भारताच्या तुलनेत

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
29 Dec 2022 - 9:03 pm
गाभा: 

मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?

मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

प्रतिक्रिया

अमेरिका वगैरे पाश्चात्य देशात शालेय शिक्षण फुकट असले, तरी विश्वविद्यालयीन शिक्षण महाग असते. आपण भारतीय मंडळी मुलांचे संपूर्ण शिक्षणच काय, त्यांची लग्ने लावून देणे, मुली-सुनांची बाळंतपणे, नातवंडांना सांभाळणे-शिकवणे हे सगळे ( आपली जबाबदारी समजून) करत असतो.
याउलट बहुतांश अमेरिकन वगैरे मुले अठराव्या वर्षी पालकांपासून फारकत घेतात. शालेय शिक्षण संपल्यावर फार कमी मुले पुढील उच्चशिक्षण घेतात.
माझ्या माहिती/अंदाजाप्रमाणे भारतीय सुशिक्षित तरुणांना परदेशात ज्या संधी मिळत आहेत, त्यामागे हे एक महत्वाचे कारण असावे. अमेरिकन लोक 'लकीर के फकीर', तर आपण भारतीय लोक 'जुगाडबाज' असतो, असे नेहमी अनुभवास येते.
याबद्दल माझा एक अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी माझ्या चित्रांच्या प्रदर्शनानिमित्त मला अमेरिकेत एक महिना वास्तव्य करायचे होते. मी प्रवासखर्च करेन, पण माझ्याकडे हॉटेलसाठी पैसे नाहीत हे मी स्पष्ट केल्यावर आयोजकांनी एका अमेरिकन कुटुंबात माझी वास्तव्याची सोय केली. हे कुटुंब म्हणजे मॅनी(नवरा) आणि जो(बायको) नामक सत्तरीतले एक जोडपे होते. भारतातून त्यांच्या घरी रात्री नऊला पोचल्यावर माझी (नंबराने उघडणारी) बॅग उघडेनाशी झाली. ते दोघे खूपच काळजीत पडले. यलो पेजेस मधून नंबर हुडकून मॅनीने 'लॉकस्मिथ' ची सकाळी नऊची अपॉइंटमेंट घेतली. ऑफिसात दोन तास उशीरा पोचण्याबद्दल कारवाई केली, आणि मला सकाळी साडे आठाला बॅग घेऊन जाऊया असे सांगितले.
'लॉकस्मिथची अपॉइंटमेंट' वगैरे ऐकून मला हसूच आले. त्यातून तो वीस का तीस डॉलर घेणार होता. मग बॅगचे जरा सूक्ष्म निरिक्षण करून मी त्यांना एकादा खिळा वगैरे काही आहे का विचारले. त्यांना याचे आश्चर्यच वाटले. खिळ्याने हा काय करणार बुवा ? असे भाव त्यांच्या चर्येवर दिसत होते. खिळा मिळाल्यावर जिथे बॅगचे कुलूप अडत होते, तो भाग खिळ्याने जरासा दाबताच कुलुप उघडले. हा सगळा प्रकार बघून ते दोघे स्तंभितच झाले. "आम्ही असा कधी विचारच करत नाही. कुलूप उघडत नसले तर 'लॉकस्मिथची अपॉइंटमेंट' हेच आम्हाला ठाऊक असते. तुला असे सुचले तरी कसे ???
मी मनात म्हटले, 'लकीर के फकीर' आणि 'जुगाडबाज' यात हाच तर फरक असतो.

माझ्या मुलाला अमेरिकेत फिजिओथेरॅपिस्टाची नोकरी लागल्यावर त्याने आपल्या कामाखेरीज कंपनीचे एकंदरित काम कसे चालते, कंपनीला नफा मुख्यतः कशातून होतो, विविध बाबतीत कंपनीची पॉलिसी काय असते, पेशंटांना दिली जाणारी सेवा, ती सेवा देणारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन आणि त्यातून कंपनीला होणारी मिळकत - यांचे नेमके काय गणित आहे वगैरे सगळे हळूहळू जाणून घेतले. त्याच्या बरोबरीचे थेरापिस्ट फक्त आपले दिलेले काम आटोपून पाचच्या ठोक्याला घरी जायचे. पुढे मुलाला वरच्या जागा मिळत जाऊन आता तो त्या सगळ्या अमेरिकन थेरापिस्टांचा बॉस झालेला आहे.
'लकीर के फकीर' असणे, आणि 'जुगाडबाज' असणे यातला हा फरक. असो.

तर्कवादी's picture

12 Jan 2023 - 11:35 am | तर्कवादी

चित्रगुप्तजी
बॅगेचा किस्सा आवडला.
पण मला वाटते की कदाचित ते सत्तरीतले जोडपे असल्याने त्यांची तशी मानसिकता असेल.
एखाद्या तरुणाने गुगल केले असते , युट्युब व्हिडिओ पाहिले असते असे मला वाटते. मी असे म्हणतो कारण अमेरिकेत वास्तव्यास असणारा माझा एक मराठी मित्र काही प्रमाणात सुतारकाम शिकला व तो ते करतो. मध्यंतरी त्याने कारचा एक पार्ट बदलला , तो ही बहुधा ब्रेकचा ( .. आता नक्की आठवत नाही मला) पण ब्रेकचा पार्ट बदलणे म्हणजे तशी जोखीमच की.. भारतात असताना त्याने असे काही केले नसते , तो कार सर्विस सेंटरला घेवून गेला असता.
किंबहूना DIY ची संकल्पना बहुधा अमेरिकनच किंवा पाश्चात्यच असावी. बाकी व्यक्ती तितक्या प्रकृती आणि एखादे काम स्वतः करावे किंवा कसे हे ठरवताना एकीकडे त्यातली जोखीम (बिघडले तर काय) , त्याबद्दल वाटणारा आत्मविश्वास , स्वतः ते करण्याची इच्छाशक्ती (करायला मजा येईल अशी मानसिकता) तर दुसरीकडे व्यावसायिक मदतीची उपलब्धता (सहज आणि चटकन कुणी येत असेल तर कशाला आपण उगाच मेहनत घ्या... आणि तेच दहा फोन करावे लागणार अस्तील तर त्यापेक्षा मीच काय ते प्रयत्न करुन बघतो असा विचार करेन) या सर्वांचा सारासार विचार.
तुमच्या मुलाच्या यशाबाबतही मी हेच म्हणेन की व्यक्ती तितक्या प्रकृती.. त्याने जसे व्यवसायाच्या अतिरिक्त बाबी जाणून घेतल्यात तसे प्रत्येक भारतीय सुद्धा करेलच असे नाही.

उपयोजक's picture

15 Jan 2023 - 4:33 pm | उपयोजक

Amazon , Apple , Google , Meta , NETFLIX हे निर्माण करणारे लकीर के फकीर???

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 9:44 am | चौकस२१२

उपयोजक
आपले हि बरोबर आहे
भारतात जुगाड हे एक "स्किल" असले तर पाश्चिमात्यांच्य्यात " शोध " आणि आंत्रप्रुनर हे स्किल आहे ... निकडी वर उपाय शोधणे आणि त्याचे रूपांतर व्यवसायात करणे हे पाश्चिमात्यानं चांगले जमते हे अनेक शोधातून कळेल .

अमेरिका वगैरे पाश्चात्य देशात शालेय शिक्षण फुकट असले, तरी विश्वविद्यालयीन शिक्षण महाग असते.
हे अममेरिकेत खरे असावे पण सर्व पाश्चिमात्य देशात असेच आहे असे नाही , येथे तर पूर्वी सर्व पदवी शिक्षण पण फुकट होते त्यानंतर त्याला शुल्क लावले गेले पण ते शुल्क हे सरकार तुम्हाला कर्ज म्हणून देते आणि जमेल तसे परत द्यायचे असते , आयकरात वाढवले जाते ....त्यामुळे लगेच पालकांना पैसे उभे करावे लागत नाहीत

बाकी आपण जे जुगाडबाज हे मांडले आहे ते तंतोतंत
नुकताच भारतात , इस्त्री / कपडे, ब्याग , मिक्सर ... सगळे दुरुस्त करून घेतले ते सुधाच एकाच उपनगरात सर्व दुरुस्तीवाले सापडले

@तर्कवादी: तो प्रसंग २००७ सालचा आहे. त्यावेळी गूगल, यूट्यूब वगैरे असतील पण मला तरी माहिती नव्हते. इंटरनेट सहज सुलभ, स्वस्त नसणार. माझ्या चित्रप्रदर्शनात एकाने विडियो शूटिंग केले आणि ते यूट्यूबवर टाकेन असे सांगितले, पण मला मुळात यूट्यूब म्हणजे काय हेच ठाऊक नव्हते. (आता येवढ्या वर्षांनंतर तो विडियो खरोखर आहे का हे बघितले पाहिजे)

