तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-diff...
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
प्रतिक्रिया
17 Apr 2022 - 11:34 pm | sunil kachure
तामिळी लोकांची भाषिक अस्मिता का तीव्र आहे .त्यांचा हिंदी लं विरोध का आहे.
ह्याचा इतिहास बघण्याच काही कारण नाही.
हिंदी भाषा आणि उत्तरेतील आक्रमण थोपण्यास त्यांची भूमिका बिगर हिंदी राज्यांच्या हिताची आहे.
आपल्या पण हिताची आहे.
बिगर हिंदी राज्यांनी इंगर्जी वर प्रभुत्व मिळवावे.
बिगर हिंदी राज्यातील राज्य सरकार नी वाद घालण्यात वेळ न घालवता.
सर्व जनता इंग्रजी भाषा शिकेल असे शिक्षण धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी.
दक्षिण भारत आणि बाकी बिगर हिंदी राज्य.
ह्यांच्या मधील भाषेची अडचण दूर होईल.
दुसऱ्या देशात,कॉर्पोरेट क्षेत्रात सर्व च ठिकाणी इंग्लिश उपयोगी पडेल.
पण हिंदी स्वीकारली तर उत्तर भारतातील बेरोजगार,बेशिस्त लोकांचे लोंढे बिगर हिंदी राज्यांचे नुकसान करतील.
भारतीय भाषा वैगरे भावनिक पॉइंट मध्ये काही अर्थ नाही.
17 Apr 2022 - 11:41 pm | Trump
श्री गुगळे, तुमचे मत बरोबर आहे.
येथे मराठीभाषीक माझ्या समजानुसार, दक्षिण भारतीयांना फक्त हिंदी भाषेसंदर्भात डोळस पाठिंबा देत आहेत.
हिंदी भाषेला विरोध म्हणजे भारताला विरोध असले काही म्हणु नका, अगदी सरसटीकरण आहे.
--
जशी शिवसेनावाले, कोणतीही धाड बसली किंवा थोडी टिका झाली की महाराष्ट्राचा अपमान तसल्या प्रकारचे तुमचे विधान आहे.
20 Apr 2022 - 12:14 am | चेतन सुभाष गुगळे
ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले आहे त्या चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादातील लिंक द्वारे उघडणारे लेख वाचा. तमिळ अस्मिता - हिंदी विरोध - स्वतंत्र द्रविड राज्याची मागणी या मुद्यांचा परस्परसंबंध त्यांच्या लेखमालेत आपल्याला सापडेल. माझा प्रतिसाद त्याच संदर्भाने आहे.
19 Apr 2022 - 12:05 pm | उपयोजक
दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.
तुमच्या अर्धवट ज्ञानाची आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे.
दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी शिकण्याला नाही.
खाली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचं संकेतस्थळ दिलं आहे. ते जरा बघून घ्या. या संस्थेतर्फे हिंदीच्या विविध स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेची कार्यालये आणि कार्यविस्तार तमिळनाडू ज्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र आकस आहे त्या राज्यातही आहे बरं का!
https://www.dbhpscentral.org/
केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का!
मी स्वत: कितीतरी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकवतो. तरीही माझा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. मी दक्षिण भारतीय नाही. आता मला काय म्हणणार? विभाजनवादी की अजून काही?
तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का? आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?
19 Apr 2022 - 11:54 pm | चेतन सुभाष गुगळे
असल्या द्वेषपूर्ण वैयक्तिक प्रतिसादाने तुमच्या विचारांची हीन पातळी दिसून येते तेव्हा ते टाळा. माझ्या ज्ञानाला अर्धवट ठरविण्याआधी मी ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले आहे त्या चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादातील लिंक द्वारे उघडणारे लेख वाचा. तमिळ अस्मिता - हिंदी विरोध - स्वतंत्र द्रविड राज्याची मागणी या मुद्यांचा परस्परसंबंध त्यांच्या लेखमालेत आपल्याला सापडेल. माझा प्रतिसाद त्याच संदर्भाने आहे.
दक्षिण भारतीयांच्या तिरस्काराबद्दल - लोकल रामू नावाची एक वेबसाईट ज्यावर एक ठराविक रक्कम भरून आपण घरगुती वस्तू / उपकरणे यांच्या सेवा दुरुस्ती बद्दल कारागीर बोलवू शकतो. मी देखील असा कारागीर बोलाविला. पुण्यातील पिंपरी चिंचवड या भागात. हा कारागिर येऊन दुरुस्ती करुन गेला पण पुन्हा उपकरण खराब झाले पुन्हा येऊन दुरुस्ती करुन गेला आणि त्यानंतर पुन्हा उपकरण खराब झाले. प्रत्येक वेळी त्याने मोठी रक्कम माझ्याकडून घेतली. त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले. त्यात त्यांचे इंग्रजीही फारसे चांगले नाही आणि तक्रार नोंदविल्यावर पुढे काहीच कार्यवाही नाही. अर्थात त्यांची अकार्यक्षमता हा वेगळा विषय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील एका उपनगरात सेवा देऊन आर्थिक फायदा कमविणार्या या बंगळुरू स्थित संस्थेने ग्राहकांना हिंदी आणि / किंवा मराठी असे पर्याय न देता फक्त इंग्रजी व दक्षिणी भाषांचा पर्याय देणे हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? अर्थात हे एकच उदाहरण नाही. मला असे अनेक अनुभव आले आहेत. मी या वृत्तीचा तिरस्कार करतो आणि ज्या लोकांमध्ये अशी वृत्ती आहे त्यांचा. ते कोणत्या वंश / प्रदेशाचे आहेत याचेशी त्याचा संबंध नाही. हे जर असे एखाद्या पंजाबी / गुजराथी कंपनीने केले असते तरी मला त्यांचा देखील तितकाच तिरस्कार वाटला असता.
धाग्याच्या विषयात जो मूळ उल्लेख आहे तो सक्तीचा आहे का? आवाहन ह्या शब्दाचा अर्थ विनंती होतो की सक्ती? मराठीचे इतपत बेताचे ज्ञान तुम्हाला जर नसेल तर ते अर्धवट पेक्षाही कमी आहे असे म्हणावे लागेल.
ते आम्हालाही माहिती आहे की या लोकांना हिंदी येतेच. फक्त ज्याला इंग्रजी किंवा स्थानिक भाषा येत नाही त्याला हा हिंदीचा पर्याय मुद्दामच न देता त्याची अडवणूक करणं हा यांचा उद्देश.
हिंदी ऐवजी इंग्रजी वापरल्याने ह्या कटकटीचं काय होतं?
आवाहन केलं आहे अमित शाह यांनी, त्याला विरोध दाक्षिणात्यांचा आणि या विरोधाला पाठिंबा तुमचा. या सगळ्याबद्दल काथ्याकूट सदरात धागा काढला तुम्ही. त्यावर अमित शाह यांचं आवाहन चूकीचं का नाही यावरचे मुद्दे मी मांडले जे काथ्याकूट या सदराखाली अपेक्षितच.
एखाद्याचं काहीतरी बिघडवणं, तसे करण्याची ताकद काय आहे? वगैरे गुंडगिरी छाप मुद्यांना निदान माझ्याकडे तरी काही थारा नाही.
20 Apr 2022 - 7:52 am | श्रीगुरुजी
त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले.
महाराष्ट्रात मी कोणालाही संपर्क केला किंवा माझ्याशी कोणी संपर्क केला तर मी फक्त मराठीतच बोलतो. समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर तिला/त्याला शुद्ध मराठीत मराठीतच बोलण्यास सांगतो. बहुतेक वेळा ते मराठीत बोलतात किंवा मराठी बोलणाऱ्याकडे संभाषणाची सूत्रे सोपावतात. मराठी बोलण्यास नकार दिला तर मी संभाषण थांबवितो.
30 Apr 2022 - 8:03 am | उपयोजक
चुकीची , अर्धवट माहिती लिहिणार. ती बरोबरच आहे यावर ठाम राहून आपला हेका चालवणार. आणि ते दाखवून दिलं तर लगेच इतरांच्या विचारांची पातळी ठरवणार? तुमचा हेका असाच सुरु ठेवा. मी मात्र जमेल तितका हिंदीसक्तीविरोध करतच राहीन. विशेषत: उत्तरभारतीयांच्या सोयीसाठी हिंदी शिकू नका इतके आवाहन अहिंदी लोकांना नक्की करेन.
दक्षिण भारतीयांचा एखाददुसरा अनुभव वाईट आला म्हणून झाडून सगळे द. भा हिंदीद्वेष्टे हा शोध लावण्यासाठी किती घाई केलीत तुम्ही? आणि बरोब्बर सगळे वाईट अनुभव तुम्हाला द.भारतीयांबद्दलच कसे काय आले हो? :)
मग जर तुम्ही द.भा च्या गळ्यात हिंदी मारण्यासाठी सक्रियपणे काहीच करु शकत नसाल तर मग तुमचा हिंदी हेका काहीच कामाचा नाही. उगाच ऊर्जा वाया घालवताय आंजावर लिहून.
17 Apr 2022 - 8:12 pm | चेतन सुभाष गुगळे
https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/styles/photo_slider_753x543/...
ही नंबर प्लेट देवनागरीत लिपीत का? इंग्रजी ला विरोध म्हणून का? मग देवनागरीत टाकली म्हणजे फक्त मराठी भाषिकांनाच वाचता यावी म्हणून का? तसे असेल तर दक्षिण भारतात त्यांच्या लिपीत टाकली तर चालेला का?
नाही ना? मग तरीही बिनदिक्कत टाकली आहे. का? तर कारण असे की ही देवनागरी लिपी हिंदी भाषिकांना सहज वाचता येते म्हणजेच हिंदी ही राष्ट्रभाषा अशी सोयीस्कर भूमिका या नंबर प्लेट मागे दिसते.
अन्यथा जर तुमचा हिंदी भाषेला विरोध आहे आणि द्वितीय भाषा म्हणून तुम्ही इंग्रजी चालवून घेत असाल तर तुम्हाला नंबर प्लेट इंग्रजी भाषेतच लिहायला हवी. देशातल्या प्रत्येकाला तुमची स्थानिक भाषा येतेच का?
17 Apr 2022 - 8:39 pm | sunil kachure
हे मराठी मध्ये लिहले आहेत हिंदी ,देव नागरी कोठून मध्येच आणली .
तुमचे खूप प्रतिसाद योग्य आहेत पण हा राज ठाकरे च्या गाडीच्या नंबर च संबंध हिंदी शी जुळवणे काही योग्य नाही.
गुजराती मध्ये आकडे वेगळेच लिहल जातात .
कित्येक गुजरात मधील गाड्यावर गुजराती मध्ये नंबर प्लेट असतील.
ते आकडे तर हिंदी भाषा असणाऱ्या लोकांस पण समजणार नाही
मग ह्या वरून गुजराती हिंदी द्वेष करणारे आहेत असा संबंध लावायचा का?
17 Apr 2022 - 8:54 pm | चेतन सुभाष गुगळे
फक्त स्थानिक भाषेत नंबर प्लेट लिहायला परवानगी नाही. मूख्य नंबर प्लेट देशभर सर्वांना समजावी म्हणून रोमन भाषेत आणि जर तुम्हाला स्थानिक भाषेत लिहायचीच असेल तर अतिरिक्त नंबर प्लेट तुम्ही स्थानिक भाषेत लिहू शकता.
परंतु इथे राज ठाकरेंनी इंग्रजी विरोध दर्शविताना स्थानिक भाषेत लिहित नंबर प्लेट लिहिली आहे. मुख्य रोमन भाषेतली नंबर प्लेट न लावताच.
आता मुद्दा असा की देशभर प्रत्येकाने असे केले म्हणजे मुख्य रोमन नंबर प्लेट न लावता फक्त स्थानिक भाषेतच नंबर प्लेट लिहिली तर? अर्थातच गुजराती आणि दक्षिण भारतीय असे करत नाहीत. कारण त्यांची लिपी त्या भाषिकांखेरीज इतरांना वाचता येत नाही आणि अपघात व इतर गुन्ह्यांमध्ये वाहन ओळखणे अशक्य होईल.
मग राज ठाकरेंनी हे असे का केले? साधे उत्तर आहे - मराठी मध्ये जरी नंबर प्लेट असली तरी लिपी देवनागरी असल्याने इतरां देखीलना वाचता येईल असा युक्तिवाद करता येतो.
दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासतानाही त्यांनी हेच केले होते.
त्यांच्या मराठी आग्रहाबरोबर त्यांनी अनेकदा हिंदी विरोध देखील दामटला तर कधी कधी इंग्रजी विरोध देखील.
समजा दक्षिणात्यांनी हिंदी विरोधा सोबत इंग्रजी लिपीला देखील विरोध दर्शविला तर काय होईल? तिथल्या इंग्रजी भाषिक पाट्यांना काळे फासण्यात आले तर केवळ स्थानिक लिपीतल्या पाट्या वाचून आपल्याला काय कळणार?
सांगायचा उद्देश असा की राज ठाकरे इंग्रजी विरोध करीत होते तेव्हा मराठी अक्षरे चालून गेली ती केवळ त्यांची व हिंदीची देवनागरी ही एकच लिपी असल्याने.
समजतील फक्त पाच व आठ या अंकांमध्ये किरकोळ फरक आहे.
https://i.pinimg.com/564x/8a/96/8b/8a968bd3b7f8d2ed56626be0a32d6bea.jpg
18 Apr 2022 - 12:19 am | sunil kachure
हिंदी भाषिक म्हणजे.यूपी,बिहारी,अखंड mp ह्या राज्यातील लोक सोडली तर बाकी गैर मराठी लोक मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात
खूप लोक तर मराठी बोलतात पण खूप गैर मराठी वरील राज्य सोडून मराठी समजतात पण.
गुजराती,राजस्थानी तर लवकर मराठी शिकतात.
पाच सहा वर्ष इथे राहणारा असेल तरी मराठी समजतात.
पण वरील राज्यातील बहुतांश लोक दोन दोन पिढ्या इथे राहून पण मराठी समजत नाहीत.
मग अशा घामेंडी वृत्ती चा राग येणे साहजिक आहे.
