/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}
योगामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे सुपरिणाम लक्षात आल्यावर आणि योगाला जगभर प्रसिद्धी मिळाल्यावर त्यामागचे अर्थकारण लक्षात घेऊन पाश्चिमात्य देशांमध्ये व इतरत्रदेखील आर्थिक प्राप्तीसाठी व्यावसायिक पद्धतीने योगाचा वापर सुरू झाला. योगासने आणि प्राणायाम शिकवण्यासाठी योग प्रशिक्षण वर्ग जागोजागी सुरू झाले. पुढे त्यांची संख्या एव्हढी वाढली की त्याला 'मॅकयोगा' (McYoga) अशी संज्ञा मिळाली. आजकालच्या सोशल मीडियाचे आणि डिजिटल जगाचे अर्थप्राप्तीसाठी योगाकडे लक्ष न जाते तर नवलच! त्यामुळे आंतरजालावर योगाचा प्रसार झाला. प्रकृतिस्वाथ्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी, विविध व्याधिमुक्तीसाठी, इतर अनेक कारणांसाठी, तसेच केवळ कुतूहलापोटी एक कूल ट्रेंड किंवा फॅशन स्टेटमेंट म्हणून योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली. योगाचा जगात सर्वत्र प्रसार झाल्याने आणि त्यातील फायदे लक्षात आल्याने विविध वंश, संस्कृती, भाषा, वर्ग, वयोगट, लिंग, आर्थिक स्तर, राष्ट्रीयत्व आणि धार्मिक श्रद्धा, संप्रदाय असणाऱ्या लोकांनी योगाचा अंगीकार केला, त्यामुळे योग सर्वसमावेशक झाला. पर्यायी औषधोपचार पद्धती म्हणून व्याधी प्रतिबंध आणि निवारण यासाठी (Yoga-Chikitsa) योगाचा वापर सुरू झाला. अशा रीतीने McYogaपासून सुरू झालेला योगाचा प्रवास RxYogaपर्यंत येऊन पोहोचला. उपजीविकेसाठी योगावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. योग व त्या अनुषंगाने इतर व्यवसायांची उलाढाल अब्जावधी डॉलर्सवर जाऊन पोहोचली आणि जगभरात योग-व्यवसाय सुस्थापित झाला, त्याला Yoga Inc. असे नाव मिळाले. पुढे अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता योगाचे सांस्कृतिक अपहरण केले गेले, त्याचा आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
योग ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या भावनेने भारताने जगाला मोफत दिलेली Open source bio-technology आहे. भारतामध्ये हजारो वर्षांच्या परंपरेने चालत आलेली योगासने, मुद्रा, प्राणायाम, ध्यानधारणा प्रत्येकासाठी उपलब्ध असून त्याचा कोणीही ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे उपयोग करून त्यापासून होणारे फायदे मिळवू शकतो. योगावर भारतामध्ये भरपूर ग्रंथसंपदा उपलब्ध असून गेली हजारो वर्षे आणि शेकडो पिढ्या भारतीय त्यांच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित योगाभ्यास करत आलेले आहेत. भारताबाहेर - विशेषतः पाश्चात्त्य देशांतील योगाचा शिरकाव फारतर एका शतकाहून थोडा अधिक आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये खऱ्या अर्थाने जनसामान्यांमध्ये योगाचा प्रसार झाला आहे. खरे तर योग हा केवळ एक प्रकारचा व्यायामप्रकार न मानता सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी लागणारी जीवनपद्धती आहे. परंतु आर्थिक प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवून योगाचे व्यावसायिकीकरण करण्यात आले आहे.
