ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

मदनबाण's picture
मदनबाण in राजकारण
11 Feb 2022 - 7:33 pm

सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत.

मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

16 Feb 2022 - 5:23 pm | प्रसाद_१९८२

नारायण राणेंनी,
पत्रकार परिषद घेऊन पार इज्जत काढलेय संपादकाची. :))

राण्या सारख्या प्राण्या कडे किति लक्ष द्यायचे ?

कपिलमुनी's picture

16 Feb 2022 - 8:41 pm | कपिलमुनी
मदनबाण's picture

16 Feb 2022 - 9:04 pm | मदनबाण

मुनी, सोमैया म्हणत आहेत... बंगले होते तर टॅक्स भरला... विकत घेतले... अ‍ॅग्रीमेंट केल. , टॅक्स भरला तर बंगले असायलाच हवे, बंगले नसतील तर त्या बंगल्यांचा टॅक्स का भरला ?

जाता जाता :- बप्पी दा...गेले. :( एक एक करुन सगळे जात आहेत. एका पिढीचा अस्त होताना आपण पाहत आहोत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco Dancer

मदनबाण's picture

16 Feb 2022 - 10:25 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco Dancer

कपिलमुनी's picture

16 Feb 2022 - 11:51 pm | कपिलमुनी

बातमी मध्ये सविस्तर खुलासा आहे. ऑन पेपर घराची नोंद होती म्हणून घरपट्टी भरली , नोंद अपडेट झाल्यावर भरली नाही.
इतके सिम्पल आहे.

sunil kachure's picture

16 Feb 2022 - 8:49 pm | sunil kachure

राणे ह्यांच्या जिवावर bjp महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे स्वप्न बघत आहे.
त्यांची पत्रकार परिषद दोन मिनिट तरी कोणी बघितली असेल का.
महाराष्ट्र मध्ये तरी bjp नी चांगली लोक शोधून त्यांच्या हातात पक्षाची सूत्र द्यावीत.

सुखीमाणूस's picture

16 Feb 2022 - 8:50 pm | सुखीमाणूस
सुखीमाणूस's picture

16 Feb 2022 - 8:53 pm | सुखीमाणूस
मदनबाण's picture

16 Feb 2022 - 10:03 pm | मदनबाण

रशिया- युक्रेन क्रायसिस, युरोप आणि सातत्याने काड्या सारणारी अमेरिका.
गेले काही दिवस आपण पाहत आहोत की रशिया आणि युक्रेन युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत अश्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. अमेरिकेच्या बाजुने रोज काही ना काही बातमी पसरवली जात आहे, चीन चे विंटर ऑलिंपिक झाल्या शिवाय रशिया हल्ला करणार नाही, अमुक एक तारखेला रशिया हल्ला करणार, रशियाने हल्ला केला अशी बातमी आणि अनेक...
माझ्या आकलना नुसार जर युद्ध झाले तर या सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचे होणार असेल तर ते युरोपचे होणार आहे आणि अमेरिकेला तेच हवे आहे. युद्ध झाले तर Nord Stream 2 पाईप लाईनचा करार होणार नाही, रशियावर निर्बंध लाधले जातील, युद्धाची झळ युरोपला देखील बसेल ती विशेषतः इंधनाच्या आणि गॅस च्या किंमती वाढल्याने आणि या बाबतीत रशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबुन असल्याने त्यांचे संबंध चिघळतील व याचा फयदा अमेरिकेला उचलायचा आहे, ते युरोपला शेल गॅस विकण्यास अधीर आहेत. म्हणजे रशियाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी, युरोपियन समुदायाचे रशियावरील इंधनाचे / गॅस / एलएनजी अवलंबित्व कमी किंवा बंद करुन स्वतःच्या शेल कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी हे युद्ध होणे अमेरिकेसाठी महत्वाचे असेल. या खेळातले मेजर प्लेअर हे रशिया, अमेरिका आणि कतार आहेत.
हल्लीच कतारच्या आमीरला बायडन भेट देऊन आले आहेत.कतार मध्ये अमेरिकेचे सेंट्रल कमांड आहे आणि फार मोठा एअर बेस आहे.कतार हा महत्वाचा नॉन नेटो सहयोगी असल्याचे अमेरिका आता सांगते. युद्ध झाले आणि रशियाकडुन युरोपचा गॅस / तेल यांचा पुरवठा झाला तो कतार ने सुरळीत ठेवावा. कतार बोइंग विमान खरेदीचा करार देखील झाला, म्हणजे अमेरिकन कंपनीला फायदा.
तेव्हा युद्ध झाले तर युरोप हा गर्तेत जाईल आणि अमेरिका स्वतःच्या शेल कंपन्यांचा आधार घेऊन स्वतःला गर्तेत जाण्या पासुन रोखु शकेल असे एकंदर गणित आत्ता तरी समोर दिसते.

