दिवाळी अंक २०२२ - ऑनलाइन शॉपिंग

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 10:54 am

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);}
/* System */
.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}
.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}
@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}
.field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)

ऑनलाइन शॉपिंग म्हणताच डोळ्यापुढे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, जिओ यासारखी नावे येतात.

खरे तर ऑनलाइन शॉपिंग ही फार जुनी व एकेकाळी रूढ असलेली संकल्पना आहे. खरेदीसाठी ग्राहकाने बाहेर न पडता विक्रेतेच ग्राहकाच्या दारी पोहोचतात. पन्नास-एक वर्षांपूर्वी ग्राहकांना थेट विक्री करणारे असे अनेक विक्रेते होते आणि चांगला व्यवसाय करत होते.

'सौभाग्य वस्तुभांडार' अशी पाटी असलेली निळी हातगाडी घेऊन एक सिंधी गृहस्थ आमच्या भागात नियमितपणे यायचा. साधी चारचाकी हातगाडी. काचेतून सर्व वस्तू मांडलेल्या असायच्या, नावावरून कल्पना आलीच असेल की या गाडीवर पावडरी, कुंकू, रिबिनी, टिकल्या, बांगड्या, गंगावन अशा वस्तू असायच्या. गाडीवर पोंगा बसवलेला होता. सकाळी दहाच्या सुमारास पांढरा लेंगा, पूर्ण बाह्यांचा पांढरा सदरा, तेल लावून मागे वळवलेले दाट केस, चेहर्‍यावर काही वण असा उजळ वर्णाचा, चांगली उंची असा सिंधी गृहस्थ गाडी ढकलत यायचा.

दादरला आजीकडे येणारा वसईचा भाजीवाला असाच. गुडघ्याइतके धोतर, अर्ध्या बाह्यांचा सदरा, वर काळे जाकीट आणि डोकावर काहीशी उभी पण गोलाकार गडद तपकिरी टोपी. हा गृहस्थ खांद्यावर दोन मोठ्या टोपल्यांची कावड घेऊन ताज्या भाज्या विकायला यायचा. कुणा तरी एकाच्या घरी टोपल्या उतरवायच्या आणि आजूबाजूच्या बिर्‍हाडांना निरोप जायचे. काम मोठ्या कष्टाचे, पण थेट ग्राहकाला विकून त्यालाही दोन पैसे अधिक मिळत असावेत आणि ग्राहकांना घरबसल्या ताजी भाजी वाजवी दरात मिळायची.

सकाळी सकाळी येणारा इडलीवाला, “मिठाची गाडी आली, बारीक मीठ..” असे ओरडत येणारा मीठवाला, तूपवाली, तांदूळवाल्या, भेळवाले, आइसक्रीमची गाडी. आइसफ्रूट खरेदी ही खरी ऑनलाइन खरेदी. इतर फेरीवाल्यांप्रमाणे हा काही गाडी वर घेऊन येऊ शकत नव्हता, मग आम्ही पोरे वरून ओरडून कुठले आइसफ्रूट हवे, ते सांगायचो आणि लांब दोरी बांधलेल्या पिशवीत पैसे टाकून पिशवी खाली सोडायचो, तो त्या पिशवीत आइसफ्रूट ठेवायचा व आम्ही पिशवी दोरीने वर ओढून घ्यायचो. यात मोठी धमाल असायची. वरच्या मजल्यावरून आलेली पिशवी वर जातान आम्ही काठीने ओढून घ्यायचो, तर आमच्या खालच्या मजल्यावरचे आमच्या पिशव्या ओढायचे. मग पिशवी सोडताना सगळे आपल्या खालच्या मजल्यांवर पाळतीला हेर पाठवायचे.

