क्रीप्टो करन्सी

कासव's picture
कासव in काथ्याकूट
11 Dec 2021 - 12:14 am
गाभा: 

काही महिन्या पूर्वी क्रीप्टो बद्दल थोडी माहिती मिळाली होती. त्यात काही गुंतवणूक करण्याच्या पण विचारात होतो. पण खूप प्रकारची चलने. ते काम कसं करतात ( तांत्रिक बाबी नाही) ह्या बद्दल कोठेतरी मनासारखी माहिती मिळत न्हवती. त्यात भारत सरकारच काही बिल आणून ह्या चलनावर काही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे. काही प्रश्न डोक्यात आहेत जाणकारांनी समाधान करावे ही विनंती.

१. असे बिल आणायला उशीर झाला आहे का?
प्रश्न पडला कारण आधीच खूप लोकांनी पैसे गुंतवले आहेत. ते येन केन प्रकारे ते परत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. ह्यात अधिक धोका आहे
२. बदल ही काळाची गरज आहे. आपण काही अंकुश ठेवले तर आपण स्पर्धेत राहू का?
३. भारतात जरी बंदी किंवा काही अंकुश आले तरी लोक बाहेरच्या देशातून व्यवहार करू शकतील का? ( तांत्रिक दृष्ट्या करू शकतील पण मग ह्या बंदी चा काय उपयोग)
४. मुळात ह्या चलनावर काही मागोवा राहत नाही मग सरकार अंकुश कसा ठेवणार? तेवढी तांत्रिक तयारी आहे का?
५. मटका लॉटरी किंवा तस्तम गोष्टी कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर चालू शकतात तर आभासी चलन का नाही?
६. असे चलन विकायला काही दिवसाची मर्यादा दिली तरी आधीच्या गुंतवणूक दराना कमी किमतीत चलन विकायला लागून नुकसान होईल. काही लोक ते विकायच्या फंदात न पडता तसेच hold करून ठेवू शकतील का. कोणी सांगावे हे किंवा दुसरे सरकार काही वर्षांनी निर्बंध शिथिल करतील आणि तेव्हा चलनाची किंमत वाढली असेल.
७. RBI स्वतःच आभासी चलन निर्माण करणार हे म्हणजे सरकारी लॉटरी सारखं झालं का?
८. स्वतःच चलन काढणे तांत्रिक दृष्ट्या सोप आणि सुरक्षित आहे का? काही बँकेचे आणि सरकारी खात्याचे website हॅक होतात. एवढी सुरक्षा खरंच सरकार घेऊ शकते का?
९. बाकी काही धाग्यात आल्या प्रमाणे सरकारने स्वतः कोणताही धंदा करू नये पण त्यांनी अंकुश जरूर ठेवावा. त्या नियमाने अश्या चलनावर अंकुश ठेवून ज्यांना ह्यात गुंतवणूक करायची आहे त्यांना करू द्यावी का? ( सिगारेट दारू वर जस दुष्परिणाम फक्त लिहिलेले असतात. विक्री किंवा वापरावर विशेष अंकुश नसतो तसे लोकांना फक्त जाणीव करून द्यावी)
१०. शेअर मार्केट सुद्धा सुरक्षित नाही मग आभासी चलनावर च बंदी का?

प्रतिक्रिया

१. असे बिल आणायला उशीर झाला आहे का?
प्रश्न पडला कारण आधीच खूप लोकांनी पैसे गुंतवले आहेत. ते येन केन प्रकारे ते परत मिळवण्याचा प्रयत्न नक्की करतील. ह्यात अधिक धोका आहे

बिलात काय आहे ह्यावर अवलंबून आहे. ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना एक्सिट साठी वेळ देण्यात येईल.

२. बदल ही काळाची गरज आहे. आपण काही अंकुश ठेवले तर आपण स्पर्धेत राहू का?

इतिहास साक्षी आहे कि ज्या ज्या क्षेत्रांत सरकारी बाबू मंडळींनी हस्तक्षेप केला तिथे तिथे प्रचंड घाण निर्माण झाली. इथे सुद्धा तेच होईल .

३. भारतात जरी बंदी किंवा काही अंकुश आले तरी लोक बाहेरच्या देशातून व्यवहार करू शकतील का? ( तांत्रिक दृष्ट्या करू शकतील पण मग ह्या बंदी चा काय उपयोग)

क्रिप्टो वरील बंदी (बंदी केल्यास) निरर्थक असून ह्यामुळे फक्त भारतीय कंपन्यांना ह्या क्षेत्रांत येण्यास मज्जाव होईल. बहुतेक व्यक्ती बिनधास्त पणें क्रिप्टो खाजगी स्वरूपांत घेऊन ठेवू शकतील.

४. मुळात ह्या चलनावर काही मागोवा राहत नाही मग सरकार अंकुश कसा ठेवणार? तेवढी तांत्रिक तयारी आहे का?

उलट आहे. ह्या चालतात १००% सर्व ट्रान्सक्शन्स सार्वजनिक असतात.

५. मटका लॉटरी किंवा तस्तम गोष्टी कधी कायदेशीर तर कधी बेकायदेशीर चालू शकतात तर आभासी चलन का नाही?

सरकारी बाबूंची मस्ती आणखीन काही नाही. ह्या मंडळींना आपल्या सत्तेला धोका पोचेल असे काहीही आवडत नाही.

६. असे चलन विकायला काही दिवसाची मर्यादा दिली तरी आधीच्या गुंतवणूक दराना कमी किमतीत चलन विकायला लागून नुकसान होईल. काही लोक ते विकायच्या फंदात न पडता तसेच hold करून ठेवू शकतील का. कोणी सांगावे हे किंवा दुसरे सरकार काही वर्षांनी निर्बंध शिथिल करतील आणि तेव्हा चलनाची किंमत वाढली असेल.

सत्य आहे.

७. RBI स्वतःच आभासी चलन निर्माण करणार हे म्हणजे सरकारी लॉटरी सारखं झालं का?

नाही. रुपया असल्याने हे फियाट करंसीच आहे.

८. स्वतःच चलन काढणे तांत्रिक दृष्ट्या सोप आणि सुरक्षित आहे का? काही बँकेचे आणि सरकारी खात्याचे website हॅक होतात. एवढी सुरक्षा खरंच सरकार घेऊ शकते का?

नाही आणि पूर्णतः निरर्थक सुद्धा आहे.

९. बाकी काही धाग्यात आल्या प्रमाणे सरकारने स्वतः कोणताही धंदा करू नये पण त्यांनी अंकुश जरूर ठेवावा. त्या नियमाने अश्या चलनावर अंकुश ठेवून ज्यांना ह्यात गुंतवणूक करायची आहे त्यांना करू द्यावी का? ( सिगारेट दारू वर जस दुष्परिणाम फक्त लिहिलेले असतात. विक्री किंवा वापरावर विशेष अंकुश नसतो तसे लोकांना फक्त जाणीव करून द्यावी)

ह्या निर्बंधांचे मूळ कारण गुंतवणूकदारांचे रक्षण नसून रुपया च्या स्थानाला धोका पोचू नये हे आहे. रुपया हे कन्व्हर्टिबल चलन नसल्याने काही प्रमाणात ते ओव्हर व्हेल्यूड आहे. क्रिप्टो मुळे काळे धन आता केश मध्ये ठेवायची गरज नाही आणि उलट सहज पणे ते विदेशांत पाठवले जाऊ शकते. आधी हे कठीण होते.

१०. शेअर मार्केट सुद्धा सुरक्षित नाही मग आभासी चलनावर च बंदी का?

तुषार काळभोर's picture

12 Dec 2021 - 8:59 am | तुषार काळभोर

"मैं धारकको क्ष्क्ष्क्ष रुपये अदा करने का वचन देता हुं|" या भारतीय रिजर्व बँकेच्या गवर्नरच्या शब्दांवर माझा जास्त विश्वास आहे.

