शशक'२०२२ - सोन्याच्या बांगड्या

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
14 May 2022 - 7:11 am

सुखी कुटूंब.आईबाबा,भाऊ,आजी, आजीची लाडकी.

आजोबांच्या पाऊलवाटेवर चालत नुकतीच ती पण डाॅक्टर झाली.आजीला केव्हढा अभिमान .....

महामारीने विक्राळ रूप धारण केले.सारे चिंताग्रस्त पण ती मात्र बिनधास्त. शेजारी पाजारी नाती दुरावली.

पहिल्यांदा भाऊ,आजी आणी पाठोपाठ आई.....उरले फक्त बाबा आणी तीच.

काही दिवसांनी एक आजी वाॅर्ड मधे आल्या.आजी नातीचे नाते जुळले.

"मला कुणीच नाही,शेवटचे करशील ना", म्हणत आजीने बांगड्या हातावर ठेवल्या.अश्रु सुकले होते. निशब्द झाली.

शब्दाला जागली...

महिन्याभराने अधिक्षकांनी कार्यालयात बोलावले.त्यांच्या समोरच्या अधेड व्यक्तीने विचारले, आजीच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या ना?

यंत्रवत फाॅर्मवर बांगड्या मीळाल्याची सही घेतली.

" sonya s".

थंडपणे पुन्हा कामाला लागली.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 8:09 am | तुषार काळभोर

पण,
सोन्याच्या बांगड्या सोन्याला मिळाल्या की अधिक्षकाने जमा करून घेतल्या?

कर्नलतपस्वी's picture

14 May 2022 - 10:04 pm | कर्नलतपस्वी

+1

चौथा कोनाडा's picture

14 May 2022 - 10:55 pm | चौथा कोनाडा

+१

श्वेता व्यास's picture

16 May 2022 - 12:51 pm | श्वेता व्यास

+१

विजुभाऊ's picture

17 May 2022 - 3:00 pm | विजुभाऊ

समजले नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

17 May 2022 - 5:12 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या “सोन्या” चिया बांगड्या होत्या. ते सोडा हो. तुम्ही १८५७ हेरीटेज वाक कधी पुर्ण करताय?

सौंदाळा's picture

17 May 2022 - 4:40 pm | सौंदाळा

+१

निनाद's picture

19 May 2022 - 9:43 am | निनाद

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 9:36 pm | चेतन सुभाष गुगळे

सोन्याच्या / सोन्या नावाच्या व्यक्तिच्या हे आधी मकरंद अनासपुरेच्या एका सिनेमात पाहिलंय. पुन्हा एकदा नाविन्य आणि मनोरंजनाचा अभाव असलेली अजून एक शशक.

सुखी's picture

26 May 2022 - 9:40 pm | सुखी

+१

Ujjwal's picture

27 May 2022 - 12:30 am | Ujjwal

अधेड?
कुठे नेऊन ठेवलंय मिपा!!!