गाभा:
१. मिपावर साहित्य संमेलनावर धागा नाही हे पाहुन आश्चर्य वाटले ! म्हणजे धागा कदाचित आलाही असेल पण मला तरी दिसला नाही !
२. ह्यावेळी काही अध्यक्षपदाची निवडणुक वगैरे नाही , शिवाय दिब्रिटो, सबनीस सारखा कोणी विवादास्पद अध्यक्ष नाही , जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव .
३. मुळात साहित्यसंमेलनाचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय ? तिथे सामान्य वाचकांचे मुद्दे चर्चेला घेतले जातात का काही ?
४. साहित्यसंमेलनाला काही सरकारी फंडिंग बिंडिंग असते का ? स्वागताध्यक्ष म्हणुन भुजबळ साहेब दिसले म्हणुन विचार आला की संमेलनाच्या पैशाचे गणित काय ?
५. मिपाच्या धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात , किमान आमचे तरी उडवले जातात म्हणुन ही एक्ष्ट्रा लाईन विनाकारण अॅड केली आहे !
प्रतिक्रिया
3 Dec 2021 - 1:17 pm | कंजूस
हे पद भांडणे लावते.
कित्येक साहित्यिकांच्या ( आणि साहित्याशी संबंधितांच्या) घरी चर्चा झडत असतील, टोमणे हाणले जात असतील.
"अमूक तमुक झाले अध्यक्ष आणि तुम्ही?"
हा एक कयास आहे. पण नाकारता येत नाही.
कित्येक बुरुजांवर वेगवेगळ्या लढाया होतात.
फंड किती मिळावा?
याच संमेलनास का? आम्हाला का नाही?
निवडणूका घ्याव्यात की नेमणूक.
लेखकच हवा का टीकाकार ?
अनुवादक का लोककथाकार?
. . .
. . .
3 Dec 2021 - 1:56 pm | सौंदाळा
नारळीकरांवरुन सुध्दा जातीय वाद निर्माण होईल / केला जाईल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही ही चांगली गोष्ट आहे.
श्रीपाल सबनीस सारखा माणूस अध्यक्ष झाला तेव्हा डोक्यात तिडीक गेली होती.
पावसामुळे मंडपाचे नुकसान, भरपूर पाणी साचले असे कालच वाचले. संमेलन आणि सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडावेत.
सरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत
3 Dec 2021 - 3:23 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, खूप अपेक्षा नाहीत
3 Dec 2021 - 3:45 pm | सामान्यनागरिक
मी नाशिककरच आहे.
सुरुवातीलाच सावरकर या विषयावरुन जबरदस्त वाद झाला. पण सध्याच्या सरकारमधे सामील असलेले भुजबळ साहेब असल्याने कोणी काही बोलु शकले नाही.
नाशिकच्या जाज्वल्य साहित्यिकाच्या स्मृतीस या संमेलनात स्थान मिळु नये ही शिकांतिका आहे.
त्यात जखमेवर मीठ चोळावे म्हणुन्च की काय जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्ह्णुन बोलावण्यात आले.
आपले राजकीय चेले चपाटे मंडपात बसवुन ते पूर्णत्वास नेले जाईल.
आमच्या सारखे काहीच लोक तेथे फिरकले सुद्धा नाही.
3 Dec 2021 - 3:59 pm | प्रचेतस
हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून संमेलनाला नक्की जाऊन या. ग्रंथप्रदर्शन ही एकच गोष्ट भेट देण्याजोगी असते. काही दुर्मिळ पुस्तके विनासायास मिळून जातात.
3 Dec 2021 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ.भा.म.सा.संमेलन आपल्याला कायम आवडतं. दरवर्षी हजेरीही असते. त्यात आपला आग्रह, त्यामुळे थंडी आणि पावसाची पर्वा न करता आमची तिथे उपस्थिती असेल.
लवकरच नवा धागा घेऊन हजर होतो.
-दिलीप बिरुटे
3 Dec 2021 - 9:11 pm | उपयोजक
सहमत
3 Dec 2021 - 3:47 pm | सामान्यनागरिक
शिकांतिका = शोकांतिका : टंकन दोषा बद्दल क्षमस्व !
