ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
31 Aug 2022 - 8:39 am

रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.

अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.

ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.

अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.

त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2022 - 9:57 pm | श्रीगुरुजी

सोयिस्करपणे अधिकृत वृत्तावर विश्वास ठेवणे आणि सोयिस्करपणे अधिकृत वृत्त नाकारणे हा तुमचा जन्मजात दोष आहे.

म्हणून तर आता अडचणीत आल्यानंतर सारवासारव करणाऱ्या बनावट वृत्तावर सोयिस्करपणे विश्वास ठेवावा लागणारच.

कपिलमुनी's picture

20 Sep 2022 - 3:46 pm | कपिलमुनी

मी तुम्हाला लुफ्तांसा च्या अधिकृत ट्विटर ची लिंक दिली आहे.

तुम्ही झी न्यूज वगैरे टाईप चेणेल वर विश्वास ठेवता ज्यांनी बातमी चा सोर्स सांगितला नाहीये... काही वर्षांपूर्वी हे चेनेलं २००० च्या नोटेत चीप आहे सांगत फिरत होते.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2022 - 3:56 pm | श्रीगुरुजी

जसे तेव्हा आदिकांचे समर्थक होते तसेच आता मानचे समर्थक आहेत. चालायचच.

कपिलमुनी's picture

20 Sep 2022 - 8:19 pm | कपिलमुनी

मुद्दा तुमच्या बातमीचा अधिकृत सोर्स काय ?
मी लुफ्तान्सा चा अधिकृत सोर्स दिला ज्यात उशीर होण्याचे कारण दिले आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2022 - 9:43 pm | श्रीगुरुजी

खिक्क . . . अजूनही समर्थन सुरूच आहे!

कपिलमुनी's picture

20 Sep 2022 - 9:52 pm | कपिलमुनी

हातात काही ठोस नसला की असा काहीतरी माझा प्रतिसाद शेवटचा टाईप खरडावा लागतं. उगी उगी... अधिकृत बातमी आणा मग टंकायचे कष्ट घ्या..

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2022 - 9:54 pm | श्रीगुरुजी

खिक्क. भगवंत मानला महाराष्ट्रातून समर्थक मिळताहेत यामागे एकच कारण आहे.

आग्या१९९०'s picture

20 Sep 2022 - 10:35 pm | आग्या१९९०

Der Mann
आता जर्मन भाषा शिकणे आले. भाषा शिकण्यापेक्षा मनाला आवडेल असे अर्थ काढणे सोपे आहे.

प्रदीप's picture

20 Sep 2022 - 9:55 pm | प्रदीप

सर्वप्रथम, मान ह्यांच्यामुळे लुफ्तान्साची फ्लाईट अनेक तास उशीरा निघाली, वगैरे माहिती चुकीची आहे, हे खरेच. समजा, ते तिथे अशा परिस्थितीत गेले होते की ज्यामुळे त्यांना फ्लाईट्वर येण्यास त्या विमान कंपनीने मज्जाव केला, तर तिथे ते, सर्वसाधारणपणे, भारतांत राजकारणी/ समाजकारणी/ बाबू इत्यादी ज्याप्रकारे 'दंगा' करू शकतात, तसे कुठल्याही भारतीय नागरीकाला करता येणार नाही, ज्यायोगे फ्लाईट अनेक तासांनी उशीरा निघावी.

पण ही हिंदूची बातमी काही प्रत्य़क्षदर्शींचा हवाला देऊन असे म्हणते की

Lufthansa’s LH 760 was scheduled to depart at 1.40 p.m. local time from Frankfurt airport. It was already delayed by “three hours” because of a late inbound flight and an aircraft change, but was further delayed because of a heated exchange between some passengers and the cabin crew, according to an eyewitness.

“A person donning a white kurta-pyjama and resembling Punjab Chief Minister Bhagwant Mann entered the aircraft along with other passengers... after some time four or five of them left the aircraft,” said the eyewitness who did not want to be identified.

The pilot later announced that some passengers had to leave and that there would be a slight delay as their baggage was being removed from the plane. The flight scheduled to depart at 1.40 p.m. local time took off at 4.30 p.m. and landed in Delhi at 4.40 a.m. IST.

बातमी पुढे म्हणते:

Mr. Mann arrived at airport but decided to reschedule return
Punjab Chief Minister Bhagwant Mann rescheduled his return journey from Frankfurt in a last-minute change for taking another flight to Delhi on Sunday.

