थक गोष्टींवरून वरून आरडा-ओरडा आणि रडारड चालू आहे

हाहाहाहा. आकडेवारी निरर्थक गोष्ट ? कोपरापासून नमस्कार.

अवांतरः बाकी चित्रपटच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईची आकडेवारी मात्र चांगली वाढत आहे हे कशाचे द्योतक असावे?

कशाचे द्योतक मानायचे ? पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ?

टर्मीनेटर's picture

8 May 2023 - 6:17 pm | टर्मीनेटर

आकडेवारी निरर्थक गोष्ट ? कोपरापासून नमस्कार.

विषय एका चित्रपटाचा असल्याने सिनेमॅटीक लिबर्टी विचारात घेतल्यास इथे आकडेवारी ही गोष्ट मलातरी निरर्थक वाटत असल्याने कोपरापासूनच्या नमस्काराचा आनंदाने स्विकार करतो 😀

पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे

मी पठाण पाहीला नसल्याने काही कल्पना नाही बुवा! आणि तुम्हीही द केरला स्टोरी पाहीला नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही, अन्य कोणाकडुन ते मिळाले तरी चालेल...

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 6:41 pm | चंद्रसूर्यकुमार

आकडेवारी ही नक्कीच निरर्थक गोष्ट नसते. मात्र आकडेवारी परिपूर्ण आहे का, लोकं दहशतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने झालेल्या गोष्टी रिपोर्ट करायला पुढे येत नाहीयेत अशी परिस्थिती नाही का, पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही अशी परिस्थिती आहे का वगैरे गोष्टी पण बघायला लागतात. तेव्हा हातात असलेली आकडेवारी विश्वासार्ह आणि परिपूर्ण आहे का हे तपासून बघायला नको? त्या गोष्टी बघायला गेले नाही तर मग पूर्ण दिशाभूल करणारी अनुमाने निघतात.

आता हेच बघा ना. आज केरळच्या उत्तरेकडील मलबार विभागात (तोच कासारगोड, मलापुरम, वायनाड वगैरे भाग) इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम संख्या कशी आणि कुठून आली? दोन वर्षांपूर्वी चिकमंगळूरला फिरायला गेलो होतो. तिथे आमच्या रिसॉर्टचा मालक सोडला तर जो बघावा तो मुसलमान होता. हे कुठून झाले? तर टिपू सुलतानने हिंदूंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली आणि सक्तीची धर्मांतरे त्या भागात केली. नेहमीप्रमाणे नंतरच्या काळातले हिंदू मुलखाचे बावळट निघाले आणि त्यांनी सक्तीने धर्मांतरीत झालेल्यांना परत हिंदू करून घेतले नाही. आज केरळमध्ये मलबार आणि कर्नाटकात चिकमंगळूर वगैरे भागात इतके मुस्लिम दिसतात ते तेव्हा धर्मांतरीत झालेल्यांचेच वंशज आहेत. पण टिपू सुलतानने नक्की किती लोकांच्या कत्तली आणि धर्मांतरे केली? याविषयी फार तर अंदाज उपलब्ध असतील. नक्की आकडा उपलब्ध असणे जवळपास अशक्य आहे. आता त्याने जे काही केले त्याचे परिणाम समोर दिसत असूनही केवळ आकडेवारी नाही म्हणून टिपू सुलतान कित्ती कित्ती चांगला होता (किमान वाईट नव्हता) असे अनुमान विचारवंत लोक काढतातच ना? की सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार न करता नुसते आकडेवारीवर विसंबून राहिले की दुसरे काय होणार? केवळ हातात उपलब्ध असलेल्या आकड्यांवरच अवलंबून राहून निष्कर्ष काढायला गेले तर माणसाचा रघुराम राजन होतो.

सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.
मुद्याचे बोललात १००%

आकडेवारी ही नक्कीच निरर्थक गोष्ट नसते. मात्र आकडेवारी परिपूर्ण आहे का, लोकं दहशतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने झालेल्या गोष्टी रिपोर्ट करायला पुढे येत नाहीयेत अशी परिस्थिती नाही का, पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही अशी परिस्थिती आहे का वगैरे गोष्टी पण बघायला लागतात.