इयर ऑफ टायगर हे सध्याचे चीन चे नविन सुरु झालेले वर्ष आहे. चीन मध्ये प्रचंड अस्वस्थता आत्ताच्या घडीला आहे, शी जिनपिंगला तिथल्या काही गोटातुन विरोध उत्पन्न झाल्याचे समजण्यात येत असुन तिथले रिअल इस्टेट मार्केट वेगाने कोसळत आहे [ बिल्ड बिल्ड बिल्ड मॉडलचा शेवट ] आणि त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि चीनी लोकांच्या जीवनमानावर होत आहे. यातुन लक्ष वळवण्यासाठी चीन मुख्यत्वे २ गोष्टी करु शकतो. जर रशिया आणि युक्रेन क्रायसिस चिघळला तर जगाचे लक्ष युरोप मध्ये असेल त्याचा फायदा घेऊन चीन आपल्या बॉर्डवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल्,इयर ऑफ टायगर... वाघ रात्री शिकार करण्यात माहिर असतो... तेव्हा चीन रात्रीची वेळ निवडेल. युरोप आणि हिंदुस्थानातील परिस्थीतुन तो तैवान ताब्यात घेण्याचा वेगळा प्रयत्न देखील तो करुन पाहु शकतो.
संदर्भ :- IMF warns China's property stress poses spillover risk
China’s Technocrat Builders Create Equivalent Of 27 Empty New York Cities
Vanke says the ‘golden age’ of China’s property is over as bellwether developer girds for hard times

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco Dancer

सुखीमाणूस's picture

17 Feb 2022 - 12:58 am | सुखीमाणूस

स्त्रियांनी अंगभर कपडे घालावे असे एखाद्या हिंदू नेत्याने म्हणायचा अवकाश....
सगळे पुरोगामी तुटून पडतात...
आता बोलती बंद.....

https://www.siasat.com/wearing-hijab-will-protect-muslim-women-from-gett...

सुखीमाणूस's picture

17 Feb 2022 - 1:19 am | सुखीमाणूस

फुकट मिळतय म्हणुन तेच तेच प्रतिसाद टाकणारी काही लोक त्रासदायक आहेत.
इथे नक्कीच खुप चान्गले आणी विविध पैलुन्वर विचार करायला लावणारे लेख आणि मत वाचायला मिळतात.
मिपा व्यव्स्थापक हे सन्स्थळ चालवण्यासाठी अर्थिक भार उचलत असणार आहेत.
माझी अशी विनन्ती आहे की लिहायची इच्छा असणार्या सभासदान्कडुन एकरकमी ठेव घ्यवी जी सभासद्त्व रद्द केले की परत करता येइल.
म्हणजे जो लेखनाचा कचरा टाकला जातो तो थाम्बेल.
लिहायला पैसे वाचायला फुकट असा मार्ग असावा...
यातल्या तान्त्रिक अडचणी माहीत नाहीत.सुचल म्हणुन टन्कल....

https://www.loksatta.com/maharashtra/muskan-khan-name-in-urdu-house-reso...

कर्नाटकात हिजाब परिधान करण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटास मुस्कान खान या विद्यार्थिनीनेही सडेतोड उत्तर दिले होते. मुस्कानची ही कृती धैर्य दाखवणारी असल्याने येथील एका घरास तिचे नाव देण्याची इच्छा महापौर ताहेरा शेख यांनी जाहीर केली होती. त्यानुसार सभेत सत्ताधारी गटाने आणलेला नामकरणाचा ठराव बहुमताने मंजूर झाला. या ठरावास भाजपने तीव्र विरोध केला तर शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले. जनता दलाच्या शान-ए-हिंदू यांनी घरास शहरातील अन्य नामांकित व्यक्तींचे नाव देण्याचा आग्रह धरत या ठरावास विरोध दर्शविला. जनता दलाचा समावेश असलेल्या महागठबंधन आघाडीची मात्र या ठरावास मूकसंमती असल्याचे चित्र दिसले.

निनाद's picture

18 Feb 2022 - 9:08 am | निनाद

भयंकर आहे हे असे कारस्थान!
चुकीचे पायंडे पाडले जात आहेत.
हे नाव राज्य सरकारने बदलले पाहिजे आणि तेथे मराठी भवन असे नाव दिले पाहिजे!

Trump's picture

18 Feb 2022 - 2:41 pm | Trump

घरभेदी

शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले.

मुक्त विहारि's picture

18 Feb 2022 - 8:13 pm | मुक्त विहारि

हिंदू एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिति आहे ...

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:15 am | निनाद

असे म्हणायचे नाही. हिंदु एकत्र येऊ शकतात आणि येतात ही वस्तुस्थिती आहे. हिंदु संघटीत होतात हे घडलेले आपण इतिहासापासून पाहतो आहोत. अन्यथा हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते!

प्रसाद_१९८२'s picture

18 Feb 2022 - 4:13 pm | प्रसाद_१९८२

2008 Serial Blast Case :
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात 49 आरोपींना दोषी ठरवलं असून त्यापैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
--

एकाच वेळी इतक्या लोकांना एकत्र फाशी द्यायचा निर्णय, भारतातील एकमेच असावा.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Feb 2022 - 8:10 pm | चंद्रसूर्यकुमार

प्रत्यक्षात किती लोक खरोखर फासावर जातात हे बघायचे. हा फक्त खालच्या न्यायालयाचा निकाल आला आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय बाकी आहे. पुढे राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज बाकी आहे. त्यावेळी प्रतिभा पाटील यांच्यासारखा कोणी राष्ट्रपती असेल तर वर्षानुवर्षे त्यावर कोणताही निर्णय होणार नाही. प्रत्यक्ष फाशी द्यायची वेळ येईल तेव्हा मग अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, हर्ष मांदेर वगैरे विचारवंत थयथयाट करतील आणि फाशी टाळायचा आटोकाट प्रयत्न करतील.

खरोखर किती लोक आणि कधी फासावर जातात तेच बघायचे.

