शशक'२०२२ - चोरी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
9 May 2022 - 8:52 am

मी इन्स्पेक्टर अजय. अनेक चोरांना पकडणारा. माझ्या कपाळावर एक व्रण आहे. लहानपणी काकांनी मला मी त्यांचे पैसे चोरले म्हणून मारलं होतं. तेव्हापासून माझ्या कपाळावर आहे. आईलाही काकू खूप छळायची. त्याच रात्री माझ्या विधवा आईनं माझ्यासकट घर सोडलं.

पुढं आम्ही एका महिलाश्रमात राहिलो. मला आईनं शाळेत घातलं. तीही प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली. मी शिकलो. पोलीसदलात गेलो.

आज आम्ही सन्मानानं जगतोय. माझ्या कपाळावरचा व्रण चाचपला की मी न केलेल्या चोरीबद्दलचा मार आठवतो.

त्या दिवशीची चोरी कुणी केली ते मला माहीत आहे. माझ्या आईनं! होय आईनं. पण मी समजून घेतलंय तिला. मी मार खात असतानाची तिची असहाय्य, केविलवाणी नजर मात्र मला आजही रडवते.

प्रतिक्रिया

सुखी's picture

9 May 2022 - 9:01 am | सुखी

+१

चांदणे संदीप's picture

9 May 2022 - 10:38 am | चांदणे संदीप

आज मेरी आई भी चोर है असं कळालंय. कथा ठीक.

सं - दी - प

तर्कवादी's picture

9 May 2022 - 11:31 am | तर्कवादी

कथा ठीक

सहमत
कथानक चांगलं आहे पण अधिक रंजकपणे मांडता आलं असतं.

कुमार१'s picture

9 May 2022 - 11:43 am | कुमार१

+१

गवि's picture

10 May 2022 - 7:49 am | गवि

+१

सिरुसेरि's picture

10 May 2022 - 11:22 am | सिरुसेरि

+१ .

प्रचेतस's picture

10 May 2022 - 12:35 pm | प्रचेतस

+१
जबरदस्त आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2022 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त. आवडली कथा.

-दिलीप बिरुटे

गणपा's picture

10 May 2022 - 1:00 pm | गणपा

+१ आवडली.
चांदणेंशी अंशतः सहमत.
पण शशक असल्याने जास्त खुलवणे शक्य नसावे.

संजय पाटिल's picture

10 May 2022 - 4:40 pm | संजय पाटिल

+१

गामा पैलवान's picture

10 May 2022 - 7:19 pm | गामा पैलवान

+१

शशक असल्याने बाळबोध ठेवावी लागली असावी.

-गा.पै.

कपिलमुनी's picture

10 May 2022 - 8:38 pm | कपिलमुनी

+१

सुक्या's picture

10 May 2022 - 10:03 pm | सुक्या

+१

सौन्दर्य's picture

10 May 2022 - 11:01 pm | सौन्दर्य

ट्विस्ट छान असल्याने + १

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:24 am | तुषार काळभोर

+१
रामलखन मधली राखी आठवली. (अर्थात तिने चोरी केली नव्हती, पण........)

स्मिताके's picture

22 May 2022 - 4:55 pm | स्मिताके

+१