ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ६)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
26 Jul 2022 - 11:07 pm
गाभा: 

मागच्या भागात माजी मुख्यमंत्री यांची मुलाखत एका प्रतिसादात दिली गेली आहे, त्या मुलाखतीचा नारायण राणेंकडून चांगला समाचार घेतला गेला आहे, याच बरोबर अनय जोगळेकर यांचा या वस्त्रहरणावर देखील एक व्हिडियो पाहण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडियोंनी धाग्याची सुरुवात करत आहे.

मदनबाण.....

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

26 Jul 2022 - 11:16 pm | कपिलमुनी

अहो मागच्या भागाचे २०० तरी प्रतिसाद होऊ द्या..
हगवण लागल्या सारखे एका मागोमाग एक धागे का??

अहो मागच्या भागाचे २०० तरी प्रतिसाद होऊ द्या..
अच्छा,२०० प्रतिसाद झाल्यावरच दुसरा धागा काढावा असा काही नियम आहे का ? ३ पाने झाली की पुढचे प्रतिसाद वाचण्यास सोपे जावे म्हणुन नविन धागा काढला.

हगवण लागल्या सारखे एका मागोमाग एक धागे का??
काय मुनी, ऑर्गेजम वरुन हगवणी पर्यंत आलात ! तुमचं मानसिक "अधःपतन" आवरा जरा. मी एका मागोमाग एक धागे काढलेले नाहीत, ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३ हा या आधी काढलेला होता, आता जुलै चालु आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I was ashamed of myself when I realized life was a costume party and I attended with my real face." :- Franz Kafka

मादागास्करच्या राजधानीत भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले.

क्लिंटन's picture

27 Jul 2022 - 11:16 am | क्लिंटन

आफ्रिका खंडात हिंदू धर्माचा प्रसार बराच होत आहे असे दिसते. आफ्रिका खंडात गणपती उत्सवही उत्साहाने साजरा होतो असे दिसते. ते पुढील व्हिडिओत बघायला मिळेल.

निनाद's picture

29 Jul 2022 - 8:34 am | निनाद

घाना या देशात स्वामी घनानंद यांनी योग आणि आरोग्य विषयक फार मोठे कार्य केले आहे. आयुर्वेदाचे फायदे आणि सनातन अध्यात्मिक विचारांकडे येथिल अनेक लोक आकर्षित झाले आहेत. स्वामीजी हिमलयात फिरत असतांना त्यांना गुरू भेटले. त्यांनी उपदेश केला की तुझ्या देश बांधवांना याची गरज आहे. त्यांनी तो उपदेश पाळला.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2022 - 12:30 pm | मुक्त विहारि

Haryana DSP killing: 12 accused found involved in investigation so far; nine arrested

https://www.google.com/amp/s/www.freepressjournal.in/amp/india/haryana-d...

वरवंटा फिरायला लागला .....

'गरीब महिलेचा छळ का करताय?' गुलाम नबी आझाद यांचा ईडी-केंद्रावर हल्लाबोल

https://www.lokmat.com/national/national-herald-case-why-are-you-torturi...

देव करो आणि अशी गरिबी सगळ्यांना मिळो ....

अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED नं पुन्हा मागवलं नोटा मोजण्याचं मशीन!

https://www.lokmat.com/national/arpita-mukherjee-ed-cash-home-machine-sh...

धाडीत सापडलेली रक्कम इतकी जास्त आहे की ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याचं मशीन मागवावं लागलं आहे.

निनाद's picture

29 Jul 2022 - 8:09 am | निनाद

लोक पैशाच्या मागे लागतात. पण अर्पिता या सन्यस्त आहेत! घरात पैशाचा डोंगर असतांना त्या पैशांना त्यांनी हात लावला नाही असे म्हणतात. इतकेच काय इमारतीचा सुमारे अकरा हजाराचा हप्ता पण थकलेला आहे. काय हे असे त्या एकट्या अबला नारीला सगळे टपले छळण्याला.

उपयोजक's picture

28 Jul 2022 - 9:32 pm | उपयोजक

https://t.me/indianpoliticsbook

फक्त राजकारणावरील पुस्तकांचे चॅनल

सौंदाळा's picture

29 Jul 2022 - 10:27 am | सौंदाळा

राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराला कधी मुहूर्त मिळणार आहे?
आधी राष्ट्रपतीपद निवडणुकीनंतर म्हणत होते आता निवडणुका होऊन गेल्या तरी काही हालचाल नाही.
१ ऑगस्ट्च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघत आहेत का?
महाविकास आघाडी गेल्या गेल्या मराठा आरक्षणवाले परत सक्रिय झालेले (का केलेले) दिसत आहेत. ९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढणार असे वाचले.

अजुन किती दिवस आपले कुशल वैमानिक मृत्यूमुखी पडत राहणार ? :( मला वाटतं ४०० पेक्षा अधिक मिग कोसळली असुन २०० पेक्षा पायलट्स मेले आहेत. वायुदलावर मोठा कलंक लागला असुन यावर अजुन अधिक बळी आपण देणार आहोत आणि का ?

एकंदर हिंदूस्थानी लष्करी आणि इतर बाबींवर मी पाहिलेला [ अर्धाच पाहिला असुन, तो पाहुन पूर्ण करायचा बाकी आहे. ] व्हिडियो इथे शेअर करत आहे. हल्लीच पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना कोठल्या तरी ड्रोन बद्धल माहिती घेताना पाहिले होते, हे आठवण्याचे कारण खाली दिलेल्या व्हिडियोत असेच एक ड्रोनचे उदाहरण दिले गेले असुन ज्या युवकाने ते बनवले होते, त्याला बरेच प्रयत्न करुन देखील संधी न मिळाल्याने त्याने शेवटी मायक्रोसॉफ्ट जॉइन केले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neeli Neeli || Full Song || Folk Song || Ft. Dhethadi Harika || Nivriti Vibes || Tamada Media

मदनबाण's picture

30 Jul 2022 - 4:53 pm | मदनबाण

आपल्या देशात बळी घेतल्या शिवाय कुठलेही महत्वाचे बदल घडत नाहीत किंवा निर्णय घेतले जात नाहीत हे मी अनेकवेळा म्हणतो त्याचे ताजे उदाहरण:-
दुर्घटनेनंतर मिग-21 च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, 2025 पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यातून मिग-21 निवृत्त होणार

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay L

मुक्त विहारि's picture

29 Jul 2022 - 4:31 pm | मुक्त विहारि

२४ तासात ट्वीट डिलीट करा, अन्यथा.., हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं

https://www.loksatta.com/desh-videsh/bjp-smriti-irani-defamation-case-de...

