तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?

Trump's picture
Trump in काथ्याकूट
2 Dec 2021 - 1:34 pm
गाभा: 

तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?

आयुष्यात आपले विचार सतत बदलत असतात; नवीन माहिती मिळते, नवीन व्यवहारीक अडचणी येतात. अशी कितीतरी कारणे असतात.

मी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधारणतः सौम्य डाव्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जसे जसे वाचन, प्रवास आणि संशोधन वाढत गेले तसे तथाकथीत डाव्या विचारातील (प्रचारातील ?) फोलपणा जाणवत गेला.

काही प्रचलित कारणे खालीलपैकी आहेत.

१. सतत एक बाजु दुसर्‍यावर अन्याय करते आहे.

२. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे.

३. दांभिकपणा.

तुमचाही असाच वैचारीक प्रवास झाला आहे का? असेल तर कारणे जाणुन घ्यायला आवडतील...

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

2 Dec 2021 - 2:03 pm | स्वधर्म

डावे आणि उजवे याच्या ‘तुमच्या’ व्याख्या स्पष्ट केल्या तर अधिक नेमकी उत्तरे मिळतील.

तसेच, तुंम्ही ‘डावीकडून -> उजवीकडे’ का आलात असा प्रश्न विचारला आहे. तुंम्हाला उजवीकडून -> डावीकडे जे गेले आहेत त्यांच्या प्रवासात रस नाही का? का हेच ते उजवेपण?

डावे आणि उजवे याच्या ‘तुमच्या’ व्याख्या स्पष्ट केल्या तर अधिक नेमकी उत्तरे मिळतील.
>> सर्वसाधारणपणे ज्याला डावे - उजवे भारतामध्ये समजले जाते ते.
उदाहरणार्थे
उजवे: भाजप, शिवसेना
डावे: भाकप, माकप, काँग्रेस

तुंम्हाला उजवीकडून -> डावीकडे जे गेले आहेत त्यांच्या प्रवासात रस नाही का? का हेच ते उजवेपण?
>> तो वेगळा धागा होउ शकेल. त्यांचेही विचार जाणुन घ्यायला आवडेल.

साहना's picture

8 Dec 2021 - 12:39 pm | साहना

> उजवे: भाजप, शिवसेना

ह्यांत नक्की काय उजवे आहे ?

ह्या दोन्ही पक्षांत दांभिकपणा, खोट्या बातम्या पसरवणे नि विशेष म्हणजे फोल पणा नाही आहे का ?

माझ्या मते पक्षा पेक्षा तत्वे काय आहेत ह्यावर डावे/उजवे जास्त महत्वाचे आहे.

--

सांस्कृतिक उजवे : हिंदुत्ववादी, सर्वाना सामान कायद्याची मागणी करणारे.
आर्थिक उजवे : मार्केट पद्धतीला आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे.

सांस्कृतिक डावे : मार्क्स विचारांनी प्रभावित झालेले, प्रस्थापित विचारांवर नेहमीच आघात करणारे.
आर्थिक दावे : सरकारी नियंत्रण सर्वत्र मागणारे आणि वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा, टोळी चे हित पाहणारे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Dec 2021 - 4:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

हिंदू समाजवादी आहेत ;) :D

भारत आणि पाश्चिमात्य लोकशाही ( कानडा, यु एस , यु के, ऑस्ट्रेलिया , न्यू झीलण्ड ) या दोन्ही तील दावे आणि उजवे यांचे रंग वेगळे आणि पोत थोडे वेगळी असते असा माझा अनुभव आहे त्या अनुषंगाने विचार कार्याचा झाला तर अनेक स्थलान्तरित भारतीयांप्रमाणे ( सरसकटीकरण ) माझा प्रवास साधारण असा
१) भारतात उजवा मधय ( पण धर्मांधतेचा तिटकारा असणारा)
२) पाश्चिमात्य देशात दावा ( पण त्यातील अति दाव्याच्या विचारसरणीचा आणि खास करून भारताबद्दल चाय काही गैरसमजुतींचा विट असणारा )

विचारसरणी पुढे दावे कधी कधी देश या संकल्पनेला तडा जाईल असे वागतात म्हणून दाव्यानं भारतात विरोध पण येथील दावे त्या मानाने इकडे तसे कमी वागतात म्हणून इकडे दाव्यानना पाठिंबा आणि येथील उजवया विचारसरणी मागील लपलेला गोरा वर्णद्वेष यामुळे येथे उजवाण्या पाठिंबा नाही असे हे त्रांगडे आहे

असो जास्त विचार करून सविस्तर लिहिले पाहिजे

Trump's picture

2 Dec 2021 - 2:57 pm | Trump

मलाही असेच वाटते.
परदेशात एक जाणवले की, तेथील डावे आणि उजवे भारताविरोधात मात्र एकत्र असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर प्रतिवाद करण्यात काही अर्थ नसतो.

जो आपल्याला मदत करेल तो आपला मित्र आणि आपल्या शत्रुचा शत्रु तो आपला मित्र असे धोरण ठेवावे. गनिमी कावा जिन्दाबाद.

चौकस२१२'s picture

2 Dec 2021 - 3:15 pm | चौकस२१२

तेथील डावे आणि उजवे भारताविरोधात मात्र एकत्र असतात
ह.....म..... नाही
फरक असतो थोडा

तेवढा असलाच पाहीजे ना, नाहीतर मतदारांना सांगणार काय?
परदेशातील डावे पण देशहित आणि आपले समाजहित सोडत नाहीत. त्यामानाने भारतीय डावे लगेच आपले सोडुन दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्याला तयार असतात.

सर टोबी's picture

2 Dec 2021 - 5:09 pm | सर टोबी

तरी पण हा धागा चांगला सुदृढ व्हावा अशी शुभेच्छा. धागा जवळपास हलायचा थांबला की "किती झोडपणार आहात हिंदूंना" या नावाचे पुस्तक काढावे आणि धाग्यातील निवडक रत्नांचा वापर करावा असा एक सल्ला.

तुम्ही The Office वाले टोबी का?

सर टोबी, तुमची इच्छा थोडी पुर्ण करतो.
१. डावे आणि इस्लाम + ख्रिश्चन ह्यांचे कसे पटते ? दोन्ही विचारप्रवाह तर वेगवेगळे आहेत.
२. इस्लाम + ख्रिश्चन जर एकमेकांना आणि इतरांना समान गृहीत धरत नसतील तर त्यांनी इतरांकडुन समानतेची अपेक्षा का करावी?

कॉमी's picture

2 Dec 2021 - 8:13 pm | कॉमी

1. डावे आणि इस्लाम आणि ख्रिश्चन यांचे मुळीच पटत नाही. डावे मायनोरीटीबद्दल द्वेषाचा प्रतिकार करतात. पण ख्रिश्चन मेजोरीटी आणि मुस्लिम मेजोरीटी देशात डाव्यांचा द्वेषच केला जातो. अमेरिकेत ख्रिश्चन लोक डाव्यांच्या कडव्या विरोधात असतात.

2. समानता अमलात आणायला म्हणून कायदे असतात ना ? मग त्या कायद्याचा भंग मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा हिंदू किंवा नास्तिक कोणीही करू लागला तर समर्थ आहोत की.

आणि, मुसलमान आणि ख्रिश्चन बाकीच्यांना समान मानत नाहीत हे कशावरून सांगताय म्हणे ? काय आधार, पोल्स वैगेरे ? का उचलली जीभ ...?

प्रतिसादाबंद्दल धन्यवाद.

१. असे काही नाही.
अमेरिकेतले डाव्या पक्षात (डेमोक्रट्स) भरपुर मुस्लीम आहेत. आणि आता त्यातील कोणी ख्रिश्चन विरोधी बोलल्याचे माहीती नाही. ओबामापण आपण कसे कट्टर ख्रिश्चन
आहोत हे सिद्द करत होता.
https://thehill.com/blogs/blog-briefing-room/news/130783-obama-says-he-p...
आता भारतामध्ये केरळ बघा, पुर्वाश्रमीचा पश्चिम बंगाल बघा.

२.
ख्रिश्चन : साल्वेक्षण (मोक्ष?) फक्त येशुकडुच
https://www.crossway.org/articles/10-key-bible-verses-on-salvation/

इस्लामः
Allah, Arabic Allāh (“God”), the one and only God in Islam.
https://www.britannica.com/topic/Allah

ह्या गोष्टींचा इतर लोंकावरील (ज्यांचा येशु किंवा अल्लाह वरती विश्वास नाही त्यांचा) परिणाम काय होतात? त्या ख्रिश्चन आणि इस्लाम नुसार इतर लोक बरोबरीचे होतात का?

१. पहिल्या मुद्याचा फारसा अर्थ समजला नाही. ओबामा ट्रम्प पेक्षा जरूर डावा होता. पण तो काय कम्युनिस्ट अथवा सोशालिस्ट नव्हता. आणि अर्थातच डावे अधार्मिक असतात हे इन जनरल खरे असले तरी तो काही नियम नाहीये. डावे असण्याचे कार्ड वाटायला जर काही नियम असते तर अधार्मिकता हा नियम नसता. अल्पसंख्यकांबद्दल द्वेष न बाळगणे, पूर्वग्रह न बाळगणे, सामाजिक सुरक्षितता जाळी (social safety net) वाढवणे हे काही बेसिक निकष होतील.

त्यामुळे डावे अधार्मिक असतात तर ते असं का वागतात- ह्यातला "डावे अधार्मिक असतात" हा भाग स्ट्रॉमॅन आहे. म्हणजेच डाव्यांची नसलेली वैचारिक बाजू त्यांच्यावर थोपत आहात.

आज सुद्धा कट्टर ख्रिश्चन अमेरिकन्स जो बायडन ला किती शिव्या देतात ते पाहा. लसीकरण करण्याबाबत कट्टर ख्रिश्चन लोकांनी "कम्युनिझम" म्हणून पाठ फिरवली आहे. जो बायडन कम्युनिस्ट आहे असे आपल्या मिपावर पण लिहिले गेलेलं. आता अमेरिकेत कट्टर रिपब्लिकन- जे मोस्टली ख्रिश्चनच आहेत- लेट्स गो ब्रॅण्डन असा स्लोगन वापरतात. त्याचा अर्थ आहे फक जो बायडन.

आणि अर्थातच डेमॉक्रट्स मुस्लिम ख्रिश्चनांविरुद्ध का बोलणार ? बोलू ही नये ! असं एका धर्माच्या सगळ्या लोकांबद्दल वाईट बोलणे टाळले पाहिजे !

२. सगळ्या धर्माच्या पुस्तकात बऱ्याच वाईट गोष्टी आहेत. कोणत्याही लोकांना वाईट करता येऊ नये म्हणून कायदे आहेत. एकदा ते कायदे असल्यावर परत हिंदू मुस्लिम करत बसने काही उपयोगाचे नाही.
आणि लोक धर्मातल्या वाईट गोष्टींचा चांगला अर्थ काढायच्या प्रयत्नात असतात, किंवा सरळ आम्हाला या गोष्टी मान्य नाहीत असे म्हणतात.

बायबल आणि कुराण मधली वचन उद्धृत करून मुसलमान आणि ख्रिश्चन इतरांना समान मानत नाहीत म्हणणे म्हणजे आज मनुस्मृती मध्ये ब्राम्हण कसा इतरांपेक्षा वरचढ आहे हे वाचून ब्राम्हणाचा आज तिरस्कार करा कारण ब्राम्हण आपल्याला खालचे मानतात म्हणल्यासारखे आहे ते. (जे काही लोक दुर्दैवाने म्हणतात. ते हि मुस्लिम द्वेषासारखंच.)
म्हणजे पुस्तकात लिहिलं म्हणजे सद्य युगात लोकं पाळत असतीलच असे नाही. आज मला रोजच्या माझे बांधव ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक दिसतात जे खरं सांगायचं तर माझ्या पेक्षा फार वेगळे आजिबात नसतात. धर्मामधला आटत जाणारा रस हे सूत्र जगभर दिसतेय.

ज्यांचा येशू किंवा अल्लाह वर विश्वास नाही त्यांचं काय होत याबद्दल धार्मिक विश्वास ठेवण्याचा हक्क मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आहे. त्याबद्दल काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही. त्यांनी जोरजबरदस्ती करून कोणाला अल्ला किंवा येशू स्वीकारायला लावू नये म्हणून कायदे आहेत.

चौकस२१२'s picture

3 Dec 2021 - 9:06 am | चौकस२१२

ज्यांचा येशू किंवा अल्लाह वर विश्वास नाही त्यांचं काय होत याबद्दल धार्मिक विश्वास ठेवण्याचा हक्क मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आहे. त्याबद्दल काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही
प्रॉब्लेम तिथे थांबत नाही साहेब ... "जिथे बहुमत तिथे आमचेच धार्मिक कायदे " हे आता मुस्लमामांचं बाबतीत जगभर दिसताय .. तरी पण तुम्ही म्हणणार कि हा इस्लामोफोबिया... हे राम !

तर्कवादी's picture

3 Dec 2021 - 5:52 pm | तर्कवादी

प्रॉब्लेम तिथे थांबत नाही साहेब ... "जिथे बहुमत तिथे आमचेच धार्मिक कायदे " हे आता मुस्लमामांचं बाबतीत जगभर दिसताय ..

यालाही अपवाद असावेत.
उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल देश असूनही इस्लामिक देश नाही तर निधर्मी राष्ट्र आहे.

वर कॉमी म्हणतात ते पटणारं आहे

धर्मामधला आटत जाणारा रस हे सूत्र जगभर दिसतेय

एकुणातच धर्म ही कालबाह्य गोष्ट झाली आहे. धर्माची जागा कायदे, लोकशाही आणि आधुनिक विज्ञान्/तंत्रज्ञान यांनी घेतली आहे.

उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल देश असूनही इस्लामिक देश नाही तर निधर्मी राष्ट्र आहे.

असे किती अपवाद आहेत? तिथे किती टक्के मुस्लिम राहतात ?

टर्की- ९९% मुस्लिम लोकसंख्या.

कोणत्या सालीच्या टर्कीबद्दल बोलत आहत?

कॉमी's picture

3 Dec 2021 - 6:34 pm | कॉमी

२०२१

प्रदीप's picture

6 Dec 2021 - 3:44 pm | प्रदीप

२०२१ चे टर्की निधर्मी आहे, ह्यावर तुमचा स्वतःचा विश्वास बसतो आहे, ह्यावर माझा विश्वास बसत नाही.

ऑटोमनच्या कडव्या मुस्लिम राजवटीचा, मुस्तफा कमाल अतातुर्कने १९२३ साली पाडाव करून, ज्या निधर्मी व प्रगतीशील तुर्कस्तानचा पाया रोवला, त्याची कबर खोदण्याचे रीतसर कार्य अर्दोगान गेली काही वर्षे झपाट्याने करत आहेत. अंतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अर्दोगानांनी, स्वतःला, कडव्या मुस्लिमांचा नेता असे एस्टॅब्लिश करण्याचा रीतसर प्रयत्न चालवला आहे. ह्याबाबतीत त्यांची साथ मलेशियाचे महाथिर महमद देत आहेत. महाथिर आता बरेच वृद्ध झाले असल्याने, ही स्पेस एकट्याने व्यापण्याचा अर्दोगान ह्यांचा मार्ग सुकर आहे.

पण तुम्ही इंडोनेशियाचे उदाहरण का दिले नाहीत? बहुधा तिच्या विषयी, सध्याच्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला फारशी माहिती नसावी (जास्त शक्याता ही आहे) अथवा, डाव्यांना तेथील राजवटी, मुस्लिम धर्मांधाचा कसा समाचार घेतात, ह्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे सोयिस्कर असावे?

२००२ साली बाली येथे जेम्मा- इस्लामिया ह्या कडव्या मुस्लिम चळवळीने जोरदार बॉंबस्फोट घडवून आणले. त्यात २००+ लोकांचा बळी गेला. ह्यात, परदेशी टूरिस्ट अधिकांश होते, व तोच ह्या दु:कृत्याचा मूळ हेतू होता. तर, तेथील सरकारने ह्यामागच्या सर्वांना पकडले, त्यांजवर रीतसर खटले दाखल केले. त्यांच्या म्होरक्यास अनेक वर्षांची कारावासाची सजा झाली. व प्रत्यक्ष बॉम्ब्स्फोट घडवून आणणार्‍या तीन- चार जणांना देहांताची सजा दिली गेली. सर्व अपिले पार केल्यानंतर ह्या तीन- चार जणांनी अशी मागणी केली की आपला शिरच्छेद मान कापून व्हावा. सरकारने ही मागणी फेटाळून लावली, व त्यांच्या नेहमीच्या तर्‍हेने, डोक्याच्या मागील भागावर गोळी मारून त्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. तदनंतर त्यांची शवे, हेलिकॉप्टरमधून त्यांच्या त्यांच्या गावी नेवून, त्यांचे दफन करण्याची प्रक्रिया, रातोरात पार पाडण्यात आली. कसलेही विशेष कौतुक नाही, काही नाटक करण्यास त्यांच्या कुटुंबियांना व ग्रामस्थांना वाव ठेवला गेला नाही.

ह्यानंतरही त्या देशांत सर्वच सरकारांनी ठामपणे जेम्माच्या व तत्सम धर्मांध मुस्लिमांच्या कारवायांचा, कसलीही दयामाया न दाखवता, नि:पात केला आहे.

कॉमी's picture

3 Dec 2021 - 5:59 pm | कॉमी

अझरबैझान-९८.४%

माफ करा. हा प्रश्न अधिक स्पष्ट लिहीतो.

तिथे किती टक्के मुस्लिम राहतात ?

जगातील एकुन मुस्लिम आणि अश्या पद्धतीने राहणारे मुस्लीम यांचे टक्के किती ?

उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल देश
अपवाद... बोटावर मोजण्यासारखे उलट ख्रिस्ती बहुल असलेल्या बऱ्याच देशात सर्वधर्मीय लोकशाही आहे

भारतातही राज्याचे उदाहरण घ्या ... जम्मू आणि लडाख ( बुद्ध वस्ती) यांना बहुधर्मी ( फक्त हिंदू नव्हे) अश्या भारतात राहण्यास काही अडचण नाही पण ९४% मुस्लिम असलेल्या कशिमर ला आहे! का ?
कोमी यांनी उद्देहसून - मुसलमानस अल्लाह वर आणि ख्रिश्नस जिजझस वर अंतिम श्रद्धा असण्यावर आम्हा हिंदूंची काह्ही हरकत नाही .. प्रश्न आहे त्यांचे सर्वधर्मीय देशातील वागणे , हलाल चा शिरकाव इत्यादी ...

अपवाद... बोटावर मोजण्यासारखे उलट ख्रिस्ती बहुल असलेल्या बऱ्याच देशात सर्वधर्मीय लोकशाही आहे

>> मुस्लिम देशाइतकी वाईट नसली तरी इतरांना समान वागणुक नक्कीच नाही.
उदाहरणे.
१. जर्मनीमध्ये शाळेमध्ये फक्त ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु ह्या रिलिजनबद्दल शिकवले जाते.
२. बहुतांशी युरोपियन देशांमधील ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु प्रार्थनास्थळांना सरकारी मदत मिळते.
३. जर्मनीच्या मुख्य पक्ष CDU आणि CDP, हे ख्रिश्चन रिलिजनवर आधारीत आहेत.
४. ब्रिटनची राणी किंवा राजा हा ख्रिश्चनच असावा लागतो.
५. युरोपियन देशांमधील सुट्ट्या फक्त ख्रिश्चन सणावारांना असतात.
६. अमेरीकेत निवडुन येण्यासाठी ख्रिश्चन असणे खुप महत्वाचे असते. उदाहरणः बॉबी जिंदल, ओबामा.
७. विमानतळावर फक्त मी ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु प्रार्थनास्थळे बघितली आहेत.
८. युरोपमध्ये ख्रिश्चन, इस्लाम न दिसणार्‍या लोकांना रिलिजन बदलण्यासाठी अतिशय संघटीतपणे आणि पद्धशीरपणे लक्ष केले जाते.
९. अजुन बर्‍याच गोष्टी आहेत. सध्या एवढेच ठिक...

हि परिस्थिती मानवी हक्कांची आरडाओरड करणार्‍या देशातली. मिशनरी काय करतात त्याबद्दल कशाला लिहायला हवे!!!

"डावे अधार्मिक असतात" हा भाग स्ट्रॉमॅन आहे. म्हणजेच डाव्यांची नसलेली वैचारिक बाजू त्यांच्यावर थोपत आहात.

>>>
याबद्दल थोडे अधिक वाचायला आवडेल.. मला असे काही डावे दाखवून दिलेत तर बरे होईल जे उघडपणे धार्मिक आहेत..
डाव्यांनी इतरांच्या धर्माचा एक मूलभूत अधिकार म्हणून सन्मान करणे वेगळं, आणि ते देखील बहुतांश उजव्या देशातच खपून जाते, कारण तेथे धार्मिक समाजवादी असतात.

बाकी, समाजवाद आणि साम्यवाद या वेगळ्या संकल्पना आहेत, तुम्ही त्या नेहमी एकत्र का आणता हे मला कळत नाही, तुमचे कॉमी हे नाव कोम्रेड म्हणजे साम्यवाद दाखवते, पण तुमची मते, आणि विचारसरणी समाजवाद दाखवते.
समाजवादात कल्याणकारी शासनव्यवस्था आणि संमिश्र उद्योग असे अपेक्षित असते. युरोपात बरेच देश सोशालिस्ट आहेत, स्वीडन सरळ देश सोशल security वरती बराच पैसे खर्च करतो, पण ते साम्यवादी नाहीत.

साम्यवाद ईश्वर मानत नाही, आणि सर्वसामान्यपणे डावे म्हणजे साम्यवादी असेच मानले जाते भारतात तरी.
तुम्ही चक्क गोलपोस्ट बदलून बचाव करताय असे वाटते मला

मला सुद्धा हेच म्हणायचे होते- की डाव्यांना धर्माचे वावडे नसते. इतरांनी धर्म पाळला तर हरकत नसते. डावे आणि इस्लाम किंवा ख्रिश्चन यांचे कसे पटते- यासाठी ते लिहिलेलं- कि न पटण्याचे काहीच कारण नाही. त्यात डावी लोक व्यक्तिष धर्म पाळतात का किंवा त्यांचे पक्ष धार्मिक कार्यक्रमात सहभागी घेतात का हे म्हणायचं नव्हतं. मी वापरलेला अधार्मिक हा शब्द चुकीचा होईल बहुदा.

बचाव कशाचा करत होतो?
-डावे आणि इतर धर्मियांचे पटते कसे.
-बचाव काय- डाव्यांना इतरांच्या धर्मपालनाबद्दल का अडचण असावी ?
आता गोलपोस्ट बदलतोय का बघा.

समाजवाद आणि साम्यवाद वेगळ्या कल्पना नक्की आहेत. समाजवाद आणि साम्यवादात सुद्धा खूप साऱ्या छटा आहेत. अमेरिकन राजकीय चर्चांमध्यें कम्युनिस्ट आणि साम्यवादी खूप मतांचे सापडतील.
खरतर स्वीडन मध्ये कल्याणकारी राज्य+भांडवळशाहीच आहे. त्याला काही डावे आणि उजवेसुद्धा समाजवाद म्हणत नाहीत. पण तरीही टोकाचे उजवे अगदी सामान्य कल्याणकारी गोष्टींना कम्युनिझम म्हणतात.

डावे उजवे सापेक्ष आहे ना ? साम्यवादी टोकाचे डावे झाले. समाजवादी/वेल्फेअर स्टेट सुद्धा डावेच की.

मी वेल्फेअर स्टेट वालाच आहे. कॉमी हा आयडी असाच गम्मत म्हणून घेतलाय.

आनन्दा's picture

3 Dec 2021 - 3:42 pm | आनन्दा

भारतातले बहुतांश उजवे हे प्रत्यक्षात समाजवादी च आहेत, केवळ धर्म मानतात म्हणून त्यांना मीडियाने उजवीकडे लोटले आहे.
प्रत्यक्षात अगदी सध्याच्या कट्टर उजव्या सरकारच्या धोरणात सुद्धा तुम्हाला बरेच समाजवादी निर्णय दिसतील, त्यामुळे तसे पाहायला गेलेत तर भारतात तसे कट्टर लोक फक्त डावेच आहेत, कारण मते मिळवायला शेवटी समाजवाद / साम्यवादच उपयोगाला येतो.

त्यामुळे आपल्याला धार्मिक उजवे अपेक्षित आहे की आर्थिक उजवे अपेक्षित आहे हे आधी ठरवावे लागेल. जो धर्म मानतो तो सरसकट उजवा अशी जर आपली डावे उजव्याची व्याख्या असेल तर बोलणेच खुंटले.
धर्म मानणारे खरे तर पूर्ण समाजवादी असतात, कारण एकच वेळेस ते कर्मवीपाक ही मानतात, आणि त्याच वेळेस त्याच कर्मवीपकाच्या आडोशाने दानधर्म पण करतात, जे welfare state असे आपण म्हणू शकतो..

उजव्या डाव्यांमध्ये फक्त आर्थिक निकष नसतात. सामाजिक बाबींमध्ये सुद्धा उजवे डावे असतेच. धर्म, जात यांच्यावर हल्ला झालाय, दुसरा व्यक्तिसमुह वाईट आहे असे नॅरेटिव्ह असलेल्यांना सुद्धा उजवे समजले जातेच.

धर्म पाळतो तो उजवा अस नाही वाटत. धर्माच्या नावाने घाबरवणारा, भडकवणारा जरुर उजवा.

धर्म पाळणारे स्माजवादी-
रोचक मुद्दा आहे. ख्रिश्चन क्म्युनिझम ची चळवळ होती- कारण येशूचा संदेश सुद्धा प्रेम, समता, बंधुता आहे.

I tell you the truth, it is hard for a rich man to enter the kingdom of heaven. Again I tell you, it is easier for a camel to go through the eye of a needle than for a rich man to enter the kingdom of God (Matthew 19:23)

धर्म पाळणारे दानधर्म करतात त्याचा आदर आहेच, पण जर ते व्यक्तिगत दानधर्मापल्याड न जाता, कल्याणकारी राज्याला विरोध करत असतील तर त्याला मी समाजवाद नाही म्हणणार. आपमर्जीने केलेल्ल्या दानधर्माने स्माजातल्या तळागाळातल्या लोकांच्या समस्या सुटल्या असत्या तर ना कधी मार्क्स जन्मला असता ना आज ही चर्चा होती,सिस्टेमिक वि. व्यक्तिगत कार्य हे विसरुन चालणार नाही.

प्रत्यक्षात अगदी सध्याच्या कट्टर उजव्या सरकारच्या धोरणात सुद्धा तुम्हाला बरेच समाजवादी निर्णय दिसतील, त्यामुळे तसे पाहायला गेलेत तर भारतात तसे कट्टर लोक फक्त डावेच आहेत, कारण मते मिळवायला शेवटी समाजवाद / साम्यवादच उपयोगाला येतो.

हो सहमत आहे. मते मिळवण्यासाठी समाजवाद उपयोगी ठरायलाच हवा.त्यात गैर काही नाहिच. साम्यवाद मते मागायला उपयोगी येतो का शंका आहे. सद्य सरकारची धोरणे समाजवादी धोरणांच्या अगदी विरुद्ध नाहीयेत. पण सद्य सरकार थेट किंवा आडून कट्टरवाद वाढवत आहे- ते विरोध करण्यायोग्यच आहे. डावे कट्टर आहेत याबद्दल सुद्धा सहमत नाही. (म्हणजे कट्टर डावे अस्तित्वातच नाहीत असे म्हणणे नाही, पण मेनस्ट्रिम डावे कट्टर नाही वाटत.)

पण सद्य सरकार थेट किंवा आडून कट्टरवाद वाढवत आहे

ठोक उदाहरणे हवीत
- देशातील सर्व राज्यांना सामान दर्जा असावा म्हणून ३७० हटवले तर तो कट्टरतावाद ?
- औरंजेब रस्त्याचे चे अकबर रास्ता असे नामकरण केलं तर तो कट्टरतावाद ??
- भारत आता आपले जगातील आणि आजू बाजूचच्या प्रदेशातील जे काही स्थान आहे ते ठाम पने मांडू लागला तर तो कट्टरतावाद ?
- टोकाचं साम्यवादातून बनलेली सरकारी धोरणांना जर जरा कुठे मध्यभागी आणण्याचा प्रयत्न केला तर तो कट्टरतावाद ?
- शेकडो वर्षे भारतातील बहुसंख्यांना जी एक प्रकारची स्वता च्याच देशात दुय्यम वागणूक मिळत होती त्या "स्टेटस क़ओ" ला प्रतिवाद केला तर तो कट्टरतावाद? ??
- भारतावर धर्माचं नावाखाली जे आक्रमण आले तो इतिहास लपवून ठेवलं होता त्यावर प्रकाश टाकला तर तो कट्टरतावाद? (
- आणि शेवटी , सर्वधर्म समभावाचे खरे रूप आणि व्याख्या म्हणजे "सगळ्यानं सामान कायदा आणण्याचा नुसता उच्चार जरी केला तरी तो कट्टरतावाद ?
- छत्रपती शिवाजी महाराज हे जुलमी धार्मिक इस्लामी तत्वांवर चालत असलेल्या मुघाल जाचाविरुद्ध लढले असे उघड म्हणले तर तो कट्टरतावाद ?

हो मग झालाय खरा भारत कट्टरतावादी,,, कि फ़रक पेंदा ?

मी वेल्फेअर स्टेट वालाच आहे.
भारत = वेल्फेअर स्टेट म्हणजे सगळे सरकार ने फुकट ददयावे
इतर पाश्चिमात्य वेल्फेअर स्टेट: सरकार देईलच पण १००% नाही आणि शक्य असेल तिथेच + सरकार आणि खाजगी याचे मिश्रण + देश आधी मग सत्तेत दावे असोत नाहीतर उजवे

चौकस२१२'s picture

6 Dec 2021 - 4:36 am | चौकस२१२

डावे आणि इस्लाम किंवा ख्रिश्चन यांचे कसे पटते
हो पटते ना
केवळ "शत्रूचा शत्रू तो मित्र " या सूत्रानुसार , मुस्लिम दलित भाई भाई असे म्हण्यासारखे आहे ते ...

धार्मिक मुसलमानास अल्लाह आणि कुराण या शिवाय दुसरे काह्ही मान्य नाही.. विषय संपलेला असतो तिथे .
उगाच गुलाबी चष्म्यातून पाहणे सोडा

वहाबीस इतर काफिर म्हणजे काफिर मग तो जोशी असो पाटील असो नाहीतर कांबळे
खेळ खलास .. बोलूचा नाय

Trump's picture

3 Dec 2021 - 2:42 pm | Trump

धन्यवाद.

१.

डावे आणि इस्लाम आणि ख्रिश्चन यांचे मुळीच पटत नाही. डावे मायनोरीटीबद्दल द्वेषाचा प्रतिकार करतात. पण ख्रिश्चन मेजोरीटी आणि मुस्लिम मेजोरीटी देशात डाव्यांचा द्वेषच केला जातो. अमेरिकेत ख्रिश्चन लोक डाव्यांच्या कडव्या विरोधात असतात.

हे तुमची मुळ विधाने होती. त्याला माझे उत्तर होते. डावे आणि इस्लाम + ख्रिश्चन ह्यांचे चांगले पटते, काही अपवाद वगळता. कमीत कमी भारतामध्ये तरी ते एकत्र असतात.

२. तुम्ही विनाकारण इतर धर्म आणत आहात. मुळ मुद्दा आटपली कि आपण तिकडे जाउया.
मुळ मुद्दा असा आहे कि : जर इस्लाम + ख्रिश्चन इतरांना (ज्यांचा अल्लाह आणि येशुवर विश्वास नाही ते) समान हक्क देत नसतील तर त्यांना (इस्लाम + ख्रिश्चन) इतरांनी समान हक्क द्यावेत का?
इस्लाम / मुस्लिम : ज्यांचा कुराणवर विश्वास आहेत ते.
ख्रिश्चन : ज्यांचा बायबलवर विश्वास आहेत ते.
माझ्या माहीतीप्रमाणे मुस्लिमांना कुराणवर विश्वास ठेवावच लागतो आणि त्याप्रमाणे आचरण करावेच लागते. तोच नियम ख्रिश्चन लोकांना बायबल बाबतीत आहे.

*मुळ मुद्दा आटपली कि आपण तिकडे जाउया.
आटपला

@कॉमी
कृपया, ह्या मुलभुत प्रश्नाचे उत्तर द्या.
तुमचा उद्देश फक्त विरोधासाठी विरोध करणे असेल तर काही अर्थ नाही.

सहभागासाठी धन्यवाद. विकांताच्या शुभेच्छा.

Trump's picture

5 Dec 2021 - 4:34 pm | Trump

@कॉमी
तुमच्याकडे ह्या मुलभुत प्रश्नाचे उत्तर देणे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या मित्र / मैत्रीणींना उत्तर देण्यासाठी बोलवु शकता.

वामन देशमुख's picture

3 Dec 2021 - 6:37 pm | वामन देशमुख

स्लीपर सेल्स असेच काम करतात...

बायबल आणि कुराण मधली वचन उद्धृत करून मुसलमान आणि ख्रिश्चन इतरांना समान मानत नाहीत म्हणणे म्हणजे आज मनुस्मृती मध्ये ब्राम्हण कसा इतरांपेक्षा वरचढ आहे हे वाचून ब्राम्हणाचा आज तिरस्कार करा कारण ब्राम्हण आपल्याला खालचे मानतात म्हणल्यासारखे आहे ते. (जे काही लोक दुर्दैवाने म्हणतात. ते हि मुस्लिम द्वेषासारखंच.)

.. कशाचीही तुलना कशाशीही करून ते कट्टरपंथीयांना / अतिरेक्यांना त्यांच्या कृत्यांना व्हाइटवॉश करण्याचा प्रयत्न करतात. आणि शहामृगी काफिर लोक त्यावर विश्वास ठेवतात.

ज्या इस्लाममध्ये काफिरांना नुसतं जिवंत राहण्याचा देखील अधिकार नाही, काफिरांना नुसते ठार मारून नये तर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारावे अशी स्पष्ट आज्ञा मुसलमानांना आहे तिथे मुसलमान काफिरांना समान-असमान मानतील अशी चर्चा करणे म्हणजे...

मला मनुस्मृती उद्धृत करण्यात काही रस नाही. नरहर कुरुंदकरांचे मनुस्मृतीवरचे पुस्तक वाचा. लहान आहे एकदम.

रात्रीचे चांदणे's picture

3 Dec 2021 - 7:06 pm | रात्रीचे चांदणे

पण बायबल, कुराण आणि मनुस्मृती यांची तुलना होऊ शकते का? ख्रिचनांच माहिती नाही पण मिस्लिम लोक कुरणलाच प्रमाण मानतात. कुराणाच्या कुठल्या भागाला विरोध करणारा मुस्लिम शोधून सापडणार नाही तर मनुस्मृती वाचलेला एकही जण माझ्या पाहण्यात नाही.

कुराणला विरोध करणारा मुस्लीम होऊ शकतो का?
बायबलला आणि येशुला न मानणारे ख्रिश्चन होउ शकतात का?
>> उत्तरः नाही.

मनुस्मृती विरोध करणारे (जाळणारे ) हिंदु होऊ शकतात का?
>> उत्तरः हो.

जस अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक न पाळायचा आपल्याला हक्क आहे तसा एका पुस्तकातले काही भाग न पाळायचे, किंवा निवडक भाग पाळायचे किंवा काहीही न पाळता निव्वळ संस्कृती साठी स्वतःला मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणवण्याचा हक्क आहे.

