शशक'२०२२ - बाप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2022 - 5:13 pm

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 5:45 pm | चौथा कोनाडा

+१

आवडली.

असं बर्‍याचदा घडताना पाहिलंय !

Bhakti's picture

12 May 2022 - 6:39 pm | Bhakti

अगदी!

श्वेता व्यास's picture

12 May 2022 - 6:25 pm | श्वेता व्यास

+१

तर्कवादी's picture

12 May 2022 - 6:27 pm | तर्कवादी

कथा आवडली. पण शेवटच्या २ ओळी अधिक आकर्षक पद्धतीने लिहिता आल्या असत्या.

तर्कवादी's picture

26 May 2022 - 11:50 am | तर्कवादी

मतादानाचा विचार करता ही शशक प्रथम क्रमांकाची दावेदार दिसत आहे सध्यातरी. (अजून ४ दिवस मतदानाचे बाकी आहेत म्हणा).
सामान्य माणसाच्या भावभावना मांडणारे कथानक नक्कीच वाचकांच्या भावनेला हात घालणारे आहे.
पण तरीही काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात. लेखक या मुद्द्यांचा नक्कीच विचार करतील ही आशा आहे.
१) टंकनचुका - उदा. "शेताततला लाखाचा माल"
२) र्हस्व-दीर्घच्या चुका - उदा. बूडवून नसून बुडवून असायला हवे.
३) कथानक छोटंसं असल्याने एखादी गोष्ट सांगायला अधिकाधिक शब्द वापरलेत असं दिसतंय
उदा. १

शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?

याऐवजी
"शेतातला लाखाचा माल वेळेत मार्केटला न पोहोचल्याने खराब होवून वाया गेला. बापासाठी एवढं करायला नको ?" असं कमी शब्दांत जमलं असतं. बाप महत्वाचा होता हे अध्याहृतच आहे. खरंतर "बापासाठी एवढं करायला नको" ह्या प्रश्नाचीही गरज नव्हती.
उदा. २ -

त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.

विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता - ही यादी विनाकारण वाढवल्याप्रमाणे वाटते.
त्याऐवजी आदरातिथ्य किंवा सरबराई यापैकी एखाद्या शब्दाने काम झाले असते.
उदा. ३

ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना

बोचला आणि लागला हे दोन्ही शब्द एकच भावना व्यक्त करतात.
अशाप्रकारे अनावश्यक पुनरुक्ती टाळून वाचलेले शब्द दुसरं काही व्यक्त करण्याकरिता अजून परिणामकारकरित्या वापरता आले असते.
४) कथा ही कथानायकाचे स्वगत यास्वरुपात मांडलीय. पण ह्या स्वगताचा भाव अगदी पहिल्या वाक्यापासून असा आहे की "मी माझ्या बापाकरिता नुकसान सोसलं, त्रास सोसला, मला डॉक्टरांनी शाबासकी दिली " ई ई सगळा मीपणा दिसतो आहे. तो टाळता आला असता तर बरं झालं असतं. नायकाची भावना अधिक गहिरी झाली असती. कथानक थोडं वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करता आला असता. उदा. संवादांच्या माध्यमातून कथा उलगडत गेली असती तर अजून परिणामकारक झाली असती.

Bhakti's picture

12 May 2022 - 6:40 pm | Bhakti

+१

चांदणे संदीप's picture

12 May 2022 - 7:07 pm | चांदणे संदीप

+१

सं - दी - प

स्वधर्म's picture

12 May 2022 - 7:11 pm | स्वधर्म

.

सौंदाळा's picture

12 May 2022 - 8:01 pm | सौंदाळा

+१
भिडली

पुंबा's picture

12 May 2022 - 8:22 pm | पुंबा

+१

डाम्बिस बोका's picture

12 May 2022 - 10:06 pm | डाम्बिस बोका

कथा आवडली.

ब़जरबट्टू's picture

12 May 2022 - 10:06 pm | ब़जरबट्टू

+१

एमी's picture

12 May 2022 - 10:19 pm | एमी

+१

कपिलमुनी's picture

12 May 2022 - 10:35 pm | कपिलमुनी

या स्पर्धेतील सर्वोत्तम कथा..ओढून ताणून काही नाही

सोत्रि's picture

13 May 2022 - 1:28 pm | सोत्रि

या स्पर्धेतील सर्वोत्तम कथा..ओढून ताणून काही नाही

+१

- (कथा आवडलेला ) सोकाजी

सुखीमाणूस's picture

12 May 2022 - 10:59 pm | सुखीमाणूस

सगळीकडेच लागु होते अशी शुक्रवारची कहाणी. भारत/परदेशी असलेल्या मुलान्मधे पण होतो कळत्/नकळत दुजाभाव

तर्कवादी's picture

12 May 2022 - 11:29 pm | तर्कवादी

मी १०१ शब्द मोजलेत ... कुणी खात्री करु शकेल काय ? (वर्डमध्ये पेस्ट केल्यावर मात्र १०० दाखवत आहे)

चांदणे संदीप's picture

13 May 2022 - 1:33 pm | चांदणे संदीप

१०१ शब्द आहेत. "रात्रीअपरात्री हा एक शब्द पकडला तर मग १०० होतात शब्द.