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 5:27 pm | मुक्त विहारि

शिवाय, क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणारे एका अर्थाने, काळ्या बाजाराला उत्तेजन देत असतात

अंमली पदार्थांचे पैसे आणि शस्त्रांच्या खरेदीचे पैसे देखील, अशा करन्सीने होण्याची शक्यता आहे

क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणे, हा माझ्या दृष्टीने राष्ट्रद्रोह
आहे....

म्हणून मग कॅश वापरणे सोडून द्यावे लागेल. ज्याला काळे धांदेच करायचे आहेत तो ते कसे ही करतो. नवीन नवीन मार्ग काढतो

मुक्त विहारि's picture

14 Dec 2021 - 7:28 pm | मुक्त विहारि

गेली एक ते दोन वर्षे , मुले कॅशलेस व्यवहार करतात ...

आमचा भाजीवाला पण जीपे वापरतो ...

मुले बरोबर असतील तर मला रोख पैसे वापरायची गरज भासत नाही
----

पुढची पिढी जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करेल, असा अंदाज आहे

> "मैं धारकको क्ष्क्ष्क्ष रुपये अदा करने का वचन देता हुं|"

त्या आश्वासनावर RBI * टाकून खाली "conditions apply" लिहायला विसरली आहे बहुतेक.

लोकांचा त्या आश्वासनावर विशेष विश्वास नाही आणि ते आश्वासन सुद्धा बहुतेक वेळी पाळले जात नाही म्हणूनच मंडळी इतर ठिकाणी पैसे टाकतात.

लोकसंख्येच्या एक टक्क्याचा एक टक्का एवढ्या लोकांचा कदाचित विश्वास नसेल तर त्याचं जनरलायजेशन नाही करता येणार.
आणि ते आश्वासन कधी पाळलं गेलं नाही?
अगदी पंतप्रधान एका रात्री म्हणाले की आता या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. तेव्हाही त्या सहीची किंमत म्हणून लोकांना त्या नोटा देऊन 'पैसे' मिळाले होते. अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे ते आश्वासन पाळलं गेलं नाही?

म्हणूनच मंडळी इतर ठिकाणी पैसे टाकतात.
>>
कोणती मंडळी? त्यांनी भारतीय रुपये वापरणं बंद केलंय का? कमी तरी केलंय का?

रंगीला रतन's picture

13 Dec 2021 - 1:07 pm | रंगीला रतन

जाऊ द्यात हो. १८८ प्रभुंची गादी कोणीतरी चालवली पाहिजे की नाही? त्यांच्या उत्तराधिकारी समजून इग्नोर मारायचा हा का ना का :=) :=)

लोकांचा त्या आश्वासनावर विशेष विश्वास नाही ???
गेला बाजार विचार केला तर भारतीय रहिवाशांची बहुतेक गुंतवणूक भारतीय रुपयात असावी असे वाटते त्यामुळे "मैं धारकको क्ष्क्ष्क्ष रुपये अदा करने का वचन देता हुं|" यावर अजूनही विश्वास लोकांचा आहे नाही का?

> भारतीय रहिवाशांची बहुतेक गुंतवणूक भारतीय रुपयात असावी असे वाटते

इतर पर्याय काय आहे ?

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 11:38 am | चौकस२१२

साहना आपण मुळात जे लिहिले होते कि "लोकांचा त्या आश्वासनावर विशेष विश्वास नाही " त्यावर माझी टिपण्णी होती कि लोकांचा अजूनही भारतीय रिझर्व बँकेचं त्या "मै धारक को .." यावर विश्वास आहे म्हणून बहुतेक गुंतवणूक रुपयांत च आहे कि !

आता तुम्ही विचारताय कि ... इतर पर्याय काय आहे ?
तर सर्वसामान्याला सुद्धा आहे मोकळीक २ लाख पन्नास हजार अमेरिकन डॉलर पर्यंत प्रत्येक भारतीय रहिवाशी भारताबाहेर प्रति वर्षी गुंतवणूक करू शकतो ...
राजरोस पने
मी असं ऐकलंय कि आता त्यासाठी भारतातून ब्रोकर हि उपलब्ध आहेत ( मुखत्वे करून एक्सचेंज ट्रेडेड फंड साठी)
अर्थात अजूनही बहुतेक लिव्हरेजेड प्रॉडक्ट ( भारताबाहेर) मध्ये खेळायला हे २५०,००० वापरात येत नाहीत .
अर्थात हे किती लोक करतात? , अगदी रग्गड पैसे असलेले सुद्धा कारण असे देशाबाहेर गुंतवणूक करणारे फार कमी . पाय उपाय आहे हे खरे
असो क्रिप्टो नामक "सेमी - उंरेगुल्टेड करन्सी (?) हा एक वेगळाच विषय आहे , त्यातील धोके आणि संधी येथे बऱ्यापैकी चर्चिली गेली आहे
तुम्हला त्यात धोका नाही फारसा असे म्हयायचे असेल तर स उद्धरण "धोका कसा नाही" हे दाखवा , सरकार खाजगी / स्वातंत्र्य वैगरे बाजूला ठेउयात केवळ एक "आर्थिक उलाढालीचे साधन " म्हणून बघुयात !
- रोजचे प्रचंड चध उतार
- एक्सचेंज पळून जाणे / चोरी
- किल्ली हरवणे !
- १४०० क्रिप्टो

> यावर विश्वास आहे म्हणून बहुतेक गुंतवणूक रुपयांत च आहे कि !

माझा मूळ आक्षेप ह्या वाक्यावर होता. बहुतेक व्यक्ती रुपयावर विश्वास आहे म्हणून रुपयांत गुंतणवूक करत नाहीत उलट पर्याय नाही म्हणून गुंतवणूक करतात. रुपया इतर चलनात बदलण्यावर भयंकर निर्बंध असल्याने लोकांकडे पर्याय नाही. इतर मार्ग आपण जे सांगत आहात ते क्लिष्ट आणि जास्त रिस्की आहेत. लोकांचा विश्वास "धारक को ..वचन ... " वगैरेवर नाही हे डिमो नंतर बऱ्यापैकी सिद्ध झाले आहे आणि त्यातूनच आपले पैसे इतर मार्गांत गुंतवण्याची आणि विशेषतः विदेशांत पार्क करण्याची बऱ्यापैकी धडपड चालू आहे. आणि डिमो नंतरच नाही तर त्याआधी सुद्धा भारतीय लोक सोने आणि इतर प्रकारची स्थावर मालमत्ता ह्यांत आपले बहुतेक पैसे गुंतवत आले आहेत. जगांतील देशांत सोन्यात पैसे गुंतवण्याचा बाबतीत भारतीय लोक नंबर एक आहेत.

माझे मूळ मत "हातच्या काकणाला आरसा कशाला" ह्या श्रेणीत मोडते. विश्व नाही म्हणूनच इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यात आणि विदेशांत पैसे पार्क करण्यात भारतीय प्रचंड प्रमाणात आघाडीवर आहेत.

> स्वातंत्र्य वैगरे बाजूला ठेउयात

नाही ! बाजूला कशाला ? माझा मुद्दा स्वातंत्र्य हाच आहे. आपला पैसा वाट्टेल तिथे वाट्टेल तसा उधळायला लोक मुक्त असावेत असा आहे.

> आर्थिक उलाढालीचे साधन " म्हणून बघुयात !

माझ्या स्वतःच्या मता प्रमाणे अजून तरी क्रिप्टो "चलन" ह्या प्रकारात मोडत नाही. माझे स्वतःचे मत खालील प्रकारे आहे.

- क्रिप्टो हे चांगले चलन नाही.
- क्रिप्टो हे गुंतवणुकीचे (सुरक्षित) साधन नाही.
- अजून तरी निव्वळ तंत्रज्ञान दृष्टिकोनातून क्रिप्टो विशेष उपयोगी सिद्ध झाले नाही. (तुलनेत इमेल, किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग इत्यादी तात्काळ उपयोगी सिद्ध झाले होते).
- सध्या तरी क्रिप्टोचा प्रमुख उपयोग हा सरकारी नियंत्रणाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पैसे एका ठिकाणहून दुसरीकडे नेणे हा आहे असे वाटते.