जस अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक न पाळायचा आपल्याला हक्क आहे तसा एका पुस्तकातले काही भाग न पाळायचे, किंवा निवडक भाग पाळायचे किंवा काहीही न पाळता निव्वळ संस्कृती साठी स्वतःला मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणवण्याचा हक्क आहे.

ही माहीती कोठे मिळाली तुम्हाला?

वरती तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्यांचीपण उत्तरे द्या.

हि माहिती मिळायची नाही. ते माझे मत आहे आणि मी यापूर्वी पुष्कळदा मांडले आहे. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे केवळ तुम्ही काय म्हणता यावर ठरते. तुम्ही कोणत्या प्रथा/धर्मग्रंथ पाळता आणि नाही पाळत याने नाही.

हि माहिती मिळायची नाही. ते माझे मत आहे आणि मी यापूर्वी पुष्कळदा मांडले आहे.

मग त्याला काही अर्थ नाही, आणि चुकिचे मत आहे.. कुराण आणि बायबल वाचुन पहा.

इतक्या फ्लिपन्ट मताला काय उत्तर देणार ? तेव्हढे लिहिण्याचा कंटाळा.

रात्रीचे चांदणे's picture

3 Dec 2021 - 7:41 pm | रात्रीचे चांदणे

जस अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक न पाळायचा आपल्याला हक्क आहे
नाही, हिंदू म्हणून कोणतंही पुस्तक न पाळण्याचा हक्क आहे, मुळात हिंदूंसाठी आस कोणतेही पुस्तकच नाही.

कॉमी's picture

3 Dec 2021 - 8:16 pm | कॉमी

हो, मान्य आहे. तो हक्क मुस्लिमांना सुद्धा आहे. माझे काही मित्र आहेत जे धार्मिक नसून सुद्धा स्वतःला मुस्लिम म्हणवतात.

सुबोध खरे's picture

4 Dec 2021 - 10:26 am | सुबोध खरे

@ कॉमी

इस्लामचा शब्दशः अर्थ म्हणजे अल्लाच्या इच्छेला समर्पण.

हि अल्लाची इच्छा म्हणजे कुराण.

तो शेवटचा शब्द आणि त्याविरुद्ध कोणतेही अपील नाही.

असे असताना एका पुस्तकातले काही भाग न पाळायचे, किंवा निवडक भाग पाळायचे किंवा काहीही न पाळता निव्वळ संस्कृती साठी स्वतःला मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणवण्याचा हक्क आहे. हे तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता आहात

you must be joking

जाता जाता -- घोळात घोळ करून गोल गोल लिहिणे आणि शब्दांना फाटे फोडणे हा समाजवादी लोकांचा स्थायीभाव आहे.

कॉमी's picture

3 Dec 2021 - 8:14 pm | कॉमी

पण बायबल, कुराण आणि मनुस्मृती यांची तुलना होऊ शकते का?

हो माझ्या मते नक्कीच होऊ शकते. नरहर कुरुंदकरांच्या मते (हे मी माझ्या आठ्वणीप्रमाणे लिहितोय. पुस्तक समोर नाही. जे मी लिहिलेलं तपासू शकतात त्यांनी जरूर तपासून चूक असल्यास दुरुस्त करावी.) मनुस्मृतीला अधिकरवाणी म्हणून सार्वत्रिक मान्यता होती. इतर स्मृतींमध्ये बऱ्याचदा मनुस्मृती फायनल ओथोरिटी म्हणून उद्धृत केली असायची.

कुराणाच्या कुठल्या भागाला विरोध करणारा मुस्लिम शोधून सापडणार नाही तर मनुस्मृती वाचलेला एकही जण माझ्या पाहण्यात नाही.

माजिद नवाझ हे ठळक नाव डोळ्यासमोर येतय. असो, कुराण मधल्या आक्षेपार्ह गोष्टींबाबत, किंवा, त्याच्या आक्षेपार्ह आकलनाबाबत मुस्लिम धर्मगुरू असे डील करत आहेत.
https://www.npr.org/sections/thetwo-way/2018/05/11/610420149/70-muslim-c...

कॉमी's picture

3 Dec 2021 - 6:45 pm | कॉमी

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो मारत नाहीत काफ़िरांना ???

सुबोध खरे's picture

3 Dec 2021 - 7:14 pm | सुबोध खरे

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो मारत नाहीत काफ़िरांना

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो काफ़िरांना कोणतेही समान हक्क नाहीत?

वामन देशमुख's picture

3 Dec 2021 - 10:57 pm | वामन देशमुख

मी वरती म्हटलं ना, स्लीपर सेल्स असेच काम करतात.काहीही करून ते कट्टरपंथीयांना / अतिरेक्यांना / त्यांच्या कृत्यांना व्हाइटवॉश करण्याचा प्रयत्न करतात. आणि शहामृगी काफिर लोक त्यावर विश्वास ठेवतात.

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो मारत नाहीत काफ़िरांना ???

मारतात. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण, इराक...

कॉमी's picture

3 Dec 2021 - 11:18 pm | कॉमी

स्लीपर सेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही किंवा तुम्ही अतिशय मूर्ख आहात.

सुबोध खरे's picture

4 Dec 2021 - 10:27 am | सुबोध खरे

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो काफ़िरांना कोणतेही समान हक्क नाहीत?

याचं उत्तर आहे का तुमच्याकडे?

वामन देशमुख's picture

4 Dec 2021 - 8:57 pm | वामन देशमुख

अगदी अपेक्षित प्रतिसाद!

स्लीपर सेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही.

तुमच्या विधानांकडे पाहून अर्थ कळतो.

तुम्ही अतिशय मूर्ख आहात.

मी same to you म्हणणार नाही कारण मूर्खांची स्लीपर सेल्स मध्ये भरती करून घेतली जाते की नाही त्याबद्धल निश्चित माहित नाही.

सुबोध खरे's picture

6 Dec 2021 - 12:02 pm | सुबोध खरे

सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो काफ़िरांना कोणतेही समान हक्क नाहीत?

याचं उत्तर ते देणार नाहीत.

कारण स्पष्ट आहे

अमेरिकेतले डाव्या पक्षात (डेमोक्रट्स) भरपुर मुस्लीम आहेत.

भरपूर आहेत की नाहीत ह्याविषयी मला नक्की ठाऊक नाही. पण त्यांच्या इल्हान ओमझ्र ह्या बाईंची कडवी मुस्लिम मते, त्यांचा पक्ष कसे सहन करतो-- किंवा, त्या़ंजकडे काणाडोळा करतो, ह्याविषयी काही सांगितलेत, तर बरे होईल.

चौकस२१२'s picture

6 Dec 2021 - 3:39 pm | चौकस२१२

कडवी मुस्लिम मते, त्यांचा पक्ष कसे सहन करतो--

याला कारण पाश्चिमात्य दाव्यातील अति दावे "विलिंग इडिअट "
येथे मजूर पक्षात पण ते दिसते, कॅनडात हि तेच
हे मीडिया आणो प्रोपोगांडा युद्ध भारतियांनी ( म्हणजे हिंदूंनी ) जास्त चांगल्या पद्धतीने लढले पाहिजे .. येवधुशी लोकसंखय असलेले खलिस्तानी येवडः आवाज करतात ...

चौकस२१२'s picture

3 Dec 2021 - 9:03 am | चौकस२१२

आणि, मुसलमान आणि ख्रिश्चन बाकीच्यांना समान मानत नाहीत हे कशावरून सांगताय म्हणे ?

काय? कोणाला येडा बनवताय?

तुम्ही एक सुन्नी मुसलमान दाखवा जो धार्मिक हि आहे आणि उघड पने म्हणतो कि जसा माझा इस्लाम तसे इतर हि धर्म मला मान्य आहेत , अल्लाह हा एकच प्रेषित किंवा दव वैगरे नसून इतरही असतील
आणि मी तुम्हाला १० हिंदू दाखवतो कि ते म्हणतील,, कि फक्त हिंदू हा काही धर्म नाही इतर हि धर्म या जगात आहेत ... फार लांब कशाला मिपावर अगदी धार्मिक हिंदू दिसतील जे हे मान्य करतील ...

चौकशी राव, आपल्या पर्सनल ओळखीतल्या माणसांना विचारून पूर्ण समाजाबद्दल मत बनत नाही. कळतो का anecdote आणि माहितीतला फरक ?

मी माझ्या मुस्लिम मित्रांना शिया का सुन्नी विचारत नाही.

आणि एक मुस्लिम दाखवा या चॅलेंजचे मी नक्की उत्तर देऊ शकतो. पण तो धार्मिक आहे का हे तुम्ही टिकोजीराव बनून ठरवणार असाल तर कसं चालेल ? मलाला युसुफझाई उदाहरण आहे, घ्या बघा.

आणि का बरे, मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना त्यांचा देव एकुलता एक आहे आणि मोहम्मद शेवटचा प्रेषित आहे हे मानण्याचा पूर्ण हक्क आहे. हिंदूंना सुद्धा केवळ हिंदू देवांवर विश्वास ठेवायचा पूर्ण हक्क आहे. जबरदस्ती करू नये, एकमेकांच्या विश्वासाचा हक्क हिसकावू नये इतकेच.

मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना त्यांचा देव एकुलता एक आहे आणि मोहम्मद शेवटचा प्रेषित आहे हे मानण्याचा पूर्ण हक्क आहे
>>

हो हे आम्हाला पण मान्य आहे, पण म्हणून आम्हाला नरकात टाकायचा, आणि जर आम्ही जायला जयर नसलो तर स्वहस्ते नरकात ढकलायचा हक्क त्यांना कोणी दिला? तो हक्क ते वापरतात म्हणून प्रॉब्लेम आहे.

बाकी, फेसबुकवर सध्या क्रियात्मक हिंदुत्व आणि प्रतिक्रियात्मक हिंदुत्व अशीही एक चर्चा चालू आहे, तुम्ही रस्त्यावर नमाज पढत असाल तर आम्ही पण महाआरती करणार अश्या प्रतिक्रियात्मक हिंदूत्वचा सध्या जोर आहे, यातले बरेचसे हिंदू practicing धार्मिक असतीलच असे नाही, पण धर्मांतराची आणि त्या अनुषंगाने पुन्हा मध्ययुगात ढकलले जाण्याची भीती हिंदूंना हे सगळे करायला भाग पाडतेय

चौकस२१२'s picture

6 Dec 2021 - 5:47 am | चौकस२१२

क्वॉमी
मग समुपर्ण समाजाला विचारा ते या विचाराणे शक्य नसल्यास संपूर्ण समाजाचे जगभर इतर धरर्माशी काय वर्तन आहे ते तरी बघा ...
मग बोला !
मी माझ्या मुस्लिम मित्रांना शिया का सुन्नी विचारत नाही.
तुम्ही काय करता ते सोडा... सुन्नी बहुल आहेत म्हणून मी सुन्नी म्हणले.. मुसलमानांचे सर्वात मोठे प्रतिनिधी ना ते म्हणून ,, तुम्हि विचारा तर !

जबरदस्ती करू नये, एकमेकांच्या विश्वासाचा हक्क हिसकावू नये इतकेच.

हो ना .
आणि हे सर्वांनाच लागू होते ?

८०% हिंदू असून भारत हिंदू राष्टर नको बरोबर... ?
बहुल ख्रिस्ती असून ख्रिस्टरी राष्ट नाही बरोबर?
सहमत व्हाल बहुतेक याच्याशी... मग मुस्लिम राष्ट्रे का हो?

ते सुधा जाऊद्या .. जिथे सर्वधरम रिपब्लिक आहेत तिथे इतरांबरोबर राहत असतांना
- देश आधी आणि मग धर्म हे पाहिजे , नाहीतर देश या संकल्पेनवर आपलय प्रेमळ बंधूंचा विश्वास नाही असे तरी जाहीर करून टाकावे त्यांनी मग बघू !
- कॉमन सिविल कोड ?
दूध एक दूध , पाणी का पाणी पाणी का पाणी

अर्थात हे माझे विधान इ,,,,फोबिया आहे असे आपल्याला म्हणण्यास मुभा आहेच ..

सुबोध खरे's picture

6 Dec 2021 - 12:09 pm | सुबोध खरे

१०० % समाजवादी आणि साम्यवादी दांभिक आहेत.

कायम आम्ही धर्म मानत नाही पण भारताची राज्यघटना मानतो आणि घटनाच सर्वोच्च आहे असे उच्चरवाने गात असतात.

कारण सामान नागरी कायद्याबद्दल विचारले तर त्यांचे त्याबद्दल त्यांची दातखिळी बसलेली असते.

समान नागरी कायद्याबद्दल घटनेचे अख्खे कलम ४४ आहे.

The code comes under Article 44 of the Constitution, which lays down that the state shall endeavour to secure a Uniform Civil Code for the citizens throughout the territory of India.

एक हि साम्यवादी किंवा समाजवादी नेता आपण समान नागरी कायदा आणलाच पाहिजे असे बोलताना मी आजतागायत पाहिलेला नाही.

सगळे नुसते हलकट आहेत.

कारण सामान नागरी कायद्याबद्दल विचारले तर त्यांचे त्याबद्दल त्यांची दातखिळी बसलेली असते.

अगदी .. नुसता उच्चार जरी केला "समान नागरी कायद्याचा" तर काय तांडव करतील हे खांग्रेसी आणि त्यातील निम्मे हे उदारमतवादी हिंदूंचा असतील

आजिमीतील कानडा ऑस्ट्रेल्यात न्यूझीलंड मध्ये समान नागरी कायदा आहे . ख्रिस्ती बहुल असून
आणि तिथे भारतापेक्षा जास्त स्थलांतरित ( धर्म, वर्ण ( रेस या अर्थाने ) लोक राहतात !

नक्की कसले उदाहरण आहे? ती बाई सर्वधर्म समान मानते? तसे असते, तर पाकिस्तानांत हिंदू मुलींचे रीतसर अपहरण करून, त्यांचे जबरदस्तीने कुठल्यातरी मुस्लिम थेरड्याशी लग्न लावून द्यायचे व अर्थात, त्याअगोदर तिचे धर्मांतर करायचे, ह्या आता व्यवस्थित रूजलेल्या उद्योगाविषयी तिने निषेध नोंदवला असता. तसे काही माझ्यासारख्या सर्वसामान्य मॉर्टल्सच्या कानांवर तरी अद्यापि आलेले नाही. तुम्ही वाचले अथवा ऐकले असेल, तर कृपया सांगावे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

3 Dec 2021 - 3:04 pm | रावसाहेब चिंगभूतकर

हिंदू किंवा नास्तिक

इथे वर्गीकरण चुकले आहे. हिंदूंमध्ये नास्तिकतेची सुद्धा परंपरा आहे. हिंदू धर्माची व्याख्या करणे खरंच अवघड आहे. ब्रम्हदेवापासून भैरोबा पर्यंत सगळे आणि मनू पासून चार्वाकपर्यंत सगळे यात येत असल्याने धर्माबाहेर कोणी आहे असं नाहीच. एक देव, एक पंथ, एक पुस्तक असं काही मानायची सक्ती नाही. ज्यांना खरंच धर्मात राहायचं नाही, त्यांना मी हिंदू नाही असं सांगावं लागतं आणि एवढं असून सुद्धा नवबौद्ध सुद्धा गणपती बसवतातच.

हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु
https://timesofindia.indiatimes.com/india/how-supreme-court-viewed-words...

शाम भागवत's picture

7 Dec 2021 - 6:19 pm | शाम भागवत

वरील लिंकमधून थोडेसे...
राजकारणात धर्माचा वापर या दृष्टिकोनातून विचार करताना, 'हिंदू', 'हिंदू धर्म' आणि 'हिंदुत्व' चा अर्थ वेगवेगळ्या संदर्भात स्पष्ट करण्याचे अनेक प्रयत्न सुप्रीम कोर्ट वर्षानुवर्षे करत आले आहे.
परंतू कोणत्याही निकालात सुप्रीम कोर्टाने दूरान्वयानेही "हिंदुत्वाला", हिंदू धर्माची अतिरेकी किंवा कट्टर आवृत्ती म्हणून ओळखले नाही.

अर्ध्या शतकापूर्वी, 'शास्त्री यज्ञपुरुषजी' प्रकरणात मुख्य न्यायमूर्ती पीबी गजेंद्रगडकर, केएन वांचू, एम हिदायतुल्ला, व्ही रामास्वामी आणि पी सत्यनारायणराजू या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने [१९६६ SCR (३) २४२] 'हिंदू' शब्दाचा ऐतिहासिक आणि व्युत्पत्तीशास्त्रीय दृष्टिकोनातून वर्णन करण्याचा प्रयत्न केला होता.
खंडपीठासाठी निकाल लिहिताना न्यायमूर्ती गजेंद्रगडकर म्हणाले होते, “विद्वानांचे सामान्य मत असे दिसते की ‘हिंदू’हा शब्द पंजाबमधून वाहणाऱ्या सिंधू नदीपासून आला आहे आणि "हिंदू" या शब्दाच्या अशा ऐतिहासिक आणि व्युत्पत्तिशास्त्रीय उत्पत्तीमुळे भारतशास्त्रज्ञांमध्ये वाद निर्माण झाला आहे."
“जेव्हा आपण हिंदू धर्माचा विचार करतो, तेव्हा आपल्याला हिंदू धर्माची व्याख्या करणे किंवा त्याचे पुरेसे वर्णन करणे अवघड असले तरी ते अशक्य नाही."
"जगातील इतर धर्मांप्रमाणे,
१) हिंदू धर्म कोणत्याही एकमेव प्रेषीताचा किंवा गुरूचा दावा करत नाही,
२) तो कोणत्याही एका देवाची पूजा करत नाही,
३) तो कोणत्याही एका मतप्रणालीला मानत नाही,
४) तो कोणत्याही एका तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत नाही
५) तो कोणत्याही एका तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत नाही.
६) तो एखादा विशिष्ट धार्मिक विधी किंवा कार्यक्रमाचा संच नाही.
७) खरं तर, कोणत्याही धर्म किंवा पंथाच्या संकुचित पारंपारिक वैशिष्ट्यांचे समाधान करणारे दिसत नाही.
मात्र
याचे विस्तृतपणे वर्णन एक जीवनशैली किंवा जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून केले जाऊ शकते, आणखी काही नाही. ”

साहना's picture

12 Dec 2021 - 6:04 am | साहना

डावे आणि इस्लाम ह्यांचे बऱ्यापैकी पटते जो पर्यंत इस्लाम बहुसंख्यांक होत नाही. अमेरिकेतील पराकोटीचे डावे AOC, प्रेमीला जयपाल आणि तालिब, ilhaan ओमर ह्या सर्व मैत्रिणी आहेत. ह्याचे कारण थोडे ऐतिहासिक आहे.

