माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर आज पावलाख वाचनं झाली.
निरनीराळ्या विषयावर एकूण ३९२ लेखनं मी केली.
त्यामधे,
अनुवादीत कविता (129) आई विषयी (8) माझ्या कविता (43)
माझ्या कवितेतून माझे विचार (18) गम्मत (12) गोष्ट (23) चर्चा (6) चिंतन (14)
टिका (2) प्रश्नोत्तरे (1)भाषण (2) लेख (87) वर्णन (2) विचार (31) विडंबन (1)
व्यक्ती आणि वल्ली(11) श्रद्धांजली (1)
२००७ जानेवारी पासून मी माझं लेखन लिहायला सुरवात केली.
२००७ मधे एकूण -----३,५१८ वाचनं झाली.
२००८ मधे एकूण ------१४,७११ वाचनं झाली.
२००९ मधे एप्रिल पर्यंत ----६,७५१ वाचनं झाली.
२००९ मधे दर महिन्याला सरासरी १,६०० वाचनं होत आहेत.
१०जानेवारी २००९ मधे ह्या एका दिवशी --१६८ वाचनं झाली.
दर दिवशी सरासरी ५० वाचनं होत असतात.
मी माझ्या सर्व मायबाप वाचकांचे आभार मानतो. आणि माझ्या ब्लॉगवर त्याचं स्वागत करतो.
जाता जाता,
आज मला मिपावर लेखन करायला येऊन ४५ आठवडे ४ दिवस झाले.
मिपावर माझी आज पर्यंत २४४ लेखनं झाली.
एकूण ५८,६११ वाचनं झाली.
एका वाचकाने पृच्छा केली की,मिपावर माझं नाव "सिद्धहस्त" लेखकात कसं नाही.?
मी काय सांगू? ती " देवांची इच्छा! "
एव्हडं मात्र खरं,सिद्धहस्त नसलो तरी "सिद्धबोटं" कीबोर्डवर असतात.आणि लेख लिहून झाल्यावर मनाला सिद्धि (accomplishment.) मिळते.
जरा गंमत केली.
मिपाच्या समस्त वाचकांचे मनस्वी आभार.
प्रतिक्रिया
4 May 2009 - 8:43 am | अनामिक
काका, तुम्ही असेच लिहीत रहावे आणि तुमच्या अनुभवांचा खजीना आमच्यापुढे असाच उकलत रहावा हीच सदिच्छा!
-अनामिक
4 May 2009 - 10:58 am | तिमा
सामंतसाहेब,
अहो, तुम्ही बुजुर्ग! तुम्हाला सिध्दहस्त अशा वेगळ्या प्रशस्तिपत्रकाची जरुरच नाही. आम्ही जरी प्रतिक्रिया दिली नाही प्रत्येक वेळेला, तरी आम्ही तुमचे नांव बघताच आवर्जून वाचतच असतो.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
4 May 2009 - 7:43 pm | मानस
तुमच्या सारख्या सर्वार्थाने (वयाने, ज्ञानाने, बुद्धीने, अनुभवाने) मोठ्या असलेल्या व्यक्तिस लहान तोंडी मोठा घास न घेता इतकच सांगू इच्छितो, काका तुम्ही लिहीत रहा.
माझ्या सारखे अनेक वाचक, जे मिपावर "वाचनमात्र" अवस्थेत जास्त असतात, त्यांच्यासाठी तुमच्या अनुभवांचा हा एक खजिनाच आहे. प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देणे जमतेच असे नाही, लिहीणेसुद्धा होत नाही. तरीसुद्धा वेळ मिळेल तसा, वाचत असतो आणि त्यातुन खुप काही शिकत असतो.
अनेक शुभेच्छा ....
4 May 2009 - 8:49 pm | यशोधरा
+१
असेच म्हणते :)
6 May 2009 - 9:48 pm | प्राजु
तुमचे लेख खूप आवडतात. नियमित वाचते. मात्र सगळ्याच लेखांना प्रतिक्रिया देते असं नाही. काही लेखांना लगेचच देते काहींना उशिरा तर काहींना देण्याची राहून जाते.