18 Apr 2022 - 12:24 am | अमरेंद्र बाहुबली
+१
अमीताभ बच्चन ते रस्त्यालरील भाजीवाला एकजात वृत्तीसारखी. मराठी शिकायची नाही म्हणजे नाही.
18 Apr 2022 - 12:31 am | Trump
श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.
18 Apr 2022 - 12:47 am | अमरेंद्र बाहुबली
ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा प्रकारे ते मॅंडरीन, आफ्रिकन नी मल्याळम हा बोलू शकतात. ऊगाच खोटं पसरवणं थांबवा.
“लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठ……
18 Apr 2022 - 12:58 am | Trump
भाषण वाचुनच करतात. उच्चार एकदम स्पष्ट आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मराठी येते. जर तुम्हाला लहानपणापासुन मराठी शिकेल्या माणसाइतके कौशल्य हवे असेत, तर बहुदा त्यांच्याकडे नसेल.
ही पहा सुनबाई
19 Apr 2022 - 12:09 pm | उपयोजक
श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.
साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण आहे. त्यात ते म्हणाले "लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठी"
लिहून दिलेलं असूनही ही अवस्था यांची
19 Apr 2022 - 3:05 pm | sunil kachure
हिचा एक किस्सा आठवत आहे .मराठी आणि महाराष्ट्र द्वेषाचा.
लोकसभेत जया बच्चन बोलत होती जेव्हा राज ठाकरे नी रेल्वे मध्ये हिंदी भाषिक घुसवले जातात त्या विरुद्ध आंदोलन केले होते त्या वेळी..
ह्या जया नी मुंबई केंद्र शासित करा अशी मागणी केली लोकसभेत.
त्या वेळी मुलायम सिंग जी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते.
जशी अचानक जया नी मुंबई केंद्र शासित करण्याची मागणी केली.
मुलायम सिंग जी लगेच उभे राहिले आणि त्यांनी सरळ विरोध केला.
समाजवादी पक्ष मुंबई केंद्र शासित करण्याला विरोध करतो आणि जया जे बोलत आहे ते तिचे पर्सनल मत आहे.
समाजवादी पक्ष त्याच्या शी सहमत नाही.
20 Apr 2022 - 10:33 am | चेतन सुभाष गुगळे
श्री. अमिताभ बच्चन यांनी मराठी का शिकावं हे काही कळलं नाही. इथे इंग्रजी की हिंदी ही चर्चा चालू असताना हिंदी विरोधकांनी स्थानिक भाषा अथवा इंग्रजी असा पर्यायास पसंती दिली आहे. या भाषा द्विसूत्री नुसार संवाद साधण्याचे ठरवले तर श्री. अमिताभ बच्चन यांची काहीच अडचण होणार नाही. समोरचा त्यांना म्हणाला की मला तुमची हिंदी कळत नाही तर ते अस्खलित इंग्रजीत बोलतीलच की.
https://en.wikipedia.org/wiki/Amitabh_Bachchan#Early_life
Bachchan was educated at Boys’ High School & College, Allahabad; Sherwood College, Nainital; and Kirori Mal College, University of Delhi.
त्यांनी चूकीचं मराठी वाचल्याच्या व्हिडीओ लिंक्स देण्यापेक्षा मी त्यांनी परिणामकारक इंग्रजी (न वाचता) बोलल्याची लिंक देऊ शकतो.
https://youtu.be/rkOySwlEtVk?t=98
20 Apr 2022 - 10:40 am | कॉमी
खरंय! ज्यांना इंग्लिश येतं अश्या कुणीच मराठी शिकण्याची गरज नाही, असे त्या लॉजिकने मानावे काय ?
20 Apr 2022 - 1:01 pm | sunil kachure
तुमच्या लॉजिक प्रमाणे आणि आमच्या लॉजिक प्रमाणे त्यांनी मराठी किंवा इंग्लिश च बोलले पाहिजे.
हिंदी cha marathi भाषिक राज्यात काय संबंध.
पण ते हिंदी सिनेमे,सिरियल,मराठी भाषिक राज्यात राहून करतात.
हे लॉजिक प्रमाणे चूक.
असे पण आता बॉलिवूड ची आणि हिंदी भाषिक लोकांची सिनेमा उद्योगातील मक्तेदारी संपली आहे.
दक्षिण भारतीय आणि बाकी भारतीय भाषेतील चित्र पट खूप उत्तम दर्जाचे आहेत.
18 Apr 2022 - 1:15 am | sunil kachure
विदर्भ बाबत चेतन ह्यांनी व्यक्त केलेल्या मतातून विदर्भ वेगळा हवा अशी मागणी करणाऱ्या मागे कोणता समाज आहे हे गुपित उघड होते.
पूर्वी पण खूप लोकांनी ही शंका घेतली आहे .
विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र चे तुकडे व्हावेत असे प्रयत्न मारवाडी समाज करत आहे.
वेगळा विदर्भ चे सूत्रधार हाच मारवाडी समाज आहे.
महारष्ट्र विषयी इथेच ह्याच धाग्यावर किती द्वेष पूर्ण मत व्यक्त झाली.
१)मुंबई मुळे महाराष्ट्र श्रीमंत आहे.
मुंबई महाराष्ट्र ची राजधानी आहे तुम्हाला उठा ठेवी करायची गरज काय.
२) मुंबई ची प्रगती .
गुजराती,मारवाडी,आणि हिंदी भाषिक लोकांनी केला.
ब्रिटिश लोक हेच मुंबई चे विकास करते आहेत.
बाकी लोकांनी फक्त इथे येवून स्वार्थ साधला हे सोयीस्कर विसरले.
३)विदर्भ वेगळा झाला तर २४ तास वीज महाराष्ट्रात नसेल.
म्हणजे ह्या राज्याचे तुकडे झाले पाहिजेत ही इच्छा.
४), हिंदी भाषिक मजूर आहेत म्हणून येथील उद्योग आहेत.
परत महारष्ट्र च द्वेष.
जगात खूप मजूर उपलब्ध आहेत.
हिंदी भाषिक च हवेत काही गरज नाही.
आणि जगात खूप उद्योगपती फायदा होत असेल तर उद्योग उभे करायला तयार आहेत.गुजराती आणि मारवाडी च हवेत असे काही नाही.
हे सत्य परत विसरले.
पण योग्य हवामान,योग्य शांत वातावरण,पाणी वीज ह्यांची सोय .प्रचंड समुद्र किनारा
हे मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही .
हे फक्त महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्य इथेच उपलब्ध आहे.
राजस्थान लं पाकिस्तान लागून आहे वाळवंटी प्रदेश आहे,पावसाची कमी आहे .विषम हवामान आहे.पाण्याची कमी आहे.शिक्षित लोकांची कमी आहे.
किती ठरवले तरी आणि देशात मारवाडी च उद्योगपती असले तरी.
ते राजस्थान लं प्रगत राज्य बनवू शकणार नाहीत.
ना तिथे राहून ते श्रीमंत होणार आहेतं
त्या साठी महारष्ट्र किंवा दक्षिणेतील राज्य हाच एकमेव पर्याय आहे.
यूपी,बिहार मध्ये स्वस्त मजूर आहेत तर मग त्याच राज्यात उद्योगपती उद्योग का उभारत नाहीत.
मुंबई ,पुणे आणि महाराष्ट्रात मध्ये च का उद्योग उभे करतात.
महारष्ट्र वर प्रेम हे कारण नक्कीच नाही.
त्यांचे उद्योग फक्त इथेच उभे राहू शकतात आणि प्रगती करू शकतात .
हे सत्य मात्र तर कधीच स्वीकारत नाहीत.
18 Apr 2022 - 1:21 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे मराठीच महत्व कमी व्हावं अशी
18 Apr 2022 - 1:29 am | चेतन सुभाष गुगळे
बाहुबली तुम्ही बाभळी आहात का?
सदस्यनाम नीट लिहिता येत नाही. कॉपी पेस्ट चा पर्याय देखील आहे. काय तुम्ही मराठीची शान वाढविणार. इंग्रजी ऐवजी हिंदी वापरल्याने मराठीचं महत्त्व कसं कमी होतं यावर एक प्रबंध सादर करुन पीएचडी मिळवा.
18 Apr 2022 - 1:27 am | चेतन सुभाष गुगळे
जांबुवंतराव धोटे (https://bolbhidu.com/jambuvantrao-dhote/) हेनाव कधी ऐकलं नाहीत का? हे पण मारवाडीच होते का? विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा आणि मारवाडी समाजाचा काही एक संबंध नाहीये. पुराव्याखेरीज असंबद्ध विधाने करु नका.
माझ्या मूळ प्रतिसादात मी मारवाडी शब्द वापरलेला नाहीये. तशीही मुंबईत मारवाडी नव्हे तर गुजराती समाजाची संख्या जास्त आहे. मारवाडी फार कमी.
बाकीच्यांनी स्वार्थ साधला आणि इंग्रजांनी उपकार केलेत? कोहिनूरसह अजुन काय काय लुटून नेले आणि तुम्ही त्यांचीच एजंटगिरी करताय. राणी काय तुम्हाला कोहिनूर हिरा ईनाम देणार आहे का?
19 Apr 2022 - 12:11 pm | उपयोजक
या प्रतिसादाशी सहमत आहे.
18 Apr 2022 - 1:28 am | sunil kachure
समुद्र किनारा फक्त बिगर हिंदू भाषा असणाऱ्या राज्यांना च आहे.
महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला सर्वात जास्त आहे.
विदेशी व्यापार ह्या बिगर हिंदी भाषिक राज्यांवर च अवलंबून आहे ह्या मध्ये गुजरात पण येतों
आणि फायदा दिसायला लागला की गुजराती कधी ही पक्षांतर करतील.
हे प्रदेश आहेत म्हणून विदेशी व्यापार आहे.
त्या मुळे बिगर हिंदी भाषा असणाऱ्या राज्यांचा सन्मान ठेवा .
त्यांच्या शिवाय उद्योग,व्यापार मध्ये भारताने प्रगती करणे शक्य च नाही.
उगाच हिंदी थोपवू नका.
त्या पेक्षा कोणती तरी बिगर हिंदी भाषा शिका.
18 Apr 2022 - 1:34 am | चेतन सुभाष गुगळे
मला मराठी उत्तम येते. या धाग्यावर सर्वात जास्त संख्येचे आणि लांबीचे प्रतिसाद माझेच आहेत. बोला या मराठीच्या जोरावर माझं संपूर्ण देशात काम होईल? इंग्रजी किंवा इतर कोणतीही परदेशी भाषा सुचवू नका.
ज्यादिवशी दक्षिणी राज्ये मराठीला दुसरी भाषा म्हणून स्वीकारतील मी हिंदी आग्रह सोडून देईन. इथे कन्नड लोक मराठी कानडी वादात बेळगावात मराठी माणसांची डोकी फोडत आहेत त्यावर उपाय शोधा आधी.
18 Apr 2022 - 1:53 am | sunil kachure
ह्यांचा तो प्रश्न आहे आम्ही तो डोके फोडून सोडवू किंवा प्रेमाने बसून सोडवू.
शेवटी आम्हीच सोडविणार आहोत.
23 Apr 2022 - 1:17 pm | चौथा कोनाडा
¶¶ ज्यादिवशी दक्षिणी राज्ये मराठीला दुसरी भाषा म्हणून स्वीकारतील मी हिंदी आग्रह सोडून देईन. ¶¶
मुद्दा पटला, श्री चेतन सुभाष गुगळे जी.
मराठीचा देश पातळीवर अशा पद्धतीने गवगवा केला तर हिंदी की इंग्लिश हा प्रश्न मिटून जाईल !
18 Apr 2022 - 1:51 am | sunil kachure
बहुभाषिक देश असताना एकच भारतीय भाषेचं महत्व जाहीर पने भारताच्या गृह मंत्र्याने करणेच खूप चुकीचं आहे.
ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय भाषा काही कामाच्या नाहीत असा होतो.
हे वर्तन चुकीचंच होते.
18 Apr 2022 - 9:37 am | चेतन सुभाष गुगळे
की इंग्रजी?
18 Apr 2022 - 12:41 pm | sunil kachure
तुलना केली हिंदी भाषिक आणि दक्षिण भारतीय तर ..
दक्षिण भारतीय जवळचे का वाटत असतात.
1)ते महाराष्ट्रावर त्यांची संस्कृती थोपत नाहीत.त्यांचे रीती रिवाज ते त्यांच्या पर्यंत च मर्यादित ठेवतात.
२)त्यांची भाषा ,संस्कृती मराठी लोकांनी आत्मसात करावी अशी त्यांची बिलकुल प्रयत्न नसतात.
३) ते महाराष्ट्र मधील राजकारणात हस्तक्षेप करत नाहीत.
४) त्यांचे कोणतेच नेते इथे येवून राजकीय भाषण करत नाहीत.
एकदम विचाराने mature samaj aahe.
ह्याच्या विरुद्ध उत्तर भारतीय आहेत
ते त्यांच्या संस्कृती चा जाहीर उदो उदो करतात.
ते येथील राजकारणात हस्तक्षेप करतात.
त्यांचे नालायक काहीच कामाचे नसलेले बिनडोक पुढारी इथे येवून महाराष्ट्र ल शहाणपण शिकवतात.
महाराष्ट्र ची प्रगती आमच्या मुळे झाली असा बकवास ,बिनडोक विचार दक्षिण भारतीय करत नाहीत.
पण पूर्ण उत्तर भारत महारष्ट्र आणि दक्षिण भारतावर च पूर्ण अवलंबून आहे तरी ह्या प्रगत राज्यांची प्रगती आमच्या मुळे झाली असेल बकवास दावे हे अशिक्षित लोक करत असतात.
18 Apr 2022 - 12:48 pm | sunil kachure
पंजाब,हिमाचल,बंगाल,कश्मिर ,७ सिस्टर, आसाम ,ओरिसा सोडून बाकी सर्व राज्य
Mp सहीत बाकी राहिलेली सर्व राज्य
गुजरात उत्तर भारतात येत नाही.
28 Jun 2023 - 7:03 pm | वेडा बेडूक
के सी आर आलेत.
