शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते हे कारण पुढे करत ऑफिस ने आमची ट्रिप शुक्रवार शनिवार या दोन दिवशी ठेवलेली कारण जवळ जवळ ३० ते ३५ जणांच्या राहण्याची सोय करायची होती. लोणावळ्याच्या डेल्ला रिसॉर्ट ला राहण्याची सोया केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० ते ८ वाजे पर्यंत निघायचे ठरले होते. खरं तर मी खूप उत्साही होतो कारण मी पुण्यात २ वर्षां पासून राहत होतो पण सिंहगड आणि खडक वासाला डॅम सोडला तर मी कुठे हि गेलो नव्हतो राजगडावर गेलेलो पण निम्म्यातूनच परत आलेलो उशीर झाला म्हणून. IT कंपनी मध्ये चांगल्या पगारावर जॉईन व्हायचे असेल तर चांगले कॉम्युनिकेशन स्किल म्हणजेच धीटपणे अशी फाड फाड इंग्रजी बोलता आली पाहिजे मग प्रोग्रामिंग चे नॉलेज कमी असले तरी चालेल नाही तर स्ट्रगल च स्ट्रगल, असं माझं मत आहे. आणि मी येतो त्या कॅटेगरी मध्ये जिथे फक्त नॉलेज आणि लॉजिक च होते सो दोन वर्षे सुरवातीला ४ हजारावर ६ महिने इंटरशिप नंतर १० नंतर १५ आणि १८ असे करत २ वर्षे गेली आता कुठे जरा बऱ्या कंपनी मध्ये म्हणजेच लोणावळ्याच्या रिसॉर्ट मध्ये ३० ३५ एम्प्लॉयीचे वन नाईट स्टे सहजपणे अफोर्ड करील अशा कंपनी मध्ये लागलो. त्यामुळे फिरण्याचा किंवा प्रवासाचा पुणे ते गाव हे सोडल्यास प्रसंग आला नाही. आता पर्यँत कधीच वन नाईट स्टे ची ट्रिप काढली नव्हती असे सूत्रांकडून समजले होते. मी जॉईन झालो आणि ३ महिन्यात ट्रिप निघाली त्याचाही वेगळाच आनंद होता. असो तर शुक्रवारी सकाळी जायचे म्हणाल्या नंतर गुरुवारी रात्रीच बॅग भरायची तयारी सुरु झाली. रेड, रेड/ब्लॅक, ब्लॅक अशी थीम होती सो मी रेड टी शर्ट आणि ब्लॅक जिसं घेतली, जाताना एक ड्रेस आणि रात्री साठी नाईटपॅन्ट आणि टी शर्ट आणि अंतर वस्त्र इ घेतली. नाव्ह्याकडे जाऊन थोडा फ्रेश होऊन आलो. त्याने हि गोड बोलून ४०० घेतले. कदाचित मी भाव न विचारल्यामुळे घेतले असावेत. जायचे कपडे धुतले नव्हते ते धुतले. बूट धुतला हे करत करत जवळ जवळ १२ वाजून गेले. ६:३० अलार्म लावला आणि झोपलो. ऑफिसला जायचे असेल तर ११ वाजता झोपून ९ वाजले तरी अजून झोपावेच वाटते पण का माहित नाही पण सकाळी ५:३० लाच जाग आली आणि परत काही झोप लागेना म्हणून आवरायला घेतले. अंघोळ करून तयार होई पर्यंत ७ वाजल्या आणि इशा कधी निघणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी तिला मेसेज केला. तिने ७.३० वाजेपर्यन्त निघत आहे असा रिप्लाय दिला. जायची सोय अशी झाली होती कि, सूत्रांद्वारे समजले होते, दारूचा खर्च आणि प्रवास दोन्ही अफोर्डबल नसल्याने जाण्यायेण्याचा खर्च हा स्वखर्चाने करायचा होता. सो ज्यांच्याकडे चारचाकी आहे त्यांना पैसे द्यायचे काय ठरतील ते. ३० ३५ जनात ६ गाड्या होत्या सो कोण कुठे राहतो व पिकअप करायला कसे सोयीस्कर होईल यावरून नियोजकांनी सुंदर असे नियोजन केले होते. मी राहायला विमाननगर जवळ वडगाव शेरी मध्ये असतो सो सुरवातीला मी विमाननगर वरून येणाऱ्या दुर्गेश बरोबर ठरले. माझ्या बरोबर माधव हा होता पण त्याचा जवळचा मित्र लेनॉक्स हा इशाच्या कार मध्ये होता ते दोघे एवढे गाढ दोस्त आहेत कि लेनॉक्स ने नियोजन ठरताच माझ्याशी संपर्क साधला आणि मला ईशाच्या कारमधून येण्याची विनंती केली. मी आधी चेक केले कि इशा हि कुठून येणार आहे नाही तर असे नको व्हयला कि मी असायचो वडगाव शेरी मध्ये आहे ती असायची हडपसर मध्ये पण ती वाघोली मध्ये राहायला होती. मी लेनॉक्स ला होकार होकार देऊन जय आणि वीरूला एका कार मध्ये जाण्याची संधी दिली. ते हि खुश आणि फर्स्ट टाइम लेडीज ड्राईव्ह करत असलेल्या कारमध्ये बसायला भेटत होते म्हणून मी हि खुश. माझे टीम मेम्बर हे बाणेर आणि कात्रज वरून येतात सो आधीच आमची फाटाफूट झाली होती आम्ही सगळे लोणावळ्यात भेटणार होतो. ईशाची फिकट हिरव्या (pacific blue) कलरची स्विफ्ट डिझायर होती, कार मध्ये सुयोग,पल्लवी,संकेता आणि बदलीवर आलेलो मी असे आम्ही पाच जण होतो. उगाच गाडी फिरवून उशीर करण्यापेक्षा संकेता मला घेण्यासाठी माझ्या पिकअप पॉईंट तिची ऍक्टिवा घेऊन आली. पुण्यात अनोळखी मुलीच्या पाठीमागे बसण्याची हि माझी पहिलीच वेळ होती संकेता जरी माझ्या ऑफिस मध्ये असली तरी आम्ही फक्त ट्रिप च्या निम्मिताने भेटलो होतो. इशा, सुयोग आणि पल्लवी हे ऑफिसच्या पार्किंगमध्ये आमची वाटच पाहत होते. सर्व ऑफिसच्या जवळ राहत होते म्हणून ईशाने तिकडे बोलावले असावे सर्वाना.
