ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
31 Aug 2022 - 8:39 am

रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.

अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.

ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.

अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.

त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.

२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 6:26 pm | जेम्स वांड

भरतात,

अन् हे छातीठोक सांगायला मी तुमच्या समक्ष जिवंत प्रतिसाद देतो आहे.

कोणाला उगाच पैसा वाचवायचा असेल तर तो आपापला वैयक्तिक चॉईस आहे, पण उपयोग नाही हे वाढीव झाले, बरं तो नाही हे मान्य केले तरी बिन एअर बॅग मरण्यापेक्षा मी एअर बॅग खर्च करणे प्रेफर करेनच कारण तो लास्ट ऑप्शन असेल तरी गाडीत नाही काही तर.

सुनील's picture

4 Sep 2022 - 10:54 pm | सुनील

सीट बेल्ट बांधलेला नसेल तर त्या ठिकाणची air bag उघडत नाही.

त्यांनी सीट बेल्ट बांधलेला होता किंवा नाही याची खात्री झाल्यावरच air bag बद्दल चर्चा करणे योग्य ठरेल.

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 7:25 pm | धर्मराजमुटके

दु:खद बातमी ! देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ज्या गाडीतून ते प्रवास करत होते ती मर्सिडीज म्हणजे एक महागडी आणि सुरक्षित समजली जाणारी कार आहे. कोणतीही गाडी कितीही सुरक्षित असली तरी ती १००% टक्के जीवीत रक्षणाची ग्वाही नसते ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे पण ज्याला परवडेल त्यानी जास्तीत जास्त सुरक्षित गाडी घेतलीच पाहिजे.

दुसरे म्हणजे आपल्याकडे रस्ते बांधणी करणारे खरोखरीच इंजिनियर असतात की नाही हा देखील एक चर्चेचा विषय ठरवा. ७ वी-८वी ला आम्हाला एका धड्यात बँकींग ऑफ रोडस नावाचा एक भाग शिकवला होता तो तर मला अजून भारतात कुठे आढळला नाही.

वाहन चालकांचे आणि पादचार्‍यांचे दिव्य ज्ञान हा अजून एक वेगळाच विषय.

प्रथम दर्शनी बातमीत गाडी दुभाजकावर आदळून अपघात झाले असे समजते. यात गाडी किती सुरक्षित आहे हा एक प्रश्न झाला पण दुसरा प्रश्न जो नेहमी दुर्लक्षित केला जातो तो ड्रायव्हरच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा. बरेचदा जे लोक ड्रायव्हर ठेवतात ते त्याला देखील एक मशिनच समजतात. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे की नाही त्याची मानसिक अवस्था ठीक आहे की नाही याचा त्यांना पत्ताच नसतो. ह्या बाबीवर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. ह्या घटनेत असे झाले असेलच असे माझे मत नाही.

एकंदरीत प्रत्येक मुद्द्यावर कितीही चर्चा होऊ शकते पण सुधारणा किती होईल माहित नाही.
जन्माला येणारा प्रत्येक जीव कधीतरी जाणार असतो पण असे त्रासदायक मरण कोणाला येऊ नये ही ईश्वराला प्रार्थना करण्यापलिकडे जास्त काही करता येईल असे वाटत नाही.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 7:52 pm | जेम्स वांड


पण ज्याला परवडेल त्यानी जास्तीत जास्त सुरक्षित गाडी घेतलीच पाहिजे.

हा ऑप्शन द्यायलाच नको, तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या अजस्त्र गाडीचे बेस मॉडेल घेण्यापेक्षा एखाद बारक्या गाडीचे टॉप एंड मॉडेल संपूर्ण सेफ्टी फीचर्स सहित घेणे ही कधीही अक्कल असण्याचे लक्षण ठरेल.

दुसरे म्हणजे आपल्याकडे रस्ते बांधणी करणारे खरोखरीच इंजिनियर असतात की नाही हा देखील एक चर्चेचा विषय ठरवा.

भारत म्हणे जगातील सगळ्यात मोठा पूल आहे इंजिनियर्सचा lol

तुमचं बजेट आहे त्यात एखाद्या अजस्त्र गाडीचे बेस मॉडेल घेण्यापेक्षा एखाद बारक्या गाडीचे टॉप एंड मॉडेल संपूर्ण सेफ्टी फीचर्स सहित घेणे ही कधीही अक्कल असण्याचे लक्षण ठरेल.

ते ठीक आहे पण एअर बॅग्ज असून मृत्यू का होतात याचं नेमकं अधिक विस्तृत विश्लेषण समोर येणं गरजेचं आहे त्याखेरीज लोकांचा एकरबॅग्जवर विश्वास बसणार नाही. आता जसं या अपघातात काय झालं ? मर्सिडिज कंपनीने या अपघाताचा स्वतंत्ररीत्या अभ्यास करुन अहवाल प्रसिद्ध करायला हवा. हा अपघात का झाला ? चूक कुणाची होती ? कारच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का ? या अपघातानंतर कंपनी कारमध्ये अधिक काही बदल करणार आहे का ? अर्थात असा अहवाल तयार व्हायला अनेक महिने किंवा एखादं-दोन वर्षेही लागू शकतात. पण हे व्हायला हवं. national geographic वर air crash investigation ही सिरीज पाहिली तर आपल्याला कळेल की प्रत्येक विमान अपघाताचं किती सखोल विश्लेषण केलं जातं त्याकरिता कितीतरी खर्च केला जातो... भरपूर पैसा आणि मनुष्यबळ वापरुन संशोधन करुन अहवाल तयार करण्यात येतो , सुधारणा अंमलात आणल्या जातात.
मग रस्ते अपघाताच्या बाबत असं काही होत नाही का ? की रस्त्यावर मरणार्‍याला काहीच किंमत नाही...