कोण दोषी? ते कोर्टात सिद्ध होईलच ....

आसाममध्ये अल कायदाशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

https://www.loksatta.com/desh-videsh/11-al-qaeda-linked-terrorists-arres...

......ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एकाला मोरीगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती मदरसा शिक्षक असल्याचे पुढे आले आहे. मुस्तफा असं या व्यक्तीचे नाव आहे.......

भाजपच्या युवा नेत्याची हत्या : दोन संशयितांना अटक

https://www.loksatta.com/desh-videsh/two-men-arrested-in-bjp-youth-wing-...

........या प्रकरणी बेल्लारी पोलिसांनी पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. पीएफआय या संस्थेचे झाकीर (२९) आणि मोहम्मद शाफिक (२७) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही बेल्लारीचे असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे काय याचा तपास पोलीस करत आहेत.......

राज्यपाल पदासाठी अयोग्य माणूस

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2022 - 2:13 pm | श्रीगुरुजी

पूर्ण ऐका

https://youtu.be/1NyevzqgOvc

मुक्त विहारि's picture

30 Jul 2022 - 3:55 pm | मुक्त विहारि

लिंक बद्दल धन्यवाद ....

आजिबात नाही, राऊत साहेबांनी ट्विट केलय ना, मग विषयच नाही बाकी गोष्टी तपासून बघायच्या.

गणेशा's picture

31 Jul 2022 - 12:33 am | गणेशा

श्री गुरुजी,
अतिशय बकवास बोर मारले आहे, या लिंक मधील माणसाने..
आणि संजय राऊत फलाना आलेच कुठून?
याने बोललेले लपते आहे का?

मग मागे सावित्री बाई फुले यांच्या बद्दल काढलेले उद्गगार काय होते?

जोवर अशा वक्तव्याचा सर्वच ठिकाणाहून निषेध केला जात नाही तोवर काळ वैराचाच असणार आहे.. तो सोकावणारच
आत्मसम्मान राखला जात नसतानाही आपण मौन राहत असू तर ती पक्ष/ व्यक्तीनिष्ठता न राहता वैचारिक अधःपतनाचे लक्षण ठरते.

मुंबईच्या विकासात सगळ्यांचे आपापल्या परीने योगदान आहे तसेच या सगळ्यांच्या भरभराटी मध्ये मुंबईचे योगदान आहे.. गुजराती मारवाडी लोकांनाही त्यांच्या वाटेचे श्रेय देण्यास हरकत नाही. यामुळे मराठी अस्मिता दुखावण्याचा प्रश्न नाही.
मात्र , इतर समाजाचे कौतुक करताना फक्त त्यांचेच कौतुक करणे, आणि त्यांच्या शिवाय मुंबई अगदीच बेकार होईल असे म्हणणे एक विकृत इगो आहे

जाहीर निषेध..

आणि संजय राऊत म्हणाले तर हे बिन बघता बोलणार वगैरे बोलणाऱ्यांना
-
एका पक्षाच्या पाठींब्या साठी लोकं किती आत्मसम्मान गहान टाकणार?
जे चूक ते चूक.. मग ते १० सेकंद असु नाहीतर ११ मिनिटे..
असो..

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 7:13 am | श्रीगुरुजी

राज्यपालांचे संपूर्ण ११ मिनिटांचे भाषण पाहिले तर मला नाही वाटत त्यांनी महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच वगैरे केलंय. मागचा पुढचा संदर्भ न पाहता मधलेच एखादे वाक्य अधोरेखित करून त्यावर झोडपत राहणे मला चुकीचे वाटते.

अर्थात असे वारंवार होत आहे उदाहरणार्थ - मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले अशी थाप फक्त कॉंग्रेसी मारत नाहीत, पण कुमार केतकर, चोरमारे, कुबेर असे संपादक सुद्धा मारतात.

असो.

आग्या१९९०'s picture

31 Jul 2022 - 7:59 am | आग्या१९९०

मागचा पुढचा संदर्भ न पाहता मधलेच एखादे वाक्य अधोरेखित करून त्यावर झोडपत राहणे मला चुकीचे वाटते.
जसे की, " ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा”.

कानडाऊ योगेशु's picture

31 Jul 2022 - 10:50 am | कानडाऊ योगेशु

अशोक गेहलोत यांचे "पानी मे से बिजली निकालेंगे तो किसान के लिए बचेगा क्या?" ही ही अ‍ॅडवा त्यात.

क्लिंटन's picture

31 Jul 2022 - 11:28 am | क्लिंटन

जसे की, " ऐसी मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा”.

सहमत.

त्याचप्रमाणे आणखी एक प्रसिध्द संवाद तसाच अर्धवट तोडून सगळीकडे प्रसिध्द केला जातो. प्रसिध्द केला जाणारा संवाद पुढीलप्रमाणे:

वाजपेयी- मेरा चीफ मिनिस्टर के लिए एकही संदेश है की वे राजधर्मका पालन करे. राजधर्म... यह काफी सार्थक शब्द है. मै भी उसका पालन कर रहा हू पालन करनेका प्रयास कर रहा हू. राजा के लिए शासक के लिए प्रजामे भेद नही हो सकता. ना धर्म की आधारपर ना जाती के आधारपर.

त्यानंतर बाजूला बसलेल्या मोदींनी म्हटले- हम भी तो वही कर रहे है साहब.