बिस्किटवाला तर खासच. पत्र्याची भली मोठी पेटी डोक्यावर घे‌ऊन बिस्किटे, नानकटा‌ई, बटर, जिरा बटर, टोस्ट असे अनेक प्रकार त्या पेटीत घे‌ऊन फिरणाऱ्या बिस्किटवाल्याने आपली पेटी डोक्यावरून खाली उतरवली की सगळे प्रकार पाहायला मजा यायची. राजापुरी पंचांपासून सोलापुरी चादरींपर्यंत अनेक कापड विक्रेते यायचे. झालेच तर कुणाची तरी ओळख सांगत साडीवाले यायचे. एप्रिल उजाडला की आंबेवाले सुरू व्हायचे. आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे बोहारणी. सहसा बोहारी फार क्वचित आणि असला, तरी सौदा बरोबरची बोहारीण करायची. डोक्यावर भली मोठी टोपली आणि बखाटात पोर घे‌ऊन बोहारणी यायच्या आणि बायकांना हवी असलेली भांडी व बोहारणींना हवे असलेले कपडे यावरून जी घासाघीस व्हायची, ती बघण्यासारखी असायची.

आता सगळेच विक्रेते सरळ साव होते अशातला भाग नाही. तांदूळवाल्या बायका म्हणजे हमखास बनवेगिरी. “ए बाय, तुला म्हणून स्वस्तात देते, शेजारणीला सांगू नको” असे गोड बोलत या बायका त्यांच्या तथाकथित घरचा तांदूळ बाजारापेक्षा स्वस्त विकायच्या. बोलण्यात त्या बायका गृहिणींना अशा काही भुलवायच्या की त्या जा‌ईपर्यंत घेणारी बा‌ई खुशीत असायची की बरा स्वस्तात चांगला तांदूळ मिळाला. मग लक्षात यायचे की आपल्या पाच किलोच्या दोन डब्यात मिळून पंधरा किलो तांदूळ मावलेच कसे? तर हा सगळा खोट्या मापाचा प्रताप. या बायका कधीही वजन काटा बाळगायच्या नाहीत, तर बोर्नव्हिटा किंवा तत्सम एक किलोचा डबा माप म्हणून आणायच्या. या डब्याला आतून तळापासून वर उचललेला दुसरा तळ असायचा, जो त्या सफा‌ईने लपवायच्या.

पुढे बदलत्या काळाबरोबर जागांचे स्वरूप बदलले, सामाजिक रचना बदलली आणि फेरीवाले कमी झाले. पुढे याच दारावर येणाऱ्या विक्रेत्यांचे रूपांतर बहुधा पटलावर दिसणाऱ्या थेट विक्री संस्थांमध्ये झाले. बघता बघता ऑनला‌इन खरेदी हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला. सुरुवातीला कुतूहल म्हणून खरेदी करणारे मग नियमित खरेदी करू लागले आणि लोकांना ऑनला‌इन खरेदीचे वेड लागले. ग्राहकांना या व्यवस्थेचे अनेक फायदे दिसून आले. दिव्यातल्या राक्षसाप्रमाणे हवी ती वस्तू घरपोच आणून देणारी ही व्यवस्था ग्राहकांना न आवडली तरच नवल. बाजारात जायला वेळ नाही, रस्त्याला गर्दी, वाहन ठेवायला जागा नाही.. त्यापेक्षा बसल्या जागी मागवा, हे बरे.
गेल्या दशकांत रुजलेल्या आणि अफाट लोकप्रिय झालेल्या या यंत्रणेने ग्राहकांच्या गरजा, आणि दुकानदारांकडून मिळत नसलेल्या -विधा सवलती यांचा उत्तम सखोल अभ्यास करून आपले जाळे विणले. दुकानदार वस्तू अनेकदा परत घ्यायला खळखळ करायचे, पैसे परत न देता दुसरी वस्तू घ्यायला सांगायचे; अगदी नाइलाज झाला तर पैसे परत द्यायचे, पण तेही तथाकथित टॅक्स कापून. घेतलेला कपडा बदलायचा तर ’शनिवार रविवार बदली होणार नाही, इतर दिवशी दुपारच्या वेळात या, गर्दीच्या वेळात बदली होणार नाही’ असा खाक्या. लहान मुलांच्या बाबतीत जर आणलेला कपडा लहान वा मोठा निघाला, तर हवा त्या मापात तोच कपडा मिळायचा नाही. वर ’इथे भाव होत नाही’ असा रुबाब असायचा.

