ताड फळ / ताडा गेदली
खालील लिखाण नक्की कोठे टाकावे त्याबद्दल माझा गोंधळ झाला. फोटु आहे म्हणुन कलादालनात टाकावी तर हे फोटू म्हणजे काही कला नाही. जनातलं, मनातलं मध्ये टाकावे तर त्या सारखे लेखन नाही. शेवटी खाण्याशी संबंधीत आहे म्हणून पाककृती या सदरात टाकावे असा विचार केला. पण मी या लेखात तर शेवटी प्रश्न विचारला आहे. म्हणून मी हा लेख काथ्याकूट मध्ये टाकला. आपण मला माफ करालच ही अपेक्षा. असो.
कालपरवाच कामानिमीत्त सुरतेवर स्वारी केली. जातांना एका छोट्या गावात (जिल्हा डांग) आठवडे बाजार भरला होता. स्टेपनी चे पंक्चर काढायचे होतेच. त्यामूळे वेळ होता म्हणून सहज बाजारात फिरलो. तर खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे 'ताडफळे' विकायला आलेली होती.
छाया. १ विक्रीस आलेली ताडफळे
छाया. २ विक्रीस आलेली ताडफळे
त्यांची किंमत रू. १० ला ४ नग अशी होती. विक्री करायला आलेल्या माणसाने सांगितले की, त्यांच्या भागात ते त्या फळास 'ताड गेदली' किंवा 'ताडा गेदली' असे म्हणतात. मी त्याला आणखी माहीती विचारली असता, "ते ताडाचे उंच झाड असते. त्यास हे फळ लागते. त्या झाडाच्या बुंध्यापासुन निरा निघते आणि तिच नंतर ताडी बनते" असे त्याने सांगीतले. मी ती फळे विकत घेतली. त्यावरचे साल काढून टाकले. नंतर ते खालीलप्रमाणे दिसतात.
छाया. ३ साल काढुन टाकलेली ताडफळे
छाया. ४ साल काढुन टाकलेली ताडफळे
आपण कच्चे नारळ सोलून आत ज्या प्रमाणे गर निघतो तशीच चव आतल्या गराची लागते. गरात पाणी निघत नाही. गर सलग असतो. हे फळ उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात येते असे समजले.
हे नक्की ताडफळ आहे ना? दुसरे नाव असेल तर ते काय? ( योग्य नाव समजले तर लेखाचे शिर्षक बदलता येईल.) त्याचा औषधी उपयोग आहे का?
प्रतिक्रिया
3 May 2009 - 11:56 am | यन्ना _रास्कला
ताडगोला बोल्तो त्येला. तेच्याच झाडाला मडक लावुन ताडि काडतात.
http://4.bp.blogspot.com/_KzFUTGagEnw/SC5-xjU96kI/AAAAAAAAAHU/8g90yqVvK9...(Country+liquer+made+by+Palm+sap).jpg
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
3 May 2009 - 12:00 pm | टारझन
स्मगलिंग नाय ना केली भौ ? कारण विकत घेतली असतील तर विकणाराने तरी नाव सांगितलं असतं ह्याचं ...
बाकी वेगवेगळ्या अँगल मधून काढलेले फोटू "के व ळ अ प्र ति म "
मन के साथ बातां : "दोनाचे चार होणे" ह्यालाच म्हणतात का रे टारू ? ;)
3 May 2009 - 12:29 pm | पाषाणभेद
नाय टारूदादा स्मगलिंग नाय केली, पन त्ये लोक त्याला 'ताड गेदली' किंवा 'ताडा गेदली' असे म्हणत होते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
3 May 2009 - 12:17 pm | सुनील
ह्याला ताड गोळे म्हणतात मराठीत. लुसलुशीत गर आणि मधुर पाणी..अहाहा!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 May 2009 - 12:36 pm | प्रकाश घाटपांडे
याच्या झाडाखाली बसून माणसाने 'दुध' प्याले तरी लोक त्याच्याकडे संशयाने पहातात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 May 2009 - 1:27 pm | पर्नल नेने मराठे
ताड गोळे आहेत हे. मुम्बै त महाग मिळतात जाम :(
चुचु
3 May 2009 - 1:34 pm | क्रान्ति
ताडगोळेच आहेत हे. फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
3 May 2009 - 1:51 pm | देवदत्त
हेच म्हणतो.
लगेच तोंडात त्याची चव रेंगाळली.
3 May 2009 - 1:51 pm | नितिन थत्ते
हे ताडगोळेच आहेत.
एक दुरुस्ती.
हे मुळात शहाळ्यासारखे दिसणारे फळ असते. तुम्ही न सोललेले फळ म्हणून जे दाखवले आहे- ब्राउन रंगाचे ते शहाळे सोलल्यानंतरचे आहे. तुम्हाला याचे शहाळे पहायला मिळाले नाही. मुंबईत तशी शहाळी असतात व समोर सोलून देतात.