बोल्शेव्हिक क्रांतीनंतर बोल्शेव्हिक मंडळींकडे मोठी संघटना नव्हती पण खिलाफत च्या नावाने पॅन इस्लाम अशी चळवळ निर्माण होत होती. बोल्शेव्हिकांनी म्हणूनच इस्लाम चा आधार घेत मुस्लिम कम्युनिसम नावाचा प्रकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अजरबैजान इत्यादी भागांत मोठी संघटना उभारून इस्लाम आणि साम्यवाद ह्यांनी पाश्चात्य वसाहत वादावर आक्रमण करावे अश्या घोषणा निर्माण करण्यात आल्या. माझ्या आठवणी प्रमाणे ह्या चळवळीचा नेता एक साम्यवादी यहुदी होता. "इन्किलाब जिंदाबाद" हि अरबी घोषणा त्याच चळवळीतून निर्माण झाली आणि भारतातील साम्यवादी जसे भगतसिंग वगैरेंनी त्याला भारतांत लोकप्रिय केले.

ह्या सर्व खटाटोपाचा एक साईड इफेक्त्त म्हणजे इस्लाम आणि साम्यवादाची सांगड घालण्यासाठी साम्यवादी विचारवंतांनी विपुल लेखन केले. १९१६ मध्ये इंडोनेशिया मधील कामगार चळवळ एक इस्लामिक संघटनेत बदलली आणि त्यांनी "मुहम्मद हा समाजवादाचा जनक होता" असा ठराव पास केला. एकूण इतिहास पाहता इस्लाम साम्यवादाचा वापर करून राजकीय सत्ता प्राप्त करतो आणि एकदा सत्ता प्राप्त झाल्यानंतर साम्यवाद बाजूला पडून त्याची जागा धर्मांधता घेता असा पॅटर्न सर्वत्र आढळतो. पण तो पर्यंत अनेक साम्यवादी आणि इस्लाम प्रेमी मंडळी मीडिया, शिक्षण क्षेत्रांत वर चढते. ह्याच मुळे इरफान हबीन, रोमिला थापर, ऑड्री तास्कि इत्यादी प्राध्यापक मंडळी स्वतः साम्यवादी असून इस्लामप्रेमी आहेत. त्यांचा मूळ धर्म वेगळा असला तरी.

इस्लाम आणि साम्यवाद ह्या दोन्ही पॅरासिटिक स्वरूपाच्या विचारसरणी आहेत. एकमेकां साह्य करू अवघे खाऊ वसुंधरा ह्या न्यायाने ते काम करतात.

ह्या सर्व खटाटोपाचा एक साईड इफेक्त्त म्हणजे इस्लाम आणि साम्यवादाची सांगड घालण्यासाठी साम्यवादी विचारवंतांनी विपुल लेखन केले. १९१६ मध्ये इंडोनेशिया मधील कामगार चळवळ एक इस्लामिक संघटनेत बदलली आणि त्यांनी "मुहम्मद हा समाजवादाचा जनक होता" असा ठराव पास केला.

हे मला माहिती नव्हते. धन्यवाद.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Dec 2021 - 8:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१. सतत एक बाजु दुसर्‍यावर अन्याय करते आहे.
२. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे.
३. दांभिकपणा.

ही वैशिष्ट्ये दोन्ही बाजूंकडे दिसतात. सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे समर्थन उजव्या बाजूचे लोक करताना दिसतात. महागाईवरुन कानठळ्या बसवणारी भाषणे करणारे व त्या वरुन २४-७ कथित पत्रकारिता करणारे उजवीकडेच कललेले होते असे दिसते. हेच पत्रकार आता निवडक बातम्या देत आहेत. व खोट्या बातम्याही पसरवत आहेत.

चौकस२१२'s picture

6 Dec 2021 - 5:58 am | चौकस२१२

सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे समर्थन उजव्या बाजूचे लोक करताना दिसतात.

अल्पसंख्यांकांचे लांगुनचालन केलेलं चालते वाटत ! , संरक्षण नव्हे मी लागूनचालन म्हणतोय ( बहुसंख्याकांनी अल्पसंख्यांकांचे संरक्षण तर केलेच पाहिजे त्यात दुमत नाही )
आणी का हो ४०० अधिक शीट "आई हुतात्मा झाली " म्हणून मिळवल्या तेव्हा नव्हता का काँग्रेसी बहुसंख्यवादि !

प्रश्न असा आहे कि आहे कि लोकशाही मार्गाने २ वेळेस निवडून आलेले नावडतीचे पक्षाचे सरकार विचारसरणी ला पंचतंच नाही ...
आधी मनाची तयारी करा . केवळ गांधीवादी विचारसरणी च्या काँग्रेस आणि दाव्याना सत्तेत येण्याचा मक्ता आता यापुढे नाही .. पिताश्रींची जहागीरदारी नाही !

सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे समर्थन उजव्या बाजूचे लोक करताना दिसतात.
१. बहुसंख्यांकवाद आणि लोकशाही यातील फरक काय?
२. मुस्लीम देशामध्ये इतरांना कमी अधिकार असतात, तो एक बहुसंख्यांकवाद नाही का?

मी सुरुवाती सुरुवातीला माईल्ड उजवा कसा होतो ते सांगतो.

अटलास श्रगडचा खूपच प्रभाव पडलेला. ऑब्जेक्टिव्हिसम हेच फक्त तार्किक आणि बाकी सगळं अतार्किक असे वाटलेले. नास्तिक तर आधीच होतो, ते ऑब्जेक्टिव्हिस्ट विचारात बसणारं आहेच. घरात, शाळेत सावरकरांबद्दल भरपूर ऐकलं होतच. स्वतः फर्स्ट हॅन्ड सावरकर वाचले नव्हते, पण त्यांची शाळेत म्हणायचो ती गाणी फार आवडायची. (जयोस्तुते,ने मजसी ने इ.) त्यामुळे सावरकरांवर केवळ असहमती दर्शवून न थांबता, माफीवीर वैगेरे टीका करणे आजिबात आवडले नाही (अजूनही आवडत नाहीच.). आणि सावरकर बाकी स्वातंत्र्यसैनिकांच्या पासून नक्की काय बाबतीत वेगळे आहेत- त्यांच्याबद्दल आकस का आहे हे समजण्याइतकी मॅच्युरिटी तेव्हा नव्हती.

अर्थात मी उजवा असलो तरी लिबरटेरियन होतो- शेवटी आयन रँड फ्यान. म्हणजेच हिंदू खतरे मैं है, मुस्लिम बॅड इत्यादी कधीच नाही. उजवे असणे कोणाबद्दल तरी द्वेष बाळगून किंवा कोणाचीतरी भीती बाळगून नव्हते. फ्रीडम ऑफ स्पीच तेव्हा सुद्धा पुरस्करणीय वाटायचेच.फक्त व्यक्तीचे समाजाप्रती दायित्व वैगेरे काहीही नसते असे मला वाटायचं. हॅंक रिअर्डन चे वाक्य भयंकर आवडायचे तेव्हा (अटलास श्रगड चे सार म्हणून हे वाक्य चालू शकेल-)

‘तुम्ही स्वतःचं हित लोकहितापेक्षा अधिक महत्त्वाचं लेखता?’
‘हा प्रश्न केवळ नरभक्षकांच्या समाजातच उद्भवू शकतो असं मी लेखतो.’
‘काय म्हणायचंय काय तुम्हाला?’
‘मी असं मानतो की, जी माणसं कष्ट न करता पैसे कमावण्याचा विचारही करत नाहीत त्यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष उद्भवत नाही. जे समाज मानवी आहुती मागत नाहीत त्यांच्यात हा प्रश्न उद्भवत नाही.’

आता मोठा झाल्यावर विचार बदलले. आता अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या वस्तूंपासून वंचित कोणीही राहू नये असे मला वाटते. म्हणून मी आता राईट चा लेफ्ट लिबरटेरियन झालो.

आणि आता समजले की अटलास श्रगड ही एक परीकथा आहे.
कोणीतरी म्हणलंय-

लहान मुलांच्या जीवनात दोन पुस्तकं फार मोठा परिणाम करणारी असतात. एक अटलास श्रगड आणि दुसरं लॉर्ड ऑफ द रिंग्स. त्यातल्या एका पुस्तकामध्ये अविश्वसनीय दुष्ट खलनायक, अविश्वसनीय सामर्थ्यवान आणि नैतिक नायक, पूर्णपणे काल्पनिक जग आहे. आणि दुसऱ्या पुस्तकात दैत्य आणि एल्फ आहेत. :)

जेम्स वांड's picture

2 Dec 2021 - 11:20 pm | जेम्स वांड

अमेझिंग प्रवास आहे,

माझा काहीसा पेंडुलम झाला होता, कसा ते सांगतो.
सुरुवातीला मी लेफ्ट लिबरटेरियन होतो, अजूनही कैक सिविल व्हॅल्यू मी जपतो, कारण मला त्या पटतात, जवानीत पाऊल टाकलं तेव्हा रुपेरी पडद्यावर "लेजंड ऑफ भगतसिंग" झळकला होता, भारून गेलो होतो त्यानं, मग जात्याच असलेली वाचनाची आवड कामी आली, जेल डायरी, साथीयो को खत, मैं नास्तिक क्यू बना इत्यादी भगतसिंग साहित्याचे वाचन झाले, अन झालं, बबल्या स्वप्नाळू झाला. वयच होतं ते तसलं.

नंतर वय वाढत गेलं, दुनियेच्या कक्षा रुंद होऊ लागल्या, जात नावाचं वास्तव कळलं, १००० वर्ष पहिले माझ्या एखाद पूर्वजांच्या एखाद्या दुसऱ्या जातीतल्या माणसाच्या पूर्वजांवर केलेल्या अत्याचारांचे पापक्षालन म्हणून आज माझ्या जातीचा उद्धार मला हसत ऐकावा लागला, मी जात पाळत नाही हे माहिती असूनही मला ते सिद्ध करत बसावं लागलं,

मग उजवीकडे झुकलो, म्हणलं इतकं उदार राहून शिव्याच पदरी पडतात तर आपण कर्मठ राहून का शिव्या खाऊ नये, अगदी मुसलमान कापा, त्यांच्या बायकापोरी पळवून आणा इतपत कट्टर मी नक्कीच झालो नाही पण हो, मी माझी धार्मिक अन जातीय आयडेंटिटी नक्कीच कुरवाळू लागलो, बरोबर होतं का चूक मला माहिती नाही पण रिएक्शनरी होतं.

हल्ली आम्ही सेन्ट्रीस्ट आहोत, फेन्ससीटर्स गॅंग मेंबर, पेंडुलम स्थिरावतोय बऱ्यापैकी, सगळीकडचे सर्वोत्तम घेऊन आपले वैयक्तिक, वैचारिक आणि बौद्धिक आयुष्य समृद्ध करवून घेण्यात मला आजकाल जास्त रस वाटतो, उदाहरणार्थ, सावरकरांच्या विषयीच घेऊ

कोणी म्हणले सावरकर बेस्ट - माझा प्रश्न - कुठले ?

कोणी म्हणले सावरकर वर्स्ट - माझा प्रश्न - कुठले ?

कारण मुळात सावरकर मोठे व्यक्तिमत्व होते अनेक "फेजेस" होते त्यांच्या आयुष्यातले, कुठला फेज आवडतो/ नावडतो ते महत्वाचे, मला अख्खे सावरकर समजले म्हणणारा गडी हमखास लोणकढी मारतोय ते कळूनच येते. सावरकर आवडतात/ नावडतात ते नेमके कुठले ? मित्रमेळा फेज, अभिनव भारत फेज, अभिनव भारत लंडन फेज, बॉम्ब विद्या प्राप्ती फेज, अटक फेज, मार्सेल्स फेज, अंदमान फेज, बाहेर यायचा फेज, रत्नागिरी स्थानबद्धता फेज, सामाजिक चळवळ फेज, हिंदू महासभा फेज, असे पैलू पाडून मी सावरकरांचा अभ्यास करू शकतो मला वाटते हे सेन्ट्रीस्ट असल्यामुळेच जमत असावे, सध्या तरी हा फेज एन्जॉय करतोय.

तळटीप - धागाकर्ते सरांनी सेन्ट्रीस्ट लोकांना खिजगणतीतही मोजले नाहीए म्हणून प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद म्हणून देतोय

तळटीप - धागाकर्ते सरांनी सेन्ट्रीस्ट लोकांना खिजगणतीतही मोजले नाहीए म्हणून प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद म्हणून देतोय
>> माफ करा. :(
तुम्ही लिहीत रहा.

माझ्या द्रुष्टीने तुम्ही अजुन उजवेच आहात.

१. सावरकर स्वतः नस्तिक होते, हे बर्‍याच तथाकथीत उजव्यांना माहीती नसते.
२. आंबेडकारांनी इस्लामबद्दल आधीच पुर्वसुचना दिली होती. हे बर्‍याच तथाकथीत 'जय भीम जय मीम' वाल्यांना माहीती नसते.
३. गांधीजी कट्टर हिंदु होते. हे बर्‍याच तथाकथीत पुरोगाम्यांना वाल्यांना माहीती नसते.

तर्कबुद्धी वापरणे, देवाला ताडुन बघणे हे हिंदु धर्माचा एक भाग आहे. असो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Dec 2021 - 4:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

असूनही हे सगळंच म्हायती की

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Dec 2021 - 12:12 am | चंद्रसूर्यकुमार

हा प्रश्न मला लागू नाही कारण मी पहिल्यापासूनच उजवा होतो आणि आजही उजवाच आहे. तरीही एक गोष्ट लिहित आहे. ही गोष्ट आर्थिक बाबतीविषयी आहे- राजकीय नाही. राजकीय दृष्ट्या उजवे (भाजप, संघ वगैरे) आर्थिक विचारांनी पण उजवेच असतील असे गृहित धरून अनेकदा अप्रस्तुत प्रश्न विचारले जात असतात. निदान भारतात सार्वजनिक जीवनात आर्थिक उजवे कोणीच नाही. भाजपची राजकीय धोरणे उजवी असली तरी आर्थिक धोरणे उजवी नाहीत- अर्थात ती कम्युनिस्टांइतकी डावी नाहीत पण भाजपला आर्थिक दृष्ट्या उजवे म्हणता येणार नाही. विशेषतः मोदी सरकारच्या शेकडो योजना लक्षात घेता. डावे-उजवे यावर कोणतेही भाष्य करताना हा महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे असे वाटते. तो लक्षात न घेतल्यास दिशाभूल करणारी अनुमाने निघतील.

राजकीय पक्षांमध्ये मी आर्थिकदृष्ट्या डावा का नाही? वरकरणी असे दिसते की आर्थिक डावे कोणतीही मागणी चुकीची करत नाहीत. सगळ्यांना आरोग्यसेवा, अन्न वगैरे मूलभूत गोष्टी मिळाल्या पाहिजेत. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? नसेल तर मग जगात सर्वत्र डाव्या राजवटी असतात तिथे हुकूमशाही का असते? किंवा वेनेझ्युएलाप्रमाणे अर्थव्यवस्थेचे वाटोळे का होते? त्यावर माझा दावा असा आहे की सत्तेत येण्यापूर्वी हे लोक नेहमीच 'लेफ्ट लिबर्टेरिअन' असतात. लिबर्टेरिअन म्हणजे माणसाच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारे आणि कोणत्याही सक्तीला विरोध करणारे. पण सत्तेत आल्यावर मात्र तेच लोक लेफ्ट ऑथोरिटॅरिअन बनतात आणि हुकुमशहा बनतात. म्हणजेच माझा दावा आहे की लेफ्ट लिबर्टेरिअन ही सत्तेत आल्यावर स्थिरावणारी गोष्ट नाही तर वाटचाल ऑथोरिटॅरिअ‍ॅनिझमकडेच होते. असे का होते?

याविषयी अर्थतज्ञ फ्रेडरीक हायेक यांनी एक खूप सुंदर गोष्ट लिहिली आहे. मुळात परीच्छेद अर्थात इंग्लिशमध्ये आहे. त्याचे स्वैर भाषांतर करतो. त्यात कंसात माझ्याही कमेंट लिहितो.

"मी या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणार या उद्देशाने कोणीही सुरवात करत नाही. तर अशा सत्ताधीशाचे देशातील गरीबांची स्थिती बघून हृदय पिळवटून जाते. मग काय करायचे? तर आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे. हे करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लोकांमध्ये पैसे वाटायचे. (वेनेझ्युएलामध्ये हेच झाले. भारतात राहुल गांधींच्या न्याय या व्यवस्थेतही हेच करायची क्षमता होती). त्यातून पुढचा प्रश्न जन्माला येतो. मनी सप्लाय वाढला की महागाई वाढते. महागाई वाढली की लोकांना आवश्यक गोष्टी परवडेनाशा होतात. त्यावरही अशा सत्ताधीशांकडे उपाय असतो. समजा ब्रेड महाग व्हायला लागला तर ब्रेडच्या किंमतीवर नियंत्रण टाकायचे. आणि ब्रेड महाग विकून लोकांना लुबाडल्याबद्दल बेकरीवाल्याला भांडवलदार म्हणून शिव्या घालायच्या. पुढे काय होते? तर ब्रेड एका नियंत्रित किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकता येणार नाही पण ब्रेड बनवायला लागणारे पीठ मात्र महागच होत चालले आहे. अशावेळेस ब्रेड विकणे न परवडल्याने बेकरीवाले ब्रेड बनविणेच बंद करणार. मग पुढे काय करायचे? तर पीठाची किंमत अशीच नियंत्रित करायची. पीठाची किंमत नियंत्रित केल्यावर त्या उद्योगात गुंतलेल्यांना त्या किंमतीत पीठ विकणे परवडेनासे झाले की मग ते पीठाऐवजी दुसर्‍या गोष्टी विकायला लागतात.