हे सगळे अचूक हेरून ऑनलाइनने आपला जम बसवला. अगदी वाहनापासून भाजीपर्यंत आणि विमानाच्या तिकिटांपासून ते औषधांपर्यंत सर्व काही उपलब्ध झाले. एकदा या खरेदीची ओळख होताच ग्राहकाला अनेक फायदे दिसून आले. सर्वप्रथम आजकालच्या जमान्यात जिथे लोकांना घरी यायलाच उशीर होतो, तिथे बाजारात कधी जायचे? दुसरे म्हणजे दुकानादुकानातून फिरण्यापेक्षा एकाच जागी अनेक नामांकित उत्पादने हजर! चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी उपकरणे, किराणा माल, खाद्यपदार्थ, कपडे, प्रवासाच्या वस्तू, शैक्षणिक सामग्री, अवजारे, यंत्र, फर्निचर, छंदांसाठी लागणाऱ्या वस्तू.. सर्व प्रकार उपलब्ध. शिवाय भुलवायला अनेक प्रलोभने. अनेक नामांकित कपडे कुठल्याही दुकानापेक्षा स्वस्त, नको असल्यास विनामूल्य बदलून देण्याची सोय वा पैसे परत मिळण्याची हमी याखेरीज घरपोच सेवा हे आकर्षण ठरले. आज माझ्यासारखा माणूस पाच लीटर खाद्यतेल विकत घ्यायचे, तर अ‍ॅमेझॉन, जि‌ओ, बिग बास्केट यासारख्या अनेक संकेतस्थळांना क्षणात भेट दे‌ऊन सर्वात किफायती दर असेल तिथून विकत घेतो.

किराणा दुकानदार जर तेलाच्या पाच लीटर डब्याचे ११०० रुपये घेत असेल आणि तेच जर जालावर ९०९ रुपयांना मिळत असेल, तर १९१ रुपये अधिक का मोजायचे? चहा एक किलोचे ५७० म्हणजे छापील किंमत आकारली जाते आणि ऑनला‌इन ४२५-४७५ रुपयात घरपोच! अगदी लिवा‌ईजची डेनिझेन बखी १५००-१९०० दुकानातली किंमत आणि इकडे ५००-६०० रुपये! हश पपी सॅण्डल दुकानात २७९९ आणि इकडे १७२५.. मग ग्राहकाने का घे‌ऊ नये?

किमतीव्यतिरिक्त बसल्या जागी मागवायचे आणि घरपोच मिळवायचे सुख. वस्तू मापाची नसली वा आवडली नसली, तर सहज बदलून मिळते वा पैसे परत मिळतात. अगदी नामांकित पादत्राणे अर्ध्याहून कमी किमतीत आणि अगदी अस्सल आणि नवे उत्पादन, तेही बदलीच्या वा परतीच्या बोलीवर! अनेकदा एकासारख्या दोन वस्तू मागवून आवडली ती ठेवायची आणि नको ती परत करायची, ही सुविधा अन्य कुठे मिळणार? मात्र यासाठी वस्तू टोपलीत टाकण्याआधी ती परत केली जाऊ शकते की फक्त बदलून दिली जाते की काहीच नाही, हे नीट तपासून पाहायला हवे.

