स्मार्टफोन घ्यायचाय - सल्ला हवा

उत्खनक's picture
उत्खनक in तंत्रजगत
4 Mar 2022 - 12:48 am

नमस्कार मंडळी,
आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती?

गरजः
- गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल. [आऊटलूक/एक्सेल/स्लॅक/वेबेक्स]
- साऊंड, डिस्प्ले, कॅमेरा आणि ऑपरेटींग परफॉर्मन्स चांगला हवा.
- ब्लॉटवेअर्स शक्यतो कमी
- प्रोसेसर आणि अँड्रॉईड वर्जन: पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-)

बजेट: ३५-४० हजार पर्यंत.

मी स्वतः शोधले तेव्हा सापडलेल्या काही मॉडेल्सचे तपशील चांगले वाटले [5G, 8gb/128gb वेरियंट्स - गूगल/सॅमसंग/मोटोरोला]
अर्थात् अनेक चांगले ऑप्शन्स मी बघीतलेही नसतील. अन् मुळात एवढ्या रेंज मधले फोन कधी वापरलेलेच नसल्याने काही कळतही नाही.
त्यामुळे आपल्या सल्ल्याची नितांत गरज आहे. :-)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2022 - 2:11 am | श्रीरंग_जोशी

पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-)

या गरजेची पूर्तता सध्या आयफोनच करु शकतो. आय ओएसचे अपडेट्स बरेचदा ५ ते ६ वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या आयफोनलाही उपलब्ध असतात. ओएस अपडेट थांबल्यास आजच्या काळात जालाला जोडलेला फोन सुरक्षित राहू शकेल याची शक्यता खूप कमी होते. ८ मार्चला अ‍ॅपलची लॉन्च इवेंट आहे, त्यानंतर गेल्या वर्षीचे आयफोन स्वस्त होतील.

आयफोन नको असेल तर या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे.

आयफोनच्या भानगडीत सध्या पडत नाही. पण अभिप्रायासाठी धन्यवाद श्रीरंग.

दहा हजारच्या खालचा फोन वापरत होता. आता एकदम एवढे वाढवायची गरज का वाटली?
कोणताही फोन परफेक्ट नाही. अगदी आइफोन धरून. प्राधान्य काय आहे?
१५ हजारच्या पुढे किंमतीत वाढ होण्याची कारणे म्हणजे
१) चांगला क्याम्रा ( फोटो विडिओ चांगले येतात पण साठवण्याची क्क्षमता हवी)
२) फास्ट प्रसेसर ( गेमिंगसाठी लागतो)
३) स्क्रीन, प्रकार आणि साइज. ( अमोलेड / एलसीडी ?, ब्राइटनेस ५०० निटस किंवा अधिक.)
-----
काही कंपन्या दोन वर्षांचे अपग्रेड देतात. म्हणजे पुढील तीन वर्षे सेफ. पाचसहा वर्षं फोन खेचण्याची गरज नाही. कारण आताच्या ओएस बऱ्याच संपूर्ण वाटतात. काही छोटेमोठे वरवर बदल करतात.

एक्सेल वगैरे वापरायचे तर स्क्रीन मोठीच हवी. तरीही tab एवढी होऊ शकत नाही.

दहा हजारच्या खालचा फोन वापरत होता. आता एकदम एवढे वाढवायची गरज का वाटली?
कोणताही फोन परफेक्ट नाही. अगदी आइफोन धरून. प्राधान्य काय आहे?
१५ हजारच्या पुढे किंमतीत वाढ होण्याची कारणे म्हणजे
१) चांगला क्याम्रा ( फोटो विडिओ चांगले येतात पण साठवण्याची क्क्षमता हवी)
२) फास्ट प्रसेसर ( गेमिंगसाठी लागतो)
३) स्क्रीन, प्रकार आणि साइज. ( अमोलेड / एलसीडी ?, ब्राइटनेस ५०० निटस किंवा अधिक.)

