आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या प्रमुखपदावर अश्विनी भिडे या आय.ए.एस अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्याच पदावर कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकारने त्यांना पदावरून हटविले होते. त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रोच्या कामात अक्षम्य दिरंगाई केली होती. ते काम वेगाने पुढे सरकून मेट्रोच्या सगळ्या लाईन्स पुढील दोन अडीच वर्षात सुरू झाल्या तर मुंबईकर नक्कीच फडणवीसांना शतशः धन्यवाद देतील.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/ashwini-bhide-is-back-...
प्रतिक्रिया
19 Jul 2022 - 11:32 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे पर्रीकरांना चालता येत नव्हतं तरी पद सोडायला ते तयार नव्रते हे खोटंय का?? म्हणजे ईतर परक्षातील नेत्यांनी पद सोडले नाही आजारी असून तर ती पदलालसा, पदाचा मोह वगैरे, पण पर्कीकर भाजपचे असल्याने त्यांच्या बद्दल पदलालसा वगैरे बोलसं का तो पराकोटीचा द्वेष होतो.
बाकी हेच पर्रीकर गोव्यात बिफ कमी पडू देनार नाही असं बोलले होते तेव्हा कुठे गेले होते तुमचे सोयीचे हिंदुत्व?
19 Jul 2022 - 12:22 pm | सुक्या
खरे साहेब,
थोडा गैरसमज झालेला दिसतोय. मला श्री पर्रीकरांविषयी अतीव आदर आहे. त्यांचे कार्य / साधेपणाचा त्यांनी घालुन दिलेला आदर्श वादातीत आहे. माझे मत केवळ अशा परीस्थीतीत जिथे दुर्धर आजार असताना तिथे काही काळ पदभार दुसर्याला देउन राज्य शकट हाकता आले पाहिजे. सध्याच्या परीस्थीतीत जेव्हा आजारी माणसाला कुठेतरी हजर रहावे लागते यात व्यावहारीक काहीही नाही. यात आजारी व्यक्तीला त्रासच व्हायची शक्यता जास्त आहे.
ममता बॅनर्जी यांचा अस्थीभंग हा तात्कालीक होता. त्याचा त्यांच्या कार्यपद्ध्तीवर काहीही फरक पडला नसेल. इतरत्र फिरण्यास जरुर मर्यादा आल्या असतील पण ते फार फार तर १५ ते २० दिवस. माझा दुर्धर आजार व वार्धक्य या मुळे येणारी बाधा आहे. त्यात मला तरी काही वावगे वाटत नाही.
परंतु मनमोहन सिंग / मुलायम सिह / अच्युतानंदन / शरद पवार / लाल कृष्ण आडवाणी व ईतर वयस्कर सांसद यांनी आता त्यांची जागा नव्या सदस्याला द्यायला हवी.
19 Jul 2022 - 12:31 pm | सुबोध खरे
श्री पर्रीकर हे संरक्षण मंत्री असताना केवळ गोव्यात स्थिर सरकार ठेवण्यासाठी त्यांना परत गोव्यात आणले गेले होते.
संरक्षण मंत्र्यासारखी अत्यंत महत्त्वाची खुर्ची सोडून ते एका दोन जिल्ह्याच्या चिमुकल्या राज्याचा मुख्यमंत्रीपदी कशाला गेले असते?
मुखमंत्री असताना सुद्धा जो माणूस स्वतःच्या स्कुटरवरुन जातो त्याने सत्ता लालसेसाठी मर्यत्युशय्येवर असताना सत्तेचा लोभ सोडला नव्हता असे म्हणणाऱ्या बहुसंख्य लोकांना त्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही असेच दिसते.
मी या बद्दल अधिक लिहीत नाही. आपण माहिती घ्यावी हि विनन्ती
19 Jul 2022 - 12:41 pm | अमरेंद्र बाहुबली
संरक्षण मंत्र्यासारखी अत्यंत महत्त्वाची खुर्ची सोडून ते एका दोन जिल्ह्याच्या चिमुकल्या राज्याचा मुख्यमंत्रीपदी कशाला गेले असते?