18 Apr 2022 - 10:13 pm | sunil kachure
देशांनी प्रगती करावी,सर्व राज्यांनी एक मेकाशी प्रेमाने राहवे,सर्व भाषांचा सन्मान व्हावा.
आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना देशातील कोणत्याच व्यक्ती मध्ये निर्माण होवु नये...देश एकसंघ असावा.
असेच महाराष्ट्र लं वाटते.
ह्या सर्व बाबी ची जबाबदारी केंद्र सरकार ची आहे.
आणि ही जबाबदारी पक्ष विरहित अडविम
केंद्रात कोणत्या ही पक्षाचे सरकार आले,राज्यात कोणत्या ही पक्षाच सरकार अस्ले तरी जबाबदारी कोणी विसरू नये
देशभर ग्रामीण भागात रोजगार,शेती आणि शेतीवर आधारित उद्योग ना मदत.
देशभर ग्रामीण भागात सर्व सुविधा
झाल्या पाहिजेत .जेणे करून लोक स्थलांतर करणार नाहीत .
कोणत्याच राज्याला ,कोणत्याच भाषिक लोकांना असुरक्षित वाटणार नाही.
ही काळजी घेतली जावी.
उत्तर भारतात केंद्र सरकार नी सक्ती दाखवून विकास योजना राबवाव्यात .
असुरक्षित वाटले की लोक विरोध करतात.
महाराष्ट्रात खूप प्रमाणात बाहेरील लोक येतात त्या मुळे महाराष्ट्र अस्वस्थ होतो.
जी राज्य प्रगती करतात त्यांची हीच अवस्था होते
कारण समतोल विकास होत नाही.
असुरक्षित वाटणे देशासाठी नक्कीच चांगले नाही.
19 Apr 2022 - 11:18 am | चौथा कोनाडा
भाषिक चर्चेच्या अनुषंगाने अवांतर
एक होतं गाव.
"महाराष्ट्र" त्याचं नाव.
गाव खूप छान होतं,
लोक खूप चांगले होते.
"मराठी" भाषा बोलत होते,
गुण्यागोविंदानं नांदत होते.
त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं.
वृत्ती खूप दयाळू होती.
दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.
आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ
देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे,
महाराष्ट्रात होता एक भाग.
"मुंबई" त्याचं नाव.
मुंबईसुद्धा छान होती;
महाराष्ट्राची शान होती.
सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.
आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते.
इथं आले, की इथलेच होऊन राहत होते.
"अतिथी देवो भव...!"
या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.
पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.
हळूहळू परिस्थिती बदलू लागली.
"अतिथी" जास्त आणि "यजमान" कमी झाले.
मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.
मराठी आपली वाटत नव्हती.
प्रश्न मोठा गहन होता,पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.
त्यांना एक युक्ती सुचली.
दूरदेशीची परदेशातील
भाषा त्यांना जवळची वाटली.
त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच,अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल, म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.
आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.
आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली,
आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना,
बोलीभाषा ही बदलली.
सगळ्याचा नुसता काला झाला.
शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला.
?
?
?
?
?
?
?
?
?
अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर
माफ करा हं........
आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा वाचनालयात गेला.
चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडलं, त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,
पानं फडफडली, आनंदित झाली.
त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.
इतक्यात त्या मुलानं
विचारलं, (त्याच्या भाषेत)
"मम्मी" कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे ?''
'मम्मी' खूप सजग होती,
मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.
पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, "अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस,
"मराठी भाषा" प्रचलित होती;
आता कोणी नाही ती बोलत.
पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,
पानांपानांतून अश्रू ठिबकले;
पण...................
हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण, आता मराठी साठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.!!
महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!!!
मला एकानी विचारले तू मराठीत का 'पोस्ट' टाकतो....??? आणि,
मी त्यांना एवढंच म्हटलं,
आमच्या घरात "तुळस"आहे,
'Money plant'नाही.
आमच्या घरच्या स्त्रीया "मंदीरात" जातात,
'PUB' मध्ये नाही.
आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या डायरेक्ट गळ्यात मिठी मारत नाही.
आम्ही "मराठी" आहोत,
आणि मराठीच राहणार !!!
तूम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय
मराठीतूनच देतो,
याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही,
अर्थ असा आहे की, मी आपल्याला मराठी शिकवतोय.
अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा...
"तुळशी" ची जागा आता
'Money Plant' ने घेतलीय...!!
"काकी" ची जागा आता 'Aunti' घेतलीय...!!!
'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.
अजुन बरंच काही आहे, आणि तुम्ही आत्ताच Glad झाले....???
"भाऊ" 'Bro' झाला...!!
आणि "बहीण " 'Sis'...!!!
दिवसभर मुलगा "CHATTING" च करतो... नाही तर रात्री झोपताना Mobile वर 'SETTING' पण करतो...!!!
दुध पाजणारी "आई" जिवंतपणीच 'Mummy'झाली.!!
घरची "भाकर" आता कशी आवडणार हो...
५ रु. ची 'Maggi' आता किती "Yummy" झाली...!!!
माझा मराठी माणूसच "मराठी" ला विसरू लागलाय....
आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करा !!!
सौजन्य: कायप्पा ढकलपत्र
19 Apr 2022 - 12:56 pm | कॉमी
सगळं भाषेबद्दल असताना मध्येच स्त्रियांनी पब मध्ये जाण्याचा विषय का घुसाडला असेल बुवा ?
19 Apr 2022 - 1:40 pm | श्रीगुरुजी
"रिकामी"ची जागा "खाली" झाली, "शिमग्या"ची रंगपंचमी झाली, "सवाल"च्या बाबतीत "प्रश्न"च नव्हता!
19 Apr 2022 - 2:41 pm | sunil kachure
भाषा हा विषय खूप संवेदनशील आहे.
धार्मिक संघर्ष जितके नुकसान करू शकतो त्या पेक्षा जास्त नुकसान भाषिक संघर्ष मुळे होईल.
धर्माबाबत लोक जशी आक्रमक असतात तशीच ती भाषे विषयी असतात.
आता च्या आधुनिक काळात प्रगत युरोपियन देशात सुद्धा भाषिक वादविवाद होत आहेत.
कॅनडा मध्ये पण भाषेवरून वेगळा प्रदेश मागतील जातो .
बांगला देश आणि पाकिस्तान वेगळेवेगळे
झाले त्याला भाषा हेच कारण आहे.
देशात 50% वर बिगर हिंदी लोक आहेत त्यांची भाषा हिंदी नाही.
आणि ही सर्व राज्य अशा ठिकाणी वसली आहेत की त्यांच्या विना ,त्यांच्या मदती विना भारत प्रगती करूच शकणार नाही.
ह्याचा अर्थ ते देशावर प्रेम करत नाहीत असा नाही..
पण हिंदी ची जबरदस्ती झाली तर मात्र विरोध होणारच च..
भले आता तमिळ सोडून बाकी राज्यांनी प्रतक्रिया दिली नाही ह्याचा अर्थ त्यांची संमती आहे असा नाही.
हिंदी अशीच देशावर लादली तर मात्र बिगर हिंदी राज्य तीव्र विरोध करतील.
बंगलोर, चेन्नई,मुंबई,पुणे,हैद्राबाद, कलकत्ता,अहमदाबाद,सुरत अशा अनेक बिगर हिंदी प्रदेशातील शहर च भारताचे पॉवर इंजिन आहेत.
आणि ह्या प्रगत शहरात उत्तर भारतातील लोक पोट भरायला जात आहेत आणि त्या त्या शहरातील मूळ संस्कृती मध्ये बदल करत आहेत.
आणि हे कोणाला आवडत नाही.
प्रगती करणे म्हणजे गुन्हा करणे असे वाटायला लागले आहे.
मुंबई सोडा प्रतेक बिगर हिंदी राज्यातील शहरात येणाऱ्या उत्तर भारतातील हिंदी लोकांमुळे असंतोष आहे.
हिंदी लादणे हे फक्त कारण होईल आणि विरोध रस्त्यावर दिसेल.
19 Apr 2022 - 4:15 pm | sunil kachure
मुंबई मध्ये जे मराठी लोकांना त्रास दायक वाटत आहे.
तसे अनेक शहरात तेथील स्थानिक लोकांना त्रास दायक वाटत आहे .
बंगलोर ची प्रगती होत आहे देशभरातील लोक तिथे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत.
पोट भरणे हाच एकमेव हेतू बंगलोर प्रगत होण्यासाठी कोणी तिथे जात नाही.
कन्नड लोक पण सेना किंवा ठाकरे सारखा विरोध तिथे नक्कीच करणार.
विविध देशात पण स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद वाढत च जाणार आहे
स्थलांतर असावे पण किती?
ह्याला मर्यादा असावी.
अनियंत्रित स्थलांतरित लोकांमुळे मुंबई च नाही तर जग अस्वस्थ होत आहे.
तशा हिंसक प्रतिक्रिया पण जग भर होत आहेत.
स्थलांतर किती असावे ह्या वर नियम बनणे गरजेचे आहे...
पूर्ण बिहार ,आणि पूर्ण यूपी मधील तरुण पिढी देशभर जात आहे
आणि देशाच्या एकते ला ह्या यूपी बिहारी मुळेच धोका निर्माण होईल..
कोणाला आता पटणार नाही पण हे सत्य च आहे.
20 Apr 2022 - 3:02 pm | चौथा कोनाडा
बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे जैनांवर हल्ला केला, पण अरेबिक मधील बॅनरवर का काहीच प्रतिक्रिया नाही ? - तेजस्वी सूर्या
स्थानिक कन्नड भाषाप्रेमींना सवाल.
https://www.dnaindia.com/india/report-deeply-hurt-by-attack-on-jains-ove...
20 Apr 2022 - 8:44 pm | sunil kachure
हिंदी वापरा हे अमित शाह ह्यांचे वक्तव्य ह्याला जबाबदार आहे.
बिगर हिंदी भाषा असलेली लोक अस्वस्थ झाली म्हणून हा प्रकार घडला असावा.
आता पर्यंत कधीच असे घडले होते का?
दर वर्षी हिंदी मध्येच जैन समाज बॅनर लावत असतील.
21 Apr 2022 - 8:09 am | उपयोजक
21 Apr 2022 - 12:23 pm | चेतन सुभाष गुगळे
https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/mcd-demolition-in-jahangirp...
या मारुतमाया मोहाचा एक भाग म्हणजे इतके दिवस मराठीच्या नावाने छाती पिटणाऱ्यांस मराठीतील मारुतीस्तोत्र न आठवता हनुमान चालीसा गोड वाटू लागली. उत्तर भारत तर हिंदी भाषकच. त्यामुळे तेथे हनुमान चालीसा पठण हे ओघाने आलेच.
21 Apr 2022 - 12:29 pm | सौंदाळा
यावर मला असे वाटते की स्वतःची देशपातळीवर दखल घेतली जावी म्हणूनच मारुतीस्तोत्राच्या ऐवजी हनुमान चालीसाची निवड केली असावी.
तसाही आता राज ठाकरेंना अयोध्या दौरा पण करायचा आहे. त्यामुळे ते या सगळ्या खेळ्या व्यवस्थित प्लॅन करुनच करत आहेत.
21 Apr 2022 - 12:46 pm | चेतन सुभाष गुगळे
म्हणजे देश पातळीवर दखल घेतली जावी याकरिता हिंदीची गरज आहे तर...
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही.
म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे.
महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही. महाराष्ट्र काँग्रेस तर कधीही हिंदी विरोध करुच शकणार नाही. सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल. रिपाई, समाजवादी आणि एमायएम देखील हिंदीविरोध करताना कधी पाहिले नाही. अबू आझमींनी तर कानाखाली खाल्ली पण शपथ हिंदीतच घेतली. आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीत.
एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीय.
21 Apr 2022 - 12:58 pm | sunil kachure
तुम्ही हेका सोडा .देशपातळीवर जाण्यासाठी हिंदी ची बिलकुल गरज नाही.
तुमचे खासदार किती आहेत त्याला महत्व आहे.
महाराष्ट्र मध्ये मराठी फर्स्ट ही भूमिका घेवून सेने नी किंवा कोणत्या ही पक्षाने 48 पैकी 40 जागा मिळवल्या.
प्रतेक बिगर हिंदी प्रदेशातील राजकीय पक्षांनी भाषिक अस्मिता जागृत करून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकल्या तर भारताचे सरकार त्यांच्या विना बनुच शकत नाही.
हिंदी आणि देशपातळीवर महत्व ह्याचा काही संबंध नाही.
राज ठाकरे काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे.
21 Apr 2022 - 1:09 pm | sunil kachure
ज्याला कोणताच base नाही असा आपला हट्ट आणि आपली मत विनाकारण इथे व्यक्त करत आहात.
अनेक कॉमेडियन लोकांनी ह्या वर अनेक mims पण निर्माण केले आहेत.
उत्तर भारतीय लोकात एक गुण असतो त्यांचे किती ही खोटे,चुकीचे असू ध्या. मीच बरोबर अशी त्यांची भाषा असते .
लालू ना एका पत्रकार नी विचारले.
बिहार मध्ये तुम्ही इतके दिवस सत्तेत आहात तरी बिहार हा अतिशय गरीब कसा.
त्यांचा उत्तर भारतीय खास गुण उभाळून आला आणि त्यांचे उत्तर.
बिहार काय अमेरिकेत पण गरीब लोक आहेत.
पण अमेरिकेत जे गरीब असतात त्यांच्या कडे एक च कार असते आणि बिहार मध्ये जे गरीब आहेत त्यांच्या कडे सायकल मध्ये नसते.
फरक आहे.
मूळ पॉइंट वर परत.
आंध्र प्रदेश. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही.
तमिळ nadu राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही.
केरळ. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही.
बंगाल. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही.
महारष्ट्र. राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाही.
तेलंगणा राष्ट्रीय पक्षाची सत्ता नाहीं
अजून अनेक राज्य आहेत..
हिंदी आणि राष्ट्रीय राजकारण आणि सत्ता ह्याच संबंध जोडला तर.
अर्ध्या भारतात राष्ट्रीय पक्ष सत्तेवर नसतील.