योग पाश्चात्त्य देशांमध्ये दाखल होऊन जेव्हा त्याला हळूहळू प्रसिद्धी मिळत होती, त्या कालावधीत महर्षी पतंजलींच्या योगसूत्रातील 'योग: चित्तवृत्ती निरोधः' ह्या महत्त्वाच्या सूत्राला आणि योगातील मंत्र, प्रार्थना, प्राणायाम इत्यादींना वगळून, काही विशिष्ट साधनांच्या साहाय्याने आसनांप्रमाणे शारीरिक आकृतिबंध, कसरत किंवा कवायत करून स्नायूंची ताकद, संतुलन आणि लवचीकता मिळवण्यासाठी योगसदृश व्यायामप्रकार अस्तित्वात आला. ज्यांना व्यायामशाळेतील ताकदीचे, कष्टप्रद, वजन उचलण्याचे किंवा एरोबिक्स वा अॅक्रोबॅटिक्स प्रकारचे व्यायाम करायचे नव्हते आणि ज्यांना योगातील आध्यात्मिक तत्त्वांमुळे, प्रार्थनेमुळे किंवा त्यांच्या स्वतःच्या धार्मिक श्रद्धेमुळे योगाची नावड होती, असे लोक त्या नवीन प्रकारच्या व्यायामाकडे वळले. 'योग स्टुडिओ'प्रमाणे त्या व्यायामप्रकाराचे स्टुडिओ सुरू झाले. ज्यांचा योगाबद्दलचा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित होता आणि ज्यांना भारतीय परंपरेबद्दल अनास्था होती, अशा लोकांसाठी योगासारखेच फायदे देणारा पर्याय उपलब्ध झाला.
पाश्चात्त्य देशांमध्ये आणि विशेषतः अमेरिकेमध्ये योग प्रसिद्ध होऊन जनसामान्यांमध्ये रुळल्यावर योगातील विविध आसनांची संस्कृतोद्भव नावे लक्षात ठेवणे आणि उच्चारणे गोऱ्या मंडळींना अवघड जाऊ लागले. त्यामुळे आसनांना 'हेड स्टँड', 'शोल्डर स्टँड', 'डॉग पोझ', 'कॉर्प्स पोझ' अशा प्रकारची इंग्लिश नावे मिळाली. मात्र काही ठिकाणी योगासनांना विचित्र नावे देऊन अवहेलना केली गेली. पद्मासनाला दिलेले 'criss-cross applesauce' किंवा प्राणायामाला दिलेले 'water, whiskey, coffee breathing' ही नावे याचे उदाहरण आहे. अर्थात इंग्लिश नावांमुळे योगवर्गांमध्ये शिकवताना योगशिक्षकांना सोपे जाऊ लागले. परंतु पुढे काही शिक्षकांनी योगाची परंपरा (lineage) नाकारली. योगातील प्रार्थना, मंत्रोच्चार आणि योगाचेया भारतीय मूळ यांचा ऋणनिर्देश करणे टाळायला सुरुवात केली. काही योगशिक्षकांनी योगाला 'तंदुरुस्तीसाठीचा व्यायामप्रकार' (fitness regime) असे स्वरूप दिले. योगाभ्यास करताना केवळ शारीरिक कार्यक्षमता, लवचीकता, समतोल समन्वय, स्नायूंची ताकत व सहनशक्ती ह्या बाबींवर लक्ष केंद्रित करून एका पाठोपाठ, सलग, न थांबता वेगवेगळी आसने व दमछाक करून घाम गाळून कॅलरी जाळण्यासाठी प्राधान्य दिले. योग ही विक्रेय-वस्तू (commodity merchandise) झाली. त्यामुळे पाश्चात्त्य देशांतील योगाभ्यास त्याच्या मूळ तत्त्वांपासून दूर गेला. परंतु केवळ योगासने करून शारीरिक स्वाथ्य मिळवताना त्याचा चांगला साइड इफेक्ट म्हणजे संज्ञानात्मक कार्य (cognitive functioning), भावभावना नियंत्रण, ताणतणावमुक्ती व नियंत्रण, मनो-देहभान (mind body awareness - mindfulness) हे मानसिक स्वास्थ्याचे फायदे आपोआप झाले, हा भाग अलाहिदा.