USDC सारखे स्टेबल कॉईन त्या दृष्टिकोनातून भारतीयांना जास्त फायद्याचे ठरू शकतात.

आग्या१९९०'s picture

20 Dec 2021 - 3:35 pm | आग्या१९९०

एक क्रिप्टो म्हणजे किती रुपये? त्यासाठी डॉलरचा आधार घ्यावा लागत असेल तर क्रीप्टो चलन नसून कमोडिटी प्रकारात मोडते असेच म्हणावे लागेल.

उन्मेष दिक्षीत's picture

20 Dec 2021 - 5:10 pm | उन्मेष दिक्षीत

एका वाक्यात क्रिप्टो चा क्रिप्टीक विषय समाप्त करुन टाकलेला आहे !

चौकस२१२'s picture

20 Dec 2021 - 6:52 pm | चौकस२१२

साहना आपले " माझ्या स्वतःच्या मता प्रमाणे..." पासूनची पुढं मांडलेली मते समजली आणि त्या मतांशाने सहमत पण आहे
पण सुरवातीचे काही नीट कळले नाही
-रुपया इतर चलनात बदलण्यावर भयंकर निर्बंध असल्याने लोकांकडे पर्याय नाही... २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा तेवढी इतर चलनातील रक्कम बाहेर गुंतवायला परवानगी आहे कि

- विश्व नाही म्हणूनच इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यात आणि विदेशांत पैसे पार्क करण्यात भारतीय प्रचंड प्रमाणात आघाडीवर आहेत. एकीकडे हे म्हणता आणि एकीकडे म्हणता की "इतर मार्ग आपण जे सांगत आहात ते क्लिष्ट आणि जास्त रिस्की आहेत." हि दोन्ही विधाने विरुद्ध अर्थाची नाहीत काय ?
- पुढे म्हणालात कि "जगांतील देशांत सोन्यात पैसे गुंतवण्याचा बाबतीत भारतीय लोक नंबर एक आहेत." मग ते रिस्की नाही?
-
-स्वातंत्र्य म्हणलं तर ते हि ढड नाहीये सुरवातीला आणि शेवटी सरकारमान्य चलनातच वयहार करावा लागतो ... मग स्वातंत्र्य कसलं ?

नक्की काय म्हणायचंय कि फक्त : सरकार ने धवलढवळ करू नये या एकाच मता मुळे गोंधळ झालाय ?

> २५०,००० अमेरिकन डॉलर किंवा तेवढी इतर चलनातील रक्कम बाहेर गुंतवायला परवानगी आहे कि

हि रक्कम फारच कमी आणि अतिशय निर्बंधित आहे. साधारण दोन कोटी रुपये झाले. आणि दोन कोटी गुंतवण्यासाठी जे क्लिष्ट पेपरवर्क करावे लागते ते त्यासाठी worth नाही. सहजपणे जर भारतीयांना विदेशांत stocks वगैरेत पैसे गुंतवता आले असते किंवा डॉलर्स बॉण्ड्स इत्यादीत पैसे गुंतवता आले असते तर जास्त चांगले झाले असते.

> दोन्ही विधाने विरुद्ध अर्थाची नाहीत काय ?

नाही. बहुतेक पैसा जो विदेशांत पाठवला आहे किंवा पार्क केला आहे तो बेकायदेशीर पद्धतीने पाठवला आहे किंवा पार्क केला आहे. म्हणूनच तर ऐश्वर्या राय पासून जॅकलिन पर्यंत लोकांना ED वारंवार बोलावून घेते. आपण एकदा अति श्रीमंत असला कि आपोआप कायद्याचा बाहेरील गोष्टी आपणाला accessible होतात. साधारण मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यम वर्गीय व्यक्तीला आज पर्याय नाही. पण अति श्रीमंत व्यक्तींना पर्याय उपलब्ध आहेत (बेकायदेशीर असले तरी). कायदेशीर पर्याय असते तर बहुतेक व्यक्तींनी तेच प्रेफर केले असते.

गुजरात मध्ये दारूला बंदी असली तरी दारुडे भरपूर आहेत. महाराष्ट्रांत दारूवर निर्बंध असले तरी असंख्य लोक दारू पितात आणि ड्रग्स वर संपूर्ण बंदी असली तरी असंख्य ठिकाणी आणि लोक ड्रग्स चा आस्वाद घेतात. हे सर्व विरोधाभासी वाटले तरी प्रत्यक्षांत नाही.

> - पुढे म्हणालात कि "जगांतील देशांत सोन्यात पैसे गुंतवण्याचा बाबतीत भारतीय लोक नंबर एक आहेत." मग ते रिस्की नाही?

रिस्क विषयी मी काहीही विधान केले नाही. रुपयावर लोकांचा भरोसा जितका आहे असे तुम्ही सांगतात तितका तो प्रत्यक्षांत नाही असे मी म्हटले आहे.

एकूणच रुपया किंवा रोख गुंतवणुकीवर भारतीयांना विशेष विश्वास नाही म्हणूनच भारतीय लोक सोन्यात खूप गुंतवणूक करतात. सोने सुद्धा रिस्की असेल, पण सर्व काही रुपयांत ठेवण्यापेक्षा थोडी रिस्क स्प्रेड करावी म्हणून लोक सोन्यात गुंतवणूक करत असतील.
(सध्या व्हेनेझुएला मध्ये लोक सोन्याचा किस देऊन बाजार करत आहेत)

सुबोध खरे's picture

21 Dec 2021 - 10:07 am | सुबोध खरे

परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज परवडते असे लोक सुद्धा भारतात गुंतवणूक करतात याचे कारण भारतात अगदी बँकाच्या मुदत ठेवींचे दर सुद्धा अमेरिका युरोप जपान पेक्षा जास्त आहेत.

भारतात चलनफुगवटा जास्त असल्याने सर्वच दर जास्त आहेत या शिवाय भारतीय शेअर बाजारातून नफा इतर बाजारांपेक्षा जास्त मिळत असल्याने परदेशी गुंतवणूकदार भारताकडे निवेश करण्यासाठी येतात.

बहुसंख्य पेंशन फंड भारत सारख्या उगवत्या बाजारात आपले फंड का जमा करतात याचे कारण शोधा.

माझ्या माहितीतील बहुसंख्य अनिवासी भारतीयांची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत आई वडिलांच्या नवे गुंतवणूक आहे कारण हा दर पूर्वी ८-८.५ होता तर आता ७ टक्के आहे. हा दर जगातील कोणत्याही देशातील सुरक्षित गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे आणि अनिवासी भारतीयांना भारत सरकारच्या अशा सार्वभौम गुंतवणुकीवर पूर्ण विश्वास आहे.

बाकी उच्च वर्गातील लोकांची (नट नट्या राजकारणी आणि उद्योजक) पैसे बाहेर गुंतवण्याची कारणे वेगवेगळी आहेत त्यात बेकायदेशीर कारणेच जास्त आहेत.

प्रत्येक सरकारी गोष्ट हि वाईटच असा ग्रह असलेल्या लोकांचे प्रबोधन करणे कठीण आहे

हा प्रतिसाद तसा बाळबोध आहे यांची मला जाणीव आहे पण हेच सत्य आहे

आग्या१९९०'s picture

21 Dec 2021 - 12:01 pm | आग्या१९९०

सहमत

> परदेशात गुंतवणूक ज्यांना सहज परवडते असे लोक सुद्धा भारतात गुंतवणूक करतात याचे कारण भारतात अगदी बँकाच्या मुदत ठेवींचे दर सुद्धा अमेरिका युरोप जपान पेक्षा जास्त आहेत.

मुदत ठेवीचे दर जास्त वाटले तरी चलन किंमत कमी होत गेल्याने त्याचा विशेष फरक पडत नाही. भारतातील एकूण विदेशी गुंतवणूक सिंगापुर पेक्षा कमी आहे.

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 9:41 am | सुबोध खरे

मुदत ठेवीचे दर जास्त वाटले तरी चलन किंमत कमी होत गेल्याने त्याचा विशेष फरक पडत नाही

साफ चूक

२०१३ साली डॉलर ६० रुपयाचा आसपास होता आणि आता ७५ च्या आसपास म्हणजेच डॉलर ७ वर्षात फक्त २५ % ने वधारला आहे

पी पी एफ चा दर तेंव्हा ८. ७ होता आणि आता ७.१ आहे म्हणजे सरासरी ८ टक्के धरला तरी ७ वर्षात ७२ टक्के वाढ होते

कुठे ७२ % आणि कुठे २५ %

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 9:43 am | सुबोध खरे

थोडी चूक झाली

८ वर्षात पी पी एफ ची गुंतवणूक ८५ टक्क्यांनी वाढली.

म्हणजेच हा फरक ६० % होतो

कुठे ८५ % आणि कुठे २५ %

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 10:01 am | चौकस२१२

कुठे ८५ % आणि कुठे २५ %
डॉक्टर हे गणित जरी खरे असले तरी आमच्या दृष्टीने २-३ अजून मुद्दे विचारात घयावे लागतात
येथे हे गृहीत धरले आहे कि
१) आपण कायम भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीय माणसाबद्दल बोलतोय
२) आणि बहुतेक करून एक मानसिक समाधान भावनिक गुंतवणूक सोडले तर त्याच्या दृष्टीने भारतात गुंतवणूक करणे आणि इतर कोणत्याही देशात करणे यात फरक नसतो
३) अश्या परदेशी भारतीयांत (येथील सुद्धा मध्यमवर्गिय एन आर या बद्दल) जे येथेही गडगंज आहे त्या बद्दल नाही

तर वरील ३ गोष्टी धरल्यास येणार हे मुद्दे

- आपण लिहिलेले गणित नेहमीच तसे असेल असे नाही .
- अभारीतयाला भारतीय पी एफ मध्ये कसे गुंतवता येईल? आणि त्याचा आयकर फायदा प्रदेशात कसा काय घेता येईल ?
- हा जो ७-८ % परतावा मिळतो तो रुपयात ठेवी वर जी परत कधीही बाहेर नेता येत नाही ..एन आर ओ आणि एन आर इ यातील फरक ! हा फरक फार म्हणजे फार महत्वाचा आहे .. भले शेवटी थोडे भारतात जास्त मिळाले तरी ते जर अधिकृत रित्या बाहेर काढता येत नसतील तर माणूस म्हणतो कशाला फंदात पडा
- देशादेशाप्रमे निवृत्ती चा पैसे कुठे ठेवता येईल याचं संज्ञा वेगळी असतात उदाहरण सिंगापोर मध्ये निवृत्ती फंडातील पैसे राहते घर घेण्यासाठी वापरता येतो , ऑस्ट्रेल्यात नाही इत्यादी

तेवहा सरसकटीकरण करून मी असं म्हणेन कि जो पाशात्य देशात कायमचा राहणार आहे तो एक ठराविक , ,मर्यादे पेक्षा जास्त भारतात प्रत्यक्ष गुंतवत नाही ( घर आणि भारत सोडतांना अशीच काय ठेवले असतील ते आणि नातिरेवाईकांसाठी ) हा हे खरे कि त्याचा येथील फंड फॉरीन इन्व्हेस्टमेंट म्हणून भारतात गुंतवत असेल .. पण ते वेगळे त्यातील परतावा त्यानं भारत सरकार परत नेऊ देते म्हणून नाहीतर ते हि होणार नाही

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 11:41 am | सुबोध खरे

माझ्या माहितीतील बहुसंख्य अनिवासी भारतीयांची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत आई वडिलांच्या नावे गुंतवणूक आहे

हे वाचलंय का?

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 12:01 pm | चौकस२१२

हो वाचलं ती एक क्लुप्ती अ सु शकेल आयकर किंवा आर बी आय साठी
पण आपण जर म्हणत असाल कि " बहुतेक अनिवासी भारतीय आपले त्या त्या देशातील निवृत्ती फंडाला भारतात गुंतवणूक गुंतवन्तो ? तर अतिशय अवघड वाटतय .
.. पण एक तर आपण हे नमूद करीत नाहीये कि कोणते अनिवासी ? आखाती किंवा पाश्चिमात्य? कायमचे राहत येत नाही , पाश्चिमात्य देशात येते हे दर्शवते कि गरजेट मूलभूत फरक आहे हे ... मी लिहिले आहे
दुसरे असे कि जरी असे कि हे अवघड करणे अवघड किंवा अशक्य आहे मी सिंगापुर आणि ऑस्ट्रेल्या चे उद्धरण दिले आहे

परत एकदा ऑस्ट्रेलयातील उदाहरण देतो येथे आपलं निवृत्ती फंड एक तर इंडस्ट्री मधील फंड मॅनेजर ला देऊ शातो किंवा शकतो
स्वतः चालवत असाल तर त्याला सेल्फ मानजेड म्हणतात आणि आशय फंडल्ला जरी तांत्रिक दृष्ट्या भारतात थेट गुंतवणूक करीत येत असली आणि परतावा चांगला मिळत असला ) अगदी तुम्ही म्हणता तसे एकूण गणित फायद्याचे असले तरी मला जर निवृत्ती नंतर येथेच राहायचे आहे तर तो फंड लागणार
मग अडकेल ना ते पैसे

एन आर ओ / एन आर इ हा फरक समजून घ्या साहेब

री पॅट्रिइशान अवघड आणि जरी शक्य असले तरी करन्सी रेट ची जोखीम

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 12:13 pm | सुबोध खरे

माझ्या माहितीतील हा शब्दप्रयोग कृपया वाचा

अर्थात हे सर्व माझे वर्गमित्र किंवा त्याच्या आसपासचे आहेत ( इतरांशी आर्थिक बाबतीत चर्चा होणे कठीण जाते) आणि बहुसंख्य अमेरिकेतच आहेत.

जे युरोपात आहेत ते (ब्रिटन सोडून) सर्व परत येण्याच्या विचारात आहेत.

शिवाय आई किंवा वडील सोडून दुसऱ्यांच्या नावावर सहसा भारतीय माणूस गुंतवणूक करत नाही.

मुळात हा प्रतिसाद साहना ताईंच्या प्रतिसादाला होता ज्यात

रुपयावर लोकांचा भरोसा जितका आहे असे तुम्ही सांगतात तितका तो प्रत्यक्षांत नाही असे मी म्हटले आहे.

एकूणच रुपया किंवा रोख गुंतवणुकीवर भारतीयांना विशेष विश्वास नाही

असे म्हटलेले आहे

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 12:38 pm | चौकस२१२

डॉक्टर ... आपण जो साहना ताईंच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिलात यांचेशी सहमत आहे, ( बहुतेक भारतीयांचा "... धारक को ... यावर विश्वास आहे , माझा हि आहे ) आपला मतभेद एवढाच कि "बहुतेक अनिवासी भारतीय आपलं रिटायरमेंट चा पैसे साठवताना भारतात गुंतवतात या आपल्या विधानावर "

कितीतरी तांत्रिक मुद्दे आहेत मी विस्तृत केले अडचणी आहेत
बर अमेरिकेत भारतीय म्हणजे कोण ? एच १ ब वर जास्तीत जास्त जास्त ६ वर्षे ! म्हणजे आखाती सारखेच कायमच्या रहिवाशनपैकी पैकी किती जण?

हा हे ठीक कि परत येणार असतील हि .. पण अमेरिकन निवृत्ती फंडाला असे मुळात करता येते का?

मी हे गृहिट धरतोय कि अनिवासी नोकरी व्यायसाय करताना त्याला जे सक्तीचे निवृत्ती फंडात पैसे त्या पैशांबद्दल न बद्दल बोलतोय
उदाहरण : सिगापुरे = एकूण ३७% तुमचे १७ आणि मालकाचे २०%
ऑस्ट्रेल्या = तुमचे भरलं तेवढे , मालकाचे १०%

हे जे पैसे साचतात ५५/६५ पर्यंत त्याबद्दल बोलतोय
हे पैसे पगारातून काढले जातात .. भारतासारखेच

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 7:13 am | चौकस२१२

माझ्या माहितीतील बहुसंख्य अनिवासी भारतीयांची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत आई वडिलांच्या नवे गुंतवणूक आहे

आपण "कोणत्या" परदेशाची भारतीयांबद्दल म्हणताय त्यावर अवलंबून आहे . ज्यांना परत भारतात यायचेच आहे ( आखाती देशातील वैगरे ) त्यांचे असे असेल पण जे परदेशी कायम रहिवासी किंवा नागरिक अमिरीक, कानडा, ऑस्ट्रेललिया इत्यादी होतात ( ते स्थानिक पेन्शन फंड मध्येच गुंतवतात भारतात प्रत्यक्ष फार कमी कारण
१) रुपयाची घसरती किंमत ( जरी वार्षिक परतावा असला तरी )
२) पैसे लागतील परत अभारतीय चलनात आणणे जिकिरीचे किंवा अशक्य
३) परदेश ( अमिरीक, कानडा, ऑस्ट्रेललिया इत्यादी) येथील जो काही निवृत्ती फंड असतो तो एकतर स्वतःला प्रत्यक्ष चालवत येत नाही किंवा जरी सेल्फ मॅनेज्ड ( ऑस्त्रेयात तशी सोया आहे ) असेल तरी त्याला परदेशइ ( भारतात ) गुंतवणूक करताना बंधने खुप असतात )

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 11:53 am | सुबोध खरे

Case 3: Gift by Indian parents to child residing in the US

Tax in USA:
In USA, the gift giver (donor) pays tax. In the current case, the Indian parents are not US persons and are not liable for US tax. Accordingly, gift tax does not apply.

As a US person, you are required to report any gift (or bequest) from a foreign person if it exceeds USD 100,000 in a year. Form 3520 will have to filled in such a case.

Tax in India:
In India, there would be no tax implications on the children since this is a gift from a "relative".

https://www.thegalacticadvisors.com/post/gift-tax-in-india-and-usa

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 12:19 pm | चौकस२१२

In India, there would be no tax implications on the children since this is a gift from a "relative".
तर ठीक आहे कि अशी भेट पाठवली तर भारतात टॅक्स नाही पण तो फक्त १ भाग झाला

आपण बोलतोय ते हे कि येथील ( माझा स्वतः चालवलेला रिटायरमेंट फंडातून असे पैसे पाठवता येतील का? ) तर उत्तर नाही असे आहे कारण येथील नियमाप्रमाणे हा निवृत्ती फंड " परतवा मिळण्यासाठीच गुंतवणूक करू शकतो मग भेट कशी पाठवणार
काही देशात तर "असा स्वतः फंड चालवता पण येत नाही "
बर आणि असे गुंतवायचे असतील तर डायरेक्ट गुंतवू शकतो कि आई बाबा कशाला ?
पण मग प्रश्न री पॅट्रिअशन हा आहे हे हि मी नमूद केले आहे आणि हे काही फक्त ऑस्ट्रेल्याला लागू होत नाही इतर कोणतयाही देशातून भारतातात गुंतवणूक याला होते

मी यात बऱ्यापैकी विचार आणि अभ्यास केलं आहे , कारण मी माझा स्वतःचा रिटायरमेंट फंड चालवतो आणि ट्रस्टी म्हणून बंधने माहिती आहेत

आपण जे "आई वडिलांचं नावाने " हे येथील टॅक्स भरून मग चा पैसे असे असावे . पण तसे तरी का करेल माणूस कारण मग टॅक्स चा फायदा मिळत नाही येथे

येथून भारतात गुंतवणूक सर्वसामान्याला करायाची तर
१) भावनिक म्हणून
२) नातलगांसाठी किंवा आपण स्वतः कायमचे भारतात परत जाणार असलो तर
३) री पॅट्रिअशन आणि करन्सी रिस्क घेण्याची तयारी असेल तर

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 7:06 am | चौकस२१२

हि रक्कम फारच कमी आणि अतिशय निर्बंधित आहे. साधारण दोन कोटी रुपये झाले.????
कमी ?
सहजपणे जर भारतीयांना विदेशांत stocks वगैरेत पैसे गुंतवता आले असते किंवा डॉलर्स बॉण्ड्स इत्यादीत पैसे गुंतवता आले असते तर जास्त चांगले झाले असते.
हे २५०,०००

अहो त्या २५०,००० वर तेच तर बंधन आहे ... २५०,००० हे परदेशी मालमत्ता आणि लिस्टेड शेअर मध्ये गुंतवयायाला परवानगी आहे . उलट लिव्हरेजेड ट्रेडिंग मध्ये गुंतवायला परवानगी नाही
मग अजून काय सोपे? तुमचा काही तरी गोंधळ; ?झालाय का
https://m.rbi.org.in/scripts/FAQView.aspx?Id=32
https://groww.in/blog/how-to-invest-outside-india/

साधारण मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यम वर्गीय बद्दल चा बोलतोय आपण . कळा पैसा आणि अति श्रीमंत बद्दल नाही... उगाच ते कशाला आणताय मध्ये
हा पर्याय असून सुद्धा तो ( सरकारी आणि खाजगी रोखे , स्थानिक शेअर आणि स्थानिक मालमत्ता जी कि " भारतीय रुपयात आहे " आणि रिसर्व बँकेवर भरोसा असल्यामुळे तिथे गुंतवतो भरोसा जर नसता तर हे असते का ?
एकूण अस दिसतंय कि "सरकार ने काह्ही हस्तक्षेप करू नये या एकला चालो रे या श्रदेहमुळे तुम्ही काय वाटेल ते म्हणताय "

सुबोध खरे's picture

22 Dec 2021 - 11:50 am | सुबोध खरे

२५०,००० अमेरिकन डॉलर किंवा तेवढी इतर चलनातील रक्कम बाहेर गुंतवायला परवानगी आहे कि

हि रक्कम फारच कमी आणि अतिशय निर्बंधित आहे

किती अमेरिकी लोकांना एवढा पगार वार्षिक असतो?

आणि त्यातून किती लोकांची २,५०,०००/- डॉलर्स एवढी बचत होते?

दोन कोटी गुंतवण्यासाठी जे क्लिष्ट पेपरवर्क करावे लागते ते त्यासाठी worth नाही.

आणि २ कोटी रुपये नगण्य आहेत?.

केवळ त्याच्या ०. १ टक्के पैशात (२० हजार रुपयात) कोणताही सी ए/ कर सल्लागार आपल्याला हे पेपर वर्क हसत हसत करून देईल

चौकस२१२'s picture

22 Dec 2021 - 12:20 pm | चौकस२१२

सहमत आहे .. डॉक्टर अप्लाय या विधानाशी

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Dec 2021 - 5:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

नियंत्रण सिटेल।आरबीआयचे, असे वाचण्यात आलेय.

हल्ली रुपयाचा ओघ कंट्रोलमध्ये ठेवून आरबीआय महागाई दर नियंत्रित (?) करण्याचा प्रयत्न करत असते म्हणे.

तुषार काळभोर's picture

12 Dec 2021 - 5:46 pm | तुषार काळभोर

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दर तीन महिन्यांनी आर्थिक पतधोरण - Monetory Policy- जाहीर करतात (रेपो, रिव्हर्स रेपो दर) ती कशासाठी असते?

तुर्रमखान's picture

13 Dec 2021 - 2:07 am | तुर्रमखान

क्रिप्टोवर अंकुश आणणे म्हणजे त्याचा मूळ उदेश्यच नाहिसा करणे होइल त्यामुळे कुणालाच क्रिप्टोवर अंकुश ठेवणं शक्य नाही आणि झालाच तर मग दुसर्‍या चलनांमध्ये आणि क्रिप्टोमध्ये जास्त फरक नसणार आहे. त्या-त्या देशांतल्या चलना मध्ये रुपांतर करण्याचा गेटवर काही अंकूश ठेवणं शक्य आहे. जिथे ही रेग्युलेशन्स आहेत तिथं असच आहे. बाकी क्रिप्टोमध्ये तुम्ही कितीवेळा ट्रॅन्जॅक्शन्स केलीत ही माहिती त्यांना नसते आणि काही देणंघेणं नसतं. फक्त एन्कॅश करताना (बँक ट्रान्सफर करताना) ठराविक कर भरावा लागतो. (चुभुदेघे).

चिटफंडमध्ये लोकांची फसवणुक होत असते इथे तर फ्रॉडस्टर्सना कुरणंच मोकळं आहे. फसवणुक झालेली लोकं शेवटी सरकारकडेच न्याय मागायला येतात. या लोकांची संख्या बरीच असेल तर त्या दृष्टीने काही रेग्युलेशन्स आवश्यक ठरतात.

मी स्वतः क्रिप्टोमध्ये गुंतवणुक्/ट्रेड करत नाही कारण हा फक्त काल्पनिक बुडबुडा आहे असं माझं मत आहे. त्यामागची फिलॉसॉफी (ट्रॅन्सपरन्सी, डेमॉक्रटायझेशन ऑफ इकॉनमी वैग्रे) आणि तंत्रज्ञान (ब्लॉकचेन वैग्रे) हे मला समजलं असलं तरिही हे सध्यातरी सेल्फसस्टेनिंग नाही. म्हणजे रोज बाजारात नविन क्रिप्टो येत आहेत आणि त्याचं मुल्य फक्त आणि फक्त मागणी-पुरवठा यांच्यावर अवलंबून आहे. इतर ट्रेडेबल सॉफ्ट इंस्ट्रुमेंट म्हणजे शेअर्सचे भाव असेच असतात असं एक काउंटर आर्ग्युमेंट असतं पण १००% तेच नसतं. काही इनटँजिबल गोष्टी जसं की ब्रँड वॅल्यु, मार्केटचा कल वगैरे भाव ठरवतात. पण शेवटी कंपनीचे शेअर्स लिमिटिड संख्येत असतात आणि त्यांच्याकडे सॉलिड अ‍ॅसेट असतात. ती विकून तुमची देणी देवू शकतात.

क्रिप्टो बद्दल जणू असे झालाय एकतर तुम्ही भक्त किंवा विरोधी ... पण साधक बाधक विचार फार कमी लोक करतात

यातील काही मुद्दे ( मी हे आधीच कबुल करतो या कडे केवळ फक्त स्पेक्युलेटीव्ह म्हणून बघतो ...स्टोर ऑफ व्हॅल्यू मानत नाही )
१) या मागील जे तंत्र आहे त्याबद्दल वाद नाही त्याचा उपयोग काही क्षेत्रात होईल हि , वाद आहे त्यातील तो हि एक करन्सी म्हणून लोक विश्वास ठेव्वयला तयार आहेत का आणि त्याचे नियंत्रण कसे असावे कि नसावे ? आणि त्याचे भयंकर चढ उतार असे जे स्वरूप आहे त्यात "उलाढाल " करणाऱ्यांना शेर मार्केट सारखे नियंत्रित एकचेन्ज असावे कि कसे या बद्दल
यातील भक्त लोक या गोंष्टींकडे काना डोळा करून फक्त " हे नवीन आहे , म्हणजे मस्तच आहे " असे जर म्हणत असतील किंवा हे मिलेनियम जनरेशन ला कळते बाकी सगळे मूर्ख असे म्हणे असेल तर पुढे बोलणे नाही.

२) हे खरंच गुपचूप आहे का? तर नाही कारण गुंतवायला आधी पारंपरिक चलन ( कोंत्येही असो ) दयावे लागते म्हणजे त्याची नोंद होते आणि सध्या तरी त्यातून परत घेताना जगभर फियाट करन्सी ( हे नाव काही कळले नाही पण म्हणजे सरकारमान्य चलने ) मध्ये रूपांतर करावे लागते म्हणजे परत नोंद होते ..

३) यात स्टोर ऑफ व्हॅल्यू आहे का? तर मला तरी नाही असे म्हणावेसे वाटते उद्धरण देतो
- युरो हे चलन अस्तत्वात नवहते एक रात्री ते अस्तित्वात आले आणि मुख्य कारण हेच कि त्यामागे त्या देशांची मिळून असलेली " पत " आणि त्या "पती" वर लोकांचा असलेला विश्वास . हा विश्वास का तर जर्मनी आणि देशांची अंगभूत संपत्ती
- क्रिप्टो मागे काय आहे ? भोपळा ?
४) आज हे उद्या ते " धरुयात कि आज बिटकॉइन हे आवडते क्रिप्टो आहे उदया दुसरे येईल मग त्यात आणि आज जे पौंड , कानडा डॉलर आहेत त्यात आणि यात फरक काय?
उदय जर भारत क्रिप्टो , सिनो क्रिप्टो, युरो क्रिप्टो असे निघाले तर आता जो मल्टि करन्सी प्रश्न आहे तोच राहतो !
५)आजमितीला संपूर्ण सप्लाय चेन जो पर्यंत हे चलन घेत नाहि तो पर्यंत काय अर्थ आहे ?
६) वापरण्याची सोय ०. ००००६७ क्रिप्टो द्या एक काप भर चहाला ..!

७) फक्त स्पेक्युलेटीव्ह : एक्सचेंज मश्रुम उगवावेत तसे हे क्रिप्टो एक्सचेंज उगवले आणि लोकांचे पैसे त्यात गेले .. गेला बाजार न्यूयॉर्क , लंडन किंवा सिंगापुर एक्सचेंकंज बुडाले असे कधी ?ऐकलंय .. भकताना यावर कोणतेही बंधन बंधन नकोय ! का? बिटमेक्स चे उदाहरण घ्या

ऑस्ट्रेलियात एक म्ह्नन आहे कि "हे ऑस्ट्रेलियन कशावर हि जुगार खेळतील .. उदय कोणी जर २ झुरळनापिकी कोण आधी पुढे पळेल असे " बेट मार्केट" असेल तर त्यावर हि लोक बेट लावतील" या जुगार खेळायला हे उत्तम आहे , ती करन्सी आह तेम्हणून भक्तांनी कंठशोष करू नये

अजून तरी रिसर्व बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया यांची पत यावरच आपलाही विश्वास आहे

उगाच फ्री मार्केट , मिलेनियम ची जरुरत . सरकार पासून मुक्तता... हा चावटपणा आहे शेवटी संपत्ती आणि पैसे यावर थोडे तरी नोयंत्रण हे हवेच आणि फ्री मार्केट इकॉनॉमी यावर विश्वास असले तरी हे क्रिप्टो एकूण सध्या तरी मला तरी दूर राहावेसे वाटते

आणि हो जाता जाता ज्या कोणाला यात "खेळायचे " असेल मोठया चिकागो सारखया मोठया नियंत्रित बाजारातील लिस्टेड क्रिप्टो फुचुर वर खेळावे .. दाहकता सहन करता येत असेल तर !

गवि's picture

13 Dec 2021 - 8:08 am | गवि

प्रतिसाद आवडला. सर्व मह्त्वाचे मुद्दे आले आहेत.