बाकी DIY हा शब्दही कदाचित अस्तित्वात नसेल त्याकाळी, पन्नासच्या दशकात आमचे वडील सुतारकाम आणि इतर नाना खटपटी करत असायचे. माझ्या जन्मापूर्वी त्यांनी स्वतः गवंडीकाम करून घर बांधले होते, आणि मी लहान असताना घरात बिस्किटे वगैरे बनवण्यासाठी बेकरीत असते तशी भट्टी बनवली होती.
जंगलात हिंडून ते विविध वनस्पती आणून त्यापासून औषधे बनवायचे (आमचे औषधांचे दुकान होते) एकदा तर त्यांनी जंगलात पडलेले प्राण्याचे हाड घरी आणून त्याची भुकटी (बहुतेक कॅल्शियम साठी) बनवली होती.
माझे आजोबा (ते माझे वडील लहान असतानाच निवर्तले होते) ब्रिटिश काळात सर्जन होते पण त्यांना 'किमयेचा' नाद होता. पार्‍यापासून सोने बनवण्याचा प्रयत्न ते विविध प्रयोगातून करायचे, आणि काचेच्या एका विशिष्ट प्रकारच्या गोलकात बघून भूत-भविष्य दिसते असा त्यांचा विश्वास होता. मात्र तसे ते अगदी लहान मुलांनाच दिसते, म्हणून आमचे वडील आणि काका वगैरेंना ते बघायला लावायचे आणि काय दिसतेय ते सांग, असा लकडा लावायचे. आताच गुगलून बघता याबद्दल हे सापडले:
Crystal-gazing (also known as crystal-seeing, crystallism, crystallomancy, and spheromancy) is a method for seeing visions achieved through trance induction by means of gazing at a crystal. Traditionally, it has been seen as a form of divination or scrying, with visions of the future, something divine etc.
.
"THE CRYSTAL BALL" (1902) BY JOHN WILLIAM WATERHOUSE. IMAGE VIA WIKIPEDIA COMMONS

मी स्वतः पूर्वी जादूचे खेळ, लंबकाद्वारे भविष्यकथन वगैरे केलेले आहे. त्याविषयी २०११ साली 'एक वजनदार धागा' असा लेखही मिपावर लिहिला होता.
अमेरिकेत उत्तम लाकूड आणि अवजारे मिळत असल्याने तिथे मी सुतारकाम, चित्रांच्या चवकटी बनवणे वगैरे करत असतो. एकंदरित हे विक्षिप्तपण आणि जुगाडबाजी आमच्या घराण्यातच आहे म्हणायची.

तर्कवादी's picture

12 Jan 2023 - 4:46 pm | तर्कवादी

चित्रगुप्तजी धन्यवाद
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. २००७ साली गूगल, यूट्यूब प्रचलित नसल्याने सत्तरीतल्या तो जोडप्याने बॅग आपण स्वतःही दुरुस्त करु शकतो असा विचार केलाच नाही. पण त्याच वेळी कदाचित चाळीशीतल्या अमेरिकन व्यक्तीनेही प्रयत्न केला असता.
तुमच्या आजोबांच्या प्रयोगशीलतेबद्दल ऐकून मजा वाटली.
माझे वडील थोडंफार प्लंबिंग, इलेक्ट्रिकलचे काम , पंखे दुरुस्त करणे आणि इतर काही कामे स्वतः करायचे, अजूनही करतात. आमच्या घरचे वायरिंग आम्हीच केले होते (माझा भाऊ, वडील व मी) त्यावेळी मी सुद्धा ड्रिल मशिन चालवले. एखादे बोर्ड चुकून किंचित तिरपे लागले तरी आम्ही फारसा विचार केला नाही.. "काम चालायला हवं" ही मानसिकता होती. दिसण्याचं तितकंसं महत्व नव्हतं.
आठ वर्षापुर्वी मी माझ्या नव्याने रंगवलेल्या फ्लॅटमध्ये रहायला आलो आणि इथे मात्र ड्रिल चालवायची मी हिंमत केली नाही. चुकून छिद्र नीट पडलं नाही तर भिंत खराब होईल किंवा छिद्रे सरळ रेषेत न पडल्यास जी वस्तू बसवायची ती तिरपी बसेल म्हणून कधी ड्रिल मशिन हातात घेतलं नाही. इथे आपलं घर अगदी व्यवस्थितच दिसायला हवं , कुठेही काही बेढब असून चालणार नाही असा अप्रत्यक्ष दबाव असतो. तसेच इथे एक फोन केला की सोसायटीचा ईलेक्ट्रिशियन थोड्या वेळात हजर होतो आणि काम करुन देतो--सोसायटी पगार देत असल्याने या कामाचा मोबदला अव्वाच्या सव्वा मागत नाही (व्यक्तिगत कामांच्या दरांबाबतही कमिटीचे काहीसे नियंत्रण असते त्यामुळे) मग कोण कष्ट घेणार आणि प्रयोग करणार ना ?

त्याविषयी २०११ साली 'एक वजनदार धागा' असा लेखही मिपावर लिहिला होता.

दुवा दिलात त्याबद्दल आभार- लेख नक्की वाचेन.

एकंदरित हे विक्षिप्तपण आणि जुगाडबाजी आमच्या घराण्यातच आहे म्हणायची.

एकत्र कुटूंबामु़ळेही हे गुण पुढे संक्रमित होण्यास हातभार लागतो. अशी कामे व अशी प्रयोगशीलता ही खासकरुन पुरुषी स्वभावाची वैशिष्ट्य आहेत. मग वडील, काका, सख्खे चुलत भाऊ, त्यांचे ये-जा करणारे मित्र यापैकी कुणी प्रयोगशील असतील तर तो गुण हळूहळू पसरतो.शिवाय पुर्वी टीव्ही सारखी साधने नव्हती त्यामुळे वेळ व उर्जा खर्च करण्यासाठी अशा प्रयोगशीलतेची साथ असावी.

Trump's picture

13 Jan 2023 - 3:03 pm | Trump

अजुन काही गोष्टी
१. खाद्यपदार्थातील शरीरावर वाईट परीणाम करणार्या घटकमात्रांबद्दल (उदा. किटकनाशक) खात्रीलायक न सांगता येणे. सार्वजनिक खाद्यगृहात स्वच्छतेची वानवा, शरीराला घातक असणार्या रसायनांचा फळे पिकवण्यास वापर
२. डॉक्टराकडुन प्रतिजैविके (अ‍ॅंटीबायोटिक्स), स्टेरॉईडस (मराठी प्रतिशब्द?) यांचा अतिवापर. घाणेरड्या अक्षरात औषधाच्या चिठ्या लिहुन देणे.
३. माणसाच्या कौशल्यापेक्षा आई-बापाची माहिती मुलाखतीच विचारणे.
४. व्यक्तीपुजा - क्रिकेटमध्ये शतक केले की सीमाशुल्कात माफी मागणे, मंदीरे बांधणॅ

उपयोजक's picture

15 Jan 2023 - 4:24 pm | उपयोजक

विज्ञानात इतकी प्रगत असूनही हे प्रकार अमेरिकेत अनेक वर्षांपासून वारंवार का घडत आहेत? बालमानसशास्त्र , पालकनिती हे विषय अमेरिकेत इतके मागासलेले आहेत का? विद्यार्थ्याने केला शाळेत गोळीबार हे वाक्य वर्तमानपत्रात वाचलं की ८०% वेळा घटनेचा देश अमेरिकाच का असतो?

https://www.cbsnews.com/live-updates/richneck-elementary-school-shooting...

तर्कवादी's picture

15 Jan 2023 - 8:05 pm | तर्कवादी

अमेरिकेत होणारे गोळीबार हा महत्वाचा विषय अजून धाग्यात आला नव्हता.. आता बघू सदासर्वदा अमेरिकेचे गोडवे गाणारे या मुद्द्यावर काय म्हणतात ते.

साधारणतः इ.स. २००० च्या आसपास मी दिल्लीतील 'अमेरिकन स्कूल' मधे काही काळ कलाशिक्षकाचे काम केले होते. या शाळेत मुख्यतः अमेरिकन एम्बसीतल्या अमेरिकन डिप्लोम्याटांची मुले शिकत. (यात काही अमेरिकन सिटिझन झालेले भारतीय, ज्यांची भारतात डिप्लोम्याट म्हणून वॉशिंगटनातून नेमणूक झालेली होती, असे पण होते. त्याखेरीज अन्य एम्बस्यांमधे कार्यरत परदेशी लोकांची मुले पण प्रवेश घेऊ शकत होती. मात्र कोणत्याही भारतीय विद्यार्थांना त्यात प्रवेश नव्हता) त्यावेळची काही निरिक्षणे:

१. भारतातील कोणत्याही शाळेत अपेक्षित असणारी 'शिस्त' नावाची गोष्ट इथे अजिबात नव्हती. वर्ग सुरु असताना मुले या वर्गातून त्या वर्गात जात, बूट घालून टेबलांवरून चालत जाणे, बॅगांमधून काढून लांबच लांब गोडाच्या लिबलिबित दांड्या (त्यांना काय म्हणतात ते मला माहीत नाही) हातात उंच लटकवत चाटत- खात बसणे, या वर्गातल्या मुलीजवळ दुसर्‍या वर्गातील मुलगा येऊन तिला खेटून बसणे वा भारतीय विद्यार्थी कल्पनाही करणार नाहीत असे वर्तन करणे, वर्गात मोठ्याने रेडियो वाजवणे वगैरे खुशाल करायची.

२. शिक्षकांना टॉम, डिक, सूझी वगैरे नावाने संबोधणे. शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त होईल अशा कोणत्याही वर्तनाचा अभाव. शाळेच्या डायरक्टराने लेखी फतवा काढला होता की विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मिस्टर अँडरसन, मिस सूझी वगैरे संबोधिले पाहिजे, त्याचाही फारसा परिणाम झालेला नव्हता.

३. त्यांना हवे तेच आणि तसेच ते करणार. शिक्षकाने काहीही बोलायचे नाही. याचे उदाहरण म्हणजे पेंटिंगसाठी असलेले विविध प्रकारचे ब्रश दाखवून मी त्याबद्दल माहिती सांगितली, जसे चपटा आणि गोल ब्रश, मऊ वा कडक केसांचे ब्रश इत्यादि कसे वापरावेत वगैरे. त्यानंतर एक 'गोरा' मुलगा विचित्र प्रकारे ब्रश वापरत असलेला बघून मी त्याला हा चपटा ब्रश अश्या रितीनी चालवावा असे सांगितल्यावर त्याने "No. I want it this way" असे म्हणून माझ्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केले. (भारतीय शाळेत शिकवण्याचा माझा अनुभव याच्या अगदी याउलट असल्याने मी चाटच पडलो).