ऑनला‌इनमुळे अनावश्यक खरेदी होते असा एक आक्षेप असतो, पण ते आपल्यावर अवलंबून आहे. क्रेडिट कार्डच्या बाबतीतही अशीच भीती एकेकाळी होती. पण आजकाल ती सररास वापरली जातात. मॉलपेक्षा तर जाल खरेदी निश्चितच बरी. मॉलमध्ये उगाच दिसले म्हणून काहीतरी घेतले जाते, उलट जालावर अनेकदा आपण टोपलीत भरलेल्या वस्तू प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी काढून टाकतो, असा माझा अनुभव आहे. आणि हो, टोपली ही आणखी एक उत्तम सुविधा. जे जे बरे वाटेल ते टोपलीत भरत जायचे, म्हणजे ’ मघाशी बघितलेले छान होते, पण आता कुठे शोधणार’ ही कटकट नाही. शेवटी नजर मारायची, अनावश्यक वाटेल ते वा आवडले नसेल ते काढून टाकायचे.
मध्यंतरी ऑनलाइन खरेदीवर व्यापारी वर्गाने बराच आवाज उठवला होता. गंमत म्हणजे देशभक्तीलाही साद घातली होती की म्हणे आपला पैसा परदेशी जातो! जर सगळे देशाभिमानी होते, तर वर्षानुवर्षे लिवर, कोलगेट. पी अँड जी इत्यादींची उत्पादने का बरे विकली? आणि हे जालविक्रीवाले आपल्याच देशात तयार झालेल्या, आपल्याच बाजारात असलेल्या वस्तू विकत आहेत! आता ग्राहकाला किफायती किंमत, घरपोच सेवा, बदलीची वा परताव्याची सुविधा, भरपूर पर्याय, वर खरेदीवर बक्षीस हे सगळे करूनही जर ही मंडळी उत्तम नफा कमवत असतील, तर अंतर्मुख हो‌ऊन व्यापाऱ्यांनी आपली व्यापारशैली बदलायला हवी, अधिक ग्राहकाभिमुख व्हायला हवे.

कोरोना काळात जेव्हा कडक लॉकडाउन लागला, तेव्हा कोपऱ्यावरचा वाणीदादाच उपयोगी पडला अशा आशयाच्या पोस्ट फिरत होत्या. ते खरही आहे, पण हेही खरे आहे की तो अनिश्चिततेचा कालखंड व्यापाऱ्यांनाही तितकाच लाभदायक ठरला. गेल्या दोन-तीन वर्षांत न खपलेल्या सर्व वस्तू अगदी छापील किमतीला विकल्या गेल्या. यात ‘बिग बझार’सारख्यांनीही हात धुऊन घेतले व न मागवलेल्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारल्या.

जालविक्रीची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे रोजगारनिर्मिती. प्रत्येक शहरात हजरो तरुण-तरुणींनाही यामुळे कमा‌ईची संधी मिळली आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी या व्यवसायाशी संलग्न उद्योग करणाऱ्या उद्योजकाने अशी माहिती दिली होती की जर एखाद्या व्यक्तीची स्वत:ची दुचाकी असेल आणि इंग्लिश वाचता येत असेल, तर या कंपन्या महिना १७००० रुपये दे‌ऊ करतात. अर्थातच अ‍ॅमेझॉनसारख्या संस्थांमध्ये बुद्धिजीवींसाठीही रोजगार उ‌पलब्ध झालेच आहेत.

जे ते करू शकतात, ते व्यापारी का करू शकत नाहीत? माझ्यासारख्या माणसाला अनेक वर्षाचे संबंध असलेल्या दुकानदाराकडून खरेदी करायला निश्चितच आवडेल, पण त्यासाठी दुकानदारांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर जालखरेदीवाल्यांना छापील किमतीपेक्षा १५-२०% कमी दरात विक्री करून, घरपोच सेवा दे‌ऊन जर नफा कमावता येत असेल, तर व्यापाऱ्यांना ते का जमू नये? प्रत्येक शहरातल्या व्यापाऱ्यांची संघटना असतेच. या संघटनांनी एकत्र खरेदी केली, तर कदाचित त्यांनाही उत्पादकाकडून कमी दर मिळू शकेल. एकतर खरेदी किंमत अधिक असणार, नाहीतर नफा अधिक असणार! नाहीतर व्यापारी आणि जाल विक्रेते यांच्या दरात इतकी जफावत का? एकाच भागातील अनेक प्रकारचे व्यापारी एकत्र ये‌ऊन एखाद्या वितरण सेवेशी करार करून ग्राहकांनी घरपोच सेवा का दे‌ऊ शकत नाहीत? याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे औषधांचे दुकानदार. जालावर कमी किमतीत औषधे मिळतात हे लक्षात येताच त्यांनी सकारत्मक धोरण स्वीकारळे. मी जेव्हा माझ्या नेहमीच्या औषध दुकानदाराला मोकळेपणानं सांगितले की “जालावर सहज १५% सूट मिळते, जर तुम्ही अशी काही सूट दिलीत तर मला तुमच्याकडूनच घ्यायला आवडेल”, तेव्हा त्या दुकानदाराने मला तत्काळ १०% सूट मान्य केली, घरपोच सेवाही दे‌ऊ केली. मग थोड्या फरकासाठी मी त्याला सोडून बाहेर वा जालावर का जावे?

