मेथांबा

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
13 May 2022 - 1:48 pm

कैरी म्हणजे माझ पाहिलं प्रेमच आहे .लहानपणी अशा तिखट मीठ लावून कैरी खायचे की समोर बघणाऱ्याचेच दात आंबायाचे.आता तर कलमी आंब्याच्या कैऱ्या अजिबात आंबट नसतात तेव्हा छान आंबट गोड लागतात.अगदी दुकानदार सुट्ट्या पैशांऐवजी कच्चा आंब चोकलेट(गोळी) द्यायचा ती पण मलाच दिली जायची ;)

कैरीच लोणचे घातलं की आई बरणी लपवून ठेवायची ,नाहीतर कधी फडशा पडेल सांगता येत नसे.सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही पण माझ्यासाठे एक बरणी राखीव असते .साखर आंबा ,गुळांबा एवढा नाही आवडत.पण आता दिवेकरबाई डायटवाल्या यांनी सांगितल्या प्रमाणे गोड खाण्याची इच्छा झाल्यास गुळांबा हा सर्वात योग्य पर्याय आहे,कारण गुळाचे लोह तत्व शरीरास मिळते.

कैरी किसून ,फोडी करून झटपट लोणची करता येतात.त्यातलाच मेथांबा हा एक सुंदर झटपट होणारा प्रकार आहे.हा मेथांबा कैरीची साल काढून फोडणी देऊन करतात.
पण मला जास्त उकडलेल्या कैरीचा आवडतो.फायदा असा कि पन्ह करण्यासाठी कैरी उकडून ठेवल्यावर दोन एक कैऱ्यावापरून कधीही मेथांबा करता येतो.मेथ्या ह्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.तशाही मेथ्या कमीच खाल्या जातात.
आंबट गोड आणि त्यात मेथ्यांचाचा किंचित वेगळा स्वाद बराच काळ जिभेवर रेंगाळत राहतो.

अ

साहित्य:
दोन उकडलेल्या कैरी
१ कप गुळ
१ चमचा मेथ्या
१ चमचे जिरे
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा हळद आणि हिंग
फोडणीसाठी तेल
तिखट मीठ आवडीनुसार –मेथांबा हा प्रकार तिखट अधिक छान लागतो.
उगाच कांदा,लसूण हे प्रकार कैरी बरोबर अजिबात आवडतं नाही.कैरीच्या स्वादाचा स्वत:चाच एक तोरा असतो 

कृती
उकडेल्या कैरीचा गर काढावा.सुरीने त्याचे तुकडे करावे.गर smash करू नये.फोडणीसाठी कढईत तेल घ्यावे .

तेल गरम झाल्यावर जिरे ,मोहरी, हळद,हिंग घालावे.या सगळ्यांनी तडमताशा करत हळद लावून हिंगाचा अत्तर उधळल की मेथ्या त्यात टाकाव्यात gas मंद करावा.मेथ्या जळू नये याची काळजी घ्यावी.

आता कैरीच्या फोडी त्यात टाकाव्यात.एक वाफ येऊ द्यावी.आता त्यात किसलेला गुळ घालावा .गुळ जसा हळू हळू एक जीव होता आणि पदार्थाचा रंग बदलू लागतो ते मोहक वाटत.आवडीनुसार तिखट टाकावे.मीठ टाकावे.पुन्हा एक चांगली वाफ येऊ द्यावी,कैऱ्या उकडलेल्या असल्यामुळे अगदी कमी वेळ वाफ द्यावी.पाण्याची तर अजिबात गरज नाही.

बरेच दिवस हा तयार मेथांबा बरणीत टिकवता येतो.तो जसा मुरेल तसा आणखीनच कमाल लागतो.

-भक्ती

प्रतिक्रिया

नगरी's picture

13 May 2022 - 3:23 pm | नगरी

करून पाहणार
कैरी प्रेमी नगरी

नगरी's picture

13 May 2022 - 3:29 pm | नगरी
नगरी's picture

13 May 2022 - 3:29 pm | नगरी

माझी बहिण भरली वांगी करते, पण मेथ्यांची,अप्रतिम.
तिला रेसिपी पाठवली!
माझा जन्म खाण्या साठी :)

Bhakti's picture

13 May 2022 - 8:36 pm | Bhakti

वाह!

सिरुसेरि's picture

13 May 2022 - 3:48 pm | सिरुसेरि

मस्त आठवणी .