“The Punjab Chief Minister has delayed his departure as he was reportedly unwell,” said an official.

अर्थात, हे प्रकृति बिघडणे इतर काहीही असू शकते- पोट बिघडणे इत्यादी. पण अशा अर्थाचे काहीही निवेदन, इतका गदारोळ झाल्यावरसुद्ध आप पक्षाकडून अथवा पंजाब सरकारकडून आलेले नाही. किंबहुना, त्यांनी ह्याबद्दल मौन बाळगले आहे, असे दिसते?

अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेत, परदेशांतील कंपन्या व सरकारे कुणाचेही नाव घेऊन काही विशीष्ट माहिती देत नाहीत. तेव्हा नक्की काय झाले होते, ह्याबद्दल लुफ्तान्सा व तेथील सरकार ह्यांजकडून कुठलीही ठाम माहिती मिळणार नाही, हे उघडच आहे. तसेच सरकारी औचित्याला धरून, भारत सरकारचे परराष्ट्र खातेही ह्याविषयी काहीही टिपण्णी करणार नाही, हे उघड आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2022 - 10:30 pm | श्रीगुरुजी

अश्या परिस्थितीत स्पष्टपणे वस्तुस्थिती न सांगता सारवासारव करणारे संदिग्ध निवैदन प्रसिद्ध केले जाते. तेच या प्रकरणातही झालेले दिसते. अर्थात मान यांचा पूर्वोतिहास पाहता प्रत्यक्षदर्शी सांगतात तसेच झाले असणार. ३-४ वर्षांपूर्वी मान यांनी कारमधून संसदेत जाताना संसदेच्या प्रांगणाचे आतून चित्रीकरण करून ती चित्रफीत समाजमाध्यमात प्रसिद्ध केली होती.

श्रीगुरुजी's picture

20 Sep 2022 - 10:49 pm | श्रीगुरुजी

हे ट्विट पुरेसे बोलके आहे..

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2022 - 7:23 pm | श्रीगुरुजी

देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी देवानेच आआपला जन्म दिला आहे व केजरीवाल हे कृष्णावतार आहेत.

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2022 - 9:25 pm | श्रीगुरुजी

योग्य निर्णय. न्यायालयाने अनेकदा राखीव जागांचा निर्णय रद्द करूनही पुन्हा पुन्हा तोच निर्णय घेऊन तोंडावर आपटतात.

Reservation over 50% unconstitutional

तेलंगणा, आंध्रमध्ये ४० ठिकाणी NIA कडून छापेमारी; चार जणांना ताब्यातही घेतले

https://www.loksatta.com/desh-videsh/nia-raids-40-places-in-telangana-an...

चार आरोपी अब्दुल कादर, शेख सहदुल्ला, मोहम्मद इम्रान आणि मोहम्मद अब्दुल मोबीन यांना राज्य पोलिसांनी अटक केली.

एफआयआर मध्ये म्हटले आहे की “पीएफआयच्या सदस्यांनी कराटे वर्गाच्या नावाखाली तरुणांसाठी प्रशिक्षण आणि शारीरिक व्यायाम सुरू केले आणि त्यांना आपली द्वेषपूर्ण भाषणं आदींद्वारे एका विशिष्ट समुदायाविरोधात भडकावले.”

--------

आता उदारमतवादी लोक काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...

धर्मराजमुटके's picture

19 Sep 2022 - 10:18 pm | धर्मराजमुटके


आता उदारमतवादी लोक काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...


उदारमतवादी लोक तुमच्या बातमीला काऊंटर आर्ग्युमेंट म्हणून हिंदूंनी मुसलमानांवर कुठे कुठे अत्याचार केले याच्या बातम्या इथे चिकटविणार. हे एरंडाचं गुर्‍हाळ असचं चालू राहणार !

ह्याचा उदारमतवाद्यांशी काय संबंध स्पष्ट करा बघू. नक्की तुम्हाला काय असे करायचे आहे ज्याच्याशी उदारमतवादी सहमत नाहीत डिटेलवार लिहा बघू.

वामन देशमुख's picture

20 Sep 2022 - 8:46 am | वामन देशमुख

आता उदारमतवादी लोक काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ...

आपल्या मताचा आदर आहे.