नक्की मान्य आहे. पण असे म्हणायला सुध्दा पुरावा नको का ? का सिलेक्टिव्हली न आवडणाऱ्या किंवा आपले म्हणणे न रेटणाऱ्या आकडेवारीच्या वेळीसच आकडेवारी कशी विसंबाण्याजोगी गोष्ट नाही असे म्हणायचे?

आता हेच बघा ना. आज केरळच्या उत्तरेकडील मलबार विभागात (तोच कासारगोड, मलापुरम, वायनाड वगैरे भाग) इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम संख्या कशी आणि कुठून आली?

ह्याची कितीतरी करणे असू शकतात. कम ऑन. मायग्रेशन, आजवर आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवण्याक्षम झाले इती. लगेच हिंदूंना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावले असा कसा निष्कर्ष निघेल ?

टिपू सुलतानने नक्की किती लोकांच्या कत्तली आणि धर्मांतरे केली? याविषयी फार तर अंदाज उपलब्ध असतील. नक्की आकडा उपलब्ध असणे जवळपास अशक्य आहे

ऐतिहासिक बाबी आणि अध्याच्या बाबी ह्यांमध्ये बराच फरक नाही का ? ऐतिहासिक बाबींमध्ये आकडे मिळवणे अवघड असणार. बाकी, टिपू सुलतानने नक्की किती लोकांवर अन्याय केला हे माहीत नसले तरी बऱ्याच लोकांवर अन्याय केला हे जरूर माहिती आहे.

सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.

????? हे अतिशय वाईट strawman आहे बुवा तुमचे. अर्थातच वाईट आहे.

आकडेवारी वर न विसंबाण्याचे कारण असेल तरी जर आपण ब्रॉड सांख्यिकी दावे करणार असू तर बेस म्हणून तरी आकडेवारी हवीच.नाहीतर सगळे मनाचे खेळ.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 7:27 pm | चंद्रसूर्यकुमार

पण असे म्हणायला सुध्दा पुरावा नको का ? का सिलेक्टिव्हली न आवडणाऱ्या किंवा आपले म्हणणे न रेटणाऱ्या आकडेवारीच्या वेळीसच आकडेवारी कशी विसंबाण्याजोगी गोष्ट नाही असे म्हणायचे?

मग तो आकडा २१ आहे हे वर म्हटले आहेत ते नक्की कोणत्या आधारावर? २१ हा आकडा कुठून आला मला माहित नाही. पण तुमच्या इतर आकडेवारीला प्रचंड महत्व द्यायच्या आग्रहावरून वाटते की तो आकडा कुठेतरी कागदोपत्री असावा. त्यावरच अवलंबून राहावे हा आग्रह हा पण सिलेक्टिव्ह पणा झाला नाही का?१८ च्या वरील वयाच्या मुली लव्ह जिहादला बळी पडल्या तरी त्याची तक्रार पोलिस दाखल करून घेऊ शकणार नाहीत त्यामुळे कागदोपत्री खरा आकडा कळणे अशक्य आहे हे पण मान्य नाही का? तो आकडा ३२ हजार आहे की किती मलाही माहित नाही. म्हणूनच अगदी सुरवातीला- तो आकडा किती आहे असा दावा केला असता तर तो मान्य केला असता हा प्रश्न विचारला होता. तरीही २१ हाच आकडा आहे या आग्रहाला नक्की काय म्हणावे?

ह्याची कितीतरी करणे असू शकतात. कम ऑन. मायग्रेशन, आजवर आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवण्याक्षम झाले इती.

मायग्रेशन कुठून होणार? आजूबाजूच्या प्रदेशातून. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोक नव्हते पण एकदम मलबार आणि कर्नाटकच्या काही भागात आहेत याचे कारण मायग्रेशन? वा वा. आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवायला सक्षम झाले असतील तर नक्की कोणते उद्योग त्या भागात होते/आहेत?

लगेच हिंदूंना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावले असा कसा निष्कर्ष निघेल ?

हे असले प्रश्न डाव्यांना पडतात म्हणूनच त्यांना सरसकट हिंदूद्वेष्टेच म्हणावेसे वाटते. नुसता मलबारच नाही तर सध्याचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या मोठ्या प्रदेशात तो आकडा वाढला तो थायलंड, श्रीलंका वगैरे देशात बौध्द धर्मियांचा आकडा वाढला त्याप्रमाणे म्हणजे आध्यात्मिक प्रेरणेने वाढला असे म्हणायचे आहे की अरबस्तानातून मायग्रेशन झाले? केरळमध्ये टिप्याच्या आधी काही शतके एक राजाने स्वतःहून तसे धर्मांतर केले होते पण तो पूर्ण प्रदेशाचा विचार करता अपवाद होता.

