युक्रेनमधला पेचप्रसंग

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
25 Mar 2022 - 8:46 pm
गाभा: 

लोकहो,

बऱ्याच दिवसांपासनं युक्रेन व रशिया यांतल्या घडामोडींवर लिहायचं मनात होतं. पण अंगभूत आळशीपणा आडवा आला. शेवटी आता ठरवलंच की लिहूया म्हणून. तर, हा लेख रशियाच्या परिप्रेक्ष्यातनं लिहिलेला आहे. ही जी दुसरी बाजू आहे ती तितक्याशा ठळकपणे समोर आलेली नाहीये. ती यावी यासाठी हा दृष्टीकोन उलगडून सांगायचा माझा प्रयत्न आहे.

--------------x--------------x--------------

थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी :

त्याचं असं झालं की, लेक, चेक आणि रस असे ते तीन भाऊ होते. लेक ( Lech ) पासनं पोलंड उत्पन्न झालं. चेक ( Czech ) पासनं चेक राष्ट्र बनलं. तर रस ( Rus ) पासनं रशिया बनला. या कथेच्या अनेक आवृत्त्या आहेत. काही आवृत्त्यांत रस ( Rus ) नाही. पण साधारण कथा याच धर्तीवर आहेत. हे तीन भाऊ पानोनी या माणसाचे पुत्र होते. म्हणून यांना पाननीय बंधू ( Pannonian brothers ) असंही म्हणतात. पॅन हे ऐक्यदर्शक उपपद ( पॅन स्लाव्ह, पॅन अमेरिकन, इत्यादि ) यावरनंच आलं असावं. आजच्या घडीला पोलंड, चेक व रशिया यांचा प्राचीन वारसा एकंच आहे आणि तो श्लावक ( slavic ) वारसा आहे. हे आपल्यासारख्या त्रयस्थपक्षीयांनी पक्कं लक्षांत घ्यायला हवं.

चेक दक्षिणमध्य प्रांती राहिला व तिथेच त्याचे वंशज वाढले. त्या प्रांतास बोहेमिया म्हणतात. हा आजच्या चेक प्रजासत्ताकाचा मोठा प्रांत आहे ( अवांतर : दुसरा प्रांत मोराव्हिया ). लेक उत्तरप्रांती गेला व त्याचे वंशज वायव्येकडे सरकले. त्यातून पुढे पोलिश राष्ट्राची निर्मिती झाली. रस ईशान्येकडे गेला व तिथे त्याचे वंशज पसरले. रसचे वंशज जिथे पसरले त्या जागी कीव्ह नावाचे शहर त्यांनी वसवले. अशा रीतीने प्राचीन रशियन राष्ट्रास कीव्हन रस ( Kievan Rus ) असंही नाव पडलं. आजच्या रशियाचं केंद्र मॉस्को आहे. पण प्राचीन रशिया कीव्ह केंद्रित होता. आज कीव्ह हे युक्रेनची राजधानी आहे. म्हणजेच आजचं युक्रेन हे रशियाची प्राचीन भूमी आहे. रशियासोबत युक्रेन व बेलारस ही दोन राष्ट्रंही कीव्हन रसचा वारसा सांगतात. हे नातं आपण नीटपणे ध्यानी घ्यायला हवं. तसंच आजचा रशिया हा सोव्हियेत रशियाचा राजकीय वारसदार जरी असला तरी त्याचा साम्यवादी सोव्हियेतशी काहीही भावनिक संबंध नाही. निदान रशियन जनतेला तरी तो नको आहे. ही बाब सुद्धा आपण विचारांत घ्यायला हवी.

आता कोणी अशी शंका काढतील की दक्षिणी श्लावक कसेकाय उत्पन्न झाले? लेक, चेक व रस च्या कथेतनं सर्बिया, क्रोयेशिया वगैरे दक्षिण युरोपातले श्लावक कुठून निर्माण झाले ते स्पष्ट होत नाही. मात्र असं असलं तरी रशिया सर्बियास आपला श्लावक मित्र मानतो.

समकालीन पार्श्वभूमी ( इ.स. १९४९ ते २०१४ ) :

आज नाटोचा विस्तारक्रम रशियास का चिंतेत टाकतो ते वरील ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिल्यावर लक्षात येतं. नाटो म्हणजे NATO हे North Atlantic Treaty Organisation या संस्थेचे आद्याक्षररूप आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियेत रशियाच्या विस्तारवादाची प्रतिक्रिया म्हणून हा करार १९४९ साली अस्तित्वात आला. हा सुरुवातीस उत्तर अटलांटिक देशांना बांधून ठेवणारा करार होता. नाटोस प्रत्युत्तर म्हणून सोव्हियेत रशियाने १९५५ साली पूर्व जर्मनी, रोमेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, अल्बेनिया, इत्यादि साम्यवादी गोटातील राष्ट्रांना बरोबर घेऊन वॉर्सा करार अंमलात आणला. १९९१ साली सोव्हियेत विघटीत झाल्यावर 'सोव्हियेत रशिया' नामे काही वस्तू उरली नाही. वॉर्सा करार आपसूकंच रद्द ठरला. त्यामुळे नाटोचंही प्रयोजन ( raison d'etre ) संपुष्टात आलं. परंतु नाटो गट काही विलयास पावला नाही. उलट उत्तरोत्तर वाढंत गेला.

जर्मन एकीकरणाच्या संदर्भात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जेम्स बेकर व रशियाचे अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्यातला संवाद रोचक आहे. पूर्व जर्मनीत नाटोच्या झेंड्याखाली बिगर जर्मन तुकड्या तैनात केल्या जाणार नाहीत असं सामंजस्य रशिया व नाटोत विकसित झालं होतं. नाटोस जर संयुक्त जर्मनीत स्थान मिळालं तर पूर्व युरोपीय देशांना दिलासा द्यावा लागेल. असा दिलासा देण्यासाठी 'नाटोचा पूर्वेकडे विस्तार करायची गरज नाही' असा सूर बेकर यांनी गोर्बाचेव्ह यांच्याकडे लावला. कालांतराने याचा अर्थ पुतीन यांनी असा लावला की नाटो बर्लिनच्या पूर्वेकडे विस्तार करणार नाही. मात्र अमेरिकी गोट म्हणतो की नाटो आपणहून हालचाल करणार नाही हा पूर्व युरोपीय देशांना दिलेला दिलासा आहे. जर पूर्व युरोपीय देश स्वत:हून नाटोत सामील व्हायला उत्सुक असतील तर नाटो त्यांना सामील करून घेईल. अशा रीतीने नाटोच्या पूर्वेकडील विस्तारनीतीतून रशिया विरुद्ध नाटो अशी वैचारिक तेढ उत्पन्न झाली. हा वैचारिक संघर्ष २००७ सालापासनं अधिक ठळक झाला आहे.

आज नाटोचा बराच विस्तार होऊन आज त्यात मध्य व पूर्व युरोपीय राष्ट्रेही सामील झाली आहेत. चेक, रोमानिया, ग्रीस, इटली, हंगेरी, स्लोव्हेनिया, तुर्कस्थान यांचा उत्तर अटलांटिक समुद्राशी काडीमात्र संबंध नाही. साहजिकंच रशियास ही घेराव घालणारी खेळी वाटते. पोलंड व चेक नाटोत गेलेच आहेत. आता युक्रेनही नाटोत जाणार म्हणतोय? आपला पारंपारिक वारसा शत्रूच्या तोंडी जात असतांना रशियाने फक्त बघंत राहायचं का, असा प्रश्न आहे.

हा झाला १९४९ ते २०१४ पर्यंतच्या समकालीन पार्श्वभूमीचा अतिसंक्षिप्त व निवडक आढावा. आता सांप्रत पार्श्वभूमी बघूया.

सांप्रत पार्श्वभूमी ( इ.स. २०१४ ते २०२१ ) :

यानुकोव्हिच हा २०१३ साली झालेल्या निवडणुकीतून युक्रेनचा निर्वाचित अध्यक्ष बनला होता. त्याला पुतीन यांचाही पाठिंबा होता. परंतु क्रांतीचं खूळ डोक्यात शिरल्याने युक्रेनी लोकांनी त्यास हुसकून लावला. तो पुतीनकडे पळाला. पुतींनी मात्र युक्रेनी जनतेची इच्छा जाहीरपणे उचलून धरली. यानुकोव्हिच यांना आता भवितव्य नाही हे घोषित केलं. या घोषणेनंतर युक्रेनमधली अनागोंदी संपून शांतता नांदायला हवी होती. पण झालं भलतंच. रशियाच्या सीमेलगतच्या डॉनबास विभागात ( म्हणजे दोनेत्स्क व लुगान्स्क प्रांतद्वायींत ) भीषण हिंसाचार चालू झाला ( २०१४ मार्च ). हा हिंसाचार आजतागायत चालू आहे. याचं लक्ष्य या दोन प्रांतांतील रशियन नागरिक हे आहे. डॉनबास विभाग रशियाच्या सीमेस लागून असल्याने तिथे रशियन बोलणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. गेले सात आठ वर्षं सतत हिंसाचार चालू असूनही आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याची दखल घेतलेली नाही ही सल तेथील जनतेच्या मनांत आहे. पुतीन यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी असं तिथल्या रशियन लोकांना वाटतं.

नाटो व अमेरिकी सी आय ए च्या पुढाकाराने रशिया व इतर जुन्या सोव्हियेत राष्ट्रांत रंगीत क्रांत्या व उठाव ( colour revolutions and unrests ) चालू आहेत. उदा : चेचन्या ( १९९४ - १९९६ व १९९९ - २००० ) , जॉर्जिया-अबकाझिया-ओसेटिया ( २००८ ) , क्रीमिया ( २०१४ ) , किरगिझीस्थान ( २०२१ ) , कझाखस्थान ( २०२२ ) , युक्रेन ( २००५ - २०२२ ). प्रत्येक क्रांती वा उठावानंतर रशियन जनतेच्या मनात एक प्रश्न निश्चितपणे असतो : पुढील क्रांती मॉस्कोत होणार का? रशियन जनतेस जुन्या साम्यवादी दडपशाही राजवटीकडे आजिबात परतायचं नाहीये. यावरून तिची मनस्थिती कळते.

अनागोंदी टाळण्यासाठी क्रीमियात रशियाने वेगवान हालचाली करून तो प्रांत रशियास जोडून घेतला. तत्संबंधी माहिती इथे आहे : https://misalpav.com/comment/1133614#comment-1133614

गेल्या दोनतीन महिन्यांतली आत्ताची पार्श्वभूमी :

या युक्रेन युद्धापूर्वी कझाखस्थानाच्या राजधानीत अल-मटी येथे इंधनाच्या दरवाढीवरनं निदर्शनं झाली होती. इंधनाची दरवाढ हे केवळ निमित्त होतं. खरा उद्देश रशियानुकूल राजवट अस्थिर करणे हा होता. पुतीन यांनी सैन्याच्या तुकड्या सत्वर हलवून अराजक आटोक्यात आणलं. नाटोस ही वेगवान खेळी अनपेक्षित होती. या उठावास तुर्कस्थानचा छुपा पाठिंबा होता. तुर्की हेरांनी या उठावास उत्तेजन दिलं होतं. माजी राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नजरबायेव्ह याचा भाचा ( वा पुतण्या ) समत अबिश याची त्या उठावास सहानुभूती होती असा आरोप केला जातो. त्याला सांप्रत राष्ट्राध्यक्ष तोकायेव्ह यांनी सुरक्षासमितीच्या उपप्रमुख पदावरून हाकलला. ही रशियन उंटाच्या पाटीवरची शेवटची काडी ठरली असावी, असा माझा कयास आहे.