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 9:56 pm | धर्मराजमुटके

नुकतेच एका वर्तमानपत्रात वाचले की खड्डा चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला. खड्डे चुकविणाच्या नादात होणार्‍या अपघातांची आणि त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मी तर बुवा अचानक खड्डा दिसला तर अजिबात चुकविण्याचा प्रयत्न करत नाही. खड्ड्यात गाडीचे नुकसान होवो, आपल्याला झटका बसो ते एकवेळ परवडले असेच म्हणावे लागते.

जेम्स वांड's picture

4 Sep 2022 - 9:57 pm | जेम्स वांड

हे म्हणणे मी नाकारत नाही, मर्सिडीजने पोस्ट accident investigation करावे, सत्य नारायण घालावेत, गाड्या शोरुम मधून काढतानाच लिंबं ओवाळून टांगून काढाव्यात, काय वाटेल ते करावे, त्याबद्दल माझी काही मना नाही किंवा लोकांच्या उत्तरे मिळण्याच्या हक्कावर पण मला आक्षेप नाही, पण एक मर्सिडीजचा अपघात झाल्यावर डायरेक्ट पोल खोल, पितळ उघडे पडणे वगैरे वगैरे म्हणणे आपल्याला मंजूर नाही बॉ!

अन् तसेच म्हणणं असेल तर काढा आकडे, एअर बॅग्समुळे किती लोक वाचले अन् किती दगावले त्याचे सविस्तर, एअर बॅगचे आकडे जास्त असले तर एअर बॅग सक्सेस असल्याचे मानणार की नाही मग अश्या परिस्थितीत ?

उगाच काय पोल खोल अन् काय पण, एअर बॅग जीव वाचवतात, एखाद दुर्दैवी प्रसंगात त्या deploy होत नाहीत किंवा फॉल्ट असतात पण म्हणून पूर्ण एअर बॅग सिक्युरिटी सिस्टम हे स्कॅम ठरत नाही उलट जीवनावश्यक ठरतात असे वाटते.

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 12:04 am | तर्कवादी

अन् तसेच म्हणणं असेल तर काढा आकडे, एअर बॅग्समुळे किती लोक वाचले अन् किती दगावले त्याचे सविस्तर, एअर बॅगचे आकडे जास्त असले तर एअर बॅग सक्सेस असल्याचे मानणार की नाही मग अश्या परिस्थितीत ?

बरोबर आहे. एअर बॅग्ज उपयुक्त असतीलही पण कोणत्या परिस्थितीत त्या उपयुक्त ठरल्या नाहीत ते समजणे पण महत्वाचे ठरते.
एअर बॅग्ज म्हणजे नेमकं काय व कसं काम करतात , त्यांची उपयुक्तता व गरज काय हे सामान्य लोकांना नीट समजेल अशा पद्धतीने पोहोचवायला हवं यासाठी वाहन निर्मिती कंपन्या , सरकारी संस्था (ARAI) driving school यांनी लोकशिक्षण करायला हवे. नुसतेच सीटबेल्ट वापरा किंवा एअर बॅग्ज असलेली कार घ्या इतकं सांगणं पुरेसं ठरणार नाही. सीटबेल्टचा नेमका उपयोग काय व कसा होतो हे सामान्य व्यक्तीला समजल्या शिवाय तो ते वापरण्यास उत्सुक नसेल.
मला ही हेल्मेटबद्दल प्रबोधन करणारी जुनी जाहिरात आठवते. असल्या कोणत्या जाहिराती आता येत नाहीत !!

हे जाहीर करावं. म्हणजे गैरसमज दूर होईल.
समजा वाहन वेगात (८०+) आहे आणि रस्त्यावर काही प्राणी दिसला तर ब्रेक मारला जाईल. तर तो वेग मला वाटतं चार सेकंदांत शून्यावर येतो असे धरा. वेग अचानक कमी होण्याचं एक सेन्सर मोजत असणार आणि पिशवीत हवा सोडण्याचा नळ उघडला जात असणार. हि क्रिया ब्रेक मारल्यावर काम करतेय का प्रयोगशाळेत तपासत असतील. आणि त्यावर विश्वास ठेवत असतील. पण प्रयोगशाळेत प्रत्यक्ष वाहन वेगवेगळ्या वेगात आपटवून परीक्षण करतात का हे कार कंपन्यांनी सांगावे.

दुसरी एक गोष्ट की अपघातात मोडलेल्या गाड्यांचे सांगाडे पाहिले तर ते एवढ्या मोठ्या धक्क्याला मोडतात हे दिसते आहे. म्हणजे किती वेगाच्या धक्क्यात सांगाडा किती मोडतो हेसुद्धा महत्त्वाचे.

सामान्य माणसाचे तर्क आहेत. अपेक्षित परिणाम दिसत नाहीत म्हणजे एक/दोन/तीन/चार चुकीच्या गोष्टी एकाच वेळी घडत आहेत हे नक्की.

निनाद's picture

5 Sep 2022 - 5:57 am | निनाद

पिशवीत हवा सोडण्याचा नळ उघडला जात असणार.