त्यावर वाजपेयी म्हणाले- मेरा विश्वास है की नरेंद्रभाई भी वही कर रहे है. वाजपेयींचे हे पुढचे वाक्यही असे मुद्दामून तोडून आधीचाच भाग प्रसिध्द केला गेला आहे.

कानडाऊ योगेशु's picture

31 Jul 2022 - 12:12 pm | कानडाऊ योगेशु

"१५ लाख सबके खाते मे आयेंगे" हे ही अ‍ॅडवा त्यात.

डँबिस००७'s picture

31 Jul 2022 - 2:45 pm | डँबिस००७

मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले अशी थाप फक्त कॉंग्रेसी मारत नाहीत, पण कुमार केतकर, चोरमारे, कुबेर असे संपादक सुद्धा मारतात.

कुमार केतकर, चोरमारे, कुबेर असे संपादक शपथेवार सांगतात की मोदींनी
स्वःता त्यांना सांगीतलय की ते १५ लाख
प्रत्येकाच्या बॅंक खात्यात टाकणार !!

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 3:22 pm | श्रीगुरुजी

हिंदू अतिरेक्यांनी बाबरी उद्ध्वस्त केली - कुमार केतकर
आम्हीच बाबरी पाडली - संजय राऊत

निष्कर्ष - सेना हिंदू अतिरेकी टोळी आहे.

२०१९ पासून सेना-कॉंग्रेस युती आहे.
कुमार केतकर कॉंग्रेसचे खासदार आहेत.

निष्कर्ष - कॉंग्रेसचा हिंदू अतिरेकी टोळ्यांना पाठिंबा आहे.

कपिलमुनी's picture

30 Jul 2022 - 3:57 pm | कपिलमुनी

राज्यपाल येडा माणूस आहे . बहुधा संघाच्या पुस्तकात मराठी माणसाबद्दल पुरेसे शिकवत नसावेत.
मागे सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

असला बिनडोक राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा नाही ..
अर्थात लाळचाट्याचे बक्षीस म्हणून उद्या राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2022 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज्यपाल एक घटनात्मक पद आहे, घटनात्मक पदावर बसलेल्या माणसाने इतकं वाचाळ असू नये. राज्यपाल वादग्रस्त असतात, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. पंतप्रधान मोदी सरकारने आपलं खेळण्याचं बाहुलं म्हणुन ज्यांचा सतत उपयोग ज्यांचा केला त्या मा. राज्यपालांना स्वतःची शिंगे फुटली आहेत, असे वाटायला लागले आहेत.राज्यपालापदाने संविधानिक नियमांचे पालन केले पाहिजे. आपल्या सदसदविवेकबुद्धीच्या आधारे आपल्या पदाला शोभेल असे बोलले पाहिजे. आपली वैचारिक भुमिका, आपली पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून काम केले पाहिजे. पण हे सोडुन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जो वाचाळपणा सुरु केला जो मनमानीपणा केला आहे, त्याचा प्रत्येकाने निषेधच केला पाहिजे. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. सावित्रीबाई-ज्योतिबा फुले यांच्यावर वाद केला, वाचाळ कंगना रानावतला डोक्यावर बसवले. बारा आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्या, पहाटेच्या सत्ता शपथेसाठी केलेला खेळ आणि आता गुजराती मारवाडी शिवाय मुंबईचे काहीच अस्तित्व नाही असे म्हणने हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी संघर्ष करणा-या सर्वांचा आणि महाराष्ट्राचा अपमानच आहे, मराठी माणसाच्या परिश्रमातून, त्यांच्या नियमित जगण्या-मरण्याच्या प्रश्नातून मुंबई उभी राहीली आहे, एक महाराष्ट्राचा माणूस म्हणुन राज्यपालांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करतो.

मा.मोदीसरकार काही राज्यपालांना अशा वर्तनुकीतून परत बोलावणार नाही याची खात्री आहे, लोकांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न विसरुन अशा गोष्टीने जनतेचे लक्ष विचलित राहीले पाहिजे. लोकांना आपल्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे, यासाठी त्यांनाही अशा गोष्टी आवश्यकच आहेत, असे वाटायला लागले आहे.

-दिलीप बिरुटे

नवीन काही नाही. राऊतांचं घाणेरडं बोलणं मात्र चालवून घेतात. हे चित्रा वाघनी निदर्शनास आणलं.

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2022 - 4:54 pm | श्रीगुरुजी

राउत व स्वप्ना पाटकर यांच्या संभाषणाची ध्वनीफीत सर्वत्र प्रसिद्ध झालीये. त्या २७ सेकंदाच्या ध्वनीफितीत अक्षरशः प्रत्येक शब्दाआड ****द, ** द अश्या शिव्या आहेत. त्यावरील चर्चा टाळण्यासाठी अर्थातच मराठी माणूस, मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अपमान वगैरे बोथट झालेली शस्त्रे आहेतच.

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी या पक्षांना प्रतापगडी, चतुर्वेदी, त्रिपाठी, चिदंबरम, शुक्ला, पटेल, केनिया, नंदी वगैरे आठवितात. तेव्हा मराठी माणूस, मराठी अस्मिता वगैरे तेल लावत जाते.

“२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान

https://www.loksatta.com/maharashtra/chitra-wagh-support-bhagat-singh-ko...

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 8:58 am | श्रीगुरुजी

नवीन काही नाही. राऊतांचं घाणेरडं बोलणं मात्र चालवून घेतात. हे चित्रा वाघनी निदर्शनास आणलं.

ही ध्वनीफीत फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील आहे. तेव्हाच स्वप्ना पाटकरांनी याविरूद्ध आवाज उठविला होता. परंतु पोलिसांनी साधा गुन्हा सुद्धा दाखल केला नाही. आता मात्र भाजप नेत्यांना कंठ फुटलाय. तेव्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस होते. परंतु उठा व शिवसेनेची किळसवाणी हुजरेगिरी सुरू असल्याने ते गप्प बसले. सत्तेसाठी व स्वासनासाठी ते उद्या दाऊद इब्राहिमशी सुद्धा युती करतील व त्यांचे समर्थक त्यांचे कौतुकही करतील.

