मराठवाड्यातील एक हुतात्मा स्मारक: २०१८ चे प्रकाशचित्र
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण याच देशाच्या एका भूभागातील जनतेचा स्वातंत्र्य लढा अजूनही सुरूच होता. हैदराबाद संस्थान या भूभागावर निजामाचे राज्य होते . मराठवाडा, तेलंगण आणि कल्याण-कर्नाटक हे प्रदेश निजामाच्या जुलमी राजवटीखाली भरडले जात होते. धर्मांध रझाकारांच्या अत्याचारांमुळे सामान्य हिंदू जनता त्रस्त झाली होती. त्याच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय प्रजासत्ताकात सामील होण्यासाठी सर्वत्र आंदोलने, चळवळी क्रांतिकारी कारवाया इ. सुरु होत्या.
हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन करावे यासाठी भारतचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी निझामाला राजी करण्याचे खूप प्रयत्न केले पण निझाम त्यासाठी तयार होत नव्हता. रझाकारांच्या कारवाया वाढतच चालल्या होत्या. निझामाने पाकिस्तानमार्फत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाण्याची तयारी सुरु केली.
शेवटी १३ सप्टेंबर १९४८ रोजी पटेलांनी ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस ऍक्शन (प्रत्यक्षात लष्करी कारवाई) सुरू केली. चार दिवसांनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला आणि हा प्रदेश भारतात विलीन झाला.
हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात असंख्य क्रांतिकारी, नेते, कार्यकर्ते लढले. त्यातील अनेक हुतात्मे झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यात अनेक ठिकाणी हुतात्मा स्मारके निर्माण केली.
आज १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा, तेलंगण आणि कल्याण-कर्नाटक मुक्ती दिनाला ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या हुतात्म्यांना व स्वातंत्र्यसैनीकांना अभिवादन.
---
यासंदर्भातील काही दुवे:
मराठवाडा मुक्ती दिन इंग्लिश विकी पान
मराठवाडा मुक्ती दिन मराठी विकी पान
कल्याण कर्नाटक मुक्ती दिन विकी पान
हैदराबाद संस्थान
ऑपरेशन पोलो विकी पान
२०१० मधील या दोन बातम्या:
तेलंगण मुक्ती दिन साजरा करण्याचा भाजपचा आग्रह
तेलंगण मुक्ती दिनाला एमआइएमचा विरोध
सध्याच्या बातम्या आणि इतर नोंदी:
हैद्राबाद मुक्ती दिन की राष्ट्रीय एकात्मता दिन? लोकसत्ता
हैद्राबाद मुक्ती दिन की राष्ट्रीय एकात्मता दिन? इंडिया टुडे
प्रतिक्रिया
17 Sep 2022 - 8:58 am | कुमार१
+११११
17 Sep 2022 - 9:20 am | मुक्त विहारि
+1
17 Sep 2022 - 9:24 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान माहिती.
👌
17 Sep 2022 - 7:01 pm | यश राज
छान माहिती
17 Sep 2022 - 8:55 pm | कर्नलतपस्वी
समयोचित लेख.थोडक्यात पण खुप माहितीपूर्ण. आवडला. स्मरणरंजन होत रहायला हवे.
18 Sep 2022 - 2:38 pm | टर्मीनेटर
माहितीपुर्ण छोटेखानी लेख आवडला 👍
हुतात्म्यांना श्रद्धांजली व स्वातंत्र्यसैनीकांना अभिवादन 🙏
18 Sep 2022 - 9:36 pm | तुषार काळभोर
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील स्वातंत्र्य लढा सुरूच होता आणि स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा होत होते... त्या सर्वांना अभिवादन!
17 Sep 2023 - 1:28 pm | वामन देशमुख
आज १७ सप्टेंबर २०२३ ला मराठवाडा मुक्ती दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
या मुक्तीसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनीक यांना अभिवादन.
17 Sep 2023 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. हैदराबाद संस्थानाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात जात-धर्म -पंथ विसरुन समस्त जनता आणि स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला म्हणूनच मराठवाडा पारतंत्र्यातून मुक्त झाला. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शुरविरांना विनम्र अभिवादन.
-दिलीप बिरुटे
20 Sep 2023 - 6:25 am | निनाद
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा अध्यक्ष, कासिम सिझवीच्या रझाकारांचा मुकाबला करण्यासाठी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील आंध्र हिंदू महासभेने तेलंगणातील लोकांसह राज्याचे भारताशी एकीकरण करण्याची मागणी केली होती. तेलंगणा आणि मराठवाडा भागातील अनेक हिंदूंच्या क्रूर हत्या, बलात्कार इत्यादीसाठी धर्मांध रझाकार जबाबदार होते. कासिम सिझवी ला पुढे पाकिस्तलाला जिवंतपणे पळून जाऊ दिले.
कासिम सिझवी हा उघडपणे हिंदू गुलामगिरीचे समर्थन करत असे. हिंदूंना गुलाम बनवण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे, अशी त्याची धारणा होती. भारत सरकारने त्याचा उल्लेख राक्षस असा केला असेल तर या धर्मांध इसमाने हिंदूंवर त्या काळात किती आणि कसे हल्ले केले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही.