या रोज रोजच्या प्रोब्लेम्सने वैताग आला आहे !
काय तेच तेच महागाई , गॅस , पेट्रोल... माझे बरे आहे , घरी विचारणारे कोणी नाही , पण लोकांचे तोंड कोण बंद करणार ? खरच लोकांना दुसरी काही कामे नाहीत काय ? विरंगूळा म्हणून आयपीएल बघावे तर तेही फ्लॉप चालले आहे.. तिकडे बोर्डर पलीकडे पाकिस्तानचे ल लागल्याने त्याही बातम्या नाहीत..
यावर काहीतरी उपाय करायला हवाच ! लाईफ मध्ये नवे काहीतरी सेन्सेशन हवे, एक्साईट्मेंट हवी.. तर प्रोब्लेम, दु़: ख विसरले जाईल ,..
एकच खात्रीशीर उपाय..
आज रात ८ बजे.. मिट्रो ...
प्रतिक्रिया
13 May 2022 - 12:39 pm | प्रचेतस
ही कथा शशकला पात्र कशी ठरु शकते? १०० पेक्षा कितीतरी कमी आहेत शब्द.
13 May 2022 - 3:50 pm | तर्कवादी
साहित्य संपादकांचे काम आऊटसोर्स केले गेलेय की काय अशी शंका येते..
काही कथा "जनातलं मनातलं" मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या मग पुन्हा सुधारुन त्यांचा विभाग स्पर्धा करण्यात आला. एक १०१ शब्दांची कथा प्रसिद्ध झाली होती, मग गुपचुपपणे तिची दुरुस्तीही झाली आणि आता ही कथा !!
13 May 2022 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन १२ शब्द घालून 'मित्रो' वर कथा अजुन फूलवता आली असती. आणि विरोधी पार्टी कंपूची काही मतंही पडली असती.
-दिलीप बिरुटे
13 May 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा
+१
अजून फुलवता आली असती.
13 May 2022 - 6:26 pm | डाम्बिस बोका
कथा अजून रंजक हवी होती. बाकी मित्रो शब्दाची धास्ती बसली आहे हे नक्की.
14 May 2022 - 7:04 am | nutanm
कथेत शेवटी मिट्रो वाचून काही कळलेच नाही प्रतिक्रीयांमधून तो शब्द मित्रो वाचायचा कळले.
14 May 2022 - 7:04 am | nutanm
कथेत शेवटी मिट्रो वाचून काही कळलेच नाही प्रतिक्रीयांमधून तो शब्द मित्रो वाचायचा कळले.
14 May 2022 - 8:08 am | तुषार काळभोर
-१^१००
काहीही!!