डॉ कलाम हे नेमके कोण होते? ह्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देणं अशक्य आहे. मी जर त्यांना Genius असं म्हणालो तर ते काही फार विशेष होते असं वाटणार नाही, कारण हा शब्द आपण आपण इतक्यांदा वापरतो कि तो आता गुळगुळीत न राहता मिळमिळीत झाला आहे. पण ह्याची व्याख्या पाहिली तर असामान्य निर्मिती क्षमता असणारी अशी व्यक्ती जिने एखाद्या क्षेत्रात नावीन्यपूर्व काम केलं आहे. हि व्याख्या कलाम ह्यांना तंतोतंत लागू होते, अर्थात ते ह्यापेक्षा कितीतरी अधिक होते. Genius हा त्यांच्या अनेक गुणांपैकी एक होता. पण इतकी महान व्यक्ती आपल्या काळात होती त्यामुळे कदाचित हे आपल्यापैकी काही जणांना झेपत नसेल. पण त्या निमित्ताने ते खरेच शास्त्रज्ञ होते का? असा प्रश्न पडू शकतो. हे जाणून घेण्यासाठी काही मूलभूत ज्याला मराठीत बेसिक म्हणतात अशा गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. एखाद्या विषयात संशोधन करणाऱ्या, त्या विषयात सध्या उपलब्ध असणाऱ्या ज्ञानात भर टाकणाऱ्या आणि सध्या असलेले प्रश्न सोडवण्यासाठी ज्ञानाची निर्मिती किंवा असलेल्या ज्ञानाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला ढोबळमानाने शास्त्रज्ञ म्हणता येईल. अर्थात विषय कुठलाही असू शकतो तो विज्ञानच असला पाहिजे असं काही नाही, म्हणजे समाजशास्त्र, अर्थशास्त्र ह्या विषयात सुद्धा शास्त्रज्ञ असतात. पण सध्या कलामांविषयी बोलू. मी एक यादी बनवली आहे ती पहा, हि यादी कलामांच्या कामाची आहे. आधीच नमूद करतो कि हि यादी अपूर्ण आहे. संशोधनाचे ढोबळमानाने २ प्रकार असतात मूलभूत आणि उपयोजित. म्हणजेच Basic आणि Applied. दोन्ही प्रकारात डावं-उजवं करण्याची मुळीच गरज नसते कारण ते सारखेच महत्वाचे असतात. आईन्स्टाईनने मुलभूत संशोधन केलं होत तर एडिसनच संशोधन हे उपयोजित होतं तरी पण आपण दोघांनाही शास्त्रज्ञच म्हणतो. असो. यादीकडे वळू.
१. कलाम विद्यापीठात असताना प्रोजेक्ट म्हणून त्यांनी बनवलं होतं हॉवरक्राफ्ट. काय असतं हे? एकच असं वाहन जे जमीन, हवा, पाणी, चिखल अशा ठिकाणी जवळपास सारख्याच क्षमतेने चालू शकेल. असलं काही बनवणारे भारतातले ते पहिलेच. आणि त्याच नाव त्यांनी ठेवलं होत नंदी. हि त्यांच्या बुद्धिमत्तेची पहिली झलक. पुन्हा वाचा विद्यापीठात असताना प्रोजेक्ट म्हणून.
२. त्यांची मुख्य ओळख म्हणजे missile man. का असेल अशी ओळख? आज भारताकडे ब्राम्होस आहे एक अत्यन्त घातक क्षेपणास्त्र. ज्याची सध्या जगभर चर्चा आहे. पण हे असलं घातक क्षेपणास्त्र बनवण्याआधी Guided Missile म्हणजे थोडक्यात सांगायचं तर असं क्षेपणास्त्र जे पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतं. ते आपण बनवलं होतं. ८०च्या दशकात. आणि एक दोन नव्हे तब्बल ५. त्यांच्या मागची पूर्ण संकल्पना, संशोधन आणि यशस्वीरित्या त्यांच्या चाचण्या करणाऱ्या टीमचे अर्ध्वयू होते डॉ कलाम.