अगदी बरोबर कंकाका.
मी बरीच शोधाशोध केली जालावर आधी. पण एक लक्षात आलं की या ३-४ गोष्टी चांगल्या [अप्रतीम वगैरे नाही!] म्हणून जरी एकत्र घ्यायच्या तर रेंज साधारण ३० पर्यंत जातेच. त्यामुळे म्हटले घ्यायचेच आहे तर त्यातल्या त्यात चांगल्यात चांगलं पाहावं.

काही कंपन्या दोन वर्षांचे अपग्रेड देतात. म्हणजे पुढील तीन वर्षे सेफ. पाचसहा वर्षं फोन खेचण्याची गरज नाही. कारण आताच्या ओएस बऱ्याच संपूर्ण वाटतात. काही छोटेमोठे वरवर बदल करतात.

एक्सेल वगैरे वापरायचे तर स्क्रीन मोठीच हवी. तरीही tab एवढी होऊ शकत नाही.

५-६ वर्षे म्हणण्याचं कारण इतकंच होतं की अ‍ॅपचं पुढचं वर्जन चालतंच नाही असं होऊ नये बास.. अ‍ॅप चालत नाही म्हणून फोन घ्यायला लागणं मला काही पटत नाही.
कामाचं स्वरूप बघता एक्सेल लागलं तरी मुख्यत्वे बघण्यासाठी आणि शंकानिरसनासाठीच असेल. एडिटींग करण्यासाठी आपला लॅपटॉपच बरा. त्यामुळे ६.५' स्क्रीन ठीक वाटते.

जेम्स वांड's picture

4 Mar 2022 - 8:38 am | जेम्स वांड

आमचं पण डबडं बदलायला आलं आहे, लवकरच नवीन फोन घ्यावयाचा आहे, प्युअर व्हॅनिला चॉईस करायचा तर ऑप्शन कमी आहेत पण त्यातीलच एक पहावा असा मानस आहे.

होय ना.. त्याच कारणानं एवढे दिवस थांबलोय की डोक्याला शॉट लागू नये नंतर म्हणून. :-)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Mar 2022 - 8:55 am | रावसाहेब चिंगभूतकर

माझ्या मते मोटोरोला किंवा नोकिया. अर्थात फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन वर न जाता या कंपन्यांच्या वेबसाईट वर जाऊन सर्वात आधुनिक मॉडेल चेक करावे कारण फ्लिपकार्ट ऍमेझॉन वर जुने मॉडेल्स विकणाऱ्यांची भरमार असते. कदाचित तुम्हाला 10 हजार च्या आतच चांगला मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. कमीत कमी 4 जीबी आणि अधिकतम 8 जीबी (स्टॅंडर्ड: 6 जीबी) रॅम, 128 gb स्टोरेज, HD screen, डिसेंट कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि vanilla android असलेला मोबाईल निवडावा. बाकी प्रोसेसर वगैरे फारसे महत्वाचे नाहीत.

ओह ओके. रविवारी जंगली महाराज रोडला एक चक्कर टाकणारच आहे, तेव्हा जाऊन येईन एक-दोन ठिकाणी. बघुयात.
१० च्या आत मिळाला तर कोणाला नकोय.. पण बहुदा हवा तसा नाही मिळणार त्या रेंज मधे.

सॅमसंगचा अत्यंत वाईट अनुभव आला आहे. सॅमसंग M30 होता, वर्षभरातच मदरबोर्ड फेल झाले.

सॅमसंग फोन घेतला तर एक्सिनॉस प्रोसेसर असलेला घेऊ नका, स्नॅपड्रॅगन असलेलाच घ्या.

उत्खनक's picture

4 Mar 2022 - 2:16 pm | उत्खनक

ओक्के. होय, हे माझ्या एका मित्रानेही मला सांगीतलेय.
सॅमसंगचा a72 5G कसा वाटतोय?