४. वर्गातल्या कुणा मुलाचा वाढदिवस असल्याने बरेच पिझे मागवून मुले खात होती परंतु त्यातल्या एकानेही मला खाण्याबद्दल विचारलेही नाही.

५. शाळेतील विविध इयत्तांसाठी चित्रकलेचा अभ्यासक्रम खूपच विचारपूर्वक आखलेला होता, आणि त्यात पायरी पायरीने कसे शिकवायचे हे स्पष्ट केलेले होते. याची छापील प्रत मला देण्यात आलेली होती आणि कोणत्या वारी काय शिकवायचे वगैरे सगळे अगदी व्यवस्थित ठरवलेले होते. ही बाब मला खूपच महत्वाची वाटली.
(भारतीय शाळेत असले काहीही नव्हते---- अमूक एका कला-शिक्षकाची नेमणूक एकदा केली, की तो काय शिकवतो वा शिकवले पाहिजे याचे कुणाला देणेघेणे नव्हते... आणि हे फरिदाबादमधील सर्वोत्कृष्ट शाळेविषयी आहे)

६. आठवड्यातील काही तास जगातील श्रेष्ठ चित्रकारांची मोठमोठी छापील चित्रे मुलांना दाखवायची, त्यांचे मर्म उलगडून सांगायचे, मग चित्रांच्या मागे छापलेले प्रश्न त्यांना विचारायचे, त्यांची उत्तरे त्यांनी लिहायची, तसेच समोर ते चित्र ठेऊन त्याची नक्कल मुलांनी वर्गात बसून करायची. हा प्रकार मला फारच आवडला. (भारतीय शाळेत असले काहीही नव्हते)

७. एक दिवस 'सेल्फ पोर्ट्रेट' साठी असायचा. प्रत्येक विद्यार्थ्याला एकेक आरसा देऊन त्यात बघत त्यांनी आपापले चित्र काढायचे असे. यात बहुतांश चित्रे ओबडधोबड, वेडीवाकडी असली तरी त्यात त्या त्या मुलाचे काहीतरी वैशिष्ट्य दिसून यायचे, ही माझ्यासाठी खूपच आश्चर्याची गोष्ट होती. (भारतीय शाळेत असे काहीही नव्हते)
८. त्या वर्षाचे शेवटल्या दिवशी बक्षिस समारंभ होता. त्यात अभ्यासात आणि इतर सर्व बाबतीत (उदा. खेळ, चित्रकला, वक्तृत्व, संगीत इत्यादि) अश्वेत - म्हणजे कोरियन, जपानी, भारतीय (अर्थातच डिप्लोम्याटांची मुले) विद्यार्थ्यांना एकूण एक पारितोषिके मिळाली, आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून खास पारितोषिक मिळवणारी सातवी की आठवीतली विद्यार्थिनी वैद्यनाथन का सुब्रमण्यम कोणीतरी यंडूगुंडू होती. यात 'गोर्‍या' मुलाला एकही बक्षिस मिळाले नाही याचे मला खूपच आश्चर्य वाटले होते.
(वरती लिहीलेले क्र. १ ते ४ मुद्दे 'गोर्‍या' आणि 'काळ्या' अमेरिकन विद्यार्थ्यांना लागू पडत होते)

९. माझ्या वर्गात मल्होत्रा की अरोरा कोणीतरी एक पंजाबी मुलगा होता. शेवटल्या दिवशी त्याने मला लिफाफ्यात घालून एक चिठ्ठी दिली. त्यात त्याने लिहीले होते की मी जो काही काळ शिकवत होतो, त्या आधीच्या काळात त्याला चित्रकलेविषयी कधीही प्रेम वाटले नव्हते, पण माझ्यामुळे त्याला आता चित्रकलेची गोडी लागलेली होती आणि भविष्यात त्याने चित्रकलेची साधना करण्याचे ठरवले होते. माझ्याविषयी त्याच्या मनात खूप आदर निर्माण झालेला असून त्याने त्याबद्दल माझे आभार मानले होते.
हे सगळे वाचून मला खूप समाधान वाटले आणि तिथल्या एकंदरित वातावरणामुळे मनाला आलेले औदासिन्य दूर झाले.
असो. हा सगळा अनुभव या धाग्याच्या विषयाशी कितपत संबंधित आहे हे ठाऊक नाही, तरी मला आज अचानक हे सगळे आठवले म्हणून लिहीले असे.

साहना's picture

18 Jan 2023 - 2:02 am | साहना

खरेतर खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे. ह्यातून खरेतर भारतीय समाज आणि अमेरिकन समाज ह्यांची घडी वेगळी का आहे आणि कशी आहे हे साफ दिसून येते.

भारतीय शिक्षण व्यवस्था (आणि इतर सर्व व्यवस्था) ह्यांत व्यक्ती स्वातंत्र्याला शेवटचे स्थान आहे. त्यामुळे शाळेंत सर्व मुलांनी एकसारखे दिसावे, वागावे, शिकावे अशी अपेक्षा असते. शिस्तीच्या नावाखाली प्रसंगी शिक्षा देऊन मग मुलांना एकाच साच्यांत घातले जाते. ह्यांत चुकीचे काहीच नाही अनेक ठिकाणी मुले इतक्या निकृष्ट वातावरणातून येतात कि शाळेला त्यांना माणसांत आणावे लागते. अमेरिकेत (काही ठिकाणी) कृष्णवर्णीय विद्यार्थाना कपडे कसे घालावेत ह्याचे सुद्धा भान नसते. ढुंगणाच्या खाली पॅन्ट हा प्रकार काहींच्या मध्ये लोक प्रिय आहे. एखादा कृष्णवर्णीय मुलगा मग व्यवस्थित कपडे घालायला लागला तर मग इतर काळे त्याची थट्टा करतात त्याला नारळ म्हणतात (बाहेरून काळा पण आतून गोरा ह्या अर्थी). मग अनेक मुले ह्या वातावरणात इतर खराब काळ्या मुलांप्रमाणे वागायला लागतात, मग शिक्षण काहीही असेल तरी ह्यांना नोकरी मिळायला अवघड जाते कारण कपडे कसे घालावेत हे सुद्धा त्यांना समजत नाही. नोकरी मागण्यासाठी लाल स्पोर्ट्स शूज खाली उतरत असलेली ढगळ पॅन्ट आणि भडक रंगाची स्पोर्ट्स जर्सी घालून गेलात तर नोकरी कोण देईल ? त्यामुळे काही शाळांनी युनिफॉर्म वगैरे संकल्पना आणून ह्यांना माणसांत आणले.

हीच पद्धती भारतांत शालेय सिस्टम मध्ये आहे. विविध भागातील मुले हि फारच मागासलेल्या परिवारातून येतात, अनेक ठिकाणी आईवडील अशिक्षित त्यामुळे चार चौघांत वागावे कसे ह्याचे सुद्धा योग्य संस्कार होत नाहीत त्यामुळे हि जबाबदारी शिक्षकावर येऊन पडते. एके काळी शिक्षक सुद्धा चांगले असायचे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे एक आपसूक नाते निर्माण होत असे. ह्यामुळे असंख्य भारतीय विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आणि एके काळी अमेरिकन समाजांत सुद्धा हीच पद्धती असल्याने अनेक लोकांचा फायदा झाला. आता सुद्धा कॅथॉलिक शाळेंत आणि काही परंपरा प्रेमी शाळांत प्रचंड शिस्त आहे. सेंट ऑफ वूमन मधील हा सिन पहा : https://www.youtube.com/watch?v=Jd10x8LiuBc

पण समाजांतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक शिक्षकांपेक्षा जास्त श्रीमंत आणि अनेक दृष्टीने जास्त सुसंस्कृत होतात तेंव्हा हीच तथाकथित शिस्त विद्यार्थ्यांसाठी घातक ठरते. हल्लीच आमच्या कुटुंबातील एक लहान मुलगी सांगत होती कि तिच्या शिक्षिकेने तिला "ज्योतिबा फुले हि एक थोर महिला होती" असे सांगितले. विद्यार्थिनीने तिला ते चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला असता विनाकारण आऊट ऑफ टर्न बोलते म्हणून शिक्षा केली. विद्यार्थिनीच्या आईने मिटिंग घेतली तेंव्हा ज्योतिबा हे पुरुष होते हे ऐकून शिक्षिकेला आश्चर्य वाटले. तिने "स्त्री सुधाकर" ह्याचा अर्थ सुधारक जी स्त्री आहे असा घेतला होता. त्याशिवाय "बा" म्हणजे "कस्तुरबा", 'हिरबा' प्रमाणे लिंग वाचक "बा" आहे असा घेतला होता. अश्या शिक्षिकेला आदर देऊन मुलांचे हित साध्य होण्याची शक्यता कमीच आहे.

अमेरिकेतील शिक्षण व्यवस्थेतील व्यक्तिगत स्वातंत्र्य जास्त वाटले आणि अनेक ठिकाणी त्याचा विपर्यस्त होत आहे असे वाटले तरी त्यातून ज्यांना आवड आहे त्याच व्यक्ती पुढे शिकायला जातात. ज्यांना आवड आहेत ती मंडळी इतर सर्व काही विसरून त्या एकाच विषयाच्या मागे लागू शकतात आणि विनाकारण शिस्त आणि "everyone should be equally mediocre" न्यायाने त्यांना मागे ओढून धरले जात नाही. अनेकदा संपूर्ण क्लास मधील एकच विद्यार्थी असा असतो जो शिक्षकाचे शिकवणे सार्थक करतो. तो विद्यार्थी मग कदाचित मोठा बिसिनेस सुरु करेल आणि इतर बेशिस्त विद्यार्थी इथे खर्डेघाशी करतील.