Bhakti's picture

13 May 2022 - 8:36 pm | Bhakti

_/\_

सरिता बांदेकर's picture

13 May 2022 - 5:46 pm | सरिता बांदेकर
सरिता बांदेकर's picture

13 May 2022 - 5:46 pm | सरिता बांदेकर

तुमच्या रेसीपी छानच असतात.
नवीन नवीन टाकत रहा.

:) तुम्हाला पाकृ नेहमी आवडतात,छान वाटत.
सरिता ताई मला भक्तीच म्हणा.

सरिता बांदेकर's picture

13 May 2022 - 5:46 pm | सरिता बांदेकर

तुमच्या रेसीपी छानच असतात.
नवीन नवीन टाकत रहा.

सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही मग बरंच दालं .त्यांचे डायटिशन दिक्षीत?
हेच करवंदांचे केलेले दोन आठवड्यांपूर्वी. झकास लागते.

मस्त!आवळ्याच पण असंच करतात .
-व्हिटामिन सी भक्त :)

कर्नलतपस्वी's picture

13 May 2022 - 8:52 pm | कर्नलतपस्वी

पपहिल्यांदा आई ,सासूबाई,आणी आता मेव्हणी छान बनवते.

Bhakti's picture

15 May 2022 - 8:35 am | Bhakti

वाह!

मेथांबा हा फार सुंदरच लागतो, मुख्य म्हणजे मेथी, हिंग तिखट, कैरी , मोहरी यांच्या एकत्रित सुगंधामुळे व चवीमुळे. लहानपणी आई हे पदार्थ नेहमी करत असे व त्याच्या शिजवतानाच्या वासामुळे अजिबात आवडत नसत, पण आता खूपच वयवाढल्यावर हे असले वकायरस, कोयाडे अशी विचित्र नांवे असलेले पदार्थही आवडतात व आई असे विचित्र पदार्थ जवळजवळ जबरदस्तीच खायला घाली तेव्हा तिचा खूप राग येइ व आता करायला जमत नाही, आयते मिळत नाही असे सुग्रास जेवण महणून नेहमीच वाईट वाटते .

Bhakti's picture

15 May 2022 - 8:34 am | Bhakti

_/\_

मेथांबा हा फार सुंदरच लागतो, मुख्य म्हणजे मेथी, हिंग तिखट, कैरी , मोहरी यांच्या एकत्रित सुगंधामुळे व चवीमुळे. लहानपणी आई हे पदार्थ नेहमी करत असे व त्याच्या शिजवतानाच्या वासामुळे अजिबात आवडत नसत, पण आता वय वाढल्यावर हे असले व कायरस, कोयाडे अशी विचित्र नांवे असलेले पदार्थही आवडतात व आई असे विचित्र पदार्थ जवळजवळ जबरदस्तीच खायला घाली तेव्हा तिचा खूप राग येइ व आता नेहमी करायला जमत नाही, आयते मिळत नाही असे सुग्रास जेवण महणून नेहमीच वाईट वाटते .

यश राज's picture

15 May 2022 - 1:53 pm | यश राज

खूप सुंदर दिसतोय.
माझा आवडता प्रकार.

Bhakti's picture

16 May 2022 - 9:47 pm | Bhakti

धन्यवाद :)

श्वेता२४'s picture

17 May 2022 - 2:30 pm | श्वेता२४

करुन बघणार

चौथा कोनाडा's picture

17 May 2022 - 6:21 pm | चौथा कोनाडा

तोंपासु !

आवडता पदार्थ !

नगरी's picture

18 May 2022 - 3:10 pm | नगरी

केला केला,भलताच टेष्टी,फोटू नंतर टाकतो.
आभारी आहे.अर्थात तुमच्या फोटोतला सारखा नाही जमला पण व्वा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2022 - 3:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही, रेशीपी आवडली, कच्च्या कैरीचा पण करतात हे माहित नव्हते. करुन बघावा लागेल.

बरेच दिवस हा तयार मेथांबा बरणीत टिकवता येतो

असहमत :- मेथांबा कितीही कडेकोट बंदोबस्तात ठेवला तरी फार दिवस टिकत नाही, आधिच खाऊन फस्त होतो.

पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

18 May 2022 - 6:03 pm | जेम्स वांड

फोटू कातील, रेसिपी तर डबल कातील आहे ताई, आई स्पेशल रेसिपी आमच्या ही.