बाकी २००२ मधील गुजरात दंगलींमुळे व्यथित झालेले हे 'भटके हुए नौजवान' आहेत हे समर्थन कोणी केले की नाही अजुनपर्यंत?

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:13 am | निनाद

महाराष्ट्रात असलेले उलेमा ए हिंदचे लोक यांना कायदेशीर मदत देत आहेत.
शिवसेनेचे राज्य आणि त्याम्छा मुख्य मंत्री असतांना
यांना ही मदत देण्याची हिंमत होतेच कशी?

पवारांचे ठीक आहे. ते तर मुस्लिम धार्जिणेच कुटंब आहे!

कपिलमुनी's picture

18 Feb 2022 - 10:09 pm | कपिलमुनी

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.

हा केंद्रीय मंत्री !

sunil kachure's picture

19 Feb 2022 - 9:24 am | sunil kachure

जे bjp करत आहे त्याला महत्वाचे कारण आहे .bjp चे १०५ येवून पण त्यांना सत्ता मिळाली नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागलो आहे
नाही राज्याचे महत्वाचे सोडून उथळ आरोप करणारा विरोधी पक्ष महाराष्ट्र च्या इतिहासात कधीच नव्हता.
ह्या उथळ प्रकारच्या आरोप मुळे bjp चीच प्रतिमा खराब होत आहे
पुढच्या निवडणुकीत १०५ चे २५ होण्याची शक्यता च त्या मुळे निर्माण होईल.
Bjp नी आता जरा गंभीर होवून ,जबाबदार विरोधी पक्षा सारखे वागावे

आपण .....

1. साधू हत्याकांड झाले तरी गप्पच बसायचे का?

2. तांदूळ घोटाळा झाला, तरी गप्पच बसायचे का?

3. एखाद्या स्त्रीला शिवी दिली तरी, गप्पच बसायचे का?

4. निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली तरी, गप्पच बसायचे का?

5. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली तरी, गप्पच बसायचे का?

sunil kachure's picture

19 Feb 2022 - 10:01 am | sunil kachure

पोलिस,न्यायालय त्या साठी आहेत ना .की bjp ल ही वरची चार उदाहरण जास्त महत्वाची वाटत आहेत
त्या मध्ये तो navy ऑफिसर हा bjp कार्यकर्ता पहिला आहे navy चे नाव फक्त स्वार्थ साधण्यासाठी.
सुशांत चा तपास सीबीआय करत आहे.त्यांचं प्रश्न केंद्राला विचारा.
महाराष्ट्राच्या नशिबात bjp हा पक्ष सत्तेत पण नको आणि विरोधी पण नको.
इतकी लोकांची मत बदलतील असे वागू नका

यूपी मध्ये लोकांना चिरडून नेत्याचा पोरगा बाहेर पण आला.तिथे नाही लाज वाटत.
यूपी मध्ये रोज भयंकर गुन्हे घडत आहेत.
ते पाहिले स्वतःचे सरकार सुधारावा.

ह्यात BJP कुठून आले?

असो ....

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:10 am | निनाद

एकेकाळी देशभक्त आणि हिंदु तारणहार असलेली संघट्ना अशी काकाने आणि बारबालेले लयाला घालवलेली पाहून कसेतरी वाटते. साधू हत्याकांड हा तर अमानुषतेचा कळस आहे. आणि त्यावर काहीच कारवाई नाही...

Trump's picture

20 Feb 2022 - 12:39 pm | Trump

बारबालेले ?

एकेकाळी देशभक्त आणि हिंदु तारणहार असलेली संघट्ना अशी काकाने आणि बारबालेले लयाला घालवलेली पाहून कसेतरी वाटते. साधू हत्याकांड हा तर अमानुषतेचा कळस आहे. आणि त्यावर काहीच कारवाई नाही...

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Feb 2022 - 3:47 pm | चंद्रसूर्यकुमार

बर्‍याच दिवसात अरविंद केजरीवाल नामक भामट्यावर काही लिहिले नव्हते. ते आता इथे लिहितो.

१. गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेकडो अंगणवाडी कर्मचारी मुख्यमंत्री निवासापासून काही अंतरावर धरण्यावर बसल्या आहेत. स्थायी स्वरूपी नोकर्‍या मिळाव्यात, पीएफ, आरोग्यविमा वगैरेंची व्यवस्था व्हावी अशा त्यांच्या मागण्या आहेत. एबीपी वर त्याविषयी https://news.abplive.com/videos/news/delhi-anganwadi-workers-strike-cont... ही बातमी उडत उडत आली आहे. पण इतर कोणत्याही मेनस्ट्रीम मिडियातील चॅनेलवर त्याविषयी बातमीही नाही. कारण केजरीवाल आणि आप या लोकांचा लाडका आहे हे असावे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की या आंदोलक स्त्रियांची छेड काढणे, विनयभंग वगैरे प्रकार आपच्या काही कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचे आदेश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत.

म्हणजे दिल्लीत आपण शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेत फार मोठी क्रांती आणली या टिमक्या हे सद्गृहस्थ करदात्यांच्या पैशावर केरळपासून नागालँडपर्यंत पेपरात जाहिराती देऊन करणार आणि त्याचवेळेस अंगणवाडी या अगदी ग्रासरूटवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडणार. इतकेच नव्हे तर यांचे कार्यकर्ते त्या स्त्रियांची छेड काढणार आणि विनयभंग करणार. त्यांच्याविरोधात पक्षाकडून काही कारवाई केल्याचे (पक्षातून काढणे वगैरे) ऐकिवात नाही. कसे करतील? बरेच लोक विसरले असतील पण मी एक गोष्ट विसरलेलो नाही. २०१६ मध्ये आपच्या एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केला या आरोपावरून आपच्या दुसर्‍या एका कार्यकर्त्याला तुरूंगात टाकले गेले होते. तो जामिनावर सुटला. हा कायद्याच्या प्रक्रीयेचा भाग होता त्याबद्दल केजरीवालांना दोष नक्कीच देत नाही. पण तो जामिनावर सुटल्यावर त्या महिला कार्यकर्तीला मानसिक दडपण आले. अशावेळेस त्याच केजरीवालांनी 'कशाला भांडण वाढवतेस- कॉम्प्रोमाईज कर लो' असे आपल्याला सांगितले होते हा आरोप त्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आज तकला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर तिला आणखी डिप्रेशन आले आणि तिने आत्महत्या केली. https://www.dnaindia.com/india/report-watch-aap-activist-who-committed-s... असल्या माणसाकडून अंगणवाडी सेविकांविषयी कसलाही सहानुभूतीपूर्वक विचार होईल याची अपेक्षाच नाही.

२. परवाच कुमार विश्वास या आपच्या माजी नेत्याने केजरीवालांनी आपल्याला पंजाबचा मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र देशाचा (म्हणजे खलिस्तानचा) पहिला पंतप्रधान व्हायला आवडेल असे सांगितले होते हा दावा केला आहे. अर्थात अशा कोणी केलेल्या दाव्यावर लगेच विश्वास ठेवायची गरज नाही. पण इतर काही गोष्टी केजरीवाल आणि आप पंजाबी फुटिरतावाद्यांबरोबर आहे या संशयाला नक्कीच बळ देतात. उदाहरणार्थ २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचारादरम्यान केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी मुक्कामाला उतरले होते, रेफरेंडम २०२० या कॅनडा आणि लंडनमधील खलिस्तानी तत्वांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देणारी वक्तव्ये आपच्या नेत्यांनी करणे वगैरे. केजरीवालांवर हा आरोप करणारे कुमार विश्वास हे एकटेच माजी सहकारी आहेत असे अजिबात नाही. अभिनेत्री गुलकिरत कौर पानंग (गुल पानंग) ला २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केजरीवालांनी चंडिगडमधून पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यांनीही २०१८ मध्ये हाच आरोप केला होता. https://www.thehindu.com/news/national/other-states/had-warned-aap-about...

इतकेच नव्हे तर पंजाबमधील दहशतवाद चिरडणार्‍या के.पी.एस गिल यांच्यासारख्या ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यानेही तेच म्हटले होते. https://indianexpress.com/elections/punjab-assembly-elections-2017/aap-p...

असला पक्ष पंजाबमध्ये निवडणुक जिंकला तर तो देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस असेल हे नक्कीच. म्हणूनच या घाणेरड्या पक्षाविरोधात आणि त्याच्या समर्थकांविरोधात मी मिपावर गेल्या ७-८ वर्षांपासून अगदी मोहिमच उघडली आहे.

श्री गिल यांचे वक्तव्य माहिती नव्हते. धन्यवाद

कॉमी's picture

19 Feb 2022 - 6:01 pm | कॉमी

+१

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:08 am | निनाद

केजरीवाल हा भामटाच आहे या विषयी सहमत आहे! ही कीड जितकी लवकरात लवकर भारतातून जाईल तेव्हढे बरे. हा इसम धडधडीत रेटून खोटे बोलण्यात वाकबगार आहे.

कपिलमुनी's picture

19 Feb 2022 - 11:34 pm | कपिलमुनी

शेठला दिल्लीत आपटल्या पासून केजरीवाल वर भक्तांचा राग !
फेकूचांदने त्यांना पाकिस्तानी एजंट वगैरे म्हणले होते. एवढा माहिती आहे तर अटक का करत नाहीत ?? नुसत्या बाता आणि फेका

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:07 am | निनाद

केजरीवाल एक पाकिस्तानी आणि खलिस्तानी एजंट असल्यास त्याच्यवर कार्वाई करण्यास फार जास्त उशीर केला गेला आहे. तसेच दिल्लीतील जनतेचे पैसे वापरून देशभरात जाहिराती करणे आक्षेपार्ह आहे त्याची ही चौकशी व्हायला पहिजे.
राहुल गांधींच्या मदतीने याचा तपास झाला तर अजून उत्तम.

कपिलमुनी's picture

20 Feb 2022 - 11:12 am | कपिलमुनी

एका राज्यातील जाहिरती दुसरीकडे करणे चुकीचे आहे, उदा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या जाहिराती, केजरीवाल करत असलेल्या , ममता बॅनर्जी , आणि सध्या योगी करत असलेल्या जाहिराती ! सगळे चुकीचे

सुबोध खरे's picture

21 Feb 2022 - 12:13 pm | सुबोध खरे

अटक का करत नाहीत?

कायद्याची काही मूलभूत माहिती करून घ्या.

केवळ तुमचा चेहरा आवडत नाही म्हणून जवळच्या पोलीस स्थानकाचा निरीक्षक तुम्हाला आत टाकू शकणार नाही.

actionable evidence म्हणजेच कार्यवाही करण्या इतपत पुरावा असावा लागतो.