अल-मटीच्या उठावाच्या एकंच महिना आधी म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये किरगीझस्थानाची राजधानीत बिष्केक येथेही एक उठाव ( की दहशतवादी हल्ला ? ) झाला होता. तो चटकन दडपून टाकला गेला असं ऐकिवात आहे. याची पाळेमुळे ब्रिटन व तुर्कस्थान येथल्या अशासकीय संस्थांपाशी ( NGOs ) जाऊन पोहोचतात.

नाटो कशा प्रकारे रशियास घेराव घालतोय हे कळतं. हा घेराव घालायचं एक प्रमुख कारण म्हणजे रेशीमपट्टा ( Belt Road Initiative ). उघडपणे रशियाचं नाव नसलं तरी चीन व रशिया यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला तर पश्चिम युरोप व अमेरिका, ज्यास प्रथम जगत ( first world ) म्हणतात त्याची सद्दी संपुष्टात येईल. रेशीमपट्ट्यास खीळ घालण्यासाठी म्हणून नाटोस मध्य आशिया अस्थिर करायचा आहे. त्याची किंमत रशियाने का म्हणून मोजायची?

--------------x--------------x--------------

निरीक्षणं, भाष्यं व टिपण्या :

आता काही निरीक्षणं, भाष्यं व टिपण्या पाहूया.

१.
पोप म्हणतो की हे युद्ध निषिद्ध आहे व ते ताबडतोब थांबवा. भले ठीक. पण २०१८ साली युक्रेनी पारंपरिक चर्च रशियन चर्चपासून विभक्त झालं तेव्हा हाच पोप आनंदाने नाचला असणार. आता त्याच्या चमच्यांच्या बुडाला चूड लागल्यावर मोठ्या शांतीच्या गप्पा मारतोय. युगोस्लाव्हियाच्या त्रिभाजनात ऑस्ट्रिया, जर्मनी व व्हाटिकन यांचा हात होता असा संशय सर्बियन लोकं नेहमी घेतात. असाच संशय युक्रेन-रशिया चर्चच्या घटस्फोटाच्या बाबतीतही घेता यावा.

पोपमहाशय आज २५ मार्च रोजी रशिया व युक्रेन यांचं कॉन्सिक्रेशन करणार आहेत. म्हणजे हे दोन देश पवित्रकृत झाले. याचा अर्थ आता तिथे रोमन क्याथलिक धर्मांतर भट्टी ( कन्व्हर्शन इंजिन ) जोरात सुरू होणार. बोंबला तिच्यायला. नसत्या माकडचेष्टा नुसत्या.

२.
पुतीन म्हणतात की युक्रेन निर्नाझी होईस्तोवर युद्ध चालू राहील. तर युक्रेन आणि नाझींचा नेमका संबंध काय, ते पाहूया. त्याचं असं झालं की १९४१ च्या जूनमध्ये हिटलरने स्टालिनशी केलेला अनाक्रमणाचा करार मोडला व नाझी फौजांनी सोव्हियेतच्या दिशेने मुसंडी मारली. युक्रेन त्यावेळी सोव्हियेत टाचेखाली रगडून निघंत होतं. त्याला साम्यवादी सोव्हियेत राजवट अजिबात नको होती. युक्रेनी लढवय्यांना जर्मनीच्या नाझी फौजा मित्रासम होत्या. शत्रूचा शत्रू तो मित्र, इतकं साधं गणित होतं. नाझींनी सुरुवातीस मैत्री राखली. पण नंतर युक्रेनात लिबेनस्राऊम ( lebensraum ) संकल्पना राबवायला सुरुवात केली. या संकल्पनेनुसार वाढत्या जर्मन लोकसंख्येस वसतीसाठी युक्रेनची भूमी मोकळी करून द्यायची होती. याचा सोप्या शब्दांत अर्थ स्थानिक युक्रेनी लोकांची गचांडी धरून त्यांना हाकलून लावणं वा ठार मारणं असा होतो. हे धोरण राबवण्यासाठी देशद्रोही युक्रेनी लोकांची गरज होती. तसे त्यांना मिळालेही. हेच नाझीसहायी युक्रेनी आजही अस्तित्वात आहेत. पुतीन अशांना उखडून काढायचं म्हणताहेत.

३.
इस्रायलचे पंतप्रधान नभताली बेनेट यांनी इस्रायल मध्यस्थीस तयार आहे म्हणून पुतीनना अनेक निरोप पाठवले. ते स्वत:ही पुतीन यांना भेटून आले. पण पुतीन ढिम्म. त्यांनी बेनेटना जराही धूप घातली नाही. यामागची पार्श्वभूमी सांगतो.

पुतीन यांनी यापूर्वी इस्रायलला भीषण छुपी धमकी दिली आहे. २००३ साली अमेरिकेने इराकात सैन्य घुसवल्यावर पुतीननी गुपचूपपणे इराण व सिरीयामध्ये सनबर्न ( अधिकृत नाव एसएस-एन-२२ ) ही क्षेपणास्त्रे तैनात केली. ही अण्वस्त्रवाहू आहेत. जर इस्रायलने वा अमेरिकेने जास्त वचवच केली तर इस्रायल क्षणार्धात जाळून टाकलं जाईल असा गर्भित इशारा होता. त्या वेळेस अमेरिका इराणवर आक्रमण करणार अशी बरीच हवा झाली होती. तिला प्रत्युत्तर म्हणून पुतीन यांनी हे पाऊल उचललं होतं. त्यावेळी इस्रायल गप बसलं. कारण की त्यांतच शहाणपणा होता. रशियाने मग ही क्षेपणास्त्रे चीनलाही दिली.

मग आज बेनेट कशासाठी इतके टणाटणा उडताहेत? हत्तींच्या टक्करीत सशाचं काम काय? काहीच नाही. बेनेट पुतीनकडे मध्यस्थीसाठी गेलेच नव्हते मुळातून. ते गेलेले इस्रायलचं बूड सुरक्षित राखायची याचना करण्यासाठी. खोटं वाटतंय? मग बेनेट मोदींना भेटायला दिल्लीत कशाला येणारेत एप्रिलात? इस्रायलचं बूड धड ठेवण्यासाठीच ना!

२००३ साली पुतीननी उघड धमकी दिली नव्हती कारण मामला रशियापासून दूर असलेल्या इराकचा होता. या खेपेस मामला रशियाच्या दारावर धडका देणारा, म्हणूनच अतिशय गंभीर आहे. याचसाठी पुतीन यांनी उघड धमकी दिली आहे की, जर कुणी युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध हस्तक्षेप केला तर त्या देशाच्या इतिहासास ठाऊक नसलेलं असं ( प्रखर ) प्रत्युत्तर ताबडतोब दिलं जाईल. या इशाऱ्याची चुणूक बघायची असेल तर, सनबर्नच्या जागी त्याच्याहून कैकपटीने संहारक ब्राह्मोस ठेवा आणि चीनच्या जागी भारत ठेवा. आता बघा कसं वाटतंय ते.

पुतीन यांनी त्यांच्या दाढीवाल्या मित्रास नमुना पेश करायला सांगितला. मग काय, त्यानं एक ब्राह्मोस दिलं 'चुकून' पाकिस्तानात पाठवून. निरनिराळ्या देशांचे प्रमुख सध्या नव्या दिल्लीत रीघ का लावताहेत ते कळतं, नाहीका? झलक दिखाके कर गया दिवाना ....!

४.
पोप आणि बेनेट यांच्या विधानांचा समाचार घेतल्यावर आपण झेलेन्स्कींकडे वळूया. या इसमाचा आगापिछा नीट तपासला पाहिजे. याच्या नावाने अनेक अफवा उठताहेत. याला म्हणे पुतीननी वाचवला. युद्ध सुरू झाल्यावर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी काही लोकं कीव्हमध्ये घुसले होते. याची माहिती पुतीननी झेलेन्स्कींना पुरवली. मग युक्रेनी सुरक्षकांनी यथोचित पद्धतीने हत्याऱ्यांना नष्ट केलं.

०१ मार्चास बातमी आली की झेलेन्स्कींच्या हत्येचा कट फसला आहे ( इंग्रजी दुवा ) : https://news.yahoo.com/zelensky-assassination-plot-foiled-ukrainian-2254...

या बातमीनुसार रमझान कादिरोव्ह या चेचेन नेत्याची ( जो पुतीनचा मित्र आहे ) काही माणसं झेलेन्स्की यांची हत्या करायला कीव्हमध्ये आली होती. या हत्याऱ्यांची माहिती रशियाच्या गुप्तचर यंत्रणेतल्या ( फेडरल सिक्युरिटी ब्युरो म्हणजे एफ एस बी तल्या ) एका गोटाने युक्रेनी सुरक्षादलांस पुरवली. त्याप्रमाणे युक्रेनी सुरक्षादलाने हत्याऱ्यांची यथायोग्य प्रकारे विल्हेवाट लावली. एफ एस बी मधला हा गोट स्वत:स युद्धविरोधी म्हणवून घेतो. त्याला युक्रेनी युद्ध नकोय.

लंडनच्या टाईम्स मध्ये एक लेख आला : This war will be a total failure, FSB whistleblower says
लेखाचं शीर्षक : हे युद्ध ( रशियासाठी ) पार अपेशी ठरेल, इति एक सद्भेदी

या लेखानुसार रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला ( एफ एस बी ला ) पुतीननी युद्धाविषयी पार अंधारात ठेवलं होतं.

आता यातनं अनेक प्रश्न उत्पन्न होतात.

एफ एस बी पुतीन यांचे आदेश पाळीत नाही काय? हे खरं असेल तर पुतीन यांनी तिच्या प्रमुखास अलेक्झांडर बॉर्तनिकोव्ह यास पदच्युत वा पदावनत का केलं नाही? रमझान कादिरोव्ह हा ही पुतीनच्या रोषास पात्र व्हायला हवा ना? पण ते ही घडलेलं दिसंत नाही. नक्की काय प्रकरण शिजतं आहे?

बहुतेक पुतीन व एफ एस बी यांनी झेलेन्स्की यांचा जीव वाचवला आहे. मात्र हे कार्य युक्रेनी सुरक्षादलाने केलं असं दाखवण्यात आलंय. यामुळे युक्रेनी जनतेत झेलेन्स्की यांची नेता म्हणून प्रतिमा अधिक भक्कम होते. तर मग पुतीन यांना झेलेन्स्की नेतेपदी कशाला हवेत? माझ्या मते झेलेन्स्की हा माणूस प्रभावप्रवण ( prone to Putin's influence ) आहे. त्याला हाताशी धरून पुतीन यांना आपली खेळी अचूकपणे करता येईल.