आई पिकलेल्या हापूस आंब्याच्या फोडींचाही एक साखर आंबा करते, तो तर दिसायला अजूनच कातील कलर म्हणजे प्रॉपर आंब्याचाच त्याच्यात, बनवून घेतो आता एकदा आईकडून.

रच्याकने,

एक फ्युजन डोक्यात आले,

बटरमिल्क मॅरीनेटेड चिकन विंग्ज मस्त तिखट मिरपूड कोटिंग करून तळले आणि मेथांबा, साखर आंबा मिक्सर मधून फिरवून पॅनमध्ये थोडा गरम करून त्यात जर ती कुरकुरीत विंग्ज टॉस केली तर काय टेस्ट प्रोफाइल बनेल ह्याचं नवल वाटतंय.

Bhakti's picture

19 May 2022 - 1:54 pm | Bhakti

A
वरीलप्रमाणे कृती , परंतु कैरी कुकरमध्ये जास्त वेळ उकडून घ्यायची (३ शिट्या होईपर्यंत). आणि मग एकजीव गर वापरायचा.

Bhakti's picture

19 May 2022 - 2:00 pm | Bhakti

सर्वांचे आभार_/\_

असहमत :- मेथांबा कितीही कडेकोट बंदोबस्तात ठेवला तरी फार दिवस टिकत नाही, आधिच खाऊन फस्त होतो.

पैजारबुवा,

सहमत :)

एक फ्युजन डोक्यात आले,

जेम्स दादा अंड्याच्या पुढे अजून गाडी गेली नाही, तेव्हा काय इमाजिन होईना :)बट साउंड ग्रेट!

नचिकेत जवखेडकर's picture

20 May 2022 - 12:04 pm | नचिकेत जवखेडकर

मस्तं!! माझी आजी दार उन्हाळ्यात मेथांबा आणि गुळाम्बा करायची :)

आंब्यांच्या पानावर ठेवलेला मेथांबा लयं भारी दिसतोया... :)

[छुंदा प्रेमी ] ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Anjathey Jeeva Official Video | Full HD | Jodi | A.R.Rahman | Prashanth | Simran | Vairamuthu

स्मिताके's picture

22 May 2022 - 5:01 pm | स्मिताके

मस्त आणि सोपा ( हे मह्त्त्वाचं) मेथांबा. नक्की करणार.

कुमार१'s picture

22 May 2022 - 5:08 pm | कुमार१

छान आहे पदार्थ.

Bhakti's picture

24 May 2022 - 5:25 pm | Bhakti

कैरीची कढी
A
कढी भात हा तर माझा कित्येक वर्षांपासून शनिवारचा मेनू असायचा.मुक्ता नार्वेकर​चा कोकणाचा vlog पाहिला.त्यात कैरीची कढी खुप मस्त वाटली.चला करू म्हणलं.
साहित्य
A
-एका कैरीचा गर
-किसलेला अर्धी वाटी नारळाचा+आलं+मिरची
-एक वाटी गुळ(कैरीच्या​ आंबटपणनुसार कमी जास्त)
-फोडणीसाठी-लसूण पाकळ्या, मिरची तुकडे(लाल मिरची असेल तर अजून चांगलं)+जीरे,मोहरी,मेथ्या,हळद ,हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर
कृती
१.कैरीचा गर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचा.
२.किसलेला अर्धी वाटी नारळाचा+आलं+मिरची वाटत मिक्सरमध्ये करून घ्यायचं.
३.आता फोडणीसाठी तेल गरम करायचे फोडणीचे सर्व साहित्य घालायचे.
४.नारळाचे वाटण यात परतून घ्यायचे(या ऐवजी नारळाचे दूध वापरले तरी चालेल.)
५.कैरीचा गर टाकायचा किंचित परतून ,gas मंद करायचा.
६.गुळ टाकायचा.
७.आवश्यकतेनचसार पाणी टाकावे.
८.कोथिंबीर भुरभुरावी.
A

Bhakti's picture

24 May 2022 - 5:30 pm | Bhakti

डाळीचे पीठ
हे साहित्यात लिहायचे राहिले आहे.
८.डाळीचे पीठ/तांदळाचे पीठ पाण्यात थोडे कालवून कढी उकळताना टाकायचे म्हणजे कढी घट्ट होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2022 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही रेशीपी पण आवडली,
पैजारबुवा,

मेथांबा हा प्रकार पहिल्यांदाच वाचला अन् खाऊन बघितला... मस्त झालेला पाकृ साठी धन्यवाद