दुरुस्ती/ किंवा माहिती
ऑटोमोबाईलच्या पुढील भागात सेन्सर आहेत जे टक्कर झाली ओळखतात. हे सेन्सर सोडियम अझाइड असलेल्या डब्याला इलेक्ट्रिक सिग्नल पाठवतात आणि इलेक्ट्रिक सिग्नल थोड्या प्रमाणात इग्निटर कंपाऊंडचा स्फोट करतात. या प्रज्वलनाच्या उष्णतेमुळे रसायनांचे विघटन सुरू होते आणि एअर बॅग भरण्यासाठी नायट्रोजन वायूची निर्मिती होते. थोडक्यात हा एक नियंत्रित स्फोट असतो. एअरबॅगला सप्लिमेंटरी रेस्ट्रेंट सिस्टम (SRS) किंवा सप्लिमेंटरी इन्फ्लेटेबल रेस्ट्रेंट (SIR) म्हणून ओळखले जाते . येथे "पूरक" या शब्दाचा अर्थ असा आहे की एअरबॅग हे सीटबेल्ट बदलण्याऐवजी तुमचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे (तुमचा सीटबेल्ट न बांधता तुमचे संरक्षण करण्यासाठी एअरबॅगवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक आहे).

१९९५ मध्ये, एड्रियन लंड आणि सुसान फर्ग्युसन यांनी १९८५ ते १९९३ या आठ वर्षांतील रस्ते वाहतूक अपघातांचा एक मोठा अभ्यास प्रकाशित केला. त्यांना आढळून आले की एअरबॅगमुळे अपघातात मृत्यूचे प्रमाण २३ ते २४ टक्क्यांनी आणि सर्व प्रकारच्या अपघातांमध्ये १६ टक्क्यांनी कमी होते.

वैयक्तिकरित्या मी सर्व एअर बॅग असलेल्या अगदी कर्टन एअर बॅग पण असलेल्या कार मध्ये प्रवास करणे योग्य मानेन.

निनाद's picture

5 Sep 2022 - 6:04 am | निनाद

हे पहा: ग्लोबल NCAP ने त्यांच्या 'सेफर कार्स फॉर इंडिया' कार्यक्रमांतर्गत ५० हून अधिक गाड्यांची चाचणी केली आहे. यावरून माहिती मिळायला हवी.

गाडी दुभाजकावर आदळून अपघात
असे असेल तर त्या व्यवसायाच्या गृप ने सरकार दावा दाखल करून हलगर्जीपणे रस्ते बांधणी केल्याने मृत्यु झाल्याबद्दल भरपाई मागितली पाहिजे. कारण एखादा उद्योगपती गमावणे हा देशाचा ही तोटा आहे.
या निमिताने एक मोठा प्रश्न समोर येईल.
सरकारने देशव्यापी रस्ते बांधणी सुरक्षा धोरण (रस्ते बांधणी धोरण नाही) आणि रस्ता कसा बांधला तर तो रस्ता मानला जावा याची मानके निर्धारीत केली पाहिजेत. ही मानके पूर्तता झाल्या शिवाय काम पूर्ण झाले असे मानले जाऊ नये.

१) तुम्ही म्हणता तसे पट्टे लावले पाहिजेत. ते मागच्या सीटवरच्या दोघांनी बहुतेक लावले नव्हते. म्हणजे सेन्सरच्या दृष्टीने त्या ठिकाणी पसेंजर नव्हते. तिथल्या पिशव्या उघडल्या गेल्या नाहीत. वाचले नाहीत.

२) गाडी चालवणारी अनाहिता ही डावीकडून ओवरटेक करत होती.

३) एखाद्या कार कंपनीने कारची माहिती दिली त्यात टॉप स्पीड १८०,२००,२५०,३२० दिला असला तरीही भारतीय रस्त्यावर अधिकृत टॉप स्पीड ओलांडल्यास काय होईल? अपघातात कायद्याचे / विम्याचे संरक्षण मिळेल का?
४) गाड्या खरोखरच किती वेगाने जातात हे काही त्याचा प्रवासाचा वेळ पाहिल्यावर समजू शकते. अहमदाबाद मुंबई पाचशे किमी.चा प्रवास सहा तासांपेक्षा कमी वेळात करत असतील तर ८०च्यावर वेग आहेच.

तबारक हुसैन हा दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा भारतीय सैन्याच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याच्यावर उपचारादरम्यान भारतीय जवानांनी रक्तदान केलं होतं. पण नंतर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं
बातमी

कपिलमुनी's picture

4 Sep 2022 - 8:31 pm | कपिलमुनी

असा ब्लड डोनेशन केलेले आमीर खान शाहरुख खानने चित्रपटात दाखवले असते तर लोकांनी बाण मारून जीव घेतला असता

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 11:06 pm | तर्कवादी

असा ब्लड डोनेशन केलेले आमीर खान शाहरुख खानने चित्रपटात दाखवले असते तर लोकांनी बाण मारून जीव घेतला असता

चित्रपट आणि वास्तव यातला फरक करता आला नाहीतर अनेक चित्रपटांत काही ना काही आक्षेपार्ह सापडेल. किती अभिनेत्यांना (की निर्माता/ लेखक /दिग्दर्शकांना) बाण मारणार ?
के जी एफ - चाप्टर टू मध्ये नायक (!!) संसदेच्या सभागृहात एकटयाने जावून एका खासदार की मंत्र्याची हत्या करतो. हा संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा अपमान आहे. संसदेची सुरक्षाव्यवस्था कोणत्या दलाकडे असते याबद्दल मला निश्चित माहिती नाही. पण तरी ती निमलष्करी दलाकडे असावी असा माझा कयास असेल. जर तसे असेल तर तो त्या दलाच्या कार्यक्षमतेचा अपमान नाही का ? आणि जरी सुरक्षाव्यवस्था निमलष्करी दलाकडे नसून पोलिस दलाकडे असेल असे म्हंटले तरी पोलीस दलाचाही इतका मोठा अपमान चित्रपट निर्माता/दिग्दर्शाकाने का करावा ?