आणि अर्धे लोकसभेचे सभासद हिंदी विरोधी असतील.
21 Apr 2022 - 1:22 pm | sunil kachure
अमित शाह आणि प्रधान मंत्री मोदी गुजरात चे आहेत.
ते हिंदी साठी मगरीचे अश्रू गाळत आहेत.
त्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे.
त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी.
गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.
हिंदी ही गुजरात ची राज्य भाषा आहे इतकेच फक्त हवेत जरी.
अमित शाह किंवा मोदी बोलले तरी भविष्यात कधीच bjp गुजरात मध्ये निवडणूक जिंकू शकणार नाही.
21 Apr 2022 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
जाऊद्या. गुगळे सरांची फक्त “आपले” हिंदी भाषीक लोक महाराष्ट्रात ऊरावर बसावे अशी ईच्छा आहे. त्यासाठी ते प्राणपणाने मराठीला विरोध नी हिंदी ला समर्थन देत आहेत. स्वत घरात मारवाडीच बोलनार.
21 Apr 2022 - 2:00 pm | sunil kachure
मारवाडी बोलून किंवा मारवाडी च अभिमान बाळगून बाकी राज्यात कोणताच व्यवसाय करता येणार नाही
म्हणून अतिशय जड अंतःकरणाने लोकल भाषा आणि वेळ पडली तर हिंदी स्वार्थासाठी प्रेम म्हणून नाही
बोलून स्वतःचा स्वार्थ साधणार हाच एकमेव हेतू.
21 Apr 2022 - 9:42 pm | उपयोजक
मारवाडी बोलून किंवा मारवाडी च अभिमान बाळगून बाकी राज्यात कोणताच व्यवसाय करता येणार नाही
म्हणून अतिशय जड अंतःकरणाने लोकल भाषा आणि वेळ पडली तर हिंदी स्वार्थासाठी प्रेम म्हणून नाही
बोलून स्वतःचा स्वार्थ साधणार हाच एकमेव हेतू.
सहमत आहे.
21 Apr 2022 - 5:54 pm | चेतन सुभाष गुगळे
हे कुठं दिसलं? डोळे खराब आहेत की मेंदू खराब आहे की मी जे मराठीत प्रतिसाद लिहिलेत ते समजण्याची पात्रता नाही?
माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादांमध्ये केवळ इंग्रजी ऐवजी हिंदी असं लिहिलंय मी. मराठीऐवजी हिंदी असं कुठे दिसलं? का उगाच काहीही खोटं पसरवायचं?
मी घरात कोणती भाषा बोलावी ह्याचा इथे काय संबंध? इथे तुम्हाला आणि इतरांना समजेल इतकं चांगलं मराठी मी लिहितोय ना?
वैयक्तिक टिपण्णी हा निव्वळ फालतूपणाच झाला.
तेच करायचं झालं तर मग,
तुमची इथली वैयक्तिक माहिती एकदा स्वत:च वाचा -
तुम्ही अमरेंद्र बाहुबली हे सदस्यनाम का घेतलंत?
या दक्षिण भारतीय चित्रपटातल्या पात्राविषये तुम्हाला इतके प्रेम का?
मराठी चित्रपटातल्या पात्राविषयी तुम्हाला असं प्रेम / अभिमान का नाही?
तुम्ही मूळ मराठी नसून दक्षिण भारतीय आहात किंवा त्यांच्या ठायी तुमची निष्ठा आहे असं समजावं का?
त्यामुळेच तुम्ही प्राणपणाने हिंदी या भारतीय भाषेला विरोध आणि इंग्रजी या परकीय भाषेला समर्थन देत आहात का?
तुम्ही गुलामी मनोवृत्तीचे आहात काय?
इंग्रजांचे हस्तक आहात काय?
पुन्हा देशावर इंग्रजांचे राज्य यावे अशी तुमची इच्छा आहे काय?
असले प्रश्न उपस्थित करता येतील, पण मी असले प्रश्न उपस्थित करणार नाही कारण तुमच्या वैयक्तिक / खासगी बाबींचा इथे उल्लेख अनुचित ठरतो. इतका किमान सभ्यपणा निदान मी तरी पाळतो.
असो. इथे वैयक्तिक माझं मत सोडा मराठी नेत्यांचं याबाबत काय मत आहे? हे पाहा. मी वर सर्व सात प्रमुख पक्षांबाबत लिहिले आहे. कोणाचाच इंग्रजीऐवजी हिंदीला विरोध नाहीये. हे नेते / त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलेले असल्याने त्या नेत्यांचे मत हे महाराष्ट्राचे अधिकृत मत मानावे लागेल. तुम्हांस मान्य नसल्यास तुम्ही या नेत्यांऐवजी दुसर्या नेत्यांना निवडून द्या.
जोपर्यंत महाराष्ट्रातील या सात (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी, रिपाईं, मनसे) मुख्य पक्षांचे मत इंग्रजी वि. हिंदी या वादात हिंदीसोबत आहे तोवर मला इथे या धाग्यावर तुमच्यासोबत पुन्हा वेगळा युक्तिवाद करायची गरज नाहीये आणि उपयोग देखील नाहीये.
30 Apr 2022 - 6:30 pm | रंगीला रतन
महामूर्खपणाचा कळस आहे हा प्रतिसाद.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
असे धागाकर्त्याने लिहिले आहे ते वाचायची तसदी घेतली की नाही भौ? घेतली असती तर इतका फालतू प्रतिसाद लिहिला च नसता तुम्ही
त्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे.
त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी.
गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.
21 Apr 2022 - 2:21 pm | श्रीगुरुजी
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही.
हिंदी विरोधाचा अजिबात संबंध नाही. नरसिंहराव व देवेगौडा हे राष्ट्रीय पक्षात असल्याने पंतप्रधान होऊ शकले. इतर वजनदार दक्षिण भारतीय नेते स्थानिक प्रादेशिक पक्षात असल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाही. देवेगौडांना हिंदी येत नसूनही ते पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी बाळ ठाकरे व पवारांसोबत साटंलोटं करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सीताराम केसरींनी त्यांना जायला लावले. ते जाण्यामागे हिंदीविरोध किंवा हिंदी न येणे हे कारण नव्हते.
म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे.
भ्रम आहे.
महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही.
आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही हे पवार व ठाकरे ओळखून आहेत. महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मतांसाठी हे हिंदीला विरोध करीत नाहीत.
सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल.
असं काही होणार नाही. हिंदी भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्यांनी मराठीतले भाषण वाचले तर थोडीफार मते वाढू शकतील.
आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीत
आठवलेंना इंग्लिश येत नसणार. ते कविता वगैरे करीत नाहीत. ट ला ट, फ ला फ जोडून काहीतरी आचरटपणा करतात.
एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीय
यात काहीच आश्चर्य नाही. मनसे मराठीवादी पक्ष होता/आहे यावर मी कधीही विश्वास ठेवला नव्हता. सातत्याने भूमिका बदलून व कोलांट्या उड्या मारून राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता शून्य करून ठेवली आहे. भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.
21 Apr 2022 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली
भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.
भाऊ तोसरेकर हे नाव दिसले की मन हळवे होते, म्हणजे अनेक स्तंभ, तुनळी विडीओ बनवूनही पद्मश्री कुणाला दिला भाजपने तर कंगनाला. प्रामाणीक कार्यकरनार्यांवर भाजप पक्ष नेहमी अन्याय करत आलाय. भाजपसाठी फक्त एक स्टेटमेंट देऊनही कंगना पद्मश्री पटकावते ना कितीतरू तुनळी चित्रफीता तयार करूनही भाऊंना काहीच नाही. अधून मधून देश, देशातूल नागरीकानाही भाजप पक्ष पद्मश्री देतो ह्याबदल्यात देशाने त्यांचे नी माननीय नकेंद्र मोदीजींचे ऊपकार मानायला हवेत.21 Apr 2022 - 7:28 pm | कॉमी
भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार पद्म पुरस्कार ? ते काय वार्ताहर नाहीत की काहीतरी माहित नसलेली बातमी आणतात. ते घरी बसून बातम्या वाचून त्यावर टिप्पणी करतात. कंगना राणावत निःसंशयपणे भाऊ तोरसेकरांपेक्षा तिच्या क्षेत्रात जास्त गुणवान आहे.
21 Apr 2022 - 7:41 pm | चेतन सुभाष गुगळे
सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?
21 Apr 2022 - 7:53 pm | sunil kachure
पद्मश्री कशी वाटली जाते हे काही गुपित नाही.
त्याचे कौतुक कशासाठी.
फिल्म लाईन मध्ये ऑस्कर मिळणे खरे कसोटी च .
तिथे कसं लागतो.इथे चमचेगिरी लागते.
21 Apr 2022 - 8:03 pm | अमरेंद्र बाहुबली
सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?
पण भाजपसाठी राहलं कोण जास्त? कंगना की भाऊ?? बाकी कोरोनात अणेक लोकानी जनतेची सेवा केली पण भाजपपक्षाची केली नाही म्हणून पद्मश्रीस मुकले.
21 Apr 2022 - 9:54 pm | उपयोजक
सडेतोड!!!!
21 Apr 2022 - 9:25 pm | उपयोजक
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत.
मग दक्षिण भारतीय भाषांना विरोध असल्यानेच काँग्रेस आणि भाजप तमिळनाडूत स्वबळावर येऊ शकले नाहीत असे म्हणता येईल की.
21 Apr 2022 - 12:38 pm | sunil kachure
देशपातळीवर चे नेते बघितले काही मोजके सोडून .
तर असे लक्षात येईल ह्या देशपातळीवर च्या नेत्यांना स्वतःचे होम स्टेट मध्ये काहीच किंमत नसते.
ह्या देशपातळीवर असणाऱ्या नेत्यांचे स्वतःचे राज्य, अगदी स्वतःच मतदार संघ पण अतिशय मागास असतो सर्व सुविधा पासून वंचित असतो.
आणि हे नालायक देशाच्या सरकार मध्ये असतात.
काय देशाची प्रगती करणार.
ज्यांना स्वतःचा मतदार संघ सुधारता येत नाहीं.
21 Apr 2022 - 2:46 pm | sunil kachure
खोटी ,कमजोर बाजू असून पण माझीच लाल म्हणून हिंदी भाषा असणारे हिंदी चे गुणगान गटार तेव्हा कधी कधी देश हीत विसरून भाषा
लाच महत्व देवून भूमिका घ्यावी असे वाटते.
भारत सरकार कडे टॅक्स किंवा बाकी मार्गाने येणारा पैसा ह्याचा डेटा बघितला तर हिंदी भाषिक राज्यांपेक्षा हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यांचा हिस्सा खूप म्हणजे खूप जास्त आहे.भारत सरकार,भारतीय लष्कर किंवा भारताची कोणतीही संस्था फक्त हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यांवर च अवलंबून आहे.
हवं तर
हिंदी भाषिक राज्यातून केंद्राला मिळणारा महसूल आणि हिंदी भाषा नसणाऱ्या राज्यातून केंद्राला मिळणारा महसूल
हे Google वर सर्च करा
काहीच देश उपयोगी नसून ह्यांची च लाल
करताना बुद्धी गहाण ठेवली जात असेल का ?
21 Apr 2022 - 9:07 pm | चौथा कोनाडा
व्वा, क्या बात, सुका साहेब ! "हिंदीला अंध विरोध नको" या मुद्द्याला चक्क गुणगान गटारीकडे नेऊन ठेवलेत !
21 Apr 2022 - 9:58 pm | sunil kachure
हिंदी ही खूप कमी लोकांची भाषा आहे.
पंजाब,हरियाणा,राजस्थान,यूपी (मधील अनेक भाग),हिमाचल प्रदेश,बिहार,झारखंड, chhatisgadh ,हे हिंदी भाषा बोलणारी राज्य नाहीत ..ह्या राज्यातील खूप मोठा समाज हा हिंदी बोलत च नाही.
त्यांची प्रतेकाची भाषा वेगळी आहे आणि त्या ज्या भाषा आहेत त्यांचे हिंदी शी कोणतेच साधर्म नाही.
Jharkhandi भाषा मी ऐकली आहे हिंदी चा त्या भाषेशी काहीच संबंध नाही.
तसेच राजस्थानी,हरियानी,पंजाबी मिथिली,ह्या आणि अशा अनेक भाषा बोलणारे लोक च तिथे जास्त आहेत.
आपली लोक थोडे तरी हिंदी समजतील पण वरील राज्यातील गाव खेड्यात राहणाऱ्या लोकांना आपल्या इतके पण हिंदी समजत नाही.
असा माझा अंदाज आहे.
22 Apr 2022 - 3:25 am | सुक्या
अभ्यास वाढवा ...
हे वाचा .. https://web.archive.org/web/20161115133948/http://nclm.nic.in/shared/lin...
22 Apr 2022 - 1:25 pm | sunil kachure
१) माझ्या कडे १९२० च ओरिजनल जमिनी खरेदी खत आज पण आहे .
त्या मध्ये वापरलेली भाषा मराठी नाही तर मोडी आहे.
आणि राजस्थानी भाषा पण मोडीत च लीहली
जायची असे विकी सांगतो.
भारताच्या अनेक प्रांतात पण मोडी लिपी अस्तित्वात असू शकते.
२) बडोदा मध्ये सयाजीराव गायकवाड, इंदोर मध्ये शिंदे आणि होळकर घराणे,तमिळ nadu तंजावर मध्ये मराठी साम्राज्य ची सत्ता.
ह्या आणि अशा अनेक ठिकाणी मराठी राजे राज्य करत होते त्यांची राज्यकारभार ची भाषा कोणती असावी असा प्रश्न मला नेहमी पडतो.
त्यांनी नक्कीच राजाची भाषा म्हणून मराठी हीच राज्य कारभार ची भाषा अशी सक्ती केली नसणार.
स्थानिक भाषेत च राज्य कारभार होत असावा.
त्यांना काहीच अडचण आली नसावी कारण संस्कृती,भाषा लादणे अशी तेव्हा वृत्ती नव्हती.