प्रतिक्रिया
27 Jul 2022 - 1:38 am | कंजूस
डेल्ला रिसॉर्टबद्दल उत्सुकता वाढली आहे कारण प्रत्यक्ष जाऊन येणाऱ्याकडून कळणार आहे. यूट्यूबवरचे विडिओ पाहिले आहेतच.
दूरान्वये विशेष जाणून घेण्याची वेळ दहा बारा वर्षांपूर्वी आलेली होती. त्याबद्दल नंतर कधीतरी.
27 Jul 2022 - 7:21 am | प्रचेतस
डेल्लाला दोनतीन वेळा गेलोय, उगाचच हायफाय महागडे वगैरे आहे.
राजमाचीला कुणेनामामार्गे जायचा रस्ता डेलावरूनच जातो. तिथल्या पार्किंगला गाडी लावून निघाल्यास पाच सहा किमीची तंगडतोड वाचते.
27 Jul 2022 - 11:13 am | क्लिंटन
डेल्लाला कधीपासून जायचे आहे. आतापर्यंत लोणावळा-खंडाळामधील टॉप १० मधील फरियास, लगूना आणि ड्यूक्स रिट्रीटमध्ये राहणे झाले आहे पण डेल्लामध्ये नाही.
पुढील भागात फोटो नक्की टाका. पुढील भागाची वाट बघत आहे.
27 Jul 2022 - 11:18 am | मुक्त विहारि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ....
27 Jul 2022 - 11:49 am | विजुभाऊ
"आमची सारसबागेची सहल" या शाळेतील निबंधाची आठवण झाली.
पुढचा भाग कधी टाकताय
27 Jul 2022 - 11:59 am | जेम्स वांड
काय बघायला मिळेल हे वाचन करायला मिळेल अशी अपेक्षा आहे पुढील भागांकडून, पहिल्या भागात मेजर पार्ट ऑफिस, तुमचे ड्रायव्हिंग करणारी पोरगी पाहून अचंबित होणे, हापिसातील पोरे पोरी ह्या वाचकांना त्यामानाने अनाकर्षक वाटणाऱ्या गोष्टीच पुरेश्या जास्त झाल्या आहेत.
गाडी, बायडी अन् कच्चीबच्ची घेऊन लोणावळा सफर करण्यास इच्छुक अन् रिव्ह्यू भुकेला
(सिंदबाद) वांडो
27 Jul 2022 - 12:22 pm | कंजूस
खंडाळा ते लोणावळा बऱ्याच छोट्या मोठ्या जागा आहेत. कुणी यावर एकत्रित चित्रलेख टाकावा. मला स्वत:ला हॉटेलिंगमध्ये स्वारस्य नसते पण निसर्ग आवडतो. शिवाय मुंबई - ठाणे भागात गरम हवा असते. वर गेल्यावर बरे वाटते. गार हवा.
खूप वेळा एकदिवसीय ट्रिपा झाल्या आहेत. घाइघाईत सर्व करण्यापेक्षा रेंगाळत एक दोन ठिकाणे अनुभवणे उत्तम.
खंडाळ्याच्या राजमाची पॉईंटजवळ एक खाजगी पक्षीसंग्रहालय होते ते गेलेच. मुलांना आवडणारी जागा होती. जो एक पांढरा बंगला आहे बाहेर दोन सिंह पुतळेवाला तोच असावा. तिथे आता माकडांना जेवण दिले जाते. ( दुपारी साडे अकराला).
27 Jul 2022 - 12:27 pm | अमर विश्वास
लोणावळ्यात भटकण्याच्या दोन उत्तम जागा म्हणजे वाळवण डॅम चा परिसर - राजमाची / ढाक चा ट्रेक इथूनच सुरु होतो
आणि दुसरे म्हणजे कोरीगड किल्ला - एकदम सोप्पा , त्यामानाने कमी गर्दी , वाटेत टायगर्स लीप ला थांबुन मक्याची भाजी खाता येतात
27 Jul 2022 - 7:01 pm | लोगन
पुढील भागात तुम्हालाही आकर्षक वाटेल असेही लिहण्याचा प्रयत्न करीन...मोजकेच
27 Jul 2022 - 12:15 pm | अमर विश्वास
डेला रिसॉर्ट बेस्ट आहे .. अर्थात फारच महाग असल्याने ऑफिस पैसे भरत असेल तरच
ऑफिस च्या कृपेने ४-५ वेळा जायचा योग्य आला ... त्यांची ऑफरोड सफारी बेस्ट आहे ...
27 Jul 2022 - 7:09 pm | लोगन
होय , आहे त्याचेही पुढील भागात
29 Jul 2022 - 12:56 pm | तुषार काळभोर
>> _व्हॉइस ??