झारखंड मध्ये अरमान अन्सारीने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मारून टाकले आहे. तिचा मृतदेह झाडावर लटकवून ठेवला होता. गेल्या महिन्याच्या अखेरीस, शाहरुख हुसेन आणि त्याच्या मित्राने त्या एका किशोरवयीन मुलीला तिच्या घरात झोपलेले असताना जिवंत जाळले आहे.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:20 am | जेम्स वांड

क्या बात है, स्वतः गणेशोत्सव साजरा करतातच आता घरात आलेल्या नवीन सुनेच्या हातून गणेशमूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठापना करून साजरा केला ह्या मुस्लिम कुटुंबाने गणेशोत्सव, मागच्या दशकापासून सुरू आहे घरी गणपती स्थापन करण्याची परंपरा.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:28 am | जेम्स वांड

२६/११ हल्ल्यात इस्माईल अल हिंदी पण होता प्लॅनर इस्लामिक स्टेटची माहिती २०१९ साली ड्रोन हल्ल्यात झाला होता खातमा (म्हणे)

मदनबाण's picture

5 Sep 2022 - 12:18 pm | मदनबाण

प्रदर्शनाच्या आधीच ‘ब्रम्हास्त्र’ने कमावले ‘इतके’ कोटी, नवा विक्रम रचण्यासाठी चित्रपट सज्ज
चड्ढा च्या कमाई पेक्षा जास्त कमवेल का ?
बादवे... हल्ली पेड प्रमोशनचा जमाना आहे म्हणे !

जाता जाता :- ब्रम्हास्त्र कि फुसकीअस्त्र ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “The happiness of your life depends upon the quality of your thoughts.” :- Marcus Aurelius

गजानन कागलकर यांचं निधन झालं असं वाचण्यात आलं.

ब्रिटनचा ट्रस्ट लिज ट्रस यांच्यावरच! पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत
एक ना एक दिवस ज्यांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले त्यांच्यावर एक (नावापुरता का होईना) भारतीय राज्य करेल अशी बर्‍याच जणांना अपेक्षा होती तीही गर्दीस मिळविली म्हणायची.

घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मुस्लीम भाजपा नेत्याला मौलवींकडून धमकी; म्हणाल्या “त्यांना माझी हत्या…”

https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-leader-ruby-khan-alleged-receiv...

घरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने मौलवींकडून आपल्याला धमकी दिली जात असल्याचा दावा भाजपा नेत्या रुबी खान यांनी केला आहे. रुबी खान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आपल्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

फैजल अहमदने हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी आधी खोटे हिंदु नाव घेतले. नंतर तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले.
आरोपी हा जिम ट्रेनर आहे आणि त्याने सुरुवातीला पीडितेला नोकरीची ऑफर दिली. काही दिवसांनी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिला त्याच्या आईला भेटायला लावले यावेळी त्याने आणि त्याच्या आईनेही स्वतःला हिंदू म्हणून दर्शवले.
लग्न झाल्यावर तिला समजले अथर्व हा फैजल नावाचा मुस्लिम आहे. चौकशी केली असता आरोपीने आपण मुस्लिम असल्याची कबुली दिली. त्यानंतर फैजलने मुलीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिल्यावर त्याने तिचे आधीच घेऊन ठेवलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या हिंदु तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जिवंत जाळण्याची धमकी दिली.

मुस्लिम पुरुषांनी खोट्या हिंदु ओळखीने हिंदू मुलींना फसवून मुलींचा छळ केल्याच्या, आणि नंतर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

या घटनांमागे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र असावे असा संशय आहे.
मुस्लिम लोकसंख्या वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
इस्लाम मध्ये अल तकिय्या नावाचा प्रकार आहे ज्या मध्ये इस्लामच्या प्रचारासाठी इस्लामिक नसल्याचे भासवणे हा धर्मप्रचाराचा भाग आहे.

धर्मराजमुटके's picture

6 Sep 2022 - 9:04 am | धर्मराजमुटके

भारतातील हिंदूंवर अत्याचार होत आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. तुम्ही दोघेही अशा बातम्या शोधून इथे लिहिण्याचे कष्ट घेता त्याबद्दल आभार. पण ताज्या घडामोडीत त्या हरवून जातात. त्याऐवजी तुम्ही एक वेगळा धागा काढून त्यावर हे सगळे संदर्भ दिलेत तर एक त्याची एक बखर बनू शकते. शिवाय ज्याला त्या विषयात रस आहे त्यांच्यासाठी संदर्भसुची म्हणून त्या धाग्याचा उपयोग होऊ शकतो. बघा जमले तर.
अवांतर : कोणाला हिंदूकडून मुस्लीमांवर होणारे अत्याचार , हिंदूंकडून दलितांवर होणारे अत्याचार, ख्रिश्चनांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार याबाबत देखील अशाच प्रकारे डॉक्युमेंटेशन करायचे असेल तर त्यांनीही विचार करायला हरकत नाही.
असे धागे किमान वर्षभर नित्यनियमाने चालवावेत त्यायोगे कोणावर जास्त अत्याचार होत आहेत याचा देखील अंदाज येईल.
काय म्हणतात मिपाकर ?