3 Dec 2021 - 4:11 pm | प्रचेतस
तुमचा धागा आल्यामुळे अजून साहित्य संमेलनावर धागा नाही याची कमतरता भरुन निघाली. या निमित्ताने २०१६ च्या पिंपरी चिंचवड साहित्य संमेलनावर मी काढलेल्या धाग्याची आठवण आली.
खुद्द जयंत नारळीकर प्री रेकोर्डेड चित्रफितीद्वारेच तिथे उपस्थिती लावणार आहेत. अस्वास्थ्यामुळे शिवाय करोनामुळे ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत असे समजते.
साहित्यिकांची भेट घेता येते, दुरुन का होईना आपल्या आवडत्या साहित्यिकांना पाहता येते. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ग्रंथप्रदर्शन. खूप सारी पुस्तके मिळून जातात.
अहो तब्बल २५ लाख रु मिळतात अनुदान म्हणून, शिवाय भुजबळ साहेब असल्याने अर्थबळाचा प्रश्नच नै हो. राष्ट्रवादीने हायजॅक केलेले संमेलन म्हणायचे फारतर.
तुमचा धागा मुळात सहा ओळींचा असल्यामुळे चारोळी क्याटेगरीत बसत नव्हता, त्यामुळे विनाकारणच सातवी लाईन अॅड केली म्हणायची तुम्ही. :)
3 Dec 2021 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>मी काढलेल्या धाग्याची आठवण आली.
मी सुद्धा एक धागा काढलेला हं प्रचु....!
-दिलीप बिरुटे
3 Dec 2021 - 5:02 pm | प्रचेतस
लिंक प्लीज
3 Dec 2021 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ता चिकन घ्यायला मार्केटात आलोय. रस्त्यावर मोबाइल पाहात बसावे लागते. पण तुमच्या लेखनाचा फॅन असल्यामुळे तुम्हाला नकार देता येत नाही. हं ही घ्या लिंक.
-दिलीप बिरुटे
3 Dec 2021 - 6:15 pm | प्रचेतस
अरे वा...! विकांत सार्थकी लागतोय तर.
हा तुमचा उगाच विनय आहे :)
धन्यवाद, मंडळ आभारी आहे, भुजबळ संमेलनाचा आपलं नाशिक संमेलनाचा वृत्तांत बयाजवार येऊ द्यात.
6 Dec 2021 - 1:22 pm | प्रसाद गोडबोले
प्रचु , सांभाळुन बरं का !
तुमचे आडनाव पाहता पुढच्या संमेलनात तुमच्यावरही शाईफेक हल्ला होण्याची शक्यता आहे बरं का ! आणि तसेही तुमचे लेण्याबिण्या वगैरे वरील लेखन म्हणजे ईसवी सन १६०० पुर्वीही महाराष्ट्राला इतिहास होता असे सांगुन ईसवीसन १६०० नंतरच्या इतिहासाचे महत्व कमी करण्याचे कारस्थानच आहे म्हणा .
शिवाय तुमचा आयडी "प्रचेतस" ही बामणी वैदिक साहित्यातील प्रतिक वाटतो =))))
अर्थात तुम्ही काळा टी-शर्ट घालता म्हणुन शर्ट खराब होणार नाही ह्याची खात्री आहे , फक्त तेवढे काळा मास्क घालायचे बघा =)))))
6 Dec 2021 - 3:45 pm | राघव
=))
3 Dec 2021 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा आस्वाद आपण येथे लाईव्ह घेऊ शकता.
https://t.co/sT6vBFiSS7
-दिलीप बिरुटे
3 Dec 2021 - 8:06 pm | Nitin Palkar
जयंत नारळीकरांच्या सारखा अगदीच सर्वसामान्य साहित्यिक अध्यक्ष झाल्यामुळे सगळी मजा गेली राव.
जयंत नारळीकरांची ग्रंथ संपदा या https://www.mymahanagar.com/maharashtra/94th-akhil-bharatiya-marathi-sah... दुव्यावर दिसू शकेल. यात सव्वीस पुस्तके दिसतायत, पैकी एक इंग्रजी आहे. ही यादी ही यादी परिपूर्ण असेलच याची खात्री नाही.
विज्ञान कथा हा साहित्य प्रकार मराठीत बहुधा नारळीकरांनीच सुरू केला. त्यांची अनेक पुस्तके सर्व सामान्यांना विज्ञान सोप्या भाषेत उकलुन सांगणारी आहेत.
साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A... या दुव्यावर मिळू शकेल. यातील गेल्या दहा वर्षांतील अनेक अध्यक्षांनी नक्की काय लिहिले आहे हे देखील संगत येणार नाही. त्या मुळे जयंत नारळीकरांचा अगदीच सर्व सामान्य साहित्यिक हा उल्लेख खटकला.
जामिनावर असलेले स्वागताध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उल्लेखलाच विरोध ही या साहित्य संमेलनाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
अर्थात कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. ही जत्रा यथासांग पर पडेल.
3 Dec 2021 - 8:22 pm | कॉमी
सर्वसामान्य म्हणजे भांडाभांडी होणार नाही असा. धागाकर्ता त्यांच्या लेखनाला सर्वसामान्य म्हणत नसावा.
4 Dec 2021 - 1:15 am | प्रसाद गोडबोले
अगदी अगदी १००% सहमत. !
जयंत नारळीकर सरांच्या लेखनाविषयी अनादर दाखवण्याचा प्रश्नच येत नाही . आकाशाशी जडले नाते , वामन परत न आला असे आणि अनेक त्यांचे लेखन वाचलेले आहे . इतकेच नव्हे तर त्यांचे संशोधन रिलेटीव्हिटी थेअरी ची नेक्स्ट स्टेप म्हणाता येईल असे आहे हे कळाल्यावर स्वतः आईन्स्टाईन ची रिलेटीव्हीटी म्हणजे काय हे समजुन घेण्यासाठी काहीकाही पुस्तके वाचल्याचे स्मरते ! स्वत्ळ नारळीकर सर आमच्या शाळेत आलेले आणि आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधलेला देखील आठवते ! त्यांचे लेखन वाचुन अक्षरशः भारावुन गेलो होतो लहानपणी . नारळीकर सरांचे वडील (त्यांचे नाव बहुतेक विष्णु नारळीकर असे काहीसे आहे) ते स्वतः गणितज्ञ होते असे कोठेतरी वाचल्याचे स्मरते . पुढे मला स्वतःला फिजिक्स पेक्षा गणित हा विषय जास्त आवडल्याने मी गणित संख्याशास्त्र अर्थशास्त्र फायनान्स फिलॉसॉफी असा करीयरचा प्रवास केलेला आहे !
पण लहानपणी विज्ञान आणि गणिताच्या आवडीची ठिणगी आमच्या मनात टाकणार्या नारळीकर सरांच्या लेखनाविषयी मी मनापासुन कृतज्ञ आहे !
बाकी एका कट्टर धर्मांध आणि व्हर्जिन बाईला पोरं होऊ शकतात असल्या बाष्कळ अवैज्ञानिक संकल्पना उराशी कवटाळाणार्या कडव्या धर्मप्रचारकानंतर एक खरा वैज्ञानिक साहित्य संमेलनाध्यक्ष झाल्याने अखिल मराठी साहित्या मंडळाचे पाप काही प्रमाणात धुतले गेलेले आहे असे मी मानतो.
बाकी असेच सावरकरांच्या अनुल्लेखाचे अन अवमानाचे पापही पुढे कधी तरी धुतले जाईलच असा आशावाद आहे !!
__/\__
4 Dec 2021 - 9:42 am | आग्या१९९०
सावरकरांचा काय अवमान केला ह्या साहित्य संमेलनात?
4 Dec 2021 - 6:47 pm | Nitin Palkar
साहित्य संमेलनाच्या प्रांगणला 'स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी' असे नाव द्यावे अशी चर्चा होती. किमान ग्रंथ प्रदर्शनाच्या दालनाला तरी 'स्वातंत्र्यवीर सावरकर मंडप' असे नाव द्यावे अशी साहित्य रसिकांची मागणी होती ती पूर्णपणे डावलून. केवळ संमेलन गीतात त्यांचा नाममात्र उल्लेख करण्यात आला होता. कुणाच्यातरी हेकटपणास्तव तो सुद्धा गाळला होता जनमताच्या रेट्याने अखेर साहित्य संमेलन गीतात सावरकर यांचा उल्लेख केला गेला.
पुढील दुव्यानवर 'थोडी अधिक' माहिती मिळू शकेल.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/in-the-sa...
https://www.tv9marathi.com/maharashtra/swatantryaveer-savarkars-name-is-...
4 Dec 2021 - 6:52 pm | आग्या१९९०
कविकट्ट्याला त्यांचे नांव देऊन सन्मानच केला आहे. फोटोत दिसत आहे.
