ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
18 Jun 2022 - 5:26 pm
गाभा: 

आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.

लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)

Bichukale

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2022 - 5:33 pm | श्रीगुरुजी

तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक इसम प्रत्येक वेळी राष्ट्रपती/उपराष्ट्रपती निवडणुकीला उभा रहायचा. प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jun 2022 - 5:41 pm | चंद्रसूर्यकुमार

प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?

तेच समजत नाही. काका जोगिंदरसिंग हे त्याचे मूळ नाव होते. त्याने नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदापर्यंत जवळपास २०० वेळा निवडणुक लढवली होती. तो प्रत्येक वेळेस हरला नव्हे त्याची अनामत रक्कमही जप्त झाली हे वेगळे सांगायलाच नको. त्यामुळे त्याने 'धरतीपकड' हे टोपणनाव घेतले होते.

त्याला अगदी राष्ट्रपती/उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवताना प्रस्तावर म्हणून आमदार/खासदारांच्या सह्या मिळायच्याच. पण थोडीफार मतेही मिळायची. १९९२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्याने के.आर.नारायणनविरोधात निवडणुक लढवली होती आणि एका खासदाराचे मत त्याला मिळाले होते. १९९२ मध्येच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शंकरदयाळ शर्मा आणि जी.जी.स्वेल यांच्याबरोबरीने धरतीपकडनेही निवडणुक लढवली होती आणि त्याला हजारेक मूल्य असलेली मते मिळाली होती. याचा अर्थ त्याला पूर्ण देशातून २-३ मते मिळाली असली पाहिजेत.

प्रसाद_१९८२'s picture

18 Jun 2022 - 6:52 pm | प्रसाद_१९८२

हे 'धरती पकड' नाव पहिल्यांदाच ऐकले.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Jun 2022 - 10:51 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?
श्रिगुरूजी, तेव्हा आमदार खसदार ह्यांची सही असण्याचे बंधन नव्हते. कुणीही ऊभा राहू शकत होतं.

विजुभाऊ's picture

18 Jun 2022 - 7:02 pm | विजुभाऊ

त्या बिचुकले नामक इसमाला सातार्‍यात मी एकदा भेटलो आहे.
प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे.
तो जर राष्ट्रपती झाला तर या देशाचे काय होईल कोण जाणे.
त्याला समर्थन देणारे खासदार कसे मिळतात कोण जाणे.

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2022 - 7:19 pm | श्रीगुरुजी

बिचुकलेचे पुण्यातील मंडईत पेढ्यांचे दुकान आहे. तो बऱ्याचदा दुकानात असतो.

प्रदीप's picture

18 Jun 2022 - 8:01 pm | प्रदीप

प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे.

म्हणजे आपला मराठी सुब्रमण्यम स्वामीच, म्हणा की !

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2022 - 8:03 pm | श्रीगुरुजी

सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत. बिचकुले आचरट चम्या आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Jun 2022 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली

सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत.
ते बरोबर आहे हो. पण अध्येमध्ये ते भाजपला घरचा आहेर देत असतात. मग त्यांच्यावर टिका करायला नको?

sunil kachure's picture

19 Jun 2022 - 1:48 pm | sunil kachure

भगवान बुध्द ना पिपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती..
आईनस्टाईन लं तर सफरचंद च्या झाडं खाली ज्ञान प्राप्ती झाली होती.
तशा आपल्या तेजस्वी , दैदिप्मान ,विश्व गुरू ह्यांना अयोध्या मध्ये गेल्यावर दिव्यज्ञान मिळते असे तर नाही ना?
मध्ये मध्ये ज्ञान रिफिल करण्यासाठी पण तिथे जावे लागते.
तेजस्वी बुद्धी चे हेच गुपित असावे.

Bhakti's picture

19 Jun 2022 - 1:54 pm | Bhakti

आईनस्टाईन लं तर सफरचंद च्या झाडं खाली ज्ञान प्राप्ती झाली होती.
अवघड आहे.

sunil kachure's picture

19 Jun 2022 - 1:59 pm | sunil kachure

,

कानडाऊ योगेशु's picture

19 Jun 2022 - 2:06 pm | कानडाऊ योगेशु

एकदम गलत..
चुकलेच नाही तर बिचुकलेच.

श्री कचुरे, तुम्हाला कोणत्या ठिकाणी / कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे?

प्रसाद_१९८२'s picture

19 Jun 2022 - 4:57 pm | प्रसाद_१९८२

मोहाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे.

सुखी's picture

19 Jun 2022 - 10:22 pm | सुखी

:D

सुक्या's picture

20 Jun 2022 - 2:18 am | सुक्या

तुम्ही पण बिचुकलेच!! :-)
आमच्या खबरीं ने दिलेल्या पक्क्या टीप नुसार त्यांना "ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे"

"ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे" ऐवजी . . "ताडा च्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे" असे वाचावे ...

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jun 2022 - 8:11 am | अमरेंद्र बाहुबली

बदल केला तरी पीजे तो पीजेच राहनार.

सुबोध खरे's picture

20 Jun 2022 - 9:38 am | सुबोध खरे

ज्यांना समजायचंय ते समजणारच तुम्ही टेन्शन नका घेऊ

ट्रम्प ह्यांचे "सल्लागार" श्रीयुत पीटर नावारो ह्यांची आठवण आली. नावरो प्रत्येक निवडणूक लढले आणि हरले. बहुतेक इलेक्शन ते डेमोक्रॅट म्हणून लढले. एकदा तर हिलरी क्लिंटन ह्यांनी त्यांचा प्रचार केला होता आणि अगदी सेफ सीटवरून लढले तेंव्हा सुद्धा डेपोसिट जप्त. शेवटी अगदी आपल्या HOA चे इलेक्शन सुद्धा हरले. मग ते सोडून त्यांनी आपले नाव बदलले आणि "रॉन वीरा" नावानी पुस्तके वगैरे लिहायचे आणि मग नावरो नावाने दुसरी पुस्तके लिहून त्यांत रॉन वीरा ला "एक्स्पर्ट" म्हणून कोट करायचे.

अभिजीत बिचुकले सारखे विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनात अत्यंत शोभून दिसले असते आणि त्यांच्या प्रभावी अस्तित्वाने त्या भवनाची गरिमा वाढली असती ह्यांत शंका नाही. बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय.

पण बिचुकले ह्यांचा योग्य तो सन्मान करण्याची क्षमता भारतीय व्यवस्थेत नाही. वेलेन्टाइन डे दिवशी ज्यांना गर्लफ्रेंड आहे अश्या लोकांना धमकावत फिरणाऱ्या संस्कृतीरक्षण शिळ्या सैनिकाला त्याच बागेंत कुणा ललनेने अचानक गुलाबाचे फुल द्यावे आणि तो शिळा सैनिक गोंधळून जावा अशीच अवस्था आम्हा जनतेची बिचुकले ह्यांच्या अस्तित्वापुढे होईल.

दिगोचि's picture

19 Jun 2022 - 8:48 am | दिगोचि

सुमारे ६०-६५ वर्शापूर्वी मुम्बईच्या गिरगाव भागातले हे ग्रहस्थ नेहरून्च्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहायचे व डिपॉझिट जप्त न होता हरायचे. नन्तर त्यानी आपले नाव आणि धर्म बदलून ग्यानी कर्तारसिन्ग असे नाव घेतले होते. ते पगडी घालून आणि तलवार घेऊन फिरत असत.

चिक्कु's picture

19 Jun 2022 - 11:58 am | चिक्कु

बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय.

आम्हाला दात ईचकायला लावायला हातभार लावला आहे आपण.

sunil kachure's picture

19 Jun 2022 - 8:11 pm | sunil kachure

विरोधी पक्षांनी आता एकजूट दाखवणे खूप खूप गरजेचे आहे.५२,,% मत विरोधी पक्षांकडे आहेत.
फक्त एकजूट असणे महत्वाचे आहे.
हुशार,स्वाबुद्धी असणारा ,राजकीय व्यक्ती नसला तरी चालेल.
पण सर्व विरोधी पक्षांनी एक होवून राष्ट्रपती विरोधी पक्षाने उभा केलेला उमेदवार च झाला पाहिजे.
काळ नाजूक आहे.

एखाद्या योजने विषयी विरोध करून थेट अचानक जाळ्पोळ दंगल वगैरे निर्माण केली जाते.
त्यावेळी संशय येतो नक्की कशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे?

अशी काय ताजी घडामोड आहे जी माध्यमातून नाहीशी करणे आवश्यक झाले?

भारतातील चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या मुख्यालयाला भेट दिली. चीनच्या राजदूतांना द हिंदू वृत्तपत्राबरोबर परस्पर समज आणि विश्वास निर्माण करायचा आहे!