आताची काही वर्ष सोडली तर पूर्वी भाषिक संघर्ष झाल्याचे कुठेच वाचलेले आठवत नाही.
३)तेच मुघल साम्राज्य विषयी ते हिंदी नाही तर उर्दू आणि फारसी ,अफगाणी,भाषिक होते.
पण त्यांचा पण भारतात विविथ भाधिक जो राज्यकारभार चालत असेल तो स्थानिक भाषेत च.
त्यांनी स्थानिक भाषेला सन्मान दिल्या मुळे भाषा हा पहिला कधी वादाचा विषय नव्हत्या.
तेव्हा हेतू साफ होते.
पण आता भाषा पहिली लादली जाते किंवा फसवून लोकांना शिकवली जाते,नंतर त्याच भाषिक लोकांची संस्कृती येते .आणि शेवटी त्यांचीच सत्ता येते.
हे सूत्र धोकादायक वाटत म्हणून भाषा स्वीकारली जात नाही.
विचार करा.
हिंदी आणि मराठी मध्ये काय फरक आहे?
दोन्ही भाषा देवनागरी मध्येच लिहल्या जातात.
दोन्ही भारत जवळ जवळ ५०% पेक्षा जास्त सामान शब्द आहेत त्यांचे अर्थ दोन्ही भाषेत एकच आहेत.
मराठी लोक जे बिलकुल शाळेत गेले नाहीत.हिंदी शी त्यांचा कसलाच संबंध नाही.
तरी हिंदी समजतात कारण दोन्ही भाषेत असणारी समानता.
पण
हा पण खूप महत्वाचा आहे आणि ह्याला अनेक राजकीय, वर्चस्व वादी अर्थ आहेत.
हिंदी भाषा असणारे ,शिकलेले,अडाणी लोक पण सोडा.
मराठी आणि हिंदी मध्ये इतके साम्य असून पण मराठी समजत नाहीत ह्याचा अर्थ काय?
माझे मत .जर अडाणी मराठी लोकांना जे शिकलेले नाहीत ये..त्यांना हिंदी समजत असेल तर ह्या जे शिक्षित हिंदी भाषा वाले आहेत त्यांना मराठी समजायला काय अडचण आहे.
उत्तर.
काहीच अडचण नाही.
फक्त स्व भाषा म्हणजेच श्रेष्ठ हा फालतू गर्व.
दुसऱ्या भारतीय भाषे विषयी कमी पणाची भावना.
हीच कारण आहेत.
अडगे पना.
एका शब्दात.
जर हे हिंदी भाषा असणारे
Adge वागत असतील तर बाकी लोकांनी का समजदार पना दाखवावा.
सरळ प्रश्न आहे.
22 Apr 2022 - 1:39 pm | sunil kachure
आता काही वर्षात भारतात भाषा द्वेष जास्त वाढलेला आहे..
ह्याची कारण वेगळी आहेत .
चेतन किंवा जे हिंदी ची बाजू घेत आहेत ते समजत आहेत ती कारण नाहीत
पूर्वी ची मुंबई थोडी आठवत आहे बाकी ऐकलेली आहे..
चाळीत राहणारे. शेजारी असणार
मराठी कुटुंब आणि यूपी चे कुटुंब..
ह्यांच्या बायका ह्या ग्रामीण भागातील च असतं..
पुरुष इथे नोकरी करायचे.
तर ह्या दोन यूपी आणि मराठी बायका ज्यांना एकमेकाची भाषा येण्याचा संबंध च नाही...
तरी त्या संवाद साधायचा.
यूपी ची बसी भोजपुरी मिश्रित हिंदी.
आणि मराठी बाई विभागानुसार मराठी मध्येच बोलायच्या.
दोघी स्वतःच्या भाषेत च बोलायच्या पण दोघी
एकमेकाची भाषा समजून घ्यायच्या.
काही अडचण नाही.
जिथे समजत नाही तिथे हातवारे.
पण तेव्हा प्रचंड प्रमाणत हिंदी भाषा असणारे इथे नव्हते ..त्या मुळे त्यांची भीती वाटत नव्हती.. आता प्रचंड प्रमाणात हिंदी भाषा बोलणारे इथे आणि देशातील अनेक भागात जात आहेत ..त्या मुळे अस्वस्थ वाटत आणि त्या मुळे भाषा द्वेष निर्माण होतो.
असुक्षित पणाची भावना नॉन हिंदी राज्यात आहे त्या मुळे हिंसक प्रतिक्रिया पण उमटतात.
22 Apr 2022 - 2:09 pm | sunil kachure
Amit शाह बोलत आहेत ते पूर्णतः राजकीय विधान आहे.खरी समस्या खूप वेगळी आहे.
भाषा द्वेष किंवा कोणती भाषा संपर्क भाषा असावी ही समस्या च नाही.
राजस्थान ची लोकसंख्या ८, करोड आहे ह्या मध्ये ह्या मध्ये ३० करोड परप्रांतीय लोक तिथे आली असती आणि त्यांची भाषा हिंदी असती तर राजस्थान सुध्धा हिंदी च कट्टर विरोधी झाला असता त्यांनी राजस्थानी भाषा चाचं आग्रह धरला असता.
अमित शाह ह्यांच्या गुजरात ची लोकसंख्या ७, करोड आहे..त्यांच्या राज्यात ३०% तमिळ भाषिक लोकांनी आपले बस्तान बसवले असते किंवा 30% हिंदी भाषिक लोक तिथे असते.
तर .
.देश गेला खड्यत त्यांनी गुजराती सोडली च नसती.
महाराष्ट्र मध्ये आज जवळ जवळ 32% लोक
ही मराठी नाहीत.
तरी महाराष्ट्र आणि मराठी लोकांनी देशप्रेम दाखवाव आणि स्वतःच्या भाषेचा अभिमान सोडून सर्वनाश ओढवून घ्यावा ही देशाच्या गृह मंत्र्यांची इच्छा असेल तर ते राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत.
जसे चर्चिल बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या बिलकुल लायकीचे नाहीत.
हे सत्य च वाटत जेव्हा देशाचा गृह मंत्री असले सल्ले देतो तेव्हा.
महारष्ट्र सारखीच दक्षिण भारत मधील शहरांची अवस्था आहे..त्या दक्षिण भारतीय अस्वस्थ आहेत..ते विरोध करणार च ..
ह्या सर्वांच्या भावना समजून घेवून केंद्रांनी लाँग टर्म योजना आखल्या पाहिजेत.
हिंदी भाषिक मागास राज्यात बाकी भाषिक जात च नाहीत..त्या मुळे त्यांना ह्या प्रश्नाची तीव्रता माहीत नाही.
22 Apr 2022 - 2:36 pm | sunil kachure
राजस्थान - ३० करोड च्या जागी ३०% असे वाचावे.
22 Apr 2022 - 2:27 pm | sunil kachure
भाषिक वाद हा विषय लाईटली घेवू नये ..दीर्घ कालीन पण steady योजना आखून.
आंतरदेशीय migration कमी होईल अशा योजना आखव्यात .
भले बजेट मधील जास्त पैसे ह्या योजनांवर खर्च झाले तरी चालतील
स्वतः केंद्रांनी त्या योजना राबवाव्यात राज्यांना सहभागी करून घेवू नये.
वरवर दिसणारा हा भाषिक वाद अनियंत्रित स्थलांतर च परिणाम आहे.
तो पण एकाचं दिशे नी.
हिंदी भाषिक राज्य आणि हिंदी भाषा नसणारे राज्य..आताच योजना आखल्या नाहीत.उपाय योजना केल्या नाहीत तर स्थिती अतिशय गंभीर होवू शकते.
अनेक विद्वान लोकांनी पण हा इशारा दिलेला आहे.
रिॲलिटी आपण समजून घेतलीच पाहिजे.
आणि वेळ येण्या अगोदर स्थिती कशी सुधारेल ह्याचा विचार करावाच लागतो.
ह्याला च उत्तम राज्य करते म्हणतात.
22 Apr 2022 - 5:02 pm | कॉमी
रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि कादंबरी हिंदीमध्ये अनुवादित वाचलेली.
त्यातली हिंदी अगदी साजूक होती- संस्कृतप्रचुर शब्द असलेली. तशी सुद्धा हिंदी असते.
22 Apr 2022 - 6:02 pm | चेतन सुभाष गुगळे
https://www.youtube.com/playlist?list=PLUiMfS6qzIMyMuVAE36V44twlTqiuniS5
दूरदर्शन वरच्या हिंदी निर्मात्यांनी ८० व ९० च्या दशकांत अनेक बंगाली (जशी ब्योमकेश बक्षी आणि आता ही गोरा) आणि दक्षिण भारतीय (मालगूडी डेज्) यासारख्या अनेक प्रादेशिक भाषांमधील कलाकृतींचा हिंदीत अनुवाद करुन सादरीकरण केल्यानेच भारताच्या एका प्रांताला दुसर्या प्रांताची अगदी जवळून ओळख झाली. भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.
22 Apr 2022 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली
भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.
किती दक्षीणेतील भागातूल लोकानी हिंदीतील ब्योमकेश बक्षी पाहीली??
भारतीय एकात्मतेसाठी हिंदीची आजिबात आवश्यकता नाही. भारतीय एकातिमतेच्या नावाखाली हिंदी लादायचा डाव आजिबात साध्य होनार नाही. हिंदीचा जन्म १५० वर्षा आधीचा त्या आधीही भारत होता बरका.
22 Apr 2022 - 6:17 pm | श्रीगुरुजी
याने कसली एकात्मता साधली आणि यात हिंदीचे कसले योगदान? तेव्हा राष्ट्रीय दूरदर्शन ही एकच वाहिनी होती व त्यावर फक्त हिंदी कार्यक्रम असायचे म्हणून हिंदीत अनुवाद केला. दूरदर्शनवर इतर भाषांना संधीच देत नव्हते. यातून काही एकात्मता साधली गेली असती तर अहिंदी राज्यातून हिंदीला होणारा विरोध केव्हाच मावळला असता व हिंदी हीच आपली भाषा असल्याचे सर्वांनी मान्य केले असते.
22 Apr 2022 - 6:38 pm | कॉमी
सहमत.
ह्या सगळ्या मालिका बऱ्याच भारतीयांसाठी मौलिक ठेवा आहेत.
हिंदीचा "अरबी, उर्दूमिश्रित उर्दूछाप हिंदी" असा उल्लेख पाहून अनेक पातळींवर आश्चर्य आणि खेद वाटला-
१. उर्दू आणि अरबी ह्या "बाहेरच्या" भाषांचे मिश्रण चालत नाही, पण संबंध बाहेरची इंग्लिश भाषा चालते हे कसे ?
२. संस्कृतप्रचुर हिंदीमध्ये लेखन करणारे कितीतरी उत्तमोत्तम लेखक आणि कवी होऊन गेलेत. माझ्या अतिशय मोजक्या हिंदी वाचनात सुद्धा ते नजरेत आलेत. वर म्हणलं तसं गोराचे अनुवादक, हरिवंशराय बच्चन, सिनेगीत लिहिणारे नीरज- ह्यांचे लेखन हा आरोप निराधार असल्याचे दर्शवते.
३. मराठी मध्ये काय फारसी, उर्दू शब्द कमी नाहीत. तिथे मात्र सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम गाजवायची. हिंदीला मात्र अरबीमिश्रित उर्दूछाप असे घालूनपाडून बोलायचे. हा एक बायस म्हणायला पाहिजे.
22 Apr 2022 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली
इंग्लिश भाषा चालते हे कसे ?
ईंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती शिकून जगाची द्वारं ऊघडतात. हिंदीभाषीत युपीब्हारीनी हिंदीला ज्ञानभाषा बनवलेले नाही. आपला परका हा संबंधच नाही. हिंदी भाषा शिकून कुणीही ज्ञानसंपन्नझालेले नाही. हिंदी ही भाषआ अभ्यासक्रमात घालून पाचवीच्या कोवळ्या मुलांच्या डोकियाला नकारन ताण देऊन ठेवलाय ती भाषा न त्या मुलांची मातृभाषा ना ज्ञानभाषा, फक्त बिहारी युपी पाणीपुरी वाले, मजूर, नी ईतर हलके काम करनार्यांची सोय व्हावी म्हणूव पाचवीच्या लहानग्यांच्या माथी हिंदी का मारावी? हाप्रश्न कोणत्याही सुज्ञ पालकाने स्वतला विचारून पहावा.
22 Apr 2022 - 8:30 pm | कॉमी
माझ्या मुद्द्यामधले अर्धवट वाक्य कापून मूळ मुद्दा सोडून जुन्याच पटरीवर गाडी नेत आहात. तुमच्या प्रशनाचे उत्तर तुम्हाला आधीच दिले आहे. काकूबाईंना मिश्या असत्या तर, बहुसंख्य भारतीयांना ज्ञानभाषा इंग्रजी येत असती तर- छान झाले असते. पण येत नाही. ९०% भारतीयांना इंग्रजी समजत नाही.
22 Apr 2022 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
शिकतील का जशी ताकद लावून हिंदी रेटताय लोकांवर तशी ईंग्रजी रेटा.
22 Apr 2022 - 9:24 pm | sunil kachure
10% भारतीय लोकांना फक्त इंग्लिश समजते असे कोमि ह्यांचा दावा आहे.
हा 10% आकडा त्यांनी कसा काढला असे ते विचारात नाही.
जावू ध्या त्यांचे समाधान
त्यांच्या मता नी 10,%, म्हणजे 14 कोटी लोक झाली
पण भारतात असणारे डॉक्टर्स त्यांची संख्या.
विविध corporate कंपनीत काम करणारी लोक.
विविध five star hotel मध्ये काम करणारी लोक..
इंग्लिश भाषा शिकवणारे शिक्षक,मोठ मोठ्या दुकानात ,mall मध्ये काम करणारे.
इंजिनिअर,नर्सेस,ह्या सर्वांचा आकडा बघितला तर14 कोटी पेक्षा खूप जास्त लोक इंग्लिश समजतात.
दर वर्षी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहावी पास करणाऱ्या मुलांची संख्या बघितली तर वार्षिक कोटी मध्ये लोक इंग्लिश समजणारी निर्माण होत आहेत .