सं - दी - प

प्रदीप's picture

7 Jun 2022 - 8:05 pm | प्रदीप

मराठीत एकच शब्द धरला जातो.

लोथार मथायस's picture

13 May 2022 - 12:20 am | लोथार मथायस

+१

सुखी's picture

13 May 2022 - 12:22 am | सुखी

+१

फारच वाईट , बापाचे बोचरे बोलणे असेच मलाही नेहमी जवळचे आईवडिल सख्खी भावंडे, मुले कृतघ्नतेने वागण्याचे अनुभव व नंतर मी मनांतच तडफडत बसणे मलाच का असे मनापासून घरातल्यांचे करूनही , पैसे खर्च करून आसे अनुभव सर्वांकडून अगदी मित्रमैत्रिंणीकडूनही येतात, आपल्यावेळी कोणीही आपले नाही तरी नोकरीत तर हा रोजचाच अनुभव असतो त्यामुळे मन मेलेलेच असते व मग जगरहाटी साठी साधारण 22/23 वयापासून निब्बर झालेले असते पण कधीच कृतघ्न घरच्यांकडून पोचपावती स्वतःहून दिलेली नसते व नेसमीचाच हा अनुभव म्हणून वाईट वाटायचे रहात नसते.

सुक्या's picture

13 May 2022 - 5:25 am | सुक्या

+१

nanaba's picture

13 May 2022 - 6:39 am | nanaba

+१

सविता००१'s picture

13 May 2022 - 10:19 am | सविता००१

+१

श्वेता२४'s picture

13 May 2022 - 10:24 am | श्वेता२४

+१ हे सार्वत्रिक आहे. भारतीय मानसिकताच पैशाला किंमत देणारी आहे. संस्कारक्षम पण कमी कमवणारा मुलगा हा पैसे कमावणाऱ्या पण शारिरीक कष्ट/जबाबदारी न उचलणाऱ्या मुलापेक्षा नेहमी कमीच कौतुकाला पात्र ठरतो. शारीरिक कष्ट करुन जबाबदारी उचलणाऱ्यांना समाजात किंमत/मान/कौतुक दिले जात नाही , ही वस्तुस्थिती आहे. आई वडील सर्व मुलांना समान वागवतात यावरुन तर कधीच विश्वास उडाला आहे. ज्यांचे आईवडील समान वागवत असतील ती मुले सुदैवी. असो.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 10:20 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ प्रतिसादाला

नगरी's picture

16 May 2022 - 3:57 pm | नगरी

जो करतो त्याची किंमत, जाऊ दे,
खरेच आवडली कथा आणि अभिप्रायही

सिरुसेरि's picture

13 May 2022 - 3:47 pm | सिरुसेरि

+१

टीकोजीराव's picture

13 May 2022 - 3:52 pm | टीकोजीराव

+1

संजय पाटिल's picture

13 May 2022 - 4:03 pm | संजय पाटिल

+१

मोहन's picture

13 May 2022 - 5:08 pm | मोहन

+१

गामा पैलवान's picture

14 May 2022 - 2:20 am | गामा पैलवान

+१

-गा.पै.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 8:06 am | तुषार काळभोर

+१

निओ's picture

14 May 2022 - 3:34 pm | निओ

+१

कॉमी's picture

14 May 2022 - 6:15 pm | कॉमी

चांगली आहे गोष्ट.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली

तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१, -१ असं काहीही नसतं. मत कसं मोजलं जानार? स्पर्धेचे नियम माहीत आहे की नाही?

कॉमी's picture

14 May 2022 - 7:57 pm | कॉमी

https://www.misalpav.com/comment/1140097#comment-1140097

बाहुबलीजी आमचं मत देऊ तेव्हा नक्की मोजलं जानार, चिंता नसावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 11:32 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

काड्यासारू आगलावे's picture

14 May 2022 - 11:34 pm | काड्यासारू आगलावे

+१

वेलांटी's picture

14 May 2022 - 11:53 pm | वेलांटी

+1

अभिजीत अवलिया's picture

15 May 2022 - 7:30 am | अभिजीत अवलिया

+१

वामन देशमुख's picture

15 May 2022 - 12:31 pm | वामन देशमुख

+१

प्राची अश्विनी's picture

15 May 2022 - 8:24 pm | प्राची अश्विनी

+1

नगरी's picture

16 May 2022 - 3:48 pm | नगरी

ऐसैच होता हैं +1

अनिंद्य's picture

17 May 2022 - 12:47 pm | अनिंद्य

+१

कॉमी's picture

22 May 2022 - 1:20 pm | कॉमी

मतदान

प्रसाद_१९८२'s picture

22 May 2022 - 2:14 pm | प्रसाद_१९८२

+१

स्मिताके's picture

22 May 2022 - 4:33 pm | स्मिताके

+१
खरी व्यथा. कथा आवडली.

विजुभाऊ's picture

23 May 2022 - 9:23 am | विजुभाऊ

+१