ऑरकुट वर आम्हा कविचि एक कवितेचे गाव नावाचि कम्युनिटी आहे..ज्याचे साधारण १८५ सभासद आहेत..या कम्युनिटी तर्फे खास ब्रेल लिपितुन अंध मुलांसाठी कविता संग्रह व सी.डी चे प्रकाशन दिनांक ३ मे रोजि होणार आहे.. या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे व त्या चे हे केलेले कौतुक...
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=58560798&tid=5330199893487...
From अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन" alt="" />
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 7:35 pm | क्रान्ति
या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच! शुभेच्छा.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 7:39 pm | अनंता
अतिशय स्तुत्य उपक्रम.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
30 Apr 2009 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच! शुभेच्छा.
30 Apr 2009 - 10:20 pm | प्राजु
कौतुक करावे तितके कमी आहे.
माझ्याही खूप खूप शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 11:13 pm | श्रावण मोडक
"माझ्यासमोरची सारी मुलं अंध होती हे कळत होतं. पण वळत नव्हतं. त्यामुळंच मी माझ्या एका सह-कवीची कविता त्यांना ऐकवत होतो ती जशीच्या तशी. त्यातलं हे वर्णन...
हा नीलमुकूट संभाळायला, किती जन्म रे घ्यायचे तू अजून ?
किंवा दुसऱ्या एका कवितेतील ही ओळ...
फ़क्त नजर उचलून त्या तेजबिंबाकडे पाहिले मी...!!!
पहिली कविता भीष्म आणि कृष्ण यांच्यातील संवादाची तर दुसरी कुंतीच्या मनोगताची.
कविता वाचून झाली आणि त्या मुलांशी बोलू लागलो. एक प्रश्न आला - नीलमुकुट म्हणजे काय? पाठोपाठ आणखी एक प्रश्न - तेजबिंब?
आणि क्षणार्धात मलाच दृष्टी लाभली. या मुलांसमोर हे रंगांचं वर्णन, एखाद्या दृश्याचं वर्णन करणं म्हणजे त्यांच्यातील न्यूनावरचा आणखी एक अन्यायच...."
कवी डॉ. राहूल देशपांडे हे सांगत जातो तेव्हा कविता समृद्ध करणाऱ्या प्रतिमांची मर्यादाच प्रत्येक काव्यरसिकासमोर येते. तशीच ती त्याच्याही आली. आणणारी मुलं होती दृष्टिहीन. पण ती आली आणि त्याच्या व 'कवितांचे गाव' या ऑर्कुटवरील काव्यसमुहातील त्याच्या सह-कवींच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तिलाच तो 'दृष्टी' म्हणतो.
"पंचज्ञानेंद्रियांपैकी एक, म्हणजे डोळा बंद करून कविता लिहायची. कविता दिसली नाही पाहिजे. ती जाणवली पाहिजे. इतर चार ज्ञानेंद्रियांना..."
त्या सगळ्यांचा एक नवा प्रवास सुरू झाला. कविता... आपले डोळे बंद करूनही केवळ दृष्टीहिनांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली. त्यातूनच साकारलाय हा ब्रेलचा संग्रह.
(हा मजकूर 'सामना'त याविषयी लिहिलेल्या लेखाच्या सुरवातीचा आहे. ही प्रक्रिया कशी झाली हे समजावे यासाठी तो येथे दिला आहे).
उद्या रविवारी पुण्यात या ब्रेल संग्रहाचे प्रकाशन होतेय. गरवारे महाविद्यालयात, कर्वे रस्त्यावर. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आहे. अनुराधा मराठे यांच्या हस्ते हा संग्रह आणि त्यातीलच काही निवडक भावगीतांच्या अल्बमचे प्रकाशन होईल.
30 Apr 2009 - 11:20 pm | प्राजु
"पंचज्ञानेंद्रियांपैकी एक, म्हणजे डोळा बंद करून कविता लिहायची. कविता दिसली नाही पाहिजे. ती जाणवली पाहिजे. इतर चार ज्ञानेंद्रियांना..."
खूप सुंदर आहे हा विचार. :)
धन्यवाद श्रावणदा, ही प्रोसेस आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2009 - 9:00 am | राघव
असेच म्हणतो.
कार्यक्रमाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन :)
राघव
1 May 2009 - 8:45 pm | श्रावण मोडक
वरील प्रतिसादात उद्या रविवारी असे म्हटले आहे. रविवार दि. ३ मे रोजी असा त्याचा अर्थ घ्यावा. उद्याच्या रविवारी असे म्हणायचे होते. परा यांनी चूक ध्यानी आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
1 May 2009 - 7:03 pm | सहज
चांगला उपक्रम. संबधीतांचे अभिनंदन. मोडककाकांचा प्रतिसाद माहीतीपूर्ण.
अविनाशकुलकर्णी चांगली माहीती दिलीत की. :-)