strong do what they can, weak suffer what they must.
युद्ध म्हटले कि प्रचारतंत्र हे आलेच. युक्रेनियन-रशियन युद्धांत युक्रेनियन सैन्याने किमान प्रचार तंत्रांत रशियाला संपूर्ण हरवले आहे. मिम्स, बंदूक घेतलेली म्हातारी आजीबाई, बिटकॉइन डोनेशन, UN, EU मधील जबरदस्त भाषणे. अत्यंत वक्तृत्वशाली तेजस्वी राष्ट्राध्यक्ष, ट्विटर, फेसबुक इत्यादींवर असंख्य चित्रे, विनोद, मोडलेले रशियन रणगाडे, घोस्ट ऑफ कीव सारखी मिथके, आईला फोन करून रडणारे रशियन युद्धकैदी, रशियन सैन्याने गोळी घालून मारलेले कुत्रे, निर्वासितांबरोबर जाणारे कुत्रे इत्यादी इत्यादी.
अवांतर : तुम्हाला बाकीचा लेख वाचायचा नसेल तरी चालेल पण खालील शब्द कुणाचे आहेत ते प्रतिक्रिया देऊन सांगा. नंतर गुगल करा. ठाऊक असेल तर स्पॉईलर नको.
We need to use the United Nations Security Council and believe that preserving law and order in today’s complex and turbulent world is one of the few ways to keep international relations from sliding into chaos. The law is still the law, and we must follow it whether we like it or not.
अवांतर संपले.
पण प्रत्यक्षांत रशियाने आक्रमणाची घोषणा करताच रशियाच हे युद्ध जिंकणार ह्यावर सर्वानीच (मी सुद्धा) पैसे लावले होते. पण युक्रेनियन प्रचारतंत्र इतके प्रभावी सिद्ध झाले कि कदाचित युक्रेनियन जिंकत आहेत अशी खोटी अशा युरोप इत्यादी देशांत निर्माण झाली. पण जसा जसा वेळ जाईल तसा तसा ह्या लोकांचा अपेक्षा भंग होत जाईल. रशियन आक्रमण हे अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षम होते आणि रशियन सैन्य बऱ्यापैकी ढिसाळ आहे हे निर्विवाद सत्य असले तरी शेवटी युद्ध म्हटले कि अश्या चुका दोन्ही बाजूकडून होतातच. उदाहरण म्हणजे रशियाने सीमेवर सैन्य जमवले होते हे सर्वानाच ठाऊक होते, युक्रेन ला तर ठाऊक असायलाच पाहिजे त्यामुळे निव्वळ इन्शुरन्स म्हणून तरी युक्रेन ने युद्धाची तयारी करून ठेवायला पाहिजे होती. ती त्यांनी केली नाही ह्यांतून युक्रेनी नेतृत्वाचा ढिसाळपणा दिसून येतो पण प्रचारतंत्रांत त्यावर कोणी बोट दाखवत नाही. युक्रेन ने जबरदस्तीने आपल्या पुरुषांना सैन्यात भरती केले आहे. त्यामुळे अनेक युक्रेनी बायका आणि मुले विना बाप पोलंड, मालदोवा मध्ये निर्वासित म्हणून जात आहेत. ज्यांना अजिबात सैनिकी प्रशिक्षण नाही अश्या व्यक्ती अर्ध प्रशिक्षित सुद्धा असलेल्या रशियन सैन्यापुढे जास्त टिकाव धरू शकणार नाहीत. त्यामुळे असंख्य लोक ह्यांत मरणार आहेत. नैतिक दृष्ट्या हि हत्या शेवटी युक्रेनी नेतृत्वावरच आहे. पण प्रचारतंत्रांत फक्त रशियन सैन्यांत जबरदस्तीने घुसवल्या गेलेल्या सैनिकांचाच विषय काढला जातो.
कारगिल युद्धात फक्त बळींची संख्या पहिली तरी भारतीय सैन्य अक्षरशः कापले गेले असे कुणी म्हणू शकतो. किंवा काही इंटेलिजन्स चुकीमुळे कोट्यवधी पैसे आणि शेकडो सैनिकांचा बळी गेला असे म्हणू शकतो. पण शेवटी निव्वळ चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य जिंकले. एका अमेरिकन वार्ताहराने परवेज मुशर्रफ ह्यांना खाजगीत विचारले कि नक्की काय म्हणून तुम्ही कारगिल युद्ध केले. मुशर्रफ ह्यांनी उत्तर दिले कि कारगिल युध्दांत सर्व गोष्टी पाकिस्तानला हव्या होत्या तश्याच होत होत्या. पाकिस्तान साठी हा मास्टर स्ट्रोक होता. पण फक्त एक अंदाज चुकला. पाकिस्तान चा अंदाज होता कि शेकडो भारतीय सैनिकांची मृत शरीरे तिरंग्यात लपेटून परत देशभर जातील तेंव्हा हे युद्ध बंद करावे म्हणून भारतीय समाजच बोंब मारेल आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही वाटाघाटीत भारताला हरवू. पण कितीही सैनिक मरत राहिले तरी भारतीय समाज एकजूट राहिला, भारतीय राजकारणी मंडळींवर त्याचा विपरीत परिणाम पडला नाही आणि भारत शेवटी निर्विवाद पणे युद्ध जिंकला.
थोडक्यांत काय तर कागदावरील बळीची संख्या पाहून युद्धाचा शेवट ठरत नाही. प्रचार तंत्र हे क्रिकेट कमेंटरी प्रमाणे वाटले तरी फॉग ऑफ वॉर म्हणजे युद्धाचे धुके इतके गडद असते कि अतिशय चांगले विद्वान आणि प्रामाणिक माणूस सुद्धा आपली दिशाभूल करवून घेऊ शकतो. त्यामुळे युद्धाचा निकाल शेवटी पूर्णतः वेगळा असू शकतो.
सध्याच्या रशियन-युक्रेनियन युद्धांत रशिया बऱ्यापैकी प्रगती करत आहे. ती अपेक्षेपेक्षा कमी असली तरी त्याचा रशियाला फरक पडत नाही. प्रत्येक युक्रेनी सैनिकांनी १० रशियन सैनिकांना मारले तरी युद्धाचा निकाल बदलत नाही. पण सॅन झू ह्या चिनी युद्धविशारदाने लिहिल्या प्रमाणे मोठ्या शत्रूला कोंडीत पकडणे सुद्धा धोक्याचे असू शकते. समजा युक्रेन मध्ये खरोखरच पुतीन हे कोंडीत सापडले आहेत, समजा खरोखरच त्यांच्या सैन्याला जबरदस्त मर खावा लागला असून त्यांना आता कुठली तरी वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागत आहे तर ह्यांत खुश होण्यापेक्षा युरोप आणि युक्रेन ला धोकाच जास्त आहे कारण अश्या स्थितीत पुतीन कुठलाही पराकोटीचा निर्णय घेऊ शकतात. रशियाचा प्रथम हेतू २४ तासांत किंवा वर कब्जा आणि झेलेन्स्की ह्यांचे पलायन, ७२ तासांत आपला राष्ट्राध्यक्ष क्यिव मध्ये स्थापन आणि त्यानंतर देशांतून माघार असा होता असे अनेक अमेरिकन तज्ज्ञांनी लिहिले. युक्रेनी पराक्रमाने हा शक्य नाही झाला. तर आता हेतू युक्रेनी शहरे पूर्णतः जमीनदोस्त करणे हा आहे असे सांगितले जाते. नक्की काय हेतू आहे हे आम्हाला ठाऊक नसले तरी आता असंख्य प्रमाणात लोक मारले जातील हे मात्र १००% सत्य आहे.
युद्धाची कारणे कुणाची बाजू बरोबर कुणाची चुकीची ह्यावर बराच उहापोह केला जातो. त्यांत अनेक लोकांचा रशिया द्वेष, अमेरिका द्वेष, पूर्व विरुद्ध पश्चिम, लोकशाही विरुद्ध अलोकशाही, भारतीय मित्र विरुद्ध भारतीय विरोधक अश्या विविध भूमिकांची सरमिसळ झाल्याने वस्तुनिष्ठता राहणे कठीण जाते.
नैतिकता आणि युद्धतंत्र ह्यांचा संबंध आपल्यासारखे सामान्य लोक लावत बसले किंवा प्रचार तंत्रांत त्यांचा प्रभावी वापर केला गेला तरी शेवटी त्यांचा संबंध नाही. यज्ञात बळी बोकडाचा जातो सिंहाचा नाही. त्याच न्यायाने युद्धतंत्रांत बलाढ्य असतो तो जिंकतो. सत्यमेव जयते सारख्या तत्त्वांत तथ्य आहे. लॉन्ग टर्म म्हणजे दूरगामी दृष्टीने चांगली तत्वे विजयी आणि वाढत जातात. पण त्याच वेळी शॉर्ट टर्म मध्ये ज्याच्या हाती लाठी त्याची म्हशी ! जगाचा पालनकर्ता विष्णू सामान्य स्थितींत सर्पावर झोपून असतो. सर्पाला फक्त जवळचे दिसते. पण काही निर्णय घ्यायचे असल्यास किंवा युद्धावर जायचे असल्यास विष्णू गरुडावर बसतात कारण गरुडाला दूरचे दिसते.
२०२२ मधील युक्रेन-रशिया युद्ध हे काही अर्थाने खूपच वेगळे आहे. पाहिली गोष्ट म्हणजे क्रिमिया किंवा जॉर्जिया इथे चकमकी झाल्या असल्या तरी त्यांची व्याप्ती कमी होती. सीरिया इराक मध्ये युद्धे झाली तरी आधीच हे देश गरीब आणि कुणाला यांचे विशेष पडून गेले नसल्याने कुणालाच त्यांचे काय होते त्यांत रस नव्हता. पण युक्रेन युद्ध हे सोशल मीडिया द्वारे सर्वत्र दाखवले जात आहे. विविध युरोपिअन लोकांनी व्यक्त केलेल्या प्रतिकीर्या होत्या कि युक्रेन चे निर्वासीत म्हणजे इराक अफगाणिस्तान सारखे मागासलेले देश नसून आपल्यासारखे गोरे आणि आणि सुसंस्कृत आहेत. त्यामुळे हे युद्ध युरोप मधील सर्वच लोकांना आणि सामान्य लोकांना अत्यंत जिव्हारी लागले आहे. खारकीव वर पडणारी क्षेपणास्त्रे लंडन किंवा परिसवरच पडत आहेत असे युरोपिअन लोकांना वाटत आहे. हे ऐकायला थोडे असंवेदनशील वाटले तरी प्रत्यक्षांत अत्यंत स्वाभाविक आहे. पाकिस्तान मध्ये हिंदूंवर अत्याचार दिसले कि हे आपल्याच लोकांवर होत आहेत आणि ह्यांना भारतांत आश्रय द्यावा म्हणून भारतीय लोक आपल्या नेत्यांवर दबाव टाकतात. पण त्याच वेळी रोहिंग्यांवर हल्ला झाला किंवा अफगाणिस्तान मधील मुस्लिम लोकांवर अमेरिकेने बॉम्ब टाकले म्हणून भारतीयांना त्याचे विशेष सोयरे सुतक नसते. त्यामुळे युक्रेन-रशियन युद्धांतील हा एक महत्वाचा घटक होता जो ह्या युद्धाला खूपच वेगळा ठरवतो. कदाचित ह्याची अपेक्षा रशिया, अमेरिका किंवा युरोप ह्यांना कुणालाच अजिबात नव्हती. पण ह्याचे परिणाम आता सर्वानाच भोगायला लागणार आहेत.
लोकशाहीत राजकारणी मंडळींना एकाच गोष्टीत रस असतो. तो म्हणजे पुढील निवडणूक कशी जिंकायची. राष्ट्रहित, समाजहित ह्यावर कितीही बोंब मारली तरी पहिले ध्येय म्हणजे निवडणूक जिंकणे. लोकशाहीत एखादा राजकारणी मोठ्या पदावर पोचून निवृत्त झाला कि मस्त सरकारी निवासांत राहायला जातो, पुस्तके लिहितो, अवॉर्ड वगैरे घेतो. त्याचे विरोधक सुद्धा त्याला आदर देतात. एकूण अतिशय हेवा वाटावा असे जीवन असते. हुकूमशाह ला ती luxury नाही. त्याला सतत घाबरून दिवस कंठावे लागतात. आणि निवृत्ती म्हणजे अज्ञातवात किंवा मृत्यू. त्याशिवाय लोकशाहींत एकदा निवडणूक जिंकली कि किमान काही वर्षे बिनधास्त नेता पदावर राहू शकतो. हुकूमशाहीत प्रत्येक दिवस अनिश्चितीतता घेऊन येतो.
लोकशाही आणि हुकूमशाही राष्ट्रांची तुलना करताना हि asymmetry (विषमता) असते हि अनेक सामान्य लोक लक्षांत घेत नाहीत. समजा एक जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यासाठी युद्ध करायचे आहे. अनेकदा हुकूमशाहाला ते करणे सोपे जाते कारण त्याला निवडणुकांची फिकर नसते पण आपण नेते आहोत हे सतत दाखवून द्यायचे असते. त्याच वेळी लोकशाहीला युद्धांत भाग घेण्यात विशेष रस असत नाही आणि युद्धांत हरण्याची शक्यता असेल तर अजिबात नाही.
पण कधी कधी हे फासे उलटे पडतात. युद्ध आणि इलेक्शन ह्यांचा संबंध निर्माण होतो. आणि अश्या वेळी लोकशाहीतील नेते कुठल्याही हुकूमशहापेक्षा जास्त प्रभावीपणे युद्धांत भाग घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर त्यांना लोकांचे समर्थन सुद्धा जास्त मिळते. कारगिल युद्ध हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
युक्रेन वर रशियाने अचानक हल्ला केला असता आणि युक्रेन ताब्यांत घेतले असते तर आता जितका तळतळाट नाटो राष्ट्रांनी केला असता कदाचित त्याच्या ५% सुद्धा त्यांनी केला नसता. मरू दे म्हणून युरोप आणि अमेरिका आपल्या कामाला लागले असते. पण युक्रेनी प्रचार तंत्र इतके प्रभावी ठरले कि युरोप/अमेरिका मधील जनता त्यांत न भूतो न भविष्यती अशी ओढली गेली. सामान्य मतदाराची हि भावनिक गुंतवणूक पाहून युरोपिअन आणि अमेरिकन नेत्यांना जास्त कठोर भूमिका घ्यायला भाग पडावे लागले.
पुतीन ह्यांचे गणित इथेच चुकले असावे. अमेरिकन - युरोप निर्बंध जे रशियावर लादले गेले आहेत ते फारच म्हणजे फारच कठोर आहेत. अमेरिकन सरकारला सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि विविध ठिकाणी हे बोलून सुद्धा दाखवले जाते. रशियन अमेरिकन अभ्यासक ह्यांनी रशियन भाषेंत ह्या निर्बंधाचे परिणाम काय होतील हे इथे दिले आहे. [२].
“All the war-propaganda, all the screaming and lies and hatred, comes invariably from people who are not fighting.” - ओरवेल
अमेरिका/नाटोची भूमिका :
नाटो म्हणजे हिजड्यांची फौज आहे, ह्यांना भांडता येत नाही ह्यांनी फक्त दूरच्या मागासलेल्या देशांना धमकवावे इत्यादी विविध शेलकी विशेषणे NATO मागील काही वर्षांपासून ऐकवावी लागत होती. अफगाणिस्तान मधील पराभवानंतर किंवा इराक मधील गोंधळानंतर हे जास्तच प्रभावी पणे सर्वाना जाणवत होते. सामान्य युरोपिअन तसेच अमेरिकन लोकांना युद्धांत रस नव्हता. ओबामा, ट्रम्प किंवा बायडन ह्यांनी आपल्या प्रचारांत नवीन युद्धापेक्षा सध्याची युद्धे बंद करू अश्याच घोषणा दिल्या होत्या. ब्रेक्सिट सारख्या घटनांनी तर युरोप मध्ये एकी नाही वगैरे गोष्टी आपण ऐकत होतो.
युद्धाची बोलणी जाऊन ग्रेटा किंवा मलाला सारख्या गोष्टी युरोप मध्ये जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. जगापुढील सर्वांत मोठा धोका, रशिया, चीन, इस्लाम नसून वातावरण बदल आहे आहेत ह्यावर लोकांचा विश्वस बसत चालला होता. युरोप चे भविष्य काय आहे असा प्रश्न पीटर थील ह्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले की "एक तर युरोप इस्लामिक होईल नाहीतर इ-स्कुटर घेऊन सोय लाटे पित सरकारकडून फुकटचे रेशन घ्यायला रांग लावणाऱ्या लोकांचा खंड बनेल" (स्वैर).
पण शेवटी नाटो अमेरिका हे क्लिष्ट आणि लोकशाही समाज आहेत त्यामुळे ह्यांचा संबंधात काहीही म्हटले तरी शेवटी त्याला अपवाद सुद्धा दिसून येतोच. पण शेवटी ह्यांच्या हातांत निर्विवादपणे सर्वांत मोठी लाठी आहे. त्यामुळे अनेक म्हशी सुद्धा ह्यांच्याच ताब्यांत आहेत.
नाटो ने रशिया लगतच्या देशांशी चांगले संबंध ठेवू नयेत हि रशियाची भूमिका होती. युक्रेन, बेलारूस, जॉर्जिया, इत्यादी देशांना काही अर्थाने बफर देश म्हणून ठेवावे हि रशियाची भूमिका होती आणि त्यासाठी आपण युद्ध सुद्धा करू अशी धमकी वारंवार रशिया देत होता. गॉर्जिया आणि युक्रेन (२०१४) दोन्ही देशांवर मुद्दाम आक्रमण करून त्यांचा काही प्रदेश रशियाने म्हणूनच 'वादग्रस्त' केला होता. नाटो चे मेम्बर व्हायचे असेल तर सीमा स्पष्ट पाहिजे हा नियम आहे. रशियाने सीमावाद काढल्याने दोन्ही देशांना नाटो मध्ये जाणे शक्य नव्हते. थोडक्यांत रशियाची भूमिका मी आपल्या शेजार्याला वाट्टेल तसा वागवणार आणि त्याकडे इतरांनी काणा डोळा केला पाहिजे हि भूमिका. हि भूमिका नाटो मधील अनेक राष्ट्रांना स्वीकार करणे जड जात होते.
नाटो चा विस्तारवाद, नाटोला सर्व जगावर नियंत्रण पाहिजे इत्यादी गोष्टी सध्या बोलल्या जातात. पण इथे रॅशनल पद्धतीने विचार केला पाहिजे. NATO हि बहुतांशी लोकशाही देशांची संघटना आहे. नाटो मध्ये जायचे कि नाही हे तो देश ठरवतो आणि इतर देश त्याला मान्यता देतात. नाटोच्या एका राष्ट्रावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला हे नाटोचे ब्रीद आहे (आर्टिकल ५). पण शेवटी नाटो हि एक सामरिक संघटना आहे. राजकीय नाही. राजकीय, आर्थिक संबंधांना सामरिक क्षमता सुद्धा पाहिजे. पण ह्या तिन्ही गोष्टी बहुतांशी वेगळ्या आहेत. राजकीय नेतृत्व हे लोकशाही मध्ये काही काही वर्षांनी बदलते. आर्थिक परिस्थितीत तासा तासाला बदलते तर सामरिक धोरण हे दशका दशकांत बदलत नाही. पण ह्या तिन्ही गोष्टींचा कधी कधी ओव्हरलॅप होतोच.