बाकी कशावरही जुगार लावणे यावर काय बोलावे. हे ऑस्ट्रेलियाला लागू आहे असे मुळीच नाही. कोणत्या जिलबीवर माशी बसते त्यावरही पैसे लावले जातात असं मागे कोणत्यातरी कार्यक्रमात बघितलं होतं. रँडम आऊटपुट ही इतकी आकर्षक गोष्ट आहे की ती कोणत्याही खेळाला "खेळ" बनवते.

प्रयत्न, बुद्धी यांचा वाटा आणि रँडम आऊटपुटसचा वाटा यांचं प्रमाण 99% विरुद्ध 1% असेल तर ती कठीण स्पर्धा परीक्षा/ बुद्धिबळ, 90% विरुद्ध 10% असेल तर मैदानी खेळ/ क्रिकेट/फुटबॉल.. आणि उलट दिशेला जाऊन 1% विरुद्ध 99% असेल तर पत्ते, जुगार. तूर्तास क्रिप्र्टो ही या टोकाला आहे.

आपले आर्थिक आयुष्य हा खेळच आहे हे मान्य. तो या अक्षावर कुठे असावा हे आपल्या हातात आहे. जो जे वान्छील तो ते लाहो.

जो जे वान्छील तो ते लाहो.????
लोकांचा पै सा नि त्याची देखरेख आणि एकूणच आर्थिक प्रोडकट चे रेगुलेशन या बाबतीक फार लवचिक असले तर वाईट.. लोक याचा बहरपूर फायदा घेतात तेव्हा तिथे तरी सरकारचा दंडुका असावा या मताचा आहे मी
मूळ एकचेन्ज ( लंडन ते सिडनी ) आणि मश्रुम उगवनारी टिनपाट देशातील ( सायप्रस वनवाटू किंवा अगदी इस्राएल ) एकचेन्ज त्यातील लिस्ट केलेली प्रोडकट आणि ओव्हर द कौंटर प्रोडकट या बद्दल अभ्यास करूनहे मत बनले आहे
फोरेईन एक्सचेंज ट्रेडिंग मध्ये असे टिनपाट खूप आहेत लोक , बायनरी ऑप्शन चे असेच , आणि क्रिप्टो पण

तुमच्या मुद्द्यात दम आहेच. प्रश्नच नाही. पण असा दंडुका नेहमी इफेक्टीव ठरतोच असं नाही. ज्याला करायचे तो कसेही करतोच. आपापला पैसा कोणाला जुगारात लावायचाच असेल तर त्यांची मर्जी.. त्यांची इच्छा पूर्ण होवो, अशा अर्थाने काहीसे उपरोधात्मक वाक्य होते ते.

साहना's picture

17 Dec 2021 - 12:41 am | साहना

+१

सर्व मुद्दे पटले. तालेब ह्यांच्या "ब्लॅक पेपर" मध्ये हेच मुद्दे मांडले गेले आहेत.

४. मुळात ह्या चलनावर काही मागोवा राहत नाही मग सरकार अंकुश कसा ठेवणार? तेवढी तांत्रिक तयारी आहे का?

हे अर्धसत्य आहे. दोनतीन मार्गांनी हे चलन मिळणे शक्य आहे.

एक. कोणती तरी वस्तू/ सेवा पुरवून मोबदला क्रिप्टोरुपात घेणे. आपणही अन्य सेवा वस्तू याच चलनाचा वापर करुन थेट घेणे. यात मागोवा शक्य नाही, पण ही देवघेव अत्यंत मर्यादित वर्तुळात शक्य आहे. मुख्यत: बेकायदेशीर हद्दीत.

दोन. मायनिंग. याला मर्यादा आहेत. एक तर संख्या मर्यादित, दुसरे म्हणजे फार जास्त तांत्रिक रिसोर्स आणि ज्ञान. हे सामान्य नागरिकांच्या लोकसंख्येला शक्य नाही.

तीन. आपल्या देशाचे चलन देऊन क्रिप्टो विकत घेणे. तूर्त हा तिसरा मार्ग सर्वसामान्य लोक वापरत आहेत. त्यासाठी पूर्ण केवायसी वगैरे करुन, बँक खाते संलग्न करुनच व्यवहार होताहेत. वर चौकस यांनी हा मुद्दा मांडलाच आहे. या मार्गात मागोवा नाही असे म्हणता येणार नाही.

हे ठीक आहे पण मधल्या व्यवहारात राहत नाही. आणि मुख्य मुद्दा तोच आहे की अंकुश कसा ठेवणार. तेवढी सरकारची तांत्रिक तयारी आहे का?

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 9:52 am | चौकस२१२

तीन. आपल्या देशाचे चलन देऊन क्रिप्टो विकत घेणे. तूर्त हा तिसरा मार्ग सर्वसामान्य लोक वापरत आहेत.
बरोबर
आणि त्यात असंख् प्रश्न आहेत
- हि एकचेन्ज फारशी नोयंत्रित नाहीत
- अनेक बुडतात / चोरी होते
- सेंट्रल एकचेन्ज नाही किंवा शेर साठी अमेरिकेत जशी वेगवेगळी एकचेन्ज " बेस्ट बीड बेस्ट ऑफर ची सक्ती " असते ब्रोकर वर.. तसे काही नाही
- थथाकथित एकचेन्जच विरुद्ध खेळले कि काय याची शाश्वती नाही
आधी म्हणल्याप्रमाणे लंडन ते सिडनी पर्यंत फुचर किंवा ऑप्शन उलाढाल करणारी एक्सचेंज आहेत त्यात सुधा झोल घालणारे झोल घालतात तर या टिनपाट देशातील
एक्सचेंज ची काय कथा

तर या टिनपाट देशातील एक्सचेंज ची काय कथा

तुम्हाला:

या देशातील काही (नव्याने उगवलेल्या) टिनपाट क्रिप्टो एक्सचेन्जेसची काय कथा?

..असे म्हणायचे आहे का.

अन्यथा आक्षेपार्ह वाटते.

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 11:15 am | चौकस२१२

१० हजार डॉल रमध्ये " आर्थिक उलाढालीचे केंद्र ( एक्सस्चेंज ) उभा करता येते अश्या सेशल्स , वानुवाटू या सारखया देशांबद्दल
अनेक क्रिप्टो, एफ एक्स , सी एफ दि देणारे " तथाखतीत ब्रोकर " जिथे सहज आपले दुकान मांडू शकतात आशय त्या मरतुकड्या आर्थिक वचक असेलल्या देशांबद्दल
भारत या क्षेत्रात तास कडक आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2021 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> या टिनपाट देशातील
एक्सचेंज ची काय कथा.

भारतात शिकून सवरुन मोठं व्हायचं. परदेशात स्थायिक व्हायचं. तिकडे बक्कळ पैसा कमवायचा आणि तिथे बसून या देशात सतत नाक खुपसायचं, अक्कल शिकवायची, आणि पुन्हा टीनपाट म्हणायचं...असल्या फालतू वृत्तीचे लोक डोक्यात जातात.

-दिलीप बिरुटे
(भड़कलेला कट्टर भारतीय)

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 11:08 am | चौकस२१२

प्राध्यपक दिलीप बिरुटे आपली माझ्य विधानाबद्दल प्रचंड गैरसमजूत झाली आहे .. ती दूर करण्याचाच प्रयत्न करतो

मी "टिनपाट" देश हे भारताला उद्देशून अजिबात म्हणले नाही ... ते होते ते वानुवाटू, , सेशल्स सायप्रस इत्यादी देशाना उद्देशून ते सुद्धा या संधर्भात कि या डेशातील फॅनॅन्सील लायसन्स मिल्ने हे भारत, इंग्लड सिंगापोर इत्यादी देशांपेक्षा अतिशय सोप्पे असते ( सिंगापुर मध्ये जर फिनान्शिअल सेर्विसिस चा परवाना मिळवायचा तर २० लाख डॉलर ठेव असावी लागते .. तेच सेशल काही हजारात काम होते )

माझ्य लिखाणाचं ओघात जर अशी समजूत झाली असेल कि भारताला टिनपाट म्हणत आहे तर क्षमा पण तसे का म्हणण्याचाच माझा तिळ्मातर हेतू नवहता
आता हे वाचून आपण माझ्यावरील "परदेशी राहून अक्कल शिकवायची," हा आरोप मागे घ्याल अशी अशा करतो
राहिले कमवण्याबद्दल.. तर ते भारतात राहणारे हि कअँव्वायच्या मागे असतात ..कोण्ही चिचिके घेऊन काम करीत नाही असो मूळ गैरसमज दूर करावा अशी विनंती

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 11:24 am | चौकस२१२

राहिले कमवण्याबद्दल.. तर ते भारतात राहणारे कमवण्याच्या मागे असतातच कि ..कोण्ही चिंचोके घेऊन काम करीत नाही !