३. आपल्याला आपल्या विषयात किती सखोल ज्ञान आहे ह्याच प्रामाणिक उत्तर फक्त आपण स्वतःलाच देऊ शकतो. कित्येकदा तर ज्ञान सोडा आपल्या विषयात काय चाललं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे इतर विषयाबाबतीत न बोललेलचं बरं. पण कलाम इथेच तर असामान्य ठरतात. वैद्यक हा तसा बघायला गेला तर त्यांचा विषय नाही. पण एकदा कलाम राजू स्टेण्ट असं गुगलून बघा. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या जर अरुंद होत गेल्या तर हृदयाचा झटका येतो तो येऊ नये म्हणून त्यांचा व्यास रुंद करण्यासाठी एक उपकरण ह्या धमन्यांमध्ये टाकले जात त्याला Stent म्हणतात. जीव वाचवणारे हे यंत्र सुरुवातीला अत्यंत महाग होते कलाम ह्यांनी तिथे सुद्धा संशोधनकरून अत्यंत कमी किमतीत ते विकसित केलं. ज्यामुळे आज भारतात सरकारला ते सर्वांसाठी उपलब्ध करता आलं.
४. भारतातल्या दुर्गम भागात डॉक्टरांना तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी टॅब्लेट संगणक देखील 'निर्माण' केला आहे (कलाम-राजू टॅब्लेट).
तर हे चार मुख्य 'शोध' त्यांनी लावले आहेत. तशी यादी बरीच मोठी आहे. पण शंका दूर व्हावी म्हणून हि काही उदाहरणं. भारताची ओळख काय आहे? असं जर कोणी विचारलं तर ह्या अशा व्यक्ती ज्यांनी काम तर खूप मोठं केलं आहे पण त्यांच्याविषयी त्यांच्याच देशातल्या लोकांना अत्यल्प माहिती आहे, असं दुर्दैवाने म्हणता येईल. जाता जाता अजून एक गोष्ट, भारतातल्या आणि जगातल्या एकूण ४८ नामांकित विद्यापीठांनी त्यांना मानद PhD दिली आहे कारण त्यांना PhD देणं म्हणजे त्या विद्यापीठांना स्वतःचा सन्मान झाल्यासारखे वाटते. ह्यातच सर्व काही आलं. त्यामुळे डॉ कलाम हे शास्त्रज्ञ होते का ह्याविषयी निदान मी तर निःशंक आहे.
प्रतिक्रिया
22 Oct 2022 - 9:36 am | कुमार१
आदरणीय वैज्ञानिक !!
28 Oct 2022 - 3:49 pm | शाम भागवत
+१
28 Oct 2022 - 3:49 pm | शाम भागवत
+१
24 Oct 2022 - 2:19 am | भृशुंडी
कलाम ह्यांच्या नावे एकही रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेला नाही, त्यांच्या नावे उपयोजित किंवा मूलभूत असे कुठलेही संशोधन पेटंट घेतलेले नाही, त्यांच्या बहुसंख्य phd ह्या मानद आहेत.
आता ते शास्त्रज्ञ नाहीत ह्यात कमीपणा वाटावं असं काहीही नाही.
ते बहुतेक काळ तंत्रज्ञ- इंजिनिर होते आणि उर्वरीत काळ प्रोजेक्ट् मॅनेजर.
ओपनहायमरप्रमाणेच गुंतागुंतीचे प्रोजेक्ट तडीस नेण्याबद्दल कलमांना ते क्रेडिट द्यायलाच हवं.
आपण वर दिलेल्या शोधांमध्ये पाहिला शोध नाही, दुसरी सामूहिक कामगिरी आहे.
डॉ. राजू ह्यांच्यासोबत कलाम ह्यांनी नक्की कुठलं संशोधन केले आहे ते कळेल का? म्हणजे स्टेंटचा पेपर किंवा मग कलामांचे तपशीलात योगदान?
कलामांनी केलेल्या खऱ्याखुऱ्या कामाबद्दल त्यांचं कौतुक व्हावं- पण उगा त्यांना शास्त्रज्ञ का म्हणायचं?
25 Oct 2022 - 1:57 am | साहना
+ १
- अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ नाही होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचे संशोधन केले नाही. कसलाही शोध लावला नाही, कुठल्याहि महत्वाच्या जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध नाहीत.
- त्यांच्या कडे डॉक्टरेट सुद्धा नाही. त्यांना मिळालेली डॉक्टरेट हि मानद असून ती त्यांनी अर्जित केलेली नाही. पायंडा असा आहे कि मानद डॉक्टरेट मिळलेल्या व्यक्ती आपल्या नावापुढे डॉक्टर लावत नाहीत.