आता युक्रेन सारख्या देशाला नाटो चे सदस्य करून घ्यावे म्हणजे पेट्रोल जवळ मशाल नेण्यासारखे होय असे विविध अमेरिकन युद्धविश्लेषकांनी मागील कित्येक वर्षे सांगितले आहे. जवळ जवळ सर्व स्ट्रॅटेजी पेपर्स मध्ये रशियाने काहीही केले तरी युक्रेन सारख्या देशाला NATO मध्ये घेण्यात NATO चे नुकसानच आहे असे बहुतेक रिसर्च सांगत होता. John Mearsheimer सारखे realist अनेक वर्षे हेच लिहीत आले आहेत. त्यांचा खालील निबंध आज खूप लोकप्रिय झाला आहे. पण मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आणि इतर अनेकांनी हेच लिहिले आहे.[१] हिंदू अमेरिकन डेमोक्रॅट तुलसी गबर्ड ह्यांनी सुद्धा तेच हल्ली म्हटले.
युक्रेन सारखा अपरिपक्व, गरीब आणि इतर प्रकारच्या हिंसेने त्रस्त झालेला देश NATO मध्ये आला आणि रशियाने दुर्लक्ष केले तर पुढे काय होऊ शकते ? एक म्हणजे युक्रेन मधील एखाद्या गटाने, किंवा रशियन धार्जिण्या गटाने युक्रेन मधून काही छोटी रॉकेट्स राशीवर फेकली तर पुढे काय ? रशियाला प्रत्यत्तर द्यावे लागेल आणि NATO ला मग मोठे युद्ध छेडावे लागेल. रशियाने उत्तर नाही दिले तर ह्या गटांचा उत्साह आणखीन वाढेल आणि प्रस्थापित रशियन नेते कमजोर दिसतील. नाटो ने प्रत्युत्तर नाही दिले तर नाटो ची विश्वासार्हता धोक्यांत येते.
समजा रशियाविरोधांत नाटो ला काही आक्रमण करावे लागले तर ? युक्रेन सारख्या देशांचा मोठा फरक पडत नाही. ह्या देशांना सहज कब्जांत घेऊन नाटो सैन्य पुढे जाऊ शकते. उलट युक्रेन सारखे बफर देश अस्थिर ठेवले तर नाटो ला प्रचंड फायदा आहे. ह्या देशांत अस्थिरता माजवून, हत्यारे देऊन रशियाविरोधांत सतत आग ओतत तेहवली जाऊ शकते.त्यामुळे युक्रेन ला नाटो मध्ये येऊ देण्यांत पाश्चात्य राष्ट्रांचा तसा विशेष फायदा नव्हताच.
विविध माध्यमांतून नाटो चा विस्तारवाद युक्रेन युद्धासाठी कारणीभूत आहे असे लिहिले जाते पण नक्की हा विस्तार कश्यासाठी आहे आणि कोण ह्या विस्तारवादाचा पुरस्कार करतो हे किमान मला तर समजले नाही.
अमेरिकन परराष्ट्र धोरण नक्की कोण ठरवतो ? का अमेरिका अमुकच पावले उचलते ह्यावर खूप विचारमंथन होते. गोव्यांतील ३० हजार खप असलेल्या नवप्रभातून संपादक महोदयांनी "बुश ह्यांना आमचा खणखणीत इशारा" असे अग्रलेख लिहले आहेत. कुणी म्हणतो देशांचे भांडण लावून शस्त्रास्त्रे विकणे, कुणी म्हणतो तेल, (रशियाच्या संदर्भांत नॉर्दस्ट्रीम २ इत्यादी) पण खोल विचारांती हे बहुतेक तर्क अत्यंत उथळ वाटतात आणि ते आहेत सुद्धा. धोरणे नक्की कशी निर्माण होतात ह्या विषयाचा अभ्यास करण्याचे जे शास्त्र आहे त्याला "पब्लिक choice theory" असे संबोधित केले जाते. अर्थशास्त्राचा हा एक जास्त चर्चेत नसलेला पण खूप उपयुक्त असा भाग आहे.
हननानीया ह्याचे "Public Choice Theory and the Illusion of Grand Strategy" [३] असे एक चांगले पुस्तक आहे. ह्या पुस्तकांतून अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे उदाहरण घेऊन नक्की निर्णय कसे घेतले जातात ह्याचा खूप चांगला उहापोह केला आहे. पुस्तकाचा मूळ मुद्दा जो मला माझ्या intuition शी मिळता जुळता वाटला तो असा. लोकशाहीत अनेक मत प्रवाह असतात आणि त्या मतांचे अनेक पुरस्कर्ते असतात. त्यामुळे देशाचा नेता कुणीही असला तरी शेवटी त्याला अनेक मतप्रवाह तसेच इतर प्रभावांना लक्षांत घेऊन निर्णय घ्यावे लागतात. एकदा निर्णय घेतला कि बाहेरचे लोक हा निर्णय कुठल्या तर्काने घेतला ह्याच्या अटकळी बांधतात आणि प्रत्यक्षांत खरे कारण आणि वाटणारे कारण ह्यांचा संबंध असेलच असे नाही. कधी कधी निर्याणाचे जे परिणाम अपेक्षित असतात ते अजिबात होत नाहीत उलट भलतेच होते. आणि बाहेरून पाहणाऱ्याला निर्णय घेणारे नेते किती मूर्ख होते असे वाटते.
ह्याचे कारण म्हणजे निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आपला असा एक खाजगी फायदा असतो. वर वर "समाजहित, राष्ट्रहित" अश्या बाता मारताना ह्या व्यक्ती आपले खाजगी हित सुद्धा पुढे करत असतात. हे खाजगी हित नेहमी समाजहिताच्या विरोधांत असते. सुदैवाने अनेक खाजगी हित रक्षक एकमेकांविरुद्ध खेळी खेळत असल्याने त्यांचा प्रभाव बहुतांशी कमी होत जातो.
तात्पर्य म्हणजे शेवटी जे निर्णय घेतले जातात ते असंख्य घटकांच्या प्रभावाने निर्माण झाले असतात. कधी कधी निव्वळ योगायोग किंवा अपघात म्हणून एखादा निर्णय घेतला जातो. पण बाहेरील जग त्यावर प्रचंड चिंतन करत त्या निर्णयाला जस्टीफाय करणारे ४D बुद्धिबळ खेळात बसतात.
नाटो किंवा अमेरिकेने अमुक धोरण काय अवलंबायला हवे होते ह्यावर अनेक लोक निव्वळ युद्धनीती म्हणून, भूराजकीय खेळी म्हणून वगैरे पाहतात पण प्रत्यक्षांत हे निर्णय आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, स्थानीय राजकारण, विविध मित्र राष्ट्रे, कंपन्या इत्यादींचा प्रभाव म्हणून घेतले जातात. हे समजा अचूक ठरले तर त्याचे क्रेडिट नेत्यांना मिळते पण चुकले तर तर विविध कारणांनी टीकेची झोड उठते.
स्टीफन कोटकिन, अमेरिका आणि रशिया ह्यांचे वाकडे का आहे आणि कसे आहे हे ह्या २ मिनिटांच्या व्हिडिओत सांगतात. आता त्यांचेच मत बरोबर आहे असे नाही, पण आधुनिक माध्यमांच्या दुनियेत त्यांचे मत सुद्धा कदाचित एक मोठा घटक असू शकतो. [५]
युक्रेन :
युक्रेन हा एक सार्वभौम देश आहे. आणि त्या नात्याने आपले परराष्ट्र धोरण ठरविण्याचा पूर्ण अधिकार ह्या राष्ट्राला आहे हि एक नैतिक भूमिका झाली. युक्रेन हा नाटो आणि रशिया ह्यांच्या मध्ये आहे. आधी रशियाच्या कठपुतळी राष्ट्राध्यक्षांच्या खाली आणि हल्ली लोकशाही पद्धतीवर युक्रेन बऱ्यापैकी स्थिर झाला होता. कुठल्याही सध्या लोकशाही देशाप्रमाणे आर्थिक प्रगती हि माफक अपेक्षा ह्या जनतेची होती.
युरोप आणि रशिया ह्याच्यात पर्याय दिल्यास, युरोप सोबत जास्त चांगले संबंध ठेवून युक्रेन ला प्रगती करणे सहजय शक्य होते. रशिया सोबत संबंध ठेवणे म्हणजे लोकशाही काढून त्या जागी पुतीन चा हस्तक नेमणे हा पर्याय होता. ह्या दोन पर्यायांत युक्रेन कुठला पर्याय निवडेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज अजिबात नव्हती. त्यामुळे EU मध्ये घुसण्यास युक्रेन अत्यंत उत्सुक होता. EU मध्ये युक्रेन गेल्यास त्याची आर्थिक प्रगती नक्की होती. युक्रेनियन पासपोर्ट जास्त महत्वाचा झाला असता आणि क्रिमिया किंवा लगतच्या रशियन प्रदेशांतून युक्रेन मध्ये स्थलांतर वाढले असते. युरोपियन कंपन्यांना सुद्धा गुंतवणूक करता आली असती. हे सर्व काही युक्रेनी जनतेसाठी अत्यंत चांगली गोष्ट होती.
पण त्याच वेळी युक्रेनी यश हे रशियन अपयशाला जास्तच अधोरेखित करते झाले असते. युक्रेन जर बेलारूस पेक्षा जास्त श्रीमंत झाला असता तर मग बेलारूस सुद्धा रशियन प्रभावातून बाहेर पडला असता. हे सर्व writing on the wall रशिया साठी होते. आणि त्याच मुळे कुठल्याही थराला जावून ते आपण रोखू अशी रशियन भूमिका होती.
रशियन भूमिका अनैतिक असली (कारण युक्रेन सार्वभौम आहे वगैरे) तरी रशियन सैन्यबळ हे युक्रेन पेक्षा कित्येक पटीने मोठे असल्याने रशियाला अशी टोकाची भूमिका घेणे शक्य होते. म्हणूनच मी माझे वरचे पहिले इंग्रजी वाक्य लिहिले आहे.
आता तुम्ही स्वतःला रशिया नाटो च्या वाटाघाटीच्या टेबल खुर्ची वर बसवून पहा. नाटो च्या दृष्टिकोनातून युक्रेन नाटो मध्ये यावा का नाही हा नाटो आणि युक्रेनी सार्वभौमतचा प्रश्न आहे. युक्रेनला रशियन विरोधांत आक्रमण करण्यासाठी किंवा रशियेवर क्षेपणास्त्रे डागण्यासाठी युक्रेन नाटोला हवा आहे असे अजिबात नाही. हि गोष्ट रशियाला ठाऊक आहे हे नाटो ला ठाऊक आहे. त्यामुळे रशियाला नक्की समस्या काय आहे हे नाटोला समजत नाही. रशियाला काही धोका वाटतो पण तो बहुतांश अनाठायी आहे आणि त्यामुळे पुतीन सुद्धा ह्या धोक्याचा विरोधांत पराकोटीची पाऊले उचलतील असे नाटो ला वाटत नाही.
त्याच वेळी रशियन दृष्टिकोनातून पहा. युक्रेन आणि नाटो ला आपला नक्की विरोध का आहे ह्यावर रशिया सार्वजनिक रित्या एकच भूमिका घेऊ शकते ती म्हणजे नाटो आणि रशियाची सीमा एकत्र झाल्यास नाटो ती आपल्या विरोधांत वापरेल हि. हि भूमिका कुठल्याही दृष्टिकोनातून बालिश वाटते. युक्रेन EU मध्ये गेल्यास युक्रेनी समाजाची जास्त आणि जास्त वेगाने प्रगती होईल हे भय रशियाला वाटत असले तरी ते उघड पणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे ह्या विषयावरून कितीही धमक्या पुतीन ह्यांनी दिल्या तरी नाटो त्यांना गांभीर्याने घेत नाही.
त्यामुळे ह्या वाटाघाटीच्या टेबलावरून रशिया हा आडमुठे धोरण अवलंबतो असेच दिसून येईल. आणि नाटो ने शरणागती पत्करलीच तर त्याचा अर्थ युक्रेन कडे पोटेन्शिअल असून सुद्धा त्यांना गरिबीत आणि रशियाच्या मांडलिकत्वात झोकून देणे असा त्याचा अर्थ ठरेल.
रशियाची खरी भूमिका युक्रेन ने नाटोत जाऊ नये, युक्रेन ने युरोप मध्ये जाऊ नये, युरोप सोबत जास्त व्यापार करू नये, युक्रेन गरीब आणि बहुतांशी रशियावर अवलंबून राहावा अशी होती (इन that ऑर्डर ऑफ प्रायोरिटी) आणि ह्यातील काही मागण्या नाटो, EU, अमेरिका ह्यांनी मान्य केल्या तरी सर्वच मागण्या पूर्ण करणे नाटो इत्यादींच्या हातांत सुद्धा नव्हते.
त्यामुळे रशिया - युक्रेन युद्ध हे बहुतांशी "inevitable" म्हणजे अटळ होते असेच तरी मला आता वाटते.
रशिया :
रशियाच्या हातातून हे युद्ध कधीच बाहेर गेले आहे. पाश्चात्य निर्बंध गरजेपेक्षा आणि अपेक्षे पेक्षा जास्तच कठोर असल्याने प्रत्येक दिवसाला रशियन अर्थव्यवस्था कोसळत चालली आहे. ह्यातील काही गोष्टींची अपेक्षा रशियाला होती पण आता जे निर्बंध आहेत त्यांची अपेक्षा नव्हती असे रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा म्हटले आहे. हे निर्बंध काढायचे म्हटले तरी आता प्रचंड नुकसान दोन्ही बाजूंचे झाले आहे.
रशियन रणगाडे कदाचित क्यिव मध्ये घुसतील. कदाचित झेलेन्स्की ह्यांना ठार मारून त्यांच्या जागी आणखीन कुणाला बसवतील. पण त्यामुळे पुतीन ह्यांचे "स्ट्रॅटेजिक ऑब्जक्टिव्ह" काही पूर्ण होणार नाहीत. उलट आधुनिक माध्यमांनी युरोपियन जनता जास्तच रशिया विरोधी बनेल, नाटो चे बजेट वाढेल, युद्धाची खुमखुमी असलेल्या नेत्यांना जास्त मते मिळतील आणि एकूण रशियन सुरक्षा आणखीन कमजोर होईल.
कमजोर रशिया इतरांना मंडलिक बनविण्याच्या नादांत कदाचित चीन चा मांडलिक बनून राहू शकतो.
भारतासारखे देश आता संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतील. खरे तर पुतीन ह्यांनी युक्रेन वर आक्रमण केले तेंव्हाच मोदी ह्यांनी खालील व्यक्तव्य दिले.
"India should have own customised and unique weapons system, the surprise element will come on when we have own equipment. If ten countries have same type of military equipment then we have no uniqueness of the forces, said Prime Minister Narendra Modi while addressing a webinar on Friday." - फेब्रुवारी २५.
[१] - https://www.mearsheimer.com/wp-content/uploads/2019/06/Why-the-Ukraine-C...
[२] - https://twitter.com/mironov_fm/status/1499092871265361927
[३] - https://www.routledge.com/Public-Choice-Theory-and-the-Illusion-of-Grand...
[४] - https://www.youtube.com/watch?v=_mDgH3dTR4w
[५] - https://www.youtube.com/watch?v=K4xIfHzO0GI
प्रतिक्रिया
3 Mar 2022 - 3:13 pm | sunil kachure
पूर्ण लेख च फसला आहे.
सर्व राष्ट्र अतिशय सावध असतात.
कोणत्याच देशाचे नेतृत्व मूर्ख नसते.
Nato hijdyanchi फौज नाही.
ते नफा तोटा बघतात .
दुष्मान लोकांस जास्त कळतं अशा भ्रमात ठेवून पण युद्ध निती आखली जाते
हे युद्ध रशिया च जिंकणार.
रशिया ल विरोध करण्याची ताकत जगात कोणत्याच देश कडे नाही.
तसा प्रयत्न झाला तर महा विनाश होईल हे न समजण्या इतके nato देश आणि अमेरिका नक्कीच मूर्ख नाहीं
3 Mar 2022 - 3:43 pm | साहना
3 Mar 2022 - 5:52 pm | आनन्दा
लेख बहुतांशी पडतोय.
तसेही खरे तर युक्रेन बफर स्टेट म्हणून राहणे युरोप आणि रशिया दोघांच्याही फायद्याचे आहे. आणि याच कारणाने रशियाने आक्रमण केले तेव्हा सगळे शांतपणे बघत बसले होते.
पण तुम्ही म्हणताय तसे युक्रेनी प्रचारतंत्र जास्त प्रभावी ठरले की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. जनमताचा दबाव लोकशाहीत काहीही करू शकतो.
बघू, युक्रेनला EU मध्ये खरेच घेतात का यावर युद्धाचे फलित ठरेल.
अवांतर - मुळात युक्रेन हा राशियापासून स्वतंत्र झालेला भाग आहे, त्यामुळे तसेही त्यांना राशियाबद्दल प्रेम असेल अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे, त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही जी मते मांडली आहेत ती गैरलागू आहेत, रशिया ला हे पहिल्यापासून असेच असणे अपेक्षित आहे.
4 Mar 2022 - 3:12 pm | साहना
> तसेही खरे तर युक्रेन बफर स्टेट म्हणून राहणे युरोप आणि रशिया दोघांच्याही फायद्याचे आहे.
भुराजकारणाच्या दृष्टीने १००% बरोबर आहे. पण रशियन मागणी फक्त तिथे थांबणार नाही. कारण कुठलीही लोकशाही हि डायनॅमिक असते त्यामुळे युक्रेन ने आपण न्यूट्रल राही असे वचन सुद्धा दिले असते तरी सुद्धा जो पर्यंत युक्रेन अगदीच रशियाच्या अंगठ्याखाली येत नाही तोपर्यंत रशिया शांत बसली नसती. देशाला संपूर्ण दळिद्री करून सोडणे आणि नंतर आपले कठपुतळी सरकार बसवणे हे जो पर्यंत होत नाही तो पर्यंत रशिया शांत बसली नसती. आणि रशियाला हे सर्व करू देणे म्हणजे युक्रेन ला बस च्या खाली फेकण्यासारखे आहे.
ह्या प्रदेशांतील कुठलीही लिबरल लोकशाही शेवटी युरोपच्या बाजूने झुकत जाईल. हा प्रदेश सोडून द्या भारत सारखी आधुनिक लोकशाही सुद्धा पाश्चात्य देशांच्या बाजूने झुकत आहे. त्यामुळे फक्त नाटो विस्तारीकरण हा पुतीन ह्यांचा आक्षेप नव्हता तर युक्रेन आणि युक्रेनी जनता सार्वभौम आहे हा मूळ आक्षेप होता असे मला तरी वाटते.
