ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

मदनबाण's picture
मदनबाण in राजकारण
11 Feb 2022 - 7:33 pm

सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत.

मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

प्रतिक्रिया

कॉमी's picture

21 Feb 2022 - 10:10 am | कॉमी

जे २०१७ ला करता आले नाही ते पोलीस दल, सरकारी यंत्रणा योगी (भाजपाचे टफ गाय अशी प्रतिमा असलेले) यांच्या हातात असताना कसं करणार ?

कपिलमुनी's picture

21 Feb 2022 - 4:06 pm | कपिलमुनी

एवढी गुंडगिरी ? सरकार काय झोपा काढत का ?
काही हजार लोकांना आदल्या रात्री शाई लावणे कसे शक्य आहे ?

१. योगी ला कोण मतदान करणार हे आधीच माहिती हवे.
२. तिथे जाऊन मतदानाची शाई उपलब्ध करून त्या बोटावर लावायला हवी.
३. 10,000 असे मतदार शोधायला किती गुंड लागतील? एका तासात किती मतदारांना शाई लावून होईल ?

लॉजिक आणि भक्त यांचा दूरवर संबंध नसतो

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 4:25 pm | मुक्त विहारि

प्रार्थनास्थळे पण तोडू शकतात आणि मुर्ती पण फोडू शकतात ...

आपण कदाचित, बिहार मध्ये, निवडणूकीच्या काळांत गेला नसाल.

मुके, बहिरे आणि आंधळे, होता येत असेल, तर जरूर जा ...

तीन बंदर आठवतील ...