गाभा:
मित्रांनो.
या १ आणि २ ऑक्टोबरला श्रीरंग जोशी , जुई आणि मी हे मिपाकर शिकागो मधे भेटायचे ठरवतो आहे. ( शनिवार रविवार आहे)
श्रीरंग जोशी आणि जुई त्यांच्या कन्येसह गाडीने मिनीयापोलीस हुन येणार आहेत. मी डेट्रॉईट हून येईन.
सध्या मिडवेस्ट मधे कोणकोण मिपाकर रहातात ते माहीत नाही म्हणून हा धागा प्रपंच करतोय. ( इंदुसूता बरेच दिवस गायब आहेत)
दोन दिवस मस्त धमाल करू, चांगली स्थळे पाहू / खादाडी करू. असा विचार आहे.
कोण कोण येऊ शकेल हे कळवा म्हणजे आपल्याला नीट कार्यक्रम आखता येईल.
( या विषयावरचा जुना धागा http://misalpav.com/node/45354 )
प्रतिक्रिया
9 Sep 2022 - 1:20 pm | कर्नलतपस्वी
विजुभौ तीथे असतो तर नक्कीच आलो असतो.
शिकागोला मिपाकर शेखर मोघे आहेत व्यनि करा बहुतेक येतील.
बाकी शुभेच्छा.
परतीचा मान्सून कधी?
9 Sep 2022 - 7:59 pm | कंजूस
जरा कोरम वाढेल.
9 Sep 2022 - 9:27 pm | श्रीरंग_जोशी
विजुभाऊंच्या अमेरिका दौर्यामुळे मिडवेस्ट विभागात प्रथमच जाहीर मिपा कट्टा होईल.
एक महत्त्वाची माहिती - आम्ही केवळ शनिवार १ ऑक्टोबर रोजी दिवसा कट्ट्याला उपस्थित राहू शकू.
शिकागो शहरापासून जवळपासचे इलिनॉय, इंडियाना, आयोवा, विस्कॉन्सिन, मिसुरी, मिशिगन, ओहायो राज्यांमधले मिपाकर / मिपावाचक कट्ट्याला उपस्थित राहू शकल्यास आनंद वाटेल.
स्थळः मिलेनियम पार्क बहुधा सर्वाधिक सोयीचे ठरेल. किंवा नेव्ही पियरही चालेल.
तीन वर्षांपूर्वीच्या शिकागोबाबतच्या विजुभाऊंच्या धाग्यावरचा माझा प्रतिसाद.
9 Sep 2022 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्टा तपशील वृत्तांतासहित येऊ द्या. शुभेच्छा.
-दिलीप बिरूटे
10 Sep 2022 - 3:22 am | इन्दुसुता
आहे आहे हो, इथ्थेच आहे... फक्त वामा आहे आणि खूप दिवसात लॉग इन नाही केलं म्हणून व्यनि दिसला नाही.
तुम्हाला आणि श्रीरंग/ जुई ना उत्तर पाठवले आहे.
आग्रहाचे आमंत्रण.
10 Sep 2022 - 4:52 am | खटपट्या
बे एरियात काय असेल तर सांगा
10 Sep 2022 - 5:06 am | पुंबा
मी शिकागोपासून जवळच राहतो. नक्की येईन.
10 Sep 2022 - 6:26 am | इन्दुसुता
@ पुंबा...
तुम्ही कुठे राहता ( म्हणजे शिकागोच्या सबर्ब मध्ये की जवळच्या शहरात)?
10 Sep 2022 - 10:36 pm | पुंबा
मी सबर्बमध्ये आहे. व्हिलिंग मध्ये.
10 Sep 2022 - 7:44 am | कर्नलतपस्वी
बरेच मिपाकर आहेत. पुढच्या वेळेस आलो की नक्कीच भेटेन. दरवर्षीच डेट्राईटची वारी ठरलेली असते.
10 Sep 2022 - 7:52 am | सस्नेह
कट्ट्याला भरभरून शुभेच्छा !
2023 मध्ये एखादा झाला तर माझाही दौरा असेल तेव्हा.
स्नेहा
10 Sep 2022 - 8:11 am | इन्दुसुता
@कर्नल साहेब, नक्की या.