झेलेन्स्कीस यापूर्वीही जिवावरच्या धमक्या मिळाल्या आहेत. खरंतर युक्रेनात राष्ट्रप्रमुखास ठार मारण्याचे पूर्वीपासून अनेक प्रयत्न झालेले आहेत. ( २००४ साली युशेन्को यांना विष दिलेलं आठवतंय का कुणास? ) या हत्यांच्या प्रयत्नांच्या मागे युक्रेनी नाझी आहेत. या नाझींची खाजगी सेना डॉनबासमध्ये धुमाकूळ घालतेय. पुतीन याच नाझींना उखडून टाकू पाहताहेत.

सदर घटनेचा हा अन्वयार्थ पटण्याजोगा आहे. या नाझींचा प्रमुख आहे दमित्री यारोश ( Dmitry Yarosh किंवा Jarosche ). याच यारोशने २०१४ साली यानुकोव्हिचची राजवट उलथून टाकायला अपार कष्ट घेतले होते. हा पक्का रशियाद्वेष्टा आहे.

तर मग खरा सामना पुतीन विरुद्ध झेलेन्स्की असा नसून पुतीन विरुद्ध यारोश असा आहे. आहे किनई गंमाडी जंमत !

--------------x--------------x--------------

मला असं वाटतं की :

नुकतीच बातमी आलीये की पुतीन यांनी युद्ध ०९ मे पर्यंत संपवा मानून आदेश दिलेत. एकंदरीत युद्ध लांबवायची पुतीन यांची इच्छा नाही. ०९ मे पर्यंत युक्रेन नाझीमुक्त करणे हे ध्येय आहे. साहजिकंच आण्विक युद्ध होणार नाही. कारण की ते करायची पुतीनची इच्छा दिसंत नाही. पण गरज पडलीच तर तयारी मात्र जय्यत आहे.

माझ्या मते आता युक्रेनचे ३ ते ५ तुकडे संभवतात. पहिला डॉन नदीचं खोरं, अर्थात डॉनबास ( Don basin ) . हा विभाग कदाचित रशियात दाखल होईल. किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहील. पण याचं युक्रेनमध्ये राहणं अवघड दिसतंय. दुसरा भाग मुख्य युक्रेन, ज्याची राजधानी कीव्ह राहील. तिसरा भाग युक्रेनी नाझींचा असेल. हे नाझीकेंद्र पोलंड सीमेनजीक लुइव्ह ( Lviv ) नगरीकडे सरकतं आहे. ते काही काळ बहुधा तिथेच राहील. कदाचित हा वेगळा तुकडा पडायची शक्यता आहे. नाझी युक्रेनमध्ये राहिले तर कीव्हची डोकेदुखी वाढणार. म्हणून कदाचित कीव्हच वेगळा तुकडा तोडून देईल. चौथा भाग क्रीमिया म्हणता येईल, पण तो आधीच रशियात दाखल झाला आहे. पाचवा भाग हा डॉनबास व क्रीमिया यांना जोडणारा पट्टा ( मारियोपोल नगरीच्या आजूबाजूचा प्रदेश ) आहे. हा कदाचित रशिया आपल्या ताब्यात घेईल. त्यामुळे त्यांना क्रीमियात शिरायला भूमार्गे रस्ता उपलब्ध होईल.

भारताचा संभाव्य फायदा असा आहे की बलुचिस्थान आता भारतात सुकरपणे सामील होऊ शकतो. तिथल्या जनतेचा भारतास पूर्ण पाठिंबा आहे. पुतीन डॉनबासात जे करू शकतात ते मोदींना बलुचिस्थानात करायला कोण अडवणार आहे?

मला अजूनेक गोष्ट व्हायला हवीये. ती म्हणजे अमेरिकेचं विभाजन. ज्या प्रकारे नाटो ने मस्ती चालवली आहे, त्यावरून जग अणुयुद्धाच्या खाईत केव्हाही ढकललं जाऊ शकतं. नाटोचं खच्चीकरण करण्यासाठी 'न रहेगा बांस न रहेगी बांसुरी' या न्यायाने अमेरिकेचीच फाळणी करून टाकायची. पुतीन व मोदींनी मनावर घेतलं तर ते घडवून आणू शकतील (, असा माझा अंदाज आहे ). खरंतर आज ट्रंप राष्ट्राध्यक्ष असते तर रशियावर युद्धाची वेळ आलीच नसती. पण ट्रंपूतात्यांची ऐन वेळेस फाफलल्याने त्यांनी निमूटपणे सत्ता सोडली. आणि जगाच्या नशिबी आलीया भोगासी .... दुसरं काय.

--------------x--------------x--------------

जाताजाता : मायकेल खोदार्कोव्हास्की आठवतोय का कोणाला?

असो.

जमेल तसं लिहलं आहे. त्यामुळे लेख विस्कळीत आहे. सगळं काही लिहिता येणार नाही, पण जसजशा घटना घडंत जातील तसतसं भाष्य करंत जाईन म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Mar 2022 - 9:52 pm | मदनबाण

चांगली माहिती दिली आहे.

पुतीन यांनी त्यांच्या दाढीवाल्या मित्रास नमुना पेश करायला सांगितला. मग काय, त्यानं एक ब्राह्मोस दिलं 'चुकून' पाकिस्तानात पाठवून. निरनिराळ्या देशांचे प्रमुख सध्या नव्या दिल्लीत रीघ का लावताहेत ते कळतं, नाहीका? झलक दिखाके कर गया दिवाना ....!
ये कुछ पट्या नय मेरुकु... अस्थिर पाकिस्तानातील त्यांच्या सैन्याची मिसाईल ट्रेस आणि ते नष्ट करण्याच्या क्षमता किती हे आपण पडताळुन पाहिले. पाकड्यांनी चायनीज HQ16A [ LY-80 ] सरफेस टु एअर डिफेन्स मिसाईल्स [ सॅम ] त्यांच्याकडे बसवल्या आहेत, याच बरोबर इतर ही चायनीज रडार्स त्यांनी बसवल्या आहेत.
चीनी वस्तुं बद्धल एक म्हण आहे :- चायना का माल चला तो चांद तक, नही तो शाम तक ! तेव्हा आपल्या मिसाईलला ते नष्ट न करु शकल्यांने त्या सर्व सिस्टीम्सचा आणि त्या ऑपरेट करणार्‍या मंडळींचा या निमित्त्याने पर्दा फाश झाला. ही घटना घडल्यावर पाकिस्तानी लष्करात जो हडकंप झाला, त्या नंतर सगळ्या प्रकारचे हाय अलर्ट्स आणि बचावात्मक उपाय अमलात आणले गेले. या निमित्त्याने आपल्याला ते अश्या परिस्थीतीत काय करतात आणि कसे वागतात याची देखील महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली असणार.पाकिस्तानी लष्कर आणि हवाईदल यांच्या मनोबलावर याचा मोठा परिणाम झाला आहे /होईल. तसेच सर्जिकल स्ट्राईक बरोबर हे मिसाईल त्यांच्या हद्दीत बिनदिक्कत घुसवुन आपण हे जगाला दाखवुन दिले आहे की आम्ही आमचे डिफेन्सीव्ह धोरण सोडुन ऑफेस्निव्ह डिफेन्सवर शिफ्ट झालो आहोत, आम्ही हव्या त्या वेळी हवे ते टार्गेट नष्ट करु शकतो अशी भिती देखील आता पाकिस्तानच्या मनात उत्पन्न करुन ठेवण्यात यशस्वी झालो आहोत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm not special , i'm just limited edition.

गामा पैलवान's picture

26 Mar 2022 - 2:04 am | गामा पैलवान

मदनबाण,

मोदींनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

27 Mar 2022 - 5:54 pm | मुक्त विहारि

फारच उत्तम ....

आंतरराष्ट्रीय राजकारण, फार वेगळ्या पातळीवर चालते

त्यामुळे, तुम्ही म्हणता तशी, शक्यता नाकारता येत नाही.

शशिकांत ओक's picture

27 Mar 2022 - 7:11 pm | शशिकांत ओक

गा. पैलवान
रशियन पुतीन दंड थोपटून उभे राहिले आहेत.
तुम लढते रहो हम तुम्हारे कपडे संभालते है... अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हणून युक्रेनला अधांतरी ठेवले आहे.
पाकिस्तान वझीरे आज़म क्रिकेटर इम्रान खान यांच्या शेवटच्या (?) भाषणाच्या प्रतीक्षेत आहे.

Trump's picture

28 Mar 2022 - 5:35 pm | Trump

९ मे चा काय मुहूर्त लागला आहे?

रशियाने ९ मेला नाझी जर्मनीला हरावले आहे. आणि रशिया सध्या युक्रेनमध्ये नाझीबरोबर युध्द करत आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

25 Mar 2022 - 10:46 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान आहे लेख.

सौन्दर्य's picture

25 Mar 2022 - 11:29 pm | सौन्दर्य

लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. पण ------------------

'अमेरिकेचे विभाजन व्हायला पाहिजे' हे काही पटले नाही. ज्यावेळी दोन तुल्यबळ योद्धा समोरासमोर उभे ठाकतात त्यावेळी युद्ध होण्याची शक्यता कमी असते, मात्र बलवान योध्यासमोर किरकोळ योद्धा आला तर युद्ध अटळ असते. जे आपण रशिया विरुद्ध युक्रेन बघतोय. रशिया व अमेरिका हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्यामुळे दोघेही एकमेकांना वचकून आणि ओळखून आहेत असे मला वाटते. आणि त्यामुळेच तिसरे महायुद्ध अजून तरी जगावर लादले गेले नाही. उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल असे मला वाटते. अर्थात चीनच्या रुपात तिसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी निर्माण झालाच आहे.

गामा पैलवान's picture

26 Mar 2022 - 2:26 am | गामा पैलवान

सौन्दर्य,

उद्या ह्यातील एकजण जरी कमकुवत झाला तर दुसऱ्यासाठी युद्धाचा तसेच जगावर राज्य करण्याचा मार्ग मोकळा होईल

कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच.

आ.न.,
-गा.पै.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 9:33 pm | चेतन सुभाष गुगळे

कुणीही एक कितीही मजबूत असला तरी तो पूर्ण जगावर राज्य करू शकंत नाही. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उत्पन्न होतोच.

म्हणजे तुम्हाला चीन म्हणायचे आहे का? की भारत?

तुम्ही नेहमीच कष्ट घेउन वेगळा पर्सपेक्टिव्ह मांडत असता.
येथेही ऊत्तम प्रकारे मांडला आहे.

निनाद's picture

26 Mar 2022 - 5:37 am | निनाद

कदाचित या युद्धाचे धोरण खूप आधी पासून आखले जात आहे. कोव्हिडमध्ये कधीही बाहेर न पडलेले पुतीन अचानक येऊन मोदींना भेटून गेले होते.
अमेरिकेचे विभाजन करण्याआधी पाकिस्तान चे विभाजन आवश्यक आहे. अमेरिकेचे विभाजन केले तरी डेमोक्रॅटिक पक्ष आणि युरोपिय युनियन यांच्यातले सख्य मोडून काढले पाहिजे. डेमोक्रॅटिक पक्ष तर विसर्जित केला पहिजे असे माझे मत आहे. हा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे जुन्या सोवियेत युनियन चे नवे रूप आहे.