कंजूस's picture

4 Mar 2022 - 9:16 am | कंजूस

फार डब्बा नाही,
प्युअर android
Moto g 40 fusion .मोटोरोला Siteवर आहे. पण स्टोरमध्ये नाही. Flipcartवर आहे.
प्रसेसर फार जुना नाही फार स्लो नाही.
-----------------
Red mi note11max prime हा प्युअर android नसलेला, चांगला camera वाला फोन आहे. झैराती येणार, bloatwere आहेत.

उत्खनक's picture

4 Mar 2022 - 2:21 pm | उत्खनक

धन्यवाद कंकाका. मी एज 20 5G/8gb/128gb fusion बघीतला होता. हा नव्हता लक्षात आला. बघतो.

red mi चे दोन फोन झाले घेऊन. आता तो नको वाटतोय. म्हणून नाही बघीतले.

कंजूस's picture

4 Mar 2022 - 9:19 am | कंजूस

आता मिळाला तर पाहा.
एकदा स्टॉक संपला की मोटो पुन्हा मॉडेल बाजारात आणत नाहीत म्हणतात.

निनाद's picture

4 Mar 2022 - 9:42 am | निनाद

आजकाल फोटो मोबाईलवर(च) काढले जातात. तेव्हा ती गरज असल्यास कॅमेरा चांगला असलेला फोन घ्या. त्यासाठी जाऊन फोटो काढून पहाणे आवश्यक आहे.
त्यांच्या साईटवरचे फोटो कामाचे नसतात - ते जाहिरात म्हणून असतात!

उत्खनक's picture

4 Mar 2022 - 2:24 pm | उत्खनक

ओक्के, बघतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2022 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोनमधे एकाच वेळी फार पैसे गुंतवू नये, असे माझे व्यक्तीगत मत आहे. पंधरा वीस हजारातला फोन घ्यावा. कारण वर्षभरात आपल्याला दुसरे फोन डोळे मारायला लागतात. आणि मग आपला फोन फुटावा वगैरे वाटायला लागते. अर्थात पसंद अपनी अपनी. माझ्या सध्याच्या फोनमधे १२८ इंटरनल जीबी स्पेस आहे. नवीन फोन स्क्रीन ऑन टाइम सहा ते सात देत होता. त्यात मेमरी कार्डचाही स्लॉट आहे. दोन सीम आहेत. फोटो चांगले येतात. साउंड कॉलीटी मस्त आहे. रुटीने युजरसाठी बेष्ट. बॉट काढायच्या वेगवेगळ्या स्क्रीप्ट जालावर उपलब्ध आहेत, त्यामुळे अनावश्यक अ‍ॅप्लीकेशन काढून टाकता येतात.

मी नोट रेडमी १० प्रो मॅक्स घेतलाय. आम्ही फोनला रुट करणारी मंडळी आहोत. महिण्याभराच्या अंतराने फोन रुट केला. आता त्यात पिक्सेलयुआय टाकलेली आहे. सी ड्रॉइड, वगैरे भरपूर रोम आहेत. आता वायफाय नेट असल्यास सॉट १० प्लस मिळतो. नसल्यास ९ तरी. त्यामुळे एकदा फोन चार्ज केला की पुन्हा संध्याकाळी चार्जींगला टोचायची गरज नसते. तर दोन दिवस तरी ब्याट्री पूरते. ( हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे, अटी लागू ) माझा वापर फोनचा अनुक्रमे वापर असा. वाट्सॅप, टेलीग्राम, ब्राऊजर सर्चींग, अधून मधून सिनेमे बिनेमे. इतकंच.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

