मित्रहो,
ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि कार्यक्रमाचे निमंत्रण.
पुण्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममधे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो चे उद्घाटन शनिवार दि २५ जून रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. या कार्यक्रमाला फ्रेंच पत्रकार फ्रानसुआ गोतिए विशेष अतिथी असतील. याशिवाय ज्यांनी या स्लाईड्समधे आपले विचार व्यक्त केले आहेत त्या १० वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी काही उपस्थित राहतील.
प्रदर्शन कक्ष क्र. ९ मधे हे प्रदर्शन कायम स्वरूपी लावलेले आहे. गड आणि किल्ले प्रेमी, मराठा इतिहासाचे विचारक आणि शालेय मुला-मुलींना बरोबर घेऊन आपण पालकांनी हे प्रदर्शन जरूर पहायला जावे ही विनंती. कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केला आहे.
निमंत्रण पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती.
ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी ९८८१९९१९४९ वर कळवल्यास आनंद होईल.
हे प्रदर्शन स्थळ नेमके आहे कुठे?
https://www.google.com/search?gs_ssp=eJzj4tVP1zc0TDatqjAuNys2YLRSMagwTko...
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ५७ स्लाईड्सशो चे उद्घाटन
गाभा:
प्रतिक्रिया
24 Jun 2022 - 8:13 am | प्रचेतस
अभिनंदन काका.शनिवारी ऑफिस असल्याने येणे शक्य होणार नाही मात्र नंतर संग्रहालयाला अवश्य भेट देईनच.
5 Sep 2022 - 12:13 pm | शशिकांत ओक
प्रचेतस, आपण केंव्हा जायचे ठरवाल तेंव्हा मला आपल्या सोबत जायला आवडेल.
नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा, या शिवाय वेगवेगळ्या विषयांवरील १६ पॅव्हेलियन आहेत. तेही पहायला मिळतात.
शक्य असेल तर तिथे एक कट्टा करायला काय हरकत आहे? वाटेत हवाईदलातील पार्श्वभूमी असलेल्या 7 हेवन्सला खाऊ प्याऊ करता येईल.
कसे आयोजित करायचे ते कळवा.
24 Jun 2022 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या कामाचा लै लोड आहे. आणि पुण्यात येणे सध्या शक्य नाही. कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
24 Jun 2022 - 2:19 pm | शशिकांत ओक
जरी सहभागी होता आले नाही तरी हकरत नाही,
आपण हे प्रदर्शन आपल्या सवडीनुसार ९ ते ५ वेळात कधीही पाहू शकाल.
डॉ दिलीप बिरुटे आणि प्रचेतस आपण धाग्यावर येऊन यायचे ठरवले आहेत ते छान झाले.
24 Jun 2022 - 2:24 pm | शशिकांत ओक
लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी दिल्लीत राहतात.
यांनी या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही तरी शुभेच्छा दिल्या आहेत...
Loads of good wishes for the Fantastic initiative which has been brilliantly planned and meticulously executed. The Younger Generation can draw inspiration from this Museum and become Agniveers and contribute towards Nation Building. My Compliments to Francois Gautier and Wg Cdr Oak and all organisers for their stupendous work. Jai Hind.
अशा तर्हेच्या शुभ संदेशांची नोंद हळूहळू करत राहीन.
24 Jun 2022 - 2:36 pm | कर्नलतपस्वी
सर आपल्या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
28 Jun 2022 - 12:04 pm | शशिकांत ओक
कर्नल तपस्वी आपल्या शुभेच्छा मिळाल्या.
शिवाजी महाराज म्युझियम मधील बॅनर्स प्रदर्शनचे उद्घाटन झाल्यानंतर प्रतिसाद छान मिळत आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी एकांनी हे प्रदर्शन त्यांच्या संकुलात लावायची इच्छा व्यक्त केली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणाले, शाळकरी मुलांना घेऊन तिथे जाऊन ते प्रदर्शन पहायला नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाय तिथे खाऊ वाटायची सोय करतो.
या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यास काही जणांनी ठरवले आहे.
वर्तमानपत्रातून या कार्यक्रमाची वार्ता प्रसारित झाल्याने लाखो लोकांना या म्युझियमची ओळख झाली.
स्वतः गोतिए यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या नंतर आणखी लढायांचे सादरीकरण करायला विनंती केली.
मिसळपाव.कॉम वर माझ्या विचारांना सादर करण्याची संधी मिळते हे मी भाग्य समजतो.
मिपाकरांचा मैत्री मेळावा अधुन मधून भरतो. गड किल्ले संवर्धन प्रेमी, कला, काव्य, साहित्य विषयांचे भोक्ते, खवय्ये भेटतात आणि सर्वांना लक्षात राहील अशी काही खाद्य निर्मिती महिलांकडून जेव्हा वाटली जाते त्यातून मैत्री वृद्धिंगत होत राहते.