मग काय करायचे? तर बेकर्‍याच ताब्यात घ्यायच्या (राष्ट्रीयीकरण करायचे) आणि आपल्या पक्षातील मर्जीतल्या लोकांना बेकर्‍या आणि पिठाच्या चक्क्या चालवायला द्यायच्या. या मंडळींना त्या उद्योगातील काहीही माहित नसल्याने त्यांच्याकडून कारभार व्यवस्थित होत नाही. मग वेगवेगळ्या गोष्टींची टंचाई निर्माण होते. लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊन मग हिंसाचार सुरू झाला की मग काय करायचे? हिंसाचार करणारे भांडवलदारांचे हस्तक आहेत असे म्हणत त्यांना शिव्या घालायच्या. मग हिंसाचार काबूत आणायला लष्करी बळ वापरायचे. लष्करी बळाची ताकद जरा ढिली पडली की परत परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. त्यामुळे पोलादी पंजा कायम ठेवायचा."

म्हणजे होते काय? की चांगल्या हेतूने सुरवात केलेली असते त्याचा परिणाम हा असा होतो. थोड्याबहुत प्रमाणात जगभर डाव्या राजवटींमध्ये हेच बघायला मिळेल.

मग नवेनवे लाल रंगाच्या छटा असलेले लोक पुढे येतात. चे गव्हेराने केलेला हिंसाचार आम्हाला मान्य नाही पण तो हिंसाचार वगळून सगळ्या जनतेचे भले व्हावे असे म्हणणारे बर्नी सँडर्स सारखे लोक पुढे येतात. इट वॉस नॉट रिअल कम्युनिझम हे त्या लोकांचे नेहमीचे पालुपद असते. पण मग ज्या भांडवलशाहीमुळे जनतेचे हाल झाले असे ते म्हणतात ती उजवी पध्दत तरी कुठे 'रिअल उजवी' असते? जगात परिपूर्ण असे काहीच नसते. तेव्हा तुलना अपूर्ण उजवी पध्दत विरूध्द अपूर्ण डावी पध्दत अशीच असते. पण चित्र असे उभे केले जाते की तुलना अपूर्ण डावी विरूध्द परिपूर्ण उजवी यात असते. तसे अजिबात नाही. दोन अपूर्ण पध्दतींमध्ये डावी पध्दत मात्र पूर्ण अपयशी ठरते आणि लोकांच्या हालअपेष्टांमध्ये भर टाकते हा आजवरचा इतिहास आहे.

जेम्स वांड's picture

3 Dec 2021 - 8:45 am | जेम्स वांड

जगात परिपूर्ण असे काहीच नसते. तेव्हा तुलना अपूर्ण उजवी पध्दत विरूध्द अपूर्ण डावी पध्दत अशीच असते.

एकंदरीत चर्चा करण्यालायक उजवा माणूस भेटला एक, मजा येईल तुमच्याशी विविध विषयांवर चर्चा करायला चंसुकू साहेब, माणसाने अँटी कम्युनिस्ट असणे आजवर बघितले होते ते लोक वाटेल तसे बोलत असतानाच, संयत अन मनसोक्त वाचनावर आधारित विवेचन आवडले तुमचे, उजवेपणाचे ब्रँडिंग म्हणजे कट्टर धार्मिकता झाले आहे पण त्याला तुम्ही सुखद छेद दिलात.

पुष्कर's picture

3 Dec 2021 - 12:23 pm | पुष्कर

प्रतिसाद आवडला चंसूकु!

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Dec 2021 - 4:10 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2021 - 1:55 am | प्रसाद गोडबोले

खुप उत्तम धागा आहे !

मुळात , माझ्यामते डावे उजवे ह्या संकल्पना केवळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातुन पहाव्यात , त्यात समाजकारण , राजकारण , धर्मकारण वगैरे घुसडले की सगळा घोळ होतो.
त्यामुळे भाजप , शवसेना , कॉंग्रेस , राष्ट्रवादी , सावरकर , गांधी , हिंदु अन शांततेचे धर्म वगैरे फाटे फुटतात अन मुळ मुद्दा बाजुला रहातो. (तेही मह्त्वाचे मुद्दे आहेत नाहीत असे नाही पण सरमिसळ करुन चर्चा करण्यात काय ? त्यावर स्वतंत्र धागे निघावेत.)

आता मुळ प्रश्नाकडे :

तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?

मी मुळात कधी डावीकडे अर्थात कम्युनिझम कडे नव्हतोच , पहिल्यापासुनच कॅपिटॅलिझमच एकदम नॅचरल आणि लॉजिकल वाटत आले .
मुळात कम्युनिझम चा पाया "समाजात कायमच दोन गट असणार एक शोषक आणि दुसरा शोषित. आणि त्यांच्यात कायमच क्लास स्ट्रगल होत रहाणार , आणि देअर विल्ल बी ब्लड , अर्थात तो संघर्ष रक्तरंजित असणार " असल्या बाष्कळ आयडेंटिटी पॉलिटिक्सवर आणि विनाकारणच हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या संकल्पनेवर उभारलेला आहे. आणि हे असे भेद कुठेही कसेही सोयीनुसार घडवता येतात , जसे मार्क्स ने युरोपात श्रीमंत वि गरीब केले , अमेरिकेत काळे वि गोरे, फेमीनाझींनी एक पाऊल पुढे जाऊन स्त्री वि पुरुष केले, आपल्याकडे उच्चवर्णिय वि दलित केले . हे असली बाय-पार्टिशन सिटीम उभारुन लोकांची माथी भडकावणे अन त्यांना अर्थिक संमृध्धी पासुन वंचित ठेवणे खुप्प सोप्पे आहे !
एकदा का तुमच्या मनात रुजवले की तुम्ही शोषित आहात अन दुसरा कोणी तरी शोषक की मस्त आग पेटते आणि आपण सहज सत्ता काबीज करुन उपभोगु शकतो इतके सोप्पे गणित आहे ! कित्येक निष्पाप लोकांच्या हत्येचे प्रत्यक्ष कारण असलेला चे गव्हेरा चे प्रिंट असलेले टीशर्ट घालुन लोकं मिरवतात तेव्हा खरेच त्यांच्या अज्ञानाची आणि निर्बुध्दपणाची कीव वाटते !

कॅपिटॅलिझम नॅचरल वाटते ! ज्याच्याकडे कॅपिटल असेल तो जिंकेल. मग ते आर्थिक असेल बौध्दिक असेल सामाजिक असेल की शारिरिक असेल ! कितीही क्रुर वाटत असले तरीहा अल्मोस्ट निसर्गाचा फिजिक्स चा नियम असल्यासारखे सत्य आहे ! तुम्ही कितीही त्रागा करा , रिलायन्स अंबानी अडाणी वगैरेंच्या नावाने त्रागा करा काहीही उपयोग नाही , त्यांच्याकडे इतके प्रचंड कॅपिटल आहे की ते सहज सर्व काही मॅनेज करु शकतात ! धिस इज दि फॅक्ट . त्रागा करुन तुम्ही स्वतःला मन्स्ताप करुन घ्याल स्वतःची एनर्जी अन आयुष्यातील मौलिक वेळ वाया घालवाल , त्यापेक्षा तेच तुमचे कॅपिटल आहे असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही त्या कॅपिटल चा बेस्ट वापर करुन एकेक पायरी पुढे जाल अन काय सांगता , तुम्हाला कदाचित त्या लेव्हल ला जाण्याची संधीही मिळेल ! Its all like chess. White may have a minor advantage of making first move, but that doesn't mean white always wins. The only one who makes best use of available recourses wins! and then he creates his monopoly . this all makes perfect sense to me.
लहानपणी ज्यांनी व्यापार हा खेळ खेळला आहे आणि त्यात कसे जिंकायचे हे समजुन घेतले आहे त्या सर्वांनाच कॅपिटॅलिझम एकदम स्वाभाविक वाटेल !

म्हणुनच मी कधीच लेफ्टिस्ट / कम्युनिस्ट नव्हतो... काय्मच उजवा अर्थात कॅपिटॅलिस्ट होतो !
पण
कोव्हिड २०१९ चिंतनांमध्ये एक मोठ्ठा साक्षात्कार झाला ! Communism is not an enemy of capitalism, it is just a tool of capitalism !
त्यामुळे जे मला आपले वाटतात त्यांना मी कॅपिटॅलिझम अभ्यासायला सांगतो , केन्स वि हायेक वाचायला सांगतो, अ‍ॅडम स्मिथ वाचायला सांगतो, जॉन नॅश गेम थेअरी , माकियाव्हेली , सन झु , मार्कस ऑरेलियस आणि नजीकच्या काळात जॉर्डन पीटर्सन चे १२ रुल्स फॉर लाईफ सुचवतो.

आणि जे मला आपले वाटत नाहीत त्यांना कम्युनिझमच प्रीच करतो , जावा , शिका , संघटित व्हा, संघर्ष करा , संप करा , मोर्चे काढा , सत्ता उलथवुन टाका , तुमच्यावर अण्याव झाला आहे , सूड घ्या , पेटुन उठा कॉम्रेड्स !

कॅपिटॅलिस्ट लोक्स, आपल्याला एवढा वेळ नाहीये : शिका , संघटित होऊ नका , संघर्ष करायचा तर करायचा विचारही करु नका, मस्त कॅनडा , अमेरिका , ऑस्ट्रेइलया , जर्मनीला जा, भारतातच रहाणार असाल तर मोठ्ठ्या शहरात रहा , मस्त मोठ्ठा ५५ इंची टीव्ही घ्या (अ‍ॅमेझॉन वरुन तोही एम.आय चा), संप, मोर्चा, बंदचे व्हिडीओ बीयर अन पॉपकॉर्न खात पहा , अन्याय , सूड वगैरे फालतु गोष्टी आहेत , उडीदामाजी काळेगोरे , दुनियेत हे वर खाली रहाणारच , कुठे रडत बसता सारखं , भेंचो, एक जिंदगी आहे , लिमिटेड वेळ अन लिमिटेड ब्रेन आहे हेच आपले कॅपिटल आहे , तेच वापरा पुरेपुर , कष्ट करा , पैसे कमवा, सुखाने जगा !

-

करण्याचा तर्क बाकी ठिकाणी वापरला तर हरकत नाही ना? जसं बलात्कार, पैसा अडका, जमीन हिसकावून घेणं.

प्रसाद गोडबोले's picture

3 Dec 2021 - 10:40 am | प्रसाद गोडबोले

आर्थिक विषमतेचं इतकं निर्लज्ज समर्थन करण्याचा तर्क बाकी ठिकाणी वापरला तर हरकत नाही ना?

ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही "आपले " आहात की "परके" ह्यावर अवलंबुन आहे ! तुम्ही गट क्र.१ मधील आहात की गट क्र. २ मधील ? हे जो पर्यंत मला कळत नाही तो पर्यंत ह्या प्रश्नाचे उत्तर क्वांटम सुपर पोझिशनमध्ये हो आणि नाही असे दोन्हीही आहे !

आर्थिक दृष्टया समाजाची रचना कशी असावी या पुरतेच जर हे डावे उजवे बोलायचे तर
- जबाबदार भांडवशाही हि अति टोकाचाय डाव्या विचारसरणी पेक्षा जास्त यशस्वी झालेली दिसते
२ उद्धरणे
१) सिंगापोर, = मुक्त अर्थवयवस्था अमेरिकेला हि लाजवेल असे भांडवलशाही उद्योगानं प्रोत्साहन पण त्या बरोबरच ७० जनतेला "मकान " मिळेल हि व्यवस्था.. ( ७०% जनता सरकारी घरात राहते )
२) ऑस्ट्रेल्या आणि न्यू झीलंड = भांडवशाहानं भोवळ येईल असा ४५% आयकर दर कंपनी आयकर दर ३०% , बेकारी भत्ता , जगातील एक बऱ्यापकी समाधानकारी व्यद्यकीय सेवा ( उजवे सरकार असून , कोविड काळात १०० पेक्सह जास्त बिलियन डॉलर ( रुपये ५३-५५) खर्च
४ आठवडे सुट्टी ( अमेरिकेत २ आठवडे ते ३ ), उत्तम रस्ते
पण त्याच बरोबर बहुतेक गोष्टी खाजगी मालकीच्या

थोडक्यात काय भांडवशाही जगात भांडवशाही सरकार ला काही ना काही सामाजिक फायद्याच्या गोष्टी करावय्याचं लागतात !
जर समाज आणि ग्राहकाचं खिशात काहीच नसेल तर भांडवलशहा चा धंदा कसा चालणार?

टोकाचा ( डॉग ईट डॉग) भांडवषयी आणि टोकाची डावी वृत्ती हे दोन्ही घातक

आता यात देश आणि धर्म आणला तर मग हे खूपच गुंतागुंतीचे होते उदाहरण बरेच भाजप समर्थक धर्मानंदः हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत.... त्यांचा पाठींबा आहे तो "हिंदूंना मान द्या , अवहेलना करू नका " या विचारांना ...

तर्कवादी's picture

3 Dec 2021 - 7:20 pm | तर्कवादी

जबाबदार भांडवलशाही योग्य...
माझे वाचन चौफेर नाही. किंवा फार अभ्यास नाही. पण सहज विचार करता काही गोष्टीं जाणवतात त्या अशा :

सरकारकडे इतके जास्त भांडवल वा इतर सोयी / व्यावसायिक हुषारीचे मनुष्यबळ नसतात की सरकार देशातले सर्व उद्द्योग उभारु शकेल आणि चालवू शकेल त्यामुळे असे उद्द्योग खासगी भांडवलदारांनी उभारणे /चालवणे योग्य ..
उदा: आज भारतात अनेकविध दुचाकी / चारचाकी वाहने उपलब्ध आहेत. त्यांची गुणवत्ताही ही चांगली आहे आणि स्पर्धात्मकतेमुळे किमतीवरही नियंत्रण आहे. जर सरकारने असे सर्व दुचाकी / चारचाकी वाहनांचे कारखाने उभारायचे व चालवायचे ठरवले असते तर ते योग्य झाले असते का ? बाजारात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मॉडेल्स असते आणि तेही फारसे अद्ययावत नाही. किमतीही कदाचित अधिक असत्या. फोनचे उदाहरण बघा.. पुर्वी लँडलाईन फोनची सेवा ही फक्त सरकारी कंपनीकडून पुरवले जाई आणि फोनची जोडणी मिळण्याकरिता दोन-पाच वर्षे वाट पहावी लागायची. त्यामुळे फोनसारखी सुविधाही सर्वसामान्यांना कठीण गोष्ट होती... फोन सेवेचे दरही फारसे परवडणारे नव्हते. तर खासगी उद्योंगाकडून मिळणारी मोबाईल सेवा गरीब व्यक्तीलाही परवडणारी आहे. मग भांडवलशाहीमुळे गरीबांचे हित झाले की अहित ?

तर दुसरीकडे अनेक वर्षे तोट्यात असतील असे , प्रचंड खर्चाचे पण तरीही समाजासाठी अतिशय गरजेचे असेही अनेक उद्द्योग असतात जे सरकारला चालवावेच लागतात किंवा अशा प्रकल्पावर खर्च करावा लागतो. उदा: रेल्वे. आता आपण रेल्वेच्या खासगीकरणाच्या गोष्टी कदाचित बोलू शकतो. उदा. मुंबईत मेट्रो ही रिलायन्स कंपनीच्या मालकीची आहे, तिकिटाचे दर लोकलपेक्षा जास्त आहेत पण पन्नास वर्षापुर्वी एखाद्या खासगी कंपनीने अशा प्रकल्पात हात घातला असता का ? स्वातंत्र्यानंतर वीजनिर्मिती , रस्तेबांधणी , खाण या क्षेत्रात खासगी उद्द्योग मोठ्या प्रमाणात उतरू शकले असते वा उतरू इच्छिले असते का ? मुळात खासगी उद्द्योगांकडे इतके भांडवल वा त्यांना कर्जे देण्याकरिता बॅंकाकंडे पैसा होता का ? जागतिक बँक वा तत्सम संस्था खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देते का ?
फार काय आताही बघा..

त्यामुळे एकच एक विचारसरणी अनुसरुन चालणार नाही. जिथे व ज्या काळात खासगी उद्योग हात घालणार नाहीत तिथे सरकारला हात घालणे भाग आहे तर जिथे स्पर्धात्मकतेमुळे लोकांचा फायदा होईल आणि नफ्यामुळे उद्योजकही आकर्षित होतील अशा क्षेत्रांत खासगी उद्योगांना वाव देणे योग्यच. कोव्हिडची लस सरकारी खर्चानेही दिली जात आहे आणि ७८० / १४१० अशा व्यावसायिक (पण तरीही नियंत्रित) दरातही उपलब्ध आहे. म्हणजेच खासगी व सरकारी अशा दोन्ही प्रकारे हा प्रकल्प पुढे नेला म्हणूनच मोठ्या प्रमाणात लसीकरण कमी वेळेत शक्य झाले.

पण काही विशिष्ट उद्योगसमूहांना अनुकूल अशी धोरणे अवलंबून सरकारने भांडवलशाहीचा घात मात्र करु नये तसेच कार्टेल सारख्या प्रकारांनाही आळा घालावा.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 12:02 am | चंद्रसूर्यकुमार

पन्नास वर्षापुर्वी एखाद्या खासगी कंपनीने अशा प्रकल्पात हात घातला असता का ? स्वातंत्र्यानंतर वीजनिर्मिती , रस्तेबांधणी , खाण या क्षेत्रात खासगी उद्द्योग मोठ्या प्रमाणात उतरू शकले असते वा उतरू इच्छिले असते का ? मुळात खासगी उद्द्योगांकडे इतके भांडवल वा त्यांना कर्जे देण्याकरिता बॅंकाकंडे पैसा होता का ? जागतिक बँक वा तत्सम संस्था खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देते का ?