मदनबाण's picture

30 Jul 2022 - 4:53 pm | मदनबाण

@श्रीगुरुजी
लिंक बद्धल धन्यवाद.
तुम्ही दिलेली लिंक पाहिल्यावर मी अजुन दोन लिंक पाहिल्या त्या खाली देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=FWl9eftr7Eo
https://www.youtube.com/watch?v=XdeT59py1-4
थोडक्यात महानॉटी मौखिक हागणदारी सम्राट श्री ४२० यांची २७ शिव्यांनी भरलेली "हगवण" [ या शब्दाचे श्रेय मुनींना. :))) ] लपवण्यासाठी भिकार मराठी मिडियाने राज्यपालांचे संपूर्ण भाषण न दाखवता केवळ मराठी लोकांची माथी भडकवण्यासाठी आजचा दिवस घालवला आहे.
जे मिडिया ने दिवसभरात दाखवले नाही :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay L

मदनबाण's picture

30 Jul 2022 - 5:30 pm | मदनबाण

येत्या महिन्यात आमिर खानचा "लाल चड्डी" सॉरी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होणार आहे म्हणे, तेव्हा तो फ्लॉप होण्यासाठी हा चित्रपट न पाहता तुम्ही देखील याला सुपर डुपर फ्लॉप करण्यासाठी हातभार लावाच.
यात तैमुर आणि जहांगिर ची अम्मी आहे, हो तीच..., जिने मागे माजुरडे विधान केले होते.

आमिर खान ने तर भोलेनाथांचा घोर अपमान केला होता, विसरला तर नाही ना ?

थोड्या प्रमाणात जागृत झालेली हिंदू जनता काय म्हणते ?

आमिर खान ने या चित्रपटात चेहर्‍याचे तसेच चित्र-विचित्र भाव केले आहेत जे त्याने त्याच्या काही आधीच्या चित्रपटात केले होते.
संदर्भ :- 'This Is Overacting' Aamir Khan's Performance In 'LSC' Trailer Reminds People Of 'Dhoom 3'
मला खटकले ते म्हणजे हे चेहर्‍याचे विचित्रभाव त्यांने इंडियन आर्मीच्या पोशाख घालुन देखील केले आहे !
P1
P2

जाता जाता :-

मुक्त विहारि's picture

30 Jul 2022 - 8:31 pm | मुक्त विहारि

आणि कुठे अमिर खान.....

फाॅरेस्ट गम्पची भ्रष्ट नक्कल ....

राजकुमारच्या भाषेत सांगायचे तर, स्काॅच पिने वाले, हातभट्टी नहीं पिया करते...

फिल्म रीलीज व्हायच्या आधी फॉरेस्ट गंप भारी होता म्हणून लालसिंग चड्ढा बकवासंच असेल असा शिक्का मारणाऱ्यांविषयी मला आश्चर्य वाटतं. हा फॉरेस्ट गंपचा ऑफिशियल रीमेक आहे. आधी पिक्चर येऊ तर द्या. बघण्याआधी राईटऑफ करण्यात काय अर्थ आहे? बघून नाही आवडला तर ठिके, किंवा बघायचाच नसेल तरी ठिक आहे पण कायतरी ओरीजिनल कर की, रीमेक कशाला करतो, बघू नका, फलाना करा असले फुटकळ सल्ले लोक कशाला देतायेत घाईघाईत? त्याला हवे ते सिनेमे तो करेल, तुम्हाला हवे ते बघा, बघून शिव्या घाला किंवा बघूच नका पण न बघताच धुवायचं म्हणजे थोर आहे फार.

असो..

उगा काहितरीच's picture

31 Jul 2022 - 8:25 am | उगा काहितरीच

मी ३-४ मिनिटांचा ट्रेलर बघितला आणि मस्तकात तीव्र सनक गेली. किती तो विचित्रपना. एवढ्या अप्रतिम कलाकृतीचे एवढे घान विद्रुपीकरण ? छी! अजिबात नाही आवडलं. आणि वर हाईट काय होती ना सर, फॉरेस्ट गंप असं नाव कुठेतरी दिसेल म्हणून बघत होतो, पण अक्षरशः कुठेच नाही दिसले.आता कदाचित उल्लेख टाकला असेल तर कल्पना नाही. ३-४ मिनिटांचा ट्रेलर बघतांना एवढा त्रास होत होता सर आणि तुम्ही म्हणताय की पूर्ण चित्रपट बघून मत बनवा. सॉरी! शक्य नाही.

मुक्त विहारि's picture

31 Jul 2022 - 10:33 pm | मुक्त विहारि

टाॅमने, फाॅरेस्ट गम सारखीच भुमिका, "सेव्हिंग प्रायव्हेट रायन" मध्ये केली होती... संरक्षण दलातील ... आणि दोन्ही भुमिका अतिशय उत्तम रित्या साकारल्या ....

आणि लाल सिंग चढ्ढाचे ट्रेलरच सांगते की, अमिर खानला ती भुमिका जमलेली नाही ....

बाय द वे, ज्यांना, अमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, यांचा अभिनय आवडतो, त्यांचे आणि माझे पटणे शक्य नाही....

बाय द वे, ज्यांना, अमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, यांचा अभिनय आवडतो, त्यांचे आणि माझे पटणे शक्य नाही....

रुमही लागलीच लोकांना फोल्डरमध्ये टाकता वाटतं. न पटणारा फोल्डर- पुणे आवडणारे, काही अभिनेते आवडणारे.

अवघड आहे.

कपिलमुनी's picture

1 Aug 2022 - 10:28 am | कपिलमुनी

आपल्या देशाची नागरिकता सोडणाऱ्या कॅनडा कुमार बद्दल काकांचे काय मत आहे?

अनन्त अवधुत's picture

1 Aug 2022 - 10:44 am | अनन्त अवधुत

बाय द वे, ज्यांना, अमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, यांचा अभिनय आवडतो, त्यांचे आणि माझे पटणे शक्य नाही....