आपण लिहित रहा.. आम्ही वाचत राहू.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 May 2009 - 8:44 pm | क्रान्ति
मानस यांच्या प्रतिसादाशी सहमत. सामंतकाका, तुमचे लिखाण नेहमीच काहीतरी नवीन देऊन जाते. साध्या साध्या गोष्टींतूनही किती मोलाचे विचार मिळू शकतात, याचे प्रत्यंतर तुमच्या लिखाणातून येते. तुम्ही अखंडपणे लिहित रहा, हीच विनंती आणि सदिच्छा!
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
4 May 2009 - 9:49 pm | मीनल
मी पण आहे त्या वाचकात.
लेखन आवडत तुमच.
मीनल.
5 May 2009 - 12:58 am | रेवती
+१,
असेच म्हणते.
रेवती
4 May 2009 - 9:56 pm | चतुरंग
कालानुरुप असा विदा गोळा करण्यातली तुमची चिकित्सक वृत्ती कौतुकास्पद!
तुमच्या अनुभवातून आलेले लेखन बर्याचदा जगण्यासंदर्भातले वेगळेच पौलू समोर आणते. मी वाचत असतो, प्रत्येक लेख वाचतोच असे नाही पण बरेचसे वाचले आहेत आणि प्रतिक्रियाही देतो बर्याचदा.
तुम्ही लिहिते रहावे हीच इच्छा! :)
चतुरंग
4 May 2009 - 10:25 pm | प्रकाश घाटपांडे
सामंतकाका आपण उत्साहीच रहा. खर तर उत्साह टिकवणे अवघड असते. चतुरंग ने म्हणल्याप्रमाणे आपल्या लेखनात वेगळेच पैलु असतात आणि कुठलीच अपेक्षा नसते.
अतिपरिचयात अवज्ञा | संततगमानदरो भवति|
मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरु काष्ठम इंधनं कुरुते|
या न्यायाने लिखाणाची कदर हवी तशी होत नाही हे मात्र खरे. सहज उपलब्धते मुळे किंमत हवी तशी मिळत नाही. पण दुसरी बाजु अशी कि वाचना/का च्याही मर्यादा असतात. आमच्या सारख्या माणसाला एखाद्या उत्तम मैफिलीत ऐकायला नेले तर आम्हाला त्याचे महत्व समजणारच नाही. (गाढवाला गुळाची चव काय)
सामंत काका आपण लिहित रहा मिपाचे ते वैभव आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
5 May 2009 - 7:03 am | सहज
वरील प्रतिक्रियांशी सहमत.
तुम्ही लिहीत रहा.
5 May 2009 - 9:37 am | प्रमोद देव
सामंतकाका नमस्कार.
'सिद्धहस्त लेखक' ह्या शब्दाची माझी माझ्यापुरती जी व्याख्या आहे त्यात तुम्ही दूर्दैवाने नाही बसलात म्हणून मी तुमचे नाव माझ्या यादीत घातले नाही...हे प्रकटन 'त्या' वाचकासाठी आहे.
मिपावरचे सिद्धहस्त लेखक ह्या मालिकेत मी ज्यांची नावे घेतलेत त्यात काही गोष्टींचा विचार केलाय.
१)लेखनाची भाषा
२) लेखनाचा दर्जा
३)वाचकप्रियता....वगैरे वगैरे
मी तुमचा उल्लेख 'सिद्ध'हस्त लेखकात करेन. त्यात मी माझा देखिल उल्लेख करेन.
ह्याचा माझ्या परीने असा अर्थ आहे की लिहीण्यास (सदैव)सिद्ध. तुमच्या भाषेत 'सिद्धबोटे.' :)
१)लेखनाची भाषा सर्वसामान्य.....फारशी अलंकृत नाही.
२)लेखनाचा दर्जा सर्वसामान्य. त्यात अनुभवाची शिदोरी असली तरी वाङमयीन दर्जा यथातथाच
३)वाचकप्रियता.....फारशी नाही.
अर्थात ही माझी वैयक्तिक मते आहेत. ती सर्वमान्य असावीत अथवा असतील असा माझा दावा नाही.