- सरकारची आस्थापनात जो भष्टाचार आणि जी अकार्यक्षमता असते ती टाळून त्यांनी महत्वाचे प्रोजेक्त तडीस नेले आणि ते सुद्धा एक administrator म्हणून हे त्यांचे मुख्य स्किल होते आणि ते महत्वाचे आहे.
ज्या पद्धतीने भारतीय सरकारी पाठ्यपुस्तके धांदात खोटारडे पणाने भगतसिंग, बोस, गांधी ह्याच्या मांदियाळींत आंबेडकरांचा फोटो सुद्धा दाखवतात त्याच प्रमाणे खोटारडे पणाने आईन्स्टाईन, न्यूटन, जगदीशचंद्र बोस इत्यादींच्या फोटो बरोबर कलाम ह्यांचा सुद्धा फोटो वैज्ञानिक म्हणून दाखवला जातो.
25 Oct 2022 - 1:58 am | साहना
+ १
- अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ नाही होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचे संशोधन केले नाही. कसलाही शोध लावला नाही, कुठल्याहि महत्वाच्या जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध नाहीत.
- त्यांच्या कडे डॉक्टरेट सुद्धा नाही. त्यांना मिळालेली डॉक्टरेट हि मानद असून ती त्यांनी अर्जित केलेली नाही. पायंडा असा आहे कि मानद डॉक्टरेट मिळलेल्या व्यक्ती आपल्या नावापुढे डॉक्टर लावत नाहीत.
- सरकारची आस्थापनात जो भष्टाचार आणि जी अकार्यक्षमता असते ती टाळून त्यांनी महत्वाचे प्रोजेक्त तडीस नेले आणि ते सुद्धा एक administrator म्हणून हे त्यांचे मुख्य स्किल होते आणि ते महत्वाचे आहे.
ज्या पद्धतीने भारतीय सरकारी पाठ्यपुस्तके धांदात खोटारडे पणाने भगतसिंग, बोस, गांधी ह्याच्या मांदियाळींत आंबेडकरांचा फोटो सुद्धा दाखवतात त्याच प्रमाणे खोटारडे पणाने आईन्स्टाईन, न्यूटन, जगदीशचंद्र बोस इत्यादींच्या फोटो बरोबर कलाम ह्यांचा सुद्धा फोटो वैज्ञानिक म्हणून दाखवला जातो.
25 Oct 2022 - 2:03 am | साहना
+ १
- अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ नाही होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचे संशोधन केले नाही. कसलाही शोध लावला नाही, कुठल्याहि महत्वाच्या जर्नल मध्ये त्यांचे शोध निबंध नाहीत.
- त्यांच्या कडे डॉक्टरेट सुद्धा नाही. त्यांना मिळालेली डॉक्टरेट हि मानद असून ती त्यांनी अर्जित केलेली नाही. पायंडा असा आहे कि मानद डॉक्टरेट मिळलेल्या व्यक्ती आपल्या नावापुढे डॉक्टर लावत नाहीत.
- सरकारची आस्थापनात जो भष्टाचार आणि जी अकार्यक्षमता असते ती टाळून त्यांनी महत्वाचे प्रोजेक्त तडीस नेले आणि ते सुद्धा एक administrator म्हणून हे त्यांचे मुख्य स्किल होते आणि ते महत्वाचे आहे.
ज्या पद्धतीने भारतीय सरकारी पाठ्यपुस्तके धांदात खोटारडे पणाने भगतसिंग, बोस, गांधी ह्याच्या मांदियाळींत आंबेडकरांचा फोटो सुद्धा दाखवतात त्याच प्रमाणे खोटारडे पणाने आईन्स्टाईन, न्यूटन, जगदीशचंद्र बोस इत्यादींच्या फोटो बरोबर कलाम ह्यांचा सुद्धा फोटो वैज्ञानिक म्हणून दाखवला जातो.
24 Oct 2022 - 3:39 pm | विवेकपटाईत
गोपनीय तंत्रज्ञानाचे सार्वजनिक रिसर्च पेपर प्रकाशित होत नाही. शास्त्रज्ञ होण्यासाठी डिग्री किंवा रिसर्च पेपर प्रकाशित होणे इत्यादीची गरज नसते त्यांची कार्य बोलते.
