“रमाकांत त्यादिवशीसारखं आज याल का संध्याकाळी माझ्याबरोबर घरी.तुम्हाला पाहिजे तो मोबदला देईन.”रेवतीनी मधाळ आवाजात विचारलं.
“रेवती,काही काळजी करू नका ,रमाकांतला वेळ नसला तर मी येईन तुमच्याबरोबर.तुमची सगळी कामं करून देईन.बाईक आहेच माझी.” रमाकांतनी ऊत्तर द्यायच्या आत मी मध्येच बोललो.
रेवतीनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
इकडे रमाकांत जोरजोरात मान हलवत मला खूणा करत होता.मी दुर्लक्ष केलं.
“रमाकांत,मी तुम्हाला दिलेला नॅपकिन यांना द्या.”
संध्याकाळी मी शीळ घालत रेवतीच्या टेबलपाशी गेलो.
रेवतीने आंब्याच्या पेटीकडे बोट केलं,” ही पेटी घरी न्यायची आहे.नॅपकीन घेतलात ना.खांद्यावर पेटी ठेवताना लागेल तुम्हाला.रमाकांतला मी पैसे देते,तुम्हाला कॅाफी देईन.”
प्रतिक्रिया
8 May 2022 - 1:03 pm | कॉमी
समजली नाही.
8 May 2022 - 5:08 pm | मोहन
+१
8 May 2022 - 6:06 pm | तुषार काळभोर
तुम्हाला पाहिजे तो मोबदला देईन
आणि
रमाकांतला मी पैसे देते,तुम्हाला कॅाफी देईन
ही परस्परविरोधी वाक्ये आहेत..
8 May 2022 - 6:41 pm | nutanm
शेवटाचा अर्थ हा आहे का? की, रमाकांतला नॅपकिनच्या बदल्यात पैशाचा तरी मोबदला पण पेटी उचलणार्याला मात्र फक्त काॅफीचा मोबदला बरोबर का? कृपया कथालेखकाने बरोबर का चूक खुलासा करावा व चूक असल्यास त्याच्या मनातला शेवट उलगडून सांगावा.
8 May 2022 - 8:39 pm | नावातकायआहे
झेपली नाही.......
8 May 2022 - 11:11 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याला वाटलं रेवती रमाकांत ला “वेगळ्या“ कामासाठी बोलावत आहे. पण रेवतीला आंब्याची पेटी घरी पोहोचवायची होती. त्याचा
पोपट झाला.
किंवा रमाकांत ला “त्या” कामासाठी पैसे देते तुला काॅफी देईन असं तिने सांगीतलं. मला हे दोन अर्थ लागले.
10 May 2022 - 3:06 pm | प्रचेतस
रमाकांतकडून आंब्याची पेटी खरेदी केलीय आणि त्याचे पैसे ती त्याला देणार आहे आणि जो पेटी वाहून आणेल त्याला कॉफी देणार असा अर्थ लागतो मला.
10 May 2022 - 8:44 pm | कपिलमुनी
+१
10 May 2022 - 11:07 pm | सौन्दर्य
शब्दच्छल करून दोन वेगवेगळे अर्थ सुचविण्याचा प्रयत्न, दादा कोंडके स्टाईल. पटला नाही म्हणून मार्क नाही.