असंख्य सरकारी अधिकारी भ्रष्ट आहेत पण त्यांच्या विरुद्ध न्यायालयात संशयाच्या पलीकडे सज्जड पुरावा जमा करणे हि गोष्ट सोपी नाही.

अन्यथा राजकारणात त्याचे भांडवल करून संवेदनशील मतदाराना भावनात्मक आव्हान करून त्याचा गैरफायदा उठवता येतो हे आपण श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बद्दल पाहिलेले आहे.

असे करू नये इतपत राजकीय शहाणपण श्री मोदींना आहे. शिवाय श्री मोदी कधी कायद्याच्या प्रक्रियेत ढवळाढवळ करत नाहीत.

अन्यथा ते चार वेळेस मुख्यमंत्री आणि दोन वेळेस पंतप्रधान स्वबळावर झाले नसते.

मग तुम्ही त्याना कितीही शिव्या द्या नाहीतर दूषणे द्या किंवा कितीही असभ्य जळजळ व्यक्त करा

निनाद's picture

20 Feb 2022 - 4:04 am | निनाद

अहमदाबादमधील एका विशेष न्यायालयाने २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा जाहीर केली . या निकालात न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४९ दहशतवाद्यांपैकी तब्बल ३८ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरित ११ दहशतवाद्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. देवबंदस्थित इस्लामिक संघटना
उलामा-ए-हिंदने दोषींना फाशी देण्यास विरोध केला असून गरज पडल्यास ते उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ, असे म्हटले आहे.

इस्लामवादी संघटना जमियत उलेमा-ए-हिंदने मागील वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आलेल्या अल-कायदा दहशतवाद्यांच्या बचावासाठी मदत केली होती. जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या अल-कायदाच्या संशयित दहशतवाद्यांना कायदेशीर मदत जाहीर केली होती.

अटक करण्यात आलेल्या दहशतवादी संशयितांपैकी एकाच्या वडिलांनी जमियत उलेमा-ए-हिंदला कायदेशीर मदतीसाठी पत्र लिहिले होते. परिणामी, जमियत उलेमा-ए-हिंदच्या कायदेशीर मदत समितीचे अध्यक्ष गुलजार आझमी यांनी उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या दोन दहशतवादी संशयितांना कायदेशीर मदत देण्याचा निर्णय घेतला.

या विरुद्ध कोणत्याही हिंदू संघटनेने मात्र आवाज उठवलेला नाही. त्यांचे संपर्क https://jumaharashtra.com/jamiat-ulama-maharashtra-trustees/
आणि https://www.facebook.com/Muslims.of.India.Page/photos/gulzar-azmi-a-man-...
येथे दिसून येतात पण त्याची खात्री नाही. तरीही येथे असलेल्या इ मेल पत्त्यांवर राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून निषेध नोंदवला जाऊ शकतो असे दिसते.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Feb 2022 - 2:16 pm | चंद्रसूर्यकुमार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक आता रंगतदार टप्प्यात आली आहे. सुरवातीला योगी हरणार, अखिलेश परत एकदा मुख्यमंत्री बनणार असे वातावरण उभे केले गेले होते पण परिस्थिती तशी नाही असे आता दिसायला लागलेले आहे.

१. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर या गोरखनाथ मठाच्या ठिकाणातील मतदारसंघातूनच विधानसभा निवडणुक लढविणार असे भाजपने जाहीर केले. त्यापूर्वी आदित्यनाथ अयोध्येतून किंवा मथुरेतून निवडणुक लढविणार असे चित्र उभे केले गेले होते (की माध्यमांमध्ये मुद्दामून पेरले गेले होते). त्यामुळे ते गोरखपूरमधून निवडणुक लढविणार म्हणजे त्यांना अयोध्या-मथुरेतून विजयाची खात्री नाही म्हणून ते आपल्या घरच्या मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत असे म्हटले जाऊ लागले. अखिलेश यादव तर 'योगींची घरवापसी झाली' अशाप्रकारचा बोलघेवडेपणा करून बसले. पण त्यामुळे प्रश्न उभा असा राहिला की योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुक लढवत तरी आहेत पण अखिलेश यांचे काय? त्यामुळे अखिलेश यांचीही 'घरवापसी' झाली आणि त्यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवायचा निर्णय घेतला. स्वतः मुलायमसिंग यादव यांच्या राजकीय जीवनाची सुरवात याच भागातून झाली. तसेच या मतदारसंघात यादव मतदारांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना या मतदारसंघातून अखिलेश यांचा विजय सगळ्यांनी गृहितच धरला होता. इतकेच नाही तर आपण करहलमध्ये दोनदाच येणार- एकदा उमेदवारी अर्ज भरायला आणि दुसर्‍यांदा जिंकल्याचे प्रमाणपत्र घ्यायला आणि आपण आपला वेळ पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देऊ असेही अखिलेशनी म्हटले. पण आपल्याला निवडणुक तितकी सोपी राहिली नाही हे त्यांच्या लक्षात आलेले दिसते. भाजपने अखिलेशच्या विरोधात मुलायमसिंगांचे पूर्वाश्रमीचे सहकारी सत्यपालसिंग बघेल यांना उमेदवारी दिली आहे. हे गृहस्थ सध्या आग्र्याचे खासदार आणि मोदींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री आहेत. हे मुलायमसिंगांचे एकेकाळचे सहकारी असल्याने यादव कुटुंबियांची मर्मस्थाने त्यांना अचूक माहित आहेत आणि त्याचाच वापर अखिलेश यांच्या विरोधात करत आहेत असे दिसते. तसेच योगींच्या पाच वर्षांच्या काळात उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली आहे .राज्याच्या अनेक भागात अखिलेश मुख्यमंत्री असताना रात्री ८ नंतर बाहेर पडायचे धैर्य स्त्रियांना आणि मुलींना होत नसे ती परिस्थिती आज राहिली नाही. तसेच पोलिस ठाण्यात कोणा यादव किंवा मुस्लिमाविरोधात तक्रार दाखल करता येणे तितके सोपे नव्हते कारण त्यांच्यापैकी गुन्हेगारी आणि गुंड तत्वांना समाजवादी पक्षाच्या राजवटीत राजाश्रय होता. या सगळ्याचा सर्वाधिक त्रास स्त्रियांना आणि मुलींना होत होता. ती परिस्थिती सुधारल्याने महिला वर्गात योगींच्या बाजूने सुप्त लाट आहे अशा बातम्या आहेत. त्यातूनच मग भाजप उमेदवार बघेल यांच्या ताफ्यावर हल्ला करायचा प्रयत्न समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (खरं तर गुंडांनी) केला. आचारसंहिता लागू झाल्याने योगी सरकार १००% काम करू शकत नाही अशा स्थितीत विरोधी उमेदवारावरच हल्ला करायचा प्रयत्न होत असेल तर मग त्यांचे सरकारच आले तर काय होईल हा एक संदेश राज्यभर गेलाच. २०१२ मध्ये अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर 'नवी समाजवादी पार्टी' आपण लोकांपुढे आणू ही गर्जना त्यांनी केली होती त्यात तितकेसे तथ्य नव्हते हे स्पष्टच आहे. समाजवादी पक्ष हा पूर्वीही गुंडांचाच पक्ष होता आणि आजही गुंडांचाच पक्ष आहे. अशा परिस्थितीत आपल्या पायाखालची वाळू सरकू लागू लागली आहे हे लक्षात आल्यावर अखिलेशनी करहलमध्ये प्रचार करायला सुरवात केली. परवा तर ८२ वर्षांच्या मुलायमसिंग यादव यांनाही प्रचारासाठी त्यांनी करहलमध्ये बोलावले. प्रचाराचे भाषण करताना मुलायमसिंगांना आपल्या मुलाचेच नाव आठवत नव्हते आणि इथून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा असे भाषण त्यांनी केले अशा बातम्या आहेत. बहुदा वयानुरूप स्मृतीभ्रंश वगैरे त्रास त्यांना सुरू झालेला दिसतो. मुलायमसिंगांना प्रचारासाठी बोलावायला लागले याचाच अर्थ अखिलेशसाठी सगळे काही आलबेल नाही हे स्पष्ट आहे. त्याच सभेत अखिलेशचे काका शिवपालसिंग पण उपस्थित होते. त्यांना बसायला खुर्चीही दिली गेली नव्हती अशाही बातम्या आहेत. तेव्हा अखिलेशना स्वतःचीच निवडणुक जड जाणार असे दिसते.

२. ५ वर्षांपूर्वी काका शिवपालसिंग यादव यांच्याबरोबर अखिलेशनी भांडून भूस पाडला होता. त्यांच्याशी यावेळी समेट केला आणि सुरवातीला त्यांच्या मर्जीतल्या १०० उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात होते. तो आकडा हळूहळू कमी व्हायला लागला. आता तर एकट्या शिवपालसिंग यादवना जसवंतनगरची उमेदवारी दिली गेली आहे आणि त्यांच्या मर्जीतल्या इतर कोणालाही उमेदवारी दिली गेलेली नाही त्यामुळे शिवपालसिंगही नाराज आहे अशा बातम्या आहेत.

३. अखिलेशनी लहानसहान अनेक पक्षांबरोबर युती केली आहे. पण आता जागावाटपातील कुरबुरी पुढे यायला लागल्या आहेत. अशी युती केलेल्या पक्षांमध्ये अपना दलाचा एक फुटिर गट आहे. एका मतदारसंघात (नाव विसरलो) या गटाला जागा दिली गेली होती. पण आयत्या वेळी समाजवादी पक्षाने आपला सायकल चिन्हावर स्वतःचा उमेदवार जाहिर केला. अशा गोष्टींमुळे युतीत कुरबुरी वाढतात आणि त्यातून कटुता वाढते.

४. राज्याच्या पश्चिम भागात (मेरठ, बागपत वगैरे) जनाधार असलेल्या राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरींशी अखिलेशनी युती केली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागात भाजपला निवडणुक जड जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण उमेदवार निवडताना चुका झाल्या आहेत अशा बातम्या आहेत. म्हणजे रालोदला दिलेल्या जागांपैकी काही ठिकाणी मुळचे समाजवादी पक्षाचे नेते असलेलेच आयत्या वेळी पक्षांतर करून रालोदमध्ये गेले आणि त्यांना रालोदची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे जयंत चौधरींचे समर्थक जाट मतदार नाराज झाले आहेत अशा बातम्या आहेत. तसेच समाजवादी पक्षाने या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. जाट मतदार समाजवादी पक्षाच्या मुस्लिम उमेदवारांना मत देईल ही शक्यता कमी असेही म्हटले जात आहे. त्यात समाजवादी पक्षाने २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलींचा आरोप असलेल्या आझमखानांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे. तसेच कैरानामधूनही अशाच दंगलीचा आरोप असलेल्या एका मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या मागे हिंदू मतदारांचे 'कॉन्सॉलिडेशन' होईल अशी शक्यता आहे.