4 Mar 2022 - 11:23 am | कंजूस

पण रूट करणे न जमल्यास काय त्रास असतो?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2022 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्रास असा काहीच नाही. पण नको असलेले अ‍ॅप्लीकेशन्स, नेट सुरु असलं की येणा-या जाहिराती. अ‍ॅप्लीकेशन्स जी उपयोगाची नाहीत तरी येणारे अपडेट्स. ब्राऊजरवर तुम्ही शोधा किंवा नका शोधू येणारी उघडी-नागडी चित्र. ही तर डोकेदुखी झालीय. ब्राऊजरवर अनेक खिडक्या ओपन होणे. आपल्या फोन मधे व्हायरस आहे, स्कॅन करुन घ्या अशा सुचना देणारे असंख्य पॉपप विंडो आणि ब्याट्री मग ड्रेन होते, वरच्यावर वर चार्जींगला फोन लावावा लागतो.

फोन रुट करणे हा सर्व हौशी मौजीचा आणि आनंदाचा मामला.

-दिलीप बिरुटे

आता फोन रूट करणे म्हणजे काय असे विचारले तर "ये PSPO नही जानता" असे होईल, पण नक्की काय असते ते जरा सांगा प्लीज!

गावठी फिलॉसॉफर's picture

8 Mar 2022 - 8:21 pm | गावठी फिलॉसॉफर

प्रो डॉ तुमच्या वापरण्यात आलेली कोणती रोम चांगली आहे.

कासव's picture

28 Mar 2022 - 12:41 am | कासव

रूट करण्याचे तोटे अधिक आहेत

- security update मिळणे बंद
- वॉरंटी संपते
- हार्डवेअर प्रॉब्लेम होऊ शकतो. जसे हेडफोन न चालणे. ब्लूटूथ कनेक्ट न होणे.

Technical knowledge नसेल तर ह्या फंदात न पडलेले बरे.

सुबोध खरे's picture

4 Mar 2022 - 11:57 am | सुबोध खरे

वन प्लस चा फोन घ्या. उत्तम असतो. माझा आणि पत्नी चा वन प्लस ५ T आहे दोन्ही ला ४ वर्षे पेक्षा जास्त झाली आहेत. २८ हजारच्या आसपास घेतला होता. ( आता वन प्लस १० येऊ घातला आहे) कॅमेऱ्याचा दर्जा उच्च आहे.

अजिबात कोणताही त्रास नाही. एक दमडीचा खर्च नाही. चालतो आहे तोवर चालवणार. साडे तीन वर्षे त्यांनी सॉफ्टवेअर अपडेट दिला २०२१ पासून अप डेट बंद आहे. पण त्याचा आजतागायत कोणताही त्रास नाही.

तेंव्हा ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी हार्ड डिस्क होती. आजही रॅम कमी पडत नाही परंतु हार्ड डिस्क कमी पडू लागते. कारण आलेले अनेक संदेश आणि आपण काढलेले फोटो संगणकावर टाकून जागा खाली करावे असे वाटत नाही.

परंतु अगदी ९९ % हार्ड डिस्क भरली तरी फोन स्लो होत नाही किंवा ऍप स्लो होत नाही.

ऑक्सिजन ओ एस जवळ जवळ स्टॉक अँड्रॉइड असल्यामुळे फालतू ऍप नाहीत. डिस्प्ले सुद्धा सुंदर आहे.

फोन रूट करणे इ गोष्टी मी करत नाही.( त्या मला झेपणार नाहीत) आहे त्या स्थितीत उत्तम रित्या चालवतो

हे भारीये. ओळखीच्या कोणाकडे वन प्लस चा फोन नसल्याने आधी समजले नाहीत रीव्यू. आता बघतो.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

4 Mar 2022 - 2:58 pm | हणमंतअण्णा शंकर...

वन प्लस. तुमच्या रेंज मध्ये आहे आणि ४ ते ५ वर्षे अगदी विनातक्रार आरामात टिकतो. कार्यक्षमसुद्धा राहतो. पत्नीचा मोबाइल गेले ५ वर्षे वन-प्लस आहे. आजही तितकाच सुस्थितीत आहे. त्यांचे सर्वात अलीकडचे मॉडेल घ्या.