सिरीअसली काका? तुम्ही पण कॅन्सल कल्चरचे समर्थन करताय?

रात्रीचे चांदणे's picture

30 Jul 2022 - 11:26 pm | रात्रीचे चांदणे

एकनाथ शिंदे परत दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा. शपथविधी होऊन एक महिना उलटून गेला तरी अजून मंत्रिमंडळ नाही. फक्त नौकारशहांच्या हत्तात राज्य आहे.

आज खोतकर शिंदेंसेनेत दाखल झाले, कारण कायतर एका कारखान्याच्या व्यवहारामध्ये अडकले म्हणून. म्हणजेच ED कडून त्यांना अभय मिळणार. भाजपला असली प्रकरणे जड जाण्याची शक्यता आहे. भाजपचं काहीही होउदे पण भ्रष्टाचार करा आणि भाजपात जावा हा संदेश देशभर पसरतोय. सध्या राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून हे शक्य होणार नाही. राहिले राष्ट्रवादी तर त्यांच्यावर ED सोडून शांत बसवण्यात येईल.

गणेशा's picture

31 Jul 2022 - 12:47 am | गणेशा

भाजपला असली प्रकरणे जड जाण्याची शक्यता आहे.

नाही जाणार,
देशात अक्कल वापरून मते दिली जातायेत असे वाटते काय तुम्हाला..

रात्रीचे चांदणे's picture

31 Jul 2022 - 1:00 am | रात्रीचे चांदणे

देशात अक्कल वापरून मते दिली जातायेत असे वाटते काय तुम्हाला
होय, लोक उपलब्ध पर्यायांपैकी चांगला असेल तोच निवडतात असे मला तरी वाटतं. दिल्लीतल्या लोकांनी एकचवेळेला विधानसभेला केजरीवालांना तर लोकसभेसाठी मोदींना मत दिलीत. बंगलमध्येही भाजपला लोकसभेच्या प्रमाणात विधानसभेत जागा मिळाल्या नाहीत. माझ्या तालुक्यात आमदार राष्ट्रवादीचा पण लोकसभेला भाजपला जास्त मत मिळाली.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 8:51 am | श्रीगुरुजी

भाजपला असली प्रकरणे जड जाण्याची शक्यता आहे. भाजपचं काहीही होउदे पण भ्रष्टाचार करा आणि भाजपात जावा हा संदेश देशभर पसरतोय.

होय, असा संदेश देशभर आधीच पसरलाय. महाराष्ट्रात तर या प्रकाराचा अतिरेक झालाय. राणे, विखे, कृपाशंकर यांना पावन करून घेतलंय. आता प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव हे सुद्धा पावन झालेत. भविष्यात नबाब मलिक, अनिल देशमुख वगैरे सुद्धां पावन करून घेतले जातील.

परंतु हे प्रकार भाजपला जड जाण्याची शून्य शक्यता आहे. हे प्रकार करणाऱ्या फडणवीसांना मिळणारा पाठिंबा पुरेसा बोलका आहे.

श्री गुरुजी, जर समोरासमोर सरकारी संस्था वापरल्या जातायेत, तर मागे evm हॅक करणे असे कितीसे अवघड असेल..?
उगाच पडलेला प्रश्न, आजकाल यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही इतकेच...

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 7:34 pm | श्रीगुरुजी

मतदानयंत्रातूध आपल्याला हवा तसा निकाल आणण्यासाठी

(१) त्यात अगदी पहिल्यांदा सॉफ्टवेअर भरतानाच ते गडबड केलेले असावे जेणेकरून आपल्याला हवे तसे निकाल लागतील

किंवा तसे सॉफ्टवेअर भरले नसेल तर ते बदलून

(१) त्यातील सॉफ्टवेअर पूर्णपणे माहिती हवे
(२) ते बदलण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती हवी
(३) मतदानयंत्राला हात न लावता त्यातील सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यासाठी ते यंत्र आंतरजाल किंवा अन्य प्रकारे आपल्या संगणकाशी किंवा चतुर भ्रमणध्वनीशी जोडता यायला हवे.

ही मतदानयंत्रे मागील २० वर्षांहून अधिक काळ वापरात आहेत. या काळात अनेकदा अनेक राज्यात व देशात सर्वत्र अनेकदा निवडणूक झाली आहे व त्यात कोणत्याही फक्त एका विशिष्ट पक्षाला अनुकूल निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे अगदी पहिल्यांदा सॉफ्टवेअर भरतानाच ते गडबड केलेले दिसत नाही.

म्हणजे गडबड करण्यासाठी मतदानयंत्रातील सॉफ्टवेअर बदलावे लागणार व त्यासाठी वर दिलेल्या ३ गोष्टी लागणार.

एकूण मतदानयंत्रांची संख्या १ लाखांहून अधिक आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदानयंत्रातील सॉफ्टवेअर बदलण्यासाठी प्रचंड वेळ व मोठ्या संख्येने तंत्रज्ञ लागतील. पण ही यंत्रे कोणत्याही प्रकारे आंतरजालाशी जोडलेली नसतात. त्यामुळे त्यातील सॉफ्टवेअर लांब अंतरावरून बदलणे कोणत्याही तंत्रज्ञाला अशक्य आहे.

या यंत्रात गडबड करून दाखविण्याचे आव्हान काही वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना दिले होते. तेव्हा या यंत्रातील गडबडीविषयी सातत्याने आरोप करणाऱ्या आआप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, सप किंवा अन्य कोणत्याही पक्षाने हे आव्हान स्वीकारले नव्हते कारण मुळातच ते खोटे आरोप करीत होते.

समजा असे गृहीत धरले की भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व १,००,०००+ यंत्रामध्ये गडबड केली आहे, तर मग काही राज्यात भाजपविरूद्ध निकाल कसे लागतात?