ते गेले नाहीत त्यांना पाठवले होते. त्यांच्या ईच्छेला विचारतंय कोण? दिल्सीश्वरांचा आदेश पाळायचा एवढंच त्यांच्या हातात. नसतं एकलं तर हकालपट्टी झाली असती. त्यामुळे ते संरक्षण मंत्री पद सोडून काज्यात आले ह्याला काहीही अर्थ नाहीॲ हे म्हणजे मा मुख्यमंत्रीपद सोडून त्याग केलाय असं स्वतच स्वतची वागवा सुरू करून नंतर केंद्राच्या आदेशाने चूपचाप ऊप मुख्यमंत्रीपद घ्यावं लागनार्या नी त्यामुळे डोळ्यात पाणी आलेल्या फडणवींसांसारखं आहें.
बाकी हेत पर्रीकर गोव्यात बीफ कमी पडू देनार नाही हे बोलले होते. एका राज्यात गोहत्या बंदीची मागणी करायची नी दुसर्या राज्यात बीफ कमी पडू देनार नाही असे बोलायचे. भाजपचं हिंदूत्व किती ढोंगी आहे हे यातून दिसतं. मतांसाठी कोलांटऊड्या मारायला भाजपेयी एक्सपर्ट आहेत.
(बीफ मध्ये फक्त गाय येते का? वगैरे पर्रीकक समर्थक येतील. बीफ मध्ये फक्त गाय येत नाही पण गाय देखील येते)
19 Jul 2022 - 1:15 pm | श्रीगुरुजी
अच्युतानंदन व अडवाणी हे विधीमंडळात किंवा संसदेत सदस्य नाहीत.
इतरांविषयी पूर्ण सहमत आहे.
19 Jul 2022 - 3:37 pm | टर्मीनेटर
खरे साहेब मी मोदी विरोधक नाही आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे मी व्यक्तीपूजक नक्कीच नाही.
मिपावरच्या राजकीय चर्चाँमध्ये मी सहभागीही होत नाही कारण एकंदरीत इथे होणाऱ्या चर्चा ह्या सरसकटपणे एखाद्या पक्षाची/नेत्याची बाजू मांडणाऱ्या किंवा एखाद्या पक्षावर टीका करणाऱ्या अथवा एखाद्याची व्यक्तीपूजा किंवा व्यक्तीद्वेष ह्यावर आधारित असतात हा माझा स्वानुभव आहे.
तटस्थपणे काय चांगले किंवा काय वाईट मग तो पक्ष अथवा नेता कोणताही असो त्यावर टीका / टिप्पणी होताना दिसत नाही असे खेदाने नमूद करतो.
मनोहर पर्रीकर आज आपल्यामध्ये नाहीत त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप करणे इष्ट ठरणार नाही तरी तुम्हीच म्हटलंय की
त्यामुळे काही गोष्टी इथे लिहितोय!
श्री पर्रीकरांबद्दल आदर बाळगण्यास काहीच हरकत नाही पण त्यांचा एवढा उदो उदो करण्याचीही अजिबात गरज नाही हे माझे स्पष्ट वैयक्तिक मत!
राजकीय अपरिहार्यता अनेकांच्या वाट्याला येते त्यात पर्रीकरांचा नंबर फार वरचा लागेल. मी तर म्हणेन 'सो कॉल्ड' साधेपणाच्या बाबतीत दिवंगत पर्रीकर हे अरविंद केजरीवाल ह्यांचे रोल मॉडेल होते (हे देखील माझे वैयक्तिक मत असून इथे मी दोघांनाही भामटे म्हणत नाहिये ह्याची कृपया नोंद घ्यावी 😀)
गोवा ह्या चिमुकल्या राज्याचा राज्यशकट हाकताना दिवंगत पर्रीकरानींही अनेक जुमले/जुगाड केले होते हे नाकारून चालणार नाही.
त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर ह्यांना भाजपने तिकीट नाकारले तेव्हा इथेच झालेल्या चर्चा आठवल्या की त्यातला पुर्वग्रह लक्षात येतो.