याच वृत्तपत्राने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भल्यामोठ्या चीनी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भारतातील सीताराम येचिरी, डी राजा, एस. सेंथिलकुमार आणि जी. देवराजनिन यांसारख्या अनेक कम्युनिस्ट नेत्यांनीही भाग घेतला होता.

मुख्य माध्यमांत याची कुठेही बातमी आलेली नाही हे नोंद घेण्याजोगे आहे!

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2022 - 7:08 am | श्रीगुरुजी

https://www.lokmat.com/national/agneepath-protest-agneepath-scheme-big-p...

दलालांना भडकवून आंदोलन करून शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर हा आता तरूणांचं विटोळं करणार. जंग जंग पछाडून सुद्धा याला आणि याच्या समर्थकांना उत्तर प्रदेश व इतर तीन राज्यात भाजपला हरविता आलै नाही। मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यापासून हा अडगळीत पडला होता. आता परत हा फुरफुर करायला लागलाय. पुढील हिंसाचार टाळण्यासाठी व तरूणांना भडकवून भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी याला तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली दीर्घ मुदतीसाठी तुरूंगात टाकले पाहिजे.

डँबिस००७'s picture

20 Jun 2022 - 10:38 am | डँबिस००७

केंद्र सरकार
राकेश टिकैत, महम्मद झुबैर ( अल्ट न्युज) , द प्रिंट, सारख्या फेक न्युज पसरवणार्या विरुद्द ठोस कारवाई का करत नाहीय ?

अग्निवीर योजने विरुद्ध बराच बवाल बिहार मधला काँ ग्रेसचा मुसलमान नेता बरळला आहे. अग्निवीर् योजना मागे घ्या अन्यथा पुर्ण देश जाळु अस तो म्हणाला

रिपब्लिक भारत,आज तक,आणि बाकी किंचाळून , आरडा ओरड करणारे गोदी मीडिया चॅनेल.
ह्यांच्या विषयी तर रशिया पासून अनेक देशांनी आक्षेप नोंदवला आहे.

प्रसाद_१९८२'s picture

20 Jun 2022 - 12:26 pm | प्रसाद_१९८२

रशिया किस झाड की पत्ती है,
एकदा तुम्ही आक्षेप नोंदवा. दुसर्‍याच क्षणी सर्व चॅनेल बद होतील.

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2022 - 10:42 pm | श्रीगुरुजी

विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे सर्व ५ उमेदवार विजयी. कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत. भाजपने मविआची किमान २० मते फोडली. राज्यसभेपाठोपाठ विधानपरीषदेत मविआला जोरदार दणका.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Jun 2022 - 10:45 pm | अमरेंद्र बाहुबली

फोडाफोडी करणे जमते. पण जनतेचे प्रश्न सोडवणे जमत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2022 - 1:17 am | चंद्रसूर्यकुमार

खिक :)

सुक्या's picture

21 Jun 2022 - 2:36 am | सुक्या

माझ्या माहीतीनुसार महाराष्ट्रात "महा विकास आघाडी" चे सरकार आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.
हे पण भाजपा ने करावे का? का करावे?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 8:50 am | अमरेंद्र बाहुबली

देशपातळीवरचे?

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 9:29 am | श्रीगुरुजी

खिक्क

विजुभाऊ's picture

21 Jun 2022 - 2:52 pm | विजुभाऊ

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्याबद्दल बोलतोय.
राज्यातले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नसते का? की त्यासाठी पण विरोधी पक्षच जबाबदार आहेत.
काही लोकांचे प्रश्न सोडवले हे मान्य.
उदा: दारूवरचे कर कमी केले. हे एक उदाहरणादाखल. तेदेखील कोणीही मागणी केली नसताना

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 7:37 am | श्रीगुरुजी

डबल खिक्क

निनाद's picture

21 Jun 2022 - 4:29 am | निनाद

फडणवीस साडेतीन जिल्ले हिलाली ला नक्की झोपवणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 8:50 am | अमरेंद्र बाहुबली

साडे तिन जिल्ह्याच्या नेत्याला बंगालच्या ननता नी दिल्लीचे केजरीवाल राष्ट्रपती बना म्हणून विनंती करतात. :)
देशाचे पंतप्रधान त्यांना गुरू मानतात. :)

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 9:29 am | श्रीगुरुजी

खिक्क

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 7:40 am | श्रीगुरुजी

भाजपला २८३ पैकी पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली आहेत. कालच्या अनुभवावरून महा विनाश आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 8:48 am | अमरेंद्र बाहुबली

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते. २०१९ ला पहाटे च्या शपथेनंतर कोर्चाने आदेश दिला की हात वर करून मतदान घ्या. नी लगेच दुसर्या दिवशी राजिनामा! खिक्क. :)

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 9:28 am | श्रीगुरुजी

खिक्क

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 9:39 am | श्रीगुरुजी

गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा सर लावून पेटविल्यानंतर ते गाढव जसे दुगाण्या झाडत सैरावैरा धावत सुटतं, तसं काल रात्रीपासून सेनेचं झालंय.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 10:24 am | प्रसाद_१९८२

:))

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2022 - 10:14 am | चंद्रसूर्यकुमार

महाभकास आघाडीच्या सरकारने अगदी उबग आणला आहे- नव्हे कमालीची शिसारी आणि किळस वाटायला लागावी असला प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहेत. एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे. सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी अर्ध्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी '१०५ ना घरी बसवले, १०६ ना घरी बसवले' यापुढे त्यांची गाडी जात नाही. खरं सांगायचं तर या महाभकास आघाडी सरकारने १०५/१०६ ना घरी बसविण्याव्यतिरिक्त आणखी दोनच गोष्टी साध्य केल्या आहेत. पहिली म्हणजे सत्तेला घोरपडीसारखे चिकटून राहिले आणि दुसरी म्हणजे (माझ्यासाठी) सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले.

आपल्या मर्जीतल्या गुलाम आणि लाचार मिडियाला हाताशी धरून मधूनमधून हे आखिल ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असले कसलाही आधार आणि आगापिछा नसलेले सर्व्हे मधूनमधून प्रसिध्द करणे हा डोक्यात जाणारा आणखी एक प्रकार होता. तसेच 'उध्दव ठाकरे कित्ती कित्ती संयत भाषेत बोलतात' ची सगळ्या मोठ्यामोठ्या विचारवंतांनी केलेली हाकाटी हा डोक्यात जाणारा दुसरा प्रकार होता. अशा लोकांनी मागच्या वर्षी राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी केलेले भाषण ऐकले असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे ठरवले असते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती, सरकारची ध्येयधोरणे, यापुढे काय करायचा सरकारचा मानस आहे वगैरे गोष्टींवर बोलणे अपेक्षित असते. यापैकी एकाही गोष्टीचा लवलेश त्यात नव्हता. आणि 'शेतकर्‍यांना खिळे आणि चीनपुढे पळे' असले तद्दन गुडघ्यातले विधान ठाकरेंनी त्यावेळेस केले होते. ते कसले डोंबलाचे संयत भाषेतले बोलणे? सामनामधून दररोजची जी गटारगंगा व्हायची ते काय संयत भाषेत केलेली असायची का? दररोज सकाळी संजय राऊत विकाऊ मिडियासमोर जे कुंथत असतात ते अगदी संयत असते की नाही? एकवेळ ठाकरे परवडले पण हे सगळे विचारवंत अजून जास्त डोक्यात जातात. आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री म्हणून जी पोपटपंची करत असतो त्याला 'वा वा कित्ती कित्ती प्रगल्भ विचार' म्हणून माना डोलावणारी हीच ती घाणेरडी विचारवंतांची जात. त्याचे ते कौतुक बघून जणू काही आदित्य ठाकरे म्हणजे कोणी देवदूत म्हणूनच भूतलावर आला आहे असे वाटायचे कोणाला. एकीकडे हे सगळे विचारवंत मोठे फेमिनिस्ट असतात. पण संजय राठोड या शिवसेनेच्या मंत्र्यामुळे एका तरूणीने नक्की कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली असा आरोप होता त्यावर हे लोक कधी चकार शब्द बोलले आहेत? लाचार मिडिया आणि तितकेच गुलाम विचारवंत लोक हाताशी धरून महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले.

दुसर्‍या महायुध्दात नॉर्वेमध्ये ब्रिटिश नौदलाचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांना सत्ताधारी पक्षातील एक खासदार अ‍ॅमेरी यांनी ब्रिटिश इतिहासातील एक वाक्य सुनावले होते- "You have sat too long here for any good you have been doing. Depart, I say, and let us have done with you. In the name of God, go". सध्या महाराष्ट्रात घातलेल्या धुमाकुळाबद्दल ठाकरे सरकारला आणि त्याच सरकारची तळी उचलणार्‍या विचारवंतांनाही तेच म्हणावेसे वाटते-- In the name of God, go.