कासव's picture

28 Mar 2022 - 12:43 am | कासव

One plus मध्ये आधी व्हॅनिला os यायची. आता ते विवो ची ऑक्सिजन os वापरतात. जाहिरातींचा पाऊस आणि security ला ....

कंजूस's picture

4 Mar 2022 - 1:30 pm | कंजूस

आणि आताचे यात झोल आहे. त्याच्या भागिदाराने भांडण करून बाहेर पडला. सावधान.

कंजूस's picture

4 Mar 2022 - 1:33 pm | कंजूस

आणि आताचे यात झोल आहे. त्याच्या भागिदाराने भांडण करून बाहेर पडला. सावधान.

आता झैरातींचे उत्पन्न मिळवण्यासाठी रेडमी, साससंग पुढे आहेत.

उत्खनक's picture

4 Mar 2022 - 2:28 pm | उत्खनक

हैला.. हेही लक्षात घ्यावे लागणार! :-)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

4 Mar 2022 - 2:37 pm | रावसाहेब चिंगभूतकर

5G भारतात येण्याला (आणि खिशाला परवडायला) वेळ लागणार. 5G वर जास्त पैसेन घालता 4G च बरा.

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा

बजेट: ३५-४० हजार पर्यंत.

गरजांच्या मानाने भरपुर बजेट दिसतंय

माझ्या मित्राने कालच वन प्लस नॉर्ड २, ५ जी (OnePlus Nord 2 5G : 8 GB RAM, 128GB Storage)) घेतला आहे.
किंमत, ३० ह. रू अदलाबदलीचे रू १० ह वजा करुन त्याला २० ह. रु पडला. असे काही डील घेतल्यास फायदा होईल. उरलेल्या वरच्या पैशात आम्हाला पार्टी देऊन टाका.

हा हा हा.. नाही, माझा सध्याचा फोन २ हजाराच्या वर जाणार नाही. पण हे मॉडेल चांगलंय.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Mar 2022 - 8:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

कॅमेरा न मोबाईल स्पीड मस्त!

उत्खनक's picture

5 Mar 2022 - 10:09 pm | उत्खनक

OnePlus Nord 2 5G : 8 GB RAM, 128GB Storage घेतला आहे. सगळं धरून २७ हजाराला पडला. उद्यापर्यंत येईल.

OnePlus 9r 5G : 8 GB RAM, 128GB Storage पण आवडला होता. पण नॉर्डच घेतला शेवटी.
तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याचा खूप उपयोग झाला. मनःपूर्वक धन्यवाद!

मुक्त विहारि's picture

6 Mar 2022 - 6:55 pm | मुक्त विहारि

आणि फोन आवडला का? ते पण सांगा

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2022 - 5:56 pm | चौथा कोनाडा

व्वा, उत्खनक खुप भारी.
हार्दिक अभिनंदन !!!
रिव्ह्यू येऊ द्या.
फोटो टाका.
एखादा वेगळा फोटो धागा येऊ द्या.

कंजूस's picture

6 Mar 2022 - 2:31 pm | कंजूस

Geekyranjit ने दोनतीन विडिओज टाकले आहेत.
उदाहरणार्थ
१) https://youtu.be/oTVj0sz3Q0M
२)https://youtu.be/PWQp_-55VPU
वनप्लस'चे खास वैशिष्ट्य oxygen os होते ते आता नाही.
आणि डेटा पळवणे ही परमिशन घेतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Mar 2022 - 8:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

ऑक्सिजन ओएसच दिसतेय नॉर्ड मध्ये. (आत काय आहे माहिती नई, ओएसच नाव तर तेच येतंय फोनमध्ये!)

कंजूस's picture

21 Mar 2022 - 6:43 am | कंजूस

Geekyranjit ने तीन विडिओ टाकलेत. सहा महिन्यांपूर्वी. One plus Nord वर त्यातला
https://youtu.be/PWQp_-55VPU
हा पाहा.