सस्नेह, येण्याचे ठरले की कळवा.
10 Sep 2022 - 3:03 pm | भीमराव
चिंचवडातनं टमटम भेटली तर नक्की येईन कट्टा करायला.
10 Sep 2022 - 8:41 pm | चौथा कोनाडा
तुम्ही या की पुणे कट्ट्याला, मी बी टमटमनंच येणार हाय न्हवं
10 Sep 2022 - 8:37 pm | इन्दुसुता
पाठवू की ! नाहीतर असं करा, विजुभाउंच्या विमानाला लटकून या.... फक्त जरा थंडीची काळजी घ्यावी लागेल तेव्ह्डंच :)
10 Sep 2022 - 8:40 pm | चौथा कोनाडा
कट्ट्याला भरभरून शुभेच्छा !
असे कट्टे म्हणजे मिपाचे परदेशातील बलस्थान lच !
10 Sep 2022 - 11:23 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
मिपाकर काय?
कुठेही भेटतात...
मला तर, "यांबू" सारख्या वाळवंटात देखील मिपाकर भेटला आहे....
12 Sep 2022 - 11:57 am | पाषाणभेद
कार्यबाहुल्यामुळे शिकागोला येणे शक्य नाही. अन्यथा सकाळच्या विमानाने आलो असतो.
कट्याला भरभरून शुभेच्छा!!! फोटो व वृत्तांत येऊ द्या.
12 Sep 2022 - 12:38 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि दोन्हीचे फोटो अणि सविस्तर वृत्तांत येउ द्या.
12 Sep 2022 - 4:23 pm | सस्नेह
लाइव्ह वृत्त सुद्धा येवो दोन्ही कट्ट्यांचे !
13 Sep 2022 - 2:46 pm | शशिकांत ओक
या आधीचा पुणे कट्टा केंव्हा झाला होता? पुणेरी मिपाकरांना मेळावा कट्टा आयोजित करण्यात रस आहे का?
लोहगाव जवळपास शिवाजी महाराज म्युझियमला जायचे. तिथे नुकतेच नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन पहायला मिळेल. शिवाय अन्य १६ दालनातील प्रदर्शने पहायला मिळतील. गप्पांच्या नादात नवीन ओळखी व विचार ऐकायला मिळतील. ऐतिहासिक घटनांची उजळणी होईल. नंतर हवाईदलाच्या रस्त्यावर 7 हेवन्सला खाऊ प्याऊ करता येईल.
नव्या मिपाकरांचा उत्साह पाहून मी मदत करायला तयार आहे.
13 Sep 2022 - 10:59 pm | पाषाणभेद
सरजी, मिपाकट्टा शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी पाताळेश्वर, पुणे येथे साजरा होत आहे.
आपण अवश्य यावे.
12 Sep 2022 - 5:53 pm | विजुभाऊ
नक्कीच.
15 Sep 2022 - 3:23 am | पर्णिका
अरे व्वा, सहीच... जोरात होऊन जाऊ दे शिकागो मिपा कट्टा :)
त्या वीकांताला ट्रॅव्हल करतेय, नाहीतर किमान फोनवरून तरी सहभागी व्हायला आवडले असते.
17 Sep 2022 - 9:58 pm | पाषाणभेद
https://www.misalpav.com/node/50701
पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न
येथे फोटो व वृत्तांत आहे.
तुमचा कट्टा कधी होतो आहे? व वृत्तांत अपेक्षित आहे.
18 Sep 2022 - 10:19 am | सौन्दर्य
मी ह्युस्टनला असतो, प्रत्यक्ष भेटणे जमणार नाही तरी देखील फेसटाईम किंवा झूम वगैरेवर भेटू शकतो. जर तशी शक्यता असेल तर तुमचा फोन नंबर कळविल्यास मी संपर्क साधू शकतो. माझा नंबर आहे - २८१-६९०-७४९५ आहे.
भेटायची इच्छा असलेला मिपाकर.
19 Sep 2022 - 6:21 pm | जुइ
शक्य झाल्यास तुम्हाला कट्ट्याच्या वेळी फेसटाईम करु.