अमेरिकेतील डावी मंडळी आता इथे सुद्धा घाण करत आहेत. काळ्या मुलांना समजत नाही म्हणून शाळेतून गणित हाच विषय काढून टाकावा असा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे गोरी आणि आशियाई मुलांचे जाणून बुजून नुकसान करायचे. त्याच प्रमाणे शाळेंत ड्रेस कोड म्हणजे सुद्धा "racism" म्हणून वाट्टेल ते कपडे घालून यायचे नियम सुद्धा येथील दावे लोक आणायचा प्रयत्न करत आहेत.

व तेथील शिक्षकांचा व्यासंग!अमेरीकन शैक्षणिक व्यवस्था व वर्गातील वातावरण यांची झलक कळली. खरंच तेथील भारतीय पालकांना पालकत्व निभावणे किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज येत आहे.

... व तेथील शिक्षकांचा व्यासंग!अमेरीकन शैक्षणिक व्यवस्था व वर्गातील वातावरण यांची झलक कळली. खरंच तेथील भारतीय पालकांना पालकत्व निभावणे किती आव्हानात्मक आहे याचा अंदाज येत आहे.

अमेरिकन शाळेविषयी माझा जो अनुभव इथे लिहीला आहे, त्याविषयी दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेतः
१. ही शाळा फक्त डिप्लोमॅट लोकांच्या मुलांसाठी असल्यामुळे त्या मुलांना खात्री असणार की आपले कोणी काहीही बिघडवू शकत नाही. (अर्थात गोर्‍या आणि काळ्या 'अमेरिकन' मुलांच्या अभ्यास आणि अन्य विषयातील कामगिरीबद्दल लिहीलेच आहे)
२. दुसरे म्हणजे तिथली मूळची अमेरिकन कला-शिक्षिका दीर्घ सुट्टीवर अमेरिकेत गेली होती, तेवढा काळच मी तिथे काम केले होते. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या (गोर्‍या आणि काळ्या 'अमेरिकन') मुलांनी मुद्दाम माझी फजिती करावी म्हणून विविध प्रयत्न केले असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

माझ्या अंदाजाप्रमाणे युरो-अमेरिकन शिक्षणक्रम्/व्यवस्था उत्तम असावी, परंतु विद्यार्थ्यांची उदासीनता, चुकीच्या सवयी, जन्मापासून मिळणारे अतिस्वातंत्र्य (कारण जन्मापासूनच मुले सर्व सुखसोयी, खेळणी, टीव्ही वगैरे असलेल्या त्यांच्या वेगळ्या स्वतंत्र खोलीत रहातात, जिथे आई-वडील सुद्धा 'नॉक' करून आत जातात वगैरे) तिकडल्या मुलांना हल्ली आजोबा-आजींचा सहवास तर सोडाच, बरेच जणांचे आई-बाप सुद्धा विभक्त झालेले असल्याने त्यांचाही धड सहवास मिळत नसतो. त्याचाही मुलांवर प्रतिकूल परिणाम झालेला असतो.

फुकट असलेल्या शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षण फार कमी मुले घेतात (विशेषतः अमेरिकेत) याचे माझ्यामते मुख्य कारण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण महाग असते, आणि बहुतांश पालक (मुळात दोघे अद्याप एकत्र रहात असले तर) तो खर्च करायला तयार नसतात. मुलेही वेगळी राहू लागलेली असल्याने काहीतरी काम करून स्वतंत्र मिळकत करत शिक्षण घेणे सगळ्यांनाच जमत नसते.
... याउलट भारतीय पालक मुलांची शिक्षणे, त्यांची लग्ने लावून देणे, मुली-सुनांची बाळंतपणे, नातवंडांना सांभळणे, गरजेच्या वेळी मुलांना आर्थिक सहाय्य करणे, परदेशात शिक्षणासाठी मुलांना पाठवताना आपले घर गहाण ठेऊन मोठे कर्ज डोक्यावर घेणे, वगैरे सगळे (इथे विविध प्रतिसादात प्रतिपादिलेल्या भयंकर, घाणेरड्या परिस्थितीत राहूनही) करत असल्याने मधे खंड न पडता निश्चिंततेने मुलांचे सगळे शिक्षण पार पडत असते. ( वर लिहीलेले सगळे आम्ही स्वतः केलेले आहे, आणि बहुसंख्य भारतीय करतच असतात, त्यात विशेष वेगळे असे काही नाही) असो.

खुद्द अमेरिकेतील (आणि फ्रान्स मधील) शाळांमधे काय परिस्थिती असते, या विषयी माहिती माझ्या मुलांना विचारून मी सांगू शकतो. ज्यांना याबद्दल कुतूहल असेल, त्यांनी आपापले प्रश्न इथे विचारावेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित उत्तरे देता येतील.

सौंदाळा's picture

19 Jan 2023 - 10:52 am | सौंदाळा

काका तुमचे सर्वच प्रतिसाद आवडले.
कृपया फ्रान्समधील शाळांबद्दल सुद्धा अशीच माहिती वाचायला आवडेल. अमेरिकेत बरेच नातेवाईक, मित्रमंडळी असल्यामुळे ही माहिती बर्‍यापैकी होती पण फ्रान्सबद्दल मात्र कुतुहल आहे.

श्वेता२४'s picture

19 Jan 2023 - 11:50 am | श्वेता२४

तुमच्या विस्तृृत प्रतिसादामुळे बरीच माहिती कळली.
खुद्द अमेरिकेतील (आणि फ्रान्स मधील) शाळांमधे काय परिस्थिती असते, या विषयी माहिती माझ्या मुलांना विचारून मी सांगू शकतो. ज्यांना याबद्दल कुतूहल असेल, त्यांनी आपापले प्रश्न इथे विचारावेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित उत्तरे देता येतील.
हो मला उत्सुकता आहे याबद्दल. भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का?
अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का? हे चांगले आहे की वाईट?
माझ्या मावसबहिणीला तीच्या २ मुलांसह काही काळ अमेरीकेत राहावे लागले. मुले थोडी मोठी (३-4थीची)झाल्यावर तीने भारतातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला कारण तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती. तीच्या मुलांना इथे काही वर्ष जड गेले कारण तीकडे त्यांचे शिक्षण कमी झाले होते असे तीचे म्हणणे. याबद्दलही समजले तर बरे होईल.
धन्यवाद

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2023 - 2:33 pm | श्रीगुरुजी

भारतात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व अमेरीकेत काम मिळवणे (जॉब) जास्त संघर्षाचे आहे? की अमेरीकेतील/परदेशी भारतीयांच्या मुलांना तीथेच शिक्षण घेऊन जास्त चांगल्या प्रतीचा जॉब मिळतो/संधी जास्त आहेत का?

अमेरिकेतील मुलांना तेथेच शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळविणे जास्त सोपे आहे.

अमेरीकेतील/परदेशातील शिक्षण घेत असताना किंवा एकंदरीतच समाजव्यवस्थेत मिळणारी अतीमोकळीक तेथील विद्याथ्यांमध्ये अधीक ात्मविश्वास निर्माण करते का?

होय.

तीचेे म्हणणे होते अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे. इथल्या पहिलीच्या मुलाला जेवढे येते तीथे तीसरी्च्या मुलालाही येत नाही . तेथील अभ्यासक्रम सोपा आहे. विशेषत: गणित विषयाबाबत ती जास्त चिंतेत होती.

निदान गणिताच्या बाबतीत तरी हे खरे नाही. माझे काही विद्यार्थी भारतातून ९ वीत असतानाच ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत ९ वी च्या अभ्यासक्रमातच Trigonometry, Calculus असे विषय होते जे भारतात ११ वी/१२ वीत असतात. साहजिकच आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ब्राझीलची माहिती असले, नायजेरियातील पिके असले निरूपयोगी विषय त्यांच्या अभ्यासक्रमात फारसे नसतात. त्यामुळे फालतू सनावळ्या, ब्रिटन व फ्रान्समधील सप्तवार्षिक युद्ध (हा प्रकार भारतीय विद्यार्थ्यांनी का शिकायचा हे मला आजतागायत समजले नाही), पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीवर लादलेल्या तहाच्या अटी (हे सुद्धा भारतीय मुलांना का शिकवितात हे समजत नाही), नायजेरियातील पिके, तीन-चार भाषा असला निरर्थक, निरूपयोगी प्रकार शिकण्यात मुलांचा बहुमूल्य वेळ वाया जात नाही.

अमेरिकेन मुले तोंडी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इ. प्रकारात दुर्बल आहेत हे नक्की. परंतु भारतातील सध्याची पिढी सुद्धा या प्रकारात दुर्बल आहे हे मी स्वानुभवातून सांगतो.

श्वेता२४'s picture

19 Jan 2023 - 3:31 pm | श्वेता२४

प्रतिसादाबद्दल धन्यवाद श्रीगुरुजी

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jan 2023 - 4:51 pm | चंद्रसूर्यकुमार

टिपीकल भारतीय कुटुंबांमध्ये असलेली गप्प बसा संस्कृती आणि केवळ वयाने कोणी मोठा आहे या कारणावरून त्या व्यक्तीला मान द्यायचा, त्याच्यापुढे बोलायचे नाही असले प्रकार पाश्चिमात्य देशात नसतात हे त्या समाजासाठी नक्कीच चांगले आहे. अशाप्रकारचे स्वातंत्र्य आपल्याकडेही यावे असे फार वाटते.

अमेरिकेन मुले तोंडी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी इ. प्रकारात दुर्बल आहेत हे नक्की.