24 Oct 2022 - 3:40 pm | विवेकपटाईत
गोपनीय तंत्रज्ञानाचे सार्वजनिक रिसर्च पेपर प्रकाशित होत नाही. शास्त्रज्ञ होण्यासाठी डिग्री किंवा रिसर्च पेपर प्रकाशित होणे इत्यादीची गरज नसते त्यांची कार्य बोलते.
24 Oct 2022 - 11:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कलाम ह्यांच्या कार्याचा उचित गौरव तत्कालिन सरकारांनी केला होताच. मात्र त्यांच्याबरोबर काम करणार्या काहीनी 'द हिदु/फ्रंटलाईन मध्ये तेव्ह काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यात मुख्य प्रश्न त्यांचे रिसर्च पेपर्स हा होता. जेवढे वाचले आहे त्या माहितीनुसार कलाम ह्यांचे मुख्य काम प्रोजेक्ट्स तडीस नेणे हे होते व ते त्यांनी अनेक्वेळा प्रतिकूल परिस्थितीत यश्स्वीरित्या पार पाडले. टीम-बिल्डिंग/सहकार्यांना अधिकाधिक काम करण्यास प्रव्रुत्त करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता.
25 Oct 2022 - 2:13 pm | श्रीगुरुजी
संरक्षण खात्यातील गोपनीय संशोधनावर रीसर्च पेपर कसे प्रसिद्ध करणार? डॉ. कलाम हे Scientist by profession होते. अनेक औषधी कंपन्यांनी शोधलेल्या औषधांचे श्रैय कंपनीला मिळते. ज्या संशोधकांनी ते औषध शोधून, चाचण्या करून वापरण्यायोग्य केलेले असते त्यांना ते श्रेय मिळत नाही कारण संशोधकांचा व संशोधनाचा संपूर्ण खर्च कंपनीने केलेला असतो.
डॉ. कलाम सरकारी नोकरीत होते व त्यांचे संशोधन अत्यंत गोपनीय असल्याने त्यावर रीसर्च पेपर प्रसिद्ध करणे, इतर वैज्ञानिकांनी त्याला मान्यता देणे, ते संशोधन वापरून एखाद्या कंपनीने लोकोपयोगी उत्पादन निर्माण करणे हे शक्य नव्हते.
पण म्हणून डॉ. कलाम फक्त प्रकल्प व्यवस्थापक होते, ते वैज्ञानिक नव्हते कारण त्यांनी रीसर्च पेपर प्रसिद्ध केले नाहीत असा युक्तिवाद हास्यास्पद आहे. ते वैज्ञानिक होते याविषयी अजिबात शंका नाही.
26 Oct 2022 - 10:22 pm | भृशुंडी
अहो, विद्यार्थी असताना केलेलं संशोधनही पब्लिश होतं -शेकडो लाखो पेपर्स सापडतील!
एरोस्पेस इन्जिनिअर आणि शास्त्रज्ञ - ह्यात मूलभूत फरक असतो.
युक्तिवाद हास्यास्पद म्हणा, शंका नाही म्हणा - it is beating around the bush.
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी (खास अवैज्ञानिक उपमा) द्यायची झाली तर - शास्त्रज्ञ असतील तर एक तरी (निदान विद्यार्थी दशेतले) peer reviewed article दाखवा.
पुन्हा सांगतोय - एरोस्पेस इंजिनेर आणि प्रोजेक्ट अॅडमिनिस्त्रेटर असण्यात त्यांचं कार्य वादातीत आहे. योग्य विशेषणांनी व्यक्तीचा गौरव व्हावा एवढंच.
कलाम-राजू स्टेंटमधे काय गोपनीय आहे? त्यात कलामांनी काय "संशोधन" केलं सांगा पाहू?
25 Oct 2022 - 10:35 am | वामन देशमुख
हे लिखाण वाचून अरुण शौरींचे खोट्या दैवतांचे पूजन आठवले.
26 Oct 2022 - 10:45 am | साहना
शॉरींच्या डोक्यावर भक्तमंडळींनी डांबर ओतला होता ! खोट्या देवतांच्या भक्तांना जास्त चेव असतो.