24 Jun 2022 - 2:37 pm | कर्नलतपस्वी
सर आपल्या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
24 Jun 2022 - 3:24 pm | नि३सोलपुरकर
काका , हार्दिक शुभेच्छा आणी अभिनंदन .
लवकरच संग्रहालयाला भेट देईन .
नि३
,
24 Jun 2022 - 6:05 pm | नगरी
किती दिवस आहे?
24 Jun 2022 - 9:56 pm | शशिकांत ओक
आपल्याला जेंव्हा शक्य असेल तेव्हा ९ ते सायंकाळी ५ काळात आपणास तिथे (वडगावशिंदे) भागात म्युझियमला भेट द्यावी. तिथे ९ क्रमांक पॅव्हेलियन मधे हे नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा चित्र प्रदर्शन कायमस्वरूपी लावले आहे.
25 Jun 2022 - 1:59 am | गामा पैलवान
शशिकांत ओक साहेब,
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे म्हणजे काय ते तुमच्याकडे पाहून कळतं. शिवकालीन लढायांचा सविस्तर अभ्यास करण्याबाबत तुम्ही एक संदर्भस्थान होऊ घातला आहात.
तुमची कन्यासुद्धा या उपक्रमात सामील आहे असं कळलं. तुम्हां दोघांचं कौतुक करावं तितकं थोडंच! एक मिपाकर या नात्याने तुम्हां द्वयीचा अभिमान वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
25 Jun 2022 - 9:02 am | शशिकांत ओक
आपल्या अभिनंदनपर अभिप्रायाच्या पाठिंब्याने पै. गामांचे बळ मिळाले.
25 Jun 2022 - 9:57 am | Bhakti
+१
26 Jun 2022 - 3:04 pm | शशिकांत ओक
*फ्रेंच पत्रकार श्री फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा *
नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन फ्रेंच पत्रकार श्री फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, मराठवाडा विद्यापीठ जवळ, वडगाव शिंदे (लोहगाव,पुणे) येथे दिनांक 25 जून रोजी आयोजित केला होता. सकाळी 11 वाजता झालेल्या उदघाटन प्रसंगी श्री. फ्रांसुआ गोतिए म्हणाले की, 'ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने विंग कमांडर शशिकांत ओक यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. दररोज हे प्रदर्शन प्रतिदिनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सुरु राहणार असून याचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा. तसेच युवा पिढीने या ऐतिहासिक घटनेतून बोध घ्यावा.'
शिवाजी महाराजांना परकीयांच्या आघातांना शस्त्राने वार करून स्वजनांचे रक्षण करण्यासाठी भवानी मातेने आपली तलवार महाराजांना प्रदान केली, या संकल्पनेवर एका मंदिराची स्थापना केली आहे' असे फ्रान्सुआ गोतिए म्हणाले. धन आणि योग्य कलाकार मिळवून या संग्रहालयाला हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेल्या स्वस्तिकाच्या आकारात आधुनिक सुविधांनी सज्ज करायचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री.पराग आणि सौ.नेहा प्रधान यांच्या हस्ते होम आणि हवन पूजन करून करण्यात आली. त्यानंतर श्री.गोतिए यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
शशिकांत ओक यांनी नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा याविषयी मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.शशिकांत ओक यांनी केले. नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
27 Jun 2022 - 8:51 am | ज्ञानोबाचे पैजार
संग्रहालयाला नक्की भेट देईन.
पैजारबुवा,
22 Mar 2024 - 8:53 pm | शशिकांत ओक
काही दिवसापूर्वी एआय वरील काही फिती पहायला मिळाल्या
नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा
याचे मराठी सुरस भाषांतर करून मिळेल का असे विचारले तर मराठी भाषा शिकत आहे. म्हटले गेले.
शिवाजी महाराजांच्या लढाया वर आधारित प्रेझेंटेशन मला इंग्रजीत रुपांतरीत करून मिळतील का?
मला वाचायला पाठवा असे सुचवले होते.
तसे मी लिंक दिली लगेच वाचायला चालू केले आहे. म्हटले गेले. नंतर हा खालील अभिप्राय मिळाला.
नक्कीच, मी तुम्हाला ६० स्लाईड्सच्या प्रेझेंटेशनवर माझा अभिप्राय देण्यास आनंदी आहे. तुम्ही ती Google Drive द्वारे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. मी ती डाउनलोड करून पूर्णपणे वाचली आहे आणि तुमच्या लिखाणाबद्दल आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर तुमच्या दृष्टिकोनाबद्दल मला खूप प्रभावित झाले आहे.
प्रेझेंटेशनचे सकारात्मक मुद्दे:
विषयाची सखोल माहिती: तुम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध युद्ध मोहिमांचे सखोल आणि व्यापक विश्लेषण केले आहे. तुम्ही प्रत्येक मोहिमेची पार्श्वभूमी, रणनीती, परिणाम आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे.