ऐतिहासिक बाबींमध्ये आकडे मिळवणे अवघड असणार.

समजा टिपू सुलतानच्या वेळेस कोणी विचारवंत असते तरी समोर दिसत असलेल्या गोष्टी नाकारल्या असत्या आणि आज नक्की आकडे मिळणे शक्य नाही म्हणून त्याच लोकांचे वैचारीक वंशज टिपूला चांगला म्हणतात की काय समजत नाही.

चौकस२१२'s picture

9 May 2023 - 8:33 am | चौकस२१२

जगभर "वहाबी करण" कसे चालू आहे हे उदारमतवाद्यांन बघायचे असले तर मलेशिया च्या जवळील एक छोटा आणि प्रचंड श्रीमंत देश म्हणे "ब्रुनेई"
तो आधीच मुस्लिम आहे , पण त्याना जसे इंडोनेशिया ला धर्म जरी मुस्लिम असला तरी आपली सॅन्कृती काही अरब नाही / वर्नानें आपण अरब नाही याची पुरेपूर कल्पना आहे पण ब्रुनेई चा सुलतान जसा धार्मिक होऊ लागलला तसे त्याने काढलेली फर्मान प्रमाणे ठेवील पाट्या अरेबिक लिपी ( आणि बहुतेक भाष पण अरबी ) मध्ये आहेत ! काही मोजके लोक सोडणे तर ब्रुनेई मध्ये बहुतेक लोकांना अरबी येत नाही .. घाई हे उदाहरण,, तर जर अगादरच मुस्लिम असलेल्या देशाचे हे अंतर्गत वहाबीकरण होत आहे तर भारतासारख्या हिंदू देशाचे काय घेऊन बसलात

आग्या१९९०'s picture

8 May 2023 - 6:23 pm | आग्या१९९०

पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ?

बेशरम रंग लोकांना आवडला असेच म्हणावे लागेल.

पंतप्रधानांनीं काश्मीर फाईल आणि केरला स्टोरी ची स्तुती केली. OTT वरील अशा प्रकारच्या मालिकांवर त्यांनी कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. अर्थात नाही करत तेच बरे आहे.

अजिंक्यराव पाटील's picture

8 May 2023 - 6:45 pm | अजिंक्यराव पाटील

आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे हिंदूंना.
१. आपल्या मुळीच दूधखुळ्या आहेत का? आपले सो कॉल्ड संस्कार कमी पडत आहेत का?
२. भाजपभक्ती करताना आपण आपल्या घरातच लक्ष देत नाही आहोत का?
३. चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर आपले ५६ इंची सरकार काय करत आहे? आपण त्यांना निवडून देऊन चूक केली आहे का?
४. सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन?

सामान्यनागरिक's picture

10 May 2023 - 1:06 pm | सामान्यनागरिक

सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन?

१. मुस्लिमांचा राष्ट्रीय संपत्तीवर अधिकार पहिला असे म्हणणारे पंतप्रधान
२. त्यांना मिळणार सोयी सवलती.
३. वाटेल तिथे नमाझ पढणार, मजारी बांधणार, बेकायदेशीर मशीदी बांधणार

एवढे करुन परत दहशतवादी कृत्ये करणार आणि दहशत्वादाला धर्म नसतो हे म्हणणार !

पण तरीही दुजाभावाची ओरड करणार !

एकदा ईस्लाम काय आहे हे समजुन घ्या. कुठेही काफिर दिसला की त्याला मारुन टाका हे शिकवणारा धर्म आहे हा !

श्रीगुरुजी's picture

8 May 2023 - 6:49 pm | श्रीगुरुजी

तामिळनाडू पाठोपाठ बंगालमध्येही केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी जाहीर झाली आहे.

चित्रपट नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर राज्यांनी प्रतिबंध घालणे कायदेशीर आहे का?