गोवा हे छोटे राज्य असले (आणि तथाकथितरीत्या कितीही प्रगत असले तरी त्यामागे असलेल्या काळ्या बाजू नेहमी दुर्लक्षित होतात हे दुर्दैव)
जाहिरात नाही पण माझ्या एका अपूर्ण 'कोकण, तळकोकण,गोवा' मालिकेतल्या कॅसिनो विषयीच्या आगामी भागात पर्रीकरांच्या राजकीय/अर्थविषयक अगतिकतेचा फक्त ओझरता उल्लेख येईल कारण प्रवासवर्णनात राजकारण आणणे मला योग्य वाटत नाही!
आता इथे संधी मिळालीच आहे म्हणुन एक गोष्ट नमूद करू इच्छितो की उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारताना केवळ घराणेशाही हा मुद्दा नक्कीच नव्हता! त्यांच्या (उत्पल पर्रीकरांच्या) गंभीर आजारपणाच्या वेळी उपचारासाठी गोव्याहून त्यांना इतरत्र हलवताना खास विमानाचे/तिकिटाचे बुकिंग करणाऱ्या कॅसिनो मालक मोदी (ह्यांचा आणि श्री नरेंद्र मोदींचा काहीही संबंध नाही 😀) वगैरे बाबीही विचारात घेतल्या असणार.
व्यावहारिक राजकारण आणि भावनिक निर्णय/ झुकते माप देण्यात पिता-पुत्रांच्या मानसिकतेत/व्यवहार कुशलतेत असलेला फरक तिकीट वाटपाच्यावेळी नक्कीच निर्णायक ठरला असणार!
असो,
मी श्री. मोदींचा समर्थक असलो आणि इंदिरा गांधीनंतरचे (ज्यांचा कार्यकाळ अनुभवला नव्हता पण वाचून जेवढे समजले त्यावरून) माझे ते सगळ्यात आवडते पंतप्रधान असले तरी त्यांच्या प्रत्येक भल्या-बुऱ्या निर्णयाचे मी समर्थन करत नाही आणि पुढेही करणार नाही.
निर्मला सीतारामन ह्यांच्यासारख्या अयोग्य व्यक्तीची नेमणूक आधी MCA (जिथे बट्ट्याबोळ करून झाल्यावर) नंतर थेट देशाच्या अर्थमंत्रीपदी करण्याचा निर्णय असो की स्टार्ट अप इंडिया, वा 24 की 48 तासात व्यावसायिक कर्ज वगैरे सारख्या बोगस योजनांची घोषणा स्वतः पंतप्रधानांनी करणे असो त्या-त्यावेळी मी त्यांचा निषेध / विरोध मिपावर केल्याचे आठवतेय!
बाकी तुम्ही म्हणताय तसे 2024 ला मोदीच पंतप्रधान होतील ह्यात अजिबात शंका नाही, किंबहुना तेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी माझीही (वैयक्तिक) इच्छा आहे पण अनेक गोष्टीत सुधारणा होणे आवश्यक आहे हे देखील नमूद करू इच्छीतो, जसे की उद्योग, अर्थखाते आणि अनेक बोगस योजनांची स्वतः घोषणा करणे वगैरे वगैरे...
बापरे...बऱ्याच दिवसांनी मिपावर आल्याचा परिणाम असावा म्हणुन बहुतेक प्रतिसाद बराच लांबलाय 😀 त्यामुळे मावळत्या 'महाविकास आघाडी' तल्या दोन प्रमुख पक्षांचा माजी पदाधिकारी ह्या नात्याने अगदी तिकीटवाटप प्रक्रियेत अनुभवलेला शिवसेनेतला आघळपघळपणा असो की राष्ट्रवादी काँग्रेस मधला व्यावसायिकपणा/पैशाचा खेळ असो लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण आता आवरते घेतो 😀
स्वगत : 'श्री पर्रीकरांना महान राजकारणी / रोल मॉडेल समजणाऱ्या प्रत्येकानी त्यांच्या व्यवहारिक/राजकीय खेळी/ जुमल्यांविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करावी' त्यातून सगळे नाही पण निदान काही गैरसमज दूर होतील!