दुर्दैवाने हि समस्या फक्त युक्रेन ची नाही. संपूर्ण रशियाचीच आहे. संधी मिळाल्यास बहुतेक रशियन रशिया सोडून युरोप मध्ये स्थायिक होतील. बहुतेक श्रीमंत रशियन इतर देशांत दुसरी घरे घेऊन ठेवतात. किंवा पैसे देऊन इतर देशांचे नागरिकत्व घेतात.
3 Mar 2022 - 9:40 pm | जव्हेरगंज
उत्तम लेख. मीमांसा आवडली. बहुतांशी पटली!
3 Mar 2022 - 9:53 pm | धर्मराजमुटके
रूस ने अपने रॉकेट से हटाए US, UK और जापान के झंडे, भारत का तिरंगा नहीं हटाया, कहा- बाकी देशों के झंडों से खराब हो रहा था लुक !
ही बातमी
3 Mar 2022 - 11:02 pm | मदनबाण
अमेरिकन मदार्याने त्याच्या युक्रेनी माकडाला काही चाळे शिकवले, माकडाला त्या चाळ्यांचा लळा लागला. मग मदार्याने सांगितले तू किंगकाँग आहेस त्या रशियन अस्वलाला काय भितोस ? लढाईच्या आखाड्यात कुस्तीत पाड त्याला उताणा, काय वाटलं तर मी आहेच [ फार लांबुन गम्मत बघायला :))) ]
माकडाला मदार्याचे म्हणणे खरे वाटले, तो स्वतःला किंगकाँग समजु लागला, नको तेव्हढ्या काड्या करु लागला, शेवटी अस्वल पिसाळले !
असो...
ग्लोबल मिडिया अमेरिकाच्या ताब्यात आहे, अमेरिकन इंटरनेट जायंट्स च्या ताब्यात ग्लोबल कम्युनिकेशन / सोशल मिडिया आणि नेट इन्फ्रास्ट्रक्चर डॉमिनन्स आहे . तेव्हा पुतीनला राक्षस/ खलनायक / हिटलर बनवायला काही वेळ लागणार नव्हता आणि झाले देखील अगदी तसेच.
मला विशेष रस हा रशियन आर्मीच्या नुकसानाने आपण काय शिकु शकतो यात आहे. जितके मला जालावरुन थोड्या फार वाचनाने समजले त्यानुसार रशियन आर्मीचे नुकसान हे विशेषतः फायर अँड फरगेट अश्या वेपन्सच्या वापराने आणि ड्रोनच्या थोड्या बहुत वापराने करण्यात आले आहे. रशियन आर्मी ची महत्वाची वाहने टायर बाद होऊन, चिखलात अडकुन पडुन अशी जाम झाली की त्यांना तिथेच त्या ठिकाणीच सोडुन देण्यात आल्याचे पाहण्यात आलेले आहे. चिखल हा रशियन वाहनांचा, टँक्सचा मोठा शत्रु म्हणुन दिसुन आला आहे, Pantsir-S1 SAM सारख्या एअर डिफेन्स, एन्टी एअरक्राफ्ट गनमिसाईल सिस्टीम ज्याची २० किलोमीटर परिघाची क्षमता आहे त्याला लुळे करण्यासाठी हा चिखल पुरेसा ठरला !
पुतिन ने एक उत्तम भाषण २०१६ मध्ये केले होते, ते स्वतः [ पक्षी: रशिया ] नक्की काय विचार करतात, त्यांनी काय ऑफर केले , कोणी कोणती परिस्थिती समजुन घेतली पाहिजे. तेच भाषण आणि जीडी बक्षी यांचे छोटे विश्लेषण इथे देऊन जातो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- When fake news is repeated, it becomes difficult for the public to discern what's real. :- Jimmy Gomez
4 Mar 2022 - 12:17 am | साहना
> अमेरिकन मदार्याने त्याच्या युक्रेनी माकडाला काही चाळे शिकवले, माकडाला त्या चाळ्यांचा लळा लागला. मग मदार्याने सांगितले तू किंगकाँग आहेस त्या रशियन अस्वलाला काय भितोस ? लढाईच्या आखाड्यात कुस्तीत पाड त्याला उताणा, काय वाटलं तर मी आहेच [ फार लांबुन गम्मत बघायला :))) ]
माकडाला मदार्याचे म्हणणे खरे वाटले, तो स्वतःला किंगकाँग समजु लागला, नको तेव्हढ्या काड्या करु लागला, शेवटी अस्वल पिसाळले !
ह्यांत नक्की अमेरिकेचा काय फायदा आहे ?
त्याशिवाय हे असे घडून येण्यास, अमेरिकन व्यवस्था, नाटो वगैरेंच्या वॉर रूम मध्ये नक्की काय मंथन झाले असेल ?
4 Mar 2022 - 1:52 pm | मदनबाण
ह्यांत नक्की अमेरिकेचा काय फायदा आहे ?
स्वतःच्या भुमीवर एक ठिणगी देखील पडु न देता शत्रुच्या घरात आग लावण्याचा याहुन अधिक सोपा उपाय कोणता ? नाटो चे महत्व टिकण्यासाठी / पटवुन देण्यासाठी तसेच त्याची अधिक गरज निर्माण करण्यासाठी अमेरिकेला बागुलबुवा हवा होताच... इतके वर्ष रशियन्स चा बागुलबुवा अमेरिकेने इतका वापरला की त्यातला सगळा रस निघुन गेला, मग तो रस परत निर्माण करायला नको ? मग युक्रेन सारखे माकड पाळायचा फायदा काय ? अमेरिकेने बॉब्म हल्ले केले तर ते आतंकाचा नायनाट करण्यासाठी आणि रशियाने तेच केले तर तर तो मानवते वरचा अन्याय, असा गळा काढायची संधी मिडियाला मिळायला नको ? :))) युरोपियन जनतेला पुतीन म्हणजे धोका हे बिंबवण्यासाठी ही उत्तम संधी ! [ बिचारे युरोपियन रेडिएशनच्या भितीने आयोडीनच्या गोळ्यांचा वेड्या सारखा साठा करु लागले आहेत. :))) ]
याच बरोबर अमेरिक मिलेडरी इंडस्ट्रीयल कॉम्पलॅक्सला अश्या घटनातुन शस्रास्त्र विक्रीची लॉटरी देखील बर्याच वेळा लागते, याच बरोबर अमेरिकन जनतेचे लक्ष त्यांच्या स्वतःच्या आर्थिक संकाटातुन दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी देखील उपयुक्त ठरते...
बस्स्स... भाई और क्या चाहिये ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “War is the most profitable business on earth” :- Kenneth Eade
4 Mar 2022 - 2:55 pm | साहना
आपल्या युक्तिवादाचे सार :
- ये युद्ध म्हणजे नाटो चा मास्टर स्ट्रोक आहे आणि रशियाने हल्ला करावाच हा अमेरिकेचा उद्देश होता.
- पुतीन ह्यांनी स्वतःहून ह्या ट्रॅप मध्ये आगमन केले. पुतीन ह्यांनी युक्रेन वर हल्ला न केला असता तर तो रशियाचा विजय आणि नाटो चा पराभव ठरला असता ?
- आता रशियन सैन्याचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे युद्ध न करता रशियाचा पराभव आणि नाटो चा विजय झाला आहे ?
- युक्रेन वर रशियाने ताबा केला तरी रशिया हा स्ट्रॅटेजिक बुद्धिबळ हारली आहे ?
असेच तुम्हाला म्हणायचे आहे का ? काही चुकले असल्यास सांगा.
4 Mar 2022 - 4:55 pm | मदनबाण
ये युद्ध म्हणजे नाटो चा मास्टर स्ट्रोक आहे आणि रशियाने हल्ला करावाच हा अमेरिकेचा उद्देश होता.
मास्टर स्ट्रोक म्हणण्या पेक्षा रशियावर युध्दजन्य परिस्थीती लादण्यात अमेरिका यशस्वी झाला. हे इतक्या सहजासहजी झाले नाही आणि म्हणुनच हा मास्टर स्ट्रोक नाही.
पुतीन ह्यांनी स्वतःहून ह्या ट्रॅप मध्ये आगमन केले. पुतीन ह्यांनी युक्रेन वर हल्ला न केला असता तर तो रशियाचा विजय आणि नाटो चा पराभव ठरला असता ?
पुतीन हे कोणत्याही सापळ्यात अडकलेले नाही, त्यांनी या सर्व गोष्टीं बद्धल आधी अनेक वेळा वाच्यता केलेली आहे तसेच सर्व परिस्थीतीची त्यांना व्यवस्थित जाणीव होती आणि आहे. सापळ्यात तोच अडकतो ज्याला सापळ्याची कल्पना नसते !
- आता रशियन सैन्याचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे युद्ध न करता रशियाचा पराभव आणि नाटो चा विजय झाला आहे ?
आता कुठे युद्ध चालु झाले आहे आणि हे प्रॉक्सी वॉर आहे,तसेच नाटोचा सहभाग नसल्याने त्यांच्या जय- पराजयाचा विषय आत्ता तरी योग्य नाही.
- युक्रेन वर रशियाने ताबा केला तरी रशिया हा स्ट्रॅटेजिक बुद्धिबळ हारली आहे ?
पुतीन चांगले प्लेअर असल्याचे आत्ता पर्यंत दिसुन आले आहेत. युक्रेनला परास्त्र करण्याचे धोरण त्यांनी जाहीर केले आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर ते आपली दुसरी महत्वाची चाल खेळतील असा माझा व्यक्तीगत अंदाज आहे.
असेच तुम्हाला म्हणायचे आहे का ? काही चुकले असल्यास सांगा.
मी काही चुकीचे लिहले असल्यास सांगा, नाही तसे असल्यास सुधारणा करण्यास वाव निर्माण होईल. :)
जाता जाता :- खी खी ख्या ख्या ख्या...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “War is the most profitable business on earth” :- Kenneth Eade
5 Mar 2022 - 10:27 pm | मदनबाण
रशियन आर्मी ची महत्वाची वाहने टायर बाद होऊन, चिखलात अडकुन पडुन अशी जाम झाली की त्यांना तिथेच त्या ठिकाणीच सोडुन देण्यात आल्याचे पाहण्यात आलेले आहे. चिखल हा रशियन वाहनांचा, टँक्सचा मोठा शत्रु म्हणुन दिसुन आला आहे, Pantsir-S1 SAM सारख्या एअर डिफेन्स, एन्टी एअरक्राफ्ट गनमिसाईल सिस्टीम ज्याची २० किलोमीटर परिघाची क्षमता आहे त्याला लुळे करण्यासाठी हा चिखल पुरेसा ठरला !
आत्ताच ही बातमी वाचनात आली :-चीननं रशियाला दिला दगा? सैन्याच्या 'त्या' ६४ किमी ताफ्याची काय अवस्था झाली बघा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhurum Bhurum... :- Pandu
6 Mar 2022 - 2:52 pm | नगरी
व्वा,एक नक्की खरे अमेरिका कधीही युद्ध स्वतःच्या भूमीवर लढत नाही,'तुम लढो और हमसे गन लो'
6 Mar 2022 - 2:16 am | Trump
रशियन युध्दसामुग्री विश्लेषण
6 Mar 2022 - 9:58 am | मदनबाण
@Trump
व्हिडियोसाठी धन्यवाद, नक्की पाहतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sahvena Anurag... :- Panghrun
3 Mar 2022 - 11:30 pm | अर्धवटराव
प्रचारतंत्र, युरोपीय लोकमताचा रेटा वगैरे गोष्टीं एक्स्ट्रीम लेव्हल ला गेल्यास काय, हा सगळा विचार रशीयाने निश्चीत केला असावा. ज्या दिवशी युक्रेन रशीयापासुन वेगळा झाला त्याच दिवशी या आक्रमणाचं पहिलं पान रशीयन स्ट्रेटीजीस्टने लिहीलं असावं. रशीयाच्या नाकातोंडात पाणि आल्यामुळे रशीयाने हे आक्रमण घाईघाईने केलेलं नाहि. रशीया (आणि चीन देखील) तसेही बेड बॉइज म्हणुन आपली इमेज राखुन आहेत. कदाचीत त्यांनी मुद्दाम तशी इमेज बनवली आहे. त्यामुळे युरोपीय जनमानस आणि त्याच्या प्रभावाने युरोप/अमेरीकेनी घ्यायचे निर्णय याची पूर्ण कल्पना रशीयाला असेलच.
निर्बंधांमुळे रशीया आर्थीक दृष्ट्या कितीही डबघाईला आला तरी बॉटमलाईन टच करणार नाहि. याच बहाण्याने ऊर्जा पुरवठा आणि इतर व्यापाराच्या बाबतीत रशीया चीनशी आणखी जवळीक साधेल. रशीया चीनचा मींधा झाल्याचं चित्र निर्माण झालं तरी भविष्यात चीन विरोधात रशीयाचा वापर करुन घेण्याचं ऑप्शन उपलब्ध असेलच, आणि रशीयाचा त्याला नकार देखील नसेल. हे थोडंफार दुसर्या महायुध्दाच्या पूर्वपिठीकेसारखं झालं. तेंव्हा सुरुवातीला जर्मनी आणि रशीयाने हातमिळवणी केली. पण शेवटी रशीया जर्मनीवर उलटलाच (त्यात हिटलरची चुक होती हे कारण होतं म्हणा...). इंग्लंड आणि जर्मनी जमीनदोस्त झाले आणि रशीया अर्ध्या जगाचा धृव बनला. (भारत-चीन संबंध न्युट्रल ठेवायला रशीया प्रयत्न करेल. कदाचीत भविष्यात रशीयावरुन एखादी पाईपलाईन भारतात देखील येईल..कोण जाणे)
९०च्या दशकानंतर जीडीपीच्या मोजदाती वरुन नव्हे तर आर्थीक प्रगतीचा आलेख बघता सिगापूर, चीन, उएई, साऊथ कोरीया प्रमाणे रशीया आर्थीक प्रगती का करु शकला नाहि ? नैसर्गीक साधन सामुग्री, टेक्नोलॉजी, मनुष्यबळ वगैरे सर्वच बाबतीत रशीया काहि कमि नव्हता (अजुनही नाहि). तिथल्या ऊर्जा आणि युद्धसामुग्री व्यापाराने इतर दालनं झाकोळुन टाकली का? तसं झालं नसतं तर आज रशीया देखील चीन प्रमाणे पैशाच्या जोरावर दादागीरी करायला मोकळा झाला असता का? मग कदाचीत रशीयाला असं बंदुक घेऊन सीमेबाहेर पडावं लागलं नसतं. युरोपीयन युनीयनने जर रशीयाला हि चुक दाखवुन दिली आणि भविष्यात त्यावर काहि काम झालं तर ते सगळ्यांच्याच फायद्याचं होईल. कदाचीत नॉर्डस्ट्रीम-२ वगैरे प्रकल्पांतुन जर्मनी याच योजनेवर काम करत होता. पण मग त्यातुन चीनचं नुकसान होतं, आणि अमेरीकेचं सुद्धा. म्हणुन मग ड्रॅगन अआणि अंकल सॅम ने इंडायरेक्टली रशीयाला युद्धास भरीला पाडलं.. असो. हे सगळं स्पेक्युलेशल आहे :)
4 Mar 2022 - 12:14 am | रावसाहेब चिंगभूतकर
चूक. जर्मनीने रशियावर आक्रमण केले होते.
4 Mar 2022 - 12:19 am | साहना
जर्मन रशिया वैमनस्य प्रथम महायुद्धाच्या काळातले आहे. झार च्या फौजा जर्मनीला रोखू शकत नव्हत्या, त्याच काळांत बोल्शेविक क्रांती झाली आणि राशिवायला जर्मनीसोबत तह करून काही नवीन राष्ट्रे निर्माण करावी लागली. लेनिन ला हे अतिशय जिव्हारी लागले होते.
4 Mar 2022 - 12:52 am | ॲबसेंट माइंडेड ...
काहीतरी घोळ आहे. थोड विस्कटुन सांगीतल तर बर होईल.
4 Mar 2022 - 8:44 pm | अर्धवटराव
रशीया जर्मनीवर उलटण्यामागे हिटलरचे, पर्यायाने जर्मनीचे रशीयावर आक्रमण हि चुक होतीच ना.
जर्मनी जर रशीयावर चालुन जाण्यापूर्वी / जाण्याऐवजी आपल्या पूर्ण ताकतीने इंग्लंडवर चालुन गेला असता तर युद्धाचा निकाल वेगळा लागला असता असाहि एक मतप्रवाह आहे.
सध्याच्या संदर्भात याचा अर्थ इतकाच कि रशीया-चीन जवळीक फार जरी वाढली तरी त्यांच्यात वैमन्यस्य येणारच नाहि असं काहि नाहि.
(एव्हढे बोलुन मी आपल्या उंदीर मारण्याच्या कामावर परत रुजु होतो.)
4 Mar 2022 - 9:25 pm | Trump
त्यापाठीमागे जर्मनीचे वंशभेदी धोरण धोरण कारणीभुत आहेत. हिटलरचे अमेरीका, फ्रान्स आणि इंग्लंड ही आदर्श वसाहतदार देश होते. त्यामुळे त्याने सुरवातीपासुन त्यांच्याशी युध्द टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु रशियन स्लाव त्याच्यासाठी कनिष्ठ दर्जाचे होते.
अर्थात दुसर्या बाजुनेही (अमेरीका, फ्रान्स आणि इंग्लंड) थोडीफार तशीच धोरणे होती.
----------
हल्ली बरेच लोक हिटलर आणि चर्चिलला एकसमान मानतात.
अधिक वाचनः
https://en.wikipedia.org/wiki/Mein_Kampf
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Unthinkable
https://www.reddit.com/r/AskHistorians/comments/640pg5/what_did_general_...
https://en.wikipedia.org/wiki/Churchill,_Hitler_and_the_Unnecessary_War
4 Mar 2022 - 4:42 am | निनाद
जगाचा पालनकर्ता विष्णू सामान्य स्थितींत सर्पावर झोपून असतो. सर्पाला फक्त जवळचे दिसते. पण काही निर्णय घ्यायचे असल्यास किंवा युद्धावर जायचे असल्यास विष्णू गरुडावर बसतात कारण गरुडाला दूरचे दिसते. हे आवडले!
लेख एकुण परिस्थितीचे चांगले विवेचन करतो आहे. काही धुके दूर व्हायला या लेखाची नक्कीच मदत व्हावी!
4 Mar 2022 - 8:27 pm | सच्चा
प्रचारतंत्रात युक्रेन आघाडीवर आहे असे जे चित्र समाजमाध्यमे आणि दूरदर्शन वाहिन्यांवरुन जाणवत आहे, त्याचे कारण म्हणजे ही माध्यमे पूर्णपणे अमेरिका आणि त्यांच्या बगलबच्यांच्या हातात आहेत. इतर बाजूने बोलणारे अनेक विचारवंत, त्यांचे अनेक ब्लॉग्स, व्हिडिओस आणि लेखन अचानकपणे समाजमाध्यमातून अदृश्य झाले आहेत. तंत्रज्ञान आघाडीवर असण्याऱ्या अनेक कंपन्या फक्त एकांगी प्रचाराला प्रसिद्धी देत आहेत.