आज तिसर्‍या फेरीसाठीचे मतदान आहे. पहिल्या तीन फेर्‍यातच समाजवादी पक्षाला काही करता येऊ शकेल. मतदान जसे पूर्वेकडे सरकेल त्याप्रमाणे समाजवादी पक्षाचे प्राबल्य कमी होत जाईल. तसेच योगी सरकारने कोरोना काळात लोकांना घरपोच रेशन दिले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून अनेकांची घरे झाली, उज्वला योजनेतून सिलेंडर मिळाले याविषयीही राज्यात चांगले मत आहे असे व्हिडिओ बघितले आहेत. कदाचित मी स्वतः भाजप समर्थक असल्याने माझ्याकडून तेच व्हिडिओ बघितले गेले असतील ही शक्यता आहेच. पण अशा योजनांचा सगळ्यात जास्त फायदा गरीबांना होतो. हा वर्ग बसपाचा पारंपारिक मतदार राहिला आहे. तसेच बसपा आता या निवडणुकांमध्ये महत्वाचा खेळाडू नाही हे पुरेसे स्पष्ट झाले असल्याने तशाही मायावती मुख्यमंत्री होणार नाहीत तेव्हा त्यापैकी काही मते तरी योगींकडे येतील असे मला वाटते. सुरवातीला भाजपचे १३ आमदार (दोन मंत्र्यांसह) समाजवादी पक्षात गेले त्याचा बराच बोलबाला झाला. सगळे मिळून ८० भाजप आमदार सपात जातील असे म्हटले जात होते. त्यापैकी काहीही झालेले दिसत नाही. स्वामीप्रसाद मौर्य समाजवादी पक्षात गेले. पण त्याचवेळी काँग्रेसच्या आर.पी.एन सिंग यांनी भाजपत प्रवेश केल्याने आपल्या पडरौना मतदारसंघातून आपल्याला निवडणुक कठीण जाईल हे स्वामीप्रसाद मौर्यंच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फाझिलनगर या शेजारच्या मतदारसंघातून निवडणुक लढवायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये फाझिलनगरमधून निवडून आलेल्या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे.

एकूणच चित्र गुंतागुंतीचे आहे. यावेळी योगी आरामात बहुमत मिळवतील असे वाटते. २०१७ चा आकडा गाठतील/ ओलांडतील का हेच बघायचे.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Feb 2022 - 2:51 pm | चंद्रसूर्यकुमार

त्यातही हिजाबचा मुद्दा ऐन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आणला गेला त्याचा पण मतदानावर काहीतरी परिणाम होईल असे वाटते. हा मुद्दा नक्की कोणी आणला हे समजता येणे कठीण आहे. भाजपच्या बाजूने जरी हा मुद्दा सुरवातीला पुढे आणला गेला असला तरी आश्चर्य वाटू नये. काहीही असले तरी उत्तर प्रदेशच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे असते.

समजा मुस्लिमांचे समाजवादी पक्षाकडे धृवीकरण झाले तर हिंदूंचे धृवीकरण दुसर्‍या बाजूला व्हायचे प्रमाण उत्तर प्रदेशात जास्त आहे. त्यातही मुस्लिम स्त्रिया काही प्रमाणात भाजप उमेदवारांना मत देतात असे दिसते. त्यासाठी ट्रिपल तलाकविरोधात भाजपची भूमिका जबाबदार असावी. पश्चिम उत्तर प्रदेशात साहरणपूर जिल्ह्यात देवबंद म्हणून एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे मुस्लिम बहुसंख्या असूनही तिथे भाजपचा उमेदवार जिंकला होता. दुसरे म्हणजे उज्वला योजनेतून मिळालेले सिलेंडर आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे मुस्लिम स्त्रियांनाही फायदा झालाच. नवर्‍याबरोबर मतदानाला जाताना इतरांना सांगताना समाजवादी पक्षाला मत देणार असे सांगितले तरी प्रत्यक्षात मात्र तसे मत देतीलच असे नाही.अशा अगदी १०% मुस्लिम स्त्रिया जरी असल्या तरी भाजपला ती लॉटरी होऊ शकते.

दुसरे म्हणजे समजा यादवांचे समाजवादी पक्षाकडे धृवीकरण होत आहे असे दिसत असेल तर मग यादवेतर ओबीसींचे धृवीकरण दुसरीकडे होते. उत्तर प्रदेशात यादव ही डॉमिनन्ट जात आहे आणि यादव विरूध्द इतर हा सुप्त संघर्ष असतोच.

आता ही मते दुसरीकडे म्हणजे कुठे जाणार? तर अशा मतांना जायला भाजपशिवाय दुसरा पर्यायच नाही.

sunil kachure's picture

20 Feb 2022 - 8:52 pm | sunil kachure

Bjp सत्तेवर असणे खूप गरजेचे आहे हे लोकांना चांगले पटले होते
देशात खूप मोठे यश bjp ला त्या मुळे मिळाले काँगेस राज्यात पुरोगामी,मुस्लिम ह्या जमाती ॲक्टिवे होतात.
पाकिस्तान,मुस्लिम हे खूप सौम्य धोके आहेत ..पण पुरोगामी मंडळी भारताच्या मुळा लं सुरुंग लावून भारत बरबाद करण्याचे प्रयत्न करतात
जनतेला माहीत आहे..
पण bjp नी हे समजून घेतले पाहिजे
शेतकरी,गरीब वर्ग ,कामगार हे bjp चे विरोधी नाहीत.
पण त्यांना बदनाम करणे सोडून द्यावे
महाराष्ट्र प्रगत आहे .
तिथे bjp नी चुतीया गिरी बंद करावी ..
वागणूक सुधारावी जनता त्यांच्या बरोबर च आहे.