19 Sep 2022 - 1:30 am | अनुजा
मिड्वेस्ट मधेच आहे, मी येईन, कोणाला संपर्क करायचा?
19 Sep 2022 - 3:32 am | जुइ
फोन नं व्यनि केला आहे.
19 Sep 2022 - 6:53 pm | विजुभाऊ
वेलकम अनुजा.
मी आज निघतोय डेट्रॉईट
19 Sep 2022 - 8:12 pm | कर्नलतपस्वी
प्रवासा करता शुभेच्छा.
19 Sep 2022 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठपर्यंत आलं तुमच्या कट्ट्याचं. ?
-दिलीप बिरुटे
19 Sep 2022 - 8:00 pm | श्रीरंग_जोशी
अध्यक्ष महोदय कृपया नोंद घ्यावी. सदर प्रस्तावित कट्टा स्थानिक वेळेनुसार १ ऑक्टोबर रोजी आहे. भाप्रवेनुसार तो २ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत चालू शकतो. कृपया तोवर प्रतिक्षा करावी.
20 Sep 2022 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयाम सॉरी. परदेशी कट्टा म्हणजे उत्सुकताच ना म्हणून. बाकी, वेगवेगळे खायचे पदार्थ, भारी कपडे, टकाटक दिसणे,
उच्च गप्पा आणि मिपाच्या आठवणी. असं सगळं ठेवा. लै भारी फोटो आले पाहिजेत. धाग्यावर लक्ष आहेच. शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
20 Sep 2022 - 4:51 am | इन्दुसुता
@अनुजा,
व्यनि केला आहे. बघणार का?
20 Sep 2022 - 10:05 am | टर्मीनेटर
मिपाकर तितुका मेळवावा ।
मिपा धर्म वाढवावा ।।
शिकागो कट्ट्याला भरघोस शुभेच्छा 💐💐💐
25 Sep 2022 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी
नमस्कार मंडळी,
कट्ट्याला उपस्थित राहू इच्छिणार्या मिपाकर व मिपा वाचकांसाठी महत्त्वाची माहिती.
कट्टा सुरू होण्याची वेळः शनिवार १ ऑक्टोबर स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता.
ठिकाणः द बीन (क्लाउड गेट) मिलेनियम पार्क, शिकागो पत्ता: 201 E Randolph St, Chicago, IL 60602
पावसाळी वातावरण असल्यास पर्यायी ठिकाणः नेव्ही पियरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत. पत्ता: 600 E Grand Ave, Chicago, IL 60611
संपर्कासाठी माझा फोन क्रमांक: नऊशे एकोणपन्नास-चारशे एकोणचाळीस-सदोतीसशे चाळीस. कृपया थेट टेक्स्ट किंवा कॉल करावा. कायप्पा क्षमस्व.
*साहित्य संपादकांना विनंती: ही माहिती मुख्य धाग्यात जोडावी.
2 Oct 2022 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिलंच ठिकाण भारी दिसतंय. तिथेच भेटा. :)
-दिलीप बिरुटे
2 Oct 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा
2 Oct 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा
1 Oct 2022 - 7:58 am | श्रीरंग_जोशी
आज (३० सप्टेंबर) आम्ही श्री व सौ विजुभाऊ यांना शिकागोमधे भेटलो व त्यांच्याबरोबर पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर संध्याकाळी इंदुसुता यांना भेटलो.
उद्या सकाळच्या कट्ट्याची उत्सुकता आहे.
2 Oct 2022 - 8:11 am | श्रीरंग_जोशी
शिकागो कट्टा यशस्वीपणे पार पडला आहे.
सर्व कट्टेकर्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.
उद्या सविस्तर वृत्तांत लिहू.
2 Oct 2022 - 10:00 am | प्रचेतस
एकंदरीत कट्टा भारी झालेला दिसतोय. वृत्तांत लवकर येऊ द्यात.
2 Oct 2022 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
-दिलीप बिरुटे
2 Oct 2022 - 5:29 pm | तुषार काळभोर
वृत्तांताची उत्सुकता आहे..
2 Oct 2022 - 8:39 pm | सस्नेह
वृत्तांत आणि फोटोंच्या प्रतीक्षेत