ज्याप्रमाणे युक्रेन आपल्या नागरिकांना युद्ध लढण्यासाठी सक्ती करत आहे त्याबद्दल हि माध्यमे मूग गिळून गप्प बसली आहेत, विचार करा हेच जर भारतासारख्या देशात झाले असते तर, हीच मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढून मोठा गहजब माजवला असता. युद्धाची मोर्चेबांधणी हि नागरी वस्तीपासून दूर करायची असते. खरेतर युक्रेन यानुसार युद्ध अपराधी ठरतो, परंतु माध्यमांनी त्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उद्या जर युक्रेन जनता रशियन सैन्यासमोर शश्त्र घेऊन उभी राहिली आणि नाईलाजाने काही आनुषंगिक नुकसान (collateral damage) झाले तर, रशियावर युद्ध गुन्हेगाराचा ठपका देवाला जाणार आहे. त्यामुळे कदाचित रशिया आपली पावले काळजीपूर्वक टाकत आणि ठामपणे बस्तान बसवून वाटचाल करत आहे. यातून रशिया / पुतीन यांचे उद्दिष्ट काय होते आणि कितपत त्यात यश-अपयश आले, हा येणार काळच ठरवेल.
जागतिक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत रशियाविरुद्धच्या ठरावाच्या बाजूने ११० मते, ११ विरुद्ध मते आणि ५८ तठस्थ, असा निकाल आहे. जर जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर तठस्थ असणाऱ्या देशातील लोकसंख्या ही ठरावाच्या बाजूने असणाऱ्यांपेक्षा अधिक आहे.
4 Mar 2022 - 8:42 pm | sunil kachure
सैन्य म्हणजे पहिली शिस्त आणि त्या नंतर शस्त्र अशी संघटना असते.हुकूम तंतोतंत पाळले जातात.
सामान्य जनतेत हे दोन्ही गुण नसतात ते नियोजन बद्ध प्रतिकार करू शकत नाहीत.
त्या मुळे जनते नी शस्त्र हाती घेतली हा सर्व प्रचार चा प्रकार आहे
त्याला काहीच अर्थ नाही.
4 Mar 2022 - 9:01 pm | मुक्त विहारि
उपग्रह आणि ग्रह यांच्या युद्धात, तारांगणांनी पडू नये, याची संपूर्ण काळजी ग्रहाने घ्यायला हवी...
नेहरूंनी केलेली चूक, रशिया करणार नाही.
5 Mar 2022 - 5:10 am | कंजूस
कोणत्या देशांत आहेत? त्यांनाच कोणत्याही कुठल्याही लढायांचा फायदा होतो.
5 Mar 2022 - 8:32 am | sunil kachure
पूर्ण फसलेला आहे. नाटो किंवा बाकी देश जी मदती ची आश्वासन देत आहेत ती राष्ट्र काही फुकट मदत करणार नाहीत.
कर्ज देतील किंवा बाकी दुसऱ्या कोणत्या मार्गे किंमत वसूल करतील.
युद्ध होण्या पर्यंत युक्रेन नी ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता
ना त्याचे स्वतंत्र धोक्यात होते ना सीमा असुरक्षित होत्या.
थोड नरमी दाखवली असती तर युद्ध होण्याची शक्यता च नव्हती.
एकद कुटुंब प्रगती करत असले तर त्या कुटुंबात भांडणे लावून पूर्ण घर बरबाद करण्याची जुनी राजकीय खेळी आहे
तसेच युक्रेन च झाले आहे.
इराक पण शेवट पर्यंत कसा कडवा प्रतिकार करत आहे हे वेस्टर्न मीडिया भडक पने दाखवत होती
पण तो पूर्ण देश बेचिराख केला अमेरिकेने.
Same तेच इथे पण बघायला मिळत आहे
रशिया पूर्ण पने हावी आहे युद्धात तरी युक्रेन कसा लढत आहे
रशिया ची विमान कशी पाडत आहे .
हे भडक पने दाखवणे चालू च आहे..
5 Mar 2022 - 9:02 am | रावसाहेब चिंगभूतकर
रडारडी ला सुरवात झाली: Ukraine Russia War : युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी द्या
http://dhunt.in/sPwWW?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp
5 Mar 2022 - 5:02 pm | धर्मराजमुटके
१० डीग्रीमधे चालत आम्ही युक्रेन सोडलं. याला सुटका म्हणतात काय ? विद्यार्थिनीचा संताप ... ही बातमी
युद्धाच्या परिस्थीत लोकांचा खुपच जास्त अपेक्षा असतात काय असे वाटून गेले.
5 Mar 2022 - 10:56 am | सुबोध खरे
आपला लेख बहुतांशी गंडलेला आहे कारण लष्करी डावपेचांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसावी असे वाटते.
वर्तमानपत्रात वाचून लेख लिहिणे आणि प्रत्यक्ष शस्त्रास्त्रांचा वापर कसा करायचा असतो या डावपेचांनी माहिती असणे या दोन साफ वेगळ्या गोष्टी आहेत.
४ हजार च्या वर अत्याधुनिक लढाऊ विमाने असलेल्या रशियाने जर आपले वायुदल पूर्णशक्तीने वापरले असते तर आता पर्यंत युक्रेन पूर्ण बेचिराख झाला असता.
रशिया कडे असलेली क्षेपणास्त्रे त्यांनी फार कमी प्रमाणात वापरली आहेत याचे कारण त्यांना सर्वनकष युद्ध नको आहे आणि युक्रेनच्या सामान्य जनतेचे कमीत कमी बळी जावेत या इच्छेने त्यांनी हि क्षेपणास्त्रे फक्त लष्करी ठाण्यावर वापरली आहेत.
युक्रेनने उलट आपली अनेक शस्त्रास्त्रे नागरी ठिकाणी उभी केल्यामुळे त्यावर हल्ला झाल्यास सामान्य नागरिक मारले गेले कि त्याचा जगभर कांगावा करण्यासाठी आणि प्रचार तंत्रात वापर करण्यासाठी उपयोग केला आहे.
रशियन आर्मी ढिसाळ वगैरे आपण म्हणता आहात त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असेच दिसते. रशियन आर्मीला सामान्य नागरिकांना मारायचे नाही असे स्पष्ट आदेश आहेत असे दिसते. त्यामुळे महा विध्वंसक शस्त्रास्त्रे असूनही त्याचा फार कमी वापर झालेला आहे.
रशियाला फक्त सद्य राष्ट्रप्रमुख जे नाटोच्या कच्छपी लागलेले आहेत त्यांना बदलून रशियाच्या बाजूचे प्रमुख आणायचे आहेत.
श्री पुतीन याना आपल्याच शेजारी राष्ट्राची वाताहत करून घराच्या दारात कायमचा शत्रू उभा करायचा नाही. पुतीन हे के जि बीचे प्रमुख होते तेंव्हा इतर लोक समजतात तितके ते दूध खुळे नक्कीच नाहीत. युक्रेनच्या शस्त्रास्त्रांची त्यांच्या सरकारी यंत्रणेची इत्यंभूत बातमी त्यांना नक्कीच आहे.
आपल्यावर नियंत्रणे लादल्यावर आपले किती नुकसान होईल आणि किती फायदा होईल हे त्यांना नक्कीच माहिती आहे.
एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. उत्तम अर्थ व्यवस्था युद्ध जिंकत नाही तर सक्षम लष्करच युद्ध जिंकते.
हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. मग देश रशिया असो चीन असो कि उत्तर कोरिया
कारगिल युद्धात फक्त बळींची संख्या पहिली तरी भारतीय सैन्य अक्षरशः कापले गेले असे कुणी म्हणू शकतो. किंवा काही इंटेलिजन्स चुकीमुळे कोट्यवधी पैसे आणि शेकडो सैनिकांचा बळी गेला असे म्हणू शकतो. पण शेवटी निव्वळ चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्य जिंकले.
अत्यंत अज्ञानमूलक असे विधान आहे. यावरूनच आपल्याला लष्कराच्या गणिताचे किंवा हिशेबांचे अजिबात ज्ञान नाही असे मी म्हणू शकतो.
भारताचे ५२७ सैनिक हुतात्मा झाले आणि १३६३ जखमी झाले. याउलट अधिकृत आकड्यानुसार पाकिस्तानचे ४५३ सैनिक मृत्युमुखी पडले परंतु पाकिस्तानने आपले सैनिक तेथे नव्हतेच तर मुजाहिद्दीन होते सांगितल्यामुळे हा आकडा फारच कमी आहे असे सार्वत्रिक रित्या बोलले जाते श्री नवाझ शरीफ( तेंव्हा पाकिस्तानचे पंतप्रधानहोते) यांच्या म्हणण्याप्रमाणे ४००० सैनिक मृत्युमुखी पडले. युद्ध चालू झाले तेंव्हा त्यांचे उद्गार मुहाजिर ने ( मुशर्रफ) फंसा दिया असेच होते.
आपण युद्धाचे विश्लेषण हरलेल्या लष्करप्रमुखाच्या भाषणावरून करत असाल तर धन्य आहे. भारतीय समाज किंवा राजकारण्यांच्या एकजुटीमुळे आपलं विजय झाला असे आपण मांडता आहेत हेच मुळात चूक आहे. भारतीय वायुसेनेस सीमारेषा ओलांडायची नाही अशी सक्त ताकीद होती. अन्यथा हेच युद्ध किमान अर्ध्या काळात समाप्त झाले असते.
श्री वाजपेयी याना आंतराष्ट्रीय समुदायाची काळजी होती यामुळे असे आदेश दिलेले होते.
त्या काळात पाकिस्तानकडे दृष्टीच्या टप्प्याबाहेर मारा करणारी क्षेपणास्त्रे beyond-visual-rangeनव्हतीच तर भारताच्या मिग २९ वर Vympel NPO R-77 missile (NATO reporting name: AA-12 Adder) हे ८० ते १०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र होते ज्याची पाकिस्तानी वायुदलाला भयंकर भीति वाटत होती त्यामुळे त्यांच्याकडे असलेली F १६ त्यांनी युद्धात उतरवलीच नव्हती.
भारतीय लष्कर एक हात पाठीमागे बांधून लढत होते म्हणून एवढे सैनिक सुरुवातील हुतात्मा झाले एकदा इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर सुरु झाला तेंव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी लशंकराल भाजून काढले आणि युद्ध संपले.
बाकी आपले जालावर आनि वर्तमानपत्रात वाचून लेखन चालू द्या.
5 Mar 2022 - 11:21 am | कंजूस
लोकांना मतप्रदर्शनात मर्यादा असतात. त्यामुळे चिकित्सा समजू शकतो.
5 Mar 2022 - 1:26 pm | Trump
श्री साहनांच्या मतानुसार तिथे मुक्त विचार प्रणाली आहे. कोणीही काही बोलु शकते.
हे वाचुन घ्या:
चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग http://www.misalpav.com/node/49895
5 Mar 2022 - 2:26 pm | आनन्दा
बोलायला परवानगी आहेच की..
फक्त शंका आली की CIA किंवा FBI चांगला पाहुणचार करते, आणि बऱ्याच वेळा ढुंगणावर लाथ मारून मायदेशी पाठवण्याची पण व्यवस्था केली जाते म्हणे.
पण ते जाऊदे.
खरे काका, साहना ताई ना वैयक्तिक उत्तर देऊन फारसे काही भागणार नाही, उलट, साहनाताईंच्या विधानाच्या मागे मला एक फार मोठा गर्भित अर्थ दिसतो.
मधली कित्येक वर्षे, म्हणजे शितयुद्धात पाकिस्तान अमेरिकेच्या गळ्यातला ताईत होता, त्यामुळे मुक्त विचारासारणीच्या दैनिकांनी पाकिस्तानचे चित्र एक प्रगतीशील राष्ट्र म्हणून रंगवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साहनाताईंच्या साधारण बोलण्यातून हे लक्षात येते की त्यांच्या वर्तुळात बऱ्याच देशांचे आणि अमेरिकेतले देखील मुक्त विचारसरणीचा पुरस्कार करणारे लोक आहेत. पण ते बहुतांशी इंग्रजी साहित्य वाचणारेच आहेत, त्यामुळे जे सायलेंट ब्रेन वॉश होते, त्याचा हा परिणाम आहे
5 Mar 2022 - 2:37 pm | Trump
अहो मग तशी परवानगी सगळीकडेच असते. कोणीही तोंडावर चिकटपट्टी लावुन ठेवत नाही.
श्री साहना जसे म्हणतात त्याप्रमाणे तथाकथित मुक्त जगात काहीच दुष्परीणाम होत नाहीत. नुसत्याच शाब्दीक चर्चा.
5 Mar 2022 - 5:27 pm | कंजूस
बडबड करतात पण जेव्हा विसा मागायला जातात तेव्हा बडगा दाखवतात. मोठ्या नेत्यांची उदाहरणे आहेतच. पण एकाला टुरिस्ट विसा नाकारला. बहुतेक त्याच्या पासपोर्टवरच्या चीनच्या एंट्रीमुळे असेल.
स्पष्ट कुठे लिहिलेलं नसतं पण ठेचा खाल्लेले लोक आहेत. गूगल आपली नाडीकुंडली मांडत असतो. कोण कुठे काय लिहितो, पवित्रा घेतो याची.
5 Mar 2022 - 12:40 pm | प्रदीप
छे, छे, छे. तुम्हाला काहीच समजत कसे नाही, डॉक्टरसाहेब? पुतिन ह्यांचे मानसिक संतुलन, पराभावमुळे बिघडत चालले आहे, हे साहना ह्यांनी केव्हाच सांगून नव्हते का टाकले? तेव्हा आता त्या विशफुल थिंकिंगवर, जगांत कुठेही, तथाकथित 'लोकशाही'च्या 'विरूद्ध' झाले अथवा होते आहे असा भास जरी झाला, तरी 'लोकशाही खतरेमे' असे म्हणून, ऑर्गॅझम झाल्याप्रमाणे, उन्माद करणार्या सार्या भारतीयांना दिवस काढायचे आहेत.
5 Mar 2022 - 2:15 pm | रानरेडा
डॉक्टर खरे तुम्हाला तरी सैन्यदले , लष्कर याची काहीतरी माहिती आहे का, कि आपले पण अंदाज ?
5 Mar 2022 - 2:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
डॉक्टर साहेबांना असा प्रश्न कोणी विचारेल असे वाटले नव्हते
@रानरेडा - डॉक्टर नौदलात सेवारत होते त्यांनी भारतिय सैन्यदलांवर मिपावर विपूल लेखन सुध्दा केलेले आहे. त्याचे इथले लेखन वाचा मग कदाचित आपण त्यांना असा प्रश्न विचारणार नाही.
डॉक्टरांचे सगळे लेखन वाचण्या करता इकडे टिचकी मारा.
पैजारबुवा,
5 Mar 2022 - 4:05 pm | रानरेडा
पण military strategy and tactics मध्ये एक्सपर्ट आणि अनेक युद्धांचा अनुभव असलेल्या सहाना मॅडम ला वाटतं नाही म्हणजे नसावे
आपण डॉ खरे यांना भेटला आहात का ?
5 Mar 2022 - 5:31 pm | कंजूस
मतं व्यक्त करताना सावध असतात.
5 Mar 2022 - 6:36 pm | सुबोध खरे
डॉक्टर खरे तुम्हाला तरी सैन्यदले , लष्कर याची काहीतरी माहिती आहे का, कि आपले पण अंदाज ?
मी लष्करात एकंदर साडे अठरा वर्षे काम केले आहे.
अर्थात हे सर्व डॉक्टर म्हणून केले असले तरीही आम्हाला लष्करी डावपेचांपासून शस्त्रसज्जता काय तसेच कोणत्या शस्त्राने कोणता अपाय होतो आणि त्यावर उपचार कसा करायचा यासाठी काय साधन सामग्री लागते आणि त्याची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाते.
याशिवाय असमतोल युद्धात( नक्षलवादी अतिरेकी यांच्या बरोबर) किंवा दहशतवादी हल्ल्यात तसेच प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले तर आपल्याला किती जखमी सैनिक येतील आणि त्यासाठी कोणती साधन सामग्री लागेल याचा अंदाज कसा बांधायचा याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते.
पूर्वी ७. ६२ मिमी ची गोळी वापरात असत त्याने सैनिक मरण्याची शक्यता जास्त असे पण INSAS हि ५.६५ मिमी ची गोळी हिची भेदक क्षमता कमी असली तरी यामुळे जास्त सैनिक जायबंदी होतात आणि त्यांना उपचारासाठी मागे आणण्यात जखमी अधिक किमान दोन सैनिक गुंतून पडतात या तर्हेचे मूलभूत शिक्षणही दिले जाते.
याशिवाय सर्वच्या सर्व सैनिकांना/ अधिकाऱ्यांना एन बी सी डी Nuclear, Biological and Chemical Defence (NBCD) याबद्दलचे शिक्षण दिले जाते.
आण्विक जैविक आणि रासायनिक युद्धाचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम काय होतात याचे हि प्रशिक्षण दिले जाते.
याचे प्राथमिक १९८९ (यात सियाचेन आणि श्रीलंकेबद्दल बरीच चर्चा झाली होती) आणि ज्युनियर कमांड कोर्स २००० ( यात कारगिल युद्धातून काय धडा घ्यायचा याबद्दल बराच उहापोह झाला होता) हे दोन कोर्सेस मी केलेले आहेत.
यामुळे युद्धाचे अगदी प्राथमिक किंवा जुजबी का होईना प्रशिक्षण आणि अभ्यास मी केलेला आहे त्यामुळे काही काही गोष्टी मला समजू शकतात असे मला वाटते (असा माझा समज तरी आहे).
6 Mar 2022 - 4:04 am | साहना
युक्रेन ला रशिया बेचिराख करू शकत नाही असे मी कुठेही म्हटले नाही. युक्रेनच्या तुलनेत कदाचित युक्रेन ला दहावेळा बेचिराख करून त्यावरून गाढवाचा नांगर फिरविण्याच्यी सामरिक क्षमता रशिया कडे आहे ह्याला कोणीही नाकारले नाही. उलट लेख आपण विचारपूर्वक वाचला तर पहिल्या काही पॅराग्राफ मध्ये हाच विचार मी मांडला आहे. माहितीतंत्राने अनेकांनी युक्रेन इथे जिंकत आहे असे अशी समजून करून घेतली आहे पण हळू हळू रशियन सैन्य एका एका शहरावर ताबा मिळावीत जाईल तसा तसा मानसिक धक्का ह्या लोकांना बसत जाईल हे मी लिहिले होते.
> रशियन आर्मी ढिसाळ वगैरे आपण म्हणता आहात त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असेच दिसते. रशियन आर्मीला सामान्य नागरिकांना मारायचे नाही असे स्पष्ट आदेश आहेत असे दिसते. त्यामुळे महा विध्वंसक शस्त्रास्त्रे असूनही त्याचा फार कमी वापर झालेला आहे.
