पाकिस्तान - धागा उडाला

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
27 Jul 2022 - 6:03 am
गाभा: 

पाकिस्तान विषयक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी एक धागा काढला होता. पाकिस्तान विषयी सर्वांगिण चर्चा व्हावी आणि त्याची नोंद कुठे तरी असावी या भावनेने तो धागा काढला होता. आता पाकिस्तानची निर्मितीच हिंदूंपासून वेगळे राहण्यासाठी असलेला प्रदेश हवा अशी कारणाने झालेली असल्याने त्यात हिंदू हा विषय अपरिहार्यतेने आला.

त्या चर्चेत पाकिस्तान आपल्या नागरिकांमध्ये अगदी लहानपणापासून भारतद्वेष डोक्यात भिनवतो असे विधान होते, एक चर्चेचा विषय होता. सुरुवातीला त्यात संदर्भ नव्हते पण नंतर ते दिले गेले होते. पाकिस्तान सरकारी स्तरावर धोरणात्मक रितीनी भारतद्वेष पसरवतो या विषयावर टाईम्स सारख्या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या आधारावर चर्चा होती. पण संपादकांनी तो धागा उडवला. तो का उडवला हे कळले नाही.

म्हणजे पाकिस्तान सरकारी धोरण आखून भारतीय लोकां विषयी द्वेष पसरवतो. पण त्या विषयी आपण बोलायचे, लिहायचे पण नाही. असे का असावे?

मिसळपाव संपादकांना पाकिस्तानच्या अधिकृत शिक्षण धोरणाविषयी काही लिहिले तर इतका त्रास का असावा ? हा प्रश्न जास्त क्लेशकारक आहे.

बरं, हे दावे हवेत केलेले नव्हते.
हे घ्या संदर्भः
१: एएफपीच्या अहवालानुसार , पाकिस्तानमधील इतिहासाची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना शिकवतात की हिंदू हे "ठग" होते ज्यांनी "मुस्लिमांची हत्या केली.
संदर्भ आऊटलूक या प्रतिष्ठीत प्रकाशनाचा आहे ही नोंद घ्यावी!

२. पाकिस्तान में स्कूली किताबें क्या हिन्दुओं के ख़िलाफ़ नफ़रत सिखा रही हैं?
संदर्भ बीबीसी या प्रतिष्ठीत प्रकाशनाचा आहे ही नोंद घ्यावी मिलॉर्ड!

३. राजकीय प्रक्रियेत पाकिस्तानने हेतुपुरस्सर शालेय शिक्षणाला लक्ष्य केले आहे. 1960 नंतर हे अगदी स्पष्ट झाले, कारण पाकिस्तानच्या सलग लष्करी राजवटींनी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये भारताच्या बनावट प्रतिपादनांना मान्यता दिली. आज, राजकीय हेतूंसाठी चुकीची माहिती देण्याचे हे प्रयत्न सुरूच आहेत आणि पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांमध्ये ऐतिहासिक तथ्यांचे विकृतीकरण दिसून येते.
संदर्भ एका संशोधनाचा आहे.

४. यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम (USCIRF) द्वारे प्रायोजित “पाकिस्तानमधील असहिष्णुता शिकवण: सार्वजनिक शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये धार्मिक पूर्वाग्रह” या अहवालात नमूद केले आहे की पाठ्यपुस्तके अल्पसंख्याकांच्या श्रद्धा आणि संस्कृतींबद्दल त्रुटींनी भरलेली आहेत. दहाव्या इयत्तेच्या उर्दू पाठ्यपुस्तकात असे म्हटले आहे: “मुस्लिम धर्म, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था गैर-मुस्लिमांपेक्षा वेगळी असल्यामुळे हिंदूंना सहकार्य करणे अशक्य आहे.”
संदर्भ हिंदुस्तान टाईम्स या या प्रतिष्ठीत प्रकाशनाचा आहे.

उगाच काहीतरी लिहून राळ उडवायची असा उद्देश नव्हता. पण आपला शेजारी देश सरकारी शैक्षणिक धोरण राबवून आपल्या भारता विषयी भारतीय लोकां विषयी नक्की काय बोलतो लिहितो, याची साधी माहिती देणे पण मिसळपाव संपादकांना का मान्य नसावे? असो.