माझ्या मते, जर हे चूक असेल तर ते थांबविण्यासाठी मागच्या आठ-नऊ वर्षांपासून मोदींनी काय केलं आहे हे शोधणं रोचक ठरेल.
---

हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

यूपी में लव जिहाद के मामले में पहली सजा: धर्म छिपाकर करना चाह रहा था नाबालिग लड़की से शादी, कोर्ट ने मुस्लिम युवक को दी पांच साल की सजा, ठोका 40 हजार का जुर्माना

https://www.google.com/amp/s/www.jansatta.com/rajya/uttar-pradesh-love-j...

काय बोलावं ते सुचेना .....

धर्मराजमुटके's picture

20 Sep 2022 - 8:48 am | धर्मराजमुटके

आपण दिलेल्या बातमीचा दुवा पाहिला.
या घटनेमधे नेमकी का शिक्षा दिली आहे त्याचा उलगडा झालेला नाही.
१. १७ वर्षाखालील मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा दिली का ?
२. अपहरण करुन लग्न करण्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा दिली का ?
३. मुस्लीम असून हिंदू असल्याचे भासविले म्हणून शिक्षा दिली का ?
४ की वरील ३ ही मुद्दे एकत्र घेऊन शिक्षा दिली ?

तुमच्याकडे ही माहिती असेल तर जरुर लिहा.

https://www.google.com/amp/s/www.ichowk.in/lite/politics/what-is-waqf-bo...

तमिलनाडु के एक हिंदू बाहुल्य गांव तिरुचेंथुरई को वक्फ बोर्ड ने अपनी मिल्कियत घोषित कर दिया है. ये मामला तब सामने आया, जब हिंदू बाहुल्य इस गांव के एक शख्स ने अपनी जमीन बेचने की कोशिश की. रजिस्ट्रार ऑफिस से पता चला कि तमिलनाडु वक्फ बोर्ड ने उसकी जमीन समेत पूरे गांव की जमीन पर अपना दावा किया हुआ है. जिसमें उस गांव में बना 1500 साल पुराना मंदिर भी आता है. वैसे, ये सोचने वाला तथ्य है कि इस्लाम को आए 1400 साल ही हुए हैं. लेकिन, वक्फ बोर्ड ने 1500 साल पुराने मंदिर की जमीन पर भी दावा ठोक दिया है.

ब्रिटनच्या लीसेस्टर शहरात भारतीयांवर हल्ले ; भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे पडसाद

https://www.loksatta.com/desh-videsh/attacks-on-indians-in-british-city-...

लीसेस्टर पोलिसांनी सांगितले की, या शहराच्या पूर्व भागात तरुणांच्या दोन गटांत हिंसाचार झाल्यानंतर मोठय़ा संख्येने जमाव रस्त्यावर उतरला. या वेळी हिंदू समुदायाच्या मालमत्तांचे नुकसान करून हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांची नासधूस करण्यात आली.

-----

कपिलमुनी's picture

20 Sep 2022 - 2:25 pm | कपिलमुनी

स्वतः मोदी आणि सगळे न्यूज चेनेल २००९ मधल्या चित्ता आणलेल्या फेल मिशन बद्दल बोलत नाहीत.
स्वतः मोदींनी सीएम असताना असेच वाजत गाजत २००९ साली चित्ते आणले होते.
पण परिसंस्था ना मानवल्याने ते सगळे पुर्नउत्पादन ना करता मरण पावले

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

तर्कवादी's picture

21 Sep 2022 - 11:08 am | तर्कवादी

स्वतः मोदींनी सीएम असताना असेच वाजत गाजत २००९ साली चित्ते आणले होते.
पण परिसंस्था ना मानवल्याने ते सगळे पुर्नउत्पादन ना करता मरण पावले

हे माहित नव्हते.
असो यावेळी असं होणार नाही अशी आशा करुयात.

प्रसाद_१९८२'s picture

21 Sep 2022 - 11:17 am | प्रसाद_१९८२

स्वतः मोदी आणि सगळे न्यूज चेनेल २००९ मधल्या चित्ता आणलेल्या फेल मिशन बद्दल बोलत नाहीत.
--

याचा काही विदा ?
कारण भारतात चिता आणायची परवानगी सर्वौच्च न्यायालयाने दोन ते तीन वर्षापूर्वीच दिली आहे.
आणि मोदींनी असे चित्ते आणले असतील आणि ते मेले असतील तर मोदीद्वेष्टे व इतर मोदी विरोधकांनी, मोदीं विरोधात टिकेची झोड उडवली असती.