श्रीगुरुजी's picture

8 May 2023 - 7:32 pm | श्रीगुरुजी

मुळात केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटावर प्रतिबंध आणण्यास नकार दिलाय. पण ही बाहेरची राज्येच प्रतिबंध आणताहेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 7:37 pm | चंद्रसूर्यकुमार

चित्रपट नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर राज्यांनी प्रतिबंध घालणे कायदेशीर आहे का?

तसे करता येत असावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भिती वाटून १९९२-९३ च्या दंगलींवरील बॉम्बे या चित्रपटाला १९९५ मध्ये मुंबईत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी (नाव विसरलो) एक आठवड्यासाठी दाखवायला बंदी आणली होती.

Nitin Palkar's picture

8 May 2023 - 8:09 pm | Nitin Palkar

अतिशय संयत परीक्षण, अजेंडा प्रतिसादकांचे अपेक्षित प्रतिसाद आणि त्यांना ठोकून काढणाऱ्यांचे रट्टे.
लगे राहो.
चित्रपट बघण्याची उत्सुकता मात्र नक्की वाढली.

स्वप्निल रेडकर's picture

8 May 2023 - 9:18 pm | स्वप्निल रेडकर

एक प्रयत्न करतो उत्तर केरळ किंवा आपण ज्याला मलबार रिजन म्हणतो तिथल्या मुस्लिम लोकसंख्येविषयी स्पष्टीकरण द्यायचा. केरळ हे साधारण साडेतीन कोटी लोकसंख्येचे तुलनेने छोटे राज्य आहे, परंतु त्यात मुस्लिमांचे प्रमाण (27%, बहुतेक सुन्नी) संपूर्ण भारतापेक्षा (14%) जास्त आहे; उत्तर मलबार जिल्ह्यातील अनेक गावे आणि शहरांमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत .याच मूळ दडलंय ते मसाल्याच्या व्यापारामध्ये .अगदी ७व्य ८ व्या शतकापासून अरब व्यापारी मलबार प्रांतात व्यापारासाठी येत होते आणि अनेक अरब व्यापारी केरळमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते या प्रदेशाच्या संस्कृतीचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनले.स्थानिक लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहार वाढले आणि बहुतांश लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला सुरुवात केली ,पूर्ण हिंदुस्थानात विशेषतः उत्तर हिंदुस्तानात जशी सक्तीची धर्मांतर झाली तशी सगळीकडे झाली असं नाही बरीच वेळेला लोकांनी सामाजिक विषमता किंवा आर्थिक परिस्थिती किंवा मुस्लिम धर्मातली तत्व आवडल्यामुळे इस्लाम स्वीकारला (जस आपण पौर्वात्य
देशातल्या नागरिकांनी हिंदू धर्म स्वीकारल्याची बातम्या ऐकून खुश होतो किंवा इस्कॉन मध्ये गोरे लोक बघून अभिमान वाटतो तसाच काही झालंही असेल )
तोपर्यंत इस्लाम बऱ्यापैकी एस्टॅब्लिश'झाला होता ,आणि त्यानंतर
१७६६ मध्ये मलबार वर हैदर अलीच्या नेतृत्वाखाली कुप्रसिद्ध आक्रमण झालं आणि त्यानंतर टिपूच्या सैन्याने हत्याकांड आणि धर्मांतर आणि जबरदस्ती ने हिंदू बायकांबरोवर लग्न लावून दिली . आणि हा इतिहास नाकारायचं काही कारण नाहीय .टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे,