जेम्स वांड's picture

6 Sep 2022 - 9:27 am | जेम्स वांड

काहीच बोलायचं नव्हतं पण

१०,०००% सहमत, नाव शोभते आपणांस "धर्मराज" नीरक्षीर बोललात.

तसेही ताज्या घडामोडींचा धागा अन् क्रींज कंटेंट सांगत बसत नाही.

प्रचेतस's picture

6 Sep 2022 - 9:28 am | प्रचेतस

+१

निनाद's picture

8 Sep 2022 - 9:11 am | निनाद

वेगळा असे करणार नव्हतो. कारण मग तो धागा वाचलाच जाणार नाही असे वाटले. पण आता प्रचेतस यांचा पण +१ आल्याने असा विचार करतो.

निनाद's picture

11 Sep 2022 - 2:29 pm | निनाद

तुमच्या सूचनेप्रमाणे हिंदूंचा छळ हा नवीन धागा काढला होता पण धागा उडाला आहे!
तेव्हा जी काय घडामोड असेल ती इथेच असेल याची नोंद घ्यावी ही विनंती!

तिरुपती तिरुमला संस्थानाला ग्राहक न्यायलायचा दणका

मूळ केस ही आहे की,

के. आर. हरी भास्कर नावाच्या बालाजी भक्तांनी १४ वर्षे अगोदर वस्त्रालंकार सेवा करण्यासाठी बुकिंग केले होते (₹ १२,५०० फक्त भरून) , ह्या पूजेला म्हणे इतके वेटींग असते, त्याशिवाय खूप हाय लेव्हल रेकमेंडेशन लेटर्स वगैरे पण लागतात.

तर, हरी भास्कर ह्यांचा नंबर आला (१४ वर्षांनी) तेव्हा नेमके कोव्हिड - १९ साथीमुळे मंदिर अन् सेवार्थ पूजा सगळे बंद होते. मंदिर भास्कर हांना म्हणले की वस्त्रालंकार पूजन ऐवजी तुम्ही व्हीआयपी दर्शन (कोविड लॉकडाऊन ब्रेक मध्ये) घ्या, किंवा तुमचे १२,५०० रिफंड घेऊन टाका. कारण वस्त्रालंकार पूजनाला तारीख बदलून देत नाही संस्थान.

भास्कर ह्यांचे म्हणणे होते की त्यांनी भक्तिभावे देवाचे वस्त्रालंकार पूजन करण्यासाठी बुकिंग केले असल्यामुळे त्याच्या ऐवजी एखाद व्हीआयपी दर्शन घेणे त्यांना मंजूर नाही किंवा पैसे परत घेणे तर अजिबातच नाही.

ह्यामुळे त्यांनी तिरुपती तिरुमला देवस्थान (टी टी डी) विरुद्ध तामिनाडूमधील एका ग्राहक कोर्टात केस टाकली, ज्यावर कोर्ट म्हणते आहे की तिरुपती तिरुमला देवस्थान ने भक्ताला त्याच्या श्रद्धेप्रमाणे पूजा करायला नवी तारीख द्यावी किंवा ५०, ००,००० (पन्नास लाख) दंड (२४% व्याजानुसार) द्यावे.

भक्त अजूनही म्हणतोय का मला माझ्या देवाची वस्त्रालंकार पूजा करायची आहेच, मला तारीख हवीच पुढची, कोविड मध्ये आला तो माझा दोष नाही.

महेश भट्ट यांचं खरं नाव अस्लम, धर्म बदलला ते लपवता कशाला? कंगना रणौतची पोस्ट चर्चेत

https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...

हीच गोष्ट, धर्मेंद्र आणि किशोर कुमार बाबतीत पण घडलेली आहे, असे ऐकीवात आहे ...

कपिलमुनी's picture

6 Sep 2022 - 9:47 pm | कपिलमुनी

अजून हत्ती चर्चेत कसे आले नाहीत ??

मदनबाण's picture

6 Sep 2022 - 10:37 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nila Athu Vaanathumele... :- Nayakan (1987)

सनईचौघडा's picture

7 Sep 2022 - 7:02 am | सनईचौघडा

हा चौथा मदरसा नागरिकांनी स्वतः तोडला आता जनतेनेच कायदा हातात घेणं गरजेचं.

कॉमी's picture

7 Sep 2022 - 8:49 am | कॉमी

जनतेने कायदा हातात घेऊन पोलीस, जज, आणि एक्झेक्युशनर होणे गरजेचे आहे.

mayu4u's picture

8 Sep 2022 - 1:33 pm | mayu4u

याचा विचार करा, शक्य असल्यास.

आग्या१९९०'s picture

8 Sep 2022 - 2:22 pm | आग्या१९९०

अकार्यक्षम चौकीदार

आग्या१९९०'s picture

7 Sep 2022 - 9:02 am | आग्या१९९०

आता जनतेनेच कायदा हातात घेणं गरजेचं.

तो तर कधीच घेतला आहे. महात्मा गांधी, नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश ह्यांना शिक्षा जनतेनेच केली आहे.
बाबरी मशीद पाडण्यासाठी सरकारची फुटी कवडीची मदत न घेता जनतेने आपले कर्तव्य पार पाडले आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Sep 2022 - 9:57 am | श्रीगुरुजी

+ १

कुरमुसे, मदन शर्मा, राणा दांपत्य, केतकी चितळे अश्यांच्या गैरकृत्यांची शिक्षा जनतेनेच न्यायाधीश होऊन अंमलात आणली आहे.