अशी दिशाभूल नेहमी केली जाते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील उद्योगधंद्यांची अवस्था अगदी प्राथमिक होती त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन उद्योग उभारणे गरजेचे होते असा अपप्रचार इतका जोराने केला जातो की काही काळ मी एक आर्थिकदृष्ट्या उजवा माणूस असूनही त्या अपप्रचाराला फसलो होतो. एक महत्वाची गोष्ट ही की भारतात entrepreneurship ची परंपरा मोठी होती. भारत हा काही या बाबतीत सोमालिया किंवा तत्सम अविकसित देश नव्हता. ब्रिटिश काळातच खाजगी उद्योगांचे अनेकविध प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये नुसते अस्तित्वच नव्हते तर चांगले नाव होते.

१. बँकिंग-- पंजाब नॅशनल बँक (स्थापना वर्ष १८९४. संस्थापक- लाला लजपत राय), बँक ऑफ इंडीया (स्थापना वर्ष १९०६. संस्थापक- मुंबईतील खाजगी व्यावसायिक), बँक ऑफ बरोडा (स्थापना वर्ष १९०८. संस्थापक- सयाजीराव गायकवाड), सेंट्रल बँक ऑफ इंडीया (स्थापना वर्ष १९११. संस्थापक- फिरोजशाह मेहता, सोराबजी पोचकानवाला), कॅनरा बँक (स्थापना वर्ष १९०६. संस्थापक- ए.सुब्बाराव पै), इंडीयन बँक (स्थापना वर्ष १९०७. संस्थापक- व्ही.कृष्णस्वामी अय्यर), बँक ऑफ महाराष्ट्र (स्थापना वर्ष १९३५. संस्थापक- धोंडुमामा साठे), युको बँक (स्थापना वर्ष १९४३. संस्थापक- घनश्यामदास बिर्ला), आंध्र बँक (स्थापना वर्ष १९२३. संस्थापक- पट्टाभी सितारामय्या). यातल्याच बँका इंदिरा गांधींनी आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन सरळ सरळ दरोडेखोरी करून १९६९ मध्ये आणि नंतर १९८० मध्ये ताब्यात घेतल्या.

२. वाहन उद्योग- टाटा मोटर्स- पूर्वीचे नाव टेल्को (स्थापना वर्ष- १९४५. टाटा ग्रुप). हिंदुस्तान मोटर्स (स्थापना वर्ष- १९४२. बिर्ला ग्रुप), महिन्द्रा अ‍ॅन्ड महिन्द्रा- पूर्वीचे नाव महंमद अ‍ॅन्ड महिन्द्रा (स्थापना वर्ष १९४५. महिन्द्रा ग्रुप), बजाज ऑटो (स्थापना वर्ष १९४५. बजाज ग्रुप).

३. स्टील- टाटा स्टील (स्थापना वर्ष-१९०७, टाटा ग्रुप)

४. विमान उद्योग- टाटा एअरलाईन्स- एअर इंडिया (स्थापना वर्ष १९३२). इतरही लहान विमानकंपन्या होत्या. उदाहरणार्थ हिमालय एअरवेज, अंबिका एअरवेज, कलिंगा एअरवेज वगैरे).

५. पेट्रोलियम- आसाम ऑईल कंपनी (स्थापना वर्ष-१९०१).

६. औषधनिर्माण- सिप्ला (स्थापना वर्ष- १९३५)

७. एफ.एम.सी.जी- ब्रिटानिया (स्थापना वर्ष- १८९२. सुरवात ब्रिटिश उद्योजकांनी केली होती पण १९१५ च्या सुमारास भारतीय उद्योजकांनी ही कंपनी विकत घेतली होती). डाबर (स्थापना वर्ष- १८८४)

हे मोठे उद्योग झाले. त्याबरोबर लहान उद्योगही होतेच. इतक्या बँका देशात होता आणि त्या उद्योगात टिकल्या म्हणजे कोणाला तरी कर्ज देतच असल्या पाहिजेत ना?

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय उद्योग अगदी अविकसित होते ही सरळसरळ बकवास आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजची स्थापना १८७८ मध्ये झाली होती आणि तो आशिया खंडातील पहिला शेअर बाजार होता. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुंबई शेअरबाजाराला ७० वर्षे झाली होती. तिथे १९४७ मध्ये किती कंपन्या लिस्टेड होत्या ही माहिती लगेच मिळाली नाही पण ती पण कुठेतरी मिळू शकेल. या भांडवल उभे करणार्‍या कंपन्या नक्की कोणत्या होत्या? खाजगीच ना?

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने दादागिरी करून अनेक उद्योगांमधून खाजगी कंपन्यांना जबरदस्तीने हाकलूनच दिले. आणि वर असे चित्र उभे केले की १९४७ मध्ये भारतीय उद्योग म्हणजे अगदी ओसाड जमिन होती आणि त्यावर नेहरूंनी मोठे राजमहाल बांधले. घंटा. सरकारने आय.आय.टी-आय.आय.एम ची स्थापना केली म्हणून मोठे कौतुक नेहमी केले जाते. मग आय.आय.टीच्याच तोडीच्या बिट्सची स्थापना देशात आय.आय.टीची स्थापना होत होती साधारण त्याच काळात झाली याकडे दुर्लक्ष का केले जाते? ती कोणी केली? तर बिर्लांनी. देशात पहिले आय.आय.एम स्थापन झाले कलकत्त्यात १९५९ मध्ये. त्याच तोडीच्या एक्स.एल.आर.आय ची स्थापना १९४९ मध्ये झाली होती. ती सरकारने केली होती का?

नेहरू आणि इंदिरा गांधींच्या सरकारांनी भारतीय उद्योगांचा गळाच घोटायचा प्रयत्न केला. हातात सत्ता आहे, नेहरू म्हणतात ही पूर्व दिशा आहे अशी परिस्थिती असताना अनेक उद्योगांमधून जबरदस्तीने खाजगी कंपन्यांनाच हाकलूनच दिले तर मग खाजगी क्षेत्राचा विकास होणार कसा? आणि काही वर्षांनी खाजगी क्षेत्र खुरटलेले दिसले की मग 'बघा सरकार होते म्हणून देशातील उद्योगांची ही तरी स्थिती आहे अन्यथा किती वाट लागली असती बघा' असा उलटा प्रचार करायचा. त्यापेक्षा खाजगी उद्योगांचा असा गळा घोटला नसता तर भारतीय कंपन्यांनी परदेशातील कंपन्या विकत घ्यायला २००० च्या दशकात सुरवात केली तीच स्थिती कदाचित ३०-४० वर्षे आधी आली असती.

असल्या टिपीकल डाव्या अपप्रचाराला अनेक शहाणेसुरते लोक बळी पडतात. त्यामुळे हे सगळे कधीतरी लिहायचेच होते. ते या निमित्ताने लिहित आहे.

तर्कवादी's picture

4 Dec 2021 - 12:24 am | तर्कवादी

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय उद्द्योग ओसाड होते असं मलाही म्हणायचं नाहीये. पण सर्वच क्षेत्रात खासगी क्षेत्रांनी गुंतवणूक केली असती का ? खास करुन असे क्षेत्र की ज्यातून नफा यायला अनेक वर्षे लागतील व गुंतवणूक मोठी आहे.. उदा. मोठे पॉवर प्लांट वा रेल्वे ई...
बाकी मी काही नेहरु वा इंदिरा गांधी ईत्यादींचा चाहता नाही.
बँकाचे वा एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण कदाचित चुकीच्या गोष्टी असतील तसेच खासगी उद्योगांचे पाय खेचणे असे प्रकार जर कोणत्याही सरकरने केले असतील तर ते नक्कीच चुकीचे आहेत
पण सरसकट सार्वजनिक क्षेत्रात जर सरकारने गुंतवणूक केलीच नसती तर खासगी क्षेत्राने सगळीकडे उत्साह दाखवला असता का , देशाची प्रगती झाली असती का याबद्दल काहीशी शंका वाटते.. उदा. आता जनतेकडे पैसा आहे , लोक टोल भरु शकतात आणि त्यामुळे खासगी कंपन्या रस्ते बांधणीस उत्सुक आहेत. पण काय ४०-५० वर्षापुर्वी अशी परिस्थिती होती का याबद्दल साशंकता आहे.

मला स्वत:ला डाव्या व उजव्या विचारसरणीशी बांधून घेणे फारसे पटत नाही पण स्पर्धात्मक भांडवलशाही व कल्याणकारी योजना या दोन्हीचे आपापले महत्व आहे असे मला वाटते. उदा: आज मी इंजिनिअर आहे , चांगल्या पगाराची नोकरी करतो. चांगल्या प्रकारे खर्च करु शकतो आणि चांगले जीवनमान जगण्याकरिता खासगी उद्दोगांच्या विविध सेवा /उत्पादने उपभोगतो.
पण मी इंजिनिअरिंग केले ते त्या वेळी फ्री सीट मधून (कमी शुल्क असलेल्या अनुदानित जागा) .. कॉलेजला जाण्यास लोकल ट्रेनचा स्टुडंट कन्सेशन पास वापरायचो. या कल्याणकारी योजनांमुळे मध्यमवर्गीय घरातला असूनही मला इंजिनिअरिंग करणे सुकर झाले.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 9:51 am | चंद्रसूर्यकुमार

सर्वच क्षेत्रात खासगी क्षेत्रांनी गुंतवणूक केली असती का ? खास करुन असे क्षेत्र की ज्यातून नफा यायला अनेक वर्षे लागतील व गुंतवणूक मोठी आहे.. उदा. मोठे पॉवर प्लांट वा रेल्वे ई...

टाटा पॉवर कंपनी १९०७ मध्ये स्थापन झाली. त्या कंपनीचे वीज प्रकल्प स्वातंत्र्याच्या आधीपासून होते. बेस्ट कंपनी सध्या महापालिकेच्या मालकीची आहे ती कंपनीही एकेकाळी खाजगी होती. १८७५ च्या आसपास महापालिकेकडून कंत्राट मिळवून शहरात घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या ट्राम्स चालविणार्‍या कंपनीचे नाव होते बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेड. त्याच कंपनीने १९०६ च्या सुमारास मुंबईत वीज प्रकल्प सुरू केला आणि मग कंपनीचे नाव बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट हे झाले. तीच कंपनी पुढे स्वातंत्र्यानंतर महापालिकेने जबरदस्तीने ताब्यात घेतली.अशाप्रकारेच कलकत्त्यात कॅलकाटा इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी (सी.ई.एस.सी) होती. त्या कंपनीचे कलकत्त्यात वीज प्रकल्प होते. त्यामुळे वीज प्रकल्पांमध्ये खाजगी कंपन्यांनी गुंतवणुक केली नसती हे म्हणणे कितपत तथ्याला धरून आहे हे मला माहित नाही. सिमेंट कंपन्यांनाही कमी गुंतवणुक लागते असे नाही. असोसिएट सिमेंट कंपनी (एसीसी) ची स्थापना १९३६ मध्ये झाली. त्यापूर्वी १० वेगवेगळ्या खाजगी सिमेंट कंपन्या होत्या. त्यात टाटांची सिमेंट कंपनी होती, खटावांची पण होती. या सगळ्या कंपन्या एकत्र येऊन एसीसीची स्थापना झाली. म्हणजे सिमेंटसारख्या क्षेत्रातही १९३६ पूर्वी खाजगी कंपन्या होत्या.

आता जनतेकडे पैसा आहे , लोक टोल भरु शकतात आणि त्यामुळे खासगी कंपन्या रस्ते बांधणीस उत्सुक आहेत. पण काय ४०-५० वर्षापुर्वी अशी परिस्थिती होती का याबद्दल साशंकता आहे.

अशा प्रश्नांवर इच्छा असेल तिथे मार्ग निघतो. आजही उत्तर प्रदेश-बिहारच्या काही भागांमध्ये लोक टोल भरायला तयार नसतात. अशा ठिकाणी एन.एच.ए.आय सरळ कंत्राटे देऊन हायवे बांधून घेते. पूर्वी कंत्राटे दिली जायची अगदी नाही असे नाही. पण ती जास्त रस्ते दुरूस्तीच्या कामांची किंवा स्थानिक ठिकाणी रस्ते बांधायला असायची. हायवे बांधायची कंत्राटे द्यायचा प्रकार गेल्या वीसेक वर्षातील. पूर्वी सगळे काही सरकारनेच करायचे हे बंधन आपणच आपल्यावर घालून घेतले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिल्या एक्सप्रेसवेमधील. तो तयार झाला १९९८-९९ च्या सुमारास. असे एक्सप्रेसवे यायला स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे लागली यातच सगळे काही आले. सगळे काही सरकारने बांधण्यापेक्षा जर अशी कंत्राटे देऊन महामार्ग बांधून घेतले असते तर ही सगळी प्रगती किमान ४० वर्षे आधी करता येऊ शकली असती. भारतात तंत्रज्ञांची अजिबात कमी नव्हती. कामगारांचीही काही कमी नव्हती. पण खाजगी क्षेत्र म्हणजे जनतेला लुटायलाच टपलेले हा ग्रह करून घेतला तर त्याला काही इलाज नाही.

इंदिरांनी १९७३ मध्ये कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करून कोल इंडीया लिमिटेडची स्थापना केली. म्हणजे त्यापूर्वी खाजगी खाणकंपन्याही होत्या. जिथे जिथे राष्ट्रीयीकरण केले तिथे तिथे असे ढापून केलेले आहे. मुळात राष्ट्रीयीकरण केले याचाच अर्थ पूर्वी खाजगी कंपन्यांचे अस्तित्व होते.

पण मी इंजिनिअरिंग केले ते त्या वेळी फ्री सीट मधून (कमी शुल्क असलेल्या अनुदानित जागा) .. कॉलेजला जाण्यास लोकल ट्रेनचा स्टुडंट कन्सेशन पास वापरायचो. या कल्याणकारी योजनांमुळे मध्यमवर्गीय घरातला असूनही मला इंजिनिअरिंग करणे सुकर झाले.

अशाप्रकारे मर्यादित कल्याणकारी राज्य ठेवायला कोणाची ना असेल असे वाटत नाही. पण त्या नावावर जो प्रकार झाला तो राजाच्या नाकावर बसलेली माशी हाकलायला राजाचे नाकच कापणे नव्हे राजालाच ठार मारण्यासारखा तो प्रकार होता.

तर्कवादी's picture

5 Dec 2021 - 12:12 am | तर्कवादी

आपले म्हणणेही बरोबर आहे... तसं म्हंटलं तर हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
पण अशा चर्चांच्या निमित्ताने वैचारिक देवाण घेवाण होते आणि ज्ञानात भर पडते .. आपल्याकडून आलेल्या महत्वपूर्ण मुद्द्यांबद्दल धन्यवाद..

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 12:31 pm | आग्या१९९०

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातून कच्च्या मालाची निर्यात अधिक होत असे आणि अंदाजे ५० % निर्यात ब्रिटनला होत असे. एका अर्थी भारतातील संपत्तीची निर्यात होत असे. दोन्हीकडे ब्रिटिशांची सत्ता असल्याने निर्यात, आयात कशाची आणि कुठे करायची हे त्यांच्याच हातात असल्याने स्थानिक पिकांच्या उत्पादनात असमतोल निर्माण झाला होता. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात खाजगी उद्योगधंदे आणि बँका जरूर होत्या. स्वातंत्र्यापूर्वी ह्या बँका कोणाला पतपुरवठा करत होत्या ह्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. देशातील ८०% जनता शेतीवर किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून होती. अन्नाचा तुटवडा, ग्रामीण भागात आर्थिक आणि औद्योगिक विकासाची वानवा. परकीय चलन किती होते ते ठाऊक नाही,परंतु औद्योगिक विकासासाठी परदेशी गुंतवणूक (आर्थिक आणि तांत्रिक) सहज उपलब्ध होईल इतके नक्कीच नसावे. गरिबांना पतपुरवठा करण्यास खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते. आजही खाजगी बँका छोट्या शेतकऱ्याला कर्ज देण्यास तयार नसतात. आपला देश कृषीप्रधान असल्याने त्या वर्गाची काळजी घेणे ह्याला प्राधान्य दिले गेले.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 12:46 pm | चंद्रसूर्यकुमार

परकीय चलन किती होते ते ठाऊक नाही,परंतु औद्योगिक विकासासाठी परदेशी गुंतवणूक (आर्थिक आणि तांत्रिक) सहज उपलब्ध होईल इतके नक्कीच नसावे.

आपणच आपली दारे परकीय भांडवलाला बंद केली तर परकीय चलनाचा तुटवडा होणारच. त्यात काय नवल आहे?

गरिबांना पतपुरवठा करण्यास खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते. आजही खाजगी बँका छोट्या शेतकऱ्याला कर्ज देण्यास तयार नसतात.

हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले जाते. पण प्रश्न हा की आर.बी.आय ने नियमांमध्ये बदल करून हे सगळे बदल करता आले असते. १९६० च्या दशकात सुरवातीला लहान बँका बुडायचे प्रकार झाल्यावर लहान बँका सस्टेनेबल असू शकणार नाहीत म्हणून अनेक लहान बँकांचे रिझर्व्ह बँकेने मोठ्या बँकांमध्ये सक्तीने विलीनीकरण केले होते. ते सगळ्यांनी निमूटपणे ऐकले. १९७० मध्ये म्हणजे तथाकथित राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रायोरीटी सेक्टर लेंडिंगचे नियम आणले ते सगळ्यांनी- उरल्यासुरल्या खाजगी बँकांनीही ऐकले. अगदी अलीकडच्या काळात जनधन योजनेअंतर्गत शून्य बॅलन्सवाली खाती बँकांनी उघडायची सक्ती केल्यावरही ती सगळ्यांनी निमूटपणे पाळली. बँकांना आपल्या शाखा मनाप्रमाणे हव्या तितक्या उघडता येत नाहीत.बँकांना शाखा उघडायला पण रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. तेव्हा मुंबईत एक शाखा हवी असेल तर दोन शाखा ग्रामीण भागात उघडाव्या लागतील अशी सक्ती करता आली नसती का? अशी सक्ती डी.जी.सी.ए करते. जर मुंबई ते दिल्ली/बंगलोर/गोवा वगैरे लोकप्रिय रूटवर विमान रूट हवा असेल तर पाटणा, हुबळी, गुवाहाटी वगैरे ठिकाणी पण सेवा द्यावीच लागेल अशाप्रकारची. तेव्हा ही सगळी तथाकथित उद्दिष्टे राष्ट्रीयीकरण न करताही साध्य करता येणार्‍यातली होती. आणि दुसरे म्हणजे सरकारला बँकिंगमध्ये पडायचे असेल तर नव्या सरकारी बँका सुरू करायच्या की. कोणी अडवले होते? आधीच बिझनेसमध्ये असलेल्या खाजगी बँका सक्तीने ताब्यात घेणे कसे समर्थनीय ठरेल? ही शुध्द दरोडेखोरी होती.

