घावन्/डोसा/आंबोळी

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in पाककृती
1 Mar 2023 - 12:36 pm

आमची प्रेरणा

मिपावरची खमंग चर्चा वाचुन म्हटले आपणही थालिपीठ करुन बघावे. पण आळशीपणा नडला. आणि "माकडाचे घर" गोष्टीप्रमाणे गॅस लावल्यावर एक एक गोष्टी बाजारात असल्याचा पत्ता लागला. मग अंगच्या आळशीपणाला जागुन दुसरेच काहितरी बनवले त्याची सोपी कृती-

घरी तांदुळ पिठी आणि बेसन्/ज्वारी पीठ होते. हेल्मेट घालुन कांदा जमेल तितका बारीक कापला. कोथिंबीरही सापडली तीपण बारीक चिरली. सगळे एकत्र केले.चवीपुरते मीठ/मिरची घातले .पाणी घालुन मिश्रण तव्यावर ओतले जाईल ईतपत पातळ केले. १०-१५ मिनीटे झाकुन ठेवले.
a

गॅसवर तवा चांगला तापल्यावर थोडे थोडे पीठ ओतुन बाजुने घरचेच लोणी सोडले, म्हणजे घावन्/आंबोळी नीट सुटेल.
b

c
३-४ घावन बनल्यावर ताटलीत टोमॅटो सॉस घेतला आणि हाणले. पुन्हा आळशीपणा. नाहीतर ओल्या नारळाच्या चटणीबरोबर अजुन छान लागले असते.
d

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

1 Mar 2023 - 1:45 pm | टर्मीनेटर

झटपट पाकृ 👍
चर्चा वाचून मी पण इंस्पायर झालोय पण मला मात्र अजिबात घाई नाही! वांगी आली आहेत, आता ती (चुलीवर/फाटींवर/कोळशावर) भाजायला बाहेर पडावे लागणार कारण गॅस/मायक्रोवेव्ह मध्ये भाजून ती चव येत नाही!
गविंनी सुचवलेले वांग्याचे थालीपीठ निगुतीने बनवून खावे म्हणतो 😀

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Mar 2023 - 2:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

कालचे वांग्याचे भरीत फ्रिजमध्ये आहे, चला सत्कारणी लावतो.

श्वेता व्यास's picture

1 Mar 2023 - 4:52 pm | श्वेता व्यास

वा, छानच दिसतेय आंबोळी!

Nitin Palkar's picture

1 Mar 2023 - 5:53 pm | Nitin Palkar

पाकृ आणि प्रचि दोन्ही सुंदर.

कर्नलतपस्वी's picture

1 Mar 2023 - 7:47 pm | कर्नलतपस्वी

तांदळाच्या पिठाचे धिरडे खायला घातले.
नुकतीच तारर्कर्ली भटकंतीचाआनंद घेतला.
खादंती साठी जातो पण यावेळेस निराश झालो.

कर्नलतपस्वी's picture

1 Mar 2023 - 7:48 pm | कर्नलतपस्वी

अंघोळिच्या ऐवजी अंबोळीच्या असे वाचावे.