अधिकृतपणे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, हा दक्षिण आशियातील जगातील पाचव्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या आहे. पाकिस्तानचा राज्यधर्म इस्लाम आहे. पाकिस्तान हे अनेक प्राचीन संस्कृतींचे ठिकाण आहे त्यात मेहरगढ ते सिंधू संस्कृतींचा समावेश आहे. हिंदू पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये आढळतात परंतु ते आता बहुतेक सिंधमध्ये केंद्रित आहेत. पाकिस्तानात हिंदूंमध्ये असुरक्षितता वाढती आहे.

पाकिस्तानमध्ये हिंगलाज यात्रा यात्रेसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदू मंदिरे पाकिस्तानात अनेकदा तोडली जातात आणि त्याची नोंद विस्कळीतपणे ताज्या घडामोडींच्या धाग्यांमध्ये आपण संदर्भासहीत घेतली आहे. पाकिस्तानमधील अनेक हिंदू त्यांच्याविरुद्ध धार्मिक हिंसाचाराच्या आणि त्यांना द्वितीय श्रेणीतील नागरिकांप्रमाणे वागणूक दिल्याबद्दल तक्रार करतात आणि अनेकांनी भारतात किंवा पुढे परदेशात स्थलांतर केले आहे.

अफू उत्पादन: पाकिस्तान आशियातील दोन प्रमुख अवैध अफू उत्पादक केंद्रांपैकी एक आहे. मध्ये पाकिस्तानमध्ये ​​८०० हेक्टरवर अफू लागवडीचा अंदाज आहे. यातून सुमारे ४ मेट्रिक टन हेरॉईनचे उत्पादन होते/झाले असावे असा अंदाज आहे. पाकिस्तानला अंमली पदार्थांच्या तस्करीतून किमान चार अब्ज रुपये मिळतात असा अंदाज आहे. अर्थातच यात पाकिस्तानी लष्कराचा मोठा सहभाग आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाने देशाच्या गुप्त लष्करी कारवायांसाठी पैसे देण्यासाठी हेरॉइनची विक्री करण्यासाठी तपशीलवार 'ब्लू प्रिंट' तयार केली होती.

पाकिस्तानमध्ये पाच प्रमुख आणि अनेक लहान वांशिक गट आहेत. या सर्वांमध्ये पंजाबी लोकसंख्येच्या अंदाजे निम्मे आहेत आणि ते सर्वांवर नियंत्रण राखून आहेत. हा सर्वात मोठा गट आहे. पश्तून (पठाण) लोकसंख्येच्या सुमारे एक अष्टमांश आहेत. त्यातही पंजाबी पश्तून तसेच हजारवी पश्तून आहेत. आणि सिंधी हे काहीसे लहान गट आहेत. उर्वरित लोकसंख्येपैकी, मुहाजिर - १९४७ मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात पळून गेलेले मुस्लिम - आणि बलुच हे सर्वात मोठे गट आहेत.

पाकिस्तान म्हणजे उर्दू भाषा असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तेथे सिंधी ,पश्तो आणि बलुची सारख्या अनेक भाषा आहेत. आणि हे भेद फार स्पष्ट आहेत. भारतात पंजाबी ला गुरूमुखी ही लिपी आहे. ती पाकिस्तानात पुर्ण पणे पुसून टाकली आहे. त्या ऐवजी तेथे उर्दू लिपी शिकवली जाते. सिंधी लोक उर्दूचा बरेचदा विरोध करतात. खरे तर अनेक सिंधी लोक स्वतंत्र सिंधूदेश या वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. त्यांना त्यांची भाषा आणि संस्कृती जपायची आहे.

पाकिस्तान ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या इराण, अफगाणिस्तान आणि भारताशी संबंधित आहे. फेडरली प्रशासित आदिवासी क्षेत्रे (FATA) - २००१ च्या अमेरिकेच्या अफगाणिस्तानवर आक्रमणापासून शेजारील अफगाणिस्तानच्या तालिबानसह अनेक अतिरेकी इस्लामी गटांच्या सदस्यांसाठी आश्रयस्थान बनले आहे.
सध्या तेथे परिस्थिती फार खराब झाली आहे. इतकी की काही देश तेथे जाऊ नका असा सल्ला देत आहेत.

वरील बहुतेक सर्व विधानांना संदर्भांचा आधार आहे. उगाच चिखलफेक करतो आहे किंवा द्वेषमूलक लिखाणाची फेका-फेक करायची म्हणून हे लेखन केलेले नाही.