योगातील तत्वे समजून न घेता केवळ योगासने व प्राणायामाचे काही प्रकार शिकून आणि योगशिक्षकाचे वीकांताचे अतिजलद अभ्यासक्रम (weekend crash courses) करून अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या व स्वतःला योगी अथवा योगिनी (postural Yogi / Yogini) म्हणवणाऱ्या काही अतिचतुर, ढोंगी व बनावट योगशिक्षक मंडळींनी बर्गरानंद किंवा पिझ्झादेवी तत्सम नावे धारण करून मूळ योगासनांमध्ये काही किरकोळ फेरबदल केले व ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला. विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींसाठी वेगवेगळे योगोपचार सुरू करून काही योगासनांचा विशिष्ट क्रम ठरवून किंवा योगवर्गामध्ये उच्च तापमान आणि आर्द्रता ठेवून योगाला वेगळे स्वरूप दिले. स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हव्यासापोटी भारतातील प्राचीन, सार्वजनिक आणि प्रताधिकारमुक्त असलेल्या योगासनांवर स्वतःची 'बौद्धिक संपदा' असल्याचा हास्यास्पद आणि निरर्थक दावा केला. स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पेटंट ऑफिसमध्ये अर्ज दाखल केले. भारतातील आयुर्वेदिक आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित हळदीच्या आणि कडूलिंबाच्या औषधी गुणधर्मांसाठी केलेल्या पेटंट संदर्भातील दाव्याच्या अनुभवातून धडा घेऊन भारताने योगासने आणि प्राणायामाचे Traditional Knowledge Digital Library (TKDL)च्या माध्यमातून digital दस्तऐवजीकरण केले व अशा प्रकारच्या योगाच्या चाचेगिरीच्या गैरप्रकारांना आळा घातला, ही समाधानाची बाब आहे.
योग वर्गांमध्ये जाऊन योगाभ्यास करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला, तर त्यात मुख्यतः शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य (general wellness), व्यायाम (physical exercise), तणाव व्यवस्थापन (stress management), आध्यात्मिक अनुभूती (seeking a spiritual experience) ह्या कारणांचा समावेश होतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून शारीरिक स्वास्थ्य मिळून मानसिक आरोग्यामध्येदेखील सुधारणा होते (Psychophysiology of Yoga) असे आढळून आल्याने योगाची लोकप्रियता वाढत गेली. योगसाधना मूलतः 'स्व'चा (selfचा - 'मनस'चा) वैश्विक चैतन्याकडे (universal consciousnessकडे - चित्ताकडे) होणारा अंतर्गत प्रवास असला आणि योगाला कोणत्याही धार्मिक चौकटीत बद्ध करण्याची गरज नसली, तरी जगातील काही मंडळींचा योगाला विरोध आहे. केवळ भारतीयांना ज्ञात असलेल्या पंचप्राण, इडा-पिंगला-सुषुम्ना नाडी, कुंडलिनी, षट्चक्रे, चक्रभेदन इत्यादी संकल्पना इतरत्र आणि आधुनिक वैद्यकशास्त्रालादेखील माहीत नसल्याने अज्ञान, द्वेष आणि योगफोबिया (Yoga-phobia) यामुळे योगाला अशुभ, आसुरी (demonic) स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. योगातील विविध आसने आणि प्रार्थना भारतीयांच्या तीन तोंडे आणि चार हात असणाऱ्या देवतांचे प्रतीक असल्याचे सांगून लोकांना योग करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु योगातील फायदे लक्षात आल्याने लोकांनी नेटाने योगासने करणे चालू ठेवले. त्यामुळे मूळ योगातील प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पूजा, इष्टदेवतेची ध्यानधारणा इत्यादी आध्यात्मिक भाग (spiritual aspect of Yoga) काढून टाकून योगाला आपल्या प्रार्थना जोडून योगासनांना नवीन नावे देऊन नव्या स्वरूपात सादर केले. हे योगाचे सांस्कृतिक अपहरण (cultural appropriation of Yoga) आहे, असे म्हणता येईल.