पूजा करायला व्यक्ती शोधत बसल्यावर हेच होणार
26 Oct 2022 - 11:35 pm | पॉल पॉट
हरी नर्के ह्यांचा कलामांवरील चेपू लेख नूकताच प्रसिध्द झाला. त्यात त्यांनी सांगीतलंय की कलामांना महात्मा फुले कोण? हे खरं असेल तर मग कलाम हे महान होते ह्यावर खरंच शंका ऊपस्थित व्हावी.
नरके यांचा लेख त्यांच्या चेपू भिंती वर मिळेल.
27 Oct 2022 - 4:15 am | भृशुंडी
हे असलं कनेक्शन आहे होय.
तरीच इथे लोक आंबेडकरांना ओढून ताणून आणत आहेत.
ओके, असले अजेंडेवाले लेख असतील तर आपला पास.
27 Oct 2022 - 6:30 am | वामन देशमुख
हे कोण?
;)
27 Oct 2022 - 1:18 pm | तर्कवादी
आता डॉ अब्दुल कलामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हळूहळू अजेंडा पुढे रेटला जातोय...
27 Oct 2022 - 9:50 pm | सुक्या
"रॉकेट ला आग लावली की ते वर जाते" इतकीच माहीती असलेल्याने "भारतरत्न" मिळवलेल्या व्यक्ती च्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत करणे हाच ह्या अजेंड्याचा अजेंडा आहे हो. दुर्लक्ष करा ..
28 Oct 2022 - 11:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बरोबर बोललास रे सुक्या. कलाम ह्यांच्यावर रोहिणी उपग्रहाची जबाब्दारी देणारे सतीश धवन, जे इस्रोचे संचालक होते. एकही संशोधन पेपर नाही म्हणुन शास्त्रज्ञ नाही असे मानणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे.
विक्रम साराभाई ह्यांनी म्हंटले होते- We have no fantasies of landing people on the Moon or studying other planets.
म्हणजे इस्रो जे काही करणार होते ते लोकोपयोगी व भारतचे अमेरिका/सोवियेट युनिवनवर असलेले परावलंबीत्व कमी करणे व भारताला स्वावलंबी बनवणे. असे उद्देश असताना इस्रोचे वैज्ञानिक संशोधन पेपर छापुन आणण्याचा खटाटोप करतील की जी काही यंत्र-सामुग्री/रक्कम मिळाली आहे त्यातुन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतील? कलाम असोत वा नंबीनारायण वा माधवन नायर ह्यांनी प्रतिकुल परिस्थितीतुन मार्ग काढुन दाखवला.
IEEE हे ईलिक्ट्रिकल/संगणक संशोधन नियतकालिक आहे. ह्यात पेपर प्रसिद्ध होणे प्रतिष्ठेचे मानले जाते पण ह्यातले ८०% हुन अधिक संशोधन काही कामाचे नसते. नुसतीच थियरी असते.
29 Oct 2022 - 1:21 am | भृशुंडी
सतिश धवन हे डोक्टरेट मिळवलेले आहेत आणि त्यांच्या नावाने असलेले संशोधन पब्लिक डोमेनमधे आहे.
ते एक प्रोफेसर होते - अॅकेडेमिकमधे त्यांचं कर्तृत्व आहे, संशोधन करणे, करवून घेणे - ह्या सगळ्याशी त्यांचा निकट संबंध होता.
विक्रम साराभाईंबद्दलही तेच - सी.व्ही रामन ह्यांचे शिष्य, स्वतःचं असं संशोधन त्यांच्या नावे आहे हो.
ह्या सगळ्यांना का उगाच त्रास देताय तुम्ही? उगा काहीतरी कुठेही कशाला बाण मारायचे?
नशीब मायकेल फॅराडेने हे ऐकून त्याचं संशोधन थांबवलं नाही, किंवा आईन्स्टाईन,हायसेनबर्ग, बोस(जगदीशचंद्र नव्हे, सत्येंद्रनाथ), बोर इ.इ. महानुभाव आपलं हे मत ऐकून हाय खाऊन हताश होतात्से झाले असते.
शिवाय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग परवा विराट कोहलीनेही काढला आणि आमच्या शेजारचा पिंट्यादेखील गर्लफ्रेंडला पटवताना तेच करतो. मग त्यांना शास्त्रज्ञ म्हणूया का आपण?