पाकिस्तान हा आपला शेजारी देश काय करतो आहे?
तेथिल समाज रचना कशी आहे, तेथे लष्कराचा सहभाग काय आहे?
राजकीय पक्षंचाचे अजेंडे काय आहेत?
तेथे नियंत्रण खरोखर कुणाचे आहे?

तेथे काय चालले आहे याची नोंद ठेवावी, त्याची माहिती द्यावी आणि घ्यावी, चर्चा व्हावी, मत-मतांतरे जाणून घ्यावीत म्हणून धागा काढला आहे.

आता हा धागा येथे राहील अशी आशा आहे.
याच धाग्यावर पाकिस्तान विषयक बातम्या, अफवा, घडामोडींची चर्चा, विवेचन याची नोंद घेऊ या.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

27 Jul 2022 - 7:54 am | जेम्स वांड

आता जरा धागा तासात वाटतोय (वै म)

इथले अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून नक्कीच ज्ञानवर्धन होईल असे वाटते

कॉमी's picture

27 Jul 2022 - 8:28 am | कॉमी

:) (हलक्यात घ्यावा.)

निनाद's picture

27 Jul 2022 - 9:23 am | निनाद

धागा अप्रकाशित करावा ही नम्र विनंती!

जेम्स वांड's picture

27 Jul 2022 - 9:54 am | जेम्स वांड

चांगला विषय आहे की सर हा.

मदनबाण's picture

27 Jul 2022 - 9:26 am | मदनबाण

@ निनाद,
मी तुमच्या उडवलेल्या धाग्यावर एक प्रतिसाद दिला होता, जो पाकिस्तान आणि जिहादी लोकांच्या विरुद्ध होता.त्या प्रतिसादावर मुवि यांची एक प्रतिक्रिया आली होती. मग आम्हा दोघांचे ते प्रतिसाद उडवले गेले. हे झाल्यावर मी मुवि यांना उद्देशुन एक प्रतिसाद लिहला, ज्यात पाकिस्तान आणि जिहादी लोकांच्या विरोधात लिहणे काय चूक ? असा आशय होता.
नंतर धागा उडवलेला दिसला. तेव्हा तो धागा माझ्या प्रतिसादांमुळेच अप्रकाशित केला गेला असावा असे मी समजुन तुमची क्षमा मागतो कारण तुमची लिखाणाची मेहनत वाया जाऊन तुम्हाला हा नविन धागा काढायवे अतिरिक्त कष्ट घ्यावे लागले. [ प्रतिसाद उडवल्यावर धागाच अप्रकाशित का केला जावा ? या मागचा तर्क निदान मला तरी लावता आलेला नाही. ]
असो... आता या धाग्यात मी तसाच प्रतिसाद देण्याचे टाळतो, मात्र त्यात जो व्हिडियो दिला होता तो मात्र देऊन जातो. [ यात मला मेजर एस पी सिन्हा यांनी सोनिया कॉग्रेस आणि चीन यांच्यात झालेल्या MoU बद्धल देखील उल्लेख आहे, याच बद्धल मी दुसर्‍या धाग्यात उल्लेख केलेला आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bryant McGill

निनाद's picture

27 Jul 2022 - 9:30 am | निनाद

धन्यवाद बाणाजी!
पण मीच आता अप्रकाशित करावा अशी विनंती केली आहे.

[ प्रतिसाद उडवल्यावर धागाच अप्रकाशित का केला जावा ? या मागचा तर्क निदान मला तरी लावता आलेला नाही. ]

कारण परत परत प्रतिसाद देता येतो, दिलाच जातो म्हणून... ना रहेगा बास ना बजेगी बासूरी! :)

मुक्त विहारि's picture

27 Jul 2022 - 11:39 am | मुक्त विहारि

तुम्ही घेतलेली मेहनत पाहता, तोच प्रतिसाद परत दिला नाही...

मुक्त विहारि's picture

27 Jul 2022 - 11:31 am | मुक्त विहारि

वाचत आहे ...

पाकिस्तानी लोकांबरोबर माझे अनुभव वेगळे आहेत ....

ते लिहिले तर, परत धागा उडायचा....

जेम्स वांड's picture

27 Jul 2022 - 11:49 am | जेम्स वांड

धागा न उडण्यासाठी वैयक्तिक anecdotes अन् अनुभव थोडे बाजूला ठेवून स्वतंत्र प्रेस रिसर्च , पियर रिव्युड अभ्यास, डॉक्टरल रिसर्च इत्यादींचा धांडोळा घेतला तर विषयावर सर्वसंमत निष्कर्ष काढायला काहीतरी वाव अन् जागा मिळेल असे वाटते.

वैयक्तिक अनुभव अगदी १०० मिपा सभासदांचे घेतले तरी ते प्रॉपर नसेल सँपल म्हणून.

सुरुवातीला माझ्याकडुन काही वाचनीय सजेशन

१. Ghost wars - secret history of CIA and America in Afghanistan - Steve Coll

त्याचाच sequel असलेलं

२. Directorate S

पहिल्या भागात सोव्हिएत रशियाचे अफगाण आक्रमण ते ट्वीन टॉवर पडण्यापर्यंतच्या घटनांचा धांडोळा आहे तर दुसऱ्यात टॉवर्स पडणे ते २०१६ पर्यंतचा रिसर्च अन् घटनाक्रम आहे (मला वाटते ह्याच भागात ऑपरेशन नेपच्यून स्पियर आहे मी अजून तिथवर पोचलो नाहीये)

Must read पुस्तके आहेत माझ्यामते तरी.

विषय रंजक माहितीपूर्ण आहे.
वर्तमानपत्रातून रोज नवीन गोंधळ वाढवणार्‍या बातम्या वाचून आपल्या शेजारी मुलुखात जपून रहा रे बाबांनो असे सुचवावेसे वाटते.

चांगला विषय आहे. पाकिस्तान विषयावरील माझे वाचन सुद्धा हल्ली शून्य झाले आहे.

पाकिस्तानातील बहुतेक संस्था कोलमडत आहेत असे वाटते. अगदी आर्मी सुद्धा पूर्वीप्रमाणे प्रभावी राहिली नाही असे माझ्या उथळ आणि वरवरच्या वाचनाने वाटते. अमेरिकेने येथून काढता पाय घेतल्याने त्या मार्गाने येणारा असंख्य पैसा बंद झाला आहे. अरब राष्ट्रांची आर्थिक भविष्य सुद्धा आता थोडे गंभीर असल्याने त्यांच्या कडून सुद्धा मदत येणे कमी झाले आहे. पाकिस्तानातील सुशिक्षित वर्ग कॅनडा/UK मध्ये स्थलांतर करत आहे.

पाकिस्तानचे भविष्य कठीण आहे.

पाकिस्तानातील शिक्षण व्यवस्था हिंदू विरोधी आहे ह्यांत शंकाच नाही पण मदरसा शिक्षण व्यवस्थेकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणार ?

राघव's picture

28 Jul 2022 - 2:21 am | राघव

Financial Action Task Force च्या ग्रे यादीत गेल्यापासून पाकचे दिवाळे वाजणे सुरू झालेले आहे.
पण यामुळे चीनला हातपाय पसरायला फार वाव मिळतोय आणि तीच जास्त काळजीची गोष्ट आहे. जसं नुकतंच चीनने CPEC मधे आणिक काही देशांना आमंत्रित केलेले आहे आणि भारत त्याचा निषेध करतोय.

लिंक

धर्मराजमुटके's picture

27 Jul 2022 - 2:19 pm | धर्मराजमुटके

पाकीस्तानातील घडामोडी जाणून घेण्यासाठी मी काही युट्यूब चॅनल्स बघत असे मात्र तिथेदेखील स्वलालधन्य लालांची कमतरता नाही म्हणून कंटाळून तो नाद सोडला. सद्या फक्त पाकीस्तानातून प्रसारीत होणारे 'द डॉन' हे वर्तमानपत्र ऑनलाईन वाचतो. बर्‍यापैकी माहिती असते. गंमतीची गोष्ट म्हणजे बातम्यांवर प्रतिसाद देणारे अर्धे अधिक भारतीय असतात.

गामा पैलवान's picture

28 Jul 2022 - 3:03 am | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

अरे वा. माझा स्वलालधन्य होण्याचा डंका पाकिस्तानात वाजू लागला ही मोठ्या कौतुकाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी माझीच ( परत एकदा ) लाल करवून घेतो. या वाटेने पाकिस्तान लवकरंच पुरेपूर दिवाळखोरीत जाईल. ही वाट शोधून काढल्याबद्दल माझं पुनश्च अभिनंदन.

आ.न.,
-गा.पै.