यावरून नेहमी रामकृष्ण परमहंसांची (की त्यांच्या नावाने खपवली गेलेली) गोष्ट आठवते. एक योगी त्यांना भेटायला गेला आणि त्याने पाण्यावरून चालून दाखवलं. त्याचे रामकृष्ण कौतुक करतील अशी त्या योग्याची अपेक्षा होती पण ते त्याविषयी काहीच बोलले नाहीत. तेव्हा शेवटी त्या योग्याने विचारले- मी आयुष्यातील ३० वर्षे खर्च करून एवढी कठीण साधना करून ही विद्या मिळवली आहे त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का? त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले- तू तुझ्या आयुष्यातील ३० वर्षे विनाकारण व्यर्थ दवडली आहेस. इतकी वर्षे घालवून काय मिळवलेस? तर पाण्यावरून चालायचे कौशल्य. नौकेत बसलास तरी तू या तीरावरून त्या तीरावर जाऊ शकशीलच. मग तू इतकी वर्षे खर्च करून वेगळे काय मिळवलेस?

त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर वापरून (किंवा गेलाबाजार हाताने गुणाकार-भागाकार करून) काही सेकंदात उत्तर काढता येत असेल तर मग तोंडी या गोष्टी करता येणे हे मोठे कौशल्याचे काही आहे का? मलाही शाळेत असताना अशी आकडेमोड तोंडी भराभर करता यायची- बर्‍याच अंशी अजूनही येते. पण त्यातून झाले असे की आपण गणितात खूप मोठे डॉन आहोत असे मला वाटायला लागले होते. खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे हे खूप उशीरा कळले. डीवाय बाय डीएक्स ऑफ एक्स^२ = २ एक्स अशाप्रकारे घोकंपट्टी करणे हे गणित समजल्याचे लक्षण नक्कीच नाही. लिमिट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन वगैरेंमध्ये नक्की काय चालू असते याचा पत्ता कोणाला नसतो. मॅक्सिमा काढताना पहिले डेरिव्हेटिव्ह शून्य आणि दुसरे शून्यापेक्षा कमी हे कशावरून येते हे समजावून सांगणारे शिक्षक कमीच असतात. नुसते घ्या फॉर्म्युले आणि काढा उत्तरे यावर आपल्या शिक्षणपध्दतीचा भर असतो. आपल्या लोकांनी शिक्षणपध्दतीत अगदी सावळागोंधळ घातला आहे हे नक्कीच.

वामन देशमुख's picture

19 Jan 2023 - 5:37 pm | वामन देशमुख

खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे

(सदर धाग्यावर अप्रस्तुत न वाटल्यास) अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल.

- (ढ, मठ्ठ, गाढव विद्यार्थी) वामन

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jan 2023 - 7:42 pm | चंद्रसूर्यकुमार

खाली उत्तर दिले आहे.

श्वेता२४'s picture

19 Jan 2023 - 6:01 pm | श्वेता२४

धन्यवाद

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2023 - 7:21 pm | श्रीगुरुजी

त्याप्रमाणेच कॅल्क्युलेटर वापरून (किंवा गेलाबाजार हाताने गुणाकार-भागाकार करून) काही सेकंदात उत्तर काढता येत असेल तर मग तोंडी या गोष्टी करता येणे हे मोठे कौशल्याचे काही आहे का? मलाही शाळेत असताना अशी आकडेमोड तोंडी भराभर करता यायची- बर्‍याच अंशी अजूनही येते. पण त्यातून झाले असे की आपण गणितात खूप मोठे डॉन आहोत असे मला वाटायला लागले होते. खरं गणित म्हणजे आकडेमोड नाहीच तर कॅल्क्युलस हे खरं गणित आहे हे खूप उशीरा कळले.

जलद आकडेमोड कोणत्याही अभ्यासक्रमात, विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे कौशल्य आहे. मला गुणाकार, भागाकार, बेंरजा, वजाबाक्या (अर्थात फार मोठे आकडे नसले तर) बऱ्यापैकी जलद तोंडी करता येतात व अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये याचा खूप फायदा झाला आहे. विशेषतः वेगवेगळ्या आकड्यांमधील परस्परसंबंध, वर्ग, घन अश्या प्रकारातील नातेसंबंध यामुळे समजतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jan 2023 - 7:42 pm | चंद्रसूर्यकुमार

जलद आकडेमोड कोणत्याही अभ्यासक्रमात, विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे कौशल्य आहे.

याचे कारण स्पर्धा परीक्षांमध्ये त्यावरील प्रश्न विचारतात. आकडेमोड हे गणितच असले तरी गणितात त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्वाच्या आणि अधिक उपयुक्त संकल्पना आहेत. इंजिनिअरींगच्या बर्‍याच शाखांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेकंड ऑर्डर डिफरन्शिअल इक्वेशन्स हा पाया आहे त्यावर इतर सगळे अवलंबून आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगमध्ये लाप्लास ट्रान्स्फॉर्म मोठ्या प्रमाणावर लागतात. पुढची प्रगती झाली आहे ती सगळी कॅल्क्युलसवर आधारीत आहे. आकडेमोड हा त्यामानाने बराच सिंप्लिस्टिक प्रकार आहे. अमेरिकन विद्यापीठांमध्ये मास्टर्स पातळीवर कॅल्क्युलसवर खूप भर देतात. मला तिथे असताना तो विषय इतका महत्वाचा आहे हे कळले. कॅलक्युलसमधील डायव्हरजेन्स, ग्रेडिएंट आणि कर्ल या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. त्याच संकल्पना मी इंजिनिअरींगला असताना ऑप्शनला टाकल्या होत्या :) अमेरिकन विद्यापीठांमध्ये एखादी अशी महत्वाची संकल्पना ऑप्शनला टाकली तर विषय निघणारच नाही असा पेपर काढतात. आपल्याकडे तसे व्हायला हवे.

बाकी स्पर्धा परीक्षांमध्येही नुसत्या आकडेमोडीवर आधारीत प्रश्न कमी झाले आहेत. २०००-२००१ सालापर्यंत कॅट परीक्षेत २ तासात २०० प्रश्न सोडवायचे असत आणि ती परीक्षा त्यावेळी वेगावर आधारीत होती. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये वेगवेगळ्या आलेखांमधून मोठ्यामोठ्या आकडेमोडींवर आधारीत प्रश्न विचारत असत. पण आता डेटा इंटरप्रिटेशनमध्येही प्रश्न आकडेमोडीवर नाही तर अधिक 'लॉजिकल' असतात.

> अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे

ह्यांत तथ्य नाही. शाळा विविध प्रकारच्या असतात आणि प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रम वेगळा. लेखन आणि वाचन हे आपले असे एक विषय आहेत जे इथे शिकवले जातात. भारतीय शाळांत लेखन आणि वाचन ह्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात नाही. टेक्सस आणि कॅलिफोर्निया च्या शाळेच्या अभ्यासक्रमाशी माझी चांगली ओळख आहे. गणिताच्या बाबतीत अमेरिकन दहावीत कॅल्क्युलस, प्रोबॅबिलिटी इत्यादी विषय शिकवले जातात. खाजगी शाळांत तर जास्त खोलांत जाऊन शिकवले जातात.

प्राथमिक शाळांत जास्त शिकविण्यापेक्षा मुलाच्या बेसीक्स वर जास्त भर दिला जातो.

आपला मुद्दा १ आणि २ हे बरोबर असावेत
अमेरिकेबाहेरील दूतावासासाठी चालविलेली अमेरिकेबाहेरील शाळा आणि नेटिव्ह अमेरिकेतील शाळा याची कशी काय तुलना होऊ शकते चित्रगुप्तजी ?
कोणी आपला हा लेख वाचला तर त्यानं हे असेच सगळ्या पाश्चिमात्य शाळेत चालते असे वाटेल ..

जर एवढी बेशिस्त शाळा पाश्चिमात्य देशात असेल तर पुढे जाऊन हा पाश्चिमात्य समाज बऱ्यापकी यासास्वी कसा काय होतो?

येथील शाळेतील एक वाचलेली मुख्याध्यापकाचे पत्र शाळा सरकारी खाजगी नव्हे

येथेही शिस्त आहे हो ती काय एकटी भारतात आहे असे नाही

Other information

Now is the time to fix hair, piercings, eye lash extension, jewellery etc so that when you return to school you meet school uniform requirements e.g. look natural, neat, tidy and conservative in presentation.

Requirements include:

· Make up and eye lash extensions are not allowed

Nails – clear polish only, safe length & no artificial nails
Piercings – lower ear lobes only
Earrings – one pair of small, fine, plain round silver or gold sleepers or studs
Tattoos – not allowed
Watches – functional rather than decorative (a reminder any cellular device e.g. smart watch that functions as a mobile phone will be treated as per phones)
Other jewellery – not allowed
Hairstyles – natural colour, no dramatic differences in colour
- Tied up if it touches the collar using a plain band & school ribbon, at the base of the neck so that the hat can be worn correctly
- Off the face
- Minimum number two blade, no tracks, undercuts or dramatic differences in length between top and sides of the hair
- Shaving – students must always be clean shaven
- Sideburns are to be no longer than half-way down the ear.
Exemptions from above may be granted on medical, religious or cultural grounds but must be supported by appropriate documentation on application to your year level Deputy.

The theme for this year is ‘Together we grow’ and I am looking forward to seeing you all next week, ready to continue your learning and to make the most of the amazing experiences you will have access to at Mansfield this year.