तथाकथित पुरोगामी आणि मुस्लिम तर एकत्र दिसतात.

पाकिस्तान,मुस्लिम हे खूप सौम्य धोके आहेत ..पण पुरोगामी मंडळी भारताच्या मुळा लं सुरुंग लावून भारत बरबाद करण्याचे प्रयत्न करतात

हे नक्की का?

-----

शेतकरी,गरीब वर्ग ,कामगार हे bjp चे विरोधी नाहीत.
पण त्यांना बदनाम करणे सोडून द्यावे

शेतकरी वर्गाच्या तोंडाला, ह्याच राज्यातील सध्याच्या राजवटीने, पाने पुसली...

ST कर्मचारी वर्गाला कुणी उपाशी ठेवले?

प्राणी संग्रहालयासाठी पैसे आहेत पण गरीब जनतेसाठी नाहीत ...

-----

असो,

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Feb 2022 - 11:51 pm | चंद्रसूर्यकुमार

करहलमध्ये मुलायमसिंगांनी केलेल्या भाषणाचा थोडा भाग पुढे बघायला मिळेल.

वयाचा परिणाम त्यांच्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यांचा आवाज कापत आहे. या वयातल्या आपल्या वडिलांना प्रचारासाठी बोलवावे लागले याचाच अर्थ अखिलेशच्या पायाखालील वाळू घसरत आहे. मुलायमसिंगांविषयी असलेल्या सद्भावनेतून अखिलेश जिंकतीलही पण झालेले नुकसान समोर दिसत आहे.

आणि अखिलेश यादवच कशाला?

उमेदवाराचे वैयक्तिक कतृत्व काय आहे? त्याचे चारित्र्य काय आहे? त्याची स्वतःची ध्येय धोरणे काय आहेत? सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणारा आहे का?

हे मुलभूत प्रश्र्न, जो पर्यंत, मतदारांना पडत नाहीत, तोपर्य॔त मतदारांच्या मानसिक गुलामगिरीचा फायदा घेणारेच निवडून येण्याची शक्यता आहे ...

मुळ प्रश्न घराणेशाहीचा आहे. देशात सगळी आमदार, खासदार म्हणजे छोटी-छोटी संस्थाने सुरु झाली आहेत.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 12:43 am | मुक्त विहारि

घराणेशाही रूजतेच

मग ते नंद घराणे असो किंवा मिंग घराणे

लोकशाहीमुळे, आपला नेता निवडायचा अधिकार, लोकांना आहे आणि आता तरी लोकांनी, योग्य तो नेता निवडायलाच हवा. (गोव्यातील चर्चिल जर निवडून आला नाही तर, फारच उत्तम...)

सांगितले की लोकप्रतिनिधी न विषयी .किती चारित्र्यसंपन्न लोक लोकसभेत आहेत ते.

निनाद's picture

21 Feb 2022 - 5:18 am | निनाद

अखिलेश येऊ शकतो. हे गुंड लोक

  1. जेथे योगींना मतदान होऊ शकते अशा ठिकाणी आदल्या दिवशी जातात.
  2. मतदानाच्या आधीच त्या मतदारांच्या बोटाला शाई लाऊन टाकतात.
  3. योगीच्या मतदात्यांना मतदानच करता येत नाही.

मग उरलेल्या मुस्लिम आणि यादव मतदानावर अखिलेश सहजतेने जिंकतो.
त्यामुळे अखिलेश येण्याची शक्यता खूप आहे!

असे गठ्ठा मतदान बाजूला काढण्याचे प्रकार तेथे खुप जास्त झाले होते.
सुरक्षा ठेवली तरच काही होऊ शकते - अन्यथा सपा तर येणारच!

मुक्त विहारि's picture

21 Feb 2022 - 7:19 am | मुक्त विहारि

उद्या हीच गोष्ट आपल्या राज्यात पण होऊ शकते ....

कॉमी's picture

21 Feb 2022 - 8:17 am | कॉमी

हे EVM सारखं आहे की, हारले तर evm खराब आणि जिंकले तर evm बरोबर.

तस इथं पण हारले तर सपा फ्रॉड, जिंकले तर निवडणूक योग्य.

ट्रम्प ने इन्स्पिरेशन दिलीये- ज्या राज्यात जिंकतोय तिथे निवडणूक योग्य, हारतोय तिथे खराब. मला मिळालेले मेल इन balots चांगले, दुसऱ्यांना मिळालेले फ्रॉड.

ट्रम्प त्याच्या समर्थकांना काय मेसेज पाठवतोय पैसे काढायला:

स्रोत- बिझनेस इनसाईडर

ट्रम्पला पैसे नाही दिले तर तुम्ही रॅडिकल लेफ्ट.लवकर पैसे द्या, आणि कम्युनिस्ट होण्यापासून स्वतःला वाचवा.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Feb 2022 - 9:36 am | चंद्रसूर्यकुमार

हे सपाला २०१७ मध्ये का करता आले नाही?तसे करता आले असते तर सपाचा इतका मोठा पराभव होऊच शकला नसता.