जालविक्रीविरोधात जाण्यापेक्षा व्यापारी अधिक ग्राहकाभिमुख भूमिका का घेत नाहीत? मला जालखरेदीचा अतिशय चांगला अनुभव आला आहे. कुठलीही तक्रार केली की नीट ऐकून घेतली जाते आणि त्वरित निरसन केले जाते. एकदा किराणा सामान खोक्यातून न येता सुटे आले आणि डाळीचे पाकीट कोपऱ्यात फाटून डाळ सांडली होती. तक्रार नोंदवून फोटो पाठवले. तत्काळ दिलगिरी व्यक्त करत दोन दिवसात नवीन पाकीट पाठवले. हाच अनुभव रसगुल्ल्यांच्या बाबतीत. कोलकात्याच्या एका नामांकित दुकानातून एका संकेतस्थळाद्वारे मी दोन डबे मागवले. ब्ल्यू डार्टसारख्या नामांकित सेवेकडूनही डबे थोडे दबलेले होते आणि पाक बाहेर ये‌ऊन वेष्टण चिकट झाले होते. त्या संकेतस्थळाशी संपर्क साधला व त्यांच्या विनंतीनुसार फोटो व व्हिडि‌ओ पाठवला. काही तासातच नव्याने त्याच वस्तू पुन्हा व विनामूल्य पाठवत असल्याचे उत्तर आले व दोन दिवसात डबेही मिळाले. आणखी एक गंमत अशी की लॉयल कस्टमरबरोबरच लॉयल नसलेल्या कस्टमरनासुद्धा लाभ मिळतो. जे ग्राहक बराच काळ खरेदी करत नाहीत, त्यांना ‘मिस यू’ कोड पाठवून खास सूट दे‌ऊन परत आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे फायदा ग्राहकाचाच.

दुकानाची किंमत किती आहे, खर्च किती आहे याच्याशी ग्राहकाला काही देणे नसते. त्यासाठी त्याने अधिक पैसे का मोजावेत? आपण जर आपण नोकरी करत असलेल्या आस्थापनेच्या व्यवस्थापनाकडे मागणे केली की घरच्या गरजा व खर्च वाढले आहेत म्हणून माझा पगार वाढवा, तर ते मान्य हो‌ईल का? नाही. माझे काम आणि आस्थापनेला माझी गरज किती आहे यावर माझा पगार ठरतो, त्याचप्रमाणे मी ग्राहक म्हणून किफायती दर आणि उत्तम सेवा पाहूनच खरेदी करणार. आता केवळ परकीय नव्हे, तर देशी उद्योजकही जालविक्रीकडे वळले आहेत. प्रत्येक उद्योगाला आज थेट ग्राहकाशी संबंध प्रस्थपित करायचा आहे. उत्तम उदाहरण म्हणजे विमानसेवा. प्रवासी संस्था ज्या किमती सांगतात, त्याहून कमी किमतीत ग्राहकाला थेट संकेतस्थळावरून तिकीट मिळते. आज काळाची गरज ओळखून अनेक छोट्या दुकानदारांनी घरगुती वस्तू घरपोच द्यायला सुरुवात केली आहे. कुणी विशिष्ट रकमेच्या खरेदीवर मोफत घरपोच सेवा देतात, तर कुणी स्थानिक वितरण संस्थांशी संधान बांधले आहे, जे आपले पैसे वेगळे आकारतात.