मायकेल खोदार्कोव्हास्की ला पुतीन ने का सोडून दिले होते हे न उलगडलेले कोडे आहे. पूतिन ने नक्की काय सौदा केला असावा? खोदार्कोव्हास्की यांनी बोरिस येल्त्सिनच्या पहिल्या सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. म्हणजे हा माणूस पूर्णपणे कम्युनिझमवरील विश्वास गमावलेला आहे असे म्हणायला जागा आहे. या मायकेल खोदार्कोव्हास्कीला सपोर्ट मात्र ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने केला होता. ही पाताळयंत्री संस्था प्रत्येक विवादात कशी अचूकपणे आढळते!

दीपक११७७'s picture

27 Mar 2022 - 1:07 pm | दीपक११७७

छान वाटला लेख ,

जाता जाता....

झुलोस्कि सारख्या आंतराष्ट्रीय व्यक्तीचा उल्लेख लेखा मध्ये नाही याचा खेद वाटतो का?!:;

मला दोन तीन प्रश्न पडले आहेत.
१) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का?
२) पासष्ट वयाचा नियम पाळून मोदी पुन्हा निवडणुकीत उभे राहणार नाहीत तर भाजपात दुसरा कोणता चलाख नेता आहे. आणि सर्व विरोधी एक होऊन लढणार तर ममता दिदिला डावलणार कसे? जोपर्यंत ममता तोपर्यंत राहुल बाबाला चानस नाही. मग कोण?
३) तिसरा प्रश्न म्हणजे चीनला आपल्या लोकसंख्येला अन्न कसं पुरवायचं याची धास्ती पडल्याने किंवा त्या नियोजनात गुंतल्याने तळ्यात उडी मारत नाही का?

शाम भागवत's picture

28 Mar 2022 - 12:42 pm | शाम भागवत

पासष्ट वयाचा नियम पाळून

तुम्हाला ७५ म्हणावयाचे असावे.

१) भारत हा दुय्यम मोठा देश आणि मुख्य मार्केट आहे म्हणून इकडे पावणे मेवणे येत जात आहेत का?

१. मला वाटते २०१४ नंतर चीन, रशिया व भारत हे तीन देश हे एकमेकांमधे सत्तासमतोल साधणारे देश बनत आहेत. त्या अगोदर चीनची मर्जी सांभाळण्याचीच कसरत आपण जास्त करत होतो.

२. चीन भारत व रशिया हे तीन्ही देश एकत्र झाले तर नाटोला फारच जबरदस्त प्रतिस्पर्धी निर्माण होईल. अमेरिका व युरोप हे कायम दबावाखाली राहतील. यास्तव अमेरिका व युरोप आता भारताशी चांगले संबंध ठेवायचे तसेच वाढवायचे प्रयत्न करत आहेत.

या अगोदर अमेरिका व युरोप यांनी रशिया व चीन एकत्र येऊ नयेत यासाठी चीनला जवळ केले होते. पण आता चीन भरवशाचा राहिला नाही. त्यामुळे आता भारताचा नंबर लागला आहे. दुसरे सर्वाधीक महत्वाचे कारण म्हणजे भारत लोकशाही देश असल्याने भारतात काय चालले आहे ते कळू शकते. तसे रशिया व चीन बद्दल म्हणता येत नाही. त्यामुळे भारताचे महत्व २०५० पर्यंत तरी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.

चीनची जाहीरातबाजी खूप झाली आहे. मात्र तो तेवढा बलवान नाही हे जसजसे दिवस जातील तसतसे जगाला लक्षात येत जाईल. विशेषकरून भारताला हे जसजसे जाणवत जाईल व आपण आपली शस्त्रसामुग्रीमधे आत्मनिर्भर होत जाऊ त्याप्रमाणात पाकीस्तानचे विभाजन करायचे मनसुबे रचले जातील असे वाटते.

थोडक्यात भारताची मित्रसंख्या यापुढे सातत्याने वाढतच जाताना दिसणार आहे.

असे मला वाटते.

कंजूस's picture

30 Mar 2022 - 6:52 am | कंजूस

६५.
अगोदर महाजन आणि सुषमा स्वराजना तिकिट तिकिट नाकारलं होतं. यामुळे पवारसाहेबही नाराज होते. तसं आपलंही होईल.

पण आता म्हणतात मी नाही त्यातला. कांग्रेस एक होऊन त्याचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. गजराचे घड्याळ हातावर लावेन.

कपिलमुनी's picture

27 Mar 2022 - 3:51 pm | कपिलमुनी

भक्तांनी बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत.

मुक्त विहारि's picture

27 Mar 2022 - 6:44 pm | मुक्त विहारि

तो भारताचा मित्र देश होण्याची शक्यता धूसर आहे .

बांगलादेश हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहेच की ....

आनन्दा's picture

27 Mar 2022 - 8:02 pm | आनन्दा

होणार नाहीच असे पण नाही..
तसेही बलुचिस्तान मध्ये हिंदू जवळजवळ नाहीतच.. त्यामुळे त्यावरून वाजायची भीती नाहीये..

पाकिस्तान चे मात्र कंबरडे मोडेल.. शेजारी लहान लहान देश असणे नेहमी सोपे असते, कारण ते एकमेकात भांडत बसले तर तुम्हाला त्यांचा त्रास कमी होतो

बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत.
मला नाही वाटत कोणी "मांडे" खात आहे... पाकिस्तान ला निव्वळ त्रास देण्यासाठी " "बलुचिस्तान " ची आग धुमसत ठेवणे हि केवळ एक खेळी आहे

कंजूस's picture

27 Mar 2022 - 4:47 pm | कंजूस

केशर मार के?

माहिती गोळा करून मगच, विश्लेषण करता आणि मग मुद्दा मांडता...

तुमच्या लेखांतील काही विचार पटत किंवा न पटोत, पण तुम्ही आधी बाण मारून, मग वर्तुळे काढत नाही...

तुमचे आणि माझे, वैचारिक मतभेद असले तरी, वैयक्तिक पातळीवर ते कधीच हमरीतुमरीवर उतरले नाहीत आणि उतरण्याची शक्यता देखील नाही...

एक पूर्णपणे वेगळा दृष्टीकोन..
आजपर्यंत असा origin वगैरेंचा कोण कधी वाचनात आला नव्हता.

कर्नलतपस्वी's picture

28 Mar 2022 - 9:45 am | कर्नलतपस्वी

माझ्या मते आता युक्रेनचे ३ ते ५ तुकडे संभवतात. पहिला डॉन नदीचं खोरं, अर्थात डॉनबास ( Don basin ) . हा विभाग कदाचित रशियात दाखल होईल. किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहील

परस्पेक्टीव्ह पटला.आजच्याच वृत्तपत्रातील विश्लेषण व तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपले भाकीत खरे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बलुचिस्तान चे मांडे खाऊ नयेत.
मला नाही वाटत कोणी "मांडे" खातय, या चौ२१२ याच्याशी सहमत आहे.
माथेफीरू आणी भुक्कड शेजारी नेहमीच डोकेदुखी आसतो बदलू शकत नाही म्हणून कायम त्याला टेटंरहूक वर ठेवणे हाच एक उपाय.

कर्नलतपस्वी's picture

28 Mar 2022 - 9:48 am | कर्नलतपस्वी

गा पै आभ्यास,लेखन शैली भाषासमृद्धीमुळे लेख खुपच छान झालाय.अभिनंदन.

सुबोध खरे's picture

28 Mar 2022 - 11:48 am | सुबोध खरे

काही न पटलेले मुद्दे

१) बलुचिस्तानला भारताचा पाठिंबा ( छुपा किंवा उघड) असला तरी बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही.

असे होईल अशी कोणत्याही भारताच्या (सत्ताधारी किंवा विरोधी) नेत्याची किंवा नियोजन कर्त्यांची कल्पना नाही. कारण ती व्यवहार्य नाही.
(तेथे भक्ती किंवा गुलामी आणणारे लोक पूर्वग्रहदूषित/ सडक्या मनोवृत्तीचे आहेत)

केवळ तो इतिहासात भारताचा अनेक भाग होता म्हणून परत बलुचिस्तान भारताचा भाग होईल हे आपल्या आयुष्यकाळात अशक्य आहे.

पाकिस्तानचे चार तुकडे करणे हा भारताच्या डावपेचाचा उघड भाग आहे कारण तो देश केवळ इस्लाम या एकमेव खांबावर उभा आहे. भारतापासून वेगळे होण्यास तेवढे कारण पुरेसे असले तरी एकत्र राहण्यासाठी तेवढे कारण पुरेसे नाही.

तेथे पंजाबी लोकांनी सर्वत्र सवता सुभा केल्यामुळे सिंधी, बलुची आणि पठाण या तीन इतर प्रांतातील लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे बांगला देश सारखे हे तीन प्रांत आपल्या भाषिक आणि वंशिक अस्मितेसाठी वेगळे राष्ट्र हवे हि मागणी उचलून धरतात.

२) एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच. https://www.globalsecurity.org/military/world/russia/moskit.htm.

एस एस ( सरफेस टू सरफेस) एन (naval version) २२ हि जहाजावरुन डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे "Sovremennyy" या विनाशिकांवर तैनात असून या विनाशिका रशियाकडे आणि चीनकडे रशियाकडून विकत घेतलेल्या चार विनाशिका आहेत. हि क्षेपणास्त्रे भारताकडे पण आहेत
https://en.wikipedia.org/wiki/Sovremenny-class_destroyer

३) अमेरिकेचे विभाजन हि तर सद्यस्थितीत अशक्य मात्र गोष्ट आहे.हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी.

४)ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे.

मुळात ते क्षेपणास्त्र आपण डागलं कि अपघातानेच गेलं हे नक्की सांगणं कठीण आहे . पण जरी भारताने ते मुद्दाम डागलं असेल तर ( चुकून डागलं हा कांगावा आहे हे मान्य केलं तरी) त्यातून चीनची HQ ९ हि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी आहे हे सिद्ध झालं आहे.

यामुळे पाकिस्तानची (आणि चीनची) हवा टाईट झाली आहे हे मात्र खरं.

आणि चीनची हि प्रणाली फुसकी आहे हे ठरवल्याबद्दल अमेरिका आणि नाटो हे देश आतून भारताला धन्यवादच देत असतील.
कारण आता त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणालीचे भाव वधारले शिवाय चीनच्या एकंदर सामरिक स्थिती बद्दल त्यांना जास्त चांगला अंदाज बांधता येऊ शकेल विशेषतः उद्या तैवान वरून युद्धाला तोंड फुटले तर.

एका चुकीच्या क्षेपणास्त्राने किती कारनामे केले ते पहा.

खरंतर आज ट्रंप राष्ट्राध्यक्ष असते तर रशियावर युद्धाची वेळ आलीच नसती. पण ट्रंपूतात्यांची ऐन वेळेस फाफलल्याने त्यांनी निमूटपणे सत्ता सोडली. आणि जगाच्या नशिबी आलीया भोगासी .... दुसरं काय.

+१ श्री ट्रंप यांच्याइतका प्रामाणिक, मनमोकळा आणि सगळ्यांना संभाळुन घेणारा नेता आजकाल दुर्मिळच.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Mar 2022 - 11:05 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
तात्या निवडणूक हरायला नको होते.