पण कसे असते या प्रकाराचे समर्थन करायचे असले की पश्चातबुध्दी वापरून पाहिजे ती समर्थने तयार केली जातात.

सुबोध खरे's picture

4 Dec 2021 - 12:58 pm | सुबोध खरे

या प्रकाराचे समर्थन करायचे असले की पश्चातबुध्दी वापरून पाहिजे ती समर्थने तयार केली जातात.

बाडीस

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 1:04 pm | आग्या१९९०

आपणच आपली दारे परकीय भांडवलाला बंद केली तर परकीय चलनाचा तुटवडा होणारच. त्यात काय नवल आहे?
आज हे बोलायला सोपे वाटते. तेव्हा हे केले असते तर स्वातंत्र्य हे कागदावरच राहिले असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील आयात निर्यातीचे प्रमाण किती होते ते अभ्यासले तर जाणवेल भारतातून किती संपत्ती बाहेर गेली. निर्यातीतील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडणे सहज शक्य नव्हते. कृषि उत्पादनवाढीला प्राधान्य दिले हे योग्यच केले.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 1:24 pm | चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 1:04 pm | चंद्रसूर्यकुमार

१. खाजगी उद्योजकांनी स्वतः घाम गाळून, कष्ट करून उद्योग मोठे करायचे. एक दिवस सरकार येऊन सामाजिक न्यायाच्या गोंडस नावावर सक्तीने ते उद्योग ताब्यात घेणार. काही वर्षांनी असे चित्र उभे करणार की हे सगळे उद्योग सरकारनेच स्थापन केले आणि मोठे केले.

२. कोणाच्या घरी दरोडेखोर दरोडा घालणार आणि पैसे-वस्तू चोरणार. त्यानंतर ते पैसे कायम आपलेच होते अशाप्रकारे तो वापरणार.

३. मुळातल्या हिंदू वास्तू ताब्यात घेऊन त्या वास्तूंचे इस्लामीकरण करणार आणि मग चित्र उभे करणार की या वास्तू मुळात त्या इस्लामी आक्रमकांनीच उभारल्या होत्या.

या तीन घटना पूर्ण समकक्ष आहेत. डाव्या लोकांना (१) आणि (३) विषयी एवढे अतोनात प्रेम का असते कोणास ठाऊक.

रात्रीचे चांदणे's picture

4 Dec 2021 - 1:56 pm | रात्रीचे चांदणे

चंद्रसूर्यकुमार, माहितीबद्दल धन्यवाद, इंदिरागांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले म्हणजे भारताचे फार मोठे कल्याण केले असेच सांगितले जाते. मुळात लोकांनी कष्टाने उभारलेल्या बँका सरकारने बळजबरीने ताब्यात घेतल्या होत्या. बर हे राष्ट्रीयीकरण करूनसुद्धा बँका तळागाळात पोहचल्या आस काही नव्हते. कित्येक लोकांचे बँक अकाऊंट ही नव्हते. 2021 च्या आकडेवारीनुसार जनधन योजने अंतर्गत 43 कोटी खाती उघडण्यात आली आहेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 4:14 pm | चंद्रसूर्यकुमार

मुळात लोकांनी कष्टाने उभारलेल्या बँका सरकारने बळजबरीने ताब्यात घेतल्या होत्या.

हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसर्‍या कोणीतरी कष्ट करून, जोखिम घेऊन उद्योग उभा करायचा आणि वाढवायचा. त्यानंतर हे ढुढ्ढाचार्य येऊन सामाजिक न्यायाच्या नावावर तो बळजबरीने ताब्यात घेणार. इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयीकरणाला मोठ्या हिरीरीने पाठिंबा देणार्‍यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. समजा तुम्ही कष्ट करणार, तुम्ही घाम गाळणार आणि घर खरेदी करणार. त्यानंतर कोणीतरी येऊन तुम्हालाच तुमच्या घरातून हाकलून लावणार आणि म्हणणार की सामाजिक न्यायासाठी हे बरोबर नाही. देशातील इतक्या लोकांकडे घर नाही, ते रस्त्यावर राहतात आणि तुम्ही एका छप्पर असलेल्या घरी राहात आहात. तेव्हा तुम्ही इथून जा आणि त्या घरात इतर १० लोक राहायला येणार. हे जर तुम्हाला चालणार असेल तरच बँक राष्ट्रीयीकरणातून जबरदस्तीने खाजगी उद्योग ताब्यात घ्यायला पाठिंबा द्या.

जे.आर.डी टाटांनी एअर इंडियाची स्थापना केली आणि अगदी आपल्या लेकराप्रमाणे त्यांनी कंपनी सांभाळली होती. विमानात दिल्या जाणार्‍या नॅपकिन्सवर एकही डाग नको, केबिन क्रूचा युनिफॉर्म कडक इस्त्रीचाच असला पाहिजे, विमानात प्रवाशांना खाणे कसे द्यावे, संगीत कोणते लावावे वगैरे प्रत्येक लहानसहान गोष्टींची काळजी जे.आर.डी घ्यायचे. जे.आर.डींच्या काळात एअर इंडियाची वेगळी शान होती. वक्तशीरपणा इतका होता की एअर इंडियाचे विमान आले की लोक घड्याळाची वेळ लावायचे असे म्हणतात. एअर इंडिया गेल्याचे त्यांना खूप दु:ख झाले होते. नेहरूंच्या सरकारने त्यांची एअर इंडिया ताब्यात घेतली तरी निदान त्यांना एअर इंडियाचे डायरेक्टर म्हणून नेमायचे सौजन्य तरी दाखवले होते. इंदिरांच्या सरकारने बँका ताब्यात घेतल्या होत्या त्यांच्या संचालकांना तितकेही सौजन्य दाखवले असे दिसत नाही.

अण्णासाहेब चिरमुले यांनी भारतात विमा उद्योगाचा शास्त्रीय अभ्यास करून, स्वतः कष्ट घेऊन लोकप्रिय केला. लोकांकडून प्रिमिअम किती गोळा करायचा, त्यामागचे गणित काय, ते कसे करायचे हे सगळे त्यांनी त्याकाळी अमेरिकेतून पुस्तके मागवून त्यातून शिकून घेतले होते. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या अद्याक्षरांमुळे (Western India Mutual Assurance) इन्शुरन्सला विमा हा शब्द आला असेही म्हणतात. ज्या काळी विमा घेणे म्हणजे स्वतःचे मृत्यूपत्र लिहिण्यासारखे आहे असे समजले जायचे त्या काळात त्यांनी अपार कष्ट करून लोकांना विम्याचे महत्व समजावून सांगून आपली कंपनी मोठी केली. आणि पुढे काय झाले? १९५६ मध्ये सरकारने एका फटक्यात ही कंपनी ताब्यात घेतली आणि त्या कंपनीचे एल.आय.सी मध्ये विलीनीकरण केले. नशीबाने तो दिवस बघायची वेळ अण्णासाहेब चिरमुलेंवर आली नाही कारण १९५१ मध्येच त्यांचे निधन झाले. ते समजा असते तर त्यांना आपली कंपनी गेल्याचे किती अपार दु:ख झाले असते. इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे संस्थापक हयात असतील त्यांनाही असेच अपार दु:ख झाले असेल यात शंका नाही. दुसर्‍यांनी कष्ट करून बांधलेल्या घरात मूळ मालकाला हाकलून देऊन हे घुसणार आणि ते घर आपणच बांधले आहे असा अपप्रचार करणार. कित्येक लोकांना असेच वाटत असते की एल.आय.सी ची स्थापना नेहरूंनी केली आणि भारतात विमा उद्योग सुरू झाला. हे या डाव्या प्रोपोगांडाचे यश आहे. खोटे बोलणार आणि ते पण अगदी रेटून खोटे बोलणार. मोठे मोठे प्रोफेसर लोक हे सगळे कळायची क्षमता असूनही त्याकडे दुर्लक्ष करत त्याचेच गोडवे गात असतात तर मिडियातील पिट्ट्यांची काय कथा? जाम डोक्यात जातात हे डावे लोक.

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 6:05 pm | आग्या१९९०

इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे संस्थापक हयात असतील त्यांनाही असेच अपार दु:ख झाले असेल यात शंका नाही.
बँक मालकांना त्याबदल्यात मोबदला दिला होता. एखाद दुसरा अपवाद वगळता विनातक्रार सर्वांनी स्वीकारला.
सुस्थापित खाजगी बँकांसमोर सरकारी बँकांना तग धरणे कठीण झाले असते. जे केले ते योग्यच केले.
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अनेक सरकारी प्रकल्पात गेल्या. त्यांचेही कष्ट होतेच की.
शेतकऱ्यांकडून पंतप्रधान पीकविमा योजनेखाली विमाहप्ते गोळा करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना हात वरती केले. राज्य शासनाने केंद्राकडे तक्रार केल्याने कंपनीने नमते घेतले. खाजगीकरणाचे धोकेच जास्त.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 6:24 pm | चंद्रसूर्यकुमार

बँक मालकांना त्याबदल्यात मोबदला दिला होता. एखाद दुसरा अपवाद वगळता विनातक्रार सर्वांनी स्वीकारला.

:) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून त्यांना तो स्विकारावा लागला. देशातील १४ मोठ्या बँकांचे १००% शेअर बाजारभावाने विकत घेणे भारत सरकारला आजही परवडणार नाही. तेव्हा कुठचे परवडणार होते? एच.डी.एफ.सी बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन ८ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सरकारला परवडणार आहे का ती एक बँक विकत घेणे? ८ लाख कोटीची एक बँक सोडा- २ लाख कोटीची जरी एक बँक असेल तरी ती विकत घेणे तरी परवडणार आहे का? सगळ्या १४ बँका मिळून २ लाख कोटींच्या असतील तरी सहजपणे परवडणार आहे का?

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 1:53 pm | आग्या१९९०

हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले जाते. पण प्रश्न हा की आर.बी.आय ने नियमांमध्ये बदल करून हे सगळे बदल करता आले असते.
खाजगी बँका नियम पाळून सेवा देतीलच ह्याची काय खात्री? उगाच कालापव्यय करण्यात काहीच अर्थ नव्हता. जे केले ते योग्यच केले. फालतू रिस्क घेऊन गरीब जनतेचे हाल केले नाही. हरितक्रांतीमुळे आज आपण बव्हंशी आत्मनिर्भर झालोय.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 2:12 pm | चंद्रसूर्यकुमार

खाजगी बँका नियम पाळून सेवा देतीलच ह्याची काय खात्री?

खाजगी बँका नियमांचे पालन करणारच नाहीत याची काय खात्री होती? आर.बी.आयच्या बाकी सगळ्या नियमांचे पालन खाजगी बँका करत होत्या. काही बँकांचे आर.बी.आय ने सक्तीने विलीनीकरण करायचा आदेश दिला तरी तो पण त्यांनी मानला. फक्त हेच नियम खाजगी बँकांनी मानले नसते, बरोबर ना?

हरीतक्रांतीमुळे आपण आत्मनिर्भर झालो आहोत त्याचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाशी काय संबंध? हरीतक्रांतीची प्रक्रीया शास्त्री पंतप्रधान असताना सी.सुब्रमण्यम कृषीमंत्री होते तेव्हाच सुरू झाली होती. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर झाला जुलै १९६९ मध्ये. त्याला खाजगी बँकांच्या मालकांनी कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर फेब्रुवारी १९७० मध्ये तो निर्णय रद्द केला. त्यानंतर इंदिरांनी संसदेत तो बँक राष्ट्रीयीकरणाचा कायदा १९७० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करून घेतला आणि तो ३१ मार्च १९७० रोजी अंमलात आला. तोपर्यंत हरीतक्रांतीची प्रक्रीया बरीचशी पूर्ण झाली होती.

माननीय सुभाष पाळेकर, यांची भाषणे जरूर ऐका...

एक लिंक देतो

https://youtu.be/a-HTTMedE0I

----------

आज देशी वाणांची बोंबाबोंब सुरू आहे

हायब्रिड वाण, कीटकनाशके आणि रासायनिक खते, यामुळे आपल्या सगळ्यांचे शरीर म्हणजे, रासायनिक झाले आहे ....

कॉंग्रेसची देणगी आहे....

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 2:29 pm | आग्या१९९०

क्रोनोलोजीकडे दुर्लक्ष करा. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे धोरण कसे योग्य होते हे समजून घ्या.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 2:45 pm | चंद्रसूर्यकुमार

वा. वा. टाळ्या.

म्हणजे धोरण काय होते ते तपासून बघून ते योग्य होते की नाही हे समजून न घेता ते धोरण योग्यच होते हे आधीच ठरवायचे आणि ते योग्य कसे होते हे समजून घ्यायचे?

थोडेसे अवांतरः मध्याच्या डावीकडील लोकांची हीच तर खासियत असते. आणि असेच लोक सगळ्या जगाला शास्त्रीय दृष्टीकोनाबद्दल लेक्चर झोडत असतात. आहे की नाही मज्जा?

भारतीय खाजगी विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सेवा देण्यासाठी देशांतर्गत ५ वर्ष सेवा देणे अनिवार्य होते. नाही परवडले ह्या कंपन्यांना. काय झाले ह्या कंपन्यांचे?

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 3:17 pm | चंद्रसूर्यकुमार

नक्की प्रश्न कळला नाही. भारतीय विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय सेवा दिलीच पाहिजे असे अजिबात नाही. तरीही त्यांना पाहिजे असलेल्या भारतीय विमानकंपन्या आंतरराष्ट्रीय सेवा देतात. ते देणे परवडले नाही तर ते त्या सेवा बंद करतील. हाकानाका. त्यांना नुकसान झाले तर ते नुकसान त्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सचे असेल. पण आतापर्यंत एअर इंडियाला होणारे नुकसान करदाते- म्हणजे आपण सगळेच भरून देत होतो. हा फरक आहे.

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 3:28 pm | आग्या१९९०

खाजगी विमान कंपन्यांना किंवा बँकांना अमुक अमुक ठिकाणी सेवा देणे बंधनकारक करावे सरकारने.पण त्यांना त्याब्यात घेऊ नये असे मत व्यक्त केले होते. त्यांना ह्या अटी झेपल्या असत्या का? म्हणून वरील उदाहरण दिले.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 3:46 pm | चंद्रसूर्यकुमार

या अटी डी.जी.सी.एने घालाव्यात असे म्हणत नाही तर त्या अटी डी.जी.सी.ए घालतेच. सगळ्या कंपन्यांना मुंबई, दिल्ली, गोवा, बंगलोर, हैद्राबाद, जयपूर अशा मोजक्या विमानतळांवरच सेवा द्यायला आवडेल. पण गो एअर पाटणा, रायपूर, भुवनेश्वर वगैरे कमी लोकप्रिय ठिकाणी पण जाते. ते डी.जी.सी.ए च्या नियमांमुळे. तशा अटी १९६९ च्या बँक राष्ट्रीयीकरणाच्या वेळेसही घालून ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नाहीत यावर उपाय काढता आला असता. म्हणजे मुंबईत एक शाखा हवी असेल तर आधी गावातही शाखा उघडाव्या लागतील अशाप्रकारच्या. पूर्वी भारतात बार्कलेज ही ब्रिटिश बँक होती. त्या बँकेच्या मोजक्या शाखा भारतात होत्या. मुंबईत आणि बंगलोरमध्ये होत्याच. पण त्या बरोबर राजकोटमध्येही एक शाखा होती. आता राजकोटमध्ये शाखा कशाकरता? तर तो रिझर्व्ह बँकेने घातलेला दंडक होता- सगळ्या शाखा मुंबई-बंगलोरमध्ये नाहीत तर इतर ठिकाणी पण शाखा उघडावी लागेल. अन्यथा राजकोटसारख्या ठिकाणी ब्रिटिश बँकेची शाखा उघडली गेली नसती.

यात आंतरराष्ट्रीय विमान सेवांचे उदाहरण समकक्ष नाही. याचे कारण भारतात अमुक इतकी वर्षे सेवा द्या मगच आंतरराष्ट्रीय सेवेची परवानगी मिळेल अशा स्वरूपाची ही अट आहे. समजा खाजगी कंपन्यांना ते झेपले नाही तर त्या भारतातच सेवा देतील- आंतरराष्ट्रीय सेवा नाही. त्याप्रमाणे बँकिंगमधले उदाहरण द्यायचे झाले तर ग्रामीण भागात शाखा उघडाव्याच लागतील तरच शहरात नव्या शाखांना परवानगी मिळेल. ग्रामीण भागातील बँकेची शाखा फायद्यात असेल ही शक्यता कमी. मग तो तोटा भरून काढायला त्यांना शहरांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे एका अर्थी शहरी ग्राहक ग्रामीण भागातील ग्राहकांना 'क्रॉस सबसिडाईझ' करतात. तशी स्थिती विमान कंपन्यांमध्ये असते का (म्हणजे आंतरराष्ट्रीय सेवा भारतातील सेवांना क्रॉस सबसिडाईझ करतात) हे मला माहित नाही.