योगसाधनेतील आसने, प्राणायाम, आणि ध्यानधारणा यांद्वारे शारीरिक तंदुरुस्ती (fitness), स्वयंनियमन (self-regulation), जाणीव व जागरूकता (awareness), अध्यात्म (spirituality) अशा बाबींमध्ये सुधारणा होऊन मानवी कार्यक्षमतेमध्ये (global human functionality) सर्वांगीण सकारात्मक बदल होतो आणि त्यामुळे जीवनाची गुणवत्ता (quality of life) उंचावते. परंतु हे लक्षात न घेता पाश्चात्त्य देशांमध्ये योगाला फक्त फिटनेस कमोडिटी केले गेले. अशा रीतीने योग एक ग्राहकोपयोगी उत्पादन (consumer product) झाला. हा 'योग' प्रॉडक्ट विकण्यासाठी मोठी इंडस्ट्री (Yoga Inc.) तयार करण्यात आली. अगदी व्यावसायिक पद्धतीने विविध वृत्तपत्रे, मासिके यांमध्ये कमनीय बांध्याच्या सुपर मॉडेल्स गौरांगनांच्या विविध आसनांच्या फोटोद्वारे जाहिराती करण्यात आल्या. दूरदर्शनच्या आणि आंतरजालाच्या माध्यमातून योगासनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येऊन योगाचे 'कॉस्मिक ब्युटी'ऐवजी 'कॉस्मेटिक ब्युटी' असे प्रमोशन करण्यात आले. व्यवसायवाढीसाठी योगाचे वेगवेगळे प्रकार शोधण्यात आले. योगाची आधुनिक व्यायामशाळेतील HIIT व्यायामप्रकाराशी भेसळ करून HIIT-Yoga तयार करण्यात आला. त्याव्यतिरिक्त Trapeze Yoga, Aerial Yoga, Goat Yoga, Forrest Yoga, Beer Yoga, Chocolate Yoga, Acro Yoga, Power Yoga, Yin Yoga, Holy Yoga, Partner Yoga, Boxing Yoga, नाइट क्लबमधील Rave Yoga असे विविध प्रकारचे 'योग' बाजारात आले. सद्य:स्थितीला भ्रष्ट भेसळासनाचे पन्नासहून अधिक योगचौर्य प्रकार उपलब्ध आहेत. आंतरजालावर योग आणि 'नमस्ते' यासारख्या अभिवादनासंबंधित विकृत वेब सेरीजचा सुळसुळाट झाला आहे. मोठी रक्कम आकारून कुंडलिनी जागृत करून देण्याचा दावा करणारे पोटभरू, तथाकथित योग-गुरु उपलब्ध आहेत. हेदेखील योगाचे सांस्कृतिक अपहरण आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे मानवी जीवनाचे अंतःस्थ जग (मनातील - inner world) आणि बहि:स्थ जग (बाहेरचे, भौतिक - outer world) असे दोन भाग असतात. बाह्य जग कितीही चांगले असले, तरी अंतःस्थ जग चांगले नसेल तर बाह्य भौतिक जगाचे सौख्य पूर्णतः मिळत नाही; मात्र अंतःस्थ जग चांगले असेल, तर बाह्य जगातील अडीअडचणींचा समर्थपणे सामना करता येतो. योगामुळे अंतःस्थ जग शांत, आनंदी होते. परंतु सद्यकालीन पाश्चात्त्य जगातील योगाचे स्वरूप Yoga by the body for the mind, for the intelligence असे न राहता दुर्दैवाने Yoga by the body for the body असे झाले आहे. योगसाधना आणि योग जीवनशैलीमुळे उपभोगवाद किंवा चंगळवाद यावर अवलंबून न राहता मानसिक समाधान, आनंद आणि शांती मिळणे शक्य असूनदेखील आजकालच्या internetच्या जमान्यात योगाच्या माध्यमातून 'inner-net'कडे प्रवास करण्याची संधी आपण गमावत आहोत काय? आत्मानुभूती तंत्रज्ञान (Technology of Enlightenment) असलेल्या सांख्य आणि द्वैतवादी योगसाधनेला मूळ स्वरूप पुनश्च प्राप्त होऊन त्याद्वारे सर्व जगाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा लाभ होवो, हीच योगमहर्षी पतंजलींच्या चरणी प्रार्थना.