आणि हे आदेश देताना तुम्ही तिथे होता काय ? रशियन सैन्याची ढिसाळता हि सर्वत्र पाहायला उपलब्द आहे. इथे युक्रेनी माहितीवर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही. रशियन लोकांचे स्वतःचे लेख आणि भाषणे तुम्ही पाहू शकता. अचानक युक्रेनी मंडळी कुठे राहून हल्ला करत आहे, रशिया कशी नागरी व्यवस्थेवर हल्ला करत नाही ह्या गोष्टी तुम्हालाच ठाऊक आहेत पण इतरांची मते हि प्रोपागंडा ?
निव्वळ रशियन टायर्स ह्या सारख्या सामान्य विषयावर खूप लेखन आता उपलब्ध झाले आहे. पूर्वग्रह दूर ठेवून वाचले तर समजेल.
> उत्तम अर्थ व्यवस्था युद्ध जिंकत नाही तर सक्षम लष्करच युद्ध जिंकते. हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. मग देश रशिया असो चीन असो कि उत्तर कोरिया.
युद्ध शेवटी लष्कर जिंकत असले तरी ते सक्षम आहे कि नाही हे त्यांच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून आहे. किमान इतका बाळबोध तर्क तरी सैनिकी सेवेंत अनेक वर्षे असलेल्या व्यक्तीला समजायला पाहिजे असे मला मनापासून वाटते आणि हेच तुम्ही तुमच्या राहिलेल्या लेखांत सांगितले आहे. भारताची पाकिस्तान आणि चीन विरुद्ध असलेली भूमिका भारतीय सैन्याच्या ताकदीपेक्षा जास्त शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीवर आधारित आहे. वाजपेयी ह्यांना आंतरराष्ट्रीय समाजाची जास्त चिंता का होती किंवा चीन ला निव्वळ शब्दांनी सुद्धा काही म्हणायला भारतीय सरकार मागे का पडते हे शेवटी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. (अर्थव्यवस्था हि neccessary but not sufficient ) कंडिशन आहे. कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे युद्ध सुरु सुद्धा होत नाही, आधीच माघार घेतली जाते.
> भारतीय लष्कर एक हात पाठीमागे बांधून लढत होते म्हणून एवढे सैनिक सुरुवातील हुतात्मा झाले एकदा इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर सुरु झाला तेंव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी लशंकराल भाजून काढले आणि युद्ध संपले.
शेवटी हे का झाले नाही ह्यावर विचार करणे उदबोधक ठरेल !
बाकी धाग्याचे युक्रेन करत राहिले म्हणून हरकत नाही.
7 Mar 2022 - 9:40 am | सुबोध खरे
आणि हे आदेश देताना तुम्ही तिथे होता काय ? रशियन सैन्याची ढिसाळता हि सर्वत्र पाहायला उपलब्द आहे. इथे युक्रेनी माहितीवर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही. रशियन लोकांचे स्वतःचे लेख आणि भाषणे तुम्ही पाहू शकता. अचानक युक्रेनी मंडळी कुठे राहून हल्ला करत आहे, रशिया कशी नागरी व्यवस्थेवर हल्ला करत नाही ह्या गोष्टी तुम्हालाच ठाऊक आहेत पण इतरांची मते हि प्रोपागंडा ?
इतकी जळजळ व्हायचे कारण नाही.
आपले मत प्रॉपगॅन्डा आहे असे मी कधीही म्हटलेले नाही.
प्रचंड शक्तीचे रशियन वायुदल युद्धात भाग का घेत नाही याचे उत्तर तुम्हाला देता आलेले नाही.
रशियन सैन्याची ढिसाळता याबद्दल आपण आपले मत जर काही रशियन लोकांच्या प्रतिसाद लेख किंवा वृत्तपत्रांच्या हवाल्याने देत असाल तर आपली धन्य आहे.
कारण भारताचे पंतप्रधान श्री मोदी हे हुकूमशहा, इस्लामविरोधी, मनुवादी, अत्यंत कुचकामी आणि नालायक आहेत असेच मत डावी वृत्तपत्रे पाहून/ वाचून व्यक्त केल्यासारखे आहे.
रशियाकडे असलेली शस्त्र सामग्री आणि प्रत्यक्ष युद्धात वापरलेली सामग्री याचे प्रमाण इतके व्यस्त का याच एउत्तर आपल्याला देता येईल का?
आणि हे आदेश देताना तुम्ही तिथे होता काय ?
हा प्रश्न केवळ हास्यास्पद असल्याने याचे उत्तर देण्याची तसदी घ्यायची सुद्धा गरज नाही.
असो.
चालू द्या तुमचे
10 Mar 2022 - 12:34 pm | Trump
श्री साहना
--
श्री खरे
दोघेही श्री साहना आणि श्री खरे म्हणतात, ते बरोबर आहे. श्री खरे लघुमुदतीच्या युध्दाबद्दल तर श्री साहना दिर्घमुदतीच्या युध्दाबद्दल बोलत आहेत. युक्रेन-रशिया युध्द लघुमुदतीचे अपेक्षित असल्याने श्री खरे यांचे बरोबर वाटते.
लघुमदतीच्या युध्दात सुरवातीला असलेले सैन्य आणि युध्दसामुग्री पुर्णपणे नष्ट होत नसल्याने बलशाली सैन्य महत्वाचे.
-------
दिर्घमुदतीच्या युध्दात नष्ट झालेली युध्दसामुग्री, नवीन सैन्य उभे करण्याची क्षमता, इतर देश आपल्या पक्षात आणणे (किंवा कमीत कमी), त्यांनी दिलेल्या सामुग्रीचा मोबदला देणे इत्यादीसाठी अर्थव्यवस्थाच उपयोगी पडते. किंवा सुरवातीला पटकन जिंकलेल्या प्रदेशातुन इतका मोबदला मिळायला हवा की अर्थव्यवस्थेचे पंगुत्व निघुन जाईल.
10 Mar 2022 - 1:34 pm | सुबोध खरे
अर्थव्यवस्था कितीही उत्तम असली पण लष्कर कमकुवत असेल तर देश सहज युद्ध हरतो अशी असंख्य उदाहरणे आहेत. उदा. कुवेत, दुसऱ्या महायुद्धात अनेक युरोपीय देश.
याउलट अर्थव्यवस्था गाळात असली तरी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज लष्कर देशाचे रक्षण करते. उदा उत्तर कोरिया. अमेरिकेने कितीही वल्गना केली तरी आजतागायत उत्तर कोरिया वर हल्ला करण्याची त्यांची हिम्मत झालेली नाही.
आम्ही गवत खाऊन राहू पण अणुबॉम्ब बनवू अशी दर्पोक्ती श्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी केली होती. आजयाच अणुबॉम्बच्या जोरावर सर्वनकष युद्ध झाले तर पाकिस्तानच्या दसपट मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला पाकिस्तान चा संपूर्ण पराभव करणे फार फार कठीण होईल.
तसेच रशियाच्या २० पट अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची रशियावर आक्रमण सोडाच पण त्यांनी जेथे आपले लष्कर उतरवले आहे तेथे थेट आपले सैनिक उतरवण्याची हिम्मत केलेली नाही.
तैवानच्या अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम आहे पण तो देश कायम चीनच्या दहशतवादी छायेत जगतो आहे.
भारताची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम असताना इस्लामी आक्रमकांनी सतत आक्रमण करून आपल्या देशाला ८०० वर्षे गुलाम करून ठेवलेला होता. हा इतिहास जर आपण विसरणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच.
भारताची पाकिस्तान आणि चीन विरुद्ध असलेली भूमिका भारतीय सैन्याच्या ताकदीपेक्षा जास्त शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीवर आधारित आहे.
याच्या इतके भंपक वाक्य दुसरे नसेल. चीनची भारतावर हल्ला करण्याची हिम्मत झालेली नाही याचे कारण भारतीय लष्कर १९६२ चे राहिलेले नाही. १९६२ मध्ये अरुणाचल प्रदेशात उतरलेले चीनचे सैन्य परत चीन मध्ये का गेले? तर त्यांचा रसद पुरवण्याचा मार्ग हा फार खडतर होता त्यामुळे तेथे लष्कर ठेवायचे असेल त्याचा खर्च फार प्रचंड झाला असता आणि भारताने प्रतिहल्ला केला असता ( जो नक्कीच केला गेले असता) तर हे सर्वच्या सर्व सैन्य धारातीर्थी पडले असते.
आजही चीन कितीही दावा करत असले तरी त्यांना हे माहिती आहे.
तुमचा देश पादाक्रांत झाला तर लघु काय किंवा दीर्घ मुदत कशालाच अर्थ राहत नाही. हे दुसऱ्या महायुद्धात फ्रान्स नंतर कुवेत आणि आता युक्रेन मध्ये दिसून येत आहे.
बाकी चालू द्या
10 Mar 2022 - 1:38 pm | sunil kachure
काय असते लष्कर.
ती किती असावे,कोणत्या पद्धतीचे असावे हे राज्य करते ठरवतात
आर्थिक स्थिती बघून.
त्यांना कोणती हत्यार देणे परवडेल
त्यांना किती पगार देणे परवडेल
हे सर्व देशाची आर्थिकहा स्थिती बघून च ठरते
मुळात लष्कर हवं की नको हे पण देशाची आर्थिक स्थिती वर च ठरते
बाकी कोणत्याही क्षेत्रात लष्कर मधील सैनिक पेक्षा पगार खूप कमी असेल तर लष्करात फक्त देशावर प्रेम आहे म्हणून जाणारे 100 लोक पण मिळणार नाहीत
देश प्रेम सोडा
सर्व जग ऐश आराम,आर्थिक फायदा .
ह्या भोवतीच फिरत असते.
मग आर्थिक फायदा अधिकार नी मिळू किंवा पगार नी
सत्य एक च आहे
देश ही सिस्टीम आहे. .
आणि त्या सिस्टीम मध्ये आपला फायदा होत असेल तर मी देश प्रेमी आहे
नाही तर विदेशात जावून राहण्याचा मार्ग मोकळा आहे
10 Mar 2022 - 2:57 pm | सुबोध खरे
महा भंपक प्रतिसाद
मेंदू आणि हाताचा संबंध नाही
शेजारी देश पहा.
आर्थिक स्थिती भिकेचे असली तरी दिवाळखोरी झाली तरी लष्कराचे पगार आणि भत्ते वरच चालले आहेत.
आणि तेथे लष्करात भरती व्हायला हजारांनी तरुण रांगेत उभे आहेत.
17 Mar 2022 - 11:43 am | कर्नलतपस्वी
खुप सभ्य भषेत प्रतिसाद दिलात.
17 Mar 2022 - 12:01 pm | कर्नलतपस्वी
देश ही सिस्टीम आहे. .
आणि त्या सिस्टीम मध्ये आपला फायदा होत असेल तर मी देश प्रेमी आहे
नाही तर विदेशात जावून राहण्याचा मार्ग मोकळा आहे
आजुन आपण या देशात आहात याचेच नवल वाटते. कदाचीत तुम्हाला आजुन या देशाचा फायदा होतोय आसे दिसते.
बेजाब्दार विधाने टाळाल तर उपकार होतिल आप्ल्या पेक्शा आनुभवी आणि शिकलेले सदस्य आहेत याचे भान आसुद्यात.
माहीत नसेल तर गप्प बसा. आत थोडातरी प्रतिसाद मिळतोय काही लोकानि तर तुमचा प्रतिसाद वाच्णे सोडा पण बघणे बन्द केले आहे.
7 Mar 2022 - 6:16 pm | कर्नलतपस्वी
एकदम सहमत आहे.
5 Mar 2022 - 9:40 pm | रानरेडा
नाही पण सहाना मॅडम इतका आपला सखोल अभ्यास आणि अनुभव नसावा असे मला वाटते :)
6 Mar 2022 - 12:21 am | Trump
खरे तर ह्या वादविवादात पडायचे नव्हते.
-
तुम्ही दोन व्यक्तींच्या ज्ञानाची, अनुभवाची तुलना कशी करता? जाणुन घ्यायला आवडेल. काही तरी नवीन शिकता येईल.
5 Mar 2022 - 11:44 pm | sunil kachure
1)कोणी अतिक्रमण केले तर प्रतिकार केला जातो ते लादलेले युद्ध झाले.
आक्रमण करणाऱ्या देशाचा हेतू स्पष्ट असतो.
एक तर सीमा रेषा बदलणे हा हेतू असतोच .
प्रतिकार करणाऱ्या देशाचा काहीच पूर्व नियोजित हेतू नसतो .फक्त आक्रमण थांबवणे हाच हेतू असतो.
रशिया नी युक्रेन वर आक्रमण केले आहे त्यांचा हेतू युक्रेन जिंकणे आणि तो रशियात सामील करणे हा हेतू असेल तर युद्ध अजून चालेल.
आणि तेव्हा रशिया नी युद्ध जिंकणे म्हणजे युक्रेन लं रशिया चा भाग बनवणे असा अर्थ असेल..
पण रशिया च हेतू च युक्रेन जिंकायचे नसेल. तर.
युक्रेन ला आर्थिक बाबतीत कमजोर करणे,सैन्य दल युक्रेन चे कमजोर करणे आणि जगाला एक संदेश देणे आम्ही आमच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांचे असे हाल करू.
रशिया च हा हेतू साध्य झाला आहे
१)युक्रेन मधून लाखो लोकांनी पलायन केले आहे.
२) युद्धात युक्रेन चे इतके नुकसान झाले आहे जी ते भरून येण्यासाठी काही वर्ष लागतील आणि खूप सारे पैसे त्या साठी युक्रेन लं खर्च करावे लागतील.
बाकी रशिया cha हेतू बाकी युक्रेन चे मित्र देश पूर्ण करतील ..
कर्ज देवून आणि त्या बदल्यात युक्रेन ल आर्थिक बाबतीत पांगळा करून.
३) उद्या जरी रशिया नी स्वतः च युद्ध विराम घोषित करून सैन्य मागं घेतले तरी त्याचा हेतू पूर्ण झाला आहे.
युक्रेन नी युद्ध जिंकणे ह्याचा अर्थ काय.
रशियन सैन्य युक्रेन सोडून जाणे.
बस इतकाच अर्थ आहे युक्रेन नी युद्ध जिंकण्याचा.
6 Mar 2022 - 8:50 am | रावसाहेब चिंगभूतकर
- जसजसे युद्ध पुढे जात आहे तसतसा युक्रेन बद्दल ची सहानुभूती कमी होत आहे आणि रशियाच्या बद्दल पाठिंबा भारतात वाढत आहे.
- पुतीन यांनी माघार घ्यायची वेळ केव्हाच निघून गेली आहे. युक्रेन हे युद्ध जवळ जवळ हरल्यात जमा आहे. आणखी काही आठवड्यानी रशीयनांचा युक्रेन वर ताबा आहे.
- या सर्व प्रकाराला नाटो आणि मुख्य म्हणजे अमेरिका जबाबदार आहे अशी भावना आहे. जर श्रीलंका ने आपल्या भूमीवर चीन ला सामरिक तळ उभारायला परवानगी दिली तर भारत सुद्धा श्रीलंकेवर हल्ला करेल, नव्हे त्याने करायलाच हवा. हे उदाहरण लक्षात घेतले तर रशियाची कृती फार वेगळी वाटत नाही.
- झेलन्स्की दररोज (संजय राऊत यांच्या प्रमाणे) काही न काही विधाने करत आहेत. नाटो आणि रशिया यांच्यात लढाई लावून देणे आणि त्याद्वारे स्वतःला वाचवणे ही त्यांची मनीषा अजून तरी पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे ते नाटो ला दूषणे देत आहेत. He is expendable and we may see him vanishing from political scenario once the war is over.
- रशियाचे तेल युरोप ला हवे आहेच.
- भारत आणि चीन रशिया बरोबर बिझनेस ऐज युजवल चालू ठेवतील.
- WW III काही होत नाही.
- युक्रेन EU मध्ये सामील करण्याला मुख्य राष्ट्रांचा विरोध असल्याने तिथेही तो सामील होणार नाही. नाटो मध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.
6 Mar 2022 - 11:05 am | कॉमी
एस्टोनिया, लाटिव्हिया आणि लिथुआनिया- हे देश-
१. रशियाच्या बॉर्डरवर आहेत.
२. पूर्व सोव्हिएत युनियन चे भाग आहेत.
(मुद्दा- या बाबत हे तीन देश युक्रेनशी समानच आहेत.)
३. या तिन्ही देशांनी 2004 साली नाटो सदस्यत्व घेतले.
४. रशियाने क्रायमिया गिळंकृत करेपर्यंत नाटो ने या देशांच्या सीमांवर कोणतेही सैन्य ठेवले नव्हते.
प्रपोझिशन-
नाटो कोणत्याही प्रोव्होकेशन शिवाय रशियावर हल्ला करेल ही शक्यता धूसर आहे. रशियाचे त्यांच्या शेजारी देशांशी, आणि खासकरून, पूर्व सोव्हिएत युनियन देशांशी नाते बऱ्याचदा तणावपूर्ण असते, त्या मुळे युक्रेनला आणि इतर शेजारी देशांना नाटोचा आधार घ्यावे वाटणे साहजिक आहे. रशियाने आपली अखंड रशियाची इच्छा काही ठिकाणी दाखवली आहे.
युक्रेन हा रशियन बॉर्डर वरचा, किंवा पूर्व सोविएत युनियन असलेला पहिला देश नाही. त्यामुळे रशियाची "सिक्युरिटी कन्सर्ण" तकलादू आहे.
6 Mar 2022 - 3:16 pm | Trump
पटकन हे सापडले.
दोन्ही वेळेला रशियाला ते आवडले नव्हते. पण आर्थिक कारणामुळे रशियाने उत्तर दिले नव्हते.
-----------
6 Mar 2022 - 6:38 pm | आनन्दा
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे, पण अमेरिका आणि रशिया या दोघांवर पण विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही.
युद्धाची अंतर्गत कारणे काहीतरी वेगळीच वाटत आहेत.
रशियाने ज्या ताकदीने हल्ला करायला हवा त्या ताकदीने हल्ला केलेला नाही, हल्ल्याचा नकाशा बघितला तर रशियाने जेमतेम 10टक्के युक्रेन व्यापला आहे आत्ता, म्हणजे युक्रेनवर सर्वंकष सत्ता हा उद्देश असूच शकत नाही, जर युक्रेन काबीज करायचा असता तर अन्य देश सावध व्हायच्या आत रशियाला अर्ध्याहून अधिक युक्रेन घेणे आवश्यक होते.
आता युद्ध अजून चिवट होत जाईल.. आणि युद्ध लांबले तर रशियाकडून एखादी चूक व्हायची शक्यता पण वाढत जाईल. पुतीन ला नक्कीच हे नको असणार.
नेमके काय उद्देश ठरवले आहे याचा अंदाज अजून तरी मला येत नाहीये..
7 Mar 2022 - 12:25 am | तर्कवादी
अधिकृत आकडेवारी प्रमाणे ५२७ भारतीय सैनिक शहीद झालेत तर ४५३ पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत. म्हणजे फरक फार मोठा आहे असे म्हणता येणार नाही.