3 Dec 2021 - 10:06 pm | पाषाणभेद
संमेलनाबद्दल लिहीण्यासारखे बरेच आहे, त्यात वादही लिहीले जातील म्हणून असो.
शिवसेनेत असतांना भुजबळ साहेब ज्यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमालढ्यासाठी वेश बदलून सीमेवर गेले होते त्यावेळीच त्यांनी साहित्याशी संबंंध आला हे जर मानले तर त्यांची निवड या संमेलनासाठी योग्यच समजली गेली पाहीजे.
ऑनलाईन लेखन करणार्यांचेही एक संमेलन व्हायला हवे.
7 Dec 2021 - 1:22 pm | सामान्यनागरिक
या न्यायाने संमेलन्स्थळीचे देहशुद्धी कक्ष साहित्यिक व ईतरही काही मंडळींनी वापरले असतील. म्हणुन तेही साहित्यिक झाले की काय ? अश्या लोकांची एक यादी बनवुन त्यांना भावी साहित्य संमेलनाचे क्ष क्ष क्ष अध्यक्ष म्हणुन ठेवावे लागेल.
देहशुद्धी कक्ष : प्राकृतात यास 'टोयलेट' असे नांव आहे
4 Dec 2021 - 7:38 am | कुमार१
डॉ. नारळीकर यांचे अध्यक्षीय भाषण आवडले
4 Dec 2021 - 10:56 am | सुबोध खरे
डॉ जयंत नारळीकर यांची एक मुलाखत पाहिली होती. त्यातील त्यांनी सांगितलेला एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा येथे देत आहे.
त्यांना विचारले कि तुम्ही एवढे आंतराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहात तर आपल्या मुलांनी बोर्डात यावे किंवा परीक्षेत अव्वल गुण मिळवून दैदिप्य मन यश मिळवावे असे तुम्हाला वाटत नाही का?
यावर डॉ नारळीकर म्हणाले कि
शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते तर ती त्याच्यावरील स्वाराची इच्छा असते.
आपल्या इच्छा मुलांवर लादून त्यांना शर्यतीत पळवून त्यांची दमछाक करू नका.
4 Dec 2021 - 2:33 pm | मुक्त विहारि
शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते तर ती त्याच्यावरील स्वाराची इच्छा असते.
आपल्या इच्छा मुलांवर लादून त्यांना शर्यतीत पळवून त्यांची दमछाक करू नका.
......
4 Dec 2021 - 5:52 pm | पाषाणभेद
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ मधील दिनांक ०४/१२/२०२१ ची काही छायाचित्रे -
मराठी भाषेतील पहिला शिलालेख २२०० वर्षांपूर्वीचा आहे.
काव्यकट्टा
मा. राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पत्र पाठवण्याची सोय तेथे केली होती.
मा. सयाजीराव गायकवाड यांच्यावर लिहीलेल्या ५० पुस्तकांचे प्रकाशन होणार होते.
मा. सयाजीराव गायकवाड यांच्यावर लिहीलेल्या ५० पुस्तकांचे प्रकाशन होणार होते, त्या समारंभाची तयारी सुरू होती.
"महारठिनो" हा शब्द मराठीचा पुरावा आहे.
कॅलीग्राफी
शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे या लघूपटाचे प्रदर्शन सतत सुरू ठेवण्यात आले होते. मराठी भाषेची प्राचिनता यात दर्शवलेली आहे. बाजूला कोवळ्या उन्हात सुरू असलेली कॅलीग्राफी.
esahity.com चे श्री. सुनील सामंत यांचेसमावेत आस्मादिक. ईसाहित्य.कॉम ने माझे पुस्तक "वगनाट्य- वैरी भेदला" ईबूक रूपात पुन:प्रकाशित केले आहे.
ईसाहित्य.कॉम च्या चमूसमावेत आस्मादिक.
गढीचे मालक व लेखक श्री.राजाभाऊ गायकवाड यांचे समावेत आस्मादिक.
4 Dec 2021 - 5:58 pm | मुक्त विहारि
मस्तच
4 Dec 2021 - 6:18 pm | आग्या१९९०
अभिनंदन!
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर मंच. कविकट्टा चांगलाच भरलाय.
4 Dec 2021 - 8:44 pm | जेम्स वांड
फोटोजमुळे खूप मजा आली.