असल्या घाणेरड्या सरकारमध्ये अजून राहिल्यास पुढच्या निवडणुकीत लोक जोड्याने बडवतील याची कुणकुण एकनाथ शिंदे आणि समर्थकांना लागली असेलच. काहीही झाले तरी एकनाथ शिंदे हे चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेले जमिनीवरील कार्यकर्ते आहेत. विकाऊ मिडिया काहीही चित्र उभे करत असला तरी सामान्य जनतेत या सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात उभे राहिले आहेत त्यामागचे कारण अगदी सहज समजू शकेल. अर्थातच डोळे उघडे ठेवणार्‍याला. इथे अगदी मिसळपाववर बघितले आहे की काही सदस्य अगदी थेट संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. काही झाले तरी १०५/१०६ ना घरी बसविलेच्या पुढे त्यांचीही गाडी जात नाही. शिवसेनेच्या सत्तेमुळे संबंधित सदस्यांना चार आण्याचाही फायदा झाला असायची शक्यता शून्य. तरीही सततची संज्या राऊतची भाषा तोंडात. यांच्या सत्तेमुळे व्यक्तिशः काडीमात्र फायदा न झालेले समर्थकही असा 'अ‍ॅटिट्यूड' दाखवत असतील तर मग त्या सत्तेचा फायदा होत असलेले आणि त्याहूनही स्वतः सत्तेत बसलेले लोक कितीतरी जास्त माज करत असतील याची कल्पना येऊ शकते. सध्या जो प्रकार महाराष्ट्रात चालू आहे त्यामुळे लोकांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे हे डोळे उघडे ठेवणार्‍या प्रत्येकाला समजू शकेल. पण या अ‍ॅटिट्यूडमुळे डोळ्यावर झापडे आली असतील तर मग जे काही चालू आहे ते दिसणे अशक्य आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 10:31 am | श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार महाराष्ट्राला कधीही मिळाले नव्हते. अत्यंत उर्मटपुणे फुशारक्या मारणे आणि सर्व पोलिसयंत्रणा हाताशी धरून अत्यंत वाईट पद्धतीने दडपशाही करणे यापलिकडे या नालायकांनी अडीच वर्षात काहीही केलेले नाही. कुरमुसे, मदन शर्मा, केतकी चितळे, निखिल भामरे, राणा दांपत्य ही उदाहरणे समोर आहेतच. हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 12:18 pm | अमरेंद्र बाहुबली

हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे. वाट बघा.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 12:28 pm | अमरेंद्र बाहुबली

एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे.
काहीही. ह्या सरकारची स्थापना लोकशाही मार्गाने झालीय म्हणून कोर्टात जाऊनही भाजपेयी तोंडावर पडले. जनादेश पायदळी तूडवून कर्नाटक ना मध्य प्रदेशातील भाजप सरकार स्थापन झालेय.

सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले. केजरीवाल हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे तसेच विकासकामांमूळे दिल्लीतील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. ह्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पंजाब राज्यही जिंकले.

महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले. महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय.
बाकी नेहमीचीच टिका आहें. कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावरून फडणवीस सरकार किती कार्यक्षम होते हे महाराष्ट्र जाणून आहे. आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 2:14 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय.

खिक्क

कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय.

डबल खिक्क

आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.

ट्रिपल खिक्क

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 2:25 pm | अमरेंद्र बाहुबली

मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावर मात्र तूम्ही खिक्क, खुरक्क, खाक्क, फार्रर, फूर्र काहीही केलं नाही. :)

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 2:36 pm | श्रीगुरुजी

आधीच्या तुफान विनोदी दाव्यांवरचं खिक्क थांबलं की मग तुम्हाला जे हवं ते खिक्क, फार्रर, फुर्र वगैरे सगळं करीन. नाक फेंदारून तयार रहा.

विजुभाऊ's picture

21 Jun 2022 - 2:52 pm | विजुभाऊ

पूर्ण सहमत

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 10:23 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात खूप मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळपासून सेनेचे एकनाथ शिंदे व इतर १२ आमदार बेपत्ता असून ते भाड्याच्या विमानातून सुरतला गेल्याच्या बातम्या आहेत. एकनाथ शिंदे सुरतेत २ वाजता पत्रकार परीषद घेणार असल्याच्या बातम्या आहेत. अजून एका बातमीनुसार एकनाथ शिंदेंबरोबर सेनेचे ३० आमदार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे व राजन विचारे हे सुद्धा बेपत्ता आहेत.

पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी सेनेच्या ५५ पैकी किमान ३७ आमदारांनी एकत्र पक्ष सोडला पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने सेनेचे आमदार पक्ष सोडतील असे वाटत नाही. कदाचितकमळ मोहिमेंतर्गत भाजप सेनेच्या काही आमदारांना राजीनामा द्यायला लावून ठाकरे सरकार अल्पमतात आणून स्वत:चे सरकार स्थापन करून या आमदारांना कमळ चिन्हावर पुन्हा निवडून आणण्याची योजना बनवित असावा. मध्यप्रदेश व कर्नाटकात ही योजना यशस्वी झाली होती. परंतु तेथे भाजपची आवश्यकता १० आमदारांपेक्षा कमी असल्याने ती मोहीम यशस्वी झाली. महाराष्ट्रात भाजपला किमान २५ आमदारांची गरज आहे व इतक्या मोठ्या संख्येने सेना किंवा इतर पक्षांचे आमदार राजीनामा देऊन भाजपत सामील होणे अवघड वाटते.

काहीही असले तरी काहीतरी खळबळजनक सुरू आहे किंवा होणार आहे, असे दिसत आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jun 2022 - 10:28 am | माईसाहेब कुरसूंदीकर

(अ)धर्मवीर , मुक्काम पोस्ट सूरत .. अशा मथळ्याचा अग्रलेख संजय राउत्/गिरीश कुबेर टाकण्याची शक्यता दिसतेय. शिन्दे व ११ आमदार सूरतच्या मिरीडियन हॉटेलात मोबाईल फोन्स बंद करून बसले आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 10:50 am | प्रसाद_१९८२

राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी, महाविनाश आघाडीतील पोपटपंची करणार्‍या नेत्यांना चांगलेच लोळविले आहे. एकनाथ शिंदे सध्या सुरत मधे ११ आमदारांसह एका हॉटेल मधे आहेत. व इथे साडेतीन जिल्हे ईलाईची सरकार वाचवण्याकरता कमालीची धडपड सुरु आहे.

sunil kachure's picture

21 Jun 2022 - 12:30 pm | sunil kachure

उत्तर बहु बायकात बडबडला.

आणि युद्धाची वेळ आली की गडबडला.
विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये.

सरकार काही पडणार नाही.
आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 12:43 pm | अमरेंद्र बाहुबली

विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये.
षटकार. एखादं राज्य जिकल्यासारखी बोंबाबोंब चाललीय.
सरकार काही पडणार नाही.
आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.
हे तर महाराष्ट्रातला बच्चाबच्चा जाणतो.

sunil kachure's picture

21 Jun 2022 - 12:41 pm | sunil kachure

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते.
बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते.
बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.

सर ईतकाही घाण अपमान नका करत जाऊ. :)

धावपळ सुरू आहे.

------------
क्याम्रासाठी ट्राईपॉड घेताना दुकानात छान वाटतो तो बाहेर वाऱ्यात उभा राहील का हा विचार करावा लागतो.

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या.
चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला.
तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे.
विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का?
लोकांवर अत्याचार करत आहे का?
राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का?
राज्य घटनेचा अनादर करत आहे का?
हे प्रश्न महत्वचे आहेत.
सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा .
लोक साथ देतील .
केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील.
पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत.
पक्ष सत्ते बाहेर आहे .
अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे..
राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे.
सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे.
पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील.
फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या.
चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला.
तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे.
विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का?
लोकांवर अत्याचार करत आहे का?
राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का?
राज्य घटनेचा अनादर करत आहे का?
हे प्रश्न महत्वचे आहेत.
सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा .
लोक साथ देतील .
केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील.
पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत.
पक्ष सत्ते बाहेर आहे .
अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे..
राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे.
सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे.
पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील.
फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.

समृद्धी महामार्ग योजना आणि त्याची कंत्राटे हे कोणीही ओळखेल.
गोवा महामार्ग रुंदीकरण इतके वर्ष रेंगाळण्याचं कारण कंत्राटदार गट पावरफुल आहे.