ते सोलून घेताना अगदी हिरवे असलेले सोलून घेतले तर त्यात पाणी ही निघते. आणि ते पांढरे खोबरे पण जास्त छान असते. ते शहाळे वरून चॉकलेटी झालेले असते त्यात पाणी नसते आणि खोबरे कडक आणि बेचव असते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
4 May 2009 - 3:44 pm | पाषाणभेद
मस्त माहीती मिळाली मला.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
3 May 2009 - 2:55 pm | स्वाती दिनेश
अहाहा.. काय आठवण काढलीत हो ..ठाण्यात असताना उन्हाळ्यात ताडगोळे खाणे अगदी मस्ट !! बाजारात तर मिळतातच ,पण
आमच्या ठाण्यात बाळकूमच्या आगरी बाया सिजनप्रमाणे ताडगोळे, पटणीचे तांदूळ (खास भाकरीसाठी), करटोली, शेवळं,काकडं,हिरवीगार लांब खास कापाचीच वांगी, वाळकं(म्हणजे लांब हिरव्या काकड्या ,खिरे नव्हेत ते वेगळे.)कोकमं, आंब्याच्या पाट्या..(पेट्या नाहीत पाट्या- हारे.. ७० चा शेकडा!)ऋषींची भाजी आणि असेच काय काय आणतात..माझ्या आजीपासूनच्या ठरलेल्या दोघीजणी आजही येतातच आणि वरील गोष्टी आणतात.वयोमानाप्रमाणे आता वेणूबाई, देवकीबाईला होत नाही तर आतादेवकीची मुलगी शांती येते. ह्म्म ..ताडगोळ्याची चित्रं पाहून आत्ताच्या आत्ता ठाण्याला जावसं वाटतय.
स्वाती
4 May 2009 - 5:08 pm | पाषाणभेद
या अनोळखी भाज्याची चव घ्यावी लागेल. मस्त आठवणी आहेत तुमच्या.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
6 May 2009 - 2:11 pm | ऋषिकेश
वा स्वातीताई!!! काय भरगच्च आठवण करून दिलीस. त्यातही अख्खे वाल घालून केलेली शेवळाची भाजी माझी खास आवडती.
याशिवाय, जांब (एक सफेद थंडगार फळ), कवठाची चटणी, रायआवळे, वाळवलेले चिंचोके, फणसाचे गरे, वसईची वेलची केळी (वेलची केळी सगळीकडे असतील हो मात्र वसईच्या ओळखिच्या भाजीवालीकडून खास वेगळ्या काढून ठेवलेल्या केळ्यांची मजाच और आहे), सागर मेथी वगैरे अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळून गेल्या (बरी आठवण झाली! आता एव्हाना यातील काहि गोष्टी बाजारात आल्या असतील)
बाकी ताडगोळ्यांचे फोटू पाहून थंड वाटले. धन्यु
ऋषिकेश
6 May 2009 - 2:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाह, काय मस्त आठवण करून दिलीस स्वातीताई! आम्ही डझनाने आंबे कोकणातले घ्यायचो पण अढी घालायला हा साष्टी हापूस! काय मस्त, मोठं आणि रसरशीत फळ असायचं!
3 May 2009 - 5:33 pm | प्राजु
अत्यंत सुंदर लागतं चवीला.
खूपच छान. मुंबईला मामाकडे गेलो की डोंबिवलीच्या मानपाडारोडवरून ताडगोळे घेऊन खायचो. आठवण झाली त्याची. :)
पुण्यातही लक्ष्मीरोडवर, मंडईत पाहिल्याचे आठ्वते १-२ वेळा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 May 2009 - 6:45 pm | शितल
ताडगोळे..
खुपच मस्त लागतात. :)
3 May 2009 - 9:33 pm | रेवती
फोटू छान. ताडगोळे मस्त लागतात हे समजलं पण चव नक्की कशी असते?
गोड? आंबट्?....कसे?
रेवती
4 May 2009 - 12:45 pm | चिरोटा
गोड लागतात.मात्र साखरेचे प्रमाण कमी असावे-आम्बा/चिकुच्या तुलनेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 May 2009 - 4:59 pm | रेवती
माहितीबद्दल धन्यवाद!
रेवती
3 May 2009 - 9:50 pm | यशोधरा
ताडगोळे!! मस्त लागतात हे!! :) इथे बंगलोरला हे नाही मिळत खायला! :''(
4 May 2009 - 12:44 pm | चिरोटा
मिळतात की बंगलोरात्.जयनगर खरेदी संकुल नाहीतर शहर बाजार्(सिटी मार्केट) मधे मिळतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 May 2009 - 1:40 pm | नितिन थत्ते
खरेदी संकुलात सोललेले मिळत असतील तर काही उपयोग नाही. कोवळे पाहून घेता येणार नाहीत. मग बंडल लागतील.