थेट सेवांचाच एक नवा प्रकार म्हणजे ग्राहकाला हव्या त्या हॉटेलमधील हवे ते पदार्थ घरपोच करणाऱ्या सेवा. ‘फूड पांडा’ने फार लवकर गाशा गुंडाळला. त्यामानाने स्विगी आणि झोमॅटो फोफावत आहेत. मात्र कदाचित या दीर्घकाल टिकतीलच असे नाही. सुरुवातीला फक्त ३०-४० रुपये अतिरिक्त आकारून पदार्थ घरपोच करणारे हे लोक जरा जम बसून लोकांना बसल्या जागी मागवून घ्यायचे सवय लागताच बदलले. सुरुवातीच्या काळात एक पदार्थ मागवला तर ३०-४० रुपये जास्त वाटायचे, पण घरात खाणारे ३-४ असतील, तर तो आकार क्षुल्लक वाटायचा. मात्र गेल्या काही वर्षांत या लोकांनी सर्व सदस्य उपाहारगृहांचे स्वत:चे वेगळे दरपत्रक बनवले, ज्याचे दर मूळ उपाहारगृहाच्या दरापेक्षा ३०-४०% अधिक आहेत. या व्यतिरिक्त कसलेसे कर आणि पोहोचवायचे पैसे असा खाक्या सुरू झाला. जर पा‌ऊस पडत असेल तर अतिरिक्त आकार. उपाहारगृहात मिळणारी ६५ रुपयांची मिसळ यांच्या दरपत्रकात १०० रुपये असते. कर, पोहोचवण्याचा आकार वगैरे धरुन ६५ रुपयांचा पदार्थ १६०-१७५ला पडतो. म्हणजे रिक्षाने जा‌ऊन घे‌ऊन आले तरी स्वस्त पडेल. ज्या दिवशी हॉटेल्स स्वत:ची अ‍ॅप आणून घरपोच सुविधा चालू करतील, त्या दिवशी यांना गाशा गुंडाळावा लागेल.

तर या ऑनला‌इन खरेदीला पर्याय नाही. मात्र फाजिल खरेदीचा मोह टाळला, तर उत्तम.

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

7 Nov 2022 - 12:09 pm | एक_वात्रट

सर्वसाक्षी तुम्ही तर ऑनलाईन खरेदीचा संपूर्ण आढावाच घेतलात की!

माझेही विचार अगदी तंतोतंत असेच आहेत. छोट्या दुकानदारांविषयी मला जराही सहानुभुती नाही. किंमतीत मुळीच सवलत नाही, गि-हाईकांना निवडीची कसलीही मुभा नाही, वस्तू खराब निघाली तर बदलायची सोय नाही, चांगल्या वस्तुंऐवजी आपल्याला जी वस्तू विकून जास्त नफा मिळतो ती खपवणे अशा कृत्यांमुळे ह्या दुकानदारांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मी प्रत्येक वस्तू आजकाल महाजालावर विकत घेतो, छोट्या दुकानदारांकडे जाणे मी कटाक्षाने टाळतो.

अजून एक मुद्दा - अ‍ॅमेझॉन, मिंत्रा यांसारख्या कंपन्या मराठी मुलांना कामावर ठेवतात तर राजस्थानी, गुजराथी दुकानदार कटाक्षाने त्यांच्याच राज्यातील लोकांना कामावर ठेवतात हे माझे निरीक्षण आहे.

याबरोबरच १००% ऑनलाईन दुकाने क्रेडिट कार्ड वापरायची परवानगी देतात, त्यामुळे पैसे नंतर देण्याची सोय आणि रिवॉर्ड पॉईंटस मिळतात हेही आहेच.

सर्वसाक्षी's picture

7 Nov 2022 - 1:19 pm | सर्वसाक्षी

मराठी उद्योजकांची उत्पादनं विकायला ठेवत नाहीत हाही एक अनुभव आहे
चितळे, आठवले यांची सुशिला फुड प्रॉडक्ट्स, प्रभुदेसाई यांची पितांबरी...ही काही उदाहरणे

श्वेता व्यास's picture

7 Nov 2022 - 12:19 pm | श्वेता व्यास

छान लेख आहे. ऑनलाईन शॉपिंगची सवय लागलीच आहे.
स्विगी आणि झोमॅटो बाबत सहमत. कधीतरी इतकंसं काही मागवायचं म्हटलं तर पैसे भरताना हा भला मोठा आकडा समोर येतो आणि दर वेळेस जाऊदेत घरीच काहीतरी करू म्हणून मागवणं रद्द केलं जातं.