नचिकेत जवखेडकर's picture

16 Jan 2023 - 7:46 am | नचिकेत जवखेडकर

गेल्या महिन्यात भारतात गेलो होतो तेव्हा एका नामांकित बदनाम बँकेचा अतिशय वाईट अनुभव आला. माझ्या पत्नीचे NRE अकाउंट आहे तिकडे. ३ वर्षे भारतात जाऊ न शकल्यामुळे बरीच कामं करायची होती बँकेची. १ल्यांदा गेल्यावर काउंटरवरच्या बाईंनी सांगितलं काय काय आणा ते. दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो आणि जी काय कामं करायची होती त्या सगळ्याचे अर्ज दिले. ती जे काय मागेल ती सगळी कागदपत्रं आम्ही आणली होती. त्यावरूनच ती बाई वैतागली की आता झक मारत काम करावं लागेल. आमच्या पुढच्या माणसांची परिस्थिती आम्ही बघत होतो. प्रत्येकाला अमुक नाहीये घेऊन या असा म्हणून त्या माणसांनी जे काही कागदपत्रं असेल ते आणलं की, मी हे नव्हतं सांगितलं, तमुक घेऊन या असले प्रकार चालले होते. माणशी १ तास या रेट नी ती बाई काम करत होती. आमचे सगळे अर्ज देऊन झाल्यावर २ आठवड्यांनी आम्ही परत स्टेटस चेक करायला गेलो तर तोंड वर करून म्हणतीये की तुम्ही दिलेले अर्ज हरवलेत. परत द्या. तेव्हा मी आणि पत्नीने पण आवाज चढवला पण परिणाम शून्य. काही जणांना असा वाटूच शकेल की तुलना चालू झालीये, पण इकडे जपानमधल्या बँकेत किंवा सरकारी कार्यालयात कधीही असा अनुभव आला नाहीये.

ट्रॅफिकतर विचारूच नका. सिंहगड रोड ला संतोष च्या चौकात संध्याकाळच्या वेळेला चारचाकी चालवून २-३ दिवस कंबर पूर्ण गेली होती. सिग्नल तर अक्षरशः कोणीही पळत नव्हतं. अत्यंत खेदाने नमूद करावंसं वाटतं की ३ वर्षात खूप वाईट परिस्थिती आलीये. मी सिग्नल ला थांबलो तर २-३ दा रिक्षावाल्यांनी आणि अगदी सुशिक्षित दिसणाऱ्या लोकांनी पण मागून येऊन सांगितलं की, अहो कुठे थांबलाय सिग्नलला, चला पुढे!

माझ्या एका कलीगनी मागे एकदा निर्णय घेतला की, जपान सोडून भारतात स्थायिक व्हावं. तिकडे गेल्यावर त्याची मुलं तक्रार करायला लागली की, रोज बाजूची मुलं पेन्सिल, पेन, पट्टी चोरतात म्हणून. सगळं फुकट हवं हा अट्टाहास किंवा हव्यास कधी सुटणार?
जपानमध्ये १ येन जरी येणं बाकी असेल दुकानदाराकडून तरी तो मिळतो म्हणजे मिळतोच. १ येन ला खरं तर जपानमध्येसुद्धा काहीही किंमत नाहीये. आपल्याइकडे ऍमेझॉन किंवा ऑनलाईन शॉप्पिंगवाले डिलिव्हरी बॉईज ५-१० रुपये पण परत करत नाहीत. असे का बरं? हे प्रश्न नक्कीच पडल्यावाचून राहत नाहीत.

परंतु जपानी आयुष्य जवळून बघितल्यामुळे दुसरी बाजू पण खूप जवळून अनुभवता आली. एक तर जपानी माणसं इतकी कोशात राहतात की अडीअडचणीला कोणी बाकीचे पटकन मदत करतील ही गोष्ट जवळपास नाहीच. आणि सतत कुठल्यातरी दडपणाखाली वावरल्यामुळे छान हसून खेळून संवाद फार कमी वेळा साधला जातो. बऱ्याच जणांनी म्हटल्याप्रमाणे डोमेस्टिक हेल्प जवळपास शून्य. सगळीच कामं स्वतःलाच करावी लागतात. कधी कधी खूप कंटाळा येतो पण इलाज नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेतच. म्हणून भारत वाईटच आणि परदेशच चांगला किंवा उलट असं नाहीये.

तुमचा भारतातील अनुभव सार्वत्रिक आहे. भारतीय समाज किती नालायक आहे याचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा परदेशामध्ये भारतीय समाजाबद्दल / प्रवासाबद्दल चर्चा होते तेव्हा असली माहीती दिली जाते. त्यावेळी आपलीच मान शरमेने खाली जाते.

तर्कवादी's picture

18 Jan 2023 - 12:32 am | तर्कवादी

नचिकेतजी,

तुमचा बँकेतला अनुभव फारच वाईट असला तरी तो तितकासा सार्वत्रिक नक्कीच नाही. मुख्य म्हणजे कागदपत्रांची , अर्जाची पोचपावती दिल्यानंतर कागदपत्रे हरवलित हे सांगणे सोपे नाही.
खासगी बँकेतला असेल असे वाटत नाही. तुम्ही बँकेचे नाव नमूद करु शकता...

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 7:44 am | चौकस२१२

एका नामांकित बदनाम बँकेचा अतिशय वाईट अनुभव आला
या वरून आठवले .. सध्या सोनी लिव्ह वर "पोस्ट ऑफिस उघडे आहे " हि मालिका सुरु आहे ... छान पात्र रचना आणि लिखाण आहे
असो हे झाले सरकारी .. खाजगी क्षेत्रात पैसे भरपूर असून सुद्धा "वृत्ती" अजून विचित्र ह्याचे हे उदाहरण आहे ...

भारतातल्या सर्वात जुन्या खटल्याचा अखेर ७२ वर्षांनी लागला निकाल
https://www.loksatta.com/desh-videsh/kolkata-high-court-72-year-old-case...

मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात बँकेच्या लिक्विडेशनला आव्हान देणाऱ्या याचिकांवर दोन वेळा सुनावणी घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी या तारखांना कोणीही हजर राहिले नव्हते. मात्र आता हा खटला निकाली निघाला आहे.

शेवटी कोणीच हजर न झाल्याने खटला संपला.

re

हा काही ग्रामीण भागांतील नाला नाही. दिल्ली मधील नाला आहे. ह्यांत शरमेची बाब नाला साफ नाही केला एवढीच नसून लोकांनी निर्लज्ज पणे त्यांत इतका कचरा फेकला आहे हि आहे.

श्वेता२४'s picture

17 Jan 2023 - 11:22 am | श्वेता२४

अमेरीकेतील गरीबी या यूट्यूबमधील विडीओमध्ये अमेरीकेतही काही भागात कशी अस्वच्छता आहे. लोक कसे रस्त्यावर झोपलेले असतात. उंच उंच इमारतींच्या बाजूच्या भागात कशी झोपडपट्टी आहे, आणि हे अमेरीकेतले लोक कधीही इतरांपुढे आणत नाही याचे चित्रण आहे. या विडीओच्या खालील प्रतिसादातूनही याला पुष्टी मिळते. त्यामुळे अमेरीकेतल्या/परदेशातल्या नकारात्मक बाजूंवर प्रामाणिकपणे बाेललात तरच भारतावरच्या टीकेला काही अर्थ आहे.

भारत कसा सुधारेल हे पाहणे जास्त महत्वाचे नाही का? जर तुलनाच करायची तर अगदीच गरीब आणि नालायक देशांच्या बरोबर ही करता येईल.
१. परदेशातील किती टक्के जमिनीवर कचरा असतो आणि भारतातील किती टक्के जमिनीवर कचरा असतो ?
२. तुम्ही किती भारतीयांना रस्त्यात / सार्वजनिक जागेवर कचरा टाकताना हटकु शकता ? बहुतेक लोकांना आपण काही चुकीचे करतो आहोत याची जाणिव नसते. असली तर अगदी निर्लज्ज समर्थन करण्यात त्यांना काहीही अडचण नसते, उदा. आम्ही कर भरतो, आमचा हात घाण करणार नाही, तुम्ही कोण सांगणारे ?, ईतरांनी कचरा टाकला मग आम्ही का टाकु नये? सफाई कामगार आहे कचरा साफ करायला. इ. इ.
३. कचरापेट्यांची सुध्दा भारतात चोरी होती.
प्रश्न संसाधनांचा नसुन, मनोवृत्तीचा आहे.

हा तसले व्हिडीओ मी भरपूर पहिले आहेत. कुठलातरी एक भाग निवडून काढायचा आणि जणू काही अमेरिका भारताप्रमाणेच घाण आहे अशी अर्ग्युमेण्ट करायची पण प्रत्यक्षांत अमेरिकेतील ते घाणेरडे भाग सुद्धा बहुतेक करून एखाद्या सर्वसाधारण भारतीय रस्त्यापेक्षा जास्त साफ असतात. अमेरिकेचे सोडून द्या, युक्रेन सध्या युद्धग्रस्त आहे पण तिथली शहरे सुद्धा जास्त टुमदार आणि छान वाटतात.

> त्यामुळे अमेरीकेतल्या/परदेशातल्या नकारात्मक बाजूंवर प्रामाणिकपणे बाेललात तरच भारतावरच्या टीकेला काही अर्थ आहे.

अमेरिका भारताची तुलनाच शक्य नाही कारण प्रत्येक बाबतीत दोन्ही देशांतील तफावत फारच प्रचंड आहे. त्याशिवाय मुद्दा लोक भारत का सोडतात हा आहे.

पण इतर देशांचे सोडून द्या. आम्ही आमच्याच देशाचे पाहू. देशांत सर्वत्र कचरा आणि घाण पसरली आहे हे निर्विवाद सत्य नाही का ? फक्त गरीब प्रदेशांत नाही तर उचभ्रु ठिकाणी सुद्धा लिफ्ट मध्ये पानाची पिंक किंवा आलिशान गाडीतून कचरा बाहेर रस्त्यावर फेकणे इत्यादी गोष्टी अतिशय सर्रास होत आहेत कि नाहीत ?