असल्या बकवास खेळी मुळे लोक मतदान करणार च नाहीत.
असे पण मतदान करायला लोकांना बिलकुल इंटरेस्ट नाही.
टक्के वारी बघा १००% मतदान कुठेच होत नाही.

इरसाल's picture

21 Jun 2022 - 2:34 pm | इरसाल

काका तिकडं बोंबलायल की भाजपाचे ५ जण गडबड करु जिकले.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 2:45 pm | श्रीगुरुजी

मला वाटतंय की काकांना मध्यावधी निवडणूक हवीये. त्यामुळे ते गुपचुप सरकार पाडण्याचा किंवा ठाकरेंना राजीनामा देऊन नवीन सरकार स्थापन होऊ न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. तसंही फडणवीसांना बहुमताची जुळवाजुळव करणे अवघड आहे. सेनेचे एकगठ्ठा ३८ आमदार फुटले तरच ते पक्षांतरबंदी कायद्यातून वाचतील. आज १०, उद्या ४, परवा २३ असे हप्त्याहप्त्यात आमदार फुटून उपयोग नाही. अर्थात पक्षांतरबंदी कायदा वापरण्याचा अधिकार विधानसभेच्या उपसभापतीला आहे का हे मला माहिती नाही.

पुढील निवडणुकीत सेना व कॉंग्रेसची पूर्ण वाट लागणार आहे. सेना व भाजप वेगळे लढतील. परंतु आपल्या मदतीसाठी काका कॉंग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढतील. सध्याची परिस्थिती काकांसाठी विन विन सिच्युएशन आहे.

sunil kachure's picture

21 Jun 2022 - 2:55 pm | sunil kachure

ह्या राज्याचे हीत,मराठी लोकांचे हीत हे सर्वात वरती आहे..
सरकार राहो नाही तर जावो..
पण ह्या राज्याच्या मातीत ज्या लोकांनाच देह पोसला आहे ..त्यांनी मराठी माती शी आणि मराठी लोकांशी बेइमानी करू नये
खास करून bjp walya लोकांसाठी.
फालतू देश हीत राज्याच्या लोकांना भिकेला लावेल.
ह्याचे भान ठेवा

एकच पक्ष येणे कठीण आणि स्थानिक पक्षांची मदत घेऊन युती करावी लागणार. मग मध्यावधीमध्ये खर्च करूनही पुन्हा काय वेगळे चित्र येणार?

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 5:18 pm | प्रसाद_१९८२

सध्याच्या घडामोडी पाहाता, भाजपा पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असेच दिसते.

डँबिस००७'s picture

21 Jun 2022 - 5:23 pm | डँबिस००७

सध्याच्या घडामोडी पाहाता, भाजपा पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असेच दिसते.

जर ह्या "कांडा" च्या मागे भाजपा असेल तर नक्कीच तोंडावर आपटणार. पण भाजपा असा हरणारा खेळ का खेळेल ?

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 5:30 pm | श्रीगुरुजी

सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात दोन गट, मतभेद, एकमेकांविषयी संशय निर्माण करणे, हे दोन्ही पक्ष आतून पोखरून दुर्बल करणे हे उद्दिष्ट असावे.

राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे असा अहवाल राज्यपाल केंद्रीय गृहखात्याला पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणून काही काळाने नवीन सरकारची जुळवाजुळव करणे किंवा सेना, कॉंग्रेस या पक्षातील फुटीचा फायदा घेण्यासाठी मध्यावधी निवडणूक घेणे हे उद्दिष्ट सुद्धा असू शकते.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 5:35 pm | प्रसाद_१९८२

२०१९ मधे भाजपा असाच उतावळा खेळ खेळली होती व त्याचे परिणाम आपण पाहिलेच होते. एकनाथ शिंदेचे माहित नाही, मात्र त्यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांच्या बरोबर कितीकाळ राहातात हा प्रश्न आहे. अजित पवारांबरोबर फुटलेले आमदार एक दिवस ही टिकले नव्हते.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 5:41 pm | श्रीगुरुजी

राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी अजित पवारांना काकांनीच पाठवून फडणवीसांना लालूच दाखविली होती. शपथविधी झाल्यानंतर अजित पवार मंत्रालयाकडे फिरकलेच नव्हते. ते घरी जाऊन पुढील सूचनांची वाट पहात ३ दिवस स्वस्थ बसून होते. पुढील ३ दिवसात काकांनी सोनिया गांधींचे मन वळवून सेना-राष्ट्रवादी सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळवून आपले उद्दिष्ट साध्य केले. बिच्चाऱ्या फडणवीसांना धूर्त काकांचे डावपेच समजलेच नाहीत.

कंजूस's picture

21 Jun 2022 - 5:37 pm | कंजूस

एवढेच आत अधोरेखित झाले आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2022 - 5:44 pm | श्रीगुरुजी

सेना भूतकाळात अनेकदा फुटली आहे. पूर्वी बंडू शिंगरे व माधवराव देशपांडे फुटले, नंतर भुजबळांसहीत १८ आमदार फुटले, नंतर राणे, नंतर राज ठाकरे, दरम्यानच्या काळात गणेश नाईक, भास्कर जाधव, विनायक निम्हण, प्रकाश परांजपे, संजय निरूपम वगैरे फुटले होते.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 5:46 pm | प्रसाद_१९८२

"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा फडणवीस मुख्यमंत्री होण्याऐवजी तूच मुख्यमंत्री हो, मी राजीनामा देतो" अशी ऑफर एकनाथ शिंदेना देऊन जनतेच्या नजरेत सहानभुती मिळवायची एक चांगली संधी, उद्धव ठाकरेंकडे चालून आली आहे, अर्थात ते या संधीचा फायदा घेतात की उर्मटपणे शिंदेवर कारवाई करतात ते आता पाहायचे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jun 2022 - 6:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुख्यमंत्री होता येत नाही म्हणून पक्ष सोडला हे संभवत नाही. शिवसेना ही काँग्रेस्/भाजपा नाही तर घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ह्यांना उघडपणेआव्हान कोणी देणार नाही.
जे काही वाचायला मिळतेय त्यावरुन असे दिसतेय की उद्धव आमदारांना भेटण्यास्/त्यांनी मांडलेले प्रश्न ऐकुन घेण्यास फार वेळ देत नसत. मंत्र्यानादेखील भेटण्यास उद्धव जात वेळ देत नाहीत अशी तक्रार आहे. एकनाथ शिंदे ह्यांचा पुत्र श्रीकांत खासदार आहे. तो ठाणे/कल्याण मतदारसंघात खूप लोकप्रिय आहे. त्याला वेसण घालण्यासाठी उद्धव/ईतर सेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत घेतली असाही आरोप आहे.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jun 2022 - 6:37 pm | प्रसाद_१९८२

एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर सर्वात जास्त अडचण मविआच्या पाळीव पत्रकार व विचारवंताची झाली आहे. मविआ सरकार पडल्यास दररोज मिळणारे 'पाकिट' बंद होईल या भितीने एकनाथ शिंदेना शिवसनेने कसे भरभरुन दिले, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कसे प्रभावी आहे, शिंदेच्या कोणत्याही प्रस्तावाला ठाकरे अजिबात भिक घालणार नाहीत वगैरे वगैरे सांगण्याची पाळीव पत्रकार व विचारवंतात सध्या चढाओढ लागली आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jun 2022 - 6:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पाकिटापेक्षाही अग्रलेखातून जगाला/मोदी/शहाना उपदेश कसे करायचे ह्याचीही चिंता असणार. शिंदे ह्यांनी माघार घेतली तर बुद्धीजीवी संपादक आनंदाने बेहोश होतील, उद्धव्/राउत ह्यांचे महिनाभर कौतुक होईल.

कंजूस's picture

21 Jun 2022 - 7:35 pm | कंजूस

एवढा विरोध करायची ताकद आली कुठून?
कॉन्ग्रेसही बाहेर पडणार मविआतून असं दिसतंय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jun 2022 - 7:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बहुदा राष्ट्र्वादी बाहेर पडेल. गुजराती चॅनेल्सवर "सूरतमधील हॉटेलात आहे शिंदे ह्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक मोठा नेता आहे" अशी बातमी होती. संध्याकाळी हा नेता शिंदे ह्यांची गाठ अमित शहा/नड्डा ह्यांच्याशी घालून देणार आहे अशी बातमी होती.