सर्वे सन्तु निरामया।
प्रतिक्रिया
5 Nov 2022 - 6:47 pm | कुमार१
लेख आवडला
मुद्द्यांशी सहमत आहे
6 Nov 2022 - 7:23 pm | कंजूस
१)भारतात कुणाकडे आहेत आणि किती जुने आहेत?
२)ऋषिकेशला आश्रमांतून नक्की काय शिकवतात?
7 Nov 2022 - 6:48 pm | स्वधर्म
पटले. असंच आयुर्वेदाच्या बाबतीतही होत आहे. परदेशीच नव्हे, तर भारतियांकडूनही योग व आयुर्वेद यांचे व्यापारीकरण होत आहे. एखादी गोष्ट विकावू झाल्यामुळे ती अनेक लोकांना उपलब्ध होऊ लागते, तिचा वेगाने प्रसार होतो; पण बरोबरीने मूल्यही घसरत जाते. काही प्रमाणात हे अटळ आहे की काय असे वाटते.
8 Nov 2022 - 3:01 pm | श्वेता व्यास
लेखातील विचारांशी सहमत आहे. शिवाय जेव्हा पाश्चात्य जगात योगाला महत्त्व मिळू लागले तेव्हा त्यांचं बघून भारतीयांना आपल्या मूळ योगाची महती समजली ही त्याहून लाजिरवाणी गोष्ट आहे.
10 Nov 2022 - 12:59 pm | सविता००१
अतिशय आवडला लेख
10 Nov 2022 - 7:38 pm | कर्नलतपस्वी
पाश्चात्त्य देशांतील योगाभ्यास त्याच्या मूळ तत्त्वांपासून दूर गेला. परंतु केवळ योगासने करून
सहमत आहे. योग म्हणजे फक्त वेगवेगळी आसने एवढंच लक्षात घेऊन त्याचे व्यापारीकरण केले.
लेखकाचे आभार.
11 Nov 2022 - 7:50 pm | टर्मीनेटर
उत्तम आढावा! अभ्यासपूर्ण लेख आवडला 👍
14 Nov 2022 - 1:57 am | चामुंडराय
आंतरजालावर उपलब्ध असलेली काही चित्रं / फोटोज् लेखाबरोबर पाठवली होती परंतु काही कारणवश ती लेखाबरोबर प्रसिद्ध झालेली दिसत नाही.
ती येथे देत आहे. जर मिपा च्या तत्वात बसत नसतील तर उडवावीत, हि विनंती.
अशाप्रकारच्या व्यंगचित्रांमुळे "योग" पाश्चात्य देशांमध्ये हास्यास्पद झाला आहे.
14 Nov 2022 - 2:49 am | चामुंडराय
दुकानातील "Yoga mannequins" चे उदाहरण.
योगाचा जाहिरातीसाठी वापर.
वेगवेगळ्या योगासनांचे पुतळे / बाहुल्या उपलब्ध आहेत.
14 Nov 2022 - 3:02 am | चामुंडराय
वेगवेगळ्या प्राण्यांबरोबर योग केला जातो.
हा योगाची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे का?
14 Nov 2022 - 3:07 am | चामुंडराय
14 Nov 2022 - 3:15 am | चामुंडराय