मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
15 Mar 2023 - 10:45 am

एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो. मनात विचार आला उपमा प्रमाणे भाजलेल्या मूगाच्या डाळीचे सूप ही पाच मिनिटांच्या आत निश्चित बनू शकते. मग काय. संध्याकाळी तीन -चार चमचे मुगाची डाळ कढईत मंद गॅस वर रंग बदले पर्यन्त भाजली. बहुतेक पाच मिनिटे लागली असतील. थंड झाल्या वर मिक्सर मध्ये डाळीचे पावडर करून घेतले. गॅस वर एका भांड्यात चार कप पाणी ठेवले. पानी थोडे गरम होताच, भाजलेल्या डाळीचे तीन चमचे पावडर पाण्यात ढवळले. गॅस वर सूप उकळू दिले. तो पर्यंत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. दोन मिनिटांत पाण्याला उकळी येताच गॅस मंद केला, त्यात स्वादानुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकले. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकली. दोन चमचे सूप आमच्या चिरंजीवाला स्वाद तपासायला दिले. त्याने आंगठा वर करून उत्तम स्वादाचे प्रमाणपत्र दिले. बाकी तो आठ-दहा वर्षांचा होता तेंव्हा पासून माझ्या पाकशास्त्राचे प्रयोग आधी त्याच्यावरच करतो. काही कमी जास्ती असेल तर तो सांगतो.
मुगाच्या डाळीचे सूप

सूप पिण्यासाठी तीन बाउल घेतले (एक माझ्यासाठी, एक सौ आणि एक चिरंजीव साठी). मला तूप आवडते म्हणून चहाच्या चमच्या एवढे तूप सूपात घातले. चित्रात तूप वर तरंगताना दिसत आहे. तूप घातल्याने चव वाढते असे माझे मत आहे. पण आमची सौ. त्यावर सहमत नाही. असो.
बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्‍याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे. बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे.

प्रतिक्रिया

वाह! काही बदल करुन हा पदार्थ लवकरच बनवण्यात येणार आहे, अर्थातच थोडा स्पाईसी... 👍

गवि's picture

15 Mar 2023 - 1:08 pm | गवि

छान दिसतेय.

कपिलमुनी's picture

15 Mar 2023 - 1:09 pm | कपिलमुनी

बाजारातील रेडी मिक्स पेक्षा असे सूप उत्तम !

कंजूस's picture

15 Mar 2023 - 8:04 pm | कंजूस

हा गुजराती प्रकार जुना आहे. आजाऱ्यासाठी मुगाचे कढण.

चांगला प्रकार दिसतोय, फोडणी महत्वाची ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- Varisu

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Mar 2023 - 8:05 am | राजेंद्र मेहेंदळे

छान दिस्तय की!! आजारी माणसाला शक्ती यायला आणि पचायला हलके वाटतेय.

धर्मराजमुटके's picture

16 Mar 2023 - 10:17 am | धर्मराजमुटके

हा लेख नक्की पटाईत साहेबांनीच लिहिला आहे का ? दिल्ली मराठी चा लहेजा असलेला एकही शब्द नाही त्यामुळे चुकल्यासारखे वाटले.

विवेकपटाईत's picture

18 Mar 2023 - 12:51 pm | विवेकपटाईत

आता निवृत झालो आहे. गेल्या वर्षी दासबोध वाचण्याचा उपक्रम केला. मराठी बर्‍या पैकी सुधरले आहे. शिवाय वेळ ही भरपूर आहे. बाकी हा फोटो माझ्या मोबाईलने काढलेला माझ्या घरातला आहे. भांडे घरी येऊन पाहून शक्तता.

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2023 - 8:36 pm | कर्नलतपस्वी

आमच्या कडे हुलग्याचं माडगं करतात.

बाकी सुप(इंग्रजीतले पेय) म्हणले की मसाले फोडणी सहसा नसते.

पण रेसिपी छान आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2023 - 5:24 pm | चौथा कोनाडा

नुकतंच उडीदाचं माडगं चाखलं ... पहिल्यांदाच चाखलं ... आवडलं, मस्त होतं

हुलग्याचं माडगं अजुन चाखलं नाही ... करायला पाहिजे !

टर्मीनेटर's picture

19 Mar 2023 - 11:24 am | टर्मीनेटर

आज बना दिया...
1

थोडे बदल केले.
मुगाची डाळ भाजताना त्यात १ लवंग घातली होती. तसेच फोडणी वरून न देता आधी तुपात जिरे, हिंग, हळद आणि बारीक कापलेली हिरवी मिरची घालून फोडणी बनवली, मग त्यात भाजून दळलेल्या डाळीच्या भुकटीत थोडे पाणी घालून त्याची घट्ट पेस्ट तयार करून तिच्याबरोबर थोडी आले-लसूण पेस्ट फोडणीत परतून घेतलयावर पाणी वाढवून थोडे पातळ करून मिश्रण चांगले उकळवून घेतले. अशाप्रकारे तयार झालेल्या सूप मध्ये थोडी कोथिंबीर आणि अमूल बटर घालून त्याचा आस्वाद घेतला. माझ्या कल्पनेपेक्षा जास्त चांगली चव आली होती 😀

अशाप्रकारे बनवलेल्या डाळीच्या भुकटी पासून इन्स्टंट (मूग) दाल फ्राय/दाल तडकाही बनवता येईल असे वाटत आहे, कधीतरी हा झटपट पदार्थही बनवून बघीन!

Bhakti's picture

23 Mar 2023 - 6:11 pm | Bhakti

वाह!
मुळ आणि ही पाकृ दोन्ही छान, नक्की बनवून चालणार.

विवेकपटाईत's picture

25 Mar 2023 - 8:30 am | विवेकपटाईत

मस्त.

विवेकपटाईत's picture

25 Mar 2023 - 8:31 am | विवेकपटाईत

मस्त.

वामन देशमुख's picture

19 Mar 2023 - 11:30 am | वामन देशमुख

इतके सगळेजण करून बघत आहेत म्हणजे काहीतरी खास आहेच या इन्स्टंट सुपात. मीही करून बघतो.

वामन देशमुख's picture

19 Mar 2023 - 11:32 am | वामन देशमुख

बाकी, इन्स्टंट सुपाची रेसिपी आवडली हे वेगळे सांगायला नको.

सूप म्हणून नव्हे तर पातळ वरण म्हणून.

भाताचे (तांदुळाचे) नुडल्स घरी केलेत का? नुडल्सचे पदार्थ नाही तर नुडल्सच.

king_of_net's picture

24 Mar 2023 - 3:42 pm | king_of_net

छान आहे!

A
मुग -बेसिल सूप,जरा घट्ट झालंय.बेसिल वापरलं की जरा फन्सी वाटत,पण खरंच एका तुळशीपत्राने चवच बदलते :)