प्रत्येक वाचकाने आपापल्या आवडीप्रमाणे त्यांच्या मनातील सिद्धहस्त लेखकांची यादी करावी...खरे तर ती प्रत्येकाच्या मनात असतेच. मी ती इथे जाहीरपणे मांडली...इतकेच.
ह्या माझ्या उपद्व्यापामुळे जर कुणी वैयक्तिकपणे दुखावला गेला असेल तर मी त्या व्यक्तीची/व्यक्तींची जाहीरपणे आणि बिनशर्त माफी मागतो.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
5 May 2009 - 9:47 pm | श्रीकृष्ण सामंत
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
आपल्या सर्वांचं म्हणणं हे मला तितकच लाख मोलाचं आहे.आणि त्यातून शिकण्यासारखं आहे.
जाता जाता मला एव्हडंच म्हणायचं आहे.
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
6 May 2009 - 3:39 am | योगी९००
सामंत साहेब,
माझ्यामतेही तुम्हाला सिध्दहस्त अशा वेगळ्या प्रशस्तिपत्रकाची जरुरच नाही.. हा प्रकार (नंबर १, नंबर २ वगैरे) तुमच्यानंतर सुरू होतो. तुमची जागा अढळ आहे.
खादाडमाऊ
6 May 2009 - 8:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिद्धहस्त लेखक असलेल्या सिद्धहस्त माणसाला काही पदव्यांची गरज नाही...तुम्ही लेखनाच्या बाबतीत एक चालते -बोलते, विद्यापीठ आहात. तेव्हा लिहित राहा...! आणि असाच आनंद देत राहा..!
-दिलीप बिरुटे
6 May 2009 - 1:09 pm | जागु
तुमचं लेखन नेहमीच आवडतं. तुम्हाला शुभेच्छा.
7 May 2009 - 6:57 am | श्रीकृष्ण सामंत
तुम्हासर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल परत आभार.
मला वाटत नाही सामंतकाकांना प्रतिसादाचा हव्यास आहे. केवळ एक गंमत म्हणून त्यांनी हा विदा आपल्यासमोर मांडला त्यात गैर ते काय?
हे मानसचं म्हणणं अगदी माझ्या मनातलं आहे.
अलिकडे मला वाटायला लागलं की,
"सामंतकाका तुमचं दुसरं नाव प्रतिसादकाका"
असंच सगळे म्हणत असावे.
नंतर 'नटसम्राट' नाटकातील अप्पासाहेबांप्रमाणे
''कुणी घर देता का घर?''
ह्या संवादाची आठवण येऊ लागली.
आणि,
"कुणी प्रतिसाद देता का प्रतिसाद?"
असं मिपावर विचारावं असं वाटलं.
सुरवातीला कुठेतरी शिरस्ता म्हणून मी प्रत्येकाच्या प्रतिसादाला आभार म्हणून प्रतिप्रतिसाद द्यायचो.
चूकून एकदा मी खरडवह्यातल्या "खरडा" वाचायचा मोह केला.
"सामंतकाकांच्या लेखनाला २० प्रतिसाद आले की त्यांचे त्यावर २० प्रतिसाद येऊन त्यांना ४० प्रतिसाद मिळतात."
अशी चर्चा झाली.
"सामंतका आणि प्रतिसाद "
ह्या विषयावर माझ्यावर जास्त प्रेम करणार्या वाचका-वाचकामधल्या अशा चर्चा मला वाचायला मिळाल्या.इथपर्यंत की,
"अरे, आज सामंतकाका मिपावर दिसत नाहित"
इथपर्यंत चर्चा चालायच्या.
हे संवाद वाचून मला त्या
"ब्रम्हचारी"
हिंदी सिनेमातल्या गाण्याची आठवण यायची
"आजकल सामंतकाकाके (प्रतिसादके) चर्चे हर ज़बान पर
सबको मालूम है और सबको खबर हो गई "
असो.
हे सर्व जरा गंमत म्हणून लिहलं बरं का!
वाचा आणि सोडून द्या.आणि असंच प्रेम ठेवा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
7 May 2009 - 10:37 am | दशानन
=D>
थोडेसं नवीन !