आणि हे नक्की कश्याचे फेल्युअर आहे ? माझ्या मते संस्कृतीचे फेल्यूर आहे. लोकच मुळी असुसंस्कृत आहेत त्याची हि परिणीती प्रत्येक सार्वजनिक ठिकाण उकिरडा बनण्यात होते. हीच दळभद्री मानसिकता फक्त उकिरडे निर्माण करत नाही तर प्रत्येक ठिकाणी समस्या निर्माण करते. स्त्रियांची छेडछाड, बँकेत फसवणूक, गुंडगिरी, मूर्खपणाची व्यक्तिपूजा, इत्यादी गोष्टी शेवटी, ह्याच मागासलेल्या मानसिकतेने होते. उकिरडे फक्त त्याची सिम्टम आहे.

श्वेता२४'s picture

17 Jan 2023 - 1:54 pm | श्वेता२४

त्याशिवाय मुद्दा लोक भारत का सोडतात हा आहे.
केवळ हेच टुमणं लावून धरलंय.......

पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते

जे तुम्ही आता करत आहात.

पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

हा पण धाग्याचा विषय आहे....... त्याबद्दल पण प्रामाणिक मते येणं गरजेचं आहे.

> केवळ हेच टुमणं लावून धरलंय.......

जी गोष्ट टॅंक मध्ये आहे तीच नळांत येणार तुम्ही कितीहि मागणी केली म्हणून दुसरे द्रव्य येऊ शकत नाही. धाग्याचा मूळ प्रश्न अगदी साफ आहे आणि त्यालाच धरून मी लिहीत आले आहे, तुम्हाला दुसरा विषय चघळायचा असेल तर जरूर दुसरा धागा उघडा आणि तिथे आपण ती चर्चा करू शकतो.

तर्कवादी's picture

17 Jan 2023 - 4:04 pm | तर्कवादी

हा पण धाग्याचा विषय आहे....... त्याबद्दल पण प्रामाणिक मते येणं गरजेचं आहे.

श्वेताजी प्रतिसाद आवडला.
तिकडे दुसर्‍या एका प्रतिसादात कुणीतरी अमेरिकेतील गोळीबाराचा विषय काढला त्यावरही मग अमेरिकाप्रेमींचे मौन !!

डँबिस००७'s picture

17 Jan 2023 - 6:54 pm | डँबिस००७

भारताच्या तुलनेत,................

जर तुम्ही भारताबाहेर रहात असाल तर भारतात परतणे हा सर्वात शेवटचा पर्याय असेल.

भारताला रहाण्या योग्य करायचे असेल तर म्हणजे भारतात रहाणार्या लोकांच्यां सवयीत, वागण्यात अमुलग्र बदल घडवावे लागतील. ते नुसत्या तोंडी सांगुन येणार नाहीत. त्यासाठी शालेय शिक्षणापासुनच त्याचा पाया मजबुत करावा लागेल. पण योग्य बदलासाठी योग्य पर्याय जनतेला द्यावे लागतील. ज्या देशात पॅसेंजर ट्रेन मधल्या टॉयलेट मधुन स्टीलचे टमरेलच चोरी होत असेल तिथे तुम्ही काय पर्याय देणार तिथे कडक शिक्षा व्हावी. कडक शिक्षा ही फक्त टमरेल चोरालाच नसुन त्याच्या कडुन चोरीची वस्तु विकत घेणार्याला कत्येक पटीने जास्त कड्क शिक्षा व्हावी.

अमेरीकेत भारतातील आंबे, ईंग्लंड मध्ये भाजीपाला निर्यात होत नाही, कारण भारतातल्या भाजीपाल्यात व आंब्यात केमिक्ल्स आढळतात. अशी केमिकल्स जिवाला हानीकारक असतात. पण हाच भाजीपाला भारतीय खातात कारण त्यांना दुसरा पर्याय नाही. काही शेतकरी स्वःतासाठी वेगळा भाजीपाला पिकवतात ( केमिकल्स नसलेला) आणि बाजारासाठी वेगळा भाजीपाला पिकवतात ( किटनाशक वापरलेला) असे एकले होते, अशी ही उदाहरणे बघीतली आहेत, पण आज परिस्थिती बदलताना दिसत आहे. भारतात अनेक ठिकाणी आता लोकली सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या
उपलब्ध होताना दिसत आहेत. केरळात असा बाजार काही तासात रिकामा होतो. मुंबईतही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या आता उपलब्ध होताना दिसतात आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल, कारण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे भाज्या हातोहात विकल्या जातात, जाहिरात करण्याची ग रज पडत नाही.

सेंद्रिय पद्धतीने फळे भाज्या पिकवणे तितके सोप्पे मात्र नाही कारण जे केमिकल्स वनस्पतीच्या आत येतात ते जमिनीतुनच येतात. वनस्पतीवरुन केलेला किटनाशकांचा फवार्यामुळे वनस्पती वर
केमिकल्सचा थर होतो पण तो वनस्पती धुतल्याने बराच कमी होतो. भारतातील शेतीत अनेक वर्षांच्या किटनाशकाच्या मार्यातुन जमिनीत केमिकल्सचे प्रमाण अतोनात वाढलेले आहेत. अश्या जमिनीला केमिकल्स विरहीत करण्यासाठी जमिनीत पुन्हा सुक्ष्म जीवजंतु तयार होणे आवश्यक असते, असे जीव जंतुच केमिकल्सचा निचरा करतात. गांडूळ, शेणापासुन तयार झालेल्या जीवामृताने सुद्धा असे घडु शकते.

भारतीयांना उघड्यावर शौच करायची सवय असते कारण त्यांना पर्याय नसतो. कारण संडास बांधायला लागणार्या पैश्यातुन अजुन अनेक महत्वाची निकडीची कामे होऊ शकतात त्यामुळे संडासाला प्राथमीकता मिळतच नाही. संडास नसलेल्या घरातील स्त्रीयांच्या परिस्थितीची कल्पनाही करवत नाही. पण आता घरातील स्त्रीयांनीच संडासाची मागणी लावुन धरल्याने व सरकारने त्यावर योजना आणल्याने परिस्थितीत वेगाने बदल होत आहे. उघड्यावर शौच केल्याने नगर पालिका वेगवेगळ्या प्रभावी जंतुनाशकांचा वापर करत असते आणी अशी जंतुनाशके पाण्यातुन जमिनीत जातात, आणि तिथुन वनस्पतीत आणि शेवटी आपल्या जेवणात शिरतात.

काही दशकापुर्वी महाराष्ट्रातच एका केमिकल्स बनवणार्या एका कंपनीने त्या कंपनीत निर्माण होणार्या प्रदुषित पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याएवजी प्रदुषित पाणी खोल जमिनीत पंप केल्याप्रकरणी अटक झालेली होती. खोल जमिनीत प्रदुषित पाणी पंप करुन आपण असंख्य लोकांच्या जिवना शी खेळत आहोत ह्याचे भान अश्या कंपनीला का नसावे ? आपण काय करतो त्याचे दुरागामी व निकटच्या भविष्यात काय काय परिणाम होतील ह्याचा विचार होताना दिसत नाही. प्रदुषित पाणी प्रक्रिया करुन शुद्धीकरण करुन वापरण योग्य असल तरीही ते परवडण्यासारख असेलच अस नाही, उलट ते खुपच महाग असत. केमिकल्स झोन मध्ये सरकार द्वारे असे STP प्रकल्प चालवले जातात, पण केमिकल्स तयार करणार्या कंपन्यांना अश्या STP प्रकल्पा चा वापर करणे परवडणारे असावे.

भारतात तसेच बाहेर च्या देशात भारतीय मनोवृत्तीचे अनेक अनुभव आलेले आहेत. एकदा भारतात फिरायला गेलेलो असताना, शोधुनही डस्टबीन न मिळाल्याने चिप्सच्या रिकाम्या पॅकेट हातात घेऊन फिरवत असताना अचानक बायकोच्या वडीलांनी हातातले चिप्सचे रिकामे झालेले पॅकेट जमिनीवर भिरकावले , मी फक्त बघत राहीलो , काहीही बोलु शकलो नाही.

अजुन एकदा दुबईच्या विमान तळावर प्रवास करतानाचा अनुभव, एका सहप्रवाश्याला हातातल्या सामानात जड व मोठी बॅग असल्याने कारणाने विमानात नेऊ दिले नाही. त्या प्रवाश्याच्या समोरच विमान सेवेच्या कर्मचार्याने एका मोठ्या प्लास्टीकच्या बॅगेत त्याची बॅग भरली व केबल टायने बंद केली व घेऊन गेला. मुंबईत उतरल्यावर सामानाच्या सरकत्या पट्यावरुन त्या सह प्रवाश्याने आपली बॅग उचलली जी प्लॅस्टिकच्या बॅगेच्या आत होती. त्या सह प्रवाश्याने ती प्लॅस्टिकच्या बॅग तिथेच फाडली, आपली बॅग बाहेर काढली, ती प्लॅस्टिकच्या बॅग तिथेच टाकली व आपली बॅग घेऊन तिथुन निघुन गेला.
हेच प्रकरण जर दुबईत घडत असत तर हाच सहप्रवासी ती फाडलेली प्लॅस्टिकच्या बॅग तिथेल्या तिथे टाकुन देण्याएवजी डस्टबिन शोधुन त्यामध्ये काळजी पुर्वक ती प्लॅस्टिक बॅग घालुन मगच तिथुन गेला असता.

तर्कवादी's picture

18 Jan 2023 - 11:13 am | तर्कवादी

जर तुम्ही भारताबाहेर रहात असाल तर भारतात परतणे हा सर्वात शेवटचा पर्याय असेल.