नासा असो का इस्रो - अंतराळोपयोगी संशोधनांतूनच नंतर रोजच्या वापरातल्या कित्येक वस्तू निर्माण झाल्या आहेत. ढळढळीत उदाहरण हवं असेल तर जी.पी.एस.चा उगम पहा.
फार फार थोर प्रतिसाद, धन्यवाद!
29 Oct 2022 - 10:02 am | श्रीगुरुजी
संरक्षणाशी संबंधित संशोधन गुप्त ठेवावेच लागते, एवढे तरी समजले पाहिजे.
29 Oct 2022 - 10:50 pm | भृशुंडी
ते वर कलाम राजू स्टेंटबद्दल विचारलंय ते उत्तर द्या बघू.
बाकी नंतर विचारतो.
29 Oct 2022 - 1:40 pm | पॉल पॉट
+१
31 Oct 2022 - 1:04 am | तर्कवादी
तोच प्रयत्न करतो.. पण कुणी डॉ. आबेंडकर ,तर कुणी डॉ कलाम यांच्यांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मन विषण्ण होतंय.
29 Oct 2022 - 7:18 pm | आलो आलो
निदान सार्वजनिकरित्या आपल्या कोत्या मनाचं (प्र) दर्शन नकोच
पदावरून पायउतार झाल्यावर कोणी ट्रकांनी सामान घेऊन गेले तर कोणी फक्त २-४ सदरे पॅण्ट यातच थोरवी समजून येते
फक्त थोडा कुजकट वास का येतो कोणास ठाऊक ?
29 Oct 2022 - 9:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लोकप्रिय लोकांची मापे काढणारे प्रतिसाद पाहिले की पु.लं.च्या अंतु बर्वा ह्या पात्राची आठवण होते.
"तो रवीशंकर सितारीवर बर्यापैकी ट्याव-ट्याव करतो"
"गांधी असेल मोठा पण सतत उघडे व पंचे नेसणार्या आम्हा लोकांना कसले गांधीचे कौतुक?"
29 Oct 2022 - 11:00 pm | आलो आलो
अगदि पी एल पेस्शल शालजोडी
29 Oct 2022 - 7:41 pm | लॉरी टांगटूंगकर
छाती ठोकून एकही पेपर पब्लिश्ड नाही म्हणणार्यांसाठी हा एक पेपर. एकोणिसशे चौर्याहत्तर सालचा आहे. कंपोझिट मटेरिअल वर संशोधन अजून सुद्धा चालू आहे. टुच्च्या पेपर वरुन जज करणार्या फडतुस मास्तर लोकांची आठवण आली. पेपर वगैरे प्रकार कॉलेजच्या पोरांना जज करायला ठीक आहे.
लेबलींग आणि एक एक शब्द तासत बसण्यासाठी शुभेच्छा.
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/0015056874900207
बाकी चालू द्या.
30 Oct 2022 - 11:27 pm | लॉरी टांगटूंगकर
आक्रस्ताळ्या शब्दांसाठी माफी असावी. इन्टेन्शन नव्हते. मनावर घेउ नये.
काल प्रकाशित केल्या केल्या सा.संपादकांना एडीट साठी रिक्वेस्ट पाठवलेली पण बहुदा पाहीलेलं दिसत नाही.
31 Oct 2022 - 2:22 am | भृशुंडी
सोशल मीडिया म्हटलं की इथं तिथं होतंच. Worry not.
माझं गृहीतक चुकीचं होतं (किंवा माहिती अपुरी होती) हे तुम्ही दाखवून दिलंत,माझं गृहीतक मी सुधारून घेतो आहे - after all that is the scintific method, isn't it?
मला कलामांविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल पूर्ण आदर आहे-हे बहुतेक माझ्या प्रतिसदांतून ध्वनित होत नसावं.
29 Oct 2022 - 11:06 pm | भृशुंडी
थांक्यु, हाच प्रतिसाद हवा होता.
पण सरळ पुरावे देण्याऐवजी वर जे काही झालं ते ironical आहे.
एखादा माणूस शास्त्रज्ञ आहे हे हिरीरीने मांडणारे लोक त्यांची व्यक्तिपूजा करत आहेत आणि पुराव्याऐवजी इतर काही मांडत आहेत हे व्यवच्छेदक आहे.
आता मी थांबतो :)
बाकी चालू आहेच, विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद!