झटपट जळगावी भरीत

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
23 Jan 2022 - 10:04 am

पार जळगावहून वांगी आले होते.ही वांगी आकाराने ओव्हल मोठी ,फिक्कट हिरवी असतात.यात बिया कमीअ असतात.२०१६ साली जळगावी वांग्यांना GI tag ही मिळाला आहे.
शेवटी हे एकच राहिले होते.तेव्हा जळगावी भरीतची पाकृ लिहिण्याची आणि चित्रित करायचे ठरवले.हा पदार्थ हल्लीच शिकल्यामुळे करून खायला घालायला उत्साह वाटतो आणि झटपटीत होतो.
१
साहित्य :
१.पावशेर जळगावी वांगे
२.एक वाटी कांद्याची पात (चिरलेली)
३.एक वाटी कच्चे शेंगादाणे
४.अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे
५.एक वाटी चिरलेला ओला कांदा
६.५-६ हिरव्या मिरच्या
७.७-८ लसून पाकळ्या
८..कोथिंबीर चिरलेली
९.फोडणीचे साहित्य
कृती:
१.वांग्याला तेल लावावे.सुरीने चुहू बाजूंनी टोचे मारून घ्यावेत.त्यात चार लवंगा खोचून घ्याव्यात .
२.वांगी आचेवर भाजून घ्यावेत.जळगावात धान्य काढल्यानंतरच्या उरलेल्या काड्यांवर शेतात भाजतात.
३.वांगे भाजताना बरोबर हिरव्या मिरच्याही भाजून घ्याव्यात.
४.भाजलेल्या वांग्याचे वरचे टरफल काढून टाकावे.भाजलेले वांगे वाटून/ठेचून घ्यायचे .यासाठी लाकडी खलबत्त्ता(बडगी) वापरला जातो .वा पाटा वरवंटा .यात कोणतेही धागे न राहता एकजीव व मऊ होणे महत्वाचे.
५.हिरव्या मिरच्या व लसून एकत्र वाटून घ्यावेत.
६.फोडणीसाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करावे .जिरे ,मोहरी.मिरची लसून वाटण टाकावे.
७.भाजलेले आणि कच्चे शेंगादाणे परतून घ्यावेत.
८.यात चिरलेला ओला कांदा परतून घ्यावा.नन्तर चिरलेली कांद्याची पात टाकून परतून घ्यावी.
९. आवडीनुसार हळद ,मीठ ,कोथिंबीर टाकावी.तिखट जास्त हवे असेलं तर तिखटही वापरू शकता.
१०.आता वाटलेला वांग्याचा गर यात टाकून परतून घ्यावा .१० मिनिटे वाफ येऊ द्यावी.
११.गरमा गरम जळगावी भरीत भाकरी बरोबर खायला तयार.

-भक्ती

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

23 Jan 2022 - 11:05 am | गोरगावलेकर

आवडली पाककृती
जळगावच्या हिरव्या पांढऱ्या वांग्यांची चवच न्यारी. वांग्यांबरोबर जळगावच्या मिरच्या नाही मागवल्या का?
आणखी चविष्ट होते भरीत.

Bhakti's picture

23 Jan 2022 - 11:38 am | Bhakti

जळगावच्या मिरच्या नाही मागवल्या का?

हे नव्हते माहिती पुढच्या वेळी नक्की मागवते.
धन्यवाद

लवंगा टोचुन वांगे भाजल्याने लवंगेची चव आत मुरते काय ? इडियो पाहिला छान आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu

फरक वाटतो.
धन्यवाद :)

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jan 2022 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली

व्वा. हा पदार्थ धुळ्यात माझ्या घरी वर्षानूवर्षे आजी पणजीच्या काळापासून बनवला जातो. माझा सर्वात आवडता पदार्थ.

Bhakti's picture

23 Jan 2022 - 8:31 pm | Bhakti

धन्यवाद अबा
:)

सरिता बांदेकर's picture

23 Jan 2022 - 2:24 pm | सरिता बांदेकर

मस्त वाटला व्हिडिओ पण आणि रेसीपी पण सुगरण बाई भक्ती.
मला ठाण्यात मिळतात जळगावची वांगी पण पण मला वांग्याची ॲलर्जी आहे.
त्यामुळे फक्त व्हिडिओ बघून समाधान मानावं लागणार.
अशाच छान छान रेसीपी टाकत जा.

Bhakti's picture

23 Jan 2022 - 8:32 pm | Bhakti

पण मला वांग्याची ॲलर्जी आहे.
खुप खुप धन्यवाद ताई :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2022 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलं भरीत. पाकृचा व्हीडीयो सुद्धा भारी.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

23 Jan 2022 - 8:32 pm | Bhakti

धन्यवाद सर :)

आग्या१९९०'s picture

23 Jan 2022 - 9:53 pm | आग्या१९९०

पूर्वी काळे वांगे भरिताला वापरायचो. परंतु एकदा जळगावी वांगे वापरले तेव्हापासून भरीत म्हटले म्हणजे जळगावी वांगेच वापरतो. हल्ली सर्वत्र मिळतात हि वांगी. चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव गॅसवर भाजलेल्या वांग्याला येत नाही,त्यामुळे घरात कोळशाची शेगडी ठेवली आहे मी घरात वांगे भाजायला.

काळी वांगी भरतासाठी नाही चांगली लागतं.त्याचे चुरचुरीत काप छान लागतात.

चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव गॅसवर भाजलेल्या वांग्याला येत नाही,त्यामुळे घरात कोळशाची शेगडी ठेवली आहे मी घरात वांगे भाजायला

.
+१

निनाद's picture

24 Jan 2022 - 8:08 am | निनाद

खमंग असणार.

Bhakti's picture

25 Jan 2022 - 5:11 pm | Bhakti

:) होय.

मला सगळ्याच प्रकारच्या वांग्याचे भरीत आवडते, दही घालून बनवलेले सुद्धा!
पाकृ आवडली, आता लवंगा खुपसून बनवलेले पण ट्राय करणार.
बाकी जळगावी वांग्याचे भरीत आणि कण्याची भाकरी छान लागते.

Bhakti's picture

25 Jan 2022 - 5:08 pm | Bhakti

मला सगळ्याच प्रकारच्या वांग्याचे भरीत आवडते

,
मलाही, लहानपणी शाळेतून आल्यावर हा पदार्थ स्वतः बनवून खाण्याची मजा यायची.

दही घालून बनवलेले सुद्धा!

कधी नाही खाल्लं असं
लवंगा बरोबर खोबरे बारीक तुकडे, मिरच्यापण खोचू शकता.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jan 2022 - 11:35 pm | अमरेंद्र बाहुबली

असे अनेक खान्देशी पदार्थ आहेत. ह्यातले काही माझी आई बनवते. एक वंजारी खूडा म्हणून पदार्थ आहे, अप्रतिम असतो.

सौन्दर्य's picture

25 Jan 2022 - 11:58 pm | सौन्दर्य

कृतीवरून भरीत छानच लागणार ह्यात शंकाच नाही. पण हे झटपट कसे ? ते नाही कळले. वांगे हातात घेतल्यापासून कमीतकमी अर्धा-पाऊण तास तरी लागणारच असे मला वाटते. ह्याच शनिवारी करून पाहणार आहे. जरी जळगावी वांगी ह्या परगावी (ह्युस्टन, अमेरिका) नाही मिळाली तरी काळी (की गडद निळी) वांगी मिळतातच त्यावर तहान भागवून घेईन.

सुक्या's picture

26 Jan 2022 - 1:09 am | सुक्या

भरीत हा निगुतीने करायचा प्रकार आहे. झटपट म्हटले तरी त्याला वेळ लागतोच. तुम्ही म्हणता तशी काळी वांगी मिळतात त्याचे पण भरीत छान बनते. जमल्यास भाजताना मात्र कोळसा वापरा ... कोळश्याचे ग्रील वापरुन भाजलेल्या वांग्यांना मस्त चव येते.

परगावी (ह्युस्टन, अमेरिका)

आम्ही याला झैरात म्हणतो :-) हळु घ्या ! ! !

कर्नलतपस्वी's picture

28 Jan 2022 - 8:48 pm | कर्नलतपस्वी

आईबाप उगाचच झुरतात माझ्या बछड्याला इकडच्या जेवणाची चव मीळत नसेल पण परगावी सगळ मिळतय बघा. आम्हि तुकडे असताना भरली वांगी आणी बाजरीची भाकरीपण खाल्ली.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jan 2022 - 8:37 am | श्रीरंग_जोशी

पाककृती एकदम 'तोंपासु' आहे.
लहानपणी (संकरित नसणार्‍या) हिरव्या वांग्यांचे भरीत भरपूर खाल्ले आहे त्या आठवणी जाग्या झाल्या.

Bhakti's picture

26 Jan 2022 - 7:08 pm | Bhakti

सर्वांचे आभार !

जेम्स वांड's picture

10 Feb 2022 - 10:21 am | जेम्स वांड

अन अत्युत्तम पाककृती आहे भक्तीताई

आता लाईनच लावा खान्देशी पाककृतींची असा आग्रह, लिष्ट खालीलप्रमाणे

१. भरीत
२. मिरच्यांची भाजी
३. फौजदारी डाळ
४. वंजारी खुडा
५. डाळ गंडोरी
६. खुड मिरच्यांचे पाणी
६. वांग्याची घोटलेली भाजी
७. गिलक्याचे (घोसावळ्याचे) भरीत
८. वरण बट्टी

वाह! चांगली यादी!वरण बट्टी म्हणजे डाल बट्टी ना!
आधी घरी खुप करायचे,माझं पेटेंट झालं होतं! मी , पाण्यात उकळून, तळून करायचे.
डायट सुरू केल आणि बरेच पदार्थ मागे पडले :)

निनाद's picture

10 Feb 2022 - 11:00 am | निनाद

व्हिडियो चांगला झाला आहे पण त्यात ते इन्शॉट चा लोगो नको होता!
पुढील वेळी व्हिडियो एडिट करतांना साधे विंडोज चे फोटो अ‍ॅप वापरून बनवा. यामध्ये व्हिडियो सहज एडिट करता येतो. आणि कोणताही लोगो येत नाही.
वापरायला पण सोपे आहे. शेवटी नावे वगैरे टाकता येतात.

हे पण नको असेल तर साम्सुंग चा फोन असेल तर त्यातले साम्सुंग व्हिडियो एडिटर पण चांगले आहे.

हे ही नको असेल आणि अजून तांत्रिक दृष्ट्या 'भारी'काही करायचे असेल तर फुकट आणि मुक्त उपलब्ध असलेले ओपन शॉट हे सॉफ्ट्वेयर वापरा.

हे नको असेल तर शॉटकट हा अजून एक पर्याय आहे.

उत्तम , माहिती! धन्यवाद
नक्की प्रयत्न करेन.