बाकी सूरतचे चांगले पदार्थ - सुतरफेणी आणि घारी. दादरलाही मिळते. मधुर स्वीट्स जुन्या अगरवाल क्लासच्या इमारतीजवळ.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jun 2022 - 11:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तो पंजाबी चंदू हलवाई कराचीवालाही एकेकाळी प्रसिद्ध होता. खोदादाद सर्कलला.असो.
शिंदे ह्यांच्यासोबत ३० हुन अधिक आमदार आहेत. शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे. ही अर्थात अमान्य होईल. मग काय? शिंदे वेगळा पक्ष काढणार? की भाजपात सामील होणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jun 2022 - 11:10 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे अशी काहीबाही मागणी त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठून कळलं माई?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jun 2022 - 12:09 am | माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.youtube.com/watch?v=sH103_0kK7Y
https://www.youtube.com/watch?v=p1zMu32HBM0
https://www.news18.com/news/politics/im-with-hindutva-will-not-return-to...
"मी हिंदुत्वाबरोबर आहे. मी शिवसेनेत जाणार नाही".
हिंदुत्व वगैरेच्या गप्पा मीडियात ठीक. पण सेना सोडण्याची कारणे जी काही माहित झाली-
१)राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे शिंदे व त्यांच्या खासदार पुत्राचे ठाण्यात पंख कापण्याचे उद्योग उद्धव व सेनेचे काही नेते करत होते.
२)गेल्या वर्षभराहुन अधिक काळ उद्धव व शिंदे ह्यांत धूसपुस चालू होती(https://www.lokmattimes.com/maharashtra/thackeray-memorial-how-come-mmrd...)

कानडाऊ योगेशु's picture

21 Jun 2022 - 11:38 pm | कानडाऊ योगेशु

अजित पवारांना पुढे करुन पहाटेचा शपथविधीसारखा करण्यासारखा प्रकार वाटतोय. होणार काही नाही पण देवेंद्र फडणवीस व पर्यायाने भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल. पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत.

चौकस२१२'s picture

22 Jun 2022 - 10:31 am | चौकस२१२

भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल.
पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत.

१००%

गामा पैलवान's picture

21 Jun 2022 - 11:39 pm | गामा पैलवान

मला वाटतं की सरकार पडायची ही संधी उठांनी आजीबात सोडू नये. खुशाल विरोधात बसावं आणि २०२४ ला दणकून मैदान मारावं. मध्ये एकनाथ शिंदेसारखा मोहरा बळी पडला याचं दु:ख आहे.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 10:43 am | श्रीगुरुजी

मैदान विसरा आता. घरात बसून मैदान मारता येत नाही. पूर्वी भुजबळ ५२ पैकी १८ आमदार घेऊन बाहेर पढले होते. आता ५५ पैकी जवळपास ३५ आमदार फुटलेले दिसतात. कदाचित जास्तच असतील. किमान ३७ आमदार असतील तर शिंदे गटालाच शिवसेना अशी मान्यता मिळून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळेल किंवा हे पक्षचिन्ह गोठवले जाईल. खरं तर २०१९ च्या निवडणुकीतच सेना संपलेली दिसली असती. परंतु फडणवीसांनी पुन्हा एकदा सेनेशी युती करण्याची गंभीर घोडचूक करून सेनेचे आमदार निवडून आणून सेनेला प्राणवायू पुरविला. पुढील निवडणुकीत एकट्याने लढून सेना संपली यावर मोहोर लागली असती. पण ती वेळ अडीच वर्षे अलिकडेच आली असे निदान आजतरी चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासंबंधित सर्व निर्णय यापुढे मोदी-शहांनी एकट्याने घ्यावे. निर्णयप्रक्रियेत फडणवीस/चंपा यांना सहभागी केले महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटेल हे नक्की.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 11:18 am | चंद्रसूर्यकुमार

१९९५ मध्ये चंद्रबाबू नायडूंनी आपले सासरे एन.टी.रामारावांविरोधात बंड केले. त्यावेळी तेलुगू देसम पक्षाचे बरेचसे आमदार चंद्रबाबूंबरोबर आले आणि रामाराव राजकारणातून बाहेर फेकले गेले. सध्या एकनाथ शिंदेंबरोबर ३५-४० आमदार आहेत असे दिसते. जर त्यांचे पारडे जड आहे असे चित्र उभे राहिले तर इतर काही आमदारही त्यांच्याबरोबर जाऊन उधोजींना हद्दपार करू शकतील आणि १९९५ मध्ये आंध्रमध्ये झाले ते २०२२ मध्ये महाराष्ट्रात होऊ शकेल.

एकनाथ शिंदे चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळाविरोधात जनतेत मोठा संताप आहे हे त्यांच्यासारख्या जमिनीवरील कार्यकर्त्याला अधिक चांगल्या पध्दतीला समजू शकेल. स्वतः ठाकरे आणि ते ज्या संजय राऊतांच्या पूर्ण कह्यात गेले आहेत त्यांनीही एकदाही कधी निवडणुक लढवलेली नाही. त्यांच्या सगळ्या फुशारक्या चालू आहेत या निवडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर. शिवसेनेतील जमिनीवरील कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या मनमानीविरोधात असंतोष वाढला तर त्यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

एकंदरीत या सगळ्या नाट्याचे पुढे काय होईल हे सांगता येत नसले तरी ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 2:32 pm | श्रीगुरुजी

ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.

अगदी हेच म्हणतो. थोडीशी भर टाकून सांगतो की भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 2:52 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये. सत्तेसाठी मेहबूबा बरोबर जानारे राष्ट्रवादी सोबत गेल्यावर प्राॅब्लेम काय?

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 2:58 pm | श्रीगुरुजी

अज्ञानी प्रतिसादामुळे खिक्क खिक्क खिक्क . . .

कोणताही राजकीय पक्ष असू ध्या ..त्या मध्ये bjp pan आहे.
Bjp काही मोठ्या नीतिमान पक्ष नाही..
मेहबूबा पण मेहबूब वाटली होती bjp ल.

BJP एकटी लढली आणि हवे तेवढे आमदार निवडून आले नाहीत तर bjp नी काँग्रेस शी युती केली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही...सेने बरोबर तर आता पण bjp युती करेल..
राष्ट्रवादी बरोबर चार तासाचे सरकार bjp नी बनवले होते ना.

प्रदीप's picture

22 Jun 2022 - 11:26 am | प्रदीप

महाराष्ट्रांतील भाजप ज्या तर्‍हेने हे सर्व प्रकरण हाताळते आहे, त्यांतून त्यांची येनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याची हतबलता दिसून येत आहे. गेल्या निवडणूकांपासूनच त्यांनी राश्ट्रवादी इत्यादी पक्षांतून बाजारबुणग्यांची भरती स्वपक्षांत केली, त्यांतून काय निष्पन्न झाले? ह्या पक्षाचे बळ त्यांच्या पक्षाची जी काही विचारसरणी आहे, त्याच्याशी अंतर्बाह्य एकरूप होऊन कार्य करणारे कार्यकर्ते होते. ह्या नव्या खोगीरभरतीमुळे त्याचे कार्य व प्रतिमा अतिशय डागाळलेली झाली आहे, व होत रहाणार आहे.

आता हे जे काही तथाकथित फुटीर सेना आमदार- खासदार आहेत, ते भाजपांत दाखल होवोत अथवा स्वत:च सेनेचा झेंडा हाती घेवोत. त्यांच्याशी मिळवून घेणे ह्यापुढे भाजपाला भाग आहे. ह्यांपैकी किमान एका तरी आमदारावर ई.डी. ची केस सुरू आहे. ती आता गुलद्स्त्यांत ठेवावी लागेल.

श्रीगुरुजी येथे अनेकदा, ह्या सर्वासाठी फडणवीसांना(च) दोषी ठरवतात. फडणवीस हे सगळे पुढे राहून, प्रत्यक्ष धोरणे आखून वगैरे घडवून आणत असले, तरी भाजपच्या शीर्षनेत्यांचे, प्रत्येक पाऊलावर, शिक्कामोर्तब असणारच, ह्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

ह्यावरून भाऊ तोरसेकर काही वर्षांपूर्वी म्हणाले होते ते आठवले. 'सुमारे तीस- चाळीस वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजप, आताच्या कॉंग्रेससारखाच भ्रष्ट व कसलाही विधीविशेष नसलेला पक्ष होईल, असे त्यांचे अनुमान होते. मला हे पटते आहे-- पण एका फरकाने. कॉंग्रेसने सध्या ते जे काही आहेत तिथवर येण्यास ६०+ वर्षे घेतली. कारण सुरूवातीच्या तीसेक वर्षांत देशांत आयुष्य सुस्त होते, मीडिया संपूर्णपणे मूठभर संस्था व व्यक्तिंच्या ताब्यांत होती. माहितीचे प्रसारण बर्‍याच धीम्या गतीने होत होते, किंवा तेही होत नव्हतेच. आता सोशल मीडिया व वेब बेस्ड मीदिया पोर्टल्समुळे माहिती प्रसारण, वितरण इत्यादी आमूर्लाग्र बदलले आहे. तेव्हा भाजपचा र्‍हास झपाट्याने होईल. सुमारे २०३५- ४० च्या दरम्यान ती सत्तेबाहेर फेकली जाईल. म्हणजे सत्तेत आल्यानंतर जेमतेम ३० वर्षांनी.