गामा पैलवान's picture

29 Mar 2022 - 2:20 am | गामा पैलवान

सुबोध खरे,

आपला इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.

.... बलुचिस्तान भारताचं भाग कधीही होणार नाही.

बलुचिस्थान स्वतंत्र देश म्हणून तग धरून राहणं जवळजवळ अशक्य आहे. एकतर लोकसंख्या कमी आणि त्यामानाने विस्तार जास्त. शिवार विपुल नैसर्गिक खनिज संपत्ती असल्याने त्यास कोण्या एका देशाचा सहारा घेऊन जगणं भाग आहे. अन्यथा त्याचं जे शोषण आत्ता होतंय तसंच पुढे चालू राहील. संरक्षण, परराष्ट्रव्यवहार वगैरे भानगडी स्वतंत्र बलुचिस्थानाच्या आवाक्यातल्या ( वाटंत तरी ) नाहीत.

म्हणूनंच पाकचा भाग तोडून जरी काढला तरी तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे. या कामासाठी बलुची मराठा लोकांची मदत घेता येईल. इतर बलुचींपेक्षा ते बरेच मवाळ आहेत. आणि मुख्य म्हणजे तो शिक्षित वर्ग आहे. हा वर्ग बाकी बलुची व भारत यांच्यातला दुवा म्हणून काम करू शकतो.

२.

एस एस एन २२ हि क्षेपणास्त्रे जहाज विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यावरुन मोठी अण्वस्त्रे नेता येत नाहीत त्यामुळे इस्त्रायल जाळून टाकण्याची त्यात क्षमता नाहीच.

एकदम बरोबर. पण एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत. निदान २००३ साली तरी ती तयारी झालेली होती. शिवाय इस्रायल अतिशय चिमुकला प्रांत आहे. पालघर + ठाणे + पुणे जिल्हे इतकाच विस्तार आहे ( विकीसंदर्भ : २२०७२ चौकिमी < ५३४४ + ४२१४ + १५६४३ चौकिमी ). त्यातून सबंध इस्रायल नष्ट करायची गरजही नाही. तेल अवीव, हायफा, वगैरे तीनचार प्रमुख शहरांत प्रत्येकी अर्धा मेगाटनचं विवर पाडणं पुरेसं ठरावं. निदान २००३ साली तरी पुरेसं असावं.

वरील आकडेमोड व व्यूहरचना पुतीन यांची आहे. मी ती स्पष्ट करून सांगण्यावर साहजिक मर्यादा आहेत.

३.

हि केवळ कविकल्पना आहे त्यासाठी ना जन मत आहे ना कुठली प्रशासनिक तयारी.

१९४६ साली भारताचं विभाजन ही देखील कविकल्पनाच होती. त्या कवीचं नाव महमंद इक्बाल. पण जून १९४७ मध्ये ती प्रत्यक्षांत आलीच.

बाकी अमेरिकन जनमत वगैरेंना विचारतो कोण. बिडेन धडधडीतपणे निवडणूक चोरून सत्तेत आलाय. हे एक पुस्तक आहे : Civil War II: The Coming Breakup of America

परिचयाव्हेर : मी पुस्तक वाचलेलं नाही.

हे पुस्तक १९९७ साली पहिल्यांदा छापलं गेलं. तेव्हा त्यातल्या गोष्टी अतिरंजित वाटंत होत्या. पण आज जर ग्राहकांचे आढावे बघितले तर त्या अतिरंजित गोष्टी प्रत्यक्षांत उतरल्याहं दिसून येतं. निदान, पुस्तकाचा आढावा घेणारे ग्राहक तरी तसा अभिप्राय नोंदवताहेत.

४.

ब्राम्होस पाकिस्तानात गेलं त्यासाठी पुतीन यांनी श्री मोदी याना सांगितलं हि पण एक अशीच कपोलकल्पित गोष्ट आहे.

रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

29 Mar 2022 - 7:05 pm | सुबोध खरे

तो मोकळा ठेवता कामा नये. तो भारतास जोडून घेतलाच पाहिजे.

जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार?

उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार?

एकाच वेळेस अनेक क्षेपणास्त्रे डागता यावीत.

या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे

हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात?

म्हणजे इस्रायली विमाने किंवा जहाजे यावरून डागल्या जाणाऱ्या गॅब्रियल ब्ल्यू स्पिअर क्षेपणास्त्रांच्या का भूमध्य समुद्राच्या तळाशी गुप्तपणे फिरणाऱ्या इस्रायली पाणबुड्यांच्या टार्गेट प्रॅक्टिस साठी?

उगाच काहींच्या काही?

रिकामं ब्राह्मोस पाकिस्तानावर डागण्यात मोदी व पुतीन यांच्यात सामंजस्य आहे. कोणी कोणाला सांगितलं हे गौण आहे.

मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का?

बाकी चालू द्या

प्रमोद देर्देकर's picture

29 Mar 2022 - 5:57 pm | प्रमोद देर्देकर

गा. पै तुमची माहिती संकलन लाजवाब आहे.
पण आंद्रे यांनी आठवड्या पूर्वी खफवर याची ध्वनीफीत दिली होती. त्यात १४ व्या शतकपासून इतिहास आहे.

सुबोध खरे,

आपला इथला संदेश वाचला.

१.

जेमतेम ५० हजार हिंदू असलेले बलुचिस्तान स्वतःचे काय लष्कर ठेवणार आणि पाकिस्तानी लष्कराकशी काय टक्कर घेणार?

बरोबर. म्हणजेच, स्वतंत्र झाल्यावर बलुचिस्थान परत पाकच्या ताब्यात जाणार. ते टाळण्यासाठीच तर मी त्यास भारतात सामील करून घ्यायचं म्हणतोय.

२.

उगाच बलुची मराठाची बेडकी किती फुगवणार?

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. जोवर बलुची लोकं हिंगलाज देवीस आई मानतात तोवर बलुची मराठ्यांची बेडकी फुगवायला हरकत नसावी. हे माझं वैयक्तिक मत.

३.

या क्षेपणास्त्रांचा टप्पा फक्त २५० किमी आहे. हि काय रशियन जहाजांवरुन डागायची? आणि जहाजे कुठे उभी करायची भूमध्य समुद्रात? .... उगाच काहींच्या काही?

दमास्कस ते तेल अवीव हे अंतर २०० किमीच्या आतबाहेर आहे. सीरियाच्या वाळवंटात ट्रक उभे करता येतील. किंवा मग सुखोईवरनंही डागता येतील.

अर्थात हा पुतीन यांचा प्रश्न आहे. त्यांचं आकलन माझ्यापेक्षा सखोल आहे.

४.

मुळात पुतीन यांनी मोदींना असं सांगितलं याला अंशभर तरी पुरावा आहे का?

असला वा नसला तरी काय फरक पडतो? रशिया-भारताने संयुक्तपणे विकसित केलेलं ब्राह्मोस चीननिर्मित बचावयंत्रणेस हुलकावणी देऊन पाकिस्तानात जाऊन पडतं. हे तथ्य आहे. त्याचा जो काही परिणाम व्हायला पाहिजे तो होणारंच आहे. माझा प्रश्न इतकाच आहे की, ही घटना नेमकी रशिया-युक्रेन युद्धाच्या वेळेसच का घडली असावी?

या दोन घटनांत काहीतरी संबंध असावा हा माझा तर्क आहे. त्यानुसार मी दृष्टीकोन विकसित करू पाहतोय. हा दृष्टीकोन तुम्हांस पसंत नाही. काही हरकत नाही. तुमचे माझे विचार जुळंत नाहीत, असं म्हणून मी या मुद्द्यासंदर्भात इथे थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

तर्कवादी's picture

30 Mar 2022 - 12:11 am | तर्कवादी

काही मुद्दे न पटणारे आहेत

माझ्या मते झेलेन्स्की हा माणूस प्रभावप्रवण ( prone to Putin's influence ) आहे. त्याला हाताशी धरून पुतीन यांना आपली खेळी अचूकपणे करता येईल.

तर मग खरा सामना पुतीन विरुद्ध झेलेन्स्की असा नसून पुतीन विरुद्ध यारोश असा आहे

ही थिअरी फारच फिल्मी वाटते पण तरी राजकारणात त्यातुनही आंतरराष्ट्रीय राजकारणात काहीही घडू शकते आणि दिसते तसे नसते हे मान्य केले तरी जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता. ते रशियाकरिताही पॉलिटिकली करेक्ट ठरले असते. .. नाझींना उघडपणे कोण पाठिंबा देवू शकेल ? जर नाझींचे अस्तित्व व त्यांच्या कारवाया पद्धतशीरपणे सिद्ध करुन जगासमोर आणल्या असत्या तर नाझीविरोधी मोहिमेला नैतिक पाठबळ लाभले असते असे न करता पुतीन युद्धखोरीचा दोष का ओढवून घेत आहे ?
तसेच युक्रेनमधील नाझींची संख्या किती आहे व विस्तार कसा आहे हे याचा उल्लेख नसला तरी काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ? यावरुन मला मिपावर कुणीतरी टाकलेला किस्सा आठवला - ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली.
आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात.
मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ? आधीच्या सोव्हिएत युनियनमध्येच नाझी होते का ? मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो.. असे काही नाझी आज मोठ्या प्रमाणावार अस्तित्वात असतील आणि कारवाया करत असतील हे खरं वाटत नाही.. फारतर नाझी विचाराचे काही घटक असू शकतील.
लेखातील इतर मुद्दे :
अमेरिकेचे विभाजन - हे काय नवीनच ? हे का होणार ? कोण करणार ? असो
पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे.
बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.

सुबोध खरे's picture

30 Mar 2022 - 8:09 pm | सुबोध खरे

संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.

असा स्वयंपूर्ण देश कदाचित केवळ अमेरिकाच आहे. कारण रशिया सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्वयंपूर्ण नाही. बाकी युरोपीय देश तर लांबच राहिले

भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे)

परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे.

या मुळे पाकिस्तानच काय चीनसुद्धा भारताशी कुरबुरी करताना थोडासा कचरेल यात शंका नाही.

गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी.

अपघाताने का होईना पण ब्राम्होसने चीनची क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली फुसकी ठरवली हा चीनला एक मोठा धक्काच असून त्यानंतर ब्राम्होस खरेदी साठी बऱ्याच देशांनी रस दाखवलेला आहे.

राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.

भारताने क्षेपणास्त्र डागले ते अपघात होता कि अपघाताचे नाव दिले आहे हा मुद्दा बाजूला ठेवू ( ते नक्की फारच थोड्या लोकांना माहिती असावे)

क्षेपणास्त्र अपघाताने डागले गेले तर ती मोठीच नामुष्कीजनक गोष्ट आहे.

परंतु या क्षेपणास्त्राने पाकिस्तानची चीन कडून आयात केलेली क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फुसकी ठरवली आहे हि यातील फार मोठी उपलब्धता आहे

सहमत..

गेंडा किंवा हत्ती याना भीती दाखवण्यासाठी सिंह सुद्धा गुरगुराट करतात तसेच हे आहे. स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताकी दिनी भारत आपली सैन्य शक्ती प्रदर्शनासरथ मांडतो ती काही लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर जगातील इतर देशांना आपली शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी.