7 Mar 2022 - 8:25 am | मुक्त विहारि
जो पाकिस्तान, आतंकवाद्यांना आश्रय देतो, तो अशा वेळी, स्वतःचे आकडे कमीच सांगणार...
7 Mar 2022 - 10:02 am | सुबोध खरे
मुळात कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने तेथे आपले सैनिक नसुन काश्मिरी स्वातंत्र्य सैनिकच आहेत असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नॉर्दन लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंटचे खरे सैनिक मृत्युमुखी पडले तरी त्यांना लष्करी इतमामाने अंतिम संस्कार नशिबी आले नाहीत आणि यामुळे पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ स्तरावर फार मोठा असंतोष पसरला होता.
याउलट हुतात्मा झालेल्या प्रत्येक भारतीय सैनिकास मिळणारा मान सन्मान आणि लष्करी मानाने झालेले त्यांचे अंत्यसंस्कार हे पाकीस्तानी लष्कर आणि सामान्य जनता भारतीय टी व्ही चॅनेल वर पाहत होती आणि यामुळे पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ स्तरावर फार मोठा असंतोष पसरला होता.
7 Mar 2022 - 9:14 am | रावसाहेब चिंगभूतकर
7 Mar 2022 - 10:51 am | आनन्दा
7 Mar 2022 - 10:53 am | आनन्दा
7 Mar 2022 - 10:53 am | आनन्दा
7 Mar 2022 - 10:54 am | आनन्दा
#vkleaks
अमेरिकन अनुदानित युक्रेनियन बायो वेपन लॅब रशियन सीमेजवळ शोधून काढल्या.
मी दोन दिवसा पुर्वी यावर लेख लिहिला होता त्याची लिंक खाली दिली आहे.
रशियाने असे दस्तऐवज प्रकाशित केले आहेत जे दर्शविते की युक्रेन रशियन सीमेजवळ जैविक शस्त्रांवर काम करत आहे. जसे की अँथ्रॅक्स आणि प्लेग आणि पेंटॅगॉनने त्यांचा नाश करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या वेबसाइट लिंक आम्ही तपासल्या असता त्या लिंक यूएस डिलीट केल्या गेल्या आहेत . रशियन फेडरेशनचे म्हणणे आहे की ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या जैविक शस्त्रांच्या प्रतिबंधाच्या कलम 1 चे उल्लंघन करत आहे.
प्रयोगशाळांना यूएस द्वारे निधी दिला जातो. रशियाने जारी केलेले दस्तऐवज खालीलप्रमाणे आहेत क्रपया त्या रशियन भाषेत असल्या मुळे गूगल ट्रांसलेट करून वाचा .
यूएस डिपार्टमेंट ने बायो वेपन संबंधित ज्या लिंक डिलिट केल्याचे आढ़ळले त्या लिंक खाली देत आहे .
26 feb रोजी अधिकृत दूतावास ने 15 बायो वेपन प्रयोगशाळेच्या लिंक इंटरनेट वरुन केल्याचे आढ़ळल्या .
त्या पैकी खाली काही लिंक आहेत ज्या 26 फेब . नंतर बंद दाखवत आहेत
https://web.archive.org/web/20170130193016/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20210511164310/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20170221125752/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20170221125752/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20210506053014/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20170207122550/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20170223011502/https://photos.state.gov/libr...
https://web.archive.org/web/20170207122550/https://photos.state.gov/libr...
आमचे सोअर्स खरे निघाले याचा अम्हाला समाधान आहे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4241606635942991&id=10000281...
7 Mar 2022 - 11:07 am | कॉमी
हे जर खरं असत तर पुतीनने हे कारण जगाला ओरडून ओरडून सांगितलं असत.
https://www.google.com/amp/s/amp.usatoday.com/amp/6937923001
अर्थात हा यूएस पेपर असल्याने त्यावर बाय डिफौल्ट विश्वास ठेवायचा नाही असेच बऱ्याच लोकांचे मत असेल. त्यावर काही बोलू शकत नाही. रशियन मीडिया जास्तीत जास्त स्टेट कंट्रोल्ड आहे. यूएस मध्ये तसे नाही, तरी मन बनवलं तर रशियाचे सोर्स, RT आणि स्पुतनिक सुद्धा विश्वासार्ह वाटतात.
असो.
7 Mar 2022 - 3:10 pm | आनन्दा
त्याच लिंकमध्ये हे पण लिहिले आहे -
The Ukrainian and U.S. governments partnered in August 2005 to "prevent the proliferation of dangerous pathogens and related expertise and to minimize potential biological threats," according to the treaty.
म्हणजे बायो लॅब्स आहेत हे चूक नाहीये, तर त्या कायदेशीर रित्या अमेरिकेच्या मालकीच्या नाहीयेत. तर त्याऐवजी त्या सरकारच्या मालकीच्या आहेत, आणि कोणत्या तरी करारा नुसार तेथे संशोधन चालते.
अमेरिकन प्रोपौगंडाच्या लिंक बद्दल धन्यवाद.
7 Mar 2022 - 3:46 pm | कॉमी
याचावरून जैविक हत्यारे बनवून रशियाला टार्गेट केले जाईल हे अनुमान कश्यावरून निघू शकते ?किमानपक्षी तिथे कोणत्या धोकादायक गोष्टींवर हत्यार म्हणून रिसर्च चाललाय याचा तरी उल्लेख हवा ? इथे तर सरळसरळपणे बयो वेपन्सच्या अगदी उलट उद्दिष्ट दिसतेय, prevention. सदर उद्दिष्टाप्रमाणे काम न होता त्या विरोधात काम होतेय हे कशावरून ?
हे कारण असेल तर रशियन सरकार अधिकृतरित्या तसे का बोलत नाहीये ? हे तर जगाला ओरडून ओरडून सांगायला हवे होते. उगाचच युक्रेनमध्ये नाझी आहेत, सुरक्षा करणे वैगेरे कमकुवत आहेत अशी अतार्किक पडणारी कारणे का देत आहेत रशियन्स ?
२०२० पासून हि अफवा आहे, युक्रेन आणि यूएस मिनिस्टरींनी नकार दिलेली आहे. इतकेच नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे सोशल मीडियाच्या बाहेर कोणत्या रशियन अधिकारी/मीडियाने सुद्धा मांडलेली नाहीये. समाजमाध्यमांवर कोणीही काहीही लिहू शकतो, काय आधारावर विश्वास ठेवायचा ?
7 Mar 2022 - 4:16 pm | आनन्दा
कशावरुन विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पाकिस्तान सुद्धा अणुबॉम्ब बनवत नव्हतेच.. पण त्यानी चक्क अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशातून तंत्रज्ञान चोरले, आणि या सगळया पोलिसांनी त्याकडे डोळेझाक केली हा इतिहास आहे.
त्यामुळे, जर अशी लॅबच अस्तित्वात नसती तर मग रशियावर विश्वास ठेवणे कठीण होते.
पण लॅब अस्तित्वात आहे, म्हटल्यावर दोन्ही बाजू संशयास्पद आहेत.
अमेरिका देखील डोळे झाकून विश्वास ठेवण्या इतकी साधी भोळी नाही.
तुम्हाला ती एकाच बाजू बघायची असेल तर नाईलाज आहे, मी दोन्ही बाजू विश्वासापात्र नाहीत असे म्हणतोय.
7 Mar 2022 - 5:54 pm | कॉमी
मी दोन्ही बाजूंपैकी कोणती जास्त किंवा कमी विश्वासपात्र याबद्दल आत्ता तरी बोलणार नाही*
आत्ता तरी, सोर्स संदर्भात- सोशल मिडियावरची अनाधिकृत हँडल कडून आलेली पोस्ट हा विश्वासपात्र स्रोत नाहीये. त्यात रशिया आणि अमेरिका याचा संबंध नाही जोडला तरी चालेल.
पुढे, हे खरे असेल तर रशिया अधिकृत पणे याबद्दल का बोलत नाही ?
***- पुढे, लिटरली सरकारी हस्तक्षेप आणि मालकी असणे हे शंकेचे मोठे कारण असावे का एखाद्या देशात मीडिया ऑर्गनायझेशन असणे हे जास्त मोठे कारण असावे ?
माझ्या मते पहिले- लिटरली स्टेट फंडेड मीडिया ही जास्त शंकास्पद आहे. रशियाची बहुतांश मीडिया तशीच आहे.
14 Mar 2022 - 6:41 am | आनन्दा
पुढे, लिटरली सरकारी हस्तक्षेप आणि मालकी असणे हे शंकेचे मोठे कारण असावे का एखाद्या देशात मीडिया ऑर्गनायझेशन असणे हे जास्त मोठे कारण असावे ?
I think otherwise.
सामना जे छापतो ते शिवसेनेची अधिकृत भूमिका म्हणून स्वीकारता/नाकारता येते.
मटा/सकाळ वरती असा विश्वास ठेवता येतो का?
17 Mar 2022 - 11:57 am | कॉमी
सेनेची भूमिका म्हणून सामना ग्राह्य धरा ना कोण नाही म्हणतंय.
सेनेने भाजपवर केलेले आरोप सामनात आले तर खरे मानणार का ? (पुराव्यांशिवाय)
आणि दुसरी बाजू-
भाजपशासित राज्यात चालवल्या जाणाऱ्या स्वतंत्र वृत्तपत्राने काँग्रेसवर आरोप केले तर ते भाजपशासित राज्यातल्या पेपरचे आहेत म्हणून उडवून लावणार का ?
17 Mar 2022 - 1:57 pm | Trump
नक्की कशावर चर्चा चालु आहे?
17 Mar 2022 - 4:28 pm | शाम भागवत
:))
13 Mar 2022 - 6:30 pm | Trump
Robert Pope is in charge of securing or eliminating Soviet-era bioweapons, so he knows a lot about the subject. But it turns out not all of these Soviet weapons are being destroyed or even secured in Ukraine. Pope acknowledged that in an interview.
17 Mar 2022 - 9:29 pm | Trump
श्री टकर कार्लसन यांचे स्वगत ऐकण्यासारखे आहे.
अमेरीका / खंडीय युरोपियन लोकांना भविष्यात युक्रेनला मदत करण्याचे, युध्द्दज्वर वाढवण्याचे काय तोटे याचे विश्लेषण आहे.
7 Mar 2022 - 12:26 pm | sunil kachure
बाकी लष्करी कारवाया .भारतीय सैनिक मृत्यू मुखी पडण्याचे प्रमाण जास्त च आहे आहे
योग्य नियोजन,संयम, ह्याचा अभाव आहेच
अफगाणिस्तान आणि इराक मध्ये अमेरिके नी लष्करी कारवाई केली .
अमेरिकेचे खूप कमी सैनिक मारले गेले
मनुष्य बळाची हानी जास्त होत असेल .
नेतृत्व कुठे तरी कमी पडत आहेत
7 Mar 2022 - 1:01 pm | रात्रीचे चांदणे
राजेशभाऊ बाकी सर्व विषयांप्रमाणे ह्या विषयातही तुम्हला भरपूर ज्ञान आहे आस दिसतंय. एखादा लेख लिहून काढा हिथे. आपण तो मोदी आणि आर्मी चीफ नरवणे यांना पाठवून देऊ. तुमच्याजवळ ज्ञान आहे तर आस दाबून नका ठेऊ. वाटलंस तर हिथे प्रकाशित करून सिक्रेट फोडण्यापेक्षा तुम्ही तो थेट नरवणे साहेबाना पाठवूण द्या.
17 Mar 2022 - 12:37 pm | कर्नलतपस्वी
भावी राश्ट्रिय सुरक्शा सलाहकर ( की कलह कार)
17 Mar 2022 - 12:38 pm | कर्नलतपस्वी
भावी राश्ट्रिय सुरक्शा सलाहकर ( की कलह कार)
17 Mar 2022 - 1:22 pm | सुरिया
जाऊ द्याना कर्नल साहेब,
कशाला लिंकू पिंकू चे प्रतिसादावर तुमची पण प्रतिसाद दुकानदारी चालवता.
एक जण निवडू निवडू लिंका ओततात. दुसरे मिपा क्रांतिवीर असल्याच्या थाटात पिंकाची स्वगते फेकतात.
का टाईम घालवायचा त्यांच्यावर?
कविता करा, प्रवासवर्णने लिहा, जमल्यास तुमच्या सेना आयुष्यावर लिहा. मज्जा करा.
7 Mar 2022 - 1:02 pm | सुबोध खरे
मनुष्य बळाची हानी जास्त होत असेल .
नेतृत्व कुठे तरी कमी पडत आहेत
उगाच हातात कळफलक आहे म्हणून काहीही बडवू नका.
नेतृत्व कमी पडत आहे याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का?
मी राजकीय म्हणतो आहे लष्करी तर नाहीच नाही
There were 2,401 United States military deaths in the War in Afghanistan. 1,921 of these deaths were the result of hostile action. 20,752 American service members were also wounded in action during the war.
7 Mar 2022 - 12:47 pm | sunil kachure
युद्धात नेतृत्व खूप महत्वाचे असते
राजकीय नेतृत्व अतिशय चतुर,खूप हुशार ,दूर दृष्टी असणारे असावेच लागते
कारण राजकीय नेतृत्व सर्वोच्च असते.
दुसरे तिन्ही दलां चे प्रमुख त्यांच्या मध्ये योग्य को opration असेल च पाहिजे.
आणि तिसरे युद्ध निती ठरवणारे अधिकारी हे अतिशय उच्च बुद्धी मत्ता असणारे आणि संयमी,लोक असलीच पाहिजेत.
स्व सैनिकांची जीवित हानी कमी होवून युद्ध जिंकता आले पाहिजे
त्या साठी छ्त्रपती चा आदर्श डोळ्या समोर
ठेचा.
त्यांनी अनेक युद्ध केली पण स्वतःच्या सैनिक ची जीवित हानी कमीत कमी होईल ह्याचा प्लॅन करून.
बॉर्डर चित्रपटात .
जे दाखवले आहे आणि ते सत्य पण आहे
पाकिस्तान चे प्रचंड लष्कर कसलेच हवाई संरक्षण न घेता मूर्खा सारखे भारताच्या सीमेत प्रवेश करते झाले .
इतके प्रचंड लष्कर हवाई संरक्षण नसताना उघड्या मैदानात मूर्ख अधिकारी च उतरवतात.
काय झाले
भारतीय वायू दलाने त्यांची धुळधाण udhavali .
ते काहीच करू शकले नाहीत.
11 Mar 2022 - 10:17 am | सुबोध खरे
त्या साठी छ्त्रपती चा आदर्श डोळ्या समोर
ठेचा.
हायला
आदर्श कसा काय बुवा ठेचायचा?
मी उगाच सुनील राव आलं किंवा मिरची सारखा आदर्श पाटा वरवंट्यावर घेऊन ठेचत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करून पाहिला
पण काही जमत नाही
7 Mar 2022 - 2:14 pm | sunil kachure
तो खरा आहे असा मी दावा करणार नाही कारण तो ऐकीव आहे.
माझ्या एका ओळखीच्या व्यक्ती नी तो सांगितला होता.
तो नाविक दलात होता.
पाकिस्तान ,भारत बांगलादेश युद्धात घडलेल.
आणि तो स्वतः त्या युद्धात सहभागी होता
पण
तो इथे सार्वजनिक प्लॅटफॉर्म वर शेअर करणे चुकीचे आहे.
7 Mar 2022 - 6:29 pm | कर्नलतपस्वी
लेख फसला अथवा नाही या पेक्षा लेखावर झालेल्या सांगोपांग विचार मथंना मुके खुप गोष्टींची उकल झाली. लेख व प्रतीसाद आवडले.
7 Mar 2022 - 10:21 pm | sunil kachure
Sahana ह्यांनी काही महिन्या पूर्वी असा दावा केला होता.
जेव्हा शेतकरी आंदोलन चालू होते तेव्हा.
की तंत्र ज्ञान इतके प्रगत झाले आहे की .
काही वर्षांनी ऊर्जा फुकट मिळेल
ऊर्जा निर्माण करण्यास काहीच खर्च येणार नाही
पण खरी स्थिती तर ही आहे .
आज पण वायू,डिझेल,पेट्रोल वर च जग अवलंबून आहे.
त्या साठी युद्ध होत आहेत.
त्या साठी मीडिया मधील माहिती वर विश्वास कमी ठेवा आणि सत्य स्थिती वर स्व अनुभव घेवुन मत व्यक्त करावं.
10 Mar 2022 - 10:18 pm | मदनबाण
U.S. Under Secretary of State for Political Affairs Victoria Nuland यांचे वक्तव्य रोचक आहे ! काय म्हणतात त्या ?
तर... युक्रेन मंदी बायोलॉजिकल रिसर्च फॅसेलिटीज हायेत, पन आम्हासनी काळजी हाय की त्याचा कंट्रोल रशियन सैन्य घेईल.
हे काय कमी हाय का ? तर आता पुतीन बाबा रशियावाले म्हणत हायेत की जॉर्जिया मदी बी अश्याच लॅब्स बिब्स हायेत.
कर्नल डग्लस उवाच :-
जाता जाता :- रशियन डिफॉल्ट, गोल्बल एनर्जी शॉक, जागतिक अन्न-धान्य तुटवडा [ चीन साठा करतोय असं हिथच कुटतरी म्या लिवलं व्हता बघा. ] आणि गर्तेत जाणारा मूर्ख युरोप हे कोणत्या क्रमाने समोर येते ते पहाणे रोचक ठरणार आहे.
ता.क :- जालिय भटकंतीतुन माझ्या वाचनात असे आले आहे की उध्या म्हणजे ११ मार्चला रशिया एक्सट्रर्नल इंटरनेट पासुन स्वतःला डिस्कनेक्ट करुन घेणार असुन .ru या कंन्ट्री कोड खाली त्यांच्या सर्व कंपन्या / साईट्स आणण्यास सांगितले गेले असुन ही मुदत बहुतेक आज पर्यंत आहे.
ज्यांना या बातमीत रस असेल त्यांनी हे वाचायला हरकत नाही :- Russia’s denying that it’s about to cut itself off from the global internet, but it’s acting a lot like it
विशेष :- We are witnessing the birth of Bretton Woods III :- Zoltan Pozsar
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'Life is like ice cream, enjoy it before it melts'
11 Mar 2022 - 6:23 pm | रावसाहेब चिंगभूतकर
रशिया स्वतः ला कट ऑफ करत नाहीये. तो रशियाच्या बाहेरून आत आणि आतून बाहेर जाणारा इंटरनेट ट्राफिक मॉनिटर आणि कंट्रोल करणार आहे असं वाटतंय. रशियन सर्व्हिसेस वर वेस्टर्न हॅकर्स कडून परिणाम होणार नाही हे ते पाहतायत. तसा प्रयत्न झाला तर तो मोडून काढणे त्यांना सोपे होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर ते आपले सगळे डिजिटल नेटवर्क अभेद्य किल्ल्यात नेऊन ठेवत आहेत. It is a wise move. मला फक्त एक शंका आहे. शुक्रवार का? त्यानंतर असं काय रशिया करणार आहे?