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 2:58 pm | कर्नलतपस्वी

शाॅपिंगची जबाबदारी मुलांनी घेतली आम्ही आमची हौस भाजीपाला खरेदीवर भागवतो. मुले म्हणतात "मोठ्ठी टोपली"Big Basket भाजी पण देते. पण निक्षून सांगीतले तेवढे सोडून बोला.

मला "संध्याकाळच्या कवीता" हा कविवर्य ग्रेस याचा कवितासंग्रह कसा ऑनलाईन घ्यावा हे शिकवले. आजची पिढी हुशार आहे. हळुहळू मला सवय लागावी हाच एकमेव उद्देश.

लेख आवडला ..

सरिता बांदेकर's picture

8 Nov 2022 - 9:28 pm | सरिता बांदेकर

तुम्ही खरंच छान लिहीलं आहे. ॲानलाईन शॅापिंगची सवय लॅाकडाऊनमध्ये झाली.
पण ॲानलाईन शॅापिंग करताना एका गोष्टीची उणीव भासते.
गल्लीत फेरीवाला येतो तो काय विकायला आलाय हे कळायला कान तयार व्हावे लागतात.
ती मज्जा ॲानलाईन शॅापिंगमध्ये येत नाही.
तुम्ही मस्त लिहीलं आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

8 Nov 2022 - 11:43 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे लेख. आवडला.

स्मिताके's picture

9 Nov 2022 - 12:37 am | स्मिताके

छान आहे लेख. तुम्ही लिहिलेले सर्व विक्रेते दारावर आलेले आठवतात. याशिवाय खरवसासाठी चिकाचं दूध विकणारा एकजण यायचा. "तुम्हारे नातू के लिये लाया है" म्हटल्यावर आ़जी नको कशी म्हणणार? नातवाला खरवस आवडतो हे तिनेच सांगितलेलं असायचं त्याला. कोणत्या वारी कोणते मासे हवेत ते लक्षात ठेवणारी कोळीण सुध्दा दारावर यायची. शेव चिवडा लाडू चकल्या वर्षभर ॲार्डर घेऊन दारात. एका तांदूळ विकणारीने आजीला फसवायचा प्रयत्न केला होता. मापाच्या डब्यात तळाला दाबून भरलेलं साडीचं पातळ कापड आजीने ओढून काढलं होतं, आणि त्या बाईने लगेच गाशा गुंडाळून पळ काढला होता.

या फिरत्या विक्रेत्यांच्या मालाची किंमत थोडी, त्यांच्याशी झालेली ओळख, त्यातून जाणवलेली त्यांची परिस्थिती यामुळे त्यांनी कधी फसवलं तरी फार मोठा धक्का बसत नसावा. जाऊदे, पोटासाठी करताहेत असं म्हणत असू. पुढच्या वेळी त्यांना जाब विचारत असू. त्यांनी काहीही उत्तर दिलं तरी त्यांना थापाड्या, खोटारडी म्हणून पुन्हा खरेदी करत असू.

आताच्या ॲानलाईन शॅापिंगमध्ये मात्र फसवणूक सहन करणं शक्य नाही.

कंजूस's picture

9 Nov 2022 - 1:38 am | कंजूस

लहान सहान वस्तू जर का स्थानिक दुकानात मिळत असतील तर ओनलाइन घेऊ नये.
हा दोरा आमच्या इथे छप्पन रुपयांना मिळतो. पाचशेच्या १४९ ला स्वस्त वाटेल पण खरी गोष्ट वेगळीच असते.

सस्नेह's picture

9 Nov 2022 - 7:00 am | सस्नेह

अगदी सहमत आहे. दुकानदारांच्या मानाने ऑनलाईन खरेदी फारच सोयीची आहे. दर तर अगदी वाजवी.