विवेकपटाईत's picture

7 Sep 2022 - 9:06 am | विवेकपटाईत

आपल्या देशात रस्त्यावर होणारे अपघात रास्ते फक्त 10 टक्के जवाबदार असतील. खरे कारण वाहन चालकाची लापरवाही. माझ्या जवळ महागडी कार आहे. मी वेगात गाडी चालविणार. कुणी गाडी खाली आले तरी दोन तासांत जमानत मिळणार. मी नियमान्चे पालन करणार नाही. रोजचा रस्ता आहे. पूल आल्यावर रस्ता छोटा होणार हे ही माहित आहे. रस्ता रिकामा दिसतो. 150 च्या वर गाडी चालविणार. एवढ्या वेगात 50 मीटर दूरच्या रस्त्याचा अंदाज येणे शक्य नाही आणि आला तरी गाडी थांबविणे शक्य नाही. मी तर कार रेसर सारखा किंवा हॉलीवूड नायक सारखा कार चालवू शकतो. स्पीड की मजा और मौत का आनंद.

कंजूस's picture

7 Sep 2022 - 11:15 am | कंजूस

गोर्बाचेव निमित्ताने डॉ. संदिप वासलेकर यांची मुलाखत झाली मागच्या आठवड्यात. माझा कट्टा १.
ते उच्चदस्थ अधिकारी आहेत आणि काही माहिती सागितली.
या माझा कट्टा १ मुलाखती ( वीडिओ) नंतर सापडत नाहीत .

मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विनम्र आदरांजली. अनेकांच्या निधनानंतर एका महान पर्वाचा अस्त वगैरे नुसतेच म्हटले जाते पण गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर खरोखरच मानवजातीच्या इतिहासातील एक महान पर्व संपले. पु.ल म्हणतात की ज्यांच्या जगण्याला जीवन म्हणावे असे लोक हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. मिखाईल गोर्बाचेव्ह नक्कीच त्यापैकी एक होते.

१९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि नंतर रोमानियात सिअ‍ॅसिस्कूला तर लोकांनी ठारच मारले. चेकोस्लाव्हाकिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्येही कम्युनिस्ट राजवटी पडल्या. त्यावेळेस वर्तमानपत्रातून या सगळ्या गोष्टी कळत होत्या पण त्या घटना नक्की का होत आहेत आणि त्यांचे महत्व काय याचा उलगडा काही होत नव्हता. कम्युनिझम वगैरे गोष्टी नुसत्या वर्तमानपत्रात वाचत होतो पण त्याचा अर्थ कळण्याइतकी जाण त्यावेळेस नव्हती त्यामुळे मानवी इतिहासातील एका खरोखरच ऐतिहासिक पर्वाविषयी समकालीन वर्तमानपत्रांमध्ये वाचत असूनही त्याचा आस्वाद घेता आला नव्हता. कम्युनिझम आणि रशियन पध्दतीत त्यांच्याच लोकांची गळचेपी कशी चालली होती, गुलाग वगैरे गोष्टी मला बर्‍याच नंतर कळल्या त्यामुळे रशियातून कम्युनिस्ट राजवटीचा अंत होणे ही केवढी ऐतिहासिक आणि महत्वाची घटना होती हे हळूहळू समजायला लागले.

मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे तीन गोष्टी लिहावाश्या वाटतात. स्वतः गोर्बाचेव्ह कम्युनिस्ट पक्षातूनच उच्चपदाला पोचले. ते कम्युनिझमविरोधी होते असे वाटत नाही. पाच आंधळे आणि एक हत्ती या गोष्टीप्रमाणे कम्युनिझम म्हणजे नक्की काय हे १००% कोणालाच समजले नसावे तरीही स्वतः गोर्बाचेव्ह त्याच पक्षातून वर आले असल्याने ते कम्युनिझमविरोधी नसावेत. फक्त त्यांना अभिप्रेत असलेल्या कम्युनिझमची छटा ही फिकी लाल असावी. म्हणजे त्यांना लेनिन-स्टालिनसारखा हिंसाचार नको होता पण ज्या तथाकथित उद्देशांसाठी लेनिन आणि स्टालिन यांनी हिंसाचार केला होता त्या उद्देशांना गोर्बाचेव्ह यांचा विरोध नसावा असे म्हणायला जागा आहे. अमेरिकेत बर्नी सँडर्स वगैरे डेमॉक्रॅटिक सोशालिस्ट पण म्हणतात- आम्हाला गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी करायची आहे आणि इतर उद्दिष्टे साध्य करायची आहेत पण चे गव्हेरासारखा हिंसाचार न करता तशी गोर्बाचेव्ह यांची भूमिका होती असे दिसते. १९८५-८६ मध्ये त्यांनी पेरेस्त्रोईका म्हणजे सोव्हिएट राजकारणात आणि अर्थकारणात बदल घडवायच्या दृष्टीने पावले उचलली त्यामागेही कम्युनिस्ट अर्थकारण किंवा कम्युनिस्ट राजवट संपविणे हे ध्येय नव्हते तर त्यापूर्वीच्या काळात, विशेषतः ब्रेझनेव्ह आणि त्यानंतर अल्पावधीसाठी सत्तेवर आलेल्या आंद्रेपोव्ह आणि चेरनेन्को यांच्या काळात रशियन अर्थव्यवस्थेत आलेला साचलेपणा (स्टॅगनेशन) संपवून त्या पध्दतीचा लोकांना अधिक फायदा करून द्यावा असा काहीसा उद्देश होता. आता ब्रेझनेव्ह, आंदेपोव्ह आणि चेरनेन्को यांच्या काळात आलेला साचलेपणा संपविण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते आणि गोर्बाचेव्ह यांच्याऐवजी दुसरा कोणीही सत्ताधारी झाला असता तर त्याने तेच केले असते का असे म्हणायचे का? कदाचित तसे नसावे. सोव्हिएट काळात रशियातील सगळे मोठे उद्योग सरकारच्या ताब्यात होते आणि मार्केटमध्ये मागणी किती आहे त्यानुसार उत्पादन करण्याऐवजी मॉस्कोमधून कोणी अधिकारी आदेश देईल तितकेच आणि त्याच गोष्टींचे उत्पादन या उद्योगांमधून केले जायचे. ही 'कमांड इकॉनॉमी' म्हणजे समाजवादी आणि त्यापुढील पायरी म्हणजे कम्युनिस्ट पध्दतीचा कणा होती. गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोईकाचा एक भाग म्हणून या सरकारी उद्योगांना असा मॉस्कोतून आदेश न पाठवता मार्केटमध्ये किती मागणी आहे त्याप्रमाणे उत्पादन करायची परवानगी दिली गेली. म्हणजे गोर्बाचेव्ह यांनी पूर्ण बंद असलेले दार थोडे उघडून मार्केट इकॉनॉमीचे वारे काही प्रमाणात रशियात येऊ दिले. उद्देश काय- तर आपल्याच पध्दतीचा लोकांच्या फायद्यासाठी वापर करावा. पण हे कम्युनिझमच्या मूळ तत्वांविरोधात असल्याने असे करणे हे गोर्बाचेव्ह यांचे धाडस होते. म्हणजे गोर्बाचेव्ह यांच्याजागी दुसरा कोणी असता तर त्यानेही तेच केले असते असे कदाचित नसावे.