रात्रीचे चांदणे's picture

22 Jun 2022 - 12:02 pm | रात्रीचे चांदणे

हो पण सेना आमदार स्वतःहुन फुटत असतील तर भाजपाने फायदा का नको करून घायला? शेवटी सत्ता पण महत्वाची आहेच की. काल पर्यंत तरी भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 12:41 pm | शाम भागवत

भाजपाने राजकारणासाठी इतर पक्षातून काही अयोग्य माणसे घेतली तरी त्या माणसांनी भाजपात येऊन नव्याने खाबूगिरी केली का हेही पहावे लागते. नंबरांचे गणित जुळवण्यासाठी "खाने नही दूंगा" या अटीवर अयोग्य माणसांना पक्षात घ्यायला काय हरकत आहे? अशा प्रकारची ती विचारसरणी वाटते. त्यांची टक्केवारी एकूणात २-४ टक्के असल्याने बिघडत नसावे.

२०१४ साली भाजपाने अशी काही माणसे घेतली तरी त्यांनी नव्याने भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याअगोदर जे केले ते माफ करतो पण यापुढे नव्याने काही केले तर क्षमा नाही, हा व्यवहारी दृष्टिकोन ठेऊन राजकारण करणे सध्याच्या काळात आवश्यक झाले असावे.
खरेतर मला हा विचार पसंत नसला तरी सध्याच्या काळात ह्या विचारावर राजकारणे करणे ही स्वच्छ माणसांची अगतिकता असावी.

याच विचारावर आधारित चंद्रकांत दादा काल म्हणाले असावे की, "भाजप म्हणजे भजनी मंडळ नाही." :)

प्रदीप's picture

22 Jun 2022 - 1:51 pm | प्रदीप

रात्रीचे चांदणे व शाम भगवत, भाजपची आपण दोघांनी सांगितलेली अगतिकता समजण्यासारखी आहे. ह्या व तत्सम सिच्युएशन्सचे मूळ आपल्या लोकशाहीमधे आहे.

वास्तविक, लोकशाही राबवण्यास जी परिपक्वता लागते, ती आपल्याकडे तसेच, खरे तर आशियातील कुठल्याही देशांत नाही. त्यामुळे एकतर राजकीय पक्षांना कोलांट्याउड्या माराव्या लागतात, अथवा जातीपातीचे राजकारण करावे लागते-- किवा इतर काही आशियाई देशांत झाल्याप्रमाणे सैन्याने देशाच्या राज्यशकठहाठीचा ताबा घेणे व गव्हर्नन्स सुरळीत ठेवणे, हे करावे लागते (ही माझी गेल्या काही वर्षांपूर्वी, माझ्या निरीक्षणावरून, व माझ्या कुवतीनुसार केलेली थेयरी आहे). ह्याबद्दल येथे काही लिहीत नाही, कारण ते अवांतर होईल.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 3:16 pm | शाम भागवत

तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप अमेरिकेशी तुलना करता भारतातील लोकशाही नविन आहे. अविकसीतपणा, निरक्षरता हे जास्तीचे मुद्दे आहेतच.
त्यामुळे जो पक्ष देशाचे जास्तीत जास्त भले करू शकेल किंवा कमीत कमी नुकसान करू शकेल, कमीत कमी भ्रष्टाचार करेल अशा पक्षाला निवडून देणे एवढेच विचारी व सुसंकृत माणसाला सध्याच्या स्थितीत शक्य आहे.
आपल्याला चांगला पक्ष निवडायचा नाही आहे तर कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा आहे. ;)

सौन्दर्य's picture

22 Jun 2022 - 10:51 pm | सौन्दर्य

"कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा आहे." - प्रचंड सहमत

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 11:05 pm | श्रीगुरुजी

मला कमीत कमी वाईट पक्षातला कमीत कमी वाईट नेता चालेल.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 12:00 am | श्रीगुरुजी

एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या बंडातून फारसे काही साध्य झाल्याचे अजूनतरी दिसत नाही.

विक्रांत जोशी नावाच्या पत्रकाराचे भाकित आहे की आज रात्री अनिल परबांना अटक होईल व उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jun 2022 - 12:12 am | माईसाहेब कुरसूंदीकर

त्या विक्रांतचे अनेक अंदाज चुकले आहेत. ई.डी./सी बी आय्/आय बी/कॅबिनेट सचिव रोज ह्याला अपडेट देत असावेत असे त्याच्या बोलण्यावरुन अनेकदा जाणवते.

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 12:15 am | sunil kachure

एकनाथ शिंदे नी बंड केले असेल तर सत्य स्वीकारा ..
ठाकरे नी स्वतः राजीनामा द्यावा..आणि आपल्या पक्षातील सर्व आमदार cha राजीनामा घ्याबा.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल आव्हान करावे त्यांनी पण सर्व आमदार cha राजीनामा घ्यावा..
विरोधी पक्ष च नसलेले भारताच्या इतिहासात कधीच जे घडले नाही ते घडू ध्या.
महाराष्ट्रात फक्त सरकार पण विरोधी पक्ष नाही.
जो काही गोंधळ घालायचा आहे तो त्यांना
घालू ध्या.
सत्य स्वीकारणे हेच शहाणपण.

आला आहे.
हातातल्या फायलीऐवजी डिजिटल डायरी खिशात ठेवणे बरे नाही का? एडिटिंग सोपे पडेल.
गजराचे घड्याळही हातावर मनगटावर बांधता येत नाही. 'मी' बँड? नोटिफिकेशनस पाहायला सोपे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jun 2022 - 9:09 am | माईसाहेब कुरसूंदीकर

शिंदे आणी कंपनी आता सूरतहून गुवाहाटीला पोचली आहे. शिंदे ह्यांच्याबरोबर ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. हे खरे असेल तर उद्धव पक्ष सांभाळण्यात सपशेल अपयशी ठरले असे म्हणावे लागेल. हे सगळे आमदार काही सत्ता हवी/पैसा हवा म्हणून बंड करत आहेत असे कोणाला वाटत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहे असे म्हणावे लागेल.
नऊ वाजुन गेले आहेत अजूनही शेरो शायरी करणार्या संजय राउत ह्यांचा पत्ता नाही.

त्यांना दिलेली भूमिका त्यांनी उत्तम वठवली आहे. ते काम आता झालंय.
आता दिग्दर्शक आणि निर्माते नवी पात्रे आणतील.

( बाकी हल्ली मराठी मालिका पहात नाही का तुम्ही? :))

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 12:16 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
शिंदेंबरोबर १० ते १५ आमदार असते तर हे बंडं म्हटले गेले असते. मध्यावधी लावायची असेल तर अशी काहीतरी खेळी खेळणे भाग असते.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 12:26 pm | शाम भागवत

शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस अशा युतीत राहून परत निवडून येणे अवघड आहे व आपल्याला राजकारणाचे दुकान कायमचे बंद व्हायची शक्यता आहे हे जाणवल्यामुळे शिंदेसाहेबांनी बाहेर पडायचे ठरवले असावे. नगरसेवकांकडून ही भिती आमदारांकडे व्यक्त केली गेली असावी व त्यातून नाईलाजाने ही खेळी खेळली गेली असावी.

अमोल निकस's picture

22 Jun 2022 - 9:10 am | अमोल निकस

मिसळपाव समूहाचा whtsapp Group आहे का?

कंजूस's picture

22 Jun 2022 - 9:16 am | कंजूस

पण गुप्तपणे असेल.

निनाद's picture

22 Jun 2022 - 9:50 am | निनाद

आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2022 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव समूहाचा कोणताही अधिकृत गुप नाही. पण, मिपाचे लोक असलेले अनेक समुह आहेत.

-दिलीप बिरुटे

अमोल निकस's picture

22 Jun 2022 - 7:32 pm | अमोल निकस

क्रुपया सहभागी करून घ्यावे. ९६८९१०२३३८

हवा म्हणून बंड करत आहेत असे कोणाला वाटत असेल तर. . .

त्यासाठीच चालले आहे. प्रत्येकाची आडून सरकारी कंत्राटे आहेत बहुतेक.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 9:20 am | चंद्रसूर्यकुमार

काल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांची घोषणा केली. सत्ताधारी पक्षाकडून झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री/परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा हे उमेदवार असतील.