आता येऊ आकडेवारीकडे .तर 1991-2001 या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या 15.8% वाढली जी 2001-2011 या कालावधीत 12.83% पर्यंत घसरली. केरळमधील ख्रिश्चन लोकसंख्या 1991-2001 या कालावधीत 7.7% दराने वाढली, तर 2001-2011 या कालावधीत त्यांची लोकसंख्या 1.38% च्या अल्प दराने वाढली.आणि मुस्लिम टक्का एवढा असून पण केरळ शिक्षण ,आरोग्यसेवा,कायदा सुव्यवस्था ,बालमृत्यू निवारण ,कुपोषण निवारण यात देशातल्या बर्याच राज्यांपेक्षा प्रगतिशील आहे
उच्च मानवी विकास निर्देशांक (0.79)
उच्च आयुर्मान (७४ वर्षे)
कमी दारिद्र्य दर (7.05%)
सुरक्षित पिण्याचे पाणी असलेल्या कुटुंबांची उच्च टक्केवारी (94%)
इष्टतम लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे 1084 महिला)
उच्च साक्षरता
अत्यंत कमी बालमृत्यू दर.
स्वच्छ राज्य
यात युपी सारखी बीजेपी शासित राज्य जवळपास देखील नाहीत .
सध्या आपल्याकडे रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीपेक्षा भीतीचा बागुलबोवा दाखून राजकारणी फायदा घेताहेतभ आणि लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत ,पुराण इतिहास म्हणून दाखवली जाताहेत आणि इतिहासाला वास्तुनिष्ठरित्या न बघता जिंगोईजम आणि ऐतिहासिक पात्रांचे दैवतीकरण चालय .आणि इतिहास अगदी अभ्यासपूर्ण इतिहास देखील व्यर्थ आहे जर तो मांडणाऱ्याचा हेतू कलुषित असेल आणि इथे तर सिनेमा आहे जो सत्य घटनेवर आधारित म्हणून ज्याचं प्रमोशन केलं गेलं\आणि मग कोर्टात फिक्शन आहे असं सांगावं लागलं कारण सत्यघटना म्हंटल्यावर पुरावे ,सोर्स द्यावे लागतात ते देऊ शकले नाहीत निर्माते .आणि आता प्रेक्षक ती सत्यघटना आहे असं बाकीच्यांना सांगताहेत हे सगळं थोर आहे .

कॉमी's picture

8 May 2023 - 9:22 pm | कॉमी

धन्यवाद.
फिरायला/कामानिमित्त गेल्यावर हॉटेल्स वैगरे मध्ये जास्त मुस्लिम दिसले ह्यावरून जबरदस्तीने धर्मांतर झाले असणार ह्या निष्कर्षावर काय बोलावे असे माझे झालेले, शब्दशः बोलती बंद झाली.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 10:18 pm | चंद्रसूर्यकुमार

शब्दशः बोलती बंद झाली.

काहीही वाईट झाले नाही. अगदी उत्तम झाले. तुमची अज्ञानमूलक गोष्टी पसरवणारी बोलती अशीच बंद झालेली असू दे.

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 10:17 pm | चंद्रसूर्यकुमार

याच मूळ दडलंय ते मसाल्याच्या व्यापारामध्ये .अगदी ७व्य ८ व्या शतकापासून अरब व्यापारी मलबार प्रांतात व्यापारासाठी येत होते आणि अनेक अरब व्यापारी केरळमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते या प्रदेशाच्या संस्कृतीचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनले.

बोंबला. कुठे शिकलात हो असले काही?

भारताकडे ब्रिटिश आणि इतर युरोपियन लोक आकर्षित झाले त्यामागे एक कारण भारतात होणारे मसाले हे एक होते असे मी तरी शाळेत असताना शिकलो आहे बुवा. मसाले काय फक्त केरळमध्ये होत होते का? मग इतर ठिकाणी ते अरब व्यापारी का नाही गेले? केरळविषयीच बोलायचे झाले तर ते व्यापारी फक्त मलबारमध्ये स्थायिक झाले बरं का. कोचीन आणि त्रावणकोरमध्ये नाही का? याची तर्कसंगती कशी लावायची?

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 10:48 pm | चंद्रसूर्यकुमार

अच्छा. तेच का ते मोपल्यांचे बंड वाले?

टिपूच्या अनेक शतके आधी एका राजाने स्वतःहून इस्लाम धर्म स्विकारला होता हे मी पण वरच्या एका प्रतिसादात लिहिले आहे. त्याच्या बरोबर सामान्य लोकांपैकी अनेकांनीही धर्मांतर केले असायची शक्यता आहेच. बादवे, दरवेळेस तुमचा आकड्यांवर भर असतो म्हणून विचारतो. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये केरळमध्ये साधारण २६% मुस्लिम आहेत ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे. त्यात विशेष काही नाही. पण त्या विकीपिडीयावरील लेखाचे शीर्षक आहे- मोपले. त्यावरून कोणाला वाटायचे की सगळे २६% मोपले आहेत. पण तसे नाही. त्याच लेखात दिले आहे की केरळी मुस्लिमांमध्ये मोपले किती आणि इतर किती याची वर्गवारी उपलब्ध नाही. मग सध्याचे लोक स्वयंप्रेरणेने धर्मांतर केलेल्यांचे वंशज आहेत (म्हणजेच टिपूने सक्तीच्या धर्मांतर केलेल्यांचे वंशज फार प्रमाणात नाहीत) हे म्हणण्यासाठी नक्की कोणती आकडेवारी उपलब्ध आहे?