दुसरी गोष्ट म्हणजे सुरवातीला पेरेस्त्रोईका म्हणजे राजकीय आणि आर्थिक सुधारणा राबवायला त्यांनी सुरवात केली आणि त्या सुधारणा राबवायला लठ्ठ सोव्हिएट नोकरशाहीकडून अडचणी यायला लागल्यावर ग्लासनोस्त म्हणजे प्रशासकीय सुधारणा- यात मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी गुप्ततेच्या वातावरणात पूर्वी व्हायच्या त्यात खुलेपणा आणणे ही मुख्य पावले गोर्बाचेव्हांनी उचलली. याचा अर्थ गोर्बाचेव्हांनी म्हणावे तर एका प्रकारे कम्युनिस्ट पध्दतीच्या मूळ तत्वांवरच आघात केला किंवा दुसर्‍या अर्थाने म्हणावे तर विशेष काहीच केले नाही- पण घट्ट बंद असलेले दार थोडे किलकिले केले इतकेच. मग या किलकिल्या केलेल्या दारातून इतके मोठे वादळ येऊन ३-४ वर्षात सगळी सोव्हिएट कम्युनिस्ट पध्दतच भुईसपाट कशी झाली? मागे मिपावर 'तुम्ही डावीकडून उजवीकडे का आलात' म्हणून एक चर्चा झाली होती त्यात लिहिले होते की लेफ्ट लिबर्टेरिअन ही टिकणारी स्थिती नाही- म्हणजे सत्तेत येण्यापूर्वी हे सगळे लोक लेफ्ट लिबर्टेरिअनच असतात (अगदी लेनिन किंवा चे गव्हेरानेही आपण सत्तेत आल्यावर लोकांना ठार मारायचे या उद्देशाने सत्ता बळकावली नव्हती- नसावी) पण सत्तेत आल्यावर मात्र त्यांची वाटचाल लेफ्ट ऑथोरिटॅरिअन या दिशेनेच होते. त्याचे कारण त्याच प्रतिसादात लिहिले होते. आता उलट्या अर्थाने बघितले की गोर्बाचेव्ह यांनी पूर्वीच्या गुलाग असलेल्या लालभडक कम्युनिस्ट राजवटीकडून त्यांच्या काळात काहीशा फिकट लाल पण कम्युनिस्ट राजवटीकडेच वाटचाल करण्यासाठी म्हणून थोडे दार किलकिले केले आणि त्यातून मोठे वादळ आले आणि सगळी व्यवस्थाच भुईसपाट झाली. मिपावरील अनेक चर्चांमध्ये मी म्हटले आहे की दडपशाहीशिवाय कम्युनिस्ट राजवट टिकणे अशक्य आहे त्याला ही पार्श्वभूमी आहे. त्यातही गोर्बाचेव्ह हे लेनिन किंवा स्टालिनपेक्षा कोट्यावधी पटींनी सहृदय असल्याने पूर्व युरोपातील लोकांवर त्यांच्या इच्छेविरोधात दडपशाही करणे अयोग्य आहे हे त्यांना वाटले असायची शक्यता आहेच. तरीही आपल्या देशाच्या साम्राज्याचे नुकसान व्हावे यासाठी त्यांनी पूर्व युरोपातून सैन्य मागे घेतले नसावे. अफगाणिस्तानात हकनाक पाण्यासारखा पैसा आणि रशियन जीव खर्ची पडल्याने पूर्व युरोपातील पांढरे हत्ती पोसणे दिवसेंदिवस कठीण झाल्यामुळे त्यांनी तिथून सैन्य माघारी बोलवायचा निर्णय घेतला असे दिसते. तसेच रशियन सैन्य माघारी आल्याबरोबर तिथे उठाव होईल आणि कम्युनिस्ट राजवट गाडली जाईल याची त्यांना तरी कल्पना होती की नाही कोणास ठाऊक. काहीही असले तरी सैन्याची पोलादी पकड ढिली पडल्यावर पूर्व युरोपातील आणि नंतर खुद्द रशियातील कम्युनिस्ट राजवटी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या ही पण वस्तुस्थिती आहे. दडपशाहीशिवाय कम्युनिस्ट राजवट टिकत नाही हेच ते दर्शविते का?