धाक दाखवण्याकरिता थेट पाकिस्तानात क्षेपणास्त्र डागणे ही धोकादायक कृती होती.
असो. जे झाले ते झाले आणि जीवितहानी झाली नसल्याने तसेच जगाचे लक्ष दुसरीकडे वेधलेले होते व आंतराराष्ट्रीय पातळीवर बहुधा या घटनेची फारशी दखल घेतली गेली नाही म्हणून बरे झाले. पण धाक दाखवण्यापुरते ठीक आहे. स्वतःहून युद्धाला तोंड फोडणे - निदान सध्यातरी योग्य होणार नाही. किंबहूना पुढेही युद्ध होवू नयेत, शांतता नांदावी असंच मी म्हणेन.
पाकिस्तानाचे तुकडे होवून अराजक माजण्यापेक्षा तिथल्या लष्कराचे सरकारवरील नियंत्रण नाहीसे व्हावे, राजकारण्यांना उपरती होऊन ते योग्य मार्गाने देशाचा विकास घडवण्याकरिता प्रयत्नशील व्हावेत , भारताशी वैरभाव न ठेवता सहकार्याची भूमिका घेत परस्पर विकास साधावा हे बघायला मला अधिक आवडेल. भारत , पाकिस्तान , बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंका या सर्व देशांत परस्पर सहकार्य अधिकाधिक वाढीस लागून सर्वांची भरभराट झाली तर इतर कोणताही देश यांपैकी कोणाकडेही वाकड्या नजरेने बघायला धजावणार नाही. यासर्व देशांतील जनतेत एक नैसर्गिक सहचर्याची भावना (synergy) निदान काही अंशी तरी नक्कीच आहे असे मला वाटते. जरी भारत व पाकिस्तानात सतत कुरबूरी चालत असल्या तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते (म्हणून इकडचे कलाकार /चित्रपट तिकडे व तिकडचे कलाकार /मालिका इकडे लोकप्रिय होत असावेत).
झालेच तर जोडीला भारत जपान वाढते यांच्यातले वाढते सहचर्य आणि भारत रशिया यांच्यातील जुने सौहार्दाचे संबंध यांची परिणामकारकता वाढून पुर्वेकडील (चीन वगळता) - अमेरिका व चीन हे भरवशाचे वाटत नाहीत.

राहिली गोष्ट -- हे क्षेपणास्त्र ब्राम्होसच आहे कारण भारताकडे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारे दुसरे कोणतेही क्रूझ क्षेपणास्त्र ( जमिनीला समांतर जाणारे) नाही. अग्नी पृथ्वी सूर्य इ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत म्हणजेच वातावरणाच्या बाहेर जाऊन परत आत येणारी.

हे माहीत नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

सुबोध खरे's picture

31 Mar 2022 - 7:47 pm | सुबोध खरे

CALCULATED RISK ( हिशेबी धोका पत्करणे) याला लष्करी डावपेचात अनन्य साधारण महत्व आहे. एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत.

एक तर तुमच्या क्षेपणास्त्राची चाचणी झालेली आहे आणि चीनची क्षेपणास्त्र प्रणाली फुसकी आहे याचा तुम्हाला डावपेचात्मक फायदा आणि चीनला तोटा सहज दिसून येतो आहे.

बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही.

पाकिस्तानने जर क्षेपणास्त्राने प्रतिहल्ला केला असता तर आपली क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली त्यांच्यापेक्षा कितीतरी परिणामकारक आहे. त्यात एस ४०० सुद्धा आले आहे

आणि असा एक हल्ला त्यांनी केला तर आपण केलेला प्रतिहल्ला इतका तिखट आणि परिणामकारी असेल कि पाकिस्तान परत डोके वर काढणार नाही.

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी हे पाकिस्तान वर हल्ला करतील असे बोलताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे हातपाय लटलट कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता हे आपण एवढ्यात विसरलात?

आपल्या संसदेवर हल्ला झाला असताना तत्कालीन सरकारने भारत पाकिस्तानच्या दसपट शक्तिशाली असून शेपूटच घातले होते ना?

शेवटी केवळ स्नायूमध्ये शक्ती असून उपयोग होत नाही तर पाठीचा कणा ताठ असायला आणि विचारांची बैठक पक्की असायला लागते.

आणि पाकिस्तान ची अणुबॉम्ब ची धमकी फुसकी आहे हे श्री मोदी यांनी त्यांना दोन वेळेस हल्ला करून सप्रमाण दाखवून दिले आहे..

तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन.

बाकी सामंजस्य सहकार्याची भूमिका वगैरे मुद्दे गांधी जयंतीच्या वेळेस भाषण करायला छान असतात.

सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते.

हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा.

बॉलिवूडचे सिनेमे पाहून आपली अत्यंत चुकीची समजूत झालेली आहे. बॉलिवूड निर्माते भाईचारा सामंजस्य सहकार्याची भूमिका इ इ बुळबुळीत मुद्दे आपले चित्रपट पाकिस्तानात खपावेत म्हणून पुढे करत असतात वर "गंदा है पर धंदा है" म्हणून त्याचे समर्थनही करतात

पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा. हि पिढी आता पन्नाशीला आली आहे तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.

since the 1970s Pakistani school textbooks have systematically inculcated hatred towards India and Hindus.

A 2005 report by the National Commission for Justice and Peace, a nonprofit organization in Pakistan, found that Pakistan studies textbooks in Pakistan have been used to articulate the hatred that Pakistani policy-makers have attempted to inculcate towards the Hindus. "Vituperative animosities legitimize military and autocratic rule, nurturing a siege mentality. Pakistan Studies textbooks are an active site to represent India as a hostile neighbor", the report stated. "The story of Pakistan's past is intentionally written to be distinct from often in direct contrast with, interpretations of history found in India. From the government-issued textbooks, students are taught that Hindus are backward and superstitious." Further the report stated "Textbooks reflect intentional obfuscation. Today's students, citizens of Pakistan and its future leaders are the victims of these blatant lies

Pakistani textbooks cannot mention Hindus without calling them cunning, scheming, deceptive or something equally insulting. The textbooks ignore the pre-Islamic history of Pakistan except to put the Hindu predecessors in negative light
the textbooks supported military rule in Pakistan, promoted hatred for Hindus, glorified wars and distorted the pre 1947 history of Pakistan.

Pakistani textbooks still teach children about twelve benefits of dictatorship compared with just eight benefits of democracy.No Pakistani child is ever taught about the Pakistani military's surrender to India in 1971. They are always taught that India was the aggressor in each and every war, and most amusing is they are taught that Pakistan won the 1965 war

since the 1970s Pakistan's school textbooks have systematically inculcated prejudice towards India and Hindus through historical revisionism.

Recently, the contributions of Nehru, Gandhi, Ambedkar, Patel and Bose to the Indian independence movement have been omitted from Pakistani textbooks.

स्रोत विकी

अशा विषवल्लीला जर ७-८ वर्षांपासून बालकांच्या मनात पेरले गेल्यावर येणारी फळे बिनविषारी असतील हे समजणे अत्यंत भाबडेपणाचे असेल.

असो

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2022 - 9:06 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी पाकिस्तानने कितीही गमजा केल्या तरी यावरून आपल्याला कडक, अति कडक, महाकड्क, अतिभयंकर महाकडक खलिते आणि निषेध पाठ्वण्याव्यतिरिक्त पाकिस्तान काहीही करू शकणार नाही.
ह्यावरून आपले कडीनिंदा फएम संरक्षणमंत्री राजनाथसिंग आठवले. :)
रच्याकने चिनविरूध्द तर कडीनींदा देखील बंद झालीय.

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 6:40 pm | सुबोध खरे

@ अमरेंद्र बाहुबली

तुमचे पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि डोळे उघडा

गालवान खोऱ्यात आणि डोकलं येथे काय झाले हे वाचून पहा.

उगाच कळफलक हातात आहे म्हणून असंबद्ध बडवू नका.

सुबोध खरे's picture

6 Apr 2022 - 6:41 pm | सुबोध खरे

डोकलाम

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Apr 2022 - 12:47 am | अमरेंद्र बाहुबली

सर चिन च्या घुसखोरावर आपले काय मत??

सुबोध खरे's picture

8 Apr 2022 - 8:00 pm | सुबोध खरे

कोण चिन चा घुसखोर ?

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Apr 2022 - 12:45 pm | अमरेंद्र बाहुबली

चिन च्या घुसखोरीवर*

तेंव्हा आपली विधाने डॉ मनमोहन सिंह त्यांच्यासारखीच कणाहीन आणि बुळबुळीत आहेत असेच मी म्हणेन.

मि. सुबोध खरे जी.
आपण आता राजकारण मध्ये आणलेत त्यावर बोलायची माझी इच्छा नाही.. तसेच माझ्या विधानांबद्दल असहमती मी समजू शकतो.. पण कणाहीन आणि बुळबुळीत असे हेटाळणीजनक शब्द टाळावेत अशी मी आपणास नम्र सुचना करु इच्छितो.

हा भाबडेपणा सोडा आणि अभ्यास वाढवा.

पुन्हा एकदा... मला जे वाटते ते मी मांडले होते. तुमचे मत वेगळे असू शकतेच. तुम्हाला वाटते ते तुम्ही मांडत रहा. पण "अभ्यास वाढवा" हे हेटाळणीवजा वाक्य मिपावर काहीसे प्रचलित असले तरी मी त्याचे स्वागत करीत नाही. आणि आपणास नम्रपुर्वक सुचवतो की अशा स्वरुपाची व्यक्तिगत टिप्पणी माझ्याबाबत आपण करु नये. दोन व्यक्तींमध्ये कमी अधिक प्रमाणात मतभिन्नता ही असणारच. आपली मते जुळत असली वा नसली तरी एकमेकांचा आदर करणे अधिक योग्य नाही का ?
माझ्या सुचनांचा तुम्ही विचार कराल ही आशा आहे.
धन्यवाद.

प्रदीप's picture

1 Apr 2022 - 10:26 am | प्रदीप

तेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी कसे सगळे गुण्यागोविंदाने राहत होते सारखे भाबडे समाजवादी विचार कालौघात मोडीत निघालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.

अगदी सहमत आहे.

माझी पत्नी येथे एका स्वयंसेवी संस्थेत काही वर्षे काम करत आहे. तिथे, आमच्या येथील एथनिक मायनॉरीटीजच्या मुलांसाठी, त्यांना गृहपाठ करण्यासाठी मदत करण्याच्या कार्यांत तिचा सहभाग आहे. येथे प्रामुख्याने आर्थिक निम्नस्तरांवरील एथनिक मायनॉरीटीजची मुलेमुली येतात. त्यांत फिलीपीन्स, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांग्लादेश, भारत व पाकिस्तान येथील मुलेमुली प्रामुख्याने असतात. तर, पत्नी सांगते की पाकिस्तानी मुलांना मद्रशांत जावेच लागते. आणि त्यांच्या डोक्यांत धर्माच्या व देशांच्या सीमांच्या तसेच देशांतील, आपापसांतील संबंधांच्या भावना अतिशय तीव्र असतात. तिने स्वतः अनुभवलेली पाकिस्तानी मुलांची काही उदाहरणे:

(१) पाकिस्तानी मुलगा, वय वर्षे ५ चा माझ्या पत्नीशी संवादः

पा. मु. ५: तुम कितनी अच्छी हो. तुम्हारा धरम क्या है?
पत्नी: मै हिंदू हूं
पा. मु. ५: अरेरे. तुम मुस्लिम हो जावो. नही तो तुम्हे नरक मे जाना पडेगा.