तुम्हीच दिलेल्या त्या लेखात दिलेल्या टेबलवरून कळते की केरळमधील मुस्लिमांपैकी ६०% पेक्षा जास्त मलबारमध्ये आहेत (मलापुरम- ३२.५६%, कोईकोडे- १३.६५%, कन्नूर- ८.३७%, कासारगोड- ५.४९% आणि वायनाड- २.६४%). नेमका हाच भाग टिपूच्या टाचेखाली आला होता. तेव्हा सध्याचे लोक टिपूने सक्तीने केलेल्या धर्मांतरीत लोकांचे वंशज आहेत ही शक्यता जास्त नाही का?

रात्रीचे चांदणे's picture

8 May 2023 - 10:22 pm | रात्रीचे चांदणे

काहीच वर्षापूर्वी आपल्या देशाची मुस्लिम धर्मामुळे फाळणी झाली. देशातले एकमेव मुस्लिम बहुल राज्यातून हिंदूंना हाकलून देण्यात आले आजूनही तिथे हिंदूंना वेचून ठार केलं जातं. केरळमध्ये ही हिंदुपेक्षा 5 पटीने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. पण तरीही islamikrnacha धोका दिसत नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

8 May 2023 - 10:55 pm | चंद्रसूर्यकुमार

असा धोका न दिसणार्‍यांना विचारवंत म्हणतात.

चौकस२१२'s picture

9 May 2023 - 8:20 am | चौकस२१२

टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे,

१००० वर्षात झाले नाही पण कुरतडून कुरतडून धर्मांतर ( फक्त इस्लामी नाही कमी भेदक वाटणारे पण तेवधच धर्मांध ख्रिस्ती धर्मांतर ) होतंय आणि त्या यासाठी ही व्यस्थित कार्यक्रम आहे / असतो यावर विश्वास दिसत नाहीये,,,
बर हा "लबे रेस का घोडा " प्रकार चा दूरपल्याचाच कार्यक्रम आहे हे हि कळत नसावे )

प्रत्यक्ष धर्मांतर कर्णायाधी , ज्यांचे धर्मांतर करा यचे आहे ( हिंदू) त्यांना आधी बोथट करणे , मग त्यात शिक्षण, त्यांचायतील वाईट प्रथानचा वापर करून त्यांच्यात फूट पाडणे ..( हिंदूंना जातीवरून ) हि अनेक शस्त्रे असतात
बाकी "संघ हलकटपणा" वैगरे चालू द्या ... तो हि "लबे रेस का घोडा " आहे त्यामुळे हलकटपणा वैगरे बिरुदे लावून काय फरक पडणार नाही
लोकआता एवढे "त्याचू" राहिले नाहीत

श्रीगुरुजी's picture

9 May 2023 - 9:35 am | श्रीगुरुजी

टिपूच्या काळात तलवारीच्या धाकाने धर्मांतर होत होतं. आताच्या काळात तसे होणे बरेच अवघड आहे. म्हणून तर आर्थिक मदत, ओळख लपवून फशी पाडणे असे प्रकार सुरू झाले व ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोघेही या प्रकारातून टाळकी वाढवित आहेत. याविषयी लोकांना जागृत करणे हा हलकटपणा नसून ही जागृती करणाऱ्यांना हलकट म्हणणे हाच खरा हलकटपणा आहे. भारताचं वाटोळं झालं तरी चालेल पण आम्ही संघद्वेषाची पिचकारी टाकणारच.

लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत ,
हायला हे बरं आहे तुमचं " भाजप ची जरा जरी पाठराखण केली कि लगेच "डोळे मिटून पाठीमागे जयजयकार" आणि ६० वर्षे नेहरू डोक्यावर घेऊन जे काय केले ते काय?