4 Dec 2021 - 8:50 pm | Bhakti
सुंदर फोटो!
6 Dec 2021 - 10:12 am | चौथा कोनाडा
छान प्रचि, पाभे !
त्या सुंदर वातावरणाची कल्पना आली !
अ. भा. साहित्य संमेलनात वगनाट्य- वैरी भेदला" ईबूक रूपात पुन:प्रकाशित झाले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
+१
लगे रहो पाभे !
4 Dec 2021 - 10:17 pm | उपयोजक
संमेलन सुरेख सुरु आहे
5 Dec 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा
रटाळाच्या पालखीचे भोई
या अतरंगी लेखकूने संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणाचा जबरी लेखाजोखा मांडला आहे, वाचा आणि आनंद घ्या !
6 Dec 2021 - 10:16 am | सुबोध खरे
आपल्या लाडक्या गिरीश कुबेर यांचे तोंड आपल्याच लाडक्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी शाई लावून काळे केले.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी राजांचा तथाकथित अपमान केल्याबद्दल.
ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना त्या पुस्तकाचे नावसुद्धा माहिती नव्हते किंवा त्यांनी ते वाचलेले सुद्धा नव्हते.
बाकी आपलेच दात आणि आपलेच ओठ.
6 Dec 2021 - 11:24 am | चौकस२१२
आरे असा कसा झाला! हे तर पुरोगामी आहेत ! मग ब्रिगेड का उचकली?
6 Dec 2021 - 1:01 pm | प्रसाद गोडबोले
मजा आली !
हे असले काहीतरी होणार ह्याचा अंदाज होताच , रादर त्या शिवाय संमेलन कसे परिपुर्ण होईल =))))
सावरकरांवर होणारी द्वेषाची सुरुवात सावरकरांवर कधीही थांबत नसते , अहो सावरकर इनमीनसाडेतीन टक्के, त्यांच्यात असे किती मुद्दे काढणार शोधुन द्वेष करायला , नवीन माणसे नवीन मुद्दे लागणारच !
कितीही पुरोगामित्वाचा आव आणा, महाराष्ट्र , मराठी साहित्य आणि मराठी समाज हा दुभंगलेलाच आहे , आणि एक गट दुसर्या गटाचा द्वेष करत रहाणारच ! बहुतांश वेळा तो सुप्त असेल अन काही काही वेळा असा उघड असेल !
मजा आली =))))
6 Dec 2021 - 1:43 pm | चौकस२१२
मराठी साहित्य आणि मराठी समाज हा दुभंगलेलाच आहे
समाज दुभंगलेला आहे हे समजू शकते पण साहित्य कशाला दुभंगलेल? ते नाही कळले !
वाचहणाऱ्याला फक्त दर्जेदार साहित्य पाहिजे असते , रोचक, खिळवून ठेवणारे, विचार करायाला लावणारे मग ते "बामणी" श्री ना पेंडसे असोत, झाडाझडती वाले विश्वासराव पाटील असोत किंवा नामदेव ढसाळ कि बाबा कदम !
6 Dec 2021 - 1:48 pm | मुक्त विहारि
आता सरकारी कार्यक्रम आहे...
अत्रे, पुलं, वगैरे मंडळी असतांना, सरकारी हस्तक्षेप कमी होता
6 Dec 2021 - 2:00 pm | प्रसाद गोडबोले
अहो , अहोत आहात कुठे ?
संदीप खरे ह्यांचे "दिवस असे की" हा कविता संग्रह आणी त्यावरील अल्बम फेमस झालेल्या त्यानंतर "बामणी गुळुमुळु कविता" ही प्रतिक्रिया मी स्वतःच्या कानाने ऐकली आहे !
पुलं देशपांडेंच्या उल्लेख पिल्या देशपांडे असा ऐकला आहे .
बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत काय झालं हे सगळ्या दुनियेला माहित आहे !
आणि संत साहित्यात तर बोलुच नका , रामदास स्वामी म्हणजे एकदम फेवरिट टारगेट आहे , पण त्याहुन भारी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या उल्लेख - धुर्त आर्यभट आळंदीकर ज्ञानोबा असा केलेले एका महान समाज सुधारकाचे लेखन मी स्वतः वाचले आहे , तुम्हाला हवे आहे का वाचायला ? ओनलाईन उपल्ब्ध आहे , महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे , लगेच लिन्क देतो !