द्रौपदी मुर्मूंचे नाव मागच्या वेळेसही चर्चेत होते. पण त्यांना मागच्या वेळेस उमेदवारी न देता मोदींनी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आणले होते. तसेच मागच्या वेळेस सत्ताधारी पक्षाने कोविंद यांचे नाव पुढे आणल्यावर विरोधी बाजूकडून आधी चर्चेत असलेली गोपाळकृष्ण गांधी वगैरे नावे मागे पडून मीरा कुमार हे नाव पुढे आणले गेले. यावेळेस मात्र सत्ताधारी गोटातून उमेदवाराच्या नावाची घोषणा आधी केली गेली नाही. विरोधी पक्षांकडून दुपारी यशवंत सिन्हांचे नाव आले तर रात्री ८ च्या सुमारास सत्ताधारी पक्षाकडून द्रौपदी मुर्मूंच्या नावाची घोषणा झाली.

मुळच्या ओरिसाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू वनवासी समाजातील (tribal) आहेत. आपल्याच राज्यातील स्त्री उमेदवाराला विरोध करणे नवीन पटनायक यांना शक्य होईल असे वाटत नाही. त्याप्रमाणेच झारखंडमधूनही त्यांच्या नावाला समर्थन मिळू शकेल. झारखंड मुक्ती मोर्चाला त्याच tribal समाजातून मोठे समर्थन असल्याने त्या समाजातील उमेदवाराला विरोध कदाचित त्यांच्याकडूनही व्हायचा नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मूंची वाट सोपी दिसते.

या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत बिचुकलेंचा पत्ता परत एकदा कापला गेला याचे वाईट वाटते :)

विजुभाऊ's picture

22 Jun 2022 - 12:01 pm | विजुभाऊ

या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत बिचुकलेंचा पत्ता परत एकदा कापला गेला याचे वाईट वाटते :)

याबद्दल बिचुकलेला सुद्धा वाईट वाटले नसेल

चंद्रसूर्यकुमार's picture

22 Jun 2022 - 12:05 pm | चंद्रसूर्यकुमार

:) :)

उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर ताबा नाही आणि निव्वळ फोटोला थोबाड आणि हाराला गळा म्हणून हे नेते होते. त्यांत बाजूला चमचे मंडळींचा घोळका आणि राऊत सारखे वाचाब्रहस्पती. शिवसेनेचे ४० आमदार महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये क्या पोचतात आणि उधोजींना साधी बातमी सुद्धा लागत नाही ? ह्या संत्र्याना पोलीस संरक्षण नव्हते ? महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा जी ह्याच्या साठी वसुलीचे काम करते त्यांना सुद्धा वित्तमंबातमी लागली नाही ?

पुढे काय होईल ठाऊक नाही पण उधोजीने शिंदे ह्यांच्या पुढे नाक घासले तर शिवसेनेवरची त्यांची पकड कायमची निघून जाईल. शिवसेनेचे खरे नेते शिंदे असून उधोजी फक्त उत्सवमूर्ती आहेत असे जनतेला सुद्धा कळून चुकेल. मग पैश्यांच्या बॅगा मातोश्रीवर पोचणार नाहीत तर शिंदे ह्यांच्या घरी जातील.

पुत्रमोह आणि सत्ता मोह कसा लोकांना खाली खेचतो ह्याचे उत्तम उदाहरण ठाकरे परिवार आणि शिळीसेना आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Jun 2022 - 12:27 pm | अमरेंद्र बाहुबली

शिळीसेना, पैशांच्या बॅगा मातोश्रीवर.
संपादर मंडळ हे वाचतंय की नाही?? भाजप विरोधी आयडींवर त्वरीत कारवाई होते.

रात्रीचे चांदणे's picture

22 Jun 2022 - 12:31 pm | रात्रीचे चांदणे

कचुरे साहेब तर आहेत की अजून मिपावर, कुठं झाली कारवाई

चौकस२१२'s picture

22 Jun 2022 - 10:30 am | चौकस२१२

या सगळ्यात भाजप परत तोंडावर पडणार अशी मला दाट शंका आहे .. आणि परत राष्ट्रवादी मृतदेहाचं टाळू वरचे लोणी खाणारं
भाजप काही शिकली असले तर नवीन निडवणुकांची मागणी करेल तर इज्जत राहील
भाजपचं समर्थांकी खुश जरूर व्हावे पण सबुरीने ...

सेने बद्दल बोलायचे तर जसे काँग्रेस मध्ये काँग्रेस चाय कार्यकर्त्यांना नेहरू कुटुंबाशिवाय कोणी दुसरे केहाळत नाही तसेच सेनचं "कट्टर" कार्यकर्त्यांना ठाकरेंचं ठारच लागतात सेनेत मुळातच अंतर्गत लोकशाही नसल्यमुळे हे होणारच
जसे पुतण्यांचे पहाटेचं बंडाळी नंतर सुद्धा परत राष्ट्रवादी मध्ये स्वागत केले गेले तसे एकनाथशिंदेंचं परत स्वागत होणार सेनेत असे वाटते पण दुसरे मन म्हणते कि त्यांचा भुजबळ / राणे हे जसे गद्दार ठरेल तसे शिंदे गद्दार होणार

असो एकूण " परिपकव लोकशाहीत सर्वच पक्ष असे शेण खातात.. लाज वाटली पाहिजे आमदारांना हॉटेलात काय / नेले जाते / चार्टर विमान काय !

असा ऐकलंय कि ५ तारांकित हॉटेल नवे पॅकेजेस काढतात -- गटबाधान प्याकेज .... मज्जा आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2022 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेनेला खिंडार पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा थोरा-मोठ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आज एकनाथ शिंदे. आज जरी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी सैनिक आहोत असे म्हणत असले तरी खिंडार पडले ते पड्लेच आहे. शिंदेसमर्थक आमदार भाजपाला पाठींबा देऊन भाजपाचे सरकार आणत असतील तर त्यांचे सरकार आघाडी येऊ देतील असे वाटते. अडीच वर्षानंतर आघाडीलाच त्याचा फायदा होईल, अर्थात ही शक्यता. आघाडीचं सरकार बनले त्या प्रत्येक दिवसापासून भाजपा महाआघाडीत फूट होईल याची वाट पाहात होते. दोन प्रयत्नानंतर शिंदे गटाच्या निमित्ताने भाजपाने उद्धव ठाकरे यांची खुर्ची अस्थिर केली आहे. भाजपा सत्ता स्थापन करेल असा दावा अजून तरी कोणी केला नाही. आणि करीत असेल तर महाविकास आघाडी ते करु देईल कारण आघाडीला याचा फायदा होईल असे वाटते. अर्थात राजकारणात निश्चित काहीच सांगता येत नाही. सत्ता टीकविण्याची महाआघाडी प्रयत्न करतील. हा खेळ आकड्याचा.

शिंदे गटाने आमचीच मूळ सेना आहे, असे म्हणून कोणालाही पाठींबा न देता तटस्थपणे राहतील असे काही वाटत नाही. भाजपा-सेनेचा संसार असतांना भाजपाने शिवसेनेचा कायम अपमान केला. त्या शिवसेनेतील निष्ठावंतांनी भाजपाचा हिशेब चुकता करायचा असा विडा उचलला आणि शिवसेनेने त्यांचा बदला घेतला. कायम भाजपा युतीत शिवसेनेचा जो अपमान भाजपा करीत होती. त्याचा बदला शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर संसार सुरु करुन घेतला, ते योग्य होते नव्हते. तो वेगळा विषय पण भाजपाला धडा दिला. कधीना कधी हा महाविकास आघाडीचा संसार मोडेल याची दरदिवशी भाजपा वाट पाहातच होती. मला वाटतं तो दिवस जवळ आला आहे. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही. आता थेट संधी मिळत आहे.

बाकी, इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. महाराष्ट्रात इतिहासाच्या राजकारणात १९७७ मधे महाराष्ट्रात जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या, पण त्या काही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नव्हत्या. कारण चव्हाण-रेड्डी काँग्रेसला ६९ आणि इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले. या सरकारमध्ये रेड्डी-चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री (वसंतदादा पाटील) आणि इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री (नासिकराव तिरपुडे) बनले. महाराष्ट्रात दोन पक्ष एकत्र येत आघाडी करून सरकार स्थापन करणं आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनवणं, या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच यावेळी घडल्या. वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात 'समांतर काँग्रेस' असा नवा गट स्थापन केला. या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले. पुढे पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि पुढे राष्ट्रपतीच्या शिफ़ारशीनंतर सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

मला वाटतं, महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसेच चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतला गोंधळ संपला नाही. भाजपाला सरकार स्थापन करता आले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. अर्थात ही सगळी मतं-मतांतरे, राजकारणात आणि क्रिकेटखेळामधे निश्चित काहीच सांगता येत नाही. काय घडते ते पाहात राहु या.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

22 Jun 2022 - 5:54 pm | कानडाऊ योगेशु

या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले.
हाच तो प्रसंग का ज्यामुळे काका बदनाम झाले?