कपिलमुनी's picture

21 Sep 2022 - 12:10 pm | कपिलमुनी

खुद्द मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू बघा

याबाबत च्या बातम्या तत्कालीन पेपर मध्ये आल्या आहेत.
दुवा १

स्वप्निल रेडकर's picture

21 Sep 2022 - 1:39 pm | स्वप्निल रेडकर

असं काही पुराव्यानिशी दिसलं तरी भक्त मंडळी कबूल करत नाहीत आणि वर छाती ठोकून बोलतात कि आम्ही कोणाचे भक्त नाही ,यांचं सगळं अर्ग्युमेण्ट समोरचा माणूस शिवसैनिक किंवा काँग्रेसी गुलाम आहे या कन्फर्मेशन बायस वर उभं असतं . चुकीला चूक म्हणायची लाज वाटायला लागली कि मग सगळं ज्ञान,अनुभव,चांगली लेखन शैली या गोष्टीचा शून्य उपयोग असतो हे या लोकांना केव्हा कळणार ते त्या काशीविश्वेश्वरालाच ठाऊक !!

आग्या१९९०'s picture

21 Sep 2022 - 2:57 pm | आग्या१९९०

सगळं आय टी सेलकडून आयते मिळालेले कुठलीही शहानिशा न करता जिथेतिथे डकवायची सवय झालेले जेव्हा दुसऱ्यांकडून विदा मागतात तेव्हा त्यांची कीव येते. मी तर खात्री केल्याशिवाय लिहीत नाही, कोणी कितीही विदा मागितला तरी देत नाही. कारण विदा खरा असेल तर माफी मागण्याचे सौजन्य बिजेपी समर्थकांकडे नाही. गरज असेल तर शोधतील.

सुरिया's picture

21 Sep 2022 - 3:10 pm | सुरिया

स्वतः दस्तुरखुद्द पंतप्रधान असे कावेअबाज सत्य ठोकतात की "ये दुर्भाग्य रहा कि हमने 1952 में चीतों को देश से विलुप्त तो घोषित कर दिया, लेकिन उनके पुनर्वास के लिए दशकों तक कोई सार्थक प्रयास नहीं हुआ. " हे म्हणजे "तुम्ही नाही तर आम्ही केले". असार्थक प्रवासातला स्वतः त्यांचे अपयश कोण विचारतंय? समज असाच करुन द्यायचा की इतक्या वर्षात कॉंग्रेसने केले नाही ते आम्ही करुन दाखवले. वरुनच सत्याची अशी एक केली जाते तेंव्हा खालपर्यंत काय लायकीचे झिरपत असेल देव जाणे.
आता देव म्हणायची ही सोय राहिली नाही. देवपदाला बसवलेच आहे. दुसर्‍या त्या जरा छोट्या देवाचे तर यूपीत मंदीर बनवून पूजाअर्चाही सुरु झालीय.
ym

डँबिस००७'s picture

21 Sep 2022 - 9:33 pm | डँबिस००७

किती ती जळजळ !!

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2022 - 3:47 pm | श्रीगुरुजी

पण परिसंस्था ना मानवल्याने ते सगळे पुर्नउत्पादन ना करता मरण पावले

चित्त्यांचे आयुष्य १० ते १२ वर्षांचे असते. गुजरातेत आणलेले चारही चित्ते १२ वर्षांचे आयुष्य जगून त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. त्यातील एका चित्त्याचा तर २०१७ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. त्यांना पिल्ले झाली नाहीत परंतु गुजरातेत आणल्यानंतरही ते आपले पूर्ण १२ वर्षांचे आयुष्य जगून त्यांना वार्धक्यामुळे नैसर्गिक मृत्यू आला. म्हणजे तो प्रकल्प चित्ते जगविण्यात पूर्ण यशस्वी झाला परंतु पुनरूत्पादन मात्र झाले नाही.

गुजरातेत आणलेले चित्ते

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2022 - 3:52 pm | श्रीगुरुजी

"The two pairs of cheetahs were brought from Singapore Zoo under an exchange programme in March 2009. In fact, because of good management practice and veterinary care (in Sakkarbaug Zoo), the pairs lived till the age of 12 in captivity."

The two pairs died of natural causes after attaining the age of 12. The last one died in 2017."

कपिलमुनी's picture

21 Sep 2022 - 6:57 pm | कपिलमुनी

कहना क्या चाहते हो ?

तेच लिहिले आहे की.. पुन्हा तेच हायलाईट करण्याचे काय प्रयोजन ?
परिसंस्था न मानवल्याने प्रजनन ना करता गेले .
मेल्याचे कारण अनैसर्गिक आहे असे कुठेही लिहिले नाहीये..