ह्या 10 % इंग्लिश भाषिक लोकांची संख्या 50 % होण्यास जास्त वर्ष लागणार नाहीत.
.
22 Apr 2022 - 6:23 pm | श्रीगुरुजी
दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून सांगितल्या जाणाऱ्या बातम्यांची सुरूवात This is All India Radio अशी असायची. ८० च्या दशकात This is Aakaashwaani असा बदल केला गेला. या बदलाला सर्व दाक्षिणात्य राज्यांनी विरोध केल्याने तातडीने हा बदल रद्द केला होता. दाक्षिणात्य राज्यांना साधा एक शब्द बदललेला चालत नव्हता आणि म्हणे हिंदीमुळे भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने पाऊल ठेवले गेले.
22 Apr 2022 - 8:53 pm | अमरेंद्र बाहुबली
हिंदी ना देश, देशाची एकात्मता ह्यांचा काहीही संबंध नाही. पण काही अर्धवट लोक हिंदी म्हणजे देश असंच रेटत असतात.
23 Apr 2022 - 10:05 am | चेतन सुभाष गुगळे
इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक भाषा हिंदीचा वापर करण्याची विनंती करणार्यांवर अर्धवट असल्याचा आरोप करणारे परदेशी भाषा इंग्रजीचे समर्थन केल्याने पूर्णतः परके व अभारतीय ठरत आहेत.
23 Apr 2022 - 10:22 am | अमरेंद्र बाहुबली
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड ह्या
राज्याची अधिकृत भाषा आहे.
23 Apr 2022 - 10:22 am | अमरेंद्र बाहुबली
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड ह्या
राज्याची अधिकृत भाषा आहे.
23 Apr 2022 - 11:17 am | चेतन सुभाष गुगळे
हो बरोबर आहे. हिंदीत बोललं त्यांच्याशी की विचारतात, "इंडिया से आये हो क्या?" यावरुन काय ते ओळखा.
23 Apr 2022 - 11:45 am | अमरेंद्र बाहुबली
तुम्हालाच बरं भेटतात असे लोक.
23 Apr 2022 - 11:46 am | अमरेंद्र बाहुबली
हिंदी बोललं का ते तुम्हाला परकं समजतात हियावरून काय ते ओळखा
22 Apr 2022 - 6:30 pm | sunil kachure
भारताची एकात्मता हिंदी मुळे धोक्यात येईल.आणि अनेक वेळा आली पण आहे.
हिंदी ही भारताचा एकात्मता धोक्यात आणू शकते.
इतके स्पष्ट अनेक घटनेतून दिसून आले तरी ही लोक ते मान्य करणार नाही.
23 Apr 2022 - 1:33 pm | उपयोजक
हिंदीतर राज्यांमधल्या लोकांना हिंदी शिकण्याची गरज किती आणि कुठे भासते?
१. दक्षिण भारतीय मोठे उद्योजक हे हिंदी पट्ट्यातल्या मोठ्या उद्योजकांशी इंग्रजीतूनच संवाद साधतात.तितके इंग्रजीचे ज्ञान त्या दोघांना असणे सहज शक्य आहे.
२. द. भारतातले लघुउद्योजक हे दलालांमार्फत उत्तरभारतातील लघुउद्योजकांसोबत व्यवसाय करतात. या ब्रोकर्सना हिंदी येते. बहुतेकवेळा हे लोक मारवाडी , गुजराती असतात.
अजूनतरी बहुतांश लघुउद्योजक (मग ते उत्तरभारतीय असोत की द.भारतीय) हे इंग्रजीतून व्यावसायिक संवाद साधण्याइतपत सक्षम नाहीत.दक्षिण भारतातल्या सर्व राज्यांमधे शाळांमधे इंग्रजी भाषा शिकवली जात असूनही ही परिस्थिती आहे. याचा अर्थ असा की एखादी भाषा शाळेत शिकवली गेली की त्या भाषेत संवाद साधण्याइतकी क्षमता निर्माण होतेच असे काही नाही.
दक्षिण भारतीय लघुउद्योजकांनी हिंदी शिकून ब्रोकर हटवून स्वत:च उत्तरभारतीयांना माल विकावा वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक लघुव्यावसायिकाकडे तितका वेळ नसतो. शिवाय भाषा शिकण्यात जितका वेळ जातो तो वेळ ते काम ब्रोकरकडे दिल्याने वाचतो. ते आर्थिकदृष्ट्या त्या दक्षिणभारतीय व्यावसायिकाला परवडणारे असते.
३. पर्यटन या उद्देशाने उत्तरभारतात किंवा हिंदी समजते तिथे प्रवास व त्यानिमित्ताने तिथल्या फेरीवाल्यांशी संवाद किंवा रस्ता विचारणे.
आता जे लोक उत्तरभारतात पर्यटनाच्या उद्देशाने जातील ते एकतर ट्रॅव्हल कंपनीमार्फत जातील किंवा स्वतंत्र वाहन करुन जातील. ट्रॅव्हल कंपनीतर्फे जातील ते टूर कोऑर्डिनेटरची किंवा गाडीत हिंदी येणारं कोणी असेल तर त्याचीच मदत घेतील. स्वतंत्र वाहन करुन जातानाही हेच करतील. त्यांच्यातला किमान एकजणतरी कामचलाऊ हिंदी येणारा तरी असणारच. तशी तजवीज करुनच ते जाणार. हिंदी अगदीच येत नसेल तर गुगल ट्रान्सलेट आहेच. ते लोकांना दाखवून मार्ग विचारता येणे शक्य आहे. शिवाय खाणाखुणांची भाषा आहे. काम होणे हा आणि इतकाच अशा परिस्थितीत हिंदीचा उपयोग असेल.
मग असं असेल तर हिंदी न शिकल्याने दक्षिण भारतीयांचं फारसं ना पूर्वी अडलं होतं ना यापुढे अडेल. इंग्रजी समजणार्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे हिंदीची गरज अजून कमी होईल. व्हायलाच हवी. उत्तरभारतीयांना दादागिरी करण्याची संधी मिळता कामा नये. यामुळे दक्षिण भारतीयांमुळे न्यूनगंड निर्माण होतो आणि त्या न्यूनगंडातून ते हिंदी शिकू पाहतात. एखादी भाषा ही अशी जबरदस्तीने , न्यूनगंडाने शिकणे भाग पडू नये.
23 Apr 2022 - 6:47 pm | धर्मराजमुटके
भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल यात शंकाच नाही. पण मग हिंदी भाषिक देखील इंग्रजी शिकतील ना ? की केवळ इतर भाषिक ? समजा हिंदी भाषिकांची मुजोरी नको म्हणून आपण हिंदी बोलायचे नाही हे समजण्यासारखे आहे. पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?
23 Apr 2022 - 11:25 pm | उपयोजक
पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?
इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा व्हायला काहीच हरकत नाही.इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा बनल्यास 'आम्हीच या भाषेचे मूळ मालक' असा अभिनिवेश किंवा 'कसं वाकवलं? तुमच्याच राज्यात तुमची भाषा न शिकता आमच्या भाषेत लावलं किनई बोलायला?' असा कुत्सितपणा ,मग्रुरी भारतातील कोणत्याच राज्याला करता येणार नाही.
23 Apr 2022 - 11:37 pm | श्रीगुरुजी
अगदी बरोबर. इंग्लिश संपूर्ण देशाची संपर्कभाषा झाली तर महाराष्ट्रात येऊन अमराठींना स्वत:ची भाषा लादता येणार नाही.
23 Apr 2022 - 11:46 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याच बरोबर ईंग्रजी शिकून थोडी अक्कल ही येईल. किती पोरं पैदा करावीत ईतकी हा अक्कल नाही हिंदी भाषकांना.
25 Apr 2022 - 4:32 pm | चेतन सुभाष गुगळे
बोलणारी व्यक्ति जन्माने - मराठी
बोलणार्या व्यक्तिचे पालक - मराठी आणि त्यातही वडील तर प्राध्यापक आणि कवी
व्हिडीओ चित्रीकरणातील स्थळ - मुंबई, महाराष्ट्र
https://www.facebook.com/SachinTendulkar/posts/pfbid0X5M8edPVX8baeNai2NP...
आणि व्हिडीओतील भाषा - ?
मला तरी मराठी वाटत नाहीये.
26 Apr 2022 - 7:39 am | उपयोजक
हिंदी ही पूर्ण देशाची भाषा नसली तरी सर्वात मोठी भाषा आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचावा म्हणून तो हिंदीत बोलतोय.
26 Apr 2022 - 12:16 pm | चेतन सुभाष गुगळे
मग इतका वेळ मी काय वेगळं मत मांडत होतो का?
26 Apr 2022 - 11:08 pm | सुक्या
जौ द्या हो. कात्रीत सापडले की लोक पळ वाट शोधतात ..
25 Apr 2022 - 8:54 pm | sunil kachure
सुसंस्कृत non हिंदी भाषिक राज्य हादरून गेली आहेत .हिंदी भाषिक राज्यातील अत्यंत मागास राजकीय परंपरा बघून.
नको बाबा
त्यांच्या शी संबंध पण नको आणि ती भाषा तर बिलकुल नको.
हिंदी बरोबर.
मागास जातीय व्यवस्था येणार च.
.मागास राजकीय परंपरा येणार च.
मागास विचार पद्धती येणार च
मागास रीती रिवाज येणार च.
बेशिस्त पना येणार च.
गुंडागर्दी येणार च.
एकंदरीत हिंदी आली जी आता जी प्रगत राज्य आहेत ती सर्व ३०० वर्ष तरी मागे जातील.
जग प्रगती करत आहे
आणि हिंदी भाषा आणि त्या लोकांची संस्कृती मान्य करून प्राचीन मागास काळात जायचे आहे का.
25 Apr 2022 - 10:07 pm | चौथा कोनाडा
दिवस बोअर चालला होता ..... हा प्रतिसाद वाचला अन खो खो हसून बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !

26 Apr 2022 - 12:24 pm | sunil kachure
महाराष्ट्रात हिंदी लोकांनी स्वीकारली.
लगेच हिंदी मागोमाग.
यूपी,बिहार ची राजकीय जातीयवादी संस्कृती आली.
उत्तर भारतीय सन साजरे होवू लागले त्या बरोबर त्यांच्या परंपरा आल्या.
लोक लग्नात चोऱ्या करायला लागले नवरदेवाच्या चपला ,बुट चोरायला लागले.
दक्षिण भारताने हिंदी स्वीकारली नाही.
तिथे लग्नात नवऱ्याचे बुट चोरले जात नाहीत.
ही मोजकीच उदाहरणे तुम्हाला माझे मत समजायला मदत करतील.
आणि हसणे थांबवून तुम्ही गंभीर व्ह्याल.
अजून खूप आहेत उदाहरणे.
राजस्थान मध्ये सती प्रथेचे समर्थन करण्यासाठी सती चे मंदिर आहे.
भाषे बरोबर त्या जुनाट प्रथा पण येतील.
26 Apr 2022 - 1:44 pm | तर्कवादी
म्हणजे हिंदी भाषिक राज्ये दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत मागास आहेत याबद्दल दुमत नाहीच पण ...भावनेच्या भरात त्यांनी एक शून्य जास्त टंकला असावा :)
असो.. कधी कधी विनोदी प्रतिसादही असायला हवेत...
26 Apr 2022 - 3:00 pm | चौथा कोनाडा
“हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही तर…”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
26 Apr 2022 - 3:35 pm | sunil kachure
साध्या शब्दात ..हिंदी ही भारतातील अती मागास राज्यातील भाषा आहे.
मागास म्हणजे.
1) आर्थिक बाबतीत मागास
२) सामाजिक सुधारणा बाबत मागास.
३) निती मत्ता मध्ये मागास.
४), परंपरा आणि अंध श्रद्धा ह्या बाबत मागास.
अशा ह्या भाषेचा हट्ट धरणे हाच मूर्ख पना आहे.
भाषा आणि संस्कृती,नीतिमत्ता,प्रगत विचार,ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो.
फक्त भाषा कशी योग्य आहे हा विचार च बालिश आहे.
मी तर म्हणतो देशात हिंदी वर बंदी जाहीर केली तर ..
राम मंदिर.
काश्मीर प्रश्न.
साक्षरता..
स्त्री स्वतंत्र.
लोकशाही.
जातीयवाद .
धार्मिक वाद..
ह्यांची खरी उत्त्तर सापडतील आणि भारत जगातील महासत्ता बनेल.
हिंदी chya नादाला लागल तर .
केनिया पण भारतासाठी खूप प्रगत देश असेल.
27 Apr 2022 - 12:00 pm | तर्कवादी
सुनीलजी
तुमचा मागचा एक प्रतिसाद बराच संतुलित होता. आता मात्र तुम्ही अगदीच टोकाचे विचार मांडत आहात. अशा प्रकारे दोन प्रतिसादांत मोठा विरोधाभास असल्याने तुमच्या आय डीची विश्वासार्हता कमी होवू शकते याची तुम्हाला कल्पना असावी. असो.
एक भाषा म्हणून हिंदीचाही आदर आहेच आणि इतर भाषिकांनी ही हिंदी आपापल्या आवडीनुसार व कारणानुसार शिकायलाही हरकत नाही (कुणाला उत्तरेकडील राज्यांत भटकंती करायची असेल, कुणाला हिंदी चित्रपट बघावेसे वाटत असतील, कुणाला मुन्शी प्रेमचंद सारख्या साहित्यिकांचं साहित्य मुळातून वाचायचं असेल.. ई ई) ..मात्र हिंदी भाषिक लोक आपल्या राज्यात येणार आहेत आणि त्यांच्याशी संभाषण होवू शकावे म्हणून केवळ , अमित शहांच्या प्रेमळ आवाहनाखातर (!!) सगळ्यांनी हिंदी शिकावी हे मात्र फारसं संयुक्तिक कारण होवू शकत नाही इतकंच..