खराटा
(रंग माझा वेगळा)
4 May 2009 - 1:45 pm | चिरोटा
सोललेले नाही मिळत खरेदी संकुलात्.मी सोललेले केवळ मुंबईतच बघितले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 May 2009 - 12:48 pm | यशोधरा
खूप लांब आहे हे सगळे माझ्या इथून भेंडी. तुम्ही बंगलोरात आहात का?
4 May 2009 - 12:57 pm | मराठमोळा
असं पण काही असतं का? आपल्याला बॉ माहितच नव्हतं खाऊन बघायला पाहिजे..
हे खाऊन नशा तर होत नाही ना? ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
4 May 2009 - 1:47 pm | चिरोटा
पुर्वी मुंबई उपनगरी स्थानकांवर नीरा मिळायची्. हिरव्या रंगाचे स्टॉल असायचे. ती ताडगोळ्या पासुनच बनवतात काय?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 May 2009 - 2:21 pm | नितिन थत्ते
नाही. ताडगोळ्यापासून नाही पण त्याच झाडाच्या खोडापासून काढतात. पश्चिम ठाणे जिल्ह्यात (वसई, पालघर, डहाणू) जागोजागी दिसतात. ही नीरा आंबल्यावर याची ताडी बनते. फळ खाऊन नशा वगैरे येत नाही.
बाकी माहिती मिपावरचे ताडी-माडी एक्सपर्ट देतील.:)
खराटा
(रंग माझा वेगळा)
4 May 2009 - 3:19 pm | रश्मी
हो बरोबर आमचा गावी डहाणूला समुद्रा किनारी ताडाची बरीच झाडे आहे.मुबई वरुन बरेच व्यापारी लोक ताडगोळे विकत घेण्यासाठि येतात.
4 May 2009 - 7:18 pm | अबोल
निरा हे पेय शि॑दीच्या झाडापासुन काढतात. हे पेय काढल्याबरोबर लगेच प्यायल्यास त्याला निरा म्हणतात व थोड्या वेळाने त्याला शि॑दी म्हणतात .
हल्ली मु॑बईतून बाहेर पडल्यावर महामार्गावर भरपुर सरकारमान्य निरा विक्री के॑द्र दिसतात
5 May 2009 - 2:39 am | संदीप चित्रे
>> दुसरे नाव असेल तर ते काय?
ताडगोळे म्हणजे आपल्या वीक पॉइंटसपैकी एक :)
दुर्दैवाने पुण्याला अधून-मधून मिळतात आणि न्यू जर्सीला तर मिळतच नाहीत :(
5 May 2009 - 11:50 am | अर्चिस
अगदी भरपूर आणि स्वस्त :)
अर्चिस
5 May 2009 - 2:55 pm | ऋचा
ताड गोळा अस म्हणतात ह्याला...
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
6 May 2009 - 1:10 pm | पाषाणभेद
आपणा सर्वांच्या तोडांला पाणी सुटलेले दिसतेय.
मी कौलाचे शिर्षक बदलले आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
6 May 2009 - 1:52 pm | जागु
ताडगोळेच हे. आणि ह्याच्या फळापासुन ताडी बनते, निरा शिंदीच्या फळापासुन बनते.
माझ्य माहेरी वाडी आहे. लहानपणी एकीकडे ताडगोळे काढणारा ताडगोळे तासुन टोपलीत टाकायचा आणि मी एकीकडे टोपलीची लेवल कमी करत बाजुला बसायचे. लहानपणी खुप खाल्ले आहेत. आताही माहेरहून भेट येते. पण सासरी असल्याने कंट्रोल ठेवावा लागतो हादडण्यावर.
6 May 2009 - 5:03 pm | हर्षद बर्वे
खराटा रावांनी सांगितल्याप्रमाणेच......एक विस्तारीत माहीती....त्या एका शहाळ्यासारख्या दिसणार्या फळात ३ ताडगोळे असतात... न फूटता पाणी न सांडता वेगळे करणे यासाठी लहान आकाराचा कोयता.(पातळ अर्ध्वर्तूळाकार पाते असलेला)
असतो...ठाण्यात अर्थात महागच...पण मिळतात.... कोवळे असले की पाणी असते....जून होत गेले की पाषाणभेदांनी सांगितले तस पूर्ण्पणे गर झालेला असतो.....मस्त लागतात...योगायोग म्हनजे आत्ता घरात आहेत.मगाशी घरी आल्यावर( पोटापाण्याच्या व्यवसायामधुन)२ चापले.
वा वा....सर्वांनी अवश्य खाणे...विकत घेऊन...:)
एच.बी.