त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हीच यंत्रे सर्वत्र वापरली जात असल्याने कोणत्याही राज्याच्या, लोकसभेच्या किंवा महापालिका वगैरे निवडणुकीपूर्वी ही यंत्रे पुनर्प्रारंभित केली जातात. त्यात मतदारसंघ, उमेदवारांची नावे व त्यांची सर्व माहिती, मतदारांची संख्या वगैरे त्या त्या मतदारसंघानुसार नव्याने भरली जाते. एकावेळी अनेक राज्यात निवडणूक होते. त्यामुळे निवडणूक आयोगाला व भाजपला पूर्ण ५ वर्षे २४ तास हीच गडबड सर्व यंत्रात करावी लागणार जे अशक्यप्राय आहे.

क्लिंटन's picture

31 Jul 2022 - 7:46 pm | क्लिंटन

समजा असे गृहीत धरले की भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व १,००,०००+ यंत्रामध्ये गडबड केली आहे, तर मग काही राज्यात भाजपविरूद्ध निकाल कसे लागतात?

सगळीकडे भाजपचा विजय झाला तर मतदानयंत्रे हॅक केली आहेत हे अगदीच उघड होईल. तो संशय येऊ नये यासाठी काही राज्यात यंत्रे हॅक करत नाहीत. जिथे यंत्रे हॅक केलेली नाहीत तिथे भाजपचा पराभव होतो.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 8:00 pm | श्रीगुरुजी

ख्या ख्या ख्या . . .

मुक्त विहारि's picture

31 Jul 2022 - 10:36 pm | मुक्त विहारि

भाजप हरली तर .... लोकांनी योग्य न्याय दिला आणि भाजप जिंकली तर, EVM मशीन जबाबदार .... तसे, काही लोकांचे ठरलेलेच असावे ....

कॉमी's picture

31 Jul 2022 - 8:11 pm | कॉमी

मतदानयंत्रात गडबड हा अत्यंत गंभीर स्वरूपांचा आरोप आहे. जर हा आरोप गंभीरपणे केला जात असेल तर केवळ बोलून चालणार नाही.

तसेच असा आरोप करण्यासाठी खूपच जास्त सबळ पुरावा लागतो- नक्की काय घोटाळा आहे, कसा केला. आणि हे पुरावे एकदोन पोलिंग पुरते नाही, व्यापक प्रमाणात, सिस्टमटीक दोषांवर लागतात. आणि जनमत (पोल्स वैगेरे) पेक्षा निवडणुकीचे निकाल किमान बंगले दिसायला हवे. भाजप विजयाचे तसे आजिबात नाही. भाजप सर्व जनमताच्या कौलांमध्ये आघाडीवरच होते.

त्यामुळे, भाजपने घोटाळा केलाय असे म्हणणे बेजबाबदार आहे.

(अमेरिकेत बोल्शेविकांनी किंवा democrat पक्षाने घोटाळा केला म्हणणारे सुद्धा त्यात आले.)

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 8:25 pm | श्रीगुरुजी

बहुसंख्य ठिकाणी बहुतांशी सर्वेक्षणानुसार निकाल लागलेत.

सर्वेक्षणाच्या अंदाजापेक्षा पूर्ण वेगळे किंवा बरेचसे वेगळे निकाल काही वेळा लागले आहेत.

उदा. बंगाल २०२१ विधानसभा निवडणूक, बिहार २०१५ विधानसभा निवडणूक, २००४ लोकसभा निवडणूक

परंतु या प्रत्येक वेळी भाजपविरूद्ध निकाल लागला होता. जर भाजपने मतदानयंत्रात गडबड केली होती तर असे निकाल लागले नसते. अगदी २०१९ मध्ये महाराष्ट्रात सुद्धा गडबड करून भाजपला १३० पर्यंत नेता आले असते.

कॉमी's picture

1 Aug 2022 - 8:06 am | कॉमी

बरोबर.

हा उपाय आहे. त्या यंत्रात यादीतला क्रम बदलता आला पाहिजे. मुख्य यंत्रात तिसऱ्या क्रमांकाचे मत समांतर यंत्रात त्याच पक्षाला जाईल पण समांतर यंत्रात ते यादीत तिसरे नसणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2022 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देशभाजपामय करण्यासाठी जे जे करता येईल त्या त्या व्यवस्थेचा वापर सध्या केंद्रसरकार करीत आहे. महाराष्ट्राची वाताहत ख-या अर्थाने सुरु झाली आहे. दोन मंत्री सर्व निर्णय घेत आहेत, मुख्यमंत्री दिल्ली वारी करुन थकून गेले आहेत. बारा बारा तास वाट पाहुन त्यांना भाजपश्रेष्ठी वेळ देत नाही. पद आणि सत्तेच्या मोह भल्या भल्यांना पडला. एकनाथ शिंदे भाजपाच्या गळाला लागले. भाजपा आपल्या पक्षाला जे जे अडचणीचे लोक असतील, जे लोक आपल्या पक्षात येत नाही, जे लोक आपल्याला विरोध करतील त्या त्या सर्वांच्या मागे इडी लाऊन द्यायची. आपल्या पक्षात आले की क्लीन चीट द्यायची. ''भ्रष्टाचार करा आणि भाजपात सामील व्हा' एवढीच जाहिरात करणे भाजपायीची बाकी आहे. बाकी, अच्छे दिन असेच असतात. भाजपाला जनता योग्य वेळी योग्य धडा देईलच यात काही वाद नाही. तुर्तास पक्षाला शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

महाराष्ट्राची वाताहत ख-या अर्थाने सुरु झाली आहे.
काय बोलता ! मागचे मुख्यमंत्री, ज्यांना आपण काय बोलतो त्याचे सुद्धा भान नव्हते आणि यापुढे देखील ते येईल असे वाटतं नाही. अजान स्पर्धा भरवणारे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हे तुम्हा-आम्हाला रोज सांगत होते ! तेव्हा त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची कोणती प्रगती झाली ते जरा सांगा ना प्लीज !
सारखं हिम्मत असेल तर सरकार पाडुन दाखवा अशी टिंगल करत असायचे, मग विरोधकांनी साम-दाम-दंड -भेद यांचा वापर करुन त्यांचे सरकार पाडुन दाखवले [ हे करुन दाखवले च्या शैलीतच वाचावे. ] असेल तर मग दोष कोणाचा ?
टोमणे मारण्या पलिकडे त्यांचे कर्तुत्व काय ? आता त्यांचे सरकार पडले तरी हिम्मत असेल तर ह्याव करुन दाखवा अन् त्याव करुन दाखवा ही वायफळ-बडबड करतच असतात. :)))