बाकी हिंदीवर राग नाही.. अनेक हिंदी चित्रपटांनी माझं मनोरंजन केलंय.. अनेक इंग्लिश वा दक्षिणी भाषेतले हिंदीत डब केलेले चित्रपटही उपलब्ध झाल्याने त्यातुनही मनोरंजन झालं आहेच.. .त्यामुळे माझा हिंदी वर राग नाहीच..( खरंतर कोणत्याच भाषेवर राग नाही. आणि असण्याचं कारणही नाही..) झालंच तर हिंदी भाषेतील मान्यवरांनी भाषाशुद्धीचं थोडं मनावर घेतलं तर हिंदीबद्दल आस्था वाढेल.
27 Apr 2022 - 1:39 pm | Trump
मलाही एक-दोनदा असेच आढळले होते. एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत अशी शंका येऊन गेली.
27 Apr 2022 - 3:02 pm | sunil kachure
हिंदी वर बंदी असावी हे माझे मत खूप विचार करून झाले आहे..
१)ये है स्वर्ग दरवाजा.
२) ये है रावण की लंका..
३)ये है नरक का दरवाजा.
असेल फालतू कंटेंट फक्त हिंदी मध्येच असतात.
हिंदी न्यूज चॅनेल म्हणजे जगातील सर्वात बकवास मीडिया.
अनेक देशांनी पण हिंदी न्यूज चॅनेल वर आरोप केले आहेत..
अंध विश्वास पसरवणे,चुकीची बकवास माहिती पसरवणे
हे उद्योग तर हिंदी मीडिया करत च असते.
बाकी भाषिक मीडिया इतकी मूर्ख नक्कीच नाही
त्या मुळे हिंदी वर देशात बंदी घातली गेली तर देश खूप विकास करेल.
27 Apr 2022 - 3:28 pm | Trump
श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे ह्यात फरक आहे.
असल्या फालतु गोष्टींचा भाषेशी काही संबध नसतो. ते इतर भाषांमध्येही असतात.
27 Apr 2022 - 3:43 pm | तर्कवादी
मी फारशा न्युज बघत नाही त्यामुळे कोणत्या भाषेतले चांगले व कोणते वाइट त्याबद्दल माझा फारसा अभ्यास नाही. पण अलिकडे युक्रेन युद्धाच्या निमित्ताने बातम्या बघत होतो. आज तकचे काही पत्रकार युक्रेनमध्ये थांबून रिपोर्टिंग करत होते हे खरच कौतुकास्पद . "गौरव सावंत" आणि आणखी एक पवार नावाचे पत्रकार नावावरुन मराठी वाटतात पण त्यांचे हिंदी उच्चार , शब्दरचना ई चांगलं होतं... खासकरुन गौरव सावंतचं रिपोर्टिंग मला आवडलं.
बाकी एकूणात हिंदीमधले मिडीया वाईट आहेत असं मानलं तरी त्याचा दोष भाषेला देणं योग्य होणार नाही. याच भाषेने मुन्शी प्रेमचंद सारखे साहित्यिकही दिले आहेत. भाषा शुद्ध राखण्याकडे फारसे ल़क्ष न दिल्याने अगदी औपचारिक वापराच्या हिंदी भाषेत उर्दु , फारसी , इंग्लिश ई भाषांतील शब्दांची प्रचंड भेसळ झाली आहे हाच काय तो भाषेचा दोष (खरं तर भाषा लिहिणार्या -बोलणार्यांचा दोष)
27 Apr 2022 - 8:16 pm | sunil kachure
हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे.
हसून हसून पुरेवाट झाली हे वाक्य ऐकून.
त्या पुढे तर मोठा जोक आहे.
दक्षिण भारतीय हिंदी राष्ट्र भाषा मानत नाहीत तर त्यांचे सिनेमे हिंदी मध्ये डब करतात.
आता हसून हसून लोळणे च बाकी होत.
सिनेमे भाषा कोणती आहे म्हणून लोकप्रिय होत नाहीत.
आज काल कोणत्या ही भाषेतील सिनेमे कोणत्या ही भाषेत बदलता येतात.
सिनेमे लोकप्रिय होतात
कथा,अभिनय,योग्य विषय ह्या वर.
हिंदी मध्ये दर्जा च राहिला नाही.
ना कथा,ना अभिनय.ना योग्य विषय .
ये देखो स्वर्ग का द्वार .
ये देखो नरक का द्वार.
इथपर्यंत च ह्यांची झेप.
27 Apr 2022 - 8:55 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
27 Apr 2022 - 10:32 pm | उपयोजक
चुकीची माहिती पसरवतोय
27 Apr 2022 - 10:43 pm | श्रीगुरुजी
ही पूर्ण चुकीची माहिती अगदी प्रारंभापासून आपल्या डोक्यावर थोपविली गेली आहे.
27 Apr 2022 - 10:58 pm | ॲबसेंट माइंडेड ...
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.
27 Apr 2022 - 11:23 pm | श्रीगुरुजी
एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली तर त्या भाषेत चित्रपट डब करायचे नाही का? असे असेल तर हिंदीभाषिक राज्यात अहिंदीभाषिकांनी आपली उत्पादने विकू नये अशीही मागणी होईल.
27 Apr 2022 - 11:48 pm | ॲबसेंट माइंडेड ...
पुन्हा विचारतो.
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.
27 Apr 2022 - 11:39 pm | श्रीगुरुजी
अजय देवगणचा दृश्यम् हा चित्रपट चिनी भाषेत डब झाला आहे. आता चिनी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरीसुद्धा या भाषेत का डब केला?
27 Apr 2022 - 11:33 pm | sunil kachure
पाहिले तर हिंदी जास्त लोक बोलतात म्हणून ती श्रेष्ठ ह्या असल्या युक्तिवाद ला खरे तर काहीच किंमत नाही.
Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल नी हिंदी मध्ये ऑडियो सुविधा दिलीच नसती तर..
पृथ्वी वर जी प्राणी,वनस्पती,समुद्रातील जीव ह्यांची माहिती हिंदी भाषा असणाऱ्या लोकांना जन्मात तरी मिळाली असतो का?
हिंदी मध्ये असे कार्यक्रम निर्माण करण्याची क्षमता आहे का?
दक्षिण भारतातील बाहुबली असेल किंवा पुष्पा असे मनोरंजन मूल्य खूप असलेले सिनेमे हिंदी मध्ये डब नसते केले तर .
हिंदी भाषिक लोकांना त्या दर्जा चे सिनेमे बघायला मिळाले असते.
पैसा महत्वाचा आहेच पण ज्ञान,विविध नावीन्य पूर्ण माहिती,सायन्स,विविध शोध हे हिंदी भाषिक राज्यात लागत नाहीत.
हिंदी हिंदी करत बसले तर.खोल अज्ञाना च्या अंधार कोठडीत हा प्रदेश जाईल.
28 Apr 2022 - 4:01 pm | चौथा कोनाडा
हिंदी सारख्या भाषेत Discover चॅनल,किंवा नॅशनल geography सारखे चॅनेल, डब केलेले दक्षिणी सिनेमे/ इतर भाषिक सिनेमे मराठी भाषिक माणुस (ज्याला इंग्रजी येत नाही, समजत नाही) समजू शकतो हा फायदाच नाही का ?
28 Apr 2022 - 7:57 am | जेम्स वांड
अभिनिवेष आणि अक्कल ह्यांचा परपसर संबंध नीट अभ्यासता आला आणि अभिनिवेष असतो तिथे अकलेचा वास नसतो हे गृहीतक पक्के झाले डोक्यात
28 Apr 2022 - 8:17 am | कॉमी
लॉल
28 Apr 2022 - 6:27 pm | उपयोजक
म्हणजे कसला संबंध?
BTW त्रास होत असेल तर चर्चा वाचू नका. काळजी घ्या. _/\_
28 Apr 2022 - 7:35 pm | जेम्स वांड
त्रास नाही करमणूक मात्र छान होते आहे, तुम्ही म्हणताय ते मुद्दे बरोबर आहेत, आगे बढो म्हणणार होतो पण ते हिंदी असल्यामुळे पुलेशु म्हणतो फक्त :)
28 Apr 2022 - 9:04 am | जेम्स वांड
आमच्या गावाकडच्या गणपाच्या एका शंकेचे निरसन विद्वत्तापूर्ण भद्रजन करतील अशी अपेक्षा.
आम्ही गावाकडं मुंबईहुन लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत बोलू फक्त मराठी(च)(लेंगे स्वराज लेंगे धर्तीवर) करत गेलो की गणपा म्हणतो.
"वांडू, शेरातील मानसे काय बोलत्याती काय बी सुदरत नाय, च्यामारी टिम्बं टाकून अनुस्वार म्हंत्याती, आम्हीच ण ला न म्हणलं तर ही मानसं हस्त्यात अन आमाला सुद्ध मराठी बोला म्हणत्यात, सुद्ध मराठी म्हंजी कुटली रं (टिम्ब दिलं पग) ? अन असली आसं म्हनलो तरीबी ज्यानला यात नाय त्येन्नी त्या मराठीत का बोलाव रं ?"
28 Apr 2022 - 10:32 am | तर्कवादी
गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही. पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे. जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल.
विशिष्ट व्यवसायाची गरज असल्याखेरीज (उदा: शिक्षकी पेशा) समोरच्याने प्रमाण वा शुद्ध भाषेतच बोलायला हवं असा फारसा आग्रह कुणी धरत नाही..(अपवाद असतीलच अर्थात)
त्यामुळे गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे. शहरातले लोकही ग्रामीण भागात स्थलांतरित झाले तर ग्रामीण भाषेतील काही शब्द शिकत असतीलच की...
28 Apr 2022 - 11:07 am | sunil kachure
मुळात जी भाषा गणपा ची म्हणून लिहली आहे तीच चुकीची आहे.
महाराष्ट्रात आता त्या रीती ने मराठी अगदी दुर्गम खेड्यात पण बोलली जात नाही.
महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण तर सर्वदूर पसरले ल आहे.
सर्वांना सर्व प्रकारची मराठी उत्तम समजते.
उगाच सिनेमे बघून सद्यस्थिती शी विपरीत लोकांचे समज निर्माण झाले आहेत.
ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती म्हणजे खूप च जुनी मराठी बोलत असेल.असा.
28 Apr 2022 - 6:47 pm | सुरिया
काहिच्या काही लिहु नका हो, काय ऐकलीय आणि कीती फिरलाय तुम्ही? किंवा जी गावठि म्हणून तुम्ही ऐकलीय ती एखाद्या उपनगरीफ्लॅटवासीय लेखकाची वाचलेली असावी.
ग्रामीण सिनेमाचा काळ तर सरलाच पण वांडोबाची भाषा महाराष्ट्रातल्या कमीत कमी ५ जिल्ह्यात आजही सर्रास वापरली जाते.
28 Apr 2022 - 7:15 pm | sunil kachure
प्रतिवाद तरी का करावा इतका खोटा दावा आहे.
पाच जिल्ह्यात तरी जेम्स नी लिहलेले मराठी भाषा बोलतो जाते असे सरळ फेकले आहे.
पण कोणते पाच जिल्हे हे मात्र अजिबात सांगितले नाही.
एक तरी vlogs दाखवा पुरावा म्हणून महाराष्ट्र मधील त्या व्हिडिओ त गणपा च्या तोंडी जी भाषा आहे ती बोलली जाते.
आणि तेथील लोकांस पुण्या,मुंबई ची मराठी परकी वाटते ,त्यांना समजत नाही.
२६ जिल्ह्यातील पाच जिल्ह्यात प्रमाण मराठी बोलत ,समजत नसेल.
तर साक्षरता चे सर्व दावे चुकीचे ठरतील.
महाराष्ट्र च काय पूर्ण भारत पाकिस्तान,बांगलादेश पेक्षा अशिक्षित आहे हे सत्य मान्य करावे लागेल.
28 Apr 2022 - 7:40 pm | जेम्स वांड
सुनीलजींचे प्रतिसाद लालित्य पाहून प्रतिसाद देणार नव्हतोच, आता तर त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेच समजा.
जमल्यास आपणही त्याची सवय करून घ्या, चला पाहू पाच जिल्हे फिरायला ;)
28 Apr 2022 - 8:03 pm | जेम्स वांड
तुमच्याशी बोलायला मजा येणार :)
मुद्देसूद प्रतिवाद खालीलप्रमाणे :-
गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही.
खालील बहुतकरून शुद्धभाषामतवादी जनतेचे प्रतिसाद पाहून आपले मत अजूनही असेच असेल का ?
पण प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असल्याने गणपाने निदान प्राथमिक शिक्षण तरी घेतले असावे.
प्राथमिक म्हणजे इयत्ता १ ते ४, ह्या वयात दिवसाच्या ५ तास शाळेत घालवलेल्या वेळेच्या जोरावर उरलेले १९ तास ग्रामीण परिवेशात राहणाऱ्या गणपाच्या जिभेला प्रमाण भाषेचे वळण लागेल का ? लक्षात घ्या इथे मी शेकडो पोरांवर ४-५ मास्तर वगैरे "निःशुल्क प्राथमिक शिक्षणाच्या" वास्तवात घुसतही नाहीये
जगाच्या नाही तरी आजूबाजूच्या गावच्या, तालुक्याच्या बातम्या वाचण्याकरिता कधी वृत्तपत्र वाचत असेल. त्यामुळे शुद्ध वा प्रमाण मराठी कशी आहे याचा त्याला थोडाफार अंदाज असू शकेल.
नक्कीच, अन वृत्तपत्रीय भाषा काही अंशी प्रमाणित असतेच, पण ते र ला ट लावून वाचणे अन प्रमाण मराठीचे अंदाज असणे ह्यात काही मैल अंतर असेल हे आपण मान्य कराल काय ?
शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे.