19 Jul 2022 - 7:43 pm | अनन्त अवधुत
राजकिय पक्षांनी निगडीत नसलेल्या सामान्य मतदारांना तिकिट वाटप म्हणजे कोणा नेत्याने केलेले शक्तीप्रदर्शन, तिकिट वाटपातली हाणामारी, आणि कोणी कोणाचे तिकिट कापले इतपतच बातम्यांमधुन कळते. तिकिट वाटपातली आतली बाजु कधी पुढे येत नाही.
त्यामुळे
तुम्ही हे लिहाच ही विनंती.
19 Jul 2022 - 7:44 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
एखादा नेता भाजपचा असला ना कितीही वाईट असला तरी त्याचा ऊदो ऊदो करतात काही लोक.
बाकी पर्रिकरांच्या मुलाला घराणेशाही मूळे तिकीट न देनार्यांचे वडील आमदार नी काकू मंत्री होत्या.
20 Jul 2022 - 11:23 am | सुबोध खरे
टर्मिनेटर साहेब
श्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात मि साडे चार वर्षे गोव्यात वास्तव्याला होतो. त्यांच्या इतका सर्व मान्य नेता गोव्यात तेंव्हा हि नव्हता आणि आता ही नाही.
ते येण्यापूर्वी गोव्यात दर यावर्षी मुख्यमंत्री बदलत असे.
गोव्यात खाण मालक, वाहतूक दार आणि हॉटेल मालकांच्या लॉबी अत्यंत सशक्त होत्या आणि आहेत आणि त्यांच्या मागे मोठे अर्थकारण आणि जनतेचे हितसंबंध आहेत. या तीन लॉबी विरुद्ध काम करून कोणीही तेथे निवडून येऊ शकणार नाही. कारण या ना त्या कारणाने गोव्यातील ९० % जनता त्यांच्याशी निगडित आहे.
असे असूनही त्यांनी गोव्यात केलेल्या सुधारणा आणि काम हे अत्यंत प्रशंसनीय आहे.
त्यांच्या बद्दल अनेक आरोप आणि वदंता जाणीवपूर्वक पसरवलेल्या आहेत. त्यात सत्य किती आणि असत्य किती या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
जे त्यांच्या संपर्कात आले किंवा त्यांच्याबरोबर काम केले त्यांना विचारल्यास त्यांच्याइतका साधा सरळ माणूस विरळच आहे.
त्यांचा मुलगा हिंदुजा मध्ये भरती असताना सुद्धा त्यांनी कोणतीही अतिरिक्त सुविधा घेतलेली नव्हती.
परंतु त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम करताना नौदलाचे अभियंते आणि नौदलासाठी काम करणाऱ्या एल अँड टी किंवा टाटा सारख्या कंपन्यांचे प्रश्न ज्या तर्हेने बाबूशाहीला डावलून सोडवले होते ते अत्यंत प्रशंसनीय होते आणि माझ्या माहितीनुसार हि कामे त्यांनी अत्यंत पारदर्शी पणे केली होती.
माझ्या माहितीतील अनेक नौदलाचे अभियंते आजसुद्धा त्यांच्या प्रश्न समजून घेण्याच्या क्षमतेबद्दल प्रशंसा करतात. यता माझे अरिहंत या अणुपाणबुडी वर काम केलेलं मित्र सुद्धा आहेत. (अर्थात ते स्वतः अभियंते असल्याने आणि स्वतः कारखान्याचे मालक असल्याने त्यांना अशा प्रश्नाची उत्तम जाण होती.) आणि एकदा सांगितले कि त्यांना गोष्टी सहज समजत असत आणि ए के अँटनी यांच्यासारख्या निष्क्रिय संरक्षण मंत्र्यांनंतर असा संरक्षण मंत्री मिल्ने हे भारताचे भाग्य आहे असेच बरेच संरक्षण क्षेत्रात काम करणारे लोक सांगतील.
शेवटपर्यंत सत्तेच्या लोभाने ते विधानसभेत येत होते हा आरोप निखालस पणे खोटा आहे एवढेच मी म्हणेन.
येथे केवळ गरळ ओकणारे अनेक आहेत त्यांच्याशी कोणताही संवाद करणे अशक्य आहे म्हणून मी एवढ्यावरच थांबतो.