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2022 - 8:06 pm | धर्मराजमुटके

बरं झालं लवकर फोन घेऊन तो घेतला असे इथे जाहिर केल्याबद्द्ल ! बरेचदा लोकं मदत पाहिजे म्हणून धागे काढतात पण पुढे इथे दिलेले सल्ले अमलात आणतात की फाट्यावर मारतात ते काही समजत नाही.

खेडूत's picture

6 Mar 2022 - 9:43 pm | खेडूत

हा धागा पाहिला नव्हता.
जास्त चौकशी न करता पंधरा हजाराचे बजेट मनात पकडून दुकानात गेलो.
ऑनलाईन हजारेक रुपयांनी कमी होते, पण सहा दिवस उशीराने येत होता आणी मला लवकर हवा होता. त्यमुळे 'विवो २१ट' हा चौदा हजारात घेऊन मोकळा झालो.
यात ५जी सिमचे पर्याय होते पण चार हजार जास्त किंमत आणि ५जी आपल्याकडे कधी येईल माहीत नाही म्हणून टाळले. आधीचा मोटो अद्याप छान सुरु आहे साडेचार वर्षे झाली तरी. हाही दोन् तीन वर्षे चालला तरी ठीक असा विचार आहे. यावर मेड इन इंडिया लिहीलं होतं पण मूळ चिनीच असावा.

यात एक वेगळी गोष्ट दिसली म्हणजे रॅम एक जीबी रॉम कडून उसनी घेण्याचा किंवा न घेण्याचा पर्याय आणि एक टीबी मेमरी कार्डाला सिम ट्रे मधेच जागा आहे.

तर्कवादी's picture

6 Mar 2022 - 11:57 pm | तर्कवादी

मित्रांनो ,
आपल्यापैकी कुणी सध्या Nokia वापरत आहे का ? किंवा आपल्या आसपास कुणाकडे आहे का ? असल्यास अभिप्राय देता येईल का ?
मी याआधी मायक्रोमॅक्स आणि सॅमसंगचे प्रत्येकी दोन फोन वापरलेत .. म्हणजे सॅमसंगचा दुसरा सध्या वापरत आहे दोन वर्षांपासून .. ३ जीबी रॅम आहे.. फोने अजूनही ठीक चालतो पण आता बॅटरी लवकर डिस्चार्ज होते, महिन्याभरापुर्वी नवीन बॅटरी (ओरिजिनल, सर्विस सेंटर मधूनच घेतली) पण तरीही समस्या कायम आहे. घरुनच काम असल्यामुळे पुन्हा पुन्हा चार्जिंग करतो. पण येत्या काही महिन्यात बदलावा लागेल असे दिसते. चायनीज मोबाईलबद्दल फारसा विचार नाही केला. खास करुन चायनीज कंपन्या त्यांनी बनवलेल्या मोबाईल फोन्सच्या माध्यमातुन डेटा चोरतात किंवा काय अशी भिती वाटते

कंजूस's picture

7 Mar 2022 - 5:51 am | कंजूस

Nokia कसा आहे ?
@ तर्कवादी

१) नोकिया जुनी आताची आणि नवी ( Hmd Global ने लायसनवर नाव आणि तंत्रज्ञान घेतलेली) यात फरक आहे. फरक असा की लायसन फी द्यावी लागल्याने हँडसेटस महाग पडतात. किंवा असे म्हणू की value fir money नाही.
२) दुसरी गोष्ट म्हणजे authorised repair shops आता तुरळक उरली आहेत.
३) stock Android , दोन वर्षे अपडेटस असतील. बाकी क्वालटी उत्तम असते,टिकाऊ. पण वरचे दोन मुद्दे विचारात घ्या.
४) डेटा चोरणे - आता त्यास चोरणे म्हणता येणार नाही कारण तुम्ही अगोदरच पर्मिशन देता. वरच्या विडिओत पाहा. शिवाय फेसबुक,माईक्रोसॉफँटही घेते. पण stock android चांगली.