11 Mar 2022 - 7:16 pm | प्रदीप
आपल्या प्रश्नाचे उत्तर खुद्द पुतीन ह्यांना माहित नसेल. पण तुम्ही योग्य ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे. कारण सर्वज्ञ कचुरे येथे आहेत. ते व केवळ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.
13 Mar 2022 - 9:18 am | रावसाहेब चिंगभूतकर
कॉलिंग इन मिस्टर कचुरे.. कॉलिंग इन मिस्टर कचुरे..
प्लिज रिस्पॉन्ड..
यू आर अर्जंटली रिकवायर्ड हिअर..
13 Mar 2022 - 11:28 am | sunil kachure
ह्याचे उत्तर रशिया च्या गुप्त योजना आणि युद्ध निती ज्या यंत्रणा ठरवतात त्यांनाच ह्याचे उत्तर माहीत असेल.
बाकी जी यंत्रणा त्याची अंमलबाजवणी करणार आहे त्यांना पण त्याचे उत्तर माहीत असण्याचे कारण नाही .
त्या मुळे बाकी कोणाला त्याचे उत्तर माहीत असणे शक्यच नाही.
किंवा फक्त बातमी फक्त पसरवली असेल त्या पेक्षा वेगळीच निती त्यांनी आखली असेल.
आणि महत्वाचे.
इथे मला फक्त माझे विचार व्यक्त करायला आवडतात..
कोणत्याच आयडी शी वैयक्तिक दोष आरोप करण्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाही.
11 Mar 2022 - 7:20 pm | Trump
बहुतेक काही गडबड झाली तर दुरुस्त करण्यास वेळ असावा. शनिवारी आणि रविवारी व्यावसायिक व्यवहार बंद असतात.
18 Mar 2022 - 11:16 pm | मदनबाण
रशियन डिफॉल्ट, गोल्बल एनर्जी शॉक, जागतिक अन्न-धान्य तुटवडा [ चीन साठा करतोय असं हिथच कुटतरी म्या लिवलं व्हता बघा. ] आणि गर्तेत जाणारा मूर्ख युरोप हे कोणत्या क्रमाने समोर येते ते पहाणे रोचक ठरणार आहे.
Russia seems to have averted its historic bond default — for now
पुतिन बाबा रशियावाले यांनी हा मोठ्ठा धोका सध्या तरी टाळलेला दिसतोय... पाहुया पुढे काय होते.
तुलसी ऑन बायो लॅब्स :-
जाता जाता :- Why it matters if Saudi Arabia sells oil in Chinese yuan instead of US dollars
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "No nation has friends only interests." - Charles de Gaulle
11 Mar 2022 - 6:46 pm | मूकवाचक
जगाच्या पाठीवरून धर्म नाहीसे केले तर युद्ध/ संघर्ष बंद होऊन चौफेर प्रगती होईल या अंधश्रद्धेला छेद देणारे बरेच संघर्ष होत आलेले आहेत. रशिया - युक्रेन संघर्ष त्यादृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकेल.
11 Mar 2022 - 6:57 pm | मुक्त विहारि
यांच्या मधील युद्ध, हे असेच एक आठवलेले उदाहरण...
चीन आणि तिबेट, असेच एक दुसरे उदाहरण
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, अद्याप देखील शीतयुद्ध करत आहेत...
जपानचे, कोरियावर झालेले आक्रमण, हे अजून एक उदाहरण
इसिस हे अजून एक उदाहरण ...
त्यामुळे, तुमच्या मताशी सहमत आहे....
साधारणतः चालतेबोलते सजीव, साम्राज्य वाढवतच असतात किंवा रक्षण देखील करत असतात....कुत्री देखील, आपापली गल्ली सांभाळून असतात...
11 Mar 2022 - 7:24 pm | Trump
12 Mar 2022 - 11:35 am | कॉमी
13 Mar 2022 - 12:29 am | Trump
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. ह्या युध्दामध्ये माध्यमांची भुमिका प्रामुख्याने आहे.
----
ह्या फरकामुळे युध्द्दावर चर्चा करताना, समोरचा मनुष्य कोणते माध्यम बघतो ह्यावर त्याचे मत अवलंबुन आहे. जसे जसे दिवस जातील, तसे इतर विषय ह्या युध्दाची जागा घेतील. श्री झेलेन्स्किला युरोपियन बाजुला सारतील, युक्रेनियन जनतेला ह्या विनाकारण ओढावुन घेतलेल्या संकटाला स्वत:च तोंड द्यावे लागेल. रशिया एकदा ह्या संकटातुन निघाला की कायमस्वरुपी युरोपियन मक्तेदारीला धक्का लागणार आहे. चीन नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी जवळुन बघत असेल आणि तयारी चालु असेल.
13 Mar 2022 - 12:47 am | Trump
रशियन राष्ट्रियकरण
https://www.businesstimes.com.sg/government-economy/russian-prosecutors-...
https://www.reuters.com/business/autos-transportation/mercedes-benz-says...
https://www.washingtonpost.com/business/2022/03/10/russia-nationalize-fo...
https://edition.cnn.com/2022/03/10/business/russia-nationalization-weste...
https://www.traveldailymedia.com/russia-considers-nationalisation-of-air...
https://www.reuters.com/business/autos-transportation/auto-truck-makers-...
13 Mar 2022 - 1:37 am | Trump
13 Mar 2022 - 1:06 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
प्रपोगंडा,..... (https://www.flipkart.com/propaganda/p/itm010070949a091) हे पुस्तक ह्याच विषयावर आधारित आहे ...
असेच एक जुने पुस्तक आहे... https://en.m.wikipedia.org/wiki/Propaganda_(book)
16 Mar 2022 - 5:05 pm | Trump
धन्यवाद.
17 Mar 2022 - 12:19 pm | ॲबसेंट माइंडेड ...
मिपावर हा लेख आहे.
प्रोपगंडा (Propaganda) https://www.misalpav.com/node/49400
16 Mar 2022 - 8:12 pm | sunil kachure
Republic भारत चे नाव घेतले आणि सर्व पाप धुवून निघाली.
अर्णव आणि republic सारखा बकवास न्यूज चॅनेल नाही असे म्हणणार नाही.
कारण बाकी गोदी भक्त आज तक पासून खूप आहेत.
भारतीय मीडिया कोणतेच गंभीर विषय निरपेक्ष पने मांडण्याच्या लायकीची नाही .
बावळट,अडाणी,गुलाम ही सर्व विशेषण त्यांना लावता येतील
14 Mar 2022 - 1:51 am | Trump
रशिया आणि युक्रेन ऑलिगार्क २०१८
15 Mar 2022 - 11:49 am | Trump
रशियाने अमैत्रीपुर्ण देशातील परदेशी संशोधन अधिकार( पेटंट) कोणत्याही मानधनाशिवाय वापरायला परवानगी दिली आहे. याच्यामुळे पुर्ण बौद्धिक मालमत्ता रशियाला फुकट वापरता येणार आहे.
16 Mar 2022 - 7:37 pm | Trump
भारताला स्वस्त तेल रशियाकडुन मिळेल असे दिसते. बातम्यामध्ये रशियाने साधारणतः २५ टक्के सवलत (संदर्भ सापडत नाही.) दिल्याचे दिसते आहे. वाढलेले दर आणि पुन्हा कमी झालेले तर दर १०० डॉलर प्रती बॅरलच्या (https://oilprice.com/) आसपास दिसत आहेत.
16 Mar 2022 - 8:17 pm | कॉमी
भारताने राशियातून स्वस्त तेल घेतले तर ते निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही- व्हाइट हाऊस
https://indianexpress.com/article/world/india-russia-discounted-oil-offe...
16 Mar 2022 - 8:45 pm | Trump
मी बघितली ती बातमी, अमेरीकेचा भरवसा नाही. भारताला आणि रशियाला फायदा होते आहे असे दिसले तर ते उद्या दलबदलुपणा करतील.
17 Mar 2022 - 12:04 am | शाम भागवत
तसं होणार नाही.
अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही.
17 Mar 2022 - 12:07 am | शाम भागवत
अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही असे वाटते.
:)
17 Mar 2022 - 12:07 am | Trump
सांगु शकत नाही.
अमेरिका भारताला दुखवेल असं काहीही करणार नाही.
जगावर प्रभुत्व ठेवण्यासाठी आणि बाजारपेठ म्हणुन अमेरीकेला भारताची गरज आहे. ती गरज संपताच किंवा भारताचे ओझे डोईजड होताच, भारताविरोधात अमेरीकेच्या कारवाव्या सुरु होतील.
18 Mar 2022 - 6:22 pm | शाम भागवत
तुमचे म्हणणे पूर्वीच्या भारतासाठी योग्य आहे.
पण आता मात्र भारताची गरज अमेरिकेला आहेच व ती पुढे वाढतच जाणार आहे.
इतकेच नव्हे तर जोपर्यंत चीन प्रबळ आहे तोपर्यंत तरी युरोप, अमेरिका व रशिया यांना भारताला महत्व द्यावेच लागेल.
चीनने जर भारतावर मात केली तर चीनचा पुढचा घास हा रशियाचा असणार आहे हे रशियाला माहीत आहे. त्यामुळे भारत कमजोर होईल असे रशिया कधीही करणार नाही तसेच चीनलाही दुखावत बसणार नाही.
असो.
22 Mar 2022 - 7:36 pm | सुबोध खरे
भारतावर रशियन तेल घेण्यावर बंधने घातली तर त्याच न्यायाने युरोपीय देशांवर त्यांचा नैसर्गिक वायू आणि तेल यांच्या आयातीवर बंधने घालावी लागतील.
यामुळे अमेरिकेला भारताच्या रशियन तेल खरेदीवर बंधने घालता येत नाहीयेत.
अमेरिका हा सर्वात दांभिक आणि चोर देश आहे तेंव्हा तो भारतासाठी काही करेल यावर मुळीच विश्वास ठेवू नये.
22 Mar 2022 - 9:05 pm | प्रदीप
अगदी बरोबर.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या २ मार्चच्या बातमीनुसार, स्विफ्ट्मधून स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्या रशियन बॅम्कांना वगळण्यात आलेले नाही, कारण त्यांच्यातर्फेच ई. यू. मधील देश, रशियांतील तेल व वायू खरेदी केल्याचे पैसे देऊ शकतात.
25 Mar 2022 - 10:51 am | Trump
थोडी चुक झाली आहे. पुर्ण अर्थ बदलतोय.
25 Mar 2022 - 12:08 pm | शाम भागवत
मला तरी काही चूकीचे वाटलेले नाही. प्रदीप यांनी दिलेल्या लिंक मधील या बँकांचा उल्लेख जिथे आलाय ते खाली देत आहे.
१. The European Union said on Wednesday it was excluding seven Russian banks from the SWIFT messaging system, but stopped short of including those handling energy payments, in the latest sanctions imposed on Russia over its invasion of Ukraine.
गुगलबाबा:
युरोपियन युनियनने बुधवारी सांगितले की ते स्विफ्ट मेसेजिंग सिस्टीममधून सात रशियन बँकांना वगळत आहे, परंतु युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर लादलेल्या नवीनतम निर्बंधांमध्ये ऊर्जा देयके हाताळणाऱ्यांचा समावेश करणे थांबवले आहे.
२. Sberbank (SBER.MM), Russia's largest lender, and Gazprombank were not included because they are the main channels for payments for Russian oil and gas, which EU countries are still buying despite the conflict in Ukraine.
गुगलबाबा:
Sberbank (SBER.MM), रशियाचा सर्वात मोठा कर्जदाता आणि Gazprombank यांचा समावेश करण्यात आला नाही कारण ते रशियन तेल आणि वायूच्या पेमेंटसाठी मुख्य चॅनेल आहेत, जे युक्रेनमधील संघर्ष असूनही EU देश अजूनही खरेदी करत आहेत.
३.Polish Prime Minister Mateusz Morawiecki said the decision to exclude Sberbank and Gazprombank from sanctions due to "transactions related to energy supplies to the EU" was unacceptable.
गुगलबाबा:
पोलिश पंतप्रधान मातेउझ मोराविकी यांनी सांगितले की "EU ला ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित व्यवहारांमुळे" Sberbank आणि Gazprombank ला निर्बंधांमधून वगळण्याचा निर्णय अस्वीकार्य आहे.
25 Mar 2022 - 12:13 pm | शाम भागवत
🤦♂️
मला पण ते जरा चूकीचे वाटले होते. असं टाईप करायचे होते.
🤣
25 Mar 2022 - 12:17 pm | प्रदीप
हे माझ्याकडून थोडे मोघम लिहीले गेले. मला म्हणायचे होते की स्विफ्ट्मधून अनेक रशियन बँंकांना काढण्यात आले, मात्र त्या बँकांत स्बेबँक व गॅझ्प्रॉमबँक ह्यांचा समावेश नाही. अर्थात, ह्या दोन्ही बॅंका अजूनही स्विफ्ट्मधे आहेत.
17 Mar 2022 - 1:34 am | Trump
भारतासाठीच्या काही शक्यता, नक्कीच नवीन माहीती आहे. रशियाने युध्द जिंकणे/हारणे, चीन आणि रशियन अर्थव्यवस्था याचा आपल्यावर नक्कीच परिणाम होणार आहे.
17 Mar 2022 - 10:23 am | कॉमी
व्हॉल्डोमिर झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे, युक्रेन नाटोचा भाग होणार नाही असे सांगितले.
या आधी, फेब्रुवारी मध्ये, म्हणजेच रशियाच्या घुसखोरी आधी सुद्धा, जर्मनीचे चान्सलर शोल्झ यांनी युक्रेनचे नाटोमध्ये येणे कोणत्याही अजेंड्यामध्ये नाहीये असे सांगितले (हा अजेंडा म्हणजे नेहमीचा अजेंडा नव्हे, इथे अजेंडा म्हणजे भविष्यात करावयाच्या गोष्टी.).
तिथेच, झेलेन्स्की म्हणले होते, नाटोचे सभासदत्व हे खूप लांबचे स्वप्न आहे. आणि ते काही युक्रेनच्या हातात नाही.
इतके असताना पुतीन यांनी नाटो चा विस्तार हेच कारण देऊन घुसखोरी केली.
17 Mar 2022 - 10:25 am | कॉमी
आणि, जर कारण नाटो चा विस्तार हे असेल, आणि आज झेलेन्स्की स्पष्टपणे म्हणत असतील, कि युक्रेन नाटोचा सदस्य होणार नाही, तेव्हा पुतीन ह्यांनी रशियाचे सैन्य माघारी घेणे का नाही सुरु केले ??
17 Mar 2022 - 2:04 pm | Trump
आजच्या बातमीनुसार युक्रेनने तटस्थेचा प्रस्तावाला विरोध केला. खुप परस्पराविरोधी बातम्या आहेत. खर्या - खोट्या यांची शहानिशा करणे मुश्कील आहे. बहुतेक बातम्या प्रचार- आणि दबावतंत्राचा भाग वाटतात.
17 Mar 2022 - 2:44 pm | Trump
ते एकच युध्दासाठी कारण नाही.
माझ्या विश्लेषणानुसार.
--
इतर फायदे
17 Mar 2022 - 4:11 pm | कॉमी
नाझींवाद हे कारण पटण्यासारखे नाही. नाझी असले तरी फ्रिन्ज घटक आहेत. ऍझोव बटालियन हि संपूर्ण नाझी आहे ही अंधश्रद्धा आहे. ऍझोव मधले काही नाझी असतील, पण इतर युक्रेनियन सैन्य नाझी नाही.
युक्रेनच्या दोनी सर्वोच्च नेते ज्यू आहेत. युक्रेनच्या प्रमुख राबायने ज्यूंना युक्रेनमध्ये त्रास होत नाही असा निर्वाळा दिला आहे. माझया माहितीप्रमाणे तरी नाझी लोंकांनी करावे असे काही युक्रेनमध्ये घडले नाहीये. तसेच, युक्रेनमध्ये कायदेशीर किंवा सिस्टमिक पातळीवर नाझींवाद अस्तित्वात नाही.
रशिया स्वतः होमोसेक्शुअल लोकांना शिक्षा करण्यासाठी, त्यांची मारधाड करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. खुद्द रशियाची त्याबाबत कायदेशीर भूमिका नाझींशी जुळणारी आहे.
17 Mar 2022 - 4:58 pm | Trump
चुक. सध्यातरी नाझीवाद ही युरोपियन जगात खुप मोठी गोष्ट आहेत. तुम्ही एकाद्याला आई-बहिनीवरुन शिवी देऊ शकता, पण नाझी म्हणुन बोलु शकत नाही. नाझीवादचे समर्थन करणे किंवा कोणालाही पुराव्याशिवाय नाझी बोलणे हा गुन्हा आहे. त्यामुळे युरोपियन माध्यमे जेव्हा कोणालाही नाझी म्हणतात तेव्हा त्यांनी खुप खात्री केलेली असते असे समजा.
संदर्भः
https://www.dw.com/en/is-it-illegal-to-call-someone-a-nazi/a-42313527
https://en.wikipedia.org/wiki/Legality_of_Holocaust_denial
https://www.coe.int/en/web/european-commission-against-racism-and-intole...
नाझी लोक फक्त ज्युविरोधी होते असे जे चित्र आहे ते चुकीचे आहे. त्यांना स्लाव्ह वंशीय (बहुतांशी रशियन आणि पुर्व युरोपियन) यांच्याबद्दलही खुप द्वेष होता. माझ्या माहीतीप्रमाणे सध्या नाझीलोकांना ज्यु लोकाविषयी फारश्या समस्या (किंवा द्वेष) नाही आहे, बहुतेक द्वेष अगोरे आणि अयुरोपियन लोकाविषयी आहे. श्री पुतीन यांना युक्रेनमध्ये वाढणार्या रशियन लोकांविरुध्दच्या द्वेष (ज्युद्वेष नव्हे) महत्वाचा असेल.
दुसर्या महायुध्दात युक्रेनियन आणि नाझी जर्मनी याच्यात (कमीत कमी सुरवातीला) चांगले संबध होते.
संदर्भः
https://military-history.fandom.com/wiki/Ukrainian_collaborationism_with...
https://www.thepress.purdue.edu/titles/unlikely-allies-nazi-german-and-u...
https://www.timesofisrael.com/hundreds-of-ukrainian-nationalists-march-i...
--
अजुन थोडा वेगळा इतिहास.
ज्यु (आणि काळे, अरब, भारतीय इ.) पण नाझी जर्मनीच्या बाजुने लढले.
संदर्भः
https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-n...
https://www.publishersweekly.com/978-0-7006-1178-2
https://rowman.com/ISBN/9780761871491/Strangers-in-a-Stranger-Land-How-O...
https://www.irishtimes.com/news/historian-claims-hitler-personally-appro...
मी दिलेल्या दुव्यामध्ये ह्याचा प्रतिवाद आहे. सरकारी मंत्री कसे अझॉव आणि युक्रेनियन सैन्याचे कसे संबध आहेत ह्यावर प्रकाश टाकता आहेत.
संदर्भः
https://www.nbcnews.com/think/opinion/ukraine-has-nazi-problem-vladimir-...
