Trekking चा एखादा व्हॉट्स अप ग्रुप असेल तर लिंक कोणी शेअर करू शकेल का. मी पुण्यात राहतो. पुण्याच्या आसपास ट्रेकिंग ला जाणाऱ्या हौशी लोकांबरोबर ट्रेक करायचे आहेत.
तुम्ही पुण्यात राहता तर आजुबाजुच्या टेकडी वर जायला नियमित सुरु करा. ठरावीक दिवस आणी वेळ ठेवली तर आपोआप ओळखी होतील आणी पुढचं सर्व मार्गी लागेल. जर सिंहगडावर जाण चालु केल तर मग एकदम उत्तम. सिंहगडावर नेहमी जाणारे बहुतेक लोक सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान पायथ्या पासुन वर चढायला सुरु करतात. तुम्हाला ओळखी वाढवायच्या असतील तर ही वेळ निवडा. कदाचीत आपली पण ओळख होइल :-)
रावसाहेब, ही माहिती समजायला अंंमळ सिंव्हगडावर (हो, हा शब्द आमच्यात असाच लिहीतात) जावं लागेल - नुसतं खुर्चीत बसून प्रतिसादाच्या पिंका टाकून काय होणार नाय बघा...
हे ५ दिवसांचा कार्य आठवडा हाच सगळीकडे शनि-रवि हायवे आ॑णि पिकनिक / ट्रेक स्पॉट्स ना प्रचंड गर्दी करायला भाग पाडत आहे. मी सुमारे २० वर्षे ६ दिवसांचा आठवडा या प्रकारे काम करत असे, त्यामुळे रजा भरपुर होत्या, हव्या तेव्हा घेता यायच्या. पण ५ दिवस पद्धतीत रजा कमी असतात. शनिवार घरी बसून फुकट जातो. इच्छा नसली तरी बाहेर पडावे लागते. मग मॉल, हॉटेलं. रस्ते तुडूंब होतात !
हा ५ दिवसांचा कार्य आठवडा भारताला उपयोगी नाही असं माझं मत आहे.
दिवसाचे कार्यतास कमी करून ६ दिवसांचा आठवडा करणे हे स्ट्रेस आणि गर्दी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे !
प्रतिक्रिया
4 Dec 2021 - 2:41 pm | कंजूस
आजुबाजूच्या समवयस्कांना विचारा. जातायेता सोबतही होईल तुमच्या भागाप्रमाणे.
4 Dec 2021 - 4:16 pm | टुकुल
तुम्ही पुण्यात राहता तर आजुबाजुच्या टेकडी वर जायला नियमित सुरु करा. ठरावीक दिवस आणी वेळ ठेवली तर आपोआप ओळखी होतील आणी पुढचं सर्व मार्गी लागेल. जर सिंहगडावर जाण चालु केल तर मग एकदम उत्तम. सिंहगडावर नेहमी जाणारे बहुतेक लोक सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान पायथ्या पासुन वर चढायला सुरु करतात. तुम्हाला ओळखी वाढवायच्या असतील तर ही वेळ निवडा. कदाचीत आपली पण ओळख होइल :-)
--टुकुल
4 Dec 2021 - 5:13 pm | रावसाहेब चिंगभूतकर
साधारण किती लोक असतात आणि घरातुन किती वाजता निघावे लागते, घरी परत पोचायला किती होतात, दर आठवड्याला जाता का.
5 Dec 2021 - 1:39 am | विंजिनेर
रावसाहेब, ही माहिती समजायला अंंमळ सिंव्हगडावर (हो, हा शब्द आमच्यात असाच लिहीतात) जावं लागेल - नुसतं खुर्चीत बसून प्रतिसादाच्या पिंका टाकून काय होणार नाय बघा...
डुपिल्केट आय्डी तिज्यायला...
5 Dec 2021 - 10:17 am | कंजूस
आता फेसबुक ग्रुप शोधा. तीनचार दिसताहेत.
5 Dec 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा
व्यनि पाठवलेला आहे !
7 Dec 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा
सापडला का ट्रेक ग्रुप ?
8 Dec 2021 - 6:56 pm | Nishantbhau
हो सर.. सापडला. तुम्ही दिलेल्या नंबर वर मी कॉन्टॅक्ट केला आहे. खुप खुप धन्यवाद.
7 Dec 2021 - 5:32 pm | कंजूस
व्यवस्थित सुटी काढून सोम - शुक्रवार जाणे उत्तम. शहराच्या घनचक्कर गर्दीतून बाहेर पडण्याचा आनंद मिळेल. अन्यथा शनिवार रविवार बहुतेक ठिकाणी जत्रा असते.
7 Dec 2021 - 7:35 pm | मुक्त विहारि
पिकनिक स्पॉट आणि मॅरेज फिक्सिंग
8 Dec 2021 - 12:25 pm | चौथा कोनाडा
हे ५ दिवसांचा कार्य आठवडा हाच सगळीकडे शनि-रवि हायवे आ॑णि पिकनिक / ट्रेक स्पॉट्स ना प्रचंड गर्दी करायला भाग पाडत आहे. मी सुमारे २० वर्षे ६ दिवसांचा आठवडा या प्रकारे काम करत असे, त्यामुळे रजा भरपुर होत्या, हव्या तेव्हा घेता यायच्या. पण ५ दिवस पद्धतीत रजा कमी असतात. शनिवार घरी बसून फुकट जातो. इच्छा नसली तरी बाहेर पडावे लागते. मग मॉल, हॉटेलं. रस्ते तुडूंब होतात !
हा ५ दिवसांचा कार्य आठवडा भारताला उपयोगी नाही असं माझं मत आहे.
दिवसाचे कार्यतास कमी करून ६ दिवसांचा आठवडा करणे हे स्ट्रेस आणि गर्दी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे !
9 Dec 2021 - 7:52 pm | Nishantbhau
मला हवी असलेली माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या कडून मिळाले आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खुप आभार.
15 Dec 2021 - 1:58 pm | चौथा कोनाडा
निशांतभाऊ,
ट्रेक केला असेल तर ट्रेकवृतांत /भटकंतीवृतांत जरूर येऊ द्या !