तिसरे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे बर्लिनची भिंत पडली वगैरे काळात मी बराच लहान होतो. आता माहित आहेत त्याच्या ०.१% गोष्टीही त्यावेळी माहित नव्हत्या. त्यामुळे त्या काळात मी अगदी अज्ञानातील सुखी होतो. त्यापूर्वी तर माझा जन्मही झाला नव्हता. त्या शीतयुध्दाच्या काळात माझ्यासारख्यांची अगदी विलक्षण ओढाताण झाली असती. म्हणजे 'आता पुढे काय करू रे' हे विचारायला अमेरिकेचे किंवा रशियाचे अध्यक्ष येणार नव्हते हे वेगळे सांगायलाच नको पण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशावर प्रेम आणि त्यावेळी असलेल्या परिस्थितीत अमेरिका आपल्याविरोधात तर रशिया जवळचा असल्याने रशियाविषयी आपलेपणा वाटणे पण त्याचवेळेस त्यांच्या कम्युनिस्ट पध्दतीला कमालीचा विरोध ही ओढाताण एका बाजूला. तसेच अमेरिकन पध्दतीविषयी आपलेपणा वाटत असला तरी अमेरिका पाकिस्तानला जवळ असल्याने त्या देशाचा विरोध ही ओढाताण दुसर्‍या बाजूला अशी स्थिती त्यावेळेस माझ्यासारख्यांची त्यावेळी झाली असेल. माझीही झाली असेल कदाचित पूर्वजन्मी पण माझ्या आता तरी ते लक्षात नाही :)

असो. मिखाईल गोर्बाचेव्ह यांना विनम्र आदरांजली.

आग्या१९९०'s picture

7 Sep 2022 - 3:15 pm | आग्या१९९०

रोमानियात सिअ‍ॅसिस्कूला तर लोकांनी ठारच मारले.

उच्चार ' चाऊसेस्कू ' ( निकोलाई चाऊसेस्कू ). त्यांना नरसंहार आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झाली आणि लोकांनी नव्हे , तर लष्करातील एका तुकडीने त्यांना गोळ्या घालून ठार मारले.
खूप आलिशान प्रासाद होता त्यांचा. सीएनएन वर दाखवले होते. त्यावेळी भारतातील कम्युनिस्टांची वाचा गेली होती. गोर्बाचेव्ह यांच्याविषयी फार चांगले बोलत नव्हते येथील कम्युनिस्ट.

क्लिंटन's picture

7 Sep 2022 - 3:30 pm | क्लिंटन

उच्चार ' चाऊसेस्कू ' ( निकोलाई चाऊसेस्कू ).

धन्यवाद. हो पूर्व युरोपातील उच्चार करायची पध्दत पाहता असा काहीतरी वेगळाच उच्चार असणे सहज शक्य आहे. पण त्यावेळेस मी वाचलेल्या मराठी पेपरांमध्ये सिअ‍ॅसेस्कू असेच यायचे त्यामुळे माझ्या डोक्यात तोच उच्चार बसला.

नरसंहार आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झाली आणि लोकांनी नव्हे , तर लष्करातील एका तुकडीने त्यांना गोळ्या घालून ठार मारले.

हो तांत्रिकदृष्ट्या लष्करातील तुकडीने त्याला ठार मारले पण देहदंडाची शिक्षा लोकांच्या उठावातून तयार केलेल्या तथाकथित न्यायालयाने दिली होती. अगदी १-२ दिवसात सगळी न्यायदानाची प्रक्रीया पूर्ण झाली आणि त्याला यमसदनी पाठवले पण.

श्रीगुरुजी's picture

7 Sep 2022 - 4:04 pm | श्रीगुरुजी

चाउसेस्कूच्या बायकोलाही मारले होते बहुतेक. इतर सर्व साम्यवादी देशात शांततेने सत्ता हस्तांतरण झाले होते. रूमेनियात रक्तरंजित क्रांती झाली होती.

याचा प्रारंभ गोर्बाचेव्ह यांनी केला नसून १९८१-८२ मध्ये पोलंडमधील कामगार नेता लेच वालेसा यांनी केलेल्या राष्ट्रवापी कामगार संपातून झाली होती.

मदनबाण's picture

7 Sep 2022 - 7:20 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou

देशातील मदरशांवर मी इथे चिंता व्यक्त केल्याचे आणि त्यावर नियंत्रण आणण्याच्या संदर्भात लिहले होते. [ बहुतेक त्या प्रतिसादाला देखील पंख लागले असावेत. ]
आता आसाम मध्ये अशी कारवाई होताना दिसत आहे. या विषयावर अधिक :-

फक्त लव्ह?जिहाद नाही सर्व प्रकारचा जिहाद ठेचुन काढला पाहिजे, हे असे मोकाट सुटले आहेत :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You will face many defeats in life, but never let yourself be defeated. -Maya Angelou