------------------------
खरे तर याचा येथे काहीच संबध नाही, पण माझ्या स्वत: अनुभवानुसार LGBTQ ला काही अडचण नाही. त्यांची स्वता:चे क्लब आहेत. फक्त उघड उघडपणे प्रचारकरायला बंदी आहे. बाकी येथे तुम्ही Ad Hominem सुरु केले आहे. :)
17 Mar 2022 - 6:43 pm | कॉमी
युक्रेनमध्ये नाझी आहेत हे कबुलच आहे की, कधी नाकबूल केले ? ते फ्रिन्ज आहेत हेही खरेच.
तुम्ही दिलेला दुवा काय म्हणतो बघा,
शेवटचे (३) मी ठळक केलेले वाक्य तुम्ही मत म्हणून दुर्लक्ष करू शकता. मात्र मुद्दा दोन दुर्लक्षित करू नका. दुसऱ्याच्या देशात घुसायसाठी नाझी शिक्केवाले कपडे घातलेले काही लोक आहेत इतके असून चालत नाही. मुळात नाझींना ज्यूनबरोबर काही प्रॉब्लेम नाही ही अतर्क्य गोष्ट सोडली, तरी स्लाव्हिक वंशाच्या लोकांना मारण्याचे राजसत्तेचा वरदहस्त असलेले प्रयत्न युक्रेनमध्ये मुक्ते झाल्याचे माझया तरी वाचनात नाही. नव्हे, तसे करायचे कुठे बोलणे सुद्धा नाही.
आणि, नुकत्याच झालेल्या कॅनडा ट्रकर्सच्या आंदोलनात सुद्धा काही लोक नाझी झेंडा फडकवत होते. नाझी युक्रेनमध्येच आहेत असे नाहीत. अमेरिकेत सुद्धा काही आहेत. भारतात सुद्धा काही नाझी सिम्पथी वाले लोक असणारच. तर मुद्दा हा- नाझी सर्वव्यापी आहेत. नाझींच्या दुष्कृत्यांना सरकारी वरदहस्त आहे का हे पाहणे महत्वाचे. माझ्या माहितीप्रमाणे युक्रेनमध्ये नाझी दुष्कृत्य असे सध्याच्या काळात काही झालेच नाहीये. त्यामुळे अचानक रशिया नाझींविरुद्ध मोहीम उघडेल हे अतार्किक आहे.
बरं, नाझी असणे हा काही मानवी हक्कांना तुडवण्याचा एकमेव प्रकार नाही. पत्रकार, राजकीय विरोधकांना टपकावणे इत्यादी.
https://en.m.wikipedia.org/wiki/Anti-gay_purges_in_Chechnya
धरपकड, टॉर्चर- ३ जण मेले.
येस- हा झाला कायद्याने दिला जाणारा त्रास. फ्रिन्ज नाही, उघड आणि मेनस्ट्रीम.
नाझींबद्दल सर्वात संवेदनशील असणाऱ्या देशाची एम्बसी काय म्हणते-
“What Russia is doing in Ukraine is slaughtering innocent children, women and men for its own gain.
“It's definitely not ‘fighting Nazism.’ Shame on anyone who's falling for this. (Sadly, we're kinda experts on Nazism),”
रशिया LGBT लोकांशी कशी वागते हा माझा मुद्दा माझ्या आर्ग्युमेंटचा केंद्रबिंदू नाहीये. तो आहे की युक्रेनमधील नाझी फ्रिन्ज आहेत. हा मुद्दा एक पुरवणी माहिती आहे. जर, युक्रेनमध्ये लोकांना नाझींपासून खरेच धोका असता तर रशिया ने स्वतःच्या लोकांबरोबर कसेही वागले असते तरी तो मुद्दा झाला नसता, रशियाने केले ते योग्यच वाटले असते.
मात्र, तसे नाही. युक्रेनमध्ये फ्रिन्ज नाझींकडून नुकतीच कोणतीही जेनोसाईड किंवा हत्याकांड टाईप कृती झाली नाहीये.
17 Mar 2022 - 7:16 pm | Trump
अमान्य. मी आधी दिलेले दुवे पुरेसे आहेत सिध्द करायला. जेव्हा कोणतेही सरकार अझॉव्ह सारख्या संघटनेला सैन्यात येउ देते हा प्रकार खुप मोठा आहे.
तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी गोरा/युरोपियन वंशवाद, अतिकट्टर राष्ट्र्वाद, तात्कालिन स्थानिक राजकारण, आंतरराष्टीय राजकारण, तात्कालिन शत्रु/मित्र आणि दुरगामी शत्रु/ मित्र, तात्कालिन/दुरगामी उद्दीठे ह्यावर अझॉव सारख्या कोणाला कधी आणि किती दिवस बरोबर घ्यायचे आणि कोणाबरोबर लढ्यायचे ते ठरवतात. अगदी नाझी जर्मनीने सोव्हीयत रशियाबरोबर विना आक्रमणाचा करार केला होताच की. जर तुमचा अजुन थोडा अभ्यास असेल तर श्री हिटलर यांची फ्रेंच, ब्रिटीश आणि अमेरीकन लोकांना शेवटच्या दिवसातील युध्दबंदीसाठीची आर्जवे त्यांच्या भाषणातुन आणि सरकारी संभाषणातुन दिसतील.
अजुन थोडी गंमतः
ककक आता आफ्रिकन आणि ज्यु लोकांबरोबर समझोता करते आणि त्यांना बोलावते.
संदर्भः
https://www.tabletmag.com/sections/news/articles/ku-klux-klan-chapter-no...
https://www.jpost.com/diaspora/antisemitism/when-a-jew-became-an-honorar...
झेंडे फडकवणे, आणि शस्त्रास्त्रे हाती घेणे ह्यात बराच फरक आहे. झेंडे फडकवणे, घोषणा देणे हे बरेचदा लक्ष देण्यासाठी वापरले जाते.
हो, त्यासाठीच युध्द्दाची बाकीची कारणे ही दिली आहेत मी माझ्या प्रतिसादामध्ये. https://www.misalpav.com/comment/1136384#comment-1136384
नक्की तुमचा मुद्दा काय आहे? रशिया - युक्रेन युध्द कि मानवी हक्क?
माझ्या माहीतीने कायदेशीर त्रास कोणताही नाही. जर एकाद दुसर्या घनचक्कर घटना हव्या असतील त्या नक्कीच मिळु शकतील.
बाकी चेचन्या हा बहुतांशी मुस्लीमबहुल प्रांत आहेत आणि मुख्य रशियन प्रवाहापेक्षा वेगळा आहे.. तिथे रशियन सरकारने सत्तेमध्ये राहण्यासाठी काही समझोते केले आहेत.
मी ह्यावर (२५ फेब २०२२ नंतरच्या साहित्यावर) प्रतिक्रिया काही देणार नाही. युरोपियन माध्यमांनी युक्रेनच्या बाजुने सगळा प्रचार उघडला आहे. त्याआधीचे काही साहित्य असेल तर लिहा.
17 Mar 2022 - 7:32 pm | कॉमी
बरं.
17 Jun 2022 - 11:40 am | Trump
श्री कॉमी, हे घ्या.
Ukrainian Boxer Holds Nazi Flag While Accepting Medal
17 Mar 2022 - 12:29 pm | प्रदीप
ह्यांना वेड लागायच्या मार्गावर आहे, अशी भाकिते येथे वाचली होती. तर, आता तसे ते लागले किंवा कसे, ह्याविषयी पुढची 'माहिती/अंदाज' यावेत. लई दिवस झाले ते विनोदी भाकित वाचून.
18 Mar 2022 - 12:52 pm | कॉमी
19 Mar 2022 - 3:26 am | Trump
जागतिक परदेशी गंगाजळी साठी सध्या अमेरीकन डॉलर मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तो अमेरीकन प्रभुत्वाला आणि अर्थव्यवस्थेला मुळ आधार देतो. ज्या पध्दतीने अमेरीकन आणि खंडीय युरोपियन देशांनी त्यांच्या चलनामधील परदेशी गंगाजळी वापरायला बंदी केली आहे, त्यामुळे इतर देशांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. ह्या युध्द्दामुळे काही बदल अपेक्षित आहेत.
१. भारत - रशिया व्यापार आता रुपये - रुबल मध्ये होणार.
२. सौदी अरेबिया चीनबरोबर २५ टक्के तेलव्यापार आता चायनीज रेनमिन्बी (Renminbi) मध्ये होणार.
३. श्री निक्सन आणि श्री किसींनजर यांनी पेट्रोडॉलर तयार करुन इतर देशांना जे बटीक बनवले आहे ते काही प्रमाणात कमी होणार.
संदर्भः
https://www.moneycontrol.com/news/business/explained-why-the-rupee-ruble...
https://www.fortuneindia.com/amp/story/macro%2Frussia-ukraine-war-trigge...
https://www.aljazeera.com/economy/2022/3/15/yuan-jumps-after-report-saud...
पेट्रोडॉलर इतिहासः https://www.financialsense.com/contributors/jerry-robinson/the-rise-of-t...
25 Mar 2022 - 10:56 am | Trump
पेट्रोरुबल: रशियाकडुन तेल किंवा वायु जर विकत घ्यायचा असेल तर रशियाला रुबलमध्येच पैसे द्यावे लागतील. ह्यचा परीणाम रशियावर टाकलेल्या बंधनांवर होणार. ते रुबल मिळवण्यासाठी पाशात्य देशांना रशियाबरोबर व्यापार करावाच लागेल.
असे जर झाले तर भारतासाठी चांगले असेल.
संदर्भः
https://qz.com/2146333/russia-wants-the-west-to-pay-for-oil-and-gas-in-r...
https://www.dw.com/en/putin-unfriendly-states-to-pay-for-russian-gas-in-...
20 Jun 2022 - 1:19 am | Trump
पाशात्य माध्यमांचा जरी युध्दज्वर जरी कमी होत असला आणि आधीचा युक्रेन जिंकत असल्याचे भासवणे सोडुन आता सत्य परिस्थिती सांगणे सुरु केले आहे.
तरी इंग्रजी व युरोपियन भाषांमध्ये अजुनही प्रचार चालु आहे.
हे दोन साधने उत्तम माहिती देत आहेत.
https://www.youtube.com/c/AlexanderMercourisReal
------------
https://www.youtube.com/c/TheNewAtlas/videos
3 Jul 2022 - 11:12 pm | चेतन सुभाष गुगळे
युद्ध चालू आहे की संपलं?
23 Aug 2022 - 10:38 pm | धर्मराजमुटके
मलाही हाच प्रश्न पडला आहे. बहुतेक संपल असावं. सुर्यफुलाच्या तेलाचे भाव जवळजवळ युद्धाआधीच्या पातळीवर आले आहेत. किंवा टैमप्लीज चालू असेल.
22 Aug 2022 - 12:49 pm | Trump
रशियन विचारवंत श्री अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी श्री दर्या दुगिना यांची हत्या एका कार बॉम्बस्फोटात केली गेली. ह्या युध्दात प्रथमच मी नागरी (बिनलष्करी) लोकांच्या कुटुंबियावर हल्ला होण्याची अशी बातमी ऐकतो आहे. सगळीकडे येणार्या बातम्यानुसार ह्यात युक्रेन आणि कदाचित अमेरिकेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ह्या चित्रफितीखालील प्रतिक्रियासुध्दा वाचणीय आहेत.
21 Sep 2022 - 11:22 pm | Trump
श्री पुतीन यांनी राखीव (निवृत्त) सैन्य बोलावले आहे. सरकारी आकड्याप्रमाणे पुढील ३ महिन्यात साधारत: तीन लाख नवीन सैनिक युध्दात सामील होतील. तसेच त्यांनी युक्रेनच्या डोंबास आणि डोनेस्क प्रांतामध्ये सार्वमत घेऊन त्यांना रशियामध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यामुळे युध्दपरिक्षेत्र वाढणार आहे.
--
अजुन एकः परदेशी लोक आता फक्त एक वर्ष रशियन सैन्यात सेवा देऊन रशियन नागरीक होण्याची संधी आहे. पुर्वी हीच अट पाच वर्षे सेवेची होती.
22 Sep 2022 - 9:10 am | सनईचौघडा
सध्या २ महिने झाले साहाना ताई गायब झाल्यात.
त्या आल्या की युद्धाची नवीन खात्रीशीर बातमी त्या देतील.
2 Oct 2022 - 2:14 pm | Trump
३०.०९.२०२२ रोजी श्री पुतीन यांनी चार युक्रेनियन प्रांत लुशांक, डोनेस्क, झापोरिझझिआ आणि खेरसॉन ( Luhansk, Donetsk, Zaporizhzhia and Kherson) रशियामध्ये सामिल केले.
जर्मनीला रशियन नैसर्गिक वायुचा पुरवठा करणारी उत्तर नळी - २ (घातपाताने?) निकामी करण्यात आली आहे. https://en.wikipedia.org/wiki/2022_Nord_Stream_gas_leaks
2 Oct 2022 - 3:04 pm | Trump
अमेरीका आणि अल्बेनिया यांनी रशियाच्या युक्रेनियन प्रांतजोडणीला विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात ठराव आणला, त्याला रशियाने नकाराधिकार वापरला. भारत, चीन, ब्राझिल आणि गेबॉन यांनी तटस्थता दाखवली. चीनची तटस्थता समजण्यासारखी आहे. पण भारताने दाखवलेली तटस्थता बुचकळ्यात पाडणारी आहे.
जे रशियाने युक्रेनमध्ये केले ते पाकिस्तान गिल्गिट बाल्टिस्थान आणि व्याप्त काश्मिरमध्ये, चीन आक्साई चीनमध्ये, चीन तैवानमध्ये करु शकतो. त्यामुळे तटस्थ राहुन भारताचा कोणता फायदा होणार आहे?
कृपया तज्ञांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
https://news.un.org/en/story/2022/09/1129102
3 Oct 2022 - 1:08 pm | विवेकपटाईत
अमेरिकेने मीडियाचा वापर करून एक प्यादा युक्रेनच्या गादीवर बसविला. युक्रेन युद्ध अमेरिकेची शस्त्र परीक्षण प्रयोगशाळा आहे. युद्धात युरोप आणि रशियाचे आर्थिक नुकसान होणार. अमेरिकेचा सर्व दृष्टीने फायदा होणार. डॉलर मजबूत होईल. शस्त्र विक्री वाढेल. अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल. महाग तेलाचा फटका भारत सहित सर्व आयातक देशांना बसेल.
युक्रेन ने ही पूर्वी अंतराष्ट्रिय मंचावर भारताचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे भारताला तेलाची गरज आहे. रशिया स्वस्त तेल देऊ शकते. भारत तटस्थ राहून आपली शक्ती दाखवू शकतो. यामुळे चीन बॉर्डर वर शांतता ही राहील. या शिवाय मध्यस्थीसाठी भारताचा वापर होऊ शकतो.
3 Oct 2022 - 1:08 pm | विवेकपटाईत
अमेरिकेने मीडियाचा वापर करून एक प्यादा युक्रेनच्या गादीवर बसविला. युक्रेन युद्ध अमेरिकेची शस्त्र परीक्षण प्रयोगशाळा आहे. युद्धात युरोप आणि रशियाचे आर्थिक नुकसान होणार. अमेरिकेचा सर्व दृष्टीने फायदा होणार. डॉलर मजबूत होईल. शस्त्र विक्री वाढेल. अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल. महाग तेलाचा फटका भारत सहित सर्व आयातक देशांना बसेल.
युक्रेन ने ही पूर्वी अंतराष्ट्रिय मंचावर भारताचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे भारताला तेलाची गरज आहे. रशिया स्वस्त तेल देऊ शकते. भारत तटस्थ राहून आपली शक्ती दाखवू शकतो. यामुळे चीन बॉर्डर वर शांतता ही राहील. या शिवाय मध्यस्थीसाठी भारताचा वापर होऊ शकतो.
4 Oct 2022 - 12:12 am | Trump
रशिया आणि युक्रेन युध्दाचा रोज बदलणारा नकाशा (नोंदः हे संकेतस्थळ युक्रेनधार्जीने आहे.)
https://liveuamap.com/
28 Nov 2022 - 12:00 am | Trump
ह्या नोव्हेंबरमध्ये खरे युध्द सुरु झाले आहे. रशियाने वीजप्रणाली जवळपास नष्ट केली. गोर्यांनी (युरोपियन आणि त्यांच्या वंशवेली) यांनी मानवी हक्काची रडारडी सुरु केली आहे.
त्यांच्या नाटोने १९९९ मध्ये तेच केले होते. त्यामुळे त्यांचा दांभिकपणा उघड होतो आहे.
NATO Warplanes Jolt Yugoslav Power Grid
https://www.washingtonpost.com/wp-srv/inatl/longterm/balkans/stories/bel...
-
गोर्यांना मानवी हक्क आणि लोकशाही यांची काहीही पडलेली नाही. त्यांचा मुळ हेतु त्यांचे जगावरील प्रभुत्व कायम ठेवणे हे आहे.
It’s Costing Peanuts for the US to Defeat Russia
https://cepa.org/article/its-costing-peanuts-for-the-us-to-defeat-russia/
--
रशिया ह्या युध्दात जिंकणे अगोर्यासाठी महत्वाचे आहे.
14 Dec 2022 - 9:13 pm | Trump
अतीशय उत्तम मुलाखत : श्री डग्लस मॅकग्रेगोर.
-
पाश्यात्य माध्यमांचा प्रचार, रशियाची योजना इ. बद्दल चांगली माहिती आहे.
24 Jun 2023 - 6:25 pm | Trump
वॅगणार समुहाचे प्रमुख श्री इव्हेजेनी प्रोगजीन (evgueni prigojine) यांनी रशियामध्ये बंड केल्याचे बातम्यामध्ये आले आहे. आरटी समुहावर ह्यावर अधिकृत बातमी आली आहे. श्री पुतीन यांनी रात्री राष्ट्राला संबोधित करुन एकीचे आवाहन केले. वॅगणार समुहाचे सैनिकांनी ऱोस्टोव - वो - दोन (Rostov-on-Don) ह्या शहरावर कब्जा केला आहे. वॅगणार समुहात साधारणतः ३० हजार सैनिक आहेत. त्यातील बरेच सैनिक शिक्षामाफी दिलेले/द्यायचे आश्वासन कैदी दिलेले आहेत. त्यातील किती सैनिक श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांना निष्ठावंत राहतील त्याबद्दल शंका आहे.
24 Jun 2023 - 10:19 pm | Trump
रशियामध्ये खुपच दणकादणकी चालु आहे. श्री पुतीन त्यांच्या भाषणात खुपच चिडलेले दिसले. हे केलेले बंड श्री पुतीन कसे व किती दिवसात संपवतात त्यावर श्री पुतिन यांचे भवितव्य, करिश्मा, आणि पुढील वाटचाल अवलंबुन आहे. श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा समर्थन मिळताना दिसत नाही.
मला तरी श्री इव्हेजेनी प्रोगजीन यांचे भवितव्य संपल्यात जमा दिसते आहे.
पाश्यात्य जगात आंनदाच्या उकळ्या जोरात फुटत आहे.