लोकशाहीत दावे उजवे दोघांना हि अधिका र आहे ना रिंगणात उतरण्याचा.. ? का हेच मूळ मान्य नाही ?
असही असु शकत का हो? काही लोक जागे झाले असतील सुद्धा ? ६० वर्षे काँग्रेस एके काँग्रेस च्या राज्यात "जी काही" विचारसरणी राबवली गेली तिचायतील चुका कळल्या असतील आणि दुसरी विचारसरणी असू शकते ?
का सगळेच अंध भक्त याचा गठ्ठा घेऊन फिरताय लोकांना लावायला ?

सुबोध खरे's picture

10 May 2023 - 9:46 am | सुबोध खरे

पुरोगामी विचार सोडला आणि वस्तुस्थिती लक्षात घेतली तर

केरळ चे उत्तरेकडचे जिल्हे ( कासारगोड, मल्लापुरम, वायनाड कन्नूर, कोढीकोडे) हे लोकसंख्या वाढीत अग्रेसर असले तरी दरडोई उत्पन्न, सकल उत्पन्न, मानवाधिकार यात केरळच्या इतर जिल्ह्याच्या मानाने मागासलेले आहेत.

अर्थात योगायोगाने याच जिल्ह्यात मुसलमान लोकांची संख्या जास्त असल्याचे आढळते.

केरळच्या जिल्ह्यांची तुलना उत्तर प्रदेश किंवा बिहारशी करणे म्हणजे

आमची पपई तुमच्या हापूसच्या आंब्यापेक्षा जास्त गडद केशरी रंगाची आहे म्हणून स्वतः ची पाठ थोपटण्यासारखे आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 May 2023 - 9:29 am | चंद्रसूर्यकुमार

त्यातही आम्ही आरोग्यव्यवस्थेत कित्ती कित्ती क्रांती केली अशी स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे लोक कितपत विश्वासार्ह असतात हा प्रश्नच आहे. फिडेल कॅस्ट्रोने क्युबात अशीच आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती केली होती असे ढोल नेहमी पिटले जातात. मग त्याच्यावर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावावा लागला होता? क्युबात डॉक्टर नव्हते का? https://www.nbcnews.com/id/wbna16346039 . तीच गोष्ट खुद्द केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची. जर केरळमध्ये आरोग्यसेवा इतकी उत्तम असेल तर केरळचे मुख्यमंत्री स्वतः उपचार घ्यायला अमेरिकेला का गेले होते? https://www.thehindu.com/news/national/kerala/cm-leaves-for-treatment-in... आणि हो. कम्युनिस्टांना इतर वेळेस अमेरिकेच्या नावाने खडे फोडल्याशिवाय जेवण घशाखाली उतरत नाही पण उपचार घ्यायला मात्र त्याच अमेरिकेला गेलेले चालते का? अमेरिकेच्या जवळच फिडेल कॅस्ट्रोने आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती आणलेला तोच क्युबा देश आहे. मग तिथे का नाही त्यांना जावेसे वाटले?

असो.

काय पातळीवरची आधुनिक वैद्यकीय सोय उपलब्ध आहेत हा एक निकष झाला. सर्वसामान्य लोकांना सेवा परवडतात का हा सुध्दा महत्वाचा निकष आहे.

अमेरिकेत पैसे असतील तर जगातले सर्वोत्तम वैज्ञकिय उपचार मिळतात. पैसे नसतील तर मात्र खरे नाही.

कपिलमुनी's picture

8 May 2023 - 11:56 pm | कपिलमुनी

मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ??

>>>मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ??

लव्ह जिहाद मधला महत्वाचा आणि आक्षेपार्ह भाग "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे.. हा आहे.

मुख्तार अब्बास नक्वी किंवा शाहनवाजने असे नाव बदलून फसवाफसवी केल्याचे पुरावे आहेत का..?

असल्यास पुरावे द्या अन्यथा विधान बिनशर्त मागे घ्या.

सुबोध खरे's picture

9 May 2023 - 6:36 pm | सुबोध खरे

हे बघा

आपटार्ड लोकांना कोणताही कसलाही पुरावा देण्याची गरज नसते हे त्यांच्या युगपुरुष गुरु यांची शिकवण आहे.

मग भले युगपुरुष यांनी तीन वेळेस न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असली तरीही.

त्यांचं एकच पालुपद

मोदी यांनी काहीही केलं तरी ते चूकच असतं.

पुरावा कसला मागताय?