जाता जाता :- आज तरी विश्व प्रवक्ते यांची पालखी उचलली जाईल का ? याचा विचार करतोय, इडी समाचार घ्यायला घरी पोहचलीच आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |

अमेरिक राजकारणातील वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेल्या नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट ही वादग्रस्त ठरत आहे, गेल्या २४ तासात जवळपास ५० ते ६५ हजार लोक त्यांचा फ्लाईट मुव्हमेंट डेटा जालावर ट्रॅक करत होते, नंतर मात्र हा डेटा उपलब्ध होणे बंद झाला आहे. चीन ने या बाबतीत अमेरिकेला धमकी दिली असुन पेलॉसी यांनी तैवानला भेट देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे विमान पाडले जाईल इतपत टोकाची भुमिका घेतलेली आहे. चीन आणि तैवान या दोन्ही बाजुने घमासान मिलेटरी ड्रिल्स झाल्या असुन अनेक व्हिडियो व्हायरल होत आहेत . [ ज्याची सत्यता पडताळुन पाहणे आजच्या घडीला तरी शक्य नाही. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2022 - 5:18 pm | श्रीगुरुजी

पत्राचाळ घोटाळा प्रकरण ९ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी संजय राऊतांना ताब्यात घेऊन तपास अधिकारी आपल्या कार्यालयाकडे निघाले आहेत. आज रात्रीच अधिकृत अटक होईल असं वाटतंय. घरातून बाहेर निघताना राऊतांनी जे हातवारे करून ज्या घोषणा केल्या अगदी तसेच हातवारे व घोषणा अटक होताना नबाब मलिकांनी केल्या होत्या. अटक होऊन सव्वापाच महिने उलटल्यानंतरही मलिक आतच आहेत. आताही तसेच व्हावे ही सदिच्छा.

विश्र्वप्रवक्त्याने खुद्द नमूद केल्याप्रमाणे साडेतीन नेत्यांपैकी अर्धा आज आत जातोय बहुतेक. तसं झालं तर पत्राचाळीच्या ६५० कुटुंबांना पर्यायाने मराठी माणसाला थोडा तरी न्याय मिळेल.

तसं झालं तर पत्राचाळीच्या ६५० कुटुंबांना पर्यायाने मराठी माणसाला थोडा तरी न्याय मिळेल.
सतत मराठी माणसाच्या नावाने गळे काढणारे मराठी माणासालाच जगातुन उठवतात, आज त्या मराठी माणसांचेच तळतळाट लागुन शेवटी राऊत यांना इडी ने उचलले !
सध्या मी काय पाहतोय ? या सिरीज च्या पहिल्याच भागात मी झाला बोभाटा ! असे शिर्षक देऊन मी या पत्राचाळी प्रकरणाशी संबंधीत व्हिडियो दिला होता.
भाऊ तोरसेकरांनी देखील त्यावेळी गुजराती माणस आपडा मराठी माणूस बापडा ! असा व्हिडियो अपलोड केला होता त्याचा देखील दुवा मी त्याच प्रतिसाद दिला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |

कंजूस's picture

31 Jul 2022 - 9:05 pm | कंजूस

पंजाब महा को ओप बँक - एका कंपनीला दिलेले सहा हजार कोटींचे कर्ज - त्यांनी एक प्रापर्टी डेवलप करण्यासाठी वापरणे - पण ती विकून टाकणे - करार मोडणे - त्यात गुंतलेले लोक वगैरे दिलंय. पण थेट अमुक एक म्हणजे संजय राऊतांनाच गुंतवणारे कागदपत्र सापडणे गरजेचे आहे. त्यांचे नातेवाईक नव्हे.
आणि या बाबतीत राऊत ठामपणे नाही सांगत आहेत. गुप्त व्यवहाराचा पुरावा होऊ शकणार नाही. असं एकूण आतातरी जाणवत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

31 Jul 2022 - 11:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

स्वप्ना पाटकर ह्यांचे सन्जय राउतांबरोबरचे संभाषण ऐकले आणि मराठी/शिवरायांचे नाव घेउन राजकारण करणार्या शिवसेनेबद्दलचा उरला सुरला आदरही संपला.

१९९६ साली रमेश किणी प्रकरण घडले त्याची आठवण झाली.शिला किणी/पुष्पा भावे ह्यांची संपादकियातुन/अग्रलेखातुन निंदा-नालस्ती करण्यात संजय राउत आघाडीवर होते. तेव्हा "तुम्हालाही भोगावे लागेल" असे शिला किणी म्हणाल्या होत्या त्याची आठवण झाली.

प्रतिसाद संपादित.

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2022 - 12:16 am | श्रीगुरुजी

आज राऊतांची आई डोळे पुसताना, ओवाळताना वगैरे दाखवित होते. आपल्या मुलाने एका महिलेला ज्या अत्यंत घाण घाण शिव्या दिल्यात ती ध्वनीफीत या माऊलीने ऐकली नसावी.

जेम्स वांड's picture

1 Aug 2022 - 12:21 am | जेम्स वांड

सांगता येत नाही, लेटेस्ट गरमागरम,

मुंबई भाजपचे ब्लू आईड बॉय मोहित कंबोज आणि टिपू सुलतान मैदान फेम असलम खान ह्या काँग्रेस नेत्यांचा देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सागर बंगल्या बाहेरील एक फोटो....

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2022 - 7:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल सकाळपासून पत्राचाळीच्या निमित्ताने शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून जो राजकीय सुडाचा प्रवास सुरु होता तो पाहतांना गम्मत वाटत होती. काल सकाळ पासून जो तपास सुरु होता तो तपास दिलेलीच कागदपत्रे घेऊन आणि घरात असलेल्या रोख रक्कम घेऊन संपला. राजकारणात आरोप-प्रत्यारोप शह-काटशहां चालायचेच.