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2021 - 12:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

वर लिहिलेले सर्व मुद्दे वाचले. या विषयाला आर्थिक,सामाजिक,कायदेशीर्,तांत्रिक अशा अनेक बाजु आहेत. एखादे नवीन तंत्रज्ञान जेव्हा बाजारात येते, तेव्हा त्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतातच. मग ते जेनेटिकल क्षेत्रातील असो, संरक्षण्,कृषी किवा अन्य काहिही. तसेच कूटचलनाचेही आहे. पण चिंतेची गोष्ट अशी आहे की आजकालच्या तंत्रज्ञानाच्या झपाटयात या सगळ्याचा वापर प्रथम होउ लागलाय आणि कायदे,नियमावली नंतर बनत आहेत. त्यामुळे गैरव्यवहार किवा चोरीछुपे गोष्टी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे आणि त्यातुन फसवणुक होत आहे किवा बेकायदेशीर कृत्ये होत आहेत.

त्यातही श्रीमंत कंपन्या किवा उत्पादने साम्,दाम,दंड्,भेद वापरुन आपल्या सोयीचे कायदे पास करुन उजळ माथ्याने वावरत आहेत. आणि जे तसे करुन शकत नाहियेत ते वेगवेगळे छुपे मार्ग चोखाळत आहेत. यावर सरसकट उपाय असा नाही, पण जोवर लोकांची झटपट पैसे कमावण्याची, कर वाचवण्याची, आणि कायद्यातुन पळवाटा शोधायची वृती आहे तोवर हे चालुच राहणार. मग कधी तो सट्टा/बेटींग असेल, कधी मटका/लॉटरी तर कधी अजुन काही.

मी कूटचलनात थोडीफार गुंतवणुक केली आहे, पण त्याविषयी फारसा आशावादी नाही. एकतर ते मार्केट खुपच अनिश्चित आहे, विश्वासार्ह नाही,परतावा मिळेलच अशी खात्री नाही, आणि सरकारी नियमांविषयी तर सगळाच गोंधळ आहे.

शेवटी कूटचलनाविषयी लिहिलेला माझा लेख (जाहिरात) अर्थात हा लेख लिहिला तेव्हा मला कूटचलनाविषयी बेसिक माहिती होती आणि त्या भरात तो लिहिला आहे.
http://misalpav.com/node/48610

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 1:20 pm | चौकस२१२

राजेंद्र मेहेंदळे
: आपण लिहिलेलया चिंतेच्या गोष्टीशी सहमत " यातील अजून एक मोठी चिंता म्हजे हा क्रिप्टो मार्केट / बाजार हाच मुळी पारदर्शी आहे किंवा किव्वा नाही आणि त्यावर कोणाचे लक्ष असते कि नाही .. पण सर्वसामान्य याचा विचार पण करीत नाही ब्रोकर हा शब्द दिसला तो विश्वास ठेवतो ...

मुंबई स्टॉक बाजारात बाजारात खेळणे वेगळे माझ्या परसात मी एक्सचेंज उभे केले तिथे ट्रेंड करणे यात केवढा फरक आहे!
उद्या माझे टिनपाट एक्सचनगे मी बंद करून पैसे घेऊन पळून जाऊ शकतो बी एस सी जाईल का असे पळून ?

न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज नोंदणीकृत ब्रोकर ज्याच्या ग्राहकाला एस आय पी सी चे "प्रोटेक्शन " असते
आणि वानुवाटू. बी वि आय बेटावरील ब्रोकर यातील फरक तरी किती जणांना माहिती असतो कोण जाणे

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 1:32 pm | चौकस२१२

https://www.abc.net.au/news/2021-12-07/mycryptowallet-collapse-liquidati...
Liquidators have been called in to wind up an Australian cryptocurrency exchange, which could see investors losing everything due to a lack of regulation.

कासव's picture

14 Dec 2021 - 6:27 pm | कासव

सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद

काही प्रश्नांची उकल झाली.

श्रीरंग_जोशी's picture

18 Dec 2021 - 12:12 am | श्रीरंग_जोशी

गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी हा विषय बातम्यांमधे बर्‍यापैकी आघाडीवर असतो. या धाग्यावर माहितीपूर्ण चर्चा वाचायला मिळाली. यासाठी धागाकर्त्याचे व प्रतिसादकांचे आभार.

या चर्चेत ४ वर्षांपूर्वीच्या या बातमीची भर घालतोय. QuadrigaCX नावाच्या कॅनेडियन क्रिप्टो एक्चेंजच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी Gerald Cotten याचा भारतात असताना आजारी पडून अचानक मृत्यू झाला. कोल्ड स्टोरेज (ऑफलाइन) मधे ठेवलेल्या क्रिप्टो करन्सीचा पासवर्ड केवळ त्याला ठाऊक होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे QuadrigaCX च्या गुंतवणूकदारांची मोठी गुंतवणूक (कदाचित कायमची) अडकली.

याचप्रमाणे एक मनुष्य खूप पूर्वी (२०१२) एका तुलनेत किरकोळ कामाच्या बदल्यात मिळालेल्या सात हजार बिटकॉइन्सच्या वालेटचा पासवर्ड विसरला आहे अशी बातमीही मध्यंतरी गाजल्याचे आठवते. त्या वेळी बिट कॉइनला अगदीच नगण्य किंमत होती. आता ७००० कॉइन्स म्हणजे गडगंज संपत्ती आहे.

पासवर्ड ट्राय करण्याच्या एकूण दहा चान्सेसपैकी आठ वाया गेले आहेत. तो तरुण अक्षरश: डोके आपटून घेत असेल एके काळी. नंतर मात्र त्याने परिस्थितीचा स्वीकार केला आहे आणि मानसिकता बदलली आहे अशी बातमी आली होती.

श्रीरंग_जोशी's picture

18 Dec 2021 - 9:11 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या प्रतिसादामुळे या माणसाबद्द्ल प्रथमच कळलं.

चौथा कोनाडा's picture

22 Dec 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये "क्रिप्टो डिक्रिप्टेड" मलिके अंतर्गत क्रीप्टो करन्सीवर उत्तम लेखमाला सुरू आहे (असीम गुर्जर व पार्थ सिन्हा यांची)
त्यात आज "क्रिप्टोला मत्तेचा दर्जा मिळावा" असा तज्ञांचा मत प्रवाह आहे या विषयी चर्चा आहे !
एकदा का मत्ता (अ‍ॅसेट) म्हणून दर्जा मिळाला की काहीतरी बेस मिळेल !

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Dec 2021 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुनळीवर थिंकबँक नावाचा चॅनल आहे, त्यावर अच्युत गोडबोलेंचे या विषयावरचे भाषण आहे. त्यात अनेक देशांनी कूटचलनाला चलन नव्हे पण मत्ता (अ‍ॅसेट) म्हणुन मान्यता दिली आहे असे म्हटले आहे.

किमान गैरव्यवहार किवा बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी पहिली पायरी म्हणुन तरी ह्याचा उपयोग होइल असे मला वाटते.

सोप आणि छान सांगितलं आहे पण खूपच कमी माहिती आहे. ज्यांना क्रीप्तो बद्दल काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी

https://youtu.be/nFOqL6sSgBM