(२) दुसरा एक पा. मु. वय वर्षे १०: तुम हिंदूस्तानी हो. तब तुम मेरी दुश्मन हो. क्योंकी हिंदूस्तान हमारा दुश्मन देश है.

माझा वैयक्तिक अनुभवही हा आहे, की वरवर पाकिस्तानी माणसे आपल्याशी चांगला व्यवहार करतात, व्यवहारांत थोडीफार मदत घेतात, व करतातही. मात्र हे सगळे अगदी वरवरचे असते. त्यापुढे जाऊन जेव्हा धर्माचा व देशांच्या विचारांचा संबंध येतो, तेव्हा हा चांगुलपणा सहजपणे गळून पडतो.

*****************
काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर निळूभाऊ फुलेंची एक सुंदर मुलाखत पाहिली. त्यांत निळूभाऊ त्यांच्या समाजवादी जडणघडणीविषयी सविस्तर बोलत होते. अनेक जुन्या, खूप छान कार्य केलेल्या व तळमळीच्या समाजवादी नेत्यांच्यी नावे-- उदा. एसेम, सदाशिव बागाईतकर-- त्यांच्या तोंडून ऐकतांना मला बरे वाटत होते. मग निळूभाऊंनी तेव्हाच्या (ही मुलाखत सुमारे २००५- २००६ च्या दरम्यान ध्वनिमुद्रीत झाली असावी) परिस्थितीविषयी थोडी टिपण्णी केली. त्यांत त्यांनी जयप्रकाश नारायणांचा उल्लेख केला, व म्हणाले की जेपी नेहमीच म्हणत, भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांमधील सीमा व राजकीय संबंध कृत्रिम आहेत, व नक्कीच ते पुढे गळून पडतील, व दोन्ही देशांतील नागरीक एकोप्याने राहू व वागू लागतील. हे उर्ढृत करून निळूभाऊ पुढे म्हणाले-- 'पहा, आता हे खरे होत असतांना दिसते आहे, की नाही?'

तर, जुन्या मुशीतल्या सोशालिस्टांचा हा भोळसटपणा काही जात नाही. नव्या मुशीतील सोशलिस्ट, हे बनेल आहेत, त्यांचे हिशेब वेगळेच.

तर्कवादी अतिशय सभ्य व अंगभूत विनम्र भाषेत लिहीतात. पण त्यांजकडेही हा जुन्या समाजवाद्यांचा भोळसटपणा आहे, असे एकंदरीत दिसून येते.

तुम्ही जी उदाहरणे दिलीत ती वय वर्षे ५ व १० वगैरे..
साधारणपणे मुलांना वा एकंदरीतच परिपक्वतेच्या प्रवासात अजून मागे असणार्‍यांना मित्र - शत्रू , चांगला- वाईट अशी सरळसोट विभागणीच समजते , आवडते.
मला आठतंय मी चौथी वा पाचवीत असेन फारतर.. माझ्या आसपास - ओळखीचे कुणी मुस्लिम नव्हते. शाळेत वर्गातही कुणी मुस्लिम मुले नव्हती. पण खेळाच्या एका ग्रुपमध्ये दुसर्‍या वर्गातील एका मुलाशी ओळख झाली... कधीतरी त्याच्याबद्दल बोलत असताना कुणीतरी त्याचे नाव ऐकून तो मुस्लिम असणार असे सांगितले. त्यामुळे मला त्या मुलाशी बोलणे विचित्र वाटू लागले... पुढे खेळातले ग्रुप बदलले, त्याचा माझा संपर्क राहिला नाही. फार लहानपणीचा किस्सा असल्याने आता नेमके तपशील आठवत नाही.. पण असं काहीसं झालं होतं इतकं मात्र मनावर कोरलं गेलंय.
दुसरा आठवतंय मी इंजिनिअरिंगला असताना वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी कसलंस फुटकळ विनोदी नाटक बसवलेलं होतं... विषय वेगळाच काहीतरी होता , काही ठीकठाक विनोद पण होते पण शेवटी विनाकारण - कथेचा संबंध नसताना ओढून ताणून पाकिस्तानचा उल्लेख करत एक-दोन जोषपुर्ण/ द्वेषपुर्ण वाक्ये टाकली होती आणि त्या वाक्यांना भरपूर टाळ्या व दाद मिळाली.
क्रिकेटमध्येही भारतीयांना पाकिस्तानविरुध्द व पाकिस्तानी लोकांना भारताविरुद्ध पराजय पचवणे कठीण जाते. भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही.
ही लिंक आपण बघू शकता
यावरील एका पाकिस्तानी वापरकर्त्याच्या उत्तरातील एक परिच्छेद खाली देत - त्याची पुर्ण पोस्ट ही बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या संदर्भातली असली तरी त्याची पोस्ट फिल्मी नाही आणि खालील परिच्छेद चित्रपटाबद्दल नाही
A simple message I want to give to all Indians, We don't hate you all. We hate your extremist groups and your officials who wish for hatred between us. We also hate extremism and hatred shown on our side too. We have a lot in common. So why not love each other too?

पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात काय शिकवले जाते ते एकदा नीट वाचून पहा

तुर्तास पाकिस्तानचा विषय बाजूला ठेवू
पण एकंदरीतच शालेय अभ्यासक्रमातील शिक्षणाचा माणसाच्या जीवनावर दूरगामी व खोलवर परिणाम होतो का ? तसे असेल तर निदान काहीशी शिक्षित (दहावी उत्तीर्ण म्हणू हवं तर) जनता तरी अंधश्रद्धाळू असण्याचं काहीच कारण नाही. शालेय पाठ्यपुस्तकात अंधश्रद्ध शिकवल्या जात नाहीत. पण दहावी उत्तीर्णच काय शास्र / अभियांत्रिकी / वैद्यक अशा विज्ञान शाखांतून पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लोकहि अनेक अंधश्रद्दा मानतात... खरं तर पाठ्यक्रमातील (भाषा वगळता) इतर विषयात तर ईश्वराच्या अस्तित्वाचाही उल्लेख नसतो - पण तरीही बहुतांश सुशिक्षित (यात शास्त्र शाखेचे पदवीधर, द्विपदवीधर, अभियंते, डॉक्टर ई सगळे आलेत) लोक आस्तिक असतात असं कसं ?

भारत पाकिस्तानात इतकी युद्धे व सतत कुरबुरी होत असताना या गोष्टी समजण्यासारख्या आहेत...दोन्हीकडच्या जनतेत एकमेकांबद्दल रोष वा द्वेषाची भावना अजिबातच नाही असे मी म्हणत नाही.. पण तितकेच सत्य नाही.. तेच सर्वंकष असेल असे वाटत नाही.

आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत.

भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत.

भारतीय माणूस हा पाकिस्तानचा जितका द्वेष करतो तितका बांगला देशाचा अजिबात करत नाही. खेळाच्या/ क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तान ला हरवण्याचा जितका जल्लोष होतो किंवा पाकिस्तानकडून हरल्यावर जितके वाईट वाटते तितके बांगला देश बद्दल अजिबात वाटत नाही. फार कशाला श्रीलंका ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड बरोबर पाकिस्तानचा सामना असेल तर भारतीय माणूस नक्कीच पाकिस्तान पेक्षा या देशांना प्रोत्साहन देताना दिसेल

कारण पाकिस्तान सतत तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत असतो आणि कुठे तरी आपला शेजारी, माहितीतील, ओळखीतील एखादा जवान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून मारला गेला असे लोकांना अनुभव येतात यामुळे पाकिस्तान बद्दल संताप निर्माण होतो. मुंबईतील बॉम्बस्फोट पासून ते संसदेवर हल्ला पर्यंत सर्व ठिकाणचे धागे दोरे पाकिस्तानपर्यंतच जातात. भारतातील बहुसंख्य दहशतवादी कारवाया या पाकिस्तानातच उगम पावतात.

भारतीय शिक्षणात पाकिस्तान बद्दल द्वेषमूलक असे काहीही शिकवले जात नाही. पण उलट स्थिती भयानक आहे. याचे हजारो पुरावे सापडतात.

बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.

बाकी तुमचे समाजवादी गुळगुळीत विचार असू द्या.

हा निष्कर्ष तुम्ही काढताय.. पण तो चुकीचा.. मी समाजवाद वा अन्य कोणत्या वादाची कास धरत नाही. मला सोबत तर्कवादाची आहे.
बाकी प्रत्येकाचे विचार आणि तर्क भिन्न असू शकतात.

आपले बरेच संदर्भ चुकीचे आहेत.

भारतीय माणसे केवळ मुसलमान म्हणून कोणत्या देशाचा द्वेष करत नाहीत.

याबाबत मी न काही भाष्य केले ना काही संदर्भ दिला !!
असो. तसाही मूळ धागा युक्रेनबद्दल आहे त्यामुळे या धाग्यावर भारत-पाकिस्तान या विषयावर अधिक चर्चा करण्यात मला रस नाही

वामन देशमुख's picture

1 Apr 2022 - 1:58 am | वामन देशमुख

पाकिस्तानचे विभाजन : भारताने असल्या काही भानगडीत पडू नये. सध्या जे आहे , जसे आहे तेच व्यवस्थित सांभाळावे.
बाकी भारताने पाकिस्तानावर 'चुकून' सोडलेले क्षेपणास्त्र हे ब्राह्मोसच होते का ? मी याआधी वाचलेल्या बातम्यांत फक्त क्षेपणास्त्र असाच उल्लेख होता, ब्राह्मोस नाही. आणि सध्या युक्रेनच्य्या गदारोळात जगाने या चुकीकडे दुर्लक्ष केले असले तरी यामुळे भारताने भलतेच धाडस करु नये - संरक्षण, उत्पादन व इलेक्ट्रॉनिक्स इ क्षेत्रांत स्वयंपुर्ण नसताना युद्धखोरी परवडणारी नाही.

पाकिस्तान प्रणित / चीन प्रणित / इतर कोणते प्रणित स्लीपर सेल्स अनेकदा पुढीलप्रमाणे काम करताना दिसतात.