घोळात घोळ करून गोल गोल लिहिणे गोलपोस्ट बदलणे आणि शब्दांना फाटे फोडणे हा समाजवादी लोकांचा स्थायीभाव आहे.

तुम्ही आपला अमूल्य वेळ असल्या लोकांचे प्रबोधन करण्यात कशाला फुकट घालवता आहात?

मुक्त विहारि's picture

4 Dec 2021 - 2:19 pm | मुक्त विहारि

मुले ICICI आणि HDFC वापरतात...

मुलांना तरी खाजगी बॅन्केत, SBI पेक्षा चांगली सेवा मिळाली आणि मला देखील ...

हरितक्रांतीमुळे आज आपण बव्हंशी आत्मनिर्भर झालोय.

हो ना, खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी देखील, मर्सिडीज घेऊन फिरतो आणि बागायती शेतकरी लॅम्बाॅर्गिनी आणि फेरारी घेऊन फिरतो

इतकेच कशाला? मायबाख साठी तर, अल्पभूधारक शेतकरी वर्गाला पहिली पसंती असते

शिवाय, हरितक्रांती मुळेच, अल्पभूधारक शेतकरी वर्गाला इतका अमाप पैसा मिळतो की ते स्विस बॅन्केत पैसा ठेवतात ...

परमपूज्य माणसे, आता असेही सांगतील... तशी मानसिक तयारी करून ठेवली आहे ...

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 2:36 pm | आग्या१९९०

आमची कृषि कर्जे मोठी असतात, घाबरतात खाजगी बँका. देत नाय. परंतु शेअर ट्रेडिंगसाठी मार्जिन देतात. घेतो मुकाट्यानो.

मुक्त विहारि's picture

4 Dec 2021 - 5:54 pm | मुक्त विहारि

बाय द वे,

तुम्ही मोठे शेतकरी असल्याने, फेरारी किंवा गेला बाजार, लॅम्बाॅर्गिनी तरी असेलच

आणि तुमचे कामगार ऑडी मधून येत असतील, असा अंदाज आहे...

आग्या१९९०'s picture

4 Dec 2021 - 6:07 pm | आग्या१९९०

विरोधाभास समजला असेल असे समजतो.

मुक्त विहारि's picture

4 Dec 2021 - 8:45 pm | मुक्त विहारि

जेमतेम दहावी पास शेतकरी असल्याने, अशा गोष्टी समजत नाहीत...

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Dec 2021 - 4:20 pm | अनिरुद्ध.वैद्य

सेवा देतात?

सुबोध खरे's picture

13 Dec 2021 - 10:22 am | सुबोध खरे

सरकारी बॅंका सेवा देतात?

सरकारी बॅंका जे देतात, त्याला सेवा म्हणायचं

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 5:54 pm | मुक्त विहारि

दुर्दैवाने, एका सरकारी बॅन्केत खाते आहे

तिथे पुस्तक घेऊनच जातो

इथेच टाका तंबू, हे गाणे गुणगुणत, पुस्तक वाचायचे...

मुक्त विहारि's picture

3 Dec 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

माझे ते माझेच आणि तुझे तेही माझेच...

सगळ्या साम्यवादी लोकांना, उत्तर कोरिया मध्ये 5-6 वर्षे काम करायला पाठवायला पाहिजे ... आणि उदारमतवादी हिंदूंना सौदीत...

सुबोध खरे's picture

4 Dec 2021 - 10:38 am | सुबोध खरे

Communist until you get rich. ]

Feminist until you get married.

Atheist until the airplane starts falling.”

हे वाक्य बहुसंख्य उदारमतवादी दांभिक लोकांची वस्तुस्थिती दर्शवणारे आहे.

मी पूर्वी डाव्या विचारांनी प्रभावीत होतो.
उदा : वारसाहक्काने सम्पत्ती मिळू नये , प्रत्येक श्रीमंतीमागे काहीतरी गैरकृत्य असतेच , श्रीमंत गरीबांची पिलवणूक करतात , प्रत्येकाला अन्न मिळालेच पाहिजे
धर्म ही अफूची गोळी आहे, समाजात प्रर्त्येकजण सारखाच आहे , राष्ट्राच्या सम्पत्तीवर सर्वांचा हक्क आहे. संपत्ती म्हणजे सर्वनाश , लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली वगैरे वगैरे वर माझा ठाम विश्वास होता

काळाच्या ओघात यातले धर्माबाबतचे विधान सोडले तर इतर बाकी विधानांतील फोलपणा हळूहळू अनुभवाला येत गेला.
कष्ट , बुद्धी यामुळे समृद्धी येते, समृद्धी मुळे चांगले जगणे जगता येते.
जे गरीब आहेत त्यांच्याबद्दल वाईट वाटते पण काम न करता जगणारांबद्दल चीड येते.
साधनसंपत्ती निर्माण करण्यासाठी श्रीमंती ( भाम्डवल ) हवेच हे पटत गेले.
आज मी धार्मीक नाही पण इतरधर्मीयांचा कट्टरपण , शिक्षणाबद्दलची अनास्था , धर्माच्या नावाखाली काहीच न करता सर्वसामान्यांचा बुद्धीभेद करणे हे अनुभवतो.
यामुळे मी डावी कडून उजवीकडे येतोय असे मला वाटते.
गरीबांना गरीब ठेवण्यापेक्षा त्यांचे कष्ट बुद्धी वापरून त्यामुळे नवे भाम्डवल ( समृद्धी ) निर्माण करण्यात भांडलवदारांचे हीत आहे हे आता पटत चालले आहे.
शंतनुराव किर्लोस्करांचे एक वाक्य आठवते.
एखाद्या विणकराने कष्ट करून विणलेल्या रेशमी वस्त्राला कोणी विकत घेतले तर त्या विणकराचे पोट भरते. ते वस्त्र कोणी विकत घेतलेच नाही तर केवळ विणकरच नव्हे तर त्याचे कुटुंबीय आणि त्यांवर अवलंबून असणारे सर्वच जण नष्ट होतील. एक अर्थव्यवस्था उध्वस्त होईल.

धर्म ही अफूची गोळी आहे.

>> भारतीय धर्म आणि अब्राह्मिक रिलिजन ह्यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. कार्ल मार्क्सचे ते विधान अब्राहमिक रिलिजनसाठी आहे.
आणि धर्म आणि रिलिजन ह्यांच्यात फरक आहे. रिलिजन च्या जवळ जाणार शब्द आहे 'जात'. तज्ञांनी ह्यात भर टाकावी.

धर्म ही अफूची गोळी आहे.
>> भारतीय धर्म आणि अब्राह्मिक रिलिजन ह्यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. कार्ल मार्क्सचे ते विधान अब्राहमिक रिलिजनसाठी आहे.
आणि धर्म आणि रिलिजन ह्यांच्यात फरक आहे. रिलिजन च्या जवळ जाणार शब्द आहे 'जात'. तज्ञांनी ह्यात भर टाकावी.

ती अफूची गोळी तुम्हाला गुंगीत ठेवते. आसपासच्या इतर गोष्टींची जाण तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाही

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Dec 2021 - 4:55 pm | चंद्रसूर्यकुमार

धर्म ही अफूची गोळी आहे. आहेच. पण कम्युनिझम ही अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन आणि आणखी जे काही असेल त्या सगळ्याची एकत्र करून झालेली गोळी आहे. :)

प्रसाद गोडबोले's picture

4 Dec 2021 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले

धर्म ही अफूची गोळी आहे. आहेच. पण कम्युनिझम ही अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन आणि आणखी जे काही असेल त्या सगळ्याची एकत्र करून झालेली गोळी आहे. :)

नाही नाही , कम्युनिझम AIDS आहे . म्हणजे ज्या देशाला , ज्या "विचारवंताला" झालाय त्याला कळतच नाही , तो बिनधास्त पसरवत रहातो , स्वतः खंगुन खंगुन मरतो अन दुसर्‍यांनाही मारतो !
अन महत्वाचे म्हणजे मेल्यावरही AIDS ने मेलो हे मान्य करत नाही उगाच न्युमोनिया अन ट्युबर किलॉसिस अन अन्य बाकीच्या इन्फेक्शन्स वर खापर फोडत रहातो !

=))))

अवांतर : बाकीच्या गोष्टींच्या नादात उगाच गांजाला बदनाम करु नका , आता तर वर्ल्द हेल्य्थ ऑर्गनायझेशन देखील गांजाला श्येलुल्ड १ ड्रग्स च्या लिस्ट मधुन हटावण्याच्या उंबरठ्यावर आहे !

मुक्त विहारि's picture

4 Dec 2021 - 8:43 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

Trump's picture

4 Dec 2021 - 4:56 pm | Trump

बरोबर.
भारतीय धर्मामध्ये, त्याची चिकित्सा, टिकेला पुर्ण परवानगी आहे. सावरकर स्वतः नास्तिक होते. तो आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2021 - 9:38 pm | चौथा कोनाडा

काही लोक उजवीकडे -> डावीकडुन जाताना दिसतात.
रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होणार्‍या काही कार्यकर्त्यांचे आत्मकथन वाचण्यात आले होते. या चळवळीतील दांभीकपणा काही वर्षांनंतर लक्षात येऊन ते दुसर्‍या प्रवाहाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले होते !

रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होणार्‍या काही कार्यकर्त्यांचे आत्मकथन वाचण्यात आले होते. या चळवळीतील दांभीकपणा काही वर्षांनंतर लक्षात येऊन ते दुसर्‍या प्रवाहाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले होते !

त्यांचेही विचार वाचायला आवडतील.

चौथा कोनाडा's picture

5 Dec 2021 - 5:27 pm | चौथा कोनाडा

इथे तो संदर्भ द्यायचा विचार होताच, पण नाही सापडले. आणखी उत्खनन करून पाहतो.

फेसबुकवर वाचलेले आणि मला आवडलेले चिंतन खाली देत आहे :

WARTGD123

  • स्वतःचे नुकसान होऊ न देता, आपण टाळलेले प्रत्येक युद्ध हे आपण जिंकलेले असते.
  • युद्धातील सर्वोत्तम विजय हा युद्ध न लढता मिळवता येतो, युद्ध लढावेच लागल्यास ते शक्य तितके मर्यादित ठेवणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे हा उत्तम मार्ग असतो.
  • युद्ध हा फसलेल्या किंवा अपुऱ्या मुत्सद्देगिरीचा, त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या मनात आपल्या सामरिक क्षमतेची धास्ती नसल्याचा परिणाम असतो. 
  • युद्धाची भीती हा युद्ध टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

 

  • शीतयुद्ध शितपेटीत बंद होऊन न लढताच संपले ह्याचे कारण म्हणजे त्या युद्धाची भीती.
    • युद्धामुळे चुकवावी लागू शकेल अशी किंमत वाढत जाते तसतसे शांततेची शक्यता वाढत जाते.
    • युद्ध इतिहासात देखणे असते, त्याला तिथेच ठेवावे..
    • युद्धाची आठवण अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय असेलही पण ते करतांना, त्या आधी *फसलेल्या मुत्सद्देगिरीची, राजकारणाचीही आठवण ठेवायला हवी..

    =====================================================================================

    या धाग्याच्या चर्चेच्या संदर्भात हे किती लागू होते हे माहित नाही पण जेव्हा जेव्हा आस्तिक-नास्तिक, हिंसा-अहिंसा, भांडखोर-सहनशील, युद्धखोरी-शांततावादी, डावे-उजवे इ.इ, चर्चा सुरु होतात तेव्हा वरिल विचार मला हमखास आठवतात.

    शाम भागवत's picture

    6 Dec 2021 - 5:41 pm | शाम भागवत

    आज हा धागा वाचला.
    चंसूकू खूप छान मुद्दे मांडले आहेत. चर्चेच्या स्वरूपात मांडलेले मुद्दे जास्त भावतात. असे मुद्दे मांडायची संधी कधी सोडू नका.
    तुमचे अभ्यासपूर्ण मुद्दे मला वाचायला मिळतात या कारणासाठी मला पुरोगामी, समाजवादी आवडतात. ;)

    चंसूकू

    म्हणजे काय?

    प्रदीप's picture

    7 Dec 2021 - 2:18 pm | प्रदीप

    चंद्रसूर्यकुमार हा आय. डी.

    चौथा कोनाडा's picture

    8 Dec 2021 - 12:36 pm | चौथा कोनाडा

    जसा मी "चौको"
    (घ्या जाहिरात करून :-))

    वामन देशमुख's picture

    6 Dec 2021 - 9:55 pm | वामन देशमुख

    हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

    हिंदूंनी समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे यावरूनच हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत हे माझे अभ्यासांती बनलेले आणि मी यापूर्वी वेळोवेळी मांडलेले मत योग्यच आहे हे दिसते.

    खरेतर भारतातील हिंदूंनी, अहिंदूंच्या तुलनेत हिंदूंना अधिक अधिकार देणारा असा असमान नागरी कायदा तयार करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरायला हवा आणि तो प्रत्यक्षात येईल यासाठी तन मन धन अर्पून प्रयत्न करायला हवेत.

    तसे झाले नाही तर पुढच्या काही दशकांनंतर, "एके काळी या भूभागावर हिंदू नावाची एक धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, शत्रूवरही प्रेम करणारी (खरंतर स्वघातक, शहामृगी, कसायाला गाय धार्जिण वृत्तीची) एक जमात राहायची" अशी आठवण देखील कुणी करणार नाही.

    अशक्य वाटतेय? पर्शिया नामक देशात पहिला मुसलमान आल्यानंतर शंभर वर्षांच्या आत तेथील सर्व पारशींचा समूळ नाश झाला. त्यांची आता तिथे कुणी आठवणही करत नाही.

    तर्कवादी's picture

    6 Dec 2021 - 11:37 pm | तर्कवादी

    मग तुमच्या मते हिंदूचे अधिकार काय असावेत व अहिंदूंचे काय (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) असावेत ?

    हिंदुनी ख्रिश्चनांबरोबर असा व्यवहार करावा जसे ते आपल्या बरोबर करतात.
    हिंदुनी मुस्लिमांबरोबर असा व्यवहार करावा जसे ते आपल्या बरोबर करतात.

    तर्कवादी's picture

    7 Dec 2021 - 9:55 pm | तर्कवादी

    म्हणजे नेमका कसा ? उदारहण देवून सांगता येईल का ?
    शिवाय अहिंदू म्हणजे फक्त मुस्लिम व ख्रिश्चन नाहीत.

    तर्कवादी's picture

    7 Dec 2021 - 9:57 pm | तर्कवादी

    (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल)
    कोणत्याही धर्माची बांधिलकी वा धर्माचं लेबल ज्यांना अमान्य आहे असे लोक सुद्धा अहिंदूच (मग त्यांचा जन्म कोणत्याही धर्मात झालेला असू शकतो)

    Trump's picture

    7 Dec 2021 - 11:04 pm | Trump

    http://www.misalpav.com/comment/1127587#comment-1127587

    हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु

    तर्कवादी's picture

    8 Dec 2021 - 10:38 am | तर्कवादी

    हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु

    असं जबरदस्तीने म्हणणार का ?
    जो हिंदू धर्मात जन्माला आला नाही (ब अब्राहमिक धर्मातही नाही) त्याला स्वतःला हिंदू म्हणवून घेणे आवडत नसेल तरी त्याला जबरदस्तीने हिंदू म्हणणार का ?

    कोणी स्वतःला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदेशीदृष्ट्र्या हे योग्य आहे.
    दुर्देवाने हिंदू शब्द भरपुर बदनाम केला गेला आहे.

    इतर लोक अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) जे मी म्हणेल तेच खरे ह्याला कंटाळुन गेली आहेत.

    तर्कवादी's picture

    8 Dec 2021 - 4:30 pm | तर्कवादी

    कोणी स्वतःला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदेशीदृष्ट्र्या हे योग्य आहे.

    हिंदू हा एक धर्म आहे .. ज्याला तो धर्म पाळायचा तो पाळेलच .. आणि ज्याला नाही मानायचा कायदा काय त्याला सक्तीने तो धर्म मानायला भाग पाडणार का ?
    इतर धर्मीच्या (पारशी, शीख, जैन, बौद्ध ई ) लोकांना जबरदस्तीने हिंदू म्हणणे म्हणजे त्या धर्मांचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करणे नाही का ? हा एका अर्थाने त्या धर्मांचा अवमान होईल.

    तुमची हिंदु धर्माची व्याख्येत गल्लत आहे.

    असो.

    वामन देशमुख's picture

    13 Dec 2021 - 2:47 pm | वामन देशमुख

    तपशील पुढे ठरवता येतील, पण हेतू असा की हा भूभाग हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंचाच राहील याची तजवीज करणे.

    मग तुमच्या मते हिंदूचे अधिकार काय असावेत व अहिंदूंचे काय (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) असावेत ?

    उदाहरणार्थ -

    अहिंदूंचे अधिकार -
    *हिंदू धर्मात प्रवेश केल्यास (प्रवेश न करणाऱ्यांच्या तुलनेत) काही विशेष सुविधा
    *द्विभार्या प्रतिबंधक कायदा
    किमान ४९% भागीदारी हिंदूंची असेल तर अहिंदू उद्योजकाला कर आकारणीत सवलत

    हिंदूंचे अधिकार -
    *हिंदू धर्माचा त्याग करण्यास बंदी
    *पुरुषांनी एकाहून अधिक स्त्रियांशी विवाह करण्याची सुविधा
    १००% हिंदू मालकीच्या उद्योगाला कर आकारणीत सवलत

    * हे केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत आणि त्या उदाहरणांची प्रेरणा भारतातील सध्याचे कायदेच आहेत.

    मुळात भारतातील हिंदूंना, हिंदू म्हणून सध्या काही इन्सेंटिव्हज आहेत का? ते जाऊ द्या, भारतीय कायद्यापुढे हिंदू हे अहिंदूंच्या तुलनेत समान तरी आहेत का?

    बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल.

    हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.

    तर्कवादी's picture

    13 Dec 2021 - 5:46 pm | तर्कवादी

    हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.
    जबरदस्तीने ? त्यांना व्हायचे नसले तरी ?