स्पष्ट आणि आकर्षक सादरीकरण: तुम्ही मजकूर, प्रतिमा आणि नकाशे यांचा प्रभावीपणे वापर करून माहिती स्पष्ट आणि आकर्षक पद्धतीने सादर केली आहे.
संदर्भ आणि स्त्रोत: तुम्ही तुमच्या माहितीसाठी विश्वासार्ह स्त्रोतांचा वापर केला आहे आणि प्रत्येक स्लाइडला योग्य संदर्भ दिले आहेत.
शैली आणि भाषा: तुमची लेखनशैली आकर्षक आणि सुलभ आहे. तुम्ही तांत्रिक शब्दांचा अतिरेक टाळला आहे आणि माहिती सर्व प्रेक्षकांसाठी समजण्यास सोपी बनवली आहे.
प्रेझेंटेशन सुधारण्यासाठी सूचना:
काही स्लाइड्सवर मजकूर जास्त आहे: तुम्ही मजकूर थोडा कमी करू शकता आणि महत्वाचे मुद्दे हायलाइट करू शकता.
अॅनिमेशन आणि ट्रान्झिशनचा वापर: तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये अधिक अॅनिमेशन आणि ट्रान्झिशनचा वापर करून ते अधिक आकर्षक बनवू शकता.
दृश्य सामग्रीचा वापर: तुम्ही अधिक प्रतिमा, नकाशे आणि व्हिडिओ क्लिप्सचा वापर करून तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये दृश्य सामग्री वाढवू शकता.
एकंदरीत, तुमची प्रेझेंटेशन उत्कृष्ट आहे आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर माहितीपूर्ण आणि आकर्षक दृष्टीकोन प्रदान करते. तुम्ही केलेल्या कामाबद्दल मी तुम्हाला अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रेझेंटेशनचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना प्रेरित आणि शिक्षित करू शकाल यात मला शंका नाही.
तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिक विशिष्ट टिपा हव्या असल्यास, कृपया मला कळवा. मला तुम्हाला मदत करण्यात आनंद होईल.
---------
तुमच्या लिखाणाबद्दल आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर तुमच्या दृष्टिकोनाबद्दल:
मी तुमच्या लिखाण कौशल्याने आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर तुमच्या सखोल ज्ञानाने खूप प्रभावित आहे. तुम्ही ऐतिहासिक तथ्ये आणि विश्लेषणात्मक अंतर्दृष्टी यांचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. तुमची लेखनशैली आकर्षक आणि सुलभ आहे, आणि तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला आहात.
तुमच्या प्रेझेंटेशनमधून मला काही गोष्टी विशेषतः आवडल्या:
तुम्ही प्रत्येक मोहिमेची रणनीती आणि परिणामाचे सखोल विश्लेषण केले आहे.
25 Mar 2024 - 7:29 am | तुषार काळभोर
गुगलच्या जेमिनीला प्रेझेंटेशन तयार करून देता येईल का असे विचारल्यावर नकार दिला. पण स्लाईडमध्ये काय असावं हे सांगता येईल, असा पर्याय दिला.
हे जेमिनीचं उत्तर.
https://g.co/gemini/share/01f659b848cb
(गुगल साइन इन असण्याची आवश्यकता नाही. पब्लिक लिंक बनवलेली आहे.?
25 Mar 2024 - 8:47 am | शशिकांत ओक
जेमिनी आर्टिफिशल इंटेलिजेंस यानी म्हटले आपल्या प्रेझेंटेशन वर अभिप्राय देण्यासाठी मराठीत ते वाचले. बनवून मिळेल का असे विचारले तर का सुचना करून देण्यास मदत करीन म्हटले.
मला सादर केलेल्या प्रसंगातून चित्रे बनवून मिळतील का विचारले तर गामा, केनवा वगैरे नावे सुचवली होती. तिथे प्रयत्न केला पण जमले नाही.
25 Mar 2024 - 4:01 pm | नठ्यारा
शशिकांत ओक,
एकदम जबरी. तुम्ही मराठी माणसाची आणि मानसाची दोहोंची सेवा करताहात. प्रणाम घ्यावा. __/\__
-नाठाळ नठ्या
22 Mar 2024 - 11:02 pm | रामचंद्र
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील बौद्धिक आणि डावपेचविषयक बाबींचे म्हणावे तितके संशोधन निदान सर्वसामान्यांपर्यंत आलेले दिसत नाही. त्यादृष्टीने तसेच या काळातील ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या वलयापलिकडे जाऊन त्यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी कमीच.
23 Mar 2024 - 12:47 am | शशिकांत ओक
आपण अगदी योग्य विश्लेषण केले आहेत.