सुबोध खरे's picture

21 Sep 2022 - 7:42 pm | सुबोध खरे

चित्ते प्राणिसंग्रहालयात किंवा पाळलेल्या( बंदिवान) स्थितीत सहसा पुनरुत्पादन करत नाहीत
https://www.newscientist.com/article/2077282-five-wild-animals-that-wont...

Breeding cheetahs is hard
https://cheetah.org/canada/2018/06/29/breeding-cheetahs-is-hard/

सूज्ञांस अधिक सांगणे न लगे

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2022 - 7:57 pm | श्रीगुरुजी

स्वतः मोदी आणि सगळे न्यूज चेनेल २००९ मधल्या चित्ता आणलेल्या फेल मिशन बद्दल बोलत नाहीत.

फेल मिशन असं लिहिलंय ना? पिल्लांना जन्म नाही दिला म्हणून मिशन फेल??? मुळात २००९ मध्ये आणल्यानंतर २०१२ पर्यंत पिल्ले झाली नाहीत व नंतर वय झाल्याने पिल्ले होणे शक्य नव्हते. पण सर्व चार चित्ते अकाली मरण न पावता, रोगराई न होता आपले पूर्ण १२-१३ वर्षांचे आयुष्य जगले व नैसर्गिक मृत्यू आला. एक चित्ता तर भारतात आणल्यानंतर ८ वर्षे जिवंत होता. तरीही मिशन फेल? प्राणी बाहेरून आणल्यानंतर त्यांना जगविणे, ते आपले पूर्ण आयुष्य जगणे, पुनरूत्पादन करणे व नैसर्गिक मृत्यू येणे अशी उद्दिष्टे असतात. माझ्या दृष्टीने हे मिशन फेल नसून बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहे.

डँबिस००७'s picture

21 Sep 2022 - 9:36 pm | डँबिस००७

स्वतः मोदी आणि सगळे न्यूज चेनेल २००९ मधल्या चित्ता आणलेल्या फेल मिशन बद्दल बोलत नाहीत.

मोदीजींनी केलेल मिशन फेल झाल अस ठोकुन द्यायच वर विचारायच की कहना क्या चाहते हो ?

आम आदमी पक्षाच्या अमानुतुल्ला खानच्या
सहकार्यांच्या घरावरच्या धाडीत करोडो रु ची नगदी तसेच पिस्तुल, बंदुका, रिवोलव्हर सापडली आहेत.

अमानुतुल्ला खानच्या सहकार्यांचां आएसआएस बरोबर संबंध असल्याचा दावा भाजपाने आपल्या वार्ताहर परिषदेत केलेला आहे.
https://youtu.be/GhD_KFS5yVU

हिंदी भाषेत "हथियार" असा रूढ शब्द असताना "अस्लाह" (उर्दू) शब्द हल्ली र्सरास वापरला जातोय. पाकीस्तानी चँनैल्स जास्त बघितले जाण्याचा हा परीणाम असावा?

विश्लेषण: स्वीडनचे निवडणूक निकाल आणि इटलीतील मतदारांचा कौल काय सांगतो? युरोपमध्ये पुन्हा फॅसिझमचा उदय होतोय?

https://www.loksatta.com/explained/explained-what-sewden-election-result...

स्वीडन डेमोक्रॅट्स पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेची कारणे काय?

या पक्षाचे नेते जिमी एकेसन यांनी निवडणुकीपूर्वी ‘स्वीडन फर्स्ट’ची घोषणा दिली. आपल्याकडे जसे भूमिपुत्रांसाठी काम करणाऱ्या संघटना, चळवळी असतात तसेच हेदेखील आहे. अर्थात, हे राष्ट्रीय पातळीवर आहे. म्हणजे अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, रोजगार या सर्व संधी परदेशातून आलेल्या (विशेषतः परागंदा होऊन स्थलांतरित झालेल्या) लोकांच्या आधी आपल्या देशवासियांना मिळाव्या, अशी ही भूमिका. याखेरीज मुस्लिमांना विरोध (युरोपातले बहुतांश स्थलांतरित हे युद्धग्रस्त मुस्लिम देशांमधूनच येत असल्यामुळे) धर्म-वंश याचे ध्रुवीकरण हे एकेसन यांचे मुद्दे जनतेने उचलून धरल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांच्या पक्षाला देशात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. एका अर्थी अतिउजवा पक्ष तिथे सत्तेजवळ पोहोचला आहे.