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 6:07 pm | श्रीगुरुजी

हा पहिलाच प्रसंग. नंतर अनेक वेळा खंजीर खुपसण्याचे प्रसंग घडले. आता तर पवार म्हणजेच विश्वासघात असं नातं तयार झालंय.

प्रसाद_१९८२'s picture

22 Jun 2022 - 10:32 am | प्रसाद_१९८२

बाकी शिवसेनेचे ठिक आहे, मात्र तो बच्चू कडू काय करतोय तिथे. तो विरोधक आहे ना भाजपाचा.

श्रीगुरुजी's picture

22 Jun 2022 - 10:46 am | श्रीगुरुजी

दोन वेगवेगळ्या फौजदारी खटल्यात तुरूंगवासाची शिक्षा मिळालेला बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये.

Bhakti's picture

22 Jun 2022 - 10:54 am | Bhakti

+११

प्रसाद_१९८२'s picture

22 Jun 2022 - 11:46 am | प्रसाद_१९८२

बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये.
--
सहमत !
मात्र सत्तेसाठी भाजपा काहीही करु शकतो.

डँबिस००७'s picture

22 Jun 2022 - 10:34 am | डँबिस००७

100% सहमत !!

आता सरकार पडेल . बंड केलेले त्या मध्ये यशस्वी होतील.
पण पुढे काय?स्वतः निवडून येण्याची ताकत ह्या बंडखोर पैकी किती लोकात आहे.
Bjp काही ह्यांना गरज संपल्यावर जास्त किँमत देणार नाही.

खरे तर राज ठाकरे नी बाळा साहेब ची जागा चालवायला हवी होती..
उद्धव ठाकरे मवाळ स्वभावाचे आहेत आणि शिवसेनेची ती ओळख नाही .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2022 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज ठाकरे नी बाळा साहेब ची जागा चालवायला हवी होती..
उद्धव ठाकरे मवाळ स्वभावाचे आहेत आणि शिवसेनेची ती ओळख नाही .

१००० ट्क्के सहमत.

-दिलीप बिरुटे

बाळासाहेबांची शिवसेना आहे ती. उद्धव आणि आदित्य त्यांच्या स्वबळावर पुढे येतात , घराणेशाहीवर नाही ते सर्वांना माहिती आहे.

राज्यपाल कोश्यारींना करोना झालाय अशी एक बातमी आहे.
गोव्याचे राज्यपाल प्रभारी राज्यपाल म्हणून काम करतील अशी शक्यता बोलली जातेय

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jun 2022 - 11:04 am | ज्ञानोबाचे पैजार

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल, आणि अडिच वर्षे सत्ता चालवेल, अशी शक्यता नाही का?

तसेही विधानपरिषदेचे निकाल आल्या नंतर फडणविस म्हणाले होते "आमचा लढा जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही"

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2022 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल, आणि अडिच वर्षे सत्ता चालवेल, अशी शक्यता नाही का?

अगदी. आता तसेही दोघांचेही ब्लडगृप एकच निघाले आहे, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे. पण भाजपा केंद्रीय नेतृत्वास मान्य होणारा पर्याय नाही. आपण एवढी मरमर केली आणि आपला मुख्यमंत्री होणार नसेल तर त्यास केंद्रीय नेतृत्व मान्यता देणार नाही. पण मुख्यमंत्री शिंदे झाले तर, काठावर असलेले शिवसेनेचे आमदार शिंदे गटाला मिळतील.

अवांतर : बाकी. ४ कि.मी अंतर पावसात शिंदेंच्या तावडीतून निसटलेल्या आमदाराने सांगितली आपबिती.
अजून सुरस चमत्कारिक गोष्टींसाठी वाचत राहा. सबसे आगे, सबसे तेज. मिपा. ;)

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 1:12 pm | शाम भागवत

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल,

असला प्रकार राहूल गांधी यांनी कर्नाटकात केला होता.
मोदी-शहा हे राहूल गांधी एवढेच हुषार असतील तर तसे ही होईल. :)

sunil kachure's picture

22 Jun 2022 - 11:16 am | sunil kachure

पण आताचे सरकार पडेल.
हे. मात्र खरे आहे.ओढून ताणून सत्तेत राहण्यात काही अर्थ नाही.
संकट येतात ती नवीन संधी घेवून च.
आता ही संधी कोण कसे साधते आहे.
ते बघायचे.

कंजूस's picture

22 Jun 2022 - 11:28 am | कंजूस

भरपूर संधी आलेल्या आहेत हो.

सुखी's picture

22 Jun 2022 - 11:59 am | सुखी

कायप्पा University

सेना भाजप युतीचे सरकार बननार. एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव उध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे.
१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.
१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून‌ चौकशी बंद होईल.
आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण
५) *मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.*
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे
*एकनाथ शिंदे*

सौंदाळा's picture

22 Jun 2022 - 12:07 pm | सौंदाळा

अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे.
मुंबई महानगरपालिकेला पण कोंग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी, जागावाटप तगादा लावला असता. सेनेचा पारंपारीक मतदार पण दुरावला आहेच. त्यामुळेच ठाकरेंच्या पाठींब्यानेच हे सर्व चालू आहे असे वाटते. तसे नसेल तर मात्र ठाकरेंच्या नेतृत्वावर मोठेच प्रश्नचिन्ह लागेल. आमदार सोडाच खासदार पण शिवसेना सोडून जातील.

रात्रीचे चांदणे's picture

22 Jun 2022 - 12:12 pm | रात्रीचे चांदणे

समजा असच असेल तर लोकं परत सेना भाजपला मतदान करतील का? निवडणुकीत मतदार नक्किच हे लक्षात ठेवतील.

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 12:30 pm | शाम भागवत

उठांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी मोदी-शहा जुळवून घेण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. शिंदेसाहेबांनी एवढी मोठी खेळी करण्याअगोदर याची चाचपणी अगोदर केली असण्याची शक्यता नक्कीच असणार.

चौकस२१२'s picture

22 Jun 2022 - 12:41 pm | चौकस२१२

"शिंदेसाहेबांनी एवढी मोठी खेळी करण्याअगोदर याची चाचपणी अगोदर केली असण्याची शक्यता नक्कीच असणार."

तर्कावर तसे वाटते पण काय भरोसा .. पहाटेचा अमंगल खेळ खेळताना भाजपच्या नेत्यांनी पवार काकांबरोबर " चाचपणी अगोदर केली होती का?

यावेळी फक्त एक गोष्ट वेगळी आह एकी एकनाथ शिंदे बरोबर बरोबर बरेच आमदार गेले आहेत .. हा तास म्हणाल तर धक्के आहे खरा भुजबळ किंवा राणे तसे करू शकले नवहते !

सिनेमा अजून संपला नाही
पण घरवापसी होणार आणि भाजप तोंडावर पडणार असेच वाटते
आणि मग काय काका खुश

शाम भागवत's picture

22 Jun 2022 - 12:52 pm | शाम भागवत

बघुया काय होते आहे ते.
पण
घरवापसी झाली तर भाजपा राष्ट्रपती राजवट लावू शकतो. म्हणजे कारभार भाजपाकडेच राहतो. हेच काश्मीरमधे केले होते. यात भाजपाचे नुकसान नाहीच उलट भाजपा थोडा चांगल्या स्थितीत येतो. मुख्य म्हणजे पोलीस प्रशासन भाजपाला अनुकूल झाल्याने आत्ताच्या इडी + सीबीआय + आयकर कारवाया आणखी चांगल्या पध्दतीने सुरू होतील. सीबीआय वरची महाराष्ट्रबंदी उठेल. परिस्थिती अनुकूल झाल्यावर मध्यावधी केव्हांही लावता येऊ शकते.
भाजप कायम विन विन सिच्युएशन मधे असणार आहे. त्यामुळे भाजपाला प्रत्यक्ष सत्ता लागलीच नाही मिळाली तरी चालणार आहे.
मात्र
मोदी शहा फडणवीस हे सत्तालोलूप आहेत असं ज्यांना वाटते त्यांना हे पटणार नाही.
त्यासाठी थांबा व पहा हेच धोरण :)

कंजूस's picture

22 Jun 2022 - 1:01 pm | कंजूस

होय.