पण अनेक लोक २ ते ५ वर्षे परदेशी राहून भारतात परततात. काही लोक तर याहुन अधिक काळ राहूनही भारतात कायमचे परततात. असे एक उदाहरण मी वर एका प्रतिसादात लिहिले आहे.
तुम्ही भारतात आहात की परदेशात ? परदेशात असल्यास भारत सोडण्याचा निर्णय घेतलात तेव्हा तुमच्या प्रेरणा काय होत्या ?

धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल. थोडक्यात प्रतिसादकर्त्यांनी स्वतःबद्दल आधी सांगावे हे मी सुचवेन

तुलुगू चित्रपट दाखविताना भारतीय प्रेक्षकांनी इतकि घाण केली कि त्यांना हाकलावे लागले.

https://www.youtube.com/watch?v=SOnFUES4i3Q

मलाही असाच अनुभव आला आहे.
काही परदेशी भारतीय, भारतातील चित्रपट चित्रपटगृहात लावत असत. त्यावेळी तिथे घाण करणे, खुर्च्या मोडणे, लहान मुलांनी खाऊन उलटी करणे, गोंधळ करणे असले प्रकार झाले. शेवटी त्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाने भारतीय लोकांचे चित्रपट लावणे बंद केले. आता तेच भारतीय वंशदेव्षाच्या नावाने रडगाणे गात असतात.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2023 - 11:24 am | श्रीगुरुजी

भारतात वीज जाते, अमेरिकेतही वीज जाते. अमेरिकेत वर्षात फार तर कधीतरी १ तास वगैरे वीज नसते.

भारतात बहुसंख्य रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत.. अमेरिकेत क्वचितच इतका वाईट रस्ता दिसतो.

भारतात अगदी खालच्या थरापासून लाचखोरी सुरू होते, प्रत्येक पावलावर लाच द्यावी लागते. अमेरिकेत खालच्या थरावर शून्य लाचखोरी आहे.

बलात्कार, खून वगैरे प्रकार भारतात आहेत व अमेरिकेतही आहेत. परंतु अमेरिकेत आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही व खटले खूप कमी कालावधीत संपून गुन्हेगारांना शिक्षा होते. भारतात बरोबर उलटी परिस्थिती आहे.

भारतात पुढाऱ्यांनी, उच्चपदस्थांनी केलेल्या गुन्ह्यांना संरक्षण असते. भारतात नेते विरोधकांना पकडून घरात आणून बेदम मारतात आणि तरीही मोकळे असतात. अमेरिकेत बरोबर उलट परिस्थिती आहे.

अश्या अनेक गोष्टी आहेत..

Trump's picture

18 Jan 2023 - 2:47 pm | Trump

+१
भारतातील व्यवस्था कायदा पाळणार्यापेक्षा तोडणार्‍यांना जास्त पुरक आहे. वरती जे भारतीय व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढत आहे त्यांनी कधी व्यवहारात अनुभव घेतले आहेत की नाही त्याची शंका येते.

आता चर्चेला जोर चढु लागला आहे.
बर्‍याच लोकांची समाज, सामाजिक मुल्ये आणि कायदा व्यवस्था यांच्यात गल्लत केली आहे. त्या गोष्टी एकमेकांशी संबधित असल्यातरी एकच नसतात.
आणि अमेरीका म्हणजेच परदेश नाही. मी अगदी मलेशियात लोक जाताना बघितले आहे.

ताजे प्रेत's picture

18 Jan 2023 - 3:44 pm | ताजे प्रेत

अजून एक म्हणजे हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? काही वेळा तर खाजगी रुग्णालयात पण त्यांच्यावर फुकट उपचार करावे लागतात ना ?
मी ऐकले कि कोणीही विदेशी आला कि त्याला शोधणे आणि स्वस्तात / फुकट उपचार करणे हि हॉस्पिटल / डॉक्टर ची जबाबदारी असते
असा नुकसानीत बिझनेस का करावा ? का करतात ?

ताजे प्रेत's picture

18 Jan 2023 - 3:44 pm | ताजे प्रेत

अजून एक म्हणजे हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ? काही वेळा तर खाजगी रुग्णालयात पण त्यांच्यावर फुकट उपचार करावे लागतात ना ?
मी ऐकले कि कोणीही विदेशी आला कि त्याला शोधणे आणि स्वस्तात / फुकट उपचार करणे हि हॉस्पिटल / डॉक्टर ची जबाबदारी असते
असा नुकसानीत बिझनेस का करावा ? का करतात ?

भारतात विदेशाहून - म्हणजे अगदी अफगाणीस्तान मोरोक्को वगैरे मधून सुद्धा - उपचारासाठी आलेल्या तिकडल्या नागरिकंचा (अर्थातच वशिल्याच्या, उच्च श्रेणीतील लोकांचा) वैद्यकीय खर्च तिकडले सरकार/विमा कंपन्या करत असतात, त्यामुळे त्यांना वैयक्तिक रीत्या इथे अगदी कमी वा शून्य पैसे भरावे लागतात. (ही माहिती माझा मुलगा पूर्वी दिल्लीत अपोलो हॉस्पिटलात काम करायचा, त्याने सांगितलेली आहे) अशा मोठ्या महागड्या इस्पितळांजवळ ज्यांची घरे, फ्लॅट वगैरे असतात, त्यांना काही दिवसांसाठी आलेल्या या रुग्णांच्या कुटुंबियांना खोल्या भाड्याने देऊन भरपूर रक्कम उकळता येते वगैरे.

हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. कृपया जास्त माहिती द्या. लोकांचा फुकट उपचार भारतीय खाजगी इस्पितळें का करतील ?

उपयोजक's picture

19 Jan 2023 - 11:47 am | उपयोजक

ताजे प्रेत यांनी तो प्रतिसाद तिरकसपणे लिहिला आहे. अतिशयोक्ती म्हणून

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 5:22 am | चौकस२१२

हे विदेशातून येणारे विदेशी NRI / नागरिक याना भारतीय डॉक्टर बिल कमी लावतात ना ?
हि अजब माहिती तुमहाला कोणी दिली?
शक्यच नाही!
आधी एक लक्षात घाई कि दोन प्रकारचे एन आर आई असतात
१) भारतीय नागरिक जे परदेशात कायम वास्तव्यास आहेत आणि दुहेरी नागरिक नाहीत
२) परदेशी नागरिक जे "ओ सी आय" या प्रकारचे भारतीय नागरिक ( ज्यांना कायमचे भारतात राहता येते / काम करता येते पण मताधिकार नसतो आणि अर्थात निवडणुकीला उभे राहत येत नाही )
उलट असे आहे कि जे २) प्रकारचे "ओ सी आय" आहेत त्यानं भारतात पदवी साठी ५ पट शुल्क आकारले जाते .

अमेरीकेतील शिक्षण भारताच्या तुलनेत सोपे आहे

ऑस्ट्रेलियातील उत्तर चालेल का ?

सुरवातीचं काळात ६,७ वि पर्यंत तसे आपण म्हणून शकतो , हि वर्षे घोकंपट्टी वर भर कमी असतो आणि अभ्यासक्रम जरी ठरलेला असतो तरी "पाठपुस्तकाप्रमाणे आज हा धडा " असे कमी व शिक्षकाला स्वतःच्या पद्धती प्रमाणे शिकवयाला मुभा असते त्यामुळे भारतीय समजला ते थोडे विस्कळीत वाटते
८ वि पासून मात्र १२ वि पर्यंत गणितावर भर असतोच ...तसा नसता तर येथील पदवी कमी किमतीची ठरली असती ( अभियांत्रिकी ) पण तसे नाहीये
अर्थात हे सर्व आता खूप बदलेले असावे कारण भारतात शिक्षणात सुद्धा बदल झालेला दिसतोय

मूळ फरक असा कि स्वतःहून शोधून काढून शिकणे यावर भर ( नक्की शब्दात हे वर्णन करत येत नाहीये )

एकूण काय भारतात पदवी पर्यंत शिक्षण उत्तम असल्यामुळे आपण जर इतिहासा बघितलात तर साधारण पने पदवी घ्यायला बाहेर फारसे कोणी जात नाहीत तर पद्वियोत्तर ला जास्त जाण्याकडे लोकांचा कल दिसतो

श्री नारायण मूर्ती यांनी भारतीय वृत्तीवर केलेले भाष्य

https://www.loksatta.com/desh-videsh/infosys-founder-narayana-murthy-sai...
त्यानंतर भारत आणि चीन यांच्यामध्ये तुलना करत ते म्हणाले, “१९४० मध्ये चीनचा आकार भारताएवढा होता. पण चीनने वर्क कल्चरच्या जोरावर भारतापेक्षा सहापट प्रगती केली. त्यांच्या कामामध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळतो.” पुढे नारायण मूर्ती यांनी ‘भारतामध्ये चीनप्रमाणे प्रामाणिकपणाची वृत्ती असायला हवी’ असे विधान केले.
भाषण देताना ते म्हणाले, “भारतामध्ये पक्षपात नसलेली संस्कृती असणे आवश्यक आहे. देशाला जलद निर्णय घेत त्यांवर अंमलबजावणी करण्याची आणि त्रासरहित व्यवहार करण्याची गरज आहे. भारतामध्ये कठोर मेहनत करणारे, प्रामाणिक आणि नीतिमत्ता असणारे फार कमी लोक आहे. प्रगती करण्यासाठी यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. परदेशातील व्यावसायिकांनी आपल्याकडे गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला निर्णय प्रणालीमध्ये त्वरीत बदल करायला हवे आहेत.”

त्यांनी केलेले भाष्य आणि येथील चर्चा बर्याच अंशी समान आहेत.