नारळी पाव

सुनील's picture
सुनील in पाककृती
4 May 2023 - 3:45 pm

दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे.

आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.

अत्यंत सोपी आणि झटपट होणारी हे आहे नारळी पावाची पाककृती -

साहित्य -

कोकोनट पावडर - १०० ग्रॅम्
अंडी - २
बटर - ४-५ चमचे
बेकींग पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार

वरील सर्व पदार्थ एकत्र करा. ओवन १८० डिग्रीवर गरम करून घ्या. ज्या भांड्यात बेक करणार त्या भांड्याला आतून बटरचा हलका हात फिरवून घ्या. मिश्रण भांड्यात ठेवून १८० तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या.

छायाचित्रे -

https://drive.google.com/drive/folders/1jn7GbXwpPvsYQ_amA34uOIjrv3onHq4u...

प्रतिक्रिया

मला वाटले याच्यात पदार्थ बांधणे (एकजीव करणे) साठी मैदा / कणिक /डाळीचे/ तादळाचे पीठ असेल पुढे करत वाचत गेले व मी अंडेही न खाणारी तर पदार्थ कसा बांधून करता येईल हा विचार चालू आहेआहे तर ईतरांनीही मदत करावी ही विनंती व छान ideas सुचवाव्यात. विनंती विशेष व आधीच आभार मानून ठेवते.

सुनील's picture

5 May 2023 - 8:25 am | सुनील

मला वाटते, अंडेदेखिल पदार्थ एकजीव करण्याचे काम करतो.

जर कर्बोदके कमी खाणे हा हेतू नसेल तर तुम्ही किंचित गव्हाचे पीठ वा रवा वापरू शकता. मैदा मात्र टाळा.

चांगली पाककृती,नारळाचा वापर आवडला.

सुनील's picture

6 May 2023 - 11:42 am | सुनील

धन्यवाद.