जेम्स वांड's picture

7 Mar 2022 - 9:22 am | जेम्स वांड

नोकिया घ्यावा की न घ्यावा !? एकतर तुमचे म्हणणे काय ते कळेना इथं, त्यात जुना नोकिया ५ आणि ७ प्लस वापरून अनुभव तरी उत्तम आहेत मला. तूर्तास नोकिया मध्ये उत्तम मॉडेल्स नाहीत हे मानले तरी तुम्ही नेमके काय सुचवताय ते कळेना मला.

धर्मराजमुटके's picture

7 Mar 2022 - 9:53 am | धर्मराजमुटके

मी नोकिया ५ हा ४ वर्षे वापरला. २ जीबी / १६ जीबी. मात्र ४ वर्षांनंतर बॅटरी कमकुवत झाली आणि साठवणूक क्षमता कमी पडायला लागली. त्यामुळे नंतर नोकिया २.४ (३ जीबी / ३२ जीबी) घेतला. अजून एक नोकिया ३३१० देखील वापरतो.
बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मोबाईल शी तुलना केल्यास हार्डवेअर स्पेसिफिकेशन मधे नोकिया मार खातो. अजूनही बर्‍याचश्या मोबाईल मधे HD+ (720 X 1600) पेक्षा जास्त स्क्रीन रेजोल्युशन मिळत नाही. अपडेटस नियमित मिळतात. कोणतेही फालतू चे अ‍ॅप नाहित ही नोकिया ची खासीयत आहे. फोन मजबूत आहे. कॅमेरा उच्च दर्जाचा नाही पण रोजची कामे करण्यासाठी ठिक आहे. बॅटरी बॅकअप देखील ठिक आहे.
मोबाईल वर कोणत्याही प्रकारचे गेम वापरत नाही, उठसुठ फोटो काढायचा छंद नाही. सिनेमे पाहत नाही, गाणी ऐकत नाही. युट्युब क्वचित कधीतरी वापरतो.
मुख्य वापर मेल चेक करणे, दोन व्हॉटसअप अकाऊंट वापरणे, बँकीग चे चार अ‍ॅप वापरणे आणि फोन करणे असा मर्यादित आहे. स्टॉक अँड्राईड आणि नोकियावरील प्रेम हेच माझे नोकिया वापरण्यामागे मुख्य कारण आहे.
१५ हजारपेक्षा जास्त किंमतीचा मोबाईल घ्यायचा नाही असे ठरवूनच ठेवले आहे.
शिवाय खरेदीच्या बाबतीत मला एक मानसिक आजार आहे. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी मी अनेक दिवस नियोजन करतो मात्र ती वस्तू खरेदी करुन दुकानाची पायरी उतरलो की आपण पैसे व्यर्थ खर्च केले अशी भावना सतत दोन चार दिवस जाणवत राहते.

एकंदरीत सांगायचा मुद्दा हा की मर्यादित वापरासाठी नोकिया फोन उत्तम आहेत.

तर्कवादी's picture

7 Mar 2022 - 3:41 pm | तर्कवादी

धन्यवाद धर्मराजमुटके जी

मी नोकिया ५ हा ४ वर्षे वापरला

चार वर्षे म्हणजे भारीच की...

कंजूस's picture

7 Mar 2022 - 1:30 pm | कंजूस

नोकिया मागे पडली आहे. खप जेमतेम एक टक्का आहे म्हणतात. त्यामुळे सर्विस सेंटररसवालेही (फ्रांचाइजी असतात ना )दुसऱ्या ब्रांडची कामे घेतील.