बाकी जयंत नारळीकर ह्यांचे "वामन परत न आला" नावाचे एक पुस्तक प्रसिध्द आहे त्यातील "वामन" ह्या शब्दावर वादविवाद झालेला नाही ह्याचेच मला अजुन आश्चर्य वाटत आहे !
=))))
6 Dec 2021 - 2:44 pm | मुक्त विहारि
थोडक्यात सांगायचे तर, कुणी सांगीतले आहे? हे महत्वाचे झाले आहे, असे वाटते ...
काय सांगीतले आहे? हे बघायचे नाही ....
6 Dec 2021 - 3:29 pm | चौकस२१२
हो .. हो असे जातीकरण विखारी ध्रुवीकरण चाललंय हे माहित आहे .... पण माझ्या म्हण्यायचा अर्थ फक्त एक वाचक म्हणून होता ...
म्हणजे वाचकाने ना खरे ना वाळीत टाकावे ना ढसाळांना एवढेच
10 Dec 2021 - 8:54 am | कर्नलतपस्वी
हल्ली फँशनच झालीय काहितरी बरळायचं अन मग लोक काथ्याकूट करतात, माज आलेल्वायांच वादळ माजत,चार बसा, चार दुकान फुटतात, षोलीसांची डोकेदुखी वाढते. सतरंजी उचले भेळ खातात आणी दिग्दर्शक मलई. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हल्ली आभ्यास केला जातो तो कशा कुठे काड्या केल्या की आपली पोळी भाजून घेता येईल.
10 Dec 2021 - 8:54 am | कर्नलतपस्वी
हल्ली फँशनच झालीय काहितरी बरळायचं अन मग लोक काथ्याकूट करतात, माज आलेल्वायांच वादळ माजत,चार बसा, चार दुकान फुटतात, षोलीसांची डोकेदुखी वाढते. सतरंजी उचले भेळ खातात आणी दिग्दर्शक मलई. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हल्ली आभ्यास केला जातो तो कशा कुठे काड्या केल्या की आपली पोळी भाजून घेता येईल.
10 Dec 2021 - 8:54 am | कर्नलतपस्वी
हल्ली फँशनच झालीय काहितरी बरळायचं अन मग लोक काथ्याकूट करतात, माज आलेल्वायांच वादळ माजत,चार बसा, चार दुकान फुटतात, षोलीसांची डोकेदुखी वाढते. सतरंजी उचले भेळ खातात आणी दिग्दर्शक मलई. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हल्ली आभ्यास केला जातो तो कशा कुठे काड्या केल्या की आपली पोळी भाजून घेता येईल.
6 Dec 2021 - 3:33 pm | चौकस२१२
हो ना मी एक "टूलकिट" म्हणून धागा काढला होता त्यात सावर्करांपासून सुरवात करून पुढे कसा अजेंडा राबविला जातो आणि तो किती हास्यस्पद असतो हे लिहिले होते.. दुर्दैवाने तो उडवलेला दिसतोय !
थोडक्यात म्हणजे "काय लिहिलय ते लिहिण्यापेक्षा कोणी लिहिलंय" यावर सर्व ...
6 Dec 2021 - 4:00 pm | रावसाहेब चिंगभूतकर
श्री जावेद आखतर यांनी म्हटल्याप्रमाणे दुष्ट केंद्र सरकारच्या गेस्टापो विभागाकडून मिपा ला कदाचित या बाबतीत चौकशी करण्यात आल्यामुळे तुमचा धागा उडवला गेला असावा.
6 Dec 2021 - 11:33 am | चौकस२१२
तोच सूर आळवला
https://www.youtube.com/watch?v=hPu0zjkK4Hc
6 Dec 2021 - 3:53 pm | रावसाहेब चिंगभूतकर
1. साहित्य संमेलन होतं की दुगाण्या झाडण्याची स्पर्धा होती हेच कळत नाही. कदाचित याचा अंदाज आल्यानेच नारळीकर आणि फडणवीस या दोघांनी या संमेलनाला येण्याचं टाळलं असावं.
2. त्या ढाले पाटील नावाच्या व्यक्तीने अनावश्यक वाद तयार केले. या व्यक्तीचं लिखाणातील योगदान काय नक्की हे कोणाला माहीत आहे का? ही व्यक्ती लेखक आहे का? नसेल तर ही इथे काय करते आहे?