गणपा टाईप मजुरी किंवा गेलाबाजार रोजगार पाहायला आलेल्या लोकांना अस्मितेची लक्झरी परवडेल का ? प्रश्न अस्मितेचा नाही अस्तित्वाचा आहे, वैच एक कप च्या द्या म्हणल्यावर जर शहरातील माणसाला अर्थ कळत असेल तर गणपाने शुद्ध मराठी बोलावी हा आग्रह कश्याला ? पुन्हा एकदा सांगतो सरकारी कामे, वृत्तपत्रे इत्यादींच्या प्रमाणभाषेला विरोध नाहीच पण ती गणपावर लादण्याचा पॉईंट नाही काही, हिंदी इम्पोजिशन मॅक्रो प्रश्न असेल पण हा मायक्रो प्रश्न आहे अन तो सोडवल्याशिवाय मी तरी मॅक्रोला किंमत देणार नाही, प्रॉब्लेम सोलविंग फ्लोचार्ट क्लिअर आहे माझा माझ्या डोक्यात तरी :)
28 Apr 2022 - 10:28 pm | तर्कवादी
धन्यवाद जेम्स साहेब
खरंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं असूनही तुम्ही पुन्हा तेच प्रश्न विचारताय म्हणून माझंही थोडं मनोरंजन होतंय... असो !!
मिसळपाववरील शुद्धभाषामतवादी आणि वर उल्लेखलेला अशिक्षित वा अर्धशिक्षित गणपा यांचा संबंध फारसा येणार आहे का ? आणि आलच तरी त्याच्या परिस्थितीचं आकलन करता त्याच्याकडून शुद्ध भाषा बोलण्याचा आग्रह सहसा कुणी धरणार नाही (अपवाद असतातच.. ).. बाकी मिपावरही ग्रामीण बोली भाषेतील कथा /साहित्य अधूनमधून प्रसिद्ध होत असतंच आणि त्यास लोकप्रियताही लाभते. असो.
मला वाटतंय मी आधीच उत्तर दिलंय .. तरी पुन्हा देतो " गणपाची बोली भाषा वेगळी असू शकेल, हरकत नाही." .. गणपाने प्रमाण भाषा बोलायला हवी असा आग्रह नाहीच हे आधी किमान दोनदा तरी म्हणून झालंय .. असो.
थोडाफार अंदाज इतकंच मी म्हंटलंय.. आणि वाचनाची सवय असलेला जन्मभर काही र ला ट लावून वाचत नाही.. माझी दुसरी किंवा तिसरी शिकलेली आजी [१९३० च्या आधी जन्म, लग्नाआधी अ. नगर जिल्ह्यातील एका खेडेगावात व लग्नानंतर अ. नगर शहरात आयुष्य गेले] फार सहजपणे व आवडीने वृत्तपत्र वाचत असे.
आग्रह नाही असे अनेक वेळा म्हणून झाले तरी तुम्हाला तेच पद गायचे असल्यास माझा नाईलाज आहे ..
बाकी उदाहरण देवून तुम्ही काम माझे सोपे केले.. "वैच एक कप च्या द्या " म्हंटल्यावर शहरी मराठी भाषिक चहावाला"वैच"शब्दाचा अर्थ समजला नाही किंवा "च्या" हा शब्द प्रमाण भाषेतला नाही म्हणून गणपाला चहा नाकारणार नाही.
मला वाटते मी संतुलितपणे याचे उत्तर दिले होते तरी पण तुम्ही "माझा (पक्षी गणपाचा) प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही म्हणूनच सूर लावणार असाल तर माझा नाईलाज आहे. माझे वाक्य पुन्हा लिहितो.
"गणपाने शुद्ध भाषाच बोलायला हवी असे काही नाही पण ग्रामीण भाषेतले काही शब्द जर शहरी लोकांना माहितच नसतील समजतच नसतील तर शहरात गेलेल्या गणपाने ते शब्द टाळून शहरी भाषेतील काही शब्द आत्मसात करणे म्हणजे त्याच्या अस्मितेला मोठा धक्का असे काही नसावे."
झालेच तर गणपासारखी अर्धशिक्षित माणसे शहरात कोणत्या कामासाठी येतात ? त्या निमित्ताने त्यांची उठबस कोणत्या लोकांशी असते ? त्या लोकांचा ग्रामीण बोलीभाषेशी यापुर्वी संबंध आलेला असेल हे मुद्दे विचारात घेतले तर गणपाची समस्या फक्त कागदावरची वाटते (अपवाद वगळून), वास्तववादी नाही.
पण तरी प्रॉब्लेम आहेच असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सोल्युशनचाही विचार केला असेलच, नाही का ? तुमच्या मते काय सोल्युशन आहे ते सांगितलंत तर बरं होईल. पुढे त्याचा उहापोह करु.
28 Apr 2022 - 6:32 pm | उपयोजक
गावठीपणा सोडून कुतूहलाने शहरी लोक कसे बोलतात त्याचे निरीक्षण करावे. म्हणजे गणपालाही प्रमाणभाषा जमायला लागेल. प्रमाणभाषा निर्माण करणार्यांनी त्या भाषेवर विशेष काम केलेले असते. खेडवळ लोक कोणत्याही भाषेचा उपयोग केवळ संपर्कभाषा म्हणून करतात. तस्मात गणपाला जास्त सिरियसली घेऊ नये.
28 Apr 2022 - 6:41 pm | सुरिया
तस्मात समस्त गणप्यांनी ह्या भाषा, प्रमाणभाषा, राज्य भाषा, राष्ट्रभाषा वगैरे प्रकरणालाच जास्त सिरियसली घेऊ नये. संपर्क होण्याशी मतलब.
28 Apr 2022 - 6:43 pm | कॉमी
म्हणजे आम्ही बोलतो ते आणि तसेच बोलायचे अशी इच्छा आहे तर.
28 Apr 2022 - 7:47 pm | जेम्स वांड
प्रमाणभाषा ही फक्त प्रशासकीय सोय असते, विशेष काम त्यासाठी केलेले असते, भाषासेवा करायला नाही , त्यामुळे मुद्दा रद्द होतो, अन आपण भाषासेवा करतोय हा आवही शुद्ध भाषामतवाद्यांनी आणू नये.
सन्माननीय अपवाद उदाहरणार्थ वि दा सावरकर, त्यांनीही जन्माला घातलेली शब्दसंपदा ही बोली वर आधारित अर्थात फोनेटिक्स बेस्ड होती अन दुर्दैवाने ती पण आजकाल कोणीच वापरत नाही शुद्धभाषिक पक्षीय सुद्धा
थोडक्यात काय प्रमाण म्हणजे शुद्ध ही संकल्पनाच मुळात प्रमानभाषावादी बायसेस मधून उद्भवलेली आहे, भाषेचे अलंकार अन सौंदर्य हे बोलीतच असल्यामुळे बोलींचा मान न ठेऊ शकणाऱ्या शुद्धभाषावादी जनतेला सामान्य जनतेने जास्त मनावर घेऊ नये, ह्यातच महाराष्ट्र संस्कृतीचे हित आहे
29 Apr 2022 - 10:13 am | चेतन सुभाष गुगळे
महाराष्ट्रातील गणपाने कर्नाटकच्या संगप्पाशी इंग्रजीतून बोलावे असे फर्मान देखील काढले जाईल या इंग्रजांच्या एजंटांकडून...
29 Apr 2022 - 11:05 am | उपयोजक
https://fb.watch/cHcEks7nCg/
29 Apr 2022 - 6:13 pm | चौथा कोनाडा
यात नविन काय ? हिंदी भाषा हा विषय निघाला की यांची द्रविड अस्मिता संकटात येणार !
साता समुद्रापारची परकिय भाषा शिकू, बोलू पण हिंदुस्थानातलीच भाषा म्हणजे यांच्यावर परम-संकट !
29 Apr 2022 - 6:28 pm | श्रीगुरुजी
हिंदीभाषिक शिकतात का इतर भारतीय भाषा? त्यांच्या राज्यातील अभ्यासक्रमात हिंदी व इंग्लिश व्यतिरिक्त एखादी इतर भाषा शिकणे सक्तीचे आहे का? तसं नसेल तर अहिंदीभाषिकांनी स्वत:ची भाषा व इंग्लिश व्यतिरिक्त हिंदी सक्तीने का शिकावी?
30 Apr 2022 - 8:14 am | उपयोजक
30 Apr 2022 - 11:34 am | कॉमी
ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ? ब्राम्हणांचा उल्लेख काही द्वेशपूर्ण नाही वाटला. दिलीये ती फॅक्ट आहे.
गोलवळकरांचे विचार असे नाहीत असे असेल तर जरूर सांगा, मला कल्पना नाही.
30 Apr 2022 - 6:20 pm | रंगीला रतन
असं कसं म्हणता कॉमी?
धागाकर्ता म्हणाले ब्राम्हण द्वेष आहे म्हंजे ब्राम्हण द्वेष असणारच. बॅट त्यांची आहे तेव्हा नियम पण त्यांचेच असणार. मान्य करायलाच पाहिजे :)
30 Apr 2022 - 6:44 pm | चेतन सुभाष गुगळे
www.misalpav.com/comment/1139440#comment-1139440
या प्रतिसादात जे छायाचित्र डकवलं आहे आणि त्यात जी इंग्रजीत लिहिलेली सुलभ विधाने आहेत आणि त्यापैकी ज्यांच्या भोवती चौकटी करुन त्यांकडे विशेषत्वाने लक्ष वेधले आहे - त्यांचे भाषांतर - मराठी भाषिकांना समजेल असे - खालीलप्रमाणे होईल.
आर्या अस्वलेंना आश्चर्य वाटतंय की संघाच्या वरच्या फळीतले सर्व मराठी ब्राह्मण असूनही ते देशभर हिंदी भाषेकरिता आग्रही का आहेत?
त्यांना प्रत्युत्तर देताना आकाश लिहित आहेत की त्याने (म्हणजे मूळ मराठी भाषिक असण्याने) त्यांना (म्हणजे संघाच्या प्रमुख नेत्यांना) काही फरक पडत नाही. त्यांना ज्याप्रमाणे चीनमध्ये हान घराण्याचं प्राबल्य त्यासम काहीतरी करायचं आहे. देशात कृत्रिमपणे का होइना पण एकात्मतेची समज रुजविण्याकरिता ते स्वभाषेचा (म्हणजे अर्थातच मराठीचा) त्याग करण्यास देखील तयार आहेत.
प्रत्येकानेच संघराज्यवाद, भाषा आणि हिंदू (म्हणून स्वतंत्र) ओळख याबद्दलचे श्री. गोळवलकर आणि त्यांच्या (म्हणजे संघाच्या) इतर नेत्यांचे समग्र विचार वाचायला हवेत.
इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही.
तरी मूळ इंग्रजी विधानांमधून ज्यांना
असं ध्वनित होत असेल त्यांनी निदान स्वतःचं इंग्रजी - मराठी भाषांतराचं ज्ञान पाहता आपल्या स्थानिक + इंग्रजी या भाषिक पर्यायांचा पुनश्च एकदा विचार करणे फारच गरजेचे आहे.
30 Apr 2022 - 7:09 pm | रंगीला रतन
साप साप म्हणुन भुई धोपटणे चालू आहे फक्त.
30 Apr 2022 - 9:21 pm | उपयोजक
इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही.
चष्मा न लावता पाहिलात का हो फोटो?
अस्वले बाईंनी ब्राह्मण असं स्पष्ट लिहिलंय. ते तसं लिहिण्याचं कारण स्पष्ट करा बघू. फक्त 'मराठी' असं का लिहिलं नाही अस्वलेंनी? की अर्धवट ज्ञानासोबत आता अर्धवट वाचनसुद्धा? :)
1 May 2022 - 12:22 am | रंगीला रतन
कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा न लावताही त्या विधानात ब्राम्हणद्वेष दिसत नाही. तुम्ही कुठला चष्मा लावला ते सांगा. उगाच छाती पिटून रडू नका.
असले फालतू धागे काढणे व त्यावर फालतू प्रतिसाद देणे तुमचा शौक असेल आमचा नाही.
1 May 2022 - 9:20 am | उपयोजक
पण मधेच घुसून आयडीप्रमाणे छपरी प्रतिसाद द्यायचाच. देत रहा. :)
30 Apr 2022 - 8:55 am | कॉमी
तर्कवादी, तुमच्या हायपोथॅटिकल सिनेरीओ बद्दल.
तुम्ही डेस्क जॉब असलेला व्यक्ती घेतला आहे. तो भारतभराचा डेमोग्राफीक निर्देशक होत नाही. पश्चिम बंगाल मधल्या केवळ ८% जनतेला इंग्लिश बोलता येते.सगळे स्थलांतरित डेस्क जॉब करणारेच असतील असे नाही. सर्वांना इंग्लिश येत असते तर वादाचे कारण उदभवलेच नसते- त्यामुळे तुमच्या हायपोथॅटिकल उदाहरणातल्या माणसाला व्यवस्थित इंग्लिश बोलता येते- हे माझ्या दृष्टीने पूर्ण चित्रदर्शक उदाहरण नाहीये. मी आकडेवारीवर विसंबु शकतो, एका उदाहरणावर माझे मत बनवू शकत नाही.
तुमचे पुढचे असम्पशन आहे दीर्घकाळ वास्तव. सगळ्यांचे तसे उद्दिष्ट नसते. काही लोक पुन्हा आपल्या राज्यात बदली घेण्यात धडपडत असतात आणि ४-५ वर्षात पुन्हाच जाणार असतात. त्यांनी काय करावे ?
आणि हिंदी स्थानिक भाषेला रिप्लेस करेल हे जे तुम्ही म्हणता ती भीती इंग्रजी सोबत आहेच की. जर हिंदी मुळे स्थलांतरित व्यक्ती स्थानिक भाषा शिकायची तसदी घेणार नाही म्हणता, तर दुसरी भाषा इंग्रजी असेल आणि त्याचे इंग्रजीत काम होत असेल, तरी सुद्धा घेणार नाहीच कि. तुमचा स्थलांतरित माणूस बघा कि, तो तामिळ शिकला, पण त्याआधी त्याचे काम इंग्रजीत होत होते तरीही शिकला. पण हिंदी मध्ये काम होऊ लागले तर तो आणि त्याच्या पुढच्या पिढ्या शिकणार नाहीत असे तुम्ही assume केले. आज आपल्या रोजच्या बोलण्यातून हिंदी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात आणि इंग्रजी शब्द बाहेर ठेवायला किती प्रयास लागतात हे बघा.
30 Apr 2022 - 12:07 pm | चेतन सुभाष गुगळे
सर्वच मुद्दे बरोबर आहेत आणि त्यांची मांडणी देखील अचूक व संतूलित पणे केलेली आहे.