सौंदाळा's picture

11 Nov 2022 - 3:32 pm | सौंदाळा

लेख आवडला.
जेथे स्वस्त मिळेल तिथेच.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंबाबत ऑनलाईन चेक करुन व्हराईटी बघता येते, प्राईस रेंज, ऑफर्स समजतात. ते बघून (अभ्यास करुन) मी दुकानात जातो. जेथे वस्तू प्रत्यक्ष बघायला / हाताळायला मिळते. घ्यायची असेल तर सरळ ऑनलाईन किंमत सांगतो (ऑफर पकडून) ती किंमत मॅच केली किंवा त्यापेक्षा कमी केली तर दुकानातून घेतो. ऑनलाईन खरेदी ८-१० वर्षांपूर्वी नविन होती तेव्हा दुकानदार सरळ धुडकाऊन लावायचे किंवा तिकडे डुप्लिकेट माल मिळतो वगैरे सांगायचे पण आता मात्र नीट विचार करुन बोलतात.
फळे-भाज्या बिग बास्केट, जिओ मार्ट वगैरे वरुन घेतल्या (कोरोना काळात तर नियमितपणे), चिकन, मटण, मासे पण लिशियस, फ्रेश टू होम वगैरे वरुन. पण हे लोक बर्‍याच वेळा सरळ सरळ फसवतात. उदा. भेंडी १०० ची ८० रु किलो. पण मंडईत ती ६० रु किलो असते. तसेच याची गुणवत्तापण रामभरोसे असते. त्यामुळे मला भाज्या, फळे, नॉन व्हेज हे दुकानातून निवडून घ्यायलाच आवडते.
पॅक्ड फुड आणि ईतर पॅक्ड गोष्टी मात्र छोट्या दुकानातुन एमारपीवर घेण्यापेक्षा ऑनलाईन किंवा सुपर स्टोअर मधे स्वस्त मिळतात. आता तर औषधेपन ऑनलाईन मिळतात.
पुर्वी याच्याशी संबंधित वाचलेला एक विनोद - जेव्हा दारुची बाटली ऑनलाईन खरेदी करुन घरपोच येऊन रिकामी झालेली बाटली ओलएक्सवर विकता येईल तेव्हाच ऑनलाईन शॉपिंग पुर्णत्वास गेली असे मी मानेन.

तुमचा "ऑनडोअर्" शॉपिंगचा लेख आवडला.
ऑनलाइन ऑर्डर केलेली वस्तू दारात हजर म्हणजे जुन्या ऑनडोअर् खरेदीची आधुनिक आवृत्तीच.

मस्त आहे लेख 👍 लेन्सकार्ट पण भारी सेवा आहे. मध्यंतरी नवीन चष्मा बनवला तेव्हा स्थानिक ऑप्टीशिअनने फ्रेम, प्रोग्रेसिव्ह लेन्स, कुठली कुठली कोटींग्स वगैरे मिळून अकरा हजार रुपये खर्च सांगीतला, त्यात फ्रेमची वॉरंटी फक्त ३ महीने. तिच सगळी वैशीष्ट्ये आणि अधिक चांगली फ्रेम मला लेन्सकार्ट वर साडेसात हजारांना मिळाली. वर फ्रेमची वॉरंटी १ वर्ष.

बिस्किटवाला तर खासच. पत्र्याची भली मोठी पेटी डोक्यावर घे‌ऊन बिस्किटे, नानकटा‌ई, बटर, जिरा बटर, टोस्ट असे अनेक प्रकार त्या पेटीत घे‌ऊन फिरणाऱ्या बिस्किटवाल्याने आपली पेटी डोक्यावरून खाली उतरवली की सगळे प्रकार पाहायला मजा यायची.

हा माझ्या लहानपणीही यायचा. माझा डोळा त्याच्या पेटीतल्या केकच्या तुकड्यांवर असायचा. सहा-बारा गोल पीस असलेले मावा केकचे पाकिट कुठेही मिळायचे पण आता पेस्ट्रीज जशा सहज उपलब्ध होतात तशा तेव्हा सगळीकडे मिळत नव्हत्या, त्यामुळे पेस्ट्रीजची भुक ह्या आइसींग वाल्या केकच्या तुकड्यांवर भागवता यायची. असे केकचे तुकडे मिळण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे रेल्वे स्टेशन वरचे कँटीन, पण तिथल्या केकच्या ट्रे वर माशा बसलेल्या असायच्या त्यामुळे आई-बाबा कधीच ते घेउन द्यायचे नाहीत 😀