तर्कवादी's picture

7 Mar 2022 - 2:27 pm | तर्कवादी

धन्यवाद कंजूसजी ,

value fir money:
नोकियाचे फोन्स थोडे महाग आहेत असं मलाही वाटलं पण सॅमसंगशी तुलना करता तितकीशी महाग वाटत नाहीत. शिवाय सॅमसगचे काही फोन्स (जसे M12) हे फक्त ऑनलाईन मिळतात. हे मॉडेल्स क्रोमा, विजय सेल्स , रिलायन्स डिजीटल ई कोणत्याही मोठ्या दुकानात आणि सॅमसंगच्या गॅलरीत देखील नसतात. ते तुलनेने बरेच स्वस्त असले तरी फक्त ऑनलाईन मिळणार्‍या या मॉडेल्सची गुणवत्ता डावी असते असे मला वाटते. म्हणून ऑनलाईन सोबतच मोठ्या दुकानातही वा कंपनीच्या स्वतःच्या गॅलरीत मिळणारेच मॉडेल शक्यतो घ्यावे असे मला वाटते (मग भले ते - स्वस्त असल्यास ऑनलाईन घेईन). नोकियाचे मॉडेल्स क्रोमामध्ये मिळतात. याच मुद्द्यावर मी आता मायक्रोमॅक्सचा पर्याय कमी केलाय.

बाकी क्वालटी उत्तम असते,टिकाऊ.

दहा ते पंधरा हजारांचा फोन तीन वर्षे व्यवस्थित चालत असल्यास सर्विस सेंटर्सची संख्या कमी असली तरी हरकत नाही.

डेटा चोरणे - आता त्यास चोरणे म्हणता येणार नाही कारण तुम्ही अगोदरच पर्मिशन देता

मी आधीच्या प्रतिसादात चुकीचा शब्दप्रयोग वापरला. मला डेटा (म्हणजे मी कुठे जातो, कशाचा शोध घेतो ई) गोळा केल्यास त्याबद्दल फारशी तक्रार/समस्या नाही पण ईमेल वा इतर पासवर्ड, क्रेडिट कार्डचे पासवर्ड ई चोरले जाणे व त्यामुळे इमेल हॅक होणे हा धोका मोठा वाटतो.

अनुस्वार's picture

19 Mar 2022 - 7:47 pm | अनुस्वार

माझा नोकिया ६.१ (३जीबी रॅम, ३२जीबी) जो ₹१४५०० ला पडला होता आज चार वर्षे झाली तरी (वापर भरपूर असूनसुद्धा) अगदी उत्तम चालू आहे. . गंमत म्हणजे त्यानंतर साधारण एका वर्षाने मी आणखी एक ६.१ नोकियाच्या संकेतस्थळावरून केवळ ₹७००० मध्ये घेतला (कारण तोवर ६.१+ आला होता). तोही कार्यरत आहे.

मिडियाटेक G35 प्रसेसरवाला १५ हजार रु.
क्वालकॉम sd 480 प्रसेसरवाला १८ हजार रु.

सामान्यनागरिक's picture

7 Mar 2022 - 2:37 pm | सामान्यनागरिक

दोनच दिवसांपूर्वी मी ओपो रेनो-७ ५ जी घेतला. २५६ जीबी चे स्तोरेज आहे. पण ते वाढवता येणार नाही.
बाकी सगळ्या सोयी आहेत. स्टोरेज पूरेसे वाटते. ६४ एम्पी चा क्यामेरा पण आहे. सम्ओरचा क्यामेरा १६ एम्पीचा आहे.
किम्मत २८९९०/-
हेच फीचर्स असलेला स्याम्संग एस-२१ ३५-४० हजारांपर्यंत आहे. दिसायला छान, सुंदर मुली सारखा ओपो रेनो आपल्या शेजारचा मुली सारखा आहे. पुढील ३-५ वर्षे सुखाने संसार करेल.

लावा, रेड्मी , शाओमी ई . १०-१८ हजारापर्यंत मिळतील.