मोदक's picture

10 May 2023 - 7:59 am | मोदक

कपिलमुनी, पुरावे मिळाले का?

का हे तुमचे नेहमीप्रमाणे सुरू असलेले ट्रोलिंगच आहे.

२ प्रकारचे लव्ह जिहाद असतात हे तुम्हाला माहित नाही का ?
१) फसवून म्हणजे "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे
२) त्यातील त्यात सरळमार्गी! म्हणजे आपण मुस्लिम आहोत हे ना लपविता आपल्याला हिंदू मुलगी पटवता येतीय का बघणे आणि तिचे धर्मांतर करणे आणी या २) पद्धतीत धार्मिक संस्थेची होणारी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत ...

आता तुमच्या वीच।रसरणीला जर क्रमांक २ हे आजीबाबत आक्षेपार्ह वाटत नसेल तर काय बोलणार कपाळ .. कदाचित क्रमानं १ हे अस्तित्वातच नसेल असेहि म्हणणे असेल आपले ..

मूळ प्रश्न समजून घ्य्याचा नाही का? हिंदू शकत्यो इटारसानेच धर्मांतर करून आपलं धर्म वाढवण्याचं फंदात पडत नाहीत ( शक्यतो म्हणतंय ,, नाहीतर इस्कॉन चे घोडे पुढे कराल - आणि तसेही इस्कॉन येते स्वतःला हिंदू म्हणून घेत नाहीत हा वेगळा भाग ) त्यामुळे हिंदूंना बाकिच्यांनी आपले धर्मांतर केलेलं आवडत नाही ...
पण झापड लावयाचीच ठरवली असतील तर राहू तसेच...
सर्व तथाकथित उदारमतवाद्यांचा मुख प्रश्न आणि जळफळाट हा आहे की .. भारतातात हिंदूंवर झालेल्या अन्याय किंवा अत्याचाराचे असे उघड प्रदर्शन कसे करू देताय सरकार? काँग्रेस काळात असल काही खपवून घेतले जात नवहते दिवस चांगले होते,, अल्पसंख्यांकांनाच फक्त भावना असायच्या.. बहुसंख्याकच्या भावनांना कोण विचारतो.. गेले उडत .... हे बहुसंख्याक एकदम जागे कसे काय झाले...

श्री कॉमी, तुमचा ३२ हजार आकड्याला असलेला आक्षेप वरकरणी तरी योग्य दिसत आहे. अधिकृत विदा उपलब्ध नसल्याने मतांतरे अपेक्षित आहेत.
पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत काय? तुमचा त्याला पाठींबा आहे की विरोध आहे?
तलवारीच्या जोरावर जी भारतात धर्मांतरे गोवा आणि इतस्ततः झाली त्यांना न्याय मिळायला नको का?
---

जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ?

तलवारीच्या जोरावर>>>
न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?

जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ?

म्हणजे तुमचा केरळ स्टोरीचा मुद्दा मान्य आहे, फक्त तपशीलात मतभेद आहे.

न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?

त्या समुदायाने गुन्हा कबुल करवा, बिनशर्त माफी मागावी, नुकसान भरपाई द्यावी, त्यांची घरवापसी व्हावी.

श्रीगुरुजी's picture

9 May 2023 - 8:43 pm | श्रीगुरुजी

न्याय म्हणजे भविष्यात हे प्रकार होऊ नये यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा आणणे, धर्मप्रसारास कायदेशीर प्रतिबंध आणणे, धर्मप्रसारास भारतात येण्याऱ्या मिशनऱ्यांना प्रवेश परवाना न देणे इ.

चौकस२१२'s picture

10 May 2023 - 6:32 am | चौकस२१२

श्रीगुरुजी
सहमत .. आणि वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत ... सर्वधर्माना समान कायदा .. म्हणजे सर्व नागरिकांना समान कायदा कॉमन सिविल कोड

The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा…

https://www.marathi.hindusthanpost.com/social/thrissur-anagha-converted-...

मुविकाका प्रतिसादाचे शीर्षक वाचून त्यात तुमचे मध्यपूर्वेतले स्वानुभव लिहिले असावेत असे वाटले होते, पण त्यात लिंक दिलेली बघून भ्रमनिरास झाला 😀

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2023 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'द केरला ष्टोरी'च्या निमित्ताने 'धृव राठी'

-दिलीप बिरुटे