3. शरद पवारांनी शहाजोगपणे नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतली. सावरकरांच्या वरून असे वाद होऊ नयेत असं विधान करतानाच, हे वाद भुजबळांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळेच झाले होते हे त्यांना कुणी तरी सांगायला हवं होतं.
4. ही बातमी फारशी वाचनात कशी आली नाही?
7 Dec 2021 - 9:55 am | सुबोध खरे
एकंदर सा सं जेमतेमच झाले, गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे.
बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत. कविसंमेलन एकंदरीत धन्यवाद होते.
बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले. अर्थात जालावर आणि किंडल वर पुस्तके उपलब्ध आहेत आणि पी डी एफ वर बरीच पुस्तके फुकट मिळत असल्याने लोकांची विकत घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे.
विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे.
7 Dec 2021 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>एकंदर सा सं जेमतेमच झाले.
असे काही नाही. उत्तम झाले.
>>>गर्दी म्हणण्याइतकी गर्दी नव्हती असे तेथे जाऊन आलेल्या माझ्या मित्राचे म्हणणे आहे.
गर्दी तुडुंब होती. लशीचे दोन्ही डोसेस झालेले असतील तर त्यांना सोडत होते. अनेक रसिक प्रमाणपत्र न दाखवता आल्याने परत गेले.
मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते. 'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो. विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते.
>>>>बरेचसे साहित्यिक आणि कवी (स्वप्रसिद्ध- सुप्रसिद्ध नव्हेत) लोकांना माहिती सुद्धा नाहीत.
साहित्य संमेलन त्याला काय करू शकते.
>>>>बहुसंख्य लोक नुसती पुस्तके चाळून पाहतात असे एका पुस्तक विक्रेत्याने निराशेने त्याला सांगितले.
डॉ. साहेब, पुस्तके चाळण्यात शप्पथ लै आनंद मिळतो. बाकी, या साहित्य संमेलनात रेकॉर्डब्रेक पुस्तकांची खरेदी झाल्याच्या बातम्या आहेत. दोन कोटी रुपयांची पुस्तके विकल्या गेली आहेत. (संदर्भ : ६ डिसेंबर २०२१ मटा. पृ.क्र.२)
>>>विकत घेऊन वाचायची आणि वाचून झाल्यावर ठेवायची कुठे असे प्रश्न असल्यामुळे असे होत असावे.
हं... मुद्दा चर्चेचा आहे. डॉक्टर साहेब काल एक व्यक्ती मला वाट्सपवर भेटली.आपल्याकडील संग्रहित पुस्तके तो ज्याला आवडतील त्याला विकतो.ही आयडिया मस्त होती. मला आवडली.
-दिलीप बिरुटे
( अभासासं उपस्थित रसिक)
7 Dec 2021 - 11:05 am | आग्या१९९०
'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो.
7 Dec 2021 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम....! =))
-दिलीप बिरुटे
7 Dec 2021 - 11:49 am | सुबोध खरे
पुढच्या वेळेस "बाप्पू" नाही तर "चिच्चा जान" चे नाव देऊन पहा
तुडुंब गर्दी होईल.
हा का ना का
7 Dec 2021 - 11:54 am | जेम्स वांड
काय हे !
7 Dec 2021 - 12:43 pm | आग्या१९९०
ह्याचा अर्थ सावरकर प्रेम हे बेगडीच होतं तर?
10 Dec 2021 - 8:01 am | आनन्दा
गर्दी तुडुंब होती.
मुख्य सभा मंडप भरलेला नव्हता. लोक एका जाग्यावर बसत नव्हते.
'कविकट्टा' यात गर्दी होत नव्हती. हा मंच प्रत्येक संमेलनात गर्दी खेचत असतो.
विद्यार्थी विद्यार्थिनी खुप दिसत होते.
7 Dec 2021 - 12:04 pm | कंजूस
किंवा इतर जिल्ह्यांतील काही नामचीन लेखकांच्या नावे?
7 Dec 2021 - 1:01 pm | चौथा कोनाडा
😀
लुनावाल्यांना टाळून पुढे जाणे हे आखिल मराठी साहित्याचे मोठे नुकसान असेल !
7 Dec 2021 - 1:36 pm | जेम्स वांड
मित्र
🤣 🤣 🤣 🤣 🤣