  1. भारत देशाने केलेल्या प्रगतीला / साधलेल्या ध्येयांना कमी लेखणे (downplay), त्यांच्या खरेपणाबद्धल संशय उत्पन्न करणे
  2. वेगवेगळ्या चर्चांमधून भारत देश / हिंदू लोक यांचे मनोबल खचेल असे मुद्दे मांडणे
  3. "भारत पाक शत्रुत्व हे केवळ राजकारण्यांनी निर्माण केलेला बागुलबुवा आहे, पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे
  4. पाकिस्तानी खेळाडू / कलाकार यांची जमेल तिथे वाहवा करणे आणि त्यांच्याबद्धल soft corner तयार करत राहणे
  5. भारताला युद्ध परवडणारे आहे का, तितकी लष्करी शक्ती तरी भारताकडे आहे का असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे
  6. भारताच्या / हिंदूंच्या दुबळ्या बाबीं प्रामुख्याने पुढे आणणे आणि त्याच मुख्य बाबी आहेत असे ठसवणे
  7. राष्ट्रहितदक्ष नागरिकांना नाना प्रकारे हतोत्साहित करत राहणे
  8. एकूणच भारत हा एक दुबळा देश आहे आणि त्याने पाकिस्तान / चीनला दुखावू नये, त्यांच्या अतिरेकी कारवाया शक्य तितक्या सहन कराव्यात असे सांगत राहणे

अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.

तर्कवादी's picture

1 Apr 2022 - 9:42 am | तर्कवादी

अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही.

अपल्या प्रतिसादाकडे दुर्ल़क्ष करणे अधिक योग्य वाटत आहे त्यामुळे प्रतिसादाची अपेक्षा करु नये.
धन्यवाद

कॉमी's picture

6 Apr 2022 - 5:46 pm | कॉमी

या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते.
(इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?)

तर्कवादी's picture

6 Apr 2022 - 6:25 pm | तर्कवादी

@कॉमी
तुमचे म्हणणे बरोबर आहे. थोडेफार मत-मतांतर असते तर मी प्रतिवाद केला असताही
पण माझे वाक्य होते की "सर्वसामान्य जनतेच्या मनात विरुद्ध देशातील जनतेबद्दल असा वैरभाव फारसा नाही असे मला वाटते "
आणि त्यावर प्रतिसादात या आयडीने "पाकिस्तानातील मुसलमान जनता भारतीय हिंदूंवर जीवापाड प्रेम करते" असे साफ खोटे narrative set करणे असे विधान केले तिथेच मला या आयडीचा संपुर्ण अंदाज आला... बाकी स्लीपर सेलची थिअरी म्हणजे कळस. असो !!
अशा लोकांचा प्रतिवाद केल्यास त्यांना आणखी उत्तेजन मिळते- त्यापेक्षा दुर्लक्ष करणे उत्तम , नाही का ?

या पूर्ण ल्युनॅटिक माणसाला या संस्थळावरून हाकलले पाहिजे.अर्थ माहित नसलेले काहीही शब्द हा माणूस कायम वापरतो. याच माणसाने ऐसी अक्षरे वर अतिशय बिभत्स नावाने आयडी घेतलेला. If memory serves, त्याचा सुद्धा अर्थ यांना माहित नाही असे समोर आले होते.

हे कुणाबद्धल लिहिलंय माहित नाही म्हणून त्याचा प्रतिवाद नाही.

(इतके तीव्र शब्द वापरण्याइतके तीव्र भाष्य या इसमाने नक्की केले आहे. उठसुठ हा इतर आयडींना स्लीपर सेल म्हणतो म्हणजे काय ?

उठसुठ कुणी कुणा मिपा सदस्याला स्लीपर सेल म्हटलं आहे?

बिभत्स नावाने आयडी

एखादा हा आयडी जर कम्यूनिझम दर्शवत असेल तर हा वाक्यांश त्या आयडीलाच लागू आहे म्हणावे लागेल कारण अनेकांच्या मते कम्यूनिझमइतकी बीभत्स, मानवताविरोधी, तर्कविरोधी आणि पराभूत विचारसरणी क्वचितच दुसरी कोणती असेल. पण तो आयडी जर कॉमिक / कॉमेडी असे काही दर्शवत असेल तर मग ठीक आहे; कॉमेडी शिवाय आयुष्यात मौजमजा नाही!

मला स्लीपर सेल म्हणाला आहात. विसरलात वाटतं. बाकी ताकाला जाऊन भांडे लपवायचे असेल तर खुशाल लपवा.

तुमचा आयडी काय होता तुम्हाला माहितीये. त्यात काय विनोद होता हे तुम्हालाच माहित.

स्वलेकर's picture

6 Apr 2022 - 4:30 pm | स्वलेकर

उत्तम प्रतिसाद

हा वरील प्रतिसाद वामन देशमुख यांना आहे.

अनेकदा, आपण स्लीपर सेल्सचा एक भाग आहोत हेही काहींच्या लक्षात येत नाही....

.....सहमत आहे ....

गोबेल्स नीती

कॉमी's picture

7 Apr 2022 - 8:23 pm | कॉमी

ऑ?
गोबेल्स नीती आणि स्लीपर सेल ? म्हणजे काय ?

गामा पैलवान's picture

31 Mar 2022 - 7:04 pm | गामा पैलवान

तर्कवादी,

तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं सांगतो.

१.

जर झेलेंस्की आणि पुतीन यांचं इतकंच सख्य आहे तर बंडखोर नाझींचा बीमोड करण्याकरिता (जे रशियाला हवेच आहे) झेलेन्स्की सरळपणेच रशियाची मदत घेवू शकला असता.

झेलेन्स्कीस जिवावरच्या धमक्या मिळाल्या होत्या. तो व पुतीन यांच्यात जराजरी सख्य दिसलं तर कशावरून त्याच्यावर विषप्रयोग होणार नाही? पूर्वी युशेन्को यांच्यावर डायॉक्झिनचा विषप्रयोग झाला होता. नुकताच सध्याचा मध्यस्थ असलेला अतिकरोडपती रोमन अब्रामोव्हिच याच्यावर किरकोळ विषप्रयोग झाला आहे.

२.

काही मुठभर (अगदी १०% म्हणू हवं तर) नाझींचा बीमोड करण्याकरिता झेलेन्स्की युक्रेनच्या अनेक शहरांचे सर्वंकष नुकसान होवू देत आहे ?

युद्ध सुरू झाल्यावर काहीच करता येत नाही. शिवाय जिवावरचा बेतण्याचा मुद्दा परत लागू आहेच.

३.

... ढेकूण मारण्यासाठी गादीला आग लावली जी पुढे खोलीभर पसरली.

ढेकूण रशिया मारतोय. आणि आग युक्रेनच्या गादीस लागलीये. त्यामुळे हा किस्सा कितपत सार्थ आहे, याची शंकाच वाटते.

४.

आणि झेलेन्स्की जर पुतीनच्या प्रभावाखाली आहे तर मग तो नाटोच्या नादी का लागला ? पुतीनला आवडत नसतानाही ? नाझी व नाटोचे दोन मुद्दे परस्परविरोधी वाटतात.

ते परस्परविरोधी आहेतंच. म्हणूनंच तर झेलेन्स्कीची इकडे आड तर तिकडे विहीर अशी गोची झालीये.

५.

मुळात युक्रेनमध्ये नाझींचा शिरकाव झाला कुठून ?

लेखात लिहिल्याप्रमाणे १९४० च्या आसपास.

६.

मला तरी नाझी हा बागुलबुवा वाटतो..

ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत.

आ.न.,
-गा.पै.

तर्कवादी's picture

31 Mar 2022 - 11:58 pm | तर्कवादी

ज्याला पुतीन नाझी म्हणतात त्याचा अर्थ डीप स्टेट असा आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी मुंबईतही डीप स्टेट कार्यरत आहे. त्यांमुळेच १९९३ चे १३ स्फोट आणि २६/११ वगैरे प्रकरणं घडली आहेत.

तसे तर भारतात नक्षलवादी चळवळीपण सक्रिय आहेत म्हणून त्यांचा बीमोड करण्याकरिता भारताचे पंतप्रधाच दुसर्‍या राष्ट्राला भारतावर हल्ला करण्याकरिता छुपा पाठिंबा देतील आणि त्यात भारतातील शहरेच्या शहरे बेचिराख करु देतील अशी कल्पना तरी करवते का ?
असो.
तसेच रशिया युक्रेनमधील बायोलॅब्सचा (की बायोवेपन लॅब्स) उल्लेख करते, त्याबद्दल आपणास काय वाटते?

गामा पैलवान's picture

1 Apr 2022 - 6:36 pm | गामा पैलवान

तर्कवादी,

भारत युक्रेनपेक्षा सर्वार्थाने मोठा आहे. आजच्या युक्रेनचं रशिया हे मातृराष्ट्र आहे. याउलट भारत स्वत:च एक मातृराष्ट्र आहे. युक्रेन आज नाटो विरुद्ध रशिया अशा कोंडीत सापडला आहे. भारत अशा तऱ्हेच्या कुठल्याही कोंडीत अडकलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतातले डीप स्टेट नक्षलवादी मोडून काढण्यासाठी परदेशी सहाय्य घेण्याची कल्पना फारशी व्यवहार्य नाही.

शिवाय युक्रेन स्वत:चं डीप स्टेट नाहीसं करीत नाहीये. ते रशियाला खुपतंय.

बाकी, जैविक हत्यारांविषयी माहिती नाही.

आ.न.,
-गा.पै.

नक्की काय करणार आहेत.

आणि आता उत्तर कोरियालाही हुरुप आला आहे. आज/उद्या द. कोरियावर हल्ला करणारे म्हणे.

तर्कवादी's picture

7 Apr 2022 - 11:57 pm | तर्कवादी

आज/उद्या द. कोरियावर हल्ला करणारे म्हणे

द. कोरियावर हल्ला म्हणजे जणू अमेरिकेवर हल्ला.. असे काही झाल्यास तिसरे महायुद्ध दूर नाही...

गामा पैलवान's picture

19 Apr 2022 - 8:44 pm | गामा पैलवान

लोकहो,

नुकताच १५ एप्रिलास सर्बियन जनतेने रशियास पाठिंबा देण्यासाठी बेलग्रेडमध्ये मोठा मोर्चा काढला. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.reuters.com/world/europe/pro-russia-serbs-protest-belgrade-s...

सर्बिया युरोपीय महासंघाचा भाग आहे. त्यामुळे त्यास अधिकृतपणे रशियाचा निषेध करावा लागतोय. मात्र जनतेची इच्छा उलट आहे. तिला रशियास पाठिंबा द्यायचा आहे.

१९९३ व १९९८ साली नाटोने बेलग्रेड व इतर ठिकाणी भीषण बॉम्बफेक केली होती. ती सर्बियन लोकं आजून विसरलेली नाहीत. नाटोच्या मनात काय आहे ते तिला चांगलंच ठाऊक आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वूचिक यांना पाश्चात्य जगाचा दबाव झुगारण्याची शक्ती मिळो.

आ.न.,
-गा.पै.

सार्बिया तेव्हा जेनोसाईड करत होता असे वाचले आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 10:02 pm | चेतन सुभाष गुगळे

मला अजूनेक गोष्ट व्हायला हवीये. ती म्हणजे अमेरिकेचं विभाजन.

निवडणूका होऊन आपणच विजेते असं म्हणत ट्रंप आणि बायडेन दोघेही अध्यक्षपदावर दावा करत होते तेव्हा आपल्या समाजमाध्यमांवर एक विनोद फार लोकप्रिय झाला होता.

आज बापूजी अमेरिकेत असते तर त्यांनी बायडेन आणि ट्रंप दोघांनाही "भांडू नका करा अमेरिकेचे दोन भाग आणि व्हा दोघेही अध्यक्ष" असा सल्ला दिला असता.