मागे, क्रिकेटच्या एका सामन्यात गांगुलीने विजय मिळविल्यावर अंगातला टी-शर्ट काढून गरागर फिरवला. काल खा.संजय राऊत त्याच जोशात गळ्यातला भगवे उपरणे फिरवत दमदारपणे ईडी कार्यालयात गेले. 'मरेन पण शिवसेना सोडणार नाही' असे म्हणत कायम असतो तोच जोश, तोच त्वेष, तोच तोच उत्साह. राजकारणात सुरु असलेला सुडाचा प्रवास कोणत्या राजकीय व्यक्तीला राजाचा रंक आणि रंकाचा राजा करेल हे सांगता येत नाही.

सत्तेत सतत होत असलेल्या अपमानाचा बदला अनपेक्षित युती करून अडीच वर्ष मुख्यमंत्री करून येऊन घेतला. सत्तेत आकड्यांना-संखेला महत्व असते, अशी संख्या असूनही सत्तामहत्वकांक्षा असलेल्यांना घरी बसविले. सतत टीका करीत राहणे, बोलत राहणे, बोलत बोलत सत्ता आणली. अशा वेळी सत्ताधीशांना हे बोलणे हा आवाज सहन होणे शक्यच नव्हते. ईडीच्या दहशतीने भलेभले पळत असतांना 'झुकणार नाही' म्हणून ईडीच्या कार्यवाहीला सामोरे जाईन, ही शान जबरदस्त होती. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहेच, पण सरकारच्या विरोधात बोलाल, सद्य व्यवस्थेविरुद्ध बोलाल तर, तुमचा आवाज आम्ही बंद करू हा धाक ही व्यवस्था उभी करीत आहे.

''लोग कहते है, आंदोलन प्रदर्शन, जुलुस निकालनेसे क्या होता है ? इससे यह सिद्ध होता है की हम जीवित है, अटल है और मैदान से हटे नही है - प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

1 Aug 2022 - 8:22 am | श्रीगुरुजी

काल सकाळपासून पत्राचाळीच्या निमित्ताने शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून जो राजकीय सुडाचा प्रवास सुरु होता तो पाहतांना गम्मत वाटत होती.

डिसेंबर २०१९ पासून जून २०२२ पर्यंत महाराष्ट्रात शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून जो राजकीय सुडाचा प्रवास सुरु होता तो पाहतांना आम्हाला सुद्धा गम्मत वाटत होती.

काल खा.संजय राऊत त्याच जोशात गळ्यातला भगवे उपरणे फिरवत दमदारपणे ईडी कार्यालयात गेले. 'मरेन पण शिवसेना सोडणार नाही' असे म्हणत कायम असतो तोच जोश, तोच त्वेष, तोच तोच उत्साह.

नबाब मलिक सुद्धा अटक होताना अगदी याच जोशात हाताच्या मुठी वळवून झुकेंगे नही, लढेंगे अश्या घोषणा देत एखाद्या युद्ध जिंकून आलेल्या विजयी वीराच्या थाटात ईडी कार्यालयात जाताना पाहिल्याचे स्मरते. तोच जोश, तोच त्वेष, तोच उत्साह, अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्याची तीच जिद्द, चेहऱ्यावर तसेच उर्मट हावभाव . . . आता सव्वापाच महिन्यांनतर आजाराचे नाटक करून जामीन मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

अशा वेळी सत्ताधीशांना हे बोलणे हा आवाज सहन होणे शक्यच नव्हते. ईडीच्या दहशतीने भलेभले पळत असतांना 'झुकणार नाही' म्हणून ईडीच्या कार्यवाहीला सामोरे जाईन, ही शान जबरदस्त होती.

बरोबर. केतकी चितळे, अर्णब गोस्वामी, निखिल भामरे, नौदल अधिकारी मदन शर्मा, कुरमुसे, गुणरत्न सदावर्तें, राणा दांपत्य, राणे पितापुत्र इ. चे आवाजही सत्तेवर बसलेल्या उन्मत्त सत्ताधीशांना सहन झाले नव्हते. केतकी चितळे तर हसत हसत तुरुंगात गेल्या, स्वतःचा बचाव स्वतः केला, आपली पोस्ट डीलीट करण्यास ठाम नकार दिली व कायदेशीर लढाईतून जामिनावर बाहेर आल्या. ही खरी शान!

स्वप्ना पाटकरांना राऊतांनी जी अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ केली त्याबद्दल आपले मौन कौतुकास्पद आहे.

जेम्स वांड's picture

1 Aug 2022 - 8:08 am | जेम्स वांड

सोशल मीडिया वर व्यक्त होणे आणि आपली मते प्रकाशित करणे हा कलम १९(१) अंतर्गत नागरिकांना असणारा मूलभूत अधिकार होय.

कॉमी's picture

1 Aug 2022 - 8:10 am | कॉमी
श्रीगुरुजी's picture

1 Aug 2022 - 8:25 am | श्रीगुरुजी

सतत मराठी बाणा, मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अपमान वगैरे बडबडणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्ते काल दिवसभर राऊतांच्या समर्थनार्थ मराठीऐवजी हिंदीत घोषणा का देत होते?

महाराष्ट्राचे हिंदीभाषिक राज्यात रूपांतर करण्याचा हा डाव नाही का?

मुक्त विहारि's picture

1 Aug 2022 - 9:47 am | मुक्त विहारि

‘एनआयए’चे देशभर छापासत्र; ‘आयसीस’शी संबंधांच्या संशयावरून नांदेड, कोल्हापुरात पाच जणांची चौकशी

https://www.loksatta.com/desh-videsh/nationwide-printing-session-nia-inv...

काय बोलावं ते सुचेना .....

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल

https://marathi.abplive.com/news/osmanabad/maharashtra-news-aurangabad-n...

संभाजीनगर आणि धाराशीव, असे नामांतर झाले तर उत्तम ...