20 Jul 2022 - 12:38 pm | अमरेंद्र बाहुबली
गोव्यात ओला/ऊबेर नाहीत म्हणे. का तर टूरीस्ट
टॅक्सी लाॅबी ने हफ्ते पोहोचवून ओला ऊबेर य्ऊच दिली नाही असं म्हणतात. पर्रीकर किती स्वच्छ होते हे वर टर्मीनेटर साहबेांनी सांगीतलेच आहे. ओला/ऊबेर का येऊ दिली नाही ह्या मागे पर्रीकरांचे काय “गणीत” होते ते ही लोकांना माहीतीय. चालता येत वयतानाही मुख्यमंत्रापद आज्बात सोडायला तयार नसणे असा तथाकथात साधा मुख्यमंत्री जगात नसावा.
बाकी पर्कीकर गोव्यात बीफ कमा पडू दनार नाही बोलले होते ह्यावर कोणताही भाजपेयी बोलायला तयार नाही. काय ते हिंदूत्व पर्रीकरांचं एकदम ओक्के :)
20 Jul 2022 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली
चालता येत नसतानाही मुख्यमंत्रीपद आजीबात सोडायला तयार नसणे असा तथाकथीत साधा मुख्यमंत्री जगात नसावा. असे वाचावे.
हेच
कोंग्रेसच्या एखाद्याने केले असते तर आता पर्यंत भाजपेयींनी आयटी सेलच्या फोरवर्ड्सनी सोशल मिडीया भरून ठेवला असता. पण पर्काकर असल्याने कसं चूपचाप आहेत सगळे.
20 Jul 2022 - 12:48 pm | सुबोध खरे
आपल्याला गोव्याबद्दल आणि तिथले अर्थकारण याबद्दल काहीही माहिती नाही.
श्री पर्रीकर यांनी ओला उबेर चालू करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी कायद्यासारखीच स्थिती तेथे आहे.
तेंव्हा तुमचं चालू द्या
माझा पास
20 Jul 2022 - 1:41 pm | अमरेंद्र बाहुबली
श्री पर्रीकर यांनी ओला उबेर चालू करण्याचा प्रयत्न केला होता.
अच्छा. मग कुणी अडवले त्यांना? का टॅक्सी लाॅबी ने त्यांच्या कडे “राष्ट्रहीत“ पोहोचवले म्हणून त्यांचे प्रयत्न थांबले?
21 Jul 2022 - 10:29 am | सुबोध खरे
ओला उबेर चालू केली होती
परंतु ........
पुढचा तुम्ही वाचून घ्या
अन्यथा सोडून द्या
21 Jul 2022 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली
ओला उबेर चालू केली होती
परंतु ........ पोतेच्या पोते नी बॅगा भरून राष्ट्रहीत टॅक्सी लाॅबी ने पोहोचवले व मग पर्रीकरांना नाईलाजाने ओला ऊबेर बंद कराव्या लागल्या. :)
21 Jul 2022 - 11:41 am | सुबोध खरे
तुम्ही वाचून घ्या
अन्यथा सोडून द्या
20 Jul 2022 - 12:54 pm | सुबोध खरे
बाकी पर्कीकर गोव्यात बीफ कमा पडू दनार नाही बोलले होते
याचे मूळ काय? ते असे का म्हणाले याबद्दल आपल्याला थोडी तरी माहिती आहे का?
गोव्यातील बहुतांश बीफ कर्नाटकातून येते. कर्नाटकाने गोवंश हत्येवर बंदी घातली असल्यामुलें कर्नाटकातून येणारे बीफ केवळ म्हशीचे/ रेड्याचे असते आणि त्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली होती. याबद्दलचे ते वक्तव्य होते.
गोव्यातील कत्तलखान्याला शेजारच्या राज्यातून येणारे प्राणी येत नाहीत त्यामुळे गोव्याला शेजारच्या राज्यातून बीफ ( म्हशीचे) आयात करावे लागते
माहिती नाही. ती करून घेण्याची इच्छा नाही.
द्वेषांध झाल्यामुळे असं होतंय.
इलाज नाही
20 Jul 2022 - 1:41 pm | अमरेंद्र बाहुबली
छान कथा रचलीत. आणखी येऊद्या.
19 Jul 2022 - 2:29 pm | मुक्त विहारि
“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!
https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-expelles-ramdas-kadam-targ...
---------
काय बोलावं, ते सुचेना.....
19 Jul 2022 - 5:01 pm | मुक्त विहारि
'मोदींना तुरुंगात टाका आणि सरकार पाडा' सोनिया गांधींनी रचले होते षडयंत्र; नेत्याचा खुलासा
https://www.esakal.com/amp/desh/ex-aide-of-teesta-setalvad-says-sonia-ga...
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष.....
19 Jul 2022 - 5:03 pm | मुक्त विहारि
हमारे जवानों के पास वैसे हथियार होंगे जिनके बारे में दुश्मन सोच भी नहीं सकेगा... पीएम मोदी बोले- मैं कब तक रिस्क लेता रहूंगा
https://navbharattimes.indiatimes.com/india/prime-minister-narendra-modi...
---------
संरक्षणा बाबतीत, हे केंद्र सरकार, योग्य ते निर्णय जनतेच्या भल्यासाठी, नक्कीच घेत आहे.....
19 Jul 2022 - 5:30 pm | मुक्त विहारि
साहेब, आपण पुन्हा लढू, मैदानात उतरू, पण राष्ट्रवादीची साथ सोडा, आढळराव पाटलांनी विनंती करताच उद्धव ठाकरे म्हणाले…
https://www.tv9marathi.com/politics/uddhav-thackeray-said-shiv-sena-sir-...
-------
त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हे सर्व मानणार नाहीत. शक्य होणार नाही. आपल्याला राष्ट्रवादी सोडून चालणार नाही.’ अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिलीय.
19 Jul 2022 - 6:16 pm | श्रीगुरुजी
उद्धव ठाकरे - माझ्या भात्यातील कितीही बाण काढून घेतले तरी बाण सोडणारं धनुष्य माझ्याच खांद्यावर आहे.
___________________________________
पत्रकार - आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल?
संजय राऊत आमचं पुढचं पाऊल गद्दारांच्या छाताडावर असेल, मस्तकावर असेल.
तात्पर्य -
आपलं धनुष्य केव्हाच मोडून पडलंय, भाता रिकामा झालाय हे ठाकरेंना समजतच नाही, तर आपल्या तंगड्या खेचून आपल्याला पार्श्वभागावर आपटवून पेकाट मोडलंंय हे राऊतला समजतच नाही.
सर्वस्व जाऊनही अजूनही यांच्या फुसक्या फुशारक्या, पाचकळ कोट्या, टोमणे, स्वत:विषयीचे भ्रम कायम आहेत.
19 Jul 2022 - 6:26 pm | रात्रीचे चांदणे
राऊत साहेब आत्ताच ६ वर्षासाठी खासदार झालेत त्यामुळेच निवांत असतील. मतं मागायला जनतेत तर त्यांना जायचंच नाही. सध्या ते ६ वर्षाच्या नोटीस period वर आहेत.
21 Jul 2022 - 11:42 am | सुबोध खरे
माझ्या भात्यातील कितीही बाण काढून घेतले तरी बाण सोडणारं धनुष्य माझ्याच खांद्यावर आहे.
एक जाहिरात -- डोहाळे जेवणासाठी धनुष्य भाड्याने मिळेल
संपर्क वांद्रे पूर्व
19 Jul 2022 - 6:31 pm | कानडाऊ योगेशु
हिंदुफोबिया झालेल्यांसाठी ही बातमी.(मराठी वृत्तपत्रातील बातमीही वाचली होती पण दुवा मिळाला नाही.)
काही दिवसांपूर्वीच मिशन २०४७ बद्दल च्या बातम्या होत्या. २०४७ पर्यंत संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्लॅन उघडकीस आला अशी काहीशी बातमी होती.
माझ्यामते मुस्लीमलांगुनचालन करणारे भरभरुन राज्यकर्ते असतील